Saturday 9 April 2016




साहित्य गंध  Whatsapp ग्रूप  📚

........... आयोजित..........

📚   विचारधारा  📚

************************
📚 निबंध स्पर्धा खुली  📚
************************

🎋 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती निमित्ताने 🎋

💥 विषय : - "  मला समजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर "
=========================
💥 दिनांक :-13/04/2016
💥 वार : - बुधवार
💥 वेळ : - 10:00 ते  07:00 पर्यंत
==================================
💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 एकास एकच लेख पोस्ट करता येईल
💥 शब्दमर्यादा : जास्तीत जास्त 500 शब्द
💥 लेख text मध्ये आवश्यक. उशीरा पोस्ट केलेले लेख स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
💥 लेखा खाली आपले नाव, गाव व मोबाईल नंबर अवश्य लिहावे

💥 निबंध स्पर्धेचा निकाल blog वर पाहण्यास मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये .

💥साहित्य गंध  ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...
त्यासाठी त्यांनी 09423625769 या मोबाईल क्रमांकावर आपले लेख पोस्ट कराव्यात....
=========================
🎙संयोजक : - आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
××××××××××××××××××××
🎗संकलक:--नासा येवतीकर ,धर्माबाद
==========================
🎤 परीक्षक : प्रवीण रसाळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
=============================
मला कळालेले बाबासाहेब..

    बाबा... हा शब्दच भारी पाठिंबा आणि माया देऊन  जाणारा वाटतो..  लेकराला जन्मापासून ते तो मोठा होऊन स्वत:ची ओळख बनवे पर्यंत जो स्वत:ला झिजवून घेतो.. एवढेच नव्हे तर सर्व योग्यायोग्याचा पसारा बाजूला सारून फक्त एक सुंदर भविष्य आपल्या लेकरांपुढे ठेवतो तो बाबा.. याच बाबाचे नाव हि लेकरं पुढे स्वत: मिरवतात पण........ दु:ख वाटते सांगावयास.. हिच लेकरं त्यांचे तत्व पायदळी तुडवतात.. स्वत:च्या सोईनुसार ते वापरतात.. आणि हा बाबा केवळ निराश मनाने पाहत असतो सर्वांकडे.... अगदी सारे कर्म न् कष्ट शुन्यात मिळाल्यागत....

      आपण काय करतो आहोत याहूनही वेगळे..?? आश्चर्य वाटते की, आपणास बाबाासाहेबांची लेकरं असुनही त्यांचे तत्व समजले नाही.. बाबासाहेब आपल्याला काय सांगु ईच्छीत होते.? याचा जरा विचार करा.. चला काही प्रश्न विचारूया स्वत:ला..

१) बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली.?

२) बाबासाहेबांना मुर्तीपुजा का नको होती.?

३) जगातले एव्हढे सारे धर्म सोडून एक बौद्ध धर्मच का स्विकारला.?

४) घटनेमधील काही कलम बहूजनांच्याच हिताचे का लिहीले.?

५) धर्मपरीवर्तन का मान्य केले.?

     विचारा हे प्रश्न आपल्या धिंगाना माजवलेल्या व गंजलेल्या बुद्धीला.. विचारा हे प्रश्न तुम्हाला न कळलेल्या बाबासाहेबांच्या लेकराला.. अरे विचारा कलुषीत मनाने समाजात गुंड प्रवृतीने बाबांच्या फोटोपुढे डीजेवर नाचणा-यांना....!!

         मी सांगते जर बाबा असते तर त्यांनी जिवंतपणीच गळफास लावला असता स्वत:ला.. कारण मला समजलेले बाबासाहेब हे खुप वेगळे आहेत..खुपच वेगळे...

     बौद्ध धर्म हा शांती व अहिंसाप्रिय धर्म होता.. अगदी रानटी जनावरासही माणसाळणारा.. त्यात जिवनाच्या यशाचे, सुखाचे, प्रेमाचे, आरोग्याचे अन् आत्मरक्षेचे मार्ग होते.. त्यात मुर्तीपुजा नव्हती ना त्यामुळे होणारी अंधश्रद्धा.. या अंधश्रद्धेने कित्येक वर्ष बहूजनांना व स्त्रीयांना मरणयातनेच्या कैदेत जखडले होते.. याचेच तर मुळ त्या मनुस्मृती मधे होते..

       बाबासाहेबांनी जेव्हा ही मनुस्मृती वाचली, तेव्हा त्यांच्या समाजबांधवावर होणा-या अन्यायाची आग मनुस्मृतीस जाळून निघाली..

