Saturday 24 August 2019

Arun Jetli

नवी दिल्ली - देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी (24 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बायोग्राफी
महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी 26 मे 1014 ते 14 मे 2018  या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय 3 जून 2009 ते 26 मे 2014  या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.
जेटलींच्या या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करत त्यांचा अनेक आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. जेटलींचे घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील खूप मदत केली. जेटलींनी स्वता:ची मुलं ज्या शाळेत शिकवली त्याच शाळेत घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास मदत केली. 

मुलांचे शिक्षण सोबत घरातील कर्मचाऱ्यांच्या लेकरांचे शिक्षण

जेटलींचे राजकीय सचिव ओम शर्मा यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, अरुण जेटलींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी घरातील परिवारासारखे सांभाळले. तसेच ते नेत्यांना किंवा घरातील सद्यसांना जितका मान द्यायचे तितकाच मान घरातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील देत असत. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. जेटलींची मुलं चाणक्यपुरीतील कार्मेल कॉन्व्हेंट या शाळेत शिक्षण घेत होती, त्याच शाळेत त्यांनी घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील शिकण्यास मदत केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्याची ईच्छा असलेल्या मुलांना त्यांनी परदेशात शिक्षण घेण्यास मदत केली होती. 
त्याचप्रमाणे जेटलींच्या कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था करणार्‍या जोगेंद्रच्या दोन मुलींपैकी एक मुलगी लंडनमध्ये शिकत असल्याचे बोलले जाते. तसेच कर्मचाऱ्यांची मुलं एमबीए किंवा कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवू इच्छितात त्यांच्यासाठी अरुण जेटली फी पासून नोकरीची व्यवस्था करत असत

क्रिकेट विश्वात देखील सहभाग
अरुण जेटली यांच्या निधनानंतर भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागसह अन्य क्रिकेटपटूंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.  सेहवागने सांगितले की, अरुण जेटलींच्या निधनाच्या बातमीने खूप दू:ख झाले. तसेच जेव्हा दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष केले जात होते तेव्हा अरुण जेटलींनी दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष होण्याचे कारण ऐकून घेत अनेक क्रिकेटपटूंच्या समस्या देखील त्यांनी सोडविल्या.  त्यानंतर अनेक दिल्लीतील क्रिकेटपटूंना भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे सर्व जेटलींमुळेच शक्य झाल्याचे सेहवागने स्पष्ट केले. 

मुलाचे भावनिक बोलणं
जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मोदींनाही अतीव दुःख झालं. बातमी समजल्यानंतर मोदींनी लागलीच जेटलींच्या पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांच्याबरोबर फोनवरून संवाद साधला. देशाला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी तुम्ही परदेश दौऱ्यावर गेला आहात. त्यामुळे तुम्ही तो दौरा अर्धवट सोडून भारतात परतू नका. कोणत्याही व्यक्तीपेक्षा देश हा सर्वात पहिल्यांदा येतो. म्हणून तुमचा हा दौरा पूर्ण करूनच भारतात परता, अशा शब्दांमध्ये रोहन जेटलींनी मोदींकडे भावना व्यक्त केल्या. तसेच जेटलींसारखा चांगला मित्र गमावल्याची भावनाही मोदींनी व्यक्त केली.

अरविंद केजरीवाल यांना मागावी लागली माफी
दिल्ली क्रिकेट असोसिएशन भ्रष्टाचार प्रकरणात आरोप झाल्यावर जेटली यांनी केजरीवाल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह व राघव चढ्ढा व आशुतोष यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला होता. केजरीवाल यांनी जेटलींची माफी मागितली; परंतु संजय सिंह व आशुतोष यांनीही माफी मागायला हवी, असे जेटली म्हणाले व केजरीवाल यांची माफी अमान्य केली. नंतर चौघांनीही स्वतंत्र पत्र लिहून माफी मागितली. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे जेटली 1999 ते 2013 दरम्यान अध्यक्ष होते. या काळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप जेटली यांच्यावर झाले होते. डीडीसीए ही इतर क्रिकेट संस्थांसारखी नसून ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. तिचे 4600 सदस्य असून, त्यातील 300 कंपन्या आहेत
अरुण जेटली यांनी राजकारण आणि वकिली, अशा दोन्ही भूमिका त्यांनी उत्तमपणे निभावल्या. वास्तविक जेटली यांना चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) व्हायचे होते. तथापि, राष्ट्रीय परीक्षा प्रक्रियेतील तीव्र स्पर्धेमुळे त्यांना सीए होता आले नाही. त्यामुळे ते वकिलीकडे वळले.

टॉप 10 मध्ये असलेले वकील
दिल्ली विद्यापीठातून एलएल.बी. केल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे यशस्वी वकिली केली. अरुण जेटली देशातील टॉप-10 वकिलांपैकी एक होते. सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी अनेक खटले लढविले. जानेवारी 1990 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना ज्येष्ठ विधिज्ञाचा (सिनिअर अ‍ॅडव्होकेट) दर्जा दिला. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारने त्यांना देशाचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरलपदी नेमले. या काळात त्यांनी अनेक खटल्यांत सरकारची बाजू मांडली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधातील बोफोर्स खटल्याची कागदोपत्री कारवाईही त्यांनीच पूर्ण केली. राजकीय नेत्यांचे वकील म्हणून जेटली यांची ख्याती होती. भारतीय राजकारणातील दिग्गज नेतेमंडळी त्यांचे पक्षकार होते. जनता दलाचे नेते शरद यादव, काँग्रेस नेते माधवराव शिंदे, भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी ही त्यांच्या काही अशिलांची नावे होत. विधि आणि चालू घडामोडींवर आधारित अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘इंडो-ब्रिटिश लीगल फोरम’मध्ये त्यांनी भारतातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी या विषयवर एक शोधनिबंधही सादर केला होता. पेप्सिको आणि कोका-कोला यासारख्या काही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वतीनेही जेटली यांनी बाजू मांडली.

सौजन्य : इंटरनेट

भावपुर्ण श्रद्धांजली ......!

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...