Saturday 24 August 2019

Arun Jetli

नवी दिल्ली - देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी (24 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बायोग्राफी
महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी 26 मे 1014 ते 14 मे 2018  या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय 3 जून 2009 ते 26 मे 2014  या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.
जेटलींच्या या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करत त्यांचा अनेक आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. जेटलींचे घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील खूप मदत केली. जेटलींनी स्वता:ची मुलं ज्या शाळेत शिकवली त्याच शाळेत घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास मदत केली. 

मुलांचे शिक्षण सोबत घरातील कर्मचाऱ्यांच्या लेकरांचे शिक्षण

जेटलींचे राजकीय सचिव ओम शर्मा यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, अरुण जेटलींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी घरातील परिवारासारखे सांभाळले. तसेच ते नेत्यांना किंवा घरातील सद्यसांना जितका मान द्यायचे तितकाच मान घरातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील देत असत. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. जेटलींची मुलं चाणक्यपुरीतील कार्मेल कॉन्व्हेंट या शाळेत शिक्षण घेत होती, त्याच शाळेत त्यांनी घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील शिकण्यास मदत केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्याची ईच्छा असलेल्या मुलांना त्यांनी परदेशात शिक्षण घेण्यास मदत केली होती. 
त्याचप्रमाणे जेटलींच्या कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था करणार्‍या जोगेंद्रच्या दोन मुलींपैकी एक मुलगी लंडनमध्ये शिकत असल्याचे बोलले जाते. तसेच कर्मचाऱ्यांची मुलं एमबीए किंवा कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवू इच्छितात त्यांच्यासाठी अरुण जेटली फी पासून नोकरीची व्यवस्था करत असत

क्रिकेट विश्वात देखील सहभाग
अरुण जेटली यांच्या निधनानंतर भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागसह अन्य क्रिकेटपटूंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.  सेहवागने सांगितले की, अरुण जेटलींच्या निधनाच्या बातमीने खूप दू:ख झाले. तसेच जेव्हा दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष केले जात होते तेव्हा अरुण जेटलींनी दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष होण्याचे कारण ऐकून घेत अनेक क्रिकेटपटूंच्या समस्या देखील त्यांनी सोडविल्या.  त्यानंतर अनेक दिल्लीतील क्रिकेटपटूंना भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे सर्व जेटलींमुळेच शक्य झाल्याचे सेहवागने स्पष्ट केले. 

मुलाचे भावनिक बोलणं
जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मोदींनाही अतीव दुःख झालं. बातमी समजल्यानंतर मोदींनी लागलीच जेटलींच्या पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांच्याबरोबर फोनवरून संवाद साधला. देशाला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी तुम्ही परदेश दौऱ्यावर गेला आहात. त्यामुळे तुम्ही तो दौरा अर्धवट सोडून भारतात परतू नका. कोणत्याही व्यक्तीपेक्षा देश हा सर्वात पहिल्यांदा येतो. म्हणून तुमचा हा दौरा पूर्ण करूनच भारतात परता, अशा शब्दांमध्ये रोहन जेटलींनी मोदींकडे भावना व्यक्त केल्या. तसेच जेटलींसारखा चांगला मित्र गमावल्याची भावनाही मोदींनी व्यक्त केली.

