नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी
नावावर clik करावे.
थॉमस अल्वा एडिसन हे जगप्रसिद्ध अमेरिकन संशोधक आणि उद्योजक होते. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यातील मिलान येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सॅम्युएल एडिसन व आईचे नाव नॅन्सी एडिसन होते. लहानपणी त्यांचे औपचारिक शिक्षण कमी झाले असले तरी आईच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी स्वतः अभ्यास करून विज्ञानाची गोडी निर्माण केली.
एडिसन यांनी आयुष्यभर सुमारे १००० पेक्षा अधिक शोधांचे पेटंट घेतले. अथक प्रयत्नाने त्यांनी विद्युत बल्बचा शोध लावला व व्यावहारिक उपयोगी प्रकार विकसित केल्यामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. याशिवाय फोनोग्राफ (ध्वनिमुद्रक), चलचित्र कॅमेरा, टेलिग्राफ सुधारणा, आणि विद्युत वितरण प्रणाली यांसारखे अनेक महत्त्वाचे शोध त्यांनी लावले. त्यांच्या शोधांमुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सोयीचे व आधुनिक झाले. त्यांनी जगातील पहिली औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली.
एडिसन यांचे कार्यपद्धती अत्यंत मेहनतीची होती. “मी अपयशी झालो नाही; मी फक्त १०,००० मार्ग शोधले जे काम करत नाहीत, अपयश म्हणजे "First Attempt In Learning” हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य त्यांच्या चिकाटीचे दर्शन घडवते. माणूस सकारात्मक असला की त्याच्या हातून होणाऱ्या गोष्टीसुद्धा सकारात्मक आणि भव्यदिव्य असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. त्यांनी न्यू जर्सी येथील मेनलो पार्क येथे संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली, जी जगातील पहिली औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा मानली जाते.
जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणाऱ्या या महान संशोधकाचा मृत्यू १८ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला. त्यांनी दिलेल्या शोधांमुळे विज्ञान, उद्योग आणि मानवजीवनावर अमिट ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांना “आधुनिक विद्युत युगाचा जनक” असेही म्हटले जाते. त्यांच्या जीवनातून परिश्रम, चिकाटी आणि नवकल्पनांची प्रेरणा मिळते.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने या महान संशोधकाला विनम्र अभिवादन
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी झाला.
दुसरा प्रश्न - विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन ने विद्युत बल्बचा शोध लावला.
तिसरा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन हे कोणत्या देशाचे संशोधक होते ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन हे अमेरिकेचे संशोधक होते ?
चौथा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांना काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन यांना “आधुनिक विद्युत युगाचा जनक” असेही म्हटले जाते.
शेवटचा पाचवा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांचा मृत्यू केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे - १८ ऑक्टोबर १९३१ रोजी थॉमस अल्वा एडिसन यांचा मृत्यू झाला.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment