Friday 8 January 2016

नमस्कार ! आज शुक्रवार ,चारोळी स्पर्धेचा दिवस ! 
विषय :- आठवणी आजी अजोबांच्या 
संयोजक व परीक्षक :- डाॅ शिल्पाताई जोशी (मुंबई )
ग्राफिक्स :- उत्कर्ष देवणीकर सर (उमरगा )

नियम :-
1) वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत 
2) प्रत्येकी फक्त 2 चारोळ्या पोस्ट कराव्यात 
3) एकच चारोळी स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल 
4) दोन्ही ही चारोळ्या एकाच वेळी पोस्ट कराव्यात ! म्हणजे परीक्षण करताना अडचण येणार नाही 
5) चारोळी विषयाला अनुसरून असावी .
6) दुसऱ्या व चौथ्या चरणाच्या शेवटी यमक जुळावे




==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
 "आजोळची सर
येईल का हो कशाला?
दुधासारखी साय 
येईल का कधी पाण्याला?".....

जयश्री पाटील...👈🏻

 "भुतकाळात रमताच
स्मरे आजीची गोधडी
वृद्धाश्रम दिसताच
मज पडतात कोडी"....

जयश्री पाटील👈🏻


==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
 📚📚साहित्य मंथन 📚📚
                आयोजित 
🎤🎤काव्य मंथन 🎤🎤

💥💥चारोळी स्पर्धा 💥💥

💎आजी -आजोबांच्या आठवणी💎
1 ) आजी- आजोबांच्या आठवणी
काढता डोळ्यात येते पाणी
त्यांच्या तस्वीरात दिसते तीच माया
माझी झुकते मनापासून काया

     ✏🎯🎯🎯✒
  आप्पासाहेब सुरवसे सर
       लाखनगांवकर
2 )
आजीचा तो बटवा 
देतो रामबाणी उपाय
आजोळांची ती आस
मनी ओढ लावते खास
✏🎯🎯✒
 आप्पासाहेब सुरवसे सर 
        लाखनगांवकर
3 )
ताताची गोष्ट नि आजीची अंगाई
लाडक्या नातवंडांना झोपी घालण्यापायी
आजा-आजी कितीतरी धडपड करी
परी नातवांचा गोंधळ घरीच्या दारी

✒🎯🎯✏
आप्पासाहेब सुरवसे सर
  लाखनगांवकर
4 )
आजीच्या हातची कळण्याची भाकरी
लागे खमंग नि चवदार खुप न्यारी -भारी
आजोबांची शिकवण नि तत्व
घडवी आदर्श ,अष्टपैलू व्यक्तिमत्व
✒🎯🎯✏
  आप्पासाहेब सुरवसे सर
   लाखनगांवकर
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
 1 )
आजोबांच्या गोष्टी 
आजीचा बटवा
आपल्या मुलांना 
मिळवून द्यावा 
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
2 )  आज ही आठवतो 
मज आजीचा लळा 
गोड सुंदर गाण्याचा 
आजोबांचा गळा 
-  नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
 छाती भरदार,मिशा पिळदार,करारी बाणा ।
खजिनदार पदावर होते 
दिमतीला सेवक नाना ।
 - आजोबा निझाम सरकार मधे खजिनदार होते त्यांचे स्मृतिस अर्पण 
@ अरविंद कुलकर्णी 
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
आजी आजोबाच्या 
गोष्टी ची  मनी साठवण                           
पदों पदी  येते
त्यांची आठवण
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================

हरवली आज कुठे 
आजी आजोबांची माया ............
नुसत्याच ओल्या आठवणी 
वृध्द आश्रमाची छाया...
 नागेश काळे, चाकूर 
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
🍁 आजी- आजोबांच्या आठवणी 🍁

मुंबईहून गावी आल्यावर
येते आजी अन आजोबांची आठवण
तुम्ही जरी नसाल जगात
तरी सोबत माझ्या तुमची शिकवण

बाबाजी गोडसे
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
मनी साठवण आजी 
आजोबाच्या गोष्टी ची।                
काय वर्णावि थोरवि।                
त्यांच्या संस्कारांची                   
धोंडीरामसिंह ध राजपूत वैजापुर
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================

आजोळ आठवता मनी,
होतो आसवांचा भडीमार..
छत्र प्रेमाचे गेले निघुनी,
झाला जेव्हा भुकंपी अत्याचार..
     @ उत्कर्ष देवणीकर
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================

रक्ताचे केले पाणी, पायाच्या केला चपला,
आमचे भविष्य घडविण्यासाठी,
डगमगु देणार नाही कधीही तुमचे पाय,
होइन तुमच्या म्हातारपनाची काठी.