अरविंद केजरीवाल यांना मागावी लागली माफी
दिल्ली क्रिकेट असोसिएशन भ्रष्टाचार प्रकरणात आरोप झाल्यावर जेटली यांनी केजरीवाल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह व राघव चढ्ढा व आशुतोष यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला होता. केजरीवाल यांनी जेटलींची माफी मागितली; परंतु संजय सिंह व आशुतोष यांनीही माफी मागायला हवी, असे जेटली म्हणाले व केजरीवाल यांची माफी अमान्य केली. नंतर चौघांनीही स्वतंत्र पत्र लिहून माफी मागितली. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे जेटली 1999 ते 2013 दरम्यान अध्यक्ष होते. या काळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप जेटली यांच्यावर झाले होते. डीडीसीए ही इतर क्रिकेट संस्थांसारखी नसून ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. तिचे 4600 सदस्य असून, त्यातील 300 कंपन्या आहेत
अरुण जेटली यांनी राजकारण आणि वकिली, अशा दोन्ही भूमिका त्यांनी उत्तमपणे निभावल्या. वास्तविक जेटली यांना चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) व्हायचे होते. तथापि, राष्ट्रीय परीक्षा प्रक्रियेतील तीव्र स्पर्धेमुळे त्यांना सीए होता आले नाही. त्यामुळे ते वकिलीकडे वळले.

टॉप 10 मध्ये असलेले वकील
दिल्ली विद्यापीठातून एलएल.बी. केल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे यशस्वी वकिली केली. अरुण जेटली देशातील टॉप-10 वकिलांपैकी एक होते. सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी अनेक खटले लढविले. जानेवारी 1990 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना ज्येष्ठ विधिज्ञाचा (सिनिअर अ‍ॅडव्होकेट) दर्जा दिला. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारने त्यांना देशाचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरलपदी नेमले. या काळात त्यांनी अनेक खटल्यांत सरकारची बाजू मांडली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधातील बोफोर्स खटल्याची कागदोपत्री कारवाईही त्यांनीच पूर्ण केली. राजकीय नेत्यांचे वकील म्हणून जेटली यांची ख्याती होती. भारतीय राजकारणातील दिग्गज नेतेमंडळी त्यांचे पक्षकार होते. जनता दलाचे नेते शरद यादव, काँग्रेस नेते माधवराव शिंदे, भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी ही त्यांच्या काही अशिलांची नावे होत. विधि आणि चालू घडामोडींवर आधारित अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘इंडो-ब्रिटिश लीगल फोरम’मध्ये त्यांनी भारतातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी या विषयवर एक शोधनिबंधही सादर केला होता. पेप्सिको आणि कोका-कोला यासारख्या काही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वतीनेही जेटली यांनी बाजू मांडली.

सौजन्य : इंटरनेट

भावपुर्ण श्रद्धांजली ......!

Friday 23 August 2019

सोशल मीडिया आणि आधार

सोशल मिडीया आणि आधार

फेसबुक आणि ट्विटरसह इतर सोशल मीडियावर आधार लिंक करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केली असल्याची बातमी वाचण्यात आली. एका दृष्टिकोनातून सरकारचे म्हणणे अगदी योग्य आहे असे वाटते. स्मार्टफोन आल्यापासून सोशल मिडीयाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्याचा चांगला वापर करणारी मंडळी खूप कमी आहेत, मात्र गैरवापर करणाऱ्या मंडळींचा भरणा सर्वात जास्त आहे. फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मिडियामध्ये सर्वात जास्त फेक अकाउंट आहेत. ज्यामुळे काय खरे आणि काय खोटे हे कळायला मार्ग नाही. बहुतांश जणांना याचा शारीरिक आणि आर्थिक त्रास देखील सहन करावा लागला. काही जणांची यात फसवणूक झाल्याचे प्रकार देखील घडले आहेत. याचा जास्तीत जास्त त्रास महिला वर्गांना होतो. व्हाट्सअप्प हे मोबाईल क्रमांक शी जोडलेले असल्यामुळेत्याच्यात सुरक्षितपणा वाटतो. म्हणून सध्या याचा वापर करणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच प्रमाणात दुसरीकडे मात्र विश्वास नसल्यामुळे महिला वर्ग दुसऱ्या सोशल मीडियाचा फार कमी वापर करतांनादिसून येतात. मात्र महिलांच्या नावाचा वापर करून अनेकजण फेक अकाउंट उघडण्याचे प्रकार भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे अफवा पसरविण्याचे प्रकार देखील वाढत आहेत. सोशल मिडियाला आधार लिंक करणे सोयीचे वाटत असले तरी या कार्डवरील माहिती सार्वत्रिक होण्याची भीती देखील आहे. मात्र सोशल मिडियावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे अंकुश निर्माण करणे भविष्यात खूप गरजेचे आहे, एवढं मात्र खरे

- नागोराव सा. येवतीकर

Wednesday 21 August 2019

टोकाचे पाऊल

लघुकथा - टोकाचे पाऊल

माधवने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असल्याची बातमी हा हा म्हणता म्हणता संपूर्ण गावात पसरली. थोड्या वेळानंतर पोलीस आले आणि त्यांनी पंचनामा केला. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली त्यात लिहिलं होतं की, माझ्या मृत्यूस संस्थेचे अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार आहेत. त्यांनी मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास दिल्यामुळे मला हे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. त्यामुळे या दोघांना अजिबात माफ करण्यात येऊ नये. संस्थेचे अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक यांना ही गोष्ट कळाली तसे ते दोघे फरार झाले. पोलीस त्यांच्या घरी जाऊन आले मात्र ते काही सापडले नाहीत. बायका-लेकरासह ते कुठे तरी दूर निघून गेले. माधवच्या आत्महत्येविषयी गावातील प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. प्रत्येकांच्या तोंडून त्यांच्याविषयी चांगलेच शब्द बाहेर पडत होते. अन्यायाविरुद्ध लढा द्यायला पाहिजे होता असे प्रत्येकजण म्हणत होते. पण प्रत्यक्षात त्याच्यावर जे प्रसंग ओढवले ते खरंच खूप कठीण होते का ? ज्यामुळे माधवला असे टोकाचे पाऊल उचलावे लागले. माधव हा चांगला शिकलेला, सुशिक्षित, साधा, भोळा आणि नाकासमोर चालणारा मनमिळाऊ स्वभावाचा होता. घरात अठरा विश्व दारिद्र्य असून देखील त्याने पदवी आणि बी एडचे शिक्षण पूर्ण केले. तो मुळात हुशार होता त्यामुळे त्याला कधीही नापासी ला तोंड द्यावे लागले नाही. त्याच गावात दहावी पर्यंतची एक संस्था होती. ज्यात त्याचे शिक्षण पूर्ण झाले. बी एडचा निकाल लागला आणि माधव प्रथम श्रेणीमध्ये पास झाला होता. बी एड झाल्यावर शिक्षकांची नोकरी नक्की मिळते या आशेवर त्याने वेगवेगळ्या शाळेत जाऊन आला. पण प्रत्येक ठिकाणी त्याच्या हुशारी पेक्षा पैश्याला जास्त मागणी होऊ लागली. माधव जवळ पैसा नव्हता त्यामुळे त्याला कोठेच नोकरी मिळत नव्हती. दिवसेंदिवस त्याचे दिवस खूपच कठीण होऊ लागले. मिळेल ते काम करत तो कसेबसे दिवस काढत होता. गावातील संस्थेचे अध्यक्ष एके दिवशी रस्त्याने जातांना माधवला रस्त्यावर काम करतांना पाहिले. त्याला माधवची कीव आली. त्याने घरी भेटायला येण्याचे कळविले. तसा तो सायंकाळी घरी गेला. अध्यक्षांनी त्याची चांगली विचारपूस केली, चौकशी केली आणि त्यांच्या शाळेवर शिकवायला येण्यास सांगितले. महिन्याकाठी चार ते पाच हजार रुपयांच्या नोकरीवर माधव शाळेत शिकवायला जाऊ लागला. अध्यक्ष साहेब खरोखरच देवमाणूस होता. असेच वर्ष दोन वर्षे सरले. माधव शाळेत छान शिकवू लागला होता. त्यामुळे त्याची प्रसिद्धी ही वाढली होती मात्र त्याच्या वेतनात काही वाढ झाली नव्हती. एके