    बाबासाहेबांनी मुर्तीपुजा नाकारली, तर सर्वांनी त्यांचीच मुर्ती बनवली..

    बाबांनी शिकायला व संघर्ष करायला सांगीतले, तर सर्वजणांनी संघर्ष सुरू केला.. पण काय सुंदर विषय घेतात संघर्षाचा.. तर म्हणे हा एरीया आमच्या जातीचा,तो तुमच्या.. किंवा मग ऊगीच गल्लीतुन टपोरकी करणारी मुलं.. जयभिम बोलो कुछ भी करो म्हणनारे संघर्ष.. वाह.!!! बायकांची तर हद्दच भारी.. शालीनता तर कुठेच दिसेना गेली..  माफी असावी बाबासाहेब पण मला आपण समजलात त्यानुसार आपणास हा ऊद्धटपणे वागणारा नव्हे तर शांत, शालीन व आत्मसन्मानाने जगणारा समाज हवा होता ना..??

  तुम्ही दिलेल्या सुविधा वापरून मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी संघर्ष करणारा समाज हवा होता ना..??

      अशिक्षीत राहून अंधश्रद्धेला बळी पडणारा समाज नको होता ना..??

    सर्वधर्म समभाव मानुन प्रद्न्या, शिल व करूणेचे अथांग सागर हवा होता ना..??

       बाबा मला तुम्ही इतकेच कळलात.. गर्व आहे तुमची लेक असल्याचा.. पण मी ईतर बांधवांना कशी समजावू..??

 सांगा न बाबा... सांगा न....😔🙏🏻



       - राधायादव✍🏻






~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
Dr. Babasaheb Ambedkar Article


"  शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा "

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा ते आपल्या आत्याच्या घरी राहून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत शिकून लष्कराच्याच शाळेत नोकरी करीत होते. ते सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले होते. शिक्षणाविषयी त्यांचे वडील जागरूक होते, त्यामुळे त्यांनी भीमरावाच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. बाबासाहेब लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हटले की, ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. आपण फुकट वेळ घालवायचा नाही, झटून अभ्यास करायचा ही वडीलांची लहानपणीची शिकवण त्यांनी संपूर्ण जीवनभर अवलंबिले. आजुबाजुला घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीकडे बाबासाहेबांचे बारकाईने लक्ष असॆ. बाबासाहेबांना लहानपणापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. शाळेत शिकत असताना त्यांना स्वतःच्या गोणपाटावर बसावे लागायचे, तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या हौदेला हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेत चपरासी उपस्थित असेल तरच पिण्यासाठी पाणी मिळत असॆ अन्यथा तसेच घरी जावे लागत असॆ. ओंजळीने पाणी प्यावे लागत असॆ.  सर्व मित्रांसोबत एकत्र बसण्याची परवानगी नव्हती लहानपणी त्यांच्या जीवनात आलेल्या या कटू अनुभव आणि दाहकता त्यांच्या मनाला चटके देऊन गेली. यातूनच बाबासाहेब घडत गेले. याच प्रसंगांतून शिकवण घेऊन त्यांनी सन 1927 मध्ये इतिहासात खूपच प्रसिध्द असलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, येथूनच त्यांच्या लढ्यास प्रारंभ झाला असॆ म्हणण्यास काही हरकत नसावी. त्यानंतर त्यांनी नाशिकचा काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी लढा दिला आणि त्यात ते यशस्वी सुध्दा झाले. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, त्या लोकांचा उध्दार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणिव ज्यांना आहे ते धन्य होत असॆ ते मानीत. त्यांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. स्वतःचा समाज आणि जमात यांच्याविषयी ज्यांच्या मनात तळमळ राहत नाही, त्यास जगण्याचा खरा अर्थ ही कळत नाही. बाबासाहेबांना स्वतःच्या समाजाविषयी व जातीविषयी खूप तळमळ होती. लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांना अस्वस्थ वाटायचे.  लहानपणी बाबासाहेबांना ज्या ज्या गोष्टीचा त्रास झाला, तो तो त्रास समाजातील इतर बांधवांना होऊ नये यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शेवटी सनातन्यांच्या अवमानी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मांतराचा. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता. बाबासाहेबांना बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण , सदाचार , समता , स्वातंत्र्य व बंधुतेचा वाटला, बौद्ध धर्माचे त्यांना खूप आकर्षण होते. ह्याच धर्माच्या आधाराने आपल्या लोकांचा विकास साधता येतो म्हणून विजयादशमीच्या पर्वावर दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर हजारों अनुयाया सोबत बौद्ध धर्माचा जाहिररित्या स्विकार केला आणि “साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन ” अशी गगनभेदी भीमगर्जना केली.
देशांतील अतिगरीब आणि अति मागास असलेल्या लोकांना शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले. शिक्षणानेच समाज परिवर्तन होऊ शकते असे त्यांचे मत होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यांचे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असॆ त्यांनी लोकाना सांगितले होते. शिक्षण प्राप्त झाल्याने मनुष्य विचाराने समृद्ध होतो. माणसाला काय  चांगले आणि काय वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा , शील आणि करुणा  हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच लोकांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले आणि स्वतः सोबत आपल्या परिवाराचा पर्यायाने समाजाचा विकास साधला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले म्हणून त्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असॆ म्हटले त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यांसाठी त्यांनी १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले . राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय, असे त्यांचे म्हणणे होते.
प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वतःला एक अस्मिता आहे. याची जाणिव प्रत्येकाना होणे गरजेचे म्हणूनच ते एका जातींतल्या लोकांना नाही तर समस्त लोकाना उद्देशून म्हटले आहे की, गुलामाला गुलाम असल्याची जाणिव करून द्या तो नक्की बंड करून उठेल. याच अर्थातून माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न सुध्दा त्यांनी केला. म्हणूनच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर देवासमान आहेत. गौतम बुध्दाच्या शिकवणीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असॆ गौतम बुध्दानी जे म्हटले त्याचा बाबासाहेबानी आयुष्यभर पालन केले. त्यांचे पुस्तक वाचनावर विशेष प्रेम होते, त्यांना वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे सदानकदा ते वाचन करताना आढळून येत असत. एकदा वाचन करीत बसले की सर्व काही विसरून जात असत. सलग 18 - 18 तास अभ्यास करायचे. या वाचनामुळेच त्यांच्या ज्ञानात भरमसाठ वाढ होत गेली. त्यांचे घर पुस्तकाने भरून गेले होते. त्यांनी अनेक पुस्तकांची अभ्यास केले आणि बरीच पुस्तके लिहली. त्यांची कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या दोन गोष्टीमुळे भारताचा कायापालट झाला असॆ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्यांनी दोन वर्ष अकरा महीने सतरा दिवस अहोरात्र विविध देशाच्या कायद्याचाअभ्यास करून भारताची घटना संविधान तयार केली. त्याच घटनेवर आज भारत देश सुरक्षित असून प्रगतशील राष्ट्रांच्या यादीमध्ये भारत अगदी वरच्या स्थानावर आहे. त्यांच्यामुळेच आज देशांतील प्रत्येक व्यक्तीला हक्काने जीवन जगता येतो. आपल्यावर अन्याय होत आहे असॆ वाटल्यास न्यायालयाद्वारे प्रत्येकाला न्याय मिळविता येतो. समता, बंधूता आणि समानता या राष्ट्रीय मूल्यांची जोपासना या घटनेद्वारे केल्या जाते. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असॆ म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली . त्यांनी मनुष्यमात्रांच्या जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण ज्ञान आणि माहितीच्या बळावर रंजल्या-गांजल्या जनतेच्या , शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या तसेच स्त्री वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून योग्य रस्ता दाखविले आणि मानवतेची दिव्यज्योत निर्माण केले. त्यांनी फक्त दलित लोकांचाच उध्दार केला नसून समस्त भारतीय लोकांना आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाव दिलेला आहे. ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती सर्वाना नेहमीच प्रेरक ठरते. या महामानवाचे कार्य म्हणजे समाजासाठी व देशासाठी एक दिशादर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अश्या महामानवाची आज शतकोत्तर रौप्य महोत्सवी म्हणजे 125 वी जयंती त्यानिमित्त कोटी कोटी प्रणाम.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद

Thursday 7 April 2016

गुढीपाडवा साहित्य मंथन



📚 साहित्य मंथन Whatsapp ग्रूप  📚
       ........... आयोजित..........

🎼 🎵 🎹 काव्यमंथन 🎹 🎵 🎼

🎋 गुढीपाडवा सणानिमित्त  🎋

***************************
📚 चारोळी स्पर्धा क्रमांक 30  📚
***************************
💥 विषय : - 🌴 गुढीपाडवा 🌴
ΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣ
💥 दिनांक :-08/04/2016
💥 वार : - शुक्रवार
💥 वेळ : - सकाळी 10:00 ते  07:00 पर्यंत
=========================
💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....