नशीब माझे होते खोटे,
पाहू शकलो नाही आजोबा तुम्हाला,
खुप तळमळतोय जीव माझा,
येउनी कुशीत घ्याल का आम्हाला?

_ क्रांती एस. बुद्धेवार
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
आजोबा मायेचा सागर
आजी प्रेमाचाच झरा
गोधडीची ऊब छान
मस्त मायेचा निवारा

आजीची गोधडी थालीपीठ  लोणी
अंगाईची बरोबरी करेल ना कोणी
आजोबांचा राग प्रेम वागणं मित्रावाणी
संस्काराची शिदोरी येते डोळ्यात पाणी.

उर्मिला  बांदिवडेकर
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
🌺 चारोळी स्पर्धा🌺
 👪आजी-आजोबा 👪
 "नात्याला असे प्रेमाचा पिळा,
असे घराला घरपणाची कळा,
आजी आजोबा संस्काराची शाळा,
 तिथे पिके माणुसकीचा मळा"


"आजीआजोबाची व्यथाच न्यारी,
 सुसंस्काराची केली त्यानी पेरणी जरी,
कृतघ्नतेची पीके आज विषारी,
एकाकी जीव आज  वृध्दाश्रमाच्या दारी "
   संगीता देशमुख,वसमत
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
 🌷चारोळी स्पर्धा🌷  

  बापाचा बाप तो 
नाही त्याचा माप हो 
करुनी कचरा जिवाचा 
करत राहतो कष्ठ हो 
✒....खमितकर उमेश
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
होतो काल मी यौवनामधे,
त्याच आठवणींत रमतो माजी.
त्याच वयामधे रहात असतो,
जरी असलो आजोबा आजी.

डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
कोणी बघतो ताजमहाल
आयफेल  टाॅवर बघतो कोणी
नातवानं भिंतीवर मारलेल्या रेघोट्यात
आजोबांना मात्र सापडतात अजिंठ्याची लेणी!

नदी म्हणजे लोकमाता हे आम्ही शिकलेलं
नद्यांचं ऋण आम्ही मानलेलं
नातींची नावं गंगा सिंधू ठेवून 
त्यांना चक्क घरात आणलेलं!

उषा तुपकर,सोलापूर.
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


==================================
अाजोबा म्हणजे  जसे जरदाळु
वर कणखर पण आतून मायाळू
आजी आतून बाहेरून कोमल
जसे की सायीत साखर मिसळू
सुनिल बेंडे वसमत
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

==================================
घरी आजोबांचा दरारा असतो!
खरंच तो बापाचा बाप शोभतो!!
नातवांस खुप मायाळू भासतो!
पण इतरांना जमदग्नी वाटतो!!

                   रामराव जाधव. 

काय सांगु आजोबाची महती!
भरदार मिशी,कानी भिकबाळी!
करकर वाजती पायाची वहान!!
सोनेरी चाळीशी,तोंडात कवळी!!

                    रामराव जाधव.
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

==================================
 ✨✨✨✨✨✨
चारोळी मंथन स्पर्धा
🌱🌱🌱🌱🌱🌱

थरथरलेले हात अाजी अाजोबांचे
अाशिर्वाद देण्या जेव्हा उठतात
शिणलेल्या देहाकड पाहुन
नकळत अश्रु नयनी माझे दाटतात

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱


हूंदका माझा ऐकूण अाजीअाजोबा
अाजही पेटूण उठतात
जगण्याचा अर्थ सांगून
लढण्याचे बळ मज देतात

✨✨✨✨✨✨✨
         🎯 मारुती तु.खुडे
            (9823922702)
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

==================================
🌷 चारोळी स्पर्धा 🌷
साहित्य मंथन समूह
💐💐💐💐💐💐💐
विषय-आजी आजोबा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
1
आजी आजोबांचे थकले पहा गात्र
दिसे भोगलेले काळे दिवस नि रात्र
ओहोटीच्या लाटेचे शेवटचे सत्र
जपावे सुखी घराचे प्रेमळ छत्र
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
2
हवे असतात आजी आजोबाना
थोडी माया नि चार शब्द प्रेमाचे ...
चुकूनही कधी दुखवू नका त्यांना
थोडे भान ठेवा जरा त्यांच्या ऋणाचे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