दिवशी त्याने अध्यक्ष साहेबांना वेतन वाढवून द्यावे आणि शाळेत कायमची नोकरी द्यावी म्हणून विनंती केली. साहेबांनी मान्य देखील केली. येत्या जून महिन्यापासून माधवला शाळेत कायम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. माधवला त्यादिवशी खूप आनंद झाला. काही दिवसानंतर आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत कायम होणार याचा त्याला खूप अप्रुप वाटत होतं. पण माधवचं नशीब खोटं होतं म्हणूनच की काय फेब्रुवारी महिन्यात अध्यक्ष साहेबांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. माधवच्या जीवनात अध्यक्षांचे जाणे टर्निंग पॉईंट ठरले. अध्यक्षाच्या जाण्याने त्याच्या जागी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या मुलाची नेमणूक करण्यात आली. तो तिशीच्या आतील तरुण आणि लाडात वाढलेला होता. त्याला कोणाच्या सुखदुःखाची काही काळजी नव्हती. तो आपल्याच मस्तीत जगत असे. मुलगा अध्यक्ष झाल्यापासुन शाळेचे जे चांगले वैभव होते ते बदलायला सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक आणि अध्यक्ष आता एकाच ताटात जेवणारे बनले. मुख्याध्यापकानी त्याला खाण्याची, पिण्याची आणि इतर वाईट गोष्टीची सवय लावली. त्याला देखील तेच गोड वाटत होते. पूर्वीच्या अध्यक्षांनी जून पासून माधवला कायम करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी त्याचे काम केले होते. माधव ला शाळेत कायम नोकरीवर घेण्याचे पत्र संस्थेला मिळाले. मुख्याध्यापकाने सर्वप्रथम ते पत्र अध्यक्षाला दाखविले. माधवला आपल्या संस्थेत फुकटात लागला आहे. आता तो चार पाच हजार रुपयेवर नोकरी करत आहे मात्र या पत्राने तो पंचवीस ते तीस हजार पगार उचलतो. तेंव्हा त्याच्याकडून काही तरी देणगी घ्यावी. अध्यक्षांच्या कानात त्याने ही फुंकणी मारली. माधवला पत्र आल्याची बातमी कळाली तसा तो खूप आनंदी झाला. त्याने मुख्याध्यापकाकडे पत्राची मागणी केली तर त्याने अध्यक्षाकडे जा असे सांगितले. माधव मग अध्यक्षांच्या घरी गेले आणि पत्राची मागणी केली. त्यावेळी अध्यक्ष महोदय घरात बसून दारूचे पेग घशाखाली घालत होते. एवढ्या सकाळी दारू पित असल्याचे पाहून माधवला देखील कसे तरी वाटत होते. दारूच्या नशेत तो म्हणाला, एक लाख रुपये घेऊन ये, तरच तुला हे पत्र मिळेल, अन्यथा नाही. माधव ने खूप विनंती केली. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. शेवटी नाराज होऊन तो आपल्या घरी परत आला. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा भरल्या नंतर मुख्याध्यापकाने कालच्या विषयी माधवला विचारणा केली. माधवने घडलेली घटना सांगितली. त्यावर मुख्याध्यापकाने मधला मार्ग सांगितला तो म्हणाला, एकदाच पैसे देता येत नसेल तर महिन्याला दहा हजार रुपये भरून एक लाख पूर्ण कर. माधवला हे पटले. मग त्याने मुख्याध्यापका ला सोबत घेऊन अध्यक्षांच्या घरी गेले. मुख्यध्यापकाने सांगितल्याप्रमाणेच तो बोलला आणि त्याची नोकरी तिथे टिकली. काही ही त्रास न घेता फुकटचे एक लाख रुपये मिळाले म्हणून त्यादिवशी दोघांनी जंगी पार्टी केली. नोकरी कायम झाल्यावर दिवाळी च्या सत्रात माधवचे लग्न झाले. सुशील आणि सुंदर मुलीसोबत माधवचे लग्न झाले. नजर लागावी अशी गोरीपान आणि सोज्वळ बायकोमुळे त्यांचा संसार सुखात चालू होता. दरमहा दहा हजार रुपये देत देत एक लाख रुपयांची देणगी माधवने दिली. एवढ्या गोष्टीवर खुश होणारे ते कसले मानव ! काही दिवसानी अध्यक्षांचा वाढदिवस आहे आणि ते साजरा करण्यासाठी त्यांनी माधवला पंचवीस हजारांची मागणी केली. माधवला नकार देणे अशक्य होते. दरवर्षी वाढदिवसाला ही रक्कम काढून ठेवावीच लागायची. एके वर्षी शाळेत वर्गखोली बांधायचे आहे म्हणून सर्वांकडून एक लाख रुपये देण्याची मागणी झाली. माधवला हे सर्व जड जात होतं. घरात कमावता एकटाच असल्यामुळे पगारातील एक ही पैसा मागे पडत नव्हता. हे एक लाख रुपये कसे द्यायचे याची त्याला काळजी लागून होती. पैसे देऊ शकत नाही म्हटलं तर काय होते की, मनात नाना प्रकारच्या शंका. मागे असेच एका शिक्षकाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याला संस्थेतून काढून टाकण्यात आले होते. तशी पाळी येऊ नये म्हणून अध्यक्ष मागेल तेवढे पैसे माधव गुपचूप देत होता. अधुनमधून मुख्याध्यापक देखील माधवला त्रास देऊ लागला. तुला चांगले शिकविता येत नाही, पालकांची तुमच्याबाबत तक्रार आहे, मुलांवर तुमचे नियंत्रण नाही असे अनेक आरोप माधववर लावण्यात येऊ लागले. या सर्व प्रकारामुळे माधव प्रचंड मानसिक तणावाखाली जीवन जगत होता. माधवचा काही एक दोष नसतांना त्याला हकनाक त्रास दिल्या जात आहे हे इतर सहकार्यांना कळत होते मात्र ते काही करू शकत नव्हते. अध्यक्षांच्या मुलाचे लग्न जमले होते. काही दिवसांनी घरात लग्न सोहळा पार पडणार होता. त्यांच्या घरात सर्वत्र सनई चौघडा वाजत होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जो तो आपल्या कामात व्यस्त होते. माधवला देखील या लग्नकार्यात काम करणे क्रमप्राप्त होते. जाणूनबुझुन माधवला या लग्नकार्यात अगदी छोटे काम देण्यात आले होते. शाळेत शिकविणारा तो एक हुशार शिक्षक मात्र येथे त्याची फारच गोची झाली. त्याला आलेल्या पाहुण्यांना पाणी देण्याचे काम देण्यात आले. तो नकार देऊ शकला नसता, त्याला त्याच्या नोकरीची काळजी लागली होती. या कामामुळे माधव खूपच नाराज झाला.  लग्नकार्य संपले होते. माधवच्या घरातील सर्व मंडळी त्याच लग्नासाठी गेले होते. त्याला तो अपमान सहन झाला नाही, तो थेट घरी आला. घरात कुणीही नव्हते. घरी आल्याबरोबर रागाच्या भरात त्याने दार लावून घेतलं आणि छताच्या पंख्याला दोर बांधून गळफास घेतली आणि नेहमी अपमानित होणाऱ्या आपल्या जीवाला समाधान केलं.