💥 एकास एकच चारोळी पोस्ट करता येईल

💥 चारोळीखाली आपले नाव, गाव व मोबाईल नंबर अवश्य लिहावे

💥 चारोळी स्पर्धेचा निकाल blog वर पाहण्यास मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये .

💥साहित्य मंथन ग्रूपच्या बाहेरील कवी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...
त्यासाठी .
खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपल्या चारोळ्या पोस्ट कराव्यात....
==========================

🎬अॅडमिन कोअर कमिटी🎬
👤अरविंद कुलकर्णी, अहमदनगर
📱09689077239
==========================
 👤आप्पासाहेब सुरवसे, उस्मानाबाद
📱09403725973
==========================
 👤नासा येवतीकर, नांदेड
📱 09423625769
==========================
👤उत्कर्ष देवणीकर, उमरगा
📱09763116493
==========================
 👤सौ. जयश्रीताई पाटिल, वसमत
📱09421387623
==========================
 👤सौ. अंजनाताई कर्णिक, पुणे
📱09820758823
==========================
 👤गजानन वारणकर नांदेड
📱9881384404
==========================
 👤डॉ .शिल्पाताई जोशी,मुंबई
📱09967708474
==========================
 🔦संकल्पना : - अरविंद कुलकर्णी
-------------÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷--------------
🎙संयोजक : - आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
××××××××××××××××××××
🎗संकलक:--नासा येवतीकर ,धर्माबाद
==========================
येथे आपल्या चारोळी आणि निकाल पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
http://nasayeotikar.blogspot.com/2016/04/kavy-manthan-charoli-spardha-gudhi.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎤 परीक्षक : - डॉ. शरयुताई शहा 
📱 09619023330
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||llllllllllllllll
💢 ग्राफिक्स  :- श्री.मारूती खुडे ,माहुर
📱9823922702
~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~




[4/8, 10:20 AM] Aravind Kulakarni a"nagar
🌹काव्यमंथन चारोळी स्पर्धा  क्र . 30 

गुढीपाडवा 

नवरंगांची उधळण झाली 
 लागली कला मंच ची गोडी 
 कथासंग्रह प्रकाशनाची  उंच 
उभारू साहित्यमंथन गुढी 

@ अरविंद कुलकर्णी 
( स्पर्धेसाठी नाही )
==========================
[4/8, 10:23 AM] Bhuddewar Kranti: 
चारोळी...
साहित्य मंथन स्पर्धेसाठी...

‘गुढीपाडवा'

आत्मविश्वासाच्या काठीला,
साखर गाठ गोड कर्माची।।
निंबाचे कटुसत्य अनुसरुया,
गुढी उभारु कर्तव्य धर्माची।।


‘गुढीपाडवा'

गुढीत असे वस्र तयाची,
सुख-दु:खाची शिवणं।।
सर्वांना सामावे कलश,
गुढी एकतेची शिकवणं।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820
==========================

[4/8, 10:46 AM] ‪+91 98696 43268‬
चारोळी स्पर्धा छाया पाटील. 
साहित्य मंडळानी उभारली गुढी  
मिळाली त्यात टॉनिकची पुडी  
रसाळ कवितेची चाखली गोळी 
आस्वाद घ्या रसिकजन हो वेळच्यावेळी.
==========================

[4/8, 11:13 AM] ‪+91 94214 18827‬
 स्पर्धैसाठी
💐💐💐💐💐💐💐💐

उभारा गुढी नवचैतन्याची
करा नव संकल्पांनी सुरुवात,
हिंदू संस्कृतीचे लेवुनी लेणे
नव्याने करा ध्येयाची रुजवात...।।
💐💐💐💐💐💐💐💐💐
नुतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐𴀽򣰊
सुनीता पाटील व परीवार
==========================

[4/8, 11:19 AM] ‪+91 98207 58823‬
 स्पर्धेसाठी चारोळी

पाडव्याची गुढी ऊभारताना
विसरू नका नडल्या कोणा
गोडघासाने तृप्तीत रंगताना
 नड भूक क्षुधार्थीची जाणा

अंजना कर्णिक
==========================

[4/8, 11:21 AM] ‪+91 98212 23939‬
स्पर्धेसाठी....

"मांगल्याची " गुढी ऊभारू, 
"नव चैतन्याची" कास धरू,
"हिंदू संस्कृती"ला  स्मरू....
अन्  "नववर्षाचे" स्वागत करू  !

-- सुजाता
==========================

[4/8, 11:49 AM] ‪+91 77158 54739‬
पल्लवित होती नवतेज्याने वृक्