==================================
चारोळी स्पर्धा :-

विषयः- आजी-आजोबा
*********************

बालपणीच्या आठवणीने मन भरून आले,
देवाघरी गेलेले आजी -आजोबा आठवले,
दे देवा एकदा परत मज ते बालपण,
घेवू दे तेच सुख परत, जे तू हिरावले.....

********************

माझ्या आजोळी हत्ती ऐश्वर्याचा झूले,
आजीच्या कुशीत ममतेची बाग फुले,
चार दिवसांचे मिळत असे हे आजोळपण,
पण आजोबांच्या आठवणीत सदा मन फुले .....
*********************

निर्मला सोनी.
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

==================================
 चारोळी स्पर्धा
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
विषय:- आजी-आजोबा
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
आजा रानातल पीक
आजी पीकातल पाणी
जसा डोलतो जोंधळा
शेंडी सोन्या मोत्या वाणी
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
माझ्या आजाच्या डोळ्यात
नव्या जगाच सपाणं.....
आजी सपनाचा मार्ग
जातो सुखाच्या वाटणं.....
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
निखिल स.जगताप
बेलसर ता.पुरंदर जि.पुणे
मो.नं.९८५०५९०३७४
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

==================================
माझे आजोबा आणि आजी 
म्हणजे दूध आणि साय.
त्यांची मी ममता तोलू कशी
 तूच सांग ना मला ग माय.
***********************
2)
आठवण काढाया, विसरले कधी मी 
आजी आजोबा तुम्हांला?
आजीचा बटवा जपूनी,आजोबा तुमच्या गोष्टी
   सांगत असते सदैव मी नातवाला.
                   सुलभा कुलकणीॅ.
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
==================================
साहित्य मंथन चारोळी स्पर्धा : 
आठवण आजी आजोबांची
१  
आता आजोळच्या वाटे
     होई मन माझे हळवे, 
  डोळ्यातले पाणी दाटते
    आजी आजोबाना शोधते

२ 
पोरंक करून आजोबांना
   आजी गेली वैकुंठाला
   मनात दडवून दु:खाला
  आपलं मानल  अनाथांना

३ 
सासरी जाताना नातीला 
 अाजीनी पांघरली पैठणी
 देऊन ठेवा संस्कारांचा
आजोबांनी केली पाठवणी।

४ 
मोटेवर बसून ,मस्त गायचो गाणी।
आजी आणायची ,छान
भाकर नी लोणी।
 आंब्याची आढी गच्चीवरख
लावायचे आजोबा।
झोपाळ्यावर नातवंडांचा
हा धांगडधिंगा।

५ 
आजीच्या रांगोळीत
  किती रेखीव रेशा।
 आजोबांच्या नाकावर
 या एवढ्या मिशा।
पायातल्या वहाणा
करकर वाजतात
गावगुंडावर आजोबा
दरारा ठेवतात।

६ 
आजीच्या हातची पुरणपोळी
 वाटीभरून आमरस फुगरी पुरी
आजोबांच्या हाती ऐटदार काठी
नातवंडासाठी  मायेची गळामिठी।


 गावातली पहिली शाळा
 आजोबांची करामत।
महीला ऊद्योग केंद्र
आजीची धडपड।
 गावचा स्वच्छ परिसर 
 हिरवी झाडी दाट।
आजीची आजोबांना
नेहमीच साथ।

अंजना कर्णिक
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
==================================
🌿🍂🌿🍂🌿🍂🌿
  💧चारोळी स्पर्धा💧
🌸 आजी - आजोबा 🌸

आजीआजोबांची माया   हळुवार 
जशी स्निग्ध मऊ साय
अलवार ।
चांदण्यांची अखंड झुरुमुरू
संततधार
पण आता घरोघरी झाल्येत
हद्दपार ॥
              
🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂

आजोबा आजी संस्कार करतात
घराला एक शिस्त वळण
लावतात ।
अविरत माया - ममता
करतात
तरीही ते का निराधार
होतात ? ॥
          डाॅ. शरयू शहा.
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
==================================
🌿🍂🌿🍂🌿🍂🌿