- नागोराव सा. येवतीकर

उपक्रमातून शिक्षण

शिक्षक मित्रांनो,
सप्रेम नमस्कार.

उपक्रम पूर्ण वाचल्यानंतर आपल्या शाळेवर हा उपक्रम राबवायचा असेल तर खालील लिंकवर क्लीक करून *फक्त शिक्षकांनीच* या समुहात join व्हावे.

https://chat.whatsapp.com/1RpRh2hyecS3rJeQArZVTU

उपक्रमाचे नाव :
*माझा फळा - माझी लेखणी*

◆ कृती -
*हा उपक्रम शाळा स्तरावर तसेच वर्ग स्तरावर घेता येईल.

*मैदानात किंवा वर्गात एक फळा आणि खडू ठेवण्यात यावे.

*परिपाठमध्ये फळ्यावर आजचा विषय सर्व मुलांना सांगण्यात यावे.

*मुले वर्गात गेल्यानंतर एकेक विद्यार्थ्यांना त्या विषयाशी निगडित शब्द फळ्यावर लिहिण्यास सांगावे.

*दुपारपर्यंत सर्व विद्यार्थी लिहून झाल्यावर विद्यार्थ्यांना त्या फळ्याचे निरीक्षण करायला सांगणे.

*फळ्यावर लिहिलेले शब्द चुकीचे असतील तर त्यावर विद्यार्थी चर्चा करतील ( नाव न सांगता )

*ज्या विद्यार्थ्याने अचूक शब्द आणि सुंदर अक्षरांत लेखन केले त्याचे नाव दुसऱ्या दिवशी परिपाठात सर्वांसमोर सांगणे.

*रोज एक नवा विषय मुलांना देणे आणि विद्यार्थ्यांनी शब्दांचे फलक लेखन करणे.

फायदा -
*लेखनक्षमता विकसित होईल

*मुलांची शोधकवृत्ती वाढीस लागेल

*चुकीचे शब्द शोधल्यामुळे भविष्यात शब्द लेखनात चूका कमी होण्यास मदत होईल.

*मुलांच्या मनात आनंद निर्माण होईल.

*विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती वाढीस लागेल.

*इतरांपेक्षा आपले लेखन कसे आहे ? तो स्वतः ठरवेल आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल.

*विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला, कल्पनाशक्तीला वाव मिळतो.

*अभ्यास करण्यात गोडी निर्माण होईल

*विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

रोज एक नवा विषय या समुहात दिले जाईल, आपल्या शाळेत *माझा फळा - माझी लेखणी* राबविणाऱ्या शिक्षकांचे स्वागत आहे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
उपक्रमशील शिक्षक, नांदेड
9423625769

*उपक्रमातून शिक्षण समूह नियमावली*

*माझा फळा - माझी लेखणी या उपक्रमावर आपणांस दररोज काम करायचे आहे.

*त्याअनुषंगाने रोज सकाळी एक विषय समूहात पोस्ट करण्यात येईल

*त्याच विषयाच्या संबंधित माहिती आणि फक्त एक आणि एकच फोटो दुपारी एकनंतर share करायचे आहे.

*या उपक्रमाला प्रतिसाद कसा मिळतो ? यावर पुढील क्रिया ठरविता येणार आहे.

*आपणास काही समस्या असेल किंवा काही सूचना द्यायचे असतील तर admin च्या मोबाईल क्रमांकावर whatsapp करावे कृपया call करणे टाळावे.

*हा उपक्रम आपण सर्वजण शाळेवर सलग एक आठवडा राबविल्यानंतर याचे feedback घेणार आहोत.

*आपण सर्व शिक्षक आहोत, सुज्ञ आहोत. त्यामुळे येथे उपक्रमशिवाय कोणतीही पोस्ट करूच नये.

*आपले उपक्रम राज्यभर पोहोचविण्याचे काम या समुहाच्या माध्यमातून करण्याचा हा छोटा प्रयत्न आहे. 

*प्रत्येकांच्या उपक्रमाला येथे संधी मिळणार आहे. फक्त थोडा वेळ प्रत्येकाने सबुरीने घ्यावे.

*एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण मिळून मिसळून काम करणार आहोत.

*आपण करत असलेल्या उपक्रमाची documetnt करणे आवश्यक आहे म्हणून तशी तयारी करण्याचे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न असेल.

*सहकार्य करू या नक्की काही तरी वेगळं करून दाखवू या.*

आपण सर्व शिक्षक मित्रांनी विश्वास दाखवून समुहात सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत ........ आणि

धन्यवाद .......!

नासा येवतीकर, संयोजक

Tuesday 20 August 2019

अक्षर मानव संवाद बारा देगलूर


*|| अक्षर मानव संवाद सहवास : बारा ||*

*अतिथी : रामदास फुटाणे*

समाजात राबलेल्या एका मान्यवर, अभ्यासू व्यक्तीला बोलवावं आणि सलग त्या व्यक्तीच्या संगतीत राहावं, त्याला, त्याच्या कामाला समजून घ्यावं आणि आपण, आपला समाज उन्नत होण्यासाठी काही घावतंय का ते शोधावं, असा एक *'संवाद सहवास'* नावाचा अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून नियमित घेतला जातो.
याआधीचे संवाद सहवास डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी,  डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे यांच्याशी झाले.
आता बारावा संवाद सहवास होतोय *चित्रपट, चित्रकला, शिक्षण, आमदारकी, कविता, वात्रटिका, अशा अनेक क्षेत्रांत ख्यातनाम असलेले महाराष्ट्राचे लाडके नाना अर्थात रामदास फुटाणे* यांच्याशी.
निवांत, शांत ठिकाणी फक्त मोजक्या माणसांनी जमावं आणि मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घ्यावा, विचारमंथन व्हावं असा हा कार्यक्रम आहे.

*सर्वांना मुक्त प्रवेश. राहणं-जेवणं विनाशुल्क.महिलांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था*