👪आजी- आजोबा👪
     चारोळी  स्पर्धा
👧🏻👧🏻👧🏻👧🏻👧🏻👧🏻👧🏻
आजीचा बाग प्रेमाने बहरलेला
मोगरा, जाई-जुई, गुलाबाने डंवरलेला
डाळींब, पपई, पेरूच्या भाराने लवलेला
प्रेमस्पर्शाने, प्रेमबोलाने
गहिवरलेला, फुललेला
🌲🌷🌳🌸🌺🍀🌲
आजोबांच्या मिशा कश्या
दिसतात बघा रूबाबदार
ओढून ताणून मिश्यांना
बाक दिला ना जोरदार
👨😜👨👨👨😇👨
© जागृती निखारे
स्पर्धेसाठी ८/१/२०१५
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
==================================

साहित्यमंथन ==स्पर्धा
        विषय
आजी आजोबाच्या आठवणी
====================
फक्त आजी आठवते==
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1)  
आजी गाई मधूर गाणी
       मोदक करी सुभग !!
      भल्या पहाटे शेंदून पाणी
       फुलवी केळीचा बाग!!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
2)   
आजी सांगे ,सुरस गोष्टी
       दिवेलागणी घेई ,परवचा!
       कधी ना होई दु:खी ,कष्टी
      या,सांजमनी आठव कधीचा!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेषक =कुंदा पित्रे

हे अनुभवलेले खरे आहे.!!
==================================
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
==================================
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

आजी गं आजी तू मायेचा अखंड झरा 
आणल्या कोठून प्रेमाच्या अनगिनत तऱ्हा

थांग तुझ्या प्रेमाला कधी लागताच नाही
कुटुंबाच्या भविष्यासाठी केली रक्ताची शाई 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰


जब्बार मुलाणी   नातेपुते

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
. . . . . . . . . . . . . . . . . .T H E - E N D . . . . . . . . . . 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁





Thursday 7 January 2016



माळेगाव (नांदेड)

माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणार्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे.

खंडोबाचे मंदिर
माळेगाव येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत. गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती.

खंडोबाची यात्रा
खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी . या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळय़ांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमा शाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते. [२] खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली तेव्हा इ.स. १८०९ मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे.

माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु सध्या ती पाच दिवस भरते.

भटक्या जमातींच्या जीवनप्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रष्न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते. या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असते.
माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या यात्रा होय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ श्रीक्षेत्र माळेगांव यात्रा ॥

✒ . . . वेळापत्रक . . . ✏
-------------------------------------
  दि. 8 जानेवारी 2016 रोजी
-------------------------------------
🔺 सकाळी 11:00 - शासकीय पुजा
🔺 दुपारी 12:00 - ग्रामिण महिला व बालकांसाठी स्पर्धा.
🔺 दुपारी 03:00 - देवस्वारी पुजन.
🔺 दुपारी 04:00 - भव्य कृषी प्रदर्शन व विविध स्टाॅलचे उदघाटन
-----------------------------------
दि.9 जानेवारी 2016 रोजी 
-----------------------------------
🔺 सकाळी 9:00 - विविध स्पर्धा
------------------------------------
दि.10 जानेवारी 2016 रोजी 
------------------------------------
🔺 सकाळी 11:00 - अश्व पशु, अश्व, श्वान व कुक्कूट प्रदर्शन
🔺 दुपारी 01:00 - कुस्त्यांची प्रचंड दंगल
------------------------------------
दि. 11जानेवारी 2016 रोजी 
------------------------------------
🔺 दुपारी 02:30 - पारंपारिक लोककला महोत्सव
------------------------------------
दि. 12 जानेवारी 2016 रोजी 
------------------------------------
🔺 सकाळी 11:00 - लावणी महोत्सव
🔺 दुपारी 04:00 - विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण.
------------------------------------
   तरी वरिल विविध कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.
------------------विनीत ------------------
☀सौ.मंगलताई आनंदराव गुंडले
अध्यक्षा,
जिल्हा परिषद, नांदेड.

** संकलन - सत्यजित टिप्रसवार, नांदेड













Tuesday 5 January 2016

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दर्पण दिन वा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो .


पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...