*दिनांक : १२, १३ सप्टेंबर २०१९*
*स्थळ : देगलूर, जि. नांदेड*

*नावनोंदणीसाठी खालील गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे*

https://forms.gle/d31T3iGTHD3G9ssy7

अधिक माहितीसाठी संपर्क - 7350845785/
 8793414787/

Monday 19 August 2019

फोटोग्राफी

सहस्त्रकुंड धबधबा जि. नांदेड येथील माझ्या मोबाईलद्वारे काढलेला फोटो

*फोटोग्राफी कालची आणि आजची*

फोटो काढून घेणे अगदी लहानपणापासून आवडायचे. फोटो काढणारा माणूस दिसला की, फोटो काढून घेण्यासाठी आईजवळ रड काढायचो, पण फोटो काढण्याइतके पैसे आईजवळ नसायचे. मग काहीतरी समजूत काढून वेळ काढून न्यायची. फोटो काढणारा सहसा लग्न कार्यात जास्त दिसून यायचा. गावात कोणाचं लग्न आहे म्हटलं की, खास करून त्या फोटोवाल्याकडे बघत राहायचो. तो ज्या दिशेला कॅमेरा फिरवला त्या दिशेने पळत सुटायचो. नावरदेवाच्या मागे आम्हीच आणि नवरीच्या मागे देखील आम्हीच. फक्त फोटो काढण्यापुरते नाचणं. घरी फोटो काढायचं तरी कसं ? बाजाला उभं करायचं, त्याच्यावर एक पांघरून टाकायची मग आमचा मागचा पडदा तयार आणि फोटो काढायचं तेही कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. कॅमेरा मध्ये जो रोल असायचा त्यात फक्त 32 ते 36 फोटोच निघायचे. रोल भरला की पुन्हा दुसरा रोल टाकावं लागायचं. रोल टाकण्यासाठी अंधार असलेल्या घराचा आसरा घ्यावं लागायचं. रोल वर जरासा उजेड पडला तर संपूर्ण रोल खराब होण्याची भीती राहत असे. रोल भरला की, तालुका किंवा जिल्हाच्या ठिकाणी ते धुवायला पाठवित असे. लहानपणी आम्हाला या गोष्टीचा अचंबा वाटायचा की, फोटो धुवायला टाकले म्हणजे आपल्याकडे धोबी जसा पाण्यात कपडे धुतो तसे धुवायचे असतं का ? खूप दिवस त्या बोलण्याचा अर्थच कळाले नाही पण जेव्हा स्वतः कॅमेरा घेतला आणि तो भरल्यानंतर तो रोल धुवायला दिला तेंव्हा कळलं की हे काय भानगड आहे. कोडक कंपनीचा कॅमेरा आणि रोल खूप प्रसिद्ध होता. त्याच्या शोरूममध्ये लोकांची खूप गर्दी असायची.
नव्वदच्या दशकापर्यंत काळे पांढरे फोटोचा काळ होता, त्यानंतर रंगीत फोटोचा काळ सुरू झाला. पेपर किंवा एखाद्या पुस्तकातले फोटो खूप न्याहळून पाहायचो आणि असे फोटोग्राफी आपणांस करता येईल काय ? असा प्रश्न मनात यायचा. हातात कधी कॅमेरा आला नव्हता मात्र फोटोग्राफी करण्याची आवड हे फोटो बघूनच होत गेली. स्टुडियोमध्ये जाऊन फोटो काढण्याचा पहिला प्रसंग दहाव्या वर्गात शिकत असताना घडला. कारण ही तसेच होते, दहावीच्या परीक्षा फॉर्मवर फोटो लावायचा होता म्हणून त्यावेळी पहिला पासपोर्ट काढलो. पुढे पुढे या फोटोविषयी मनात अभिरुची निर्माण होत गेली. कधी कधी मित्रासोबत स्टुडियोमध्ये जाऊन बरेच फोटो काढण्यात आले. आपल्या काही आनंदाच्या क्षणात फोटो काढण्याचा मोह निर्माण व्हायचा पण त्याचा खर्च खिशाला परवडणारे नसायचे म्हणून हा मोह टाळत असायचो. लग्नात जर फोटोवाला नाही लावलं तर नवरदेव अगदी नाराज व्हायचे. लग्न म्हटले की फोटो आलेच, त्याशिवाय लग्न कसे पार पडणार ? गरीबातला गरीब पालक ही लग्नकार्यात फोटो काढणे टाळू शकत नसत. स्वतःची फोटोग्राफीचा हौस नोकरीला लागल्यावर पूर्ण करू शकलो. सातशे रुपयांचा एक कॅमेरा विकत घेतला आणि मनसोक्त फोटोग्राफी करू शकलो. आज ही ते सर्व फोटो पाहतांना मन भूतकाळात जाते. ह्या सर्व गोष्टींचा रिवाइंड करत असताना आजच्या काळात मोबाईल द्वारे जे फोटोग्राफी होत आहे त्याचे काहीच वाटत नाही. कॅमेरा व रोल मुळे ते फोटो धुणे गरजेचे असायचे. पण आज मोबाईलद्वारे काढलेले फोटो मोबाईलमधून नष्ट ही होऊन जातात मात्र त्याची प्रिंट सहसा कोणी काढत नाही. संगणक आणि मोबाईलमुळे जीवनातील प्रत्येक क्षण बंदिस्त करता येऊ लागले ही एक आनंदाची बाब आहे. कुठेही आणि केंव्हाही आज फोटो काढणे सोपे बनले आहे. मात्र काही महाभाग याचा गैरफायदा घेतात तेंव्हा मन उदास होते. आज प्रत्येकजण फोटोग्राफर झालंय हे मात्र खरं आहे. तरी ही फोटो काढण्याची एक कला असते जे की सर्वाना जमत नाही. सर्पमित्र तथा आमचे जिवलग मित्र क्रांती बुद्धेवार एक चांगला फोटोग्राफर आहे. त्याच्याकडे फोटो काढण्याची एक कला आहे, कसब आहे. त्यांच्या हातून उत्तमोत्तम फोटो निघतात. भविष्यात त्यांनी या कलेवर अधिक लक्ष द्यावे आणि सुंदर फोटोग्राफी करावे, असे आम्हांला वाटते. आज जागतिक छायाचित्रण दिवस त्यानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा .......

- नासा येवतीकर, धर्माबाद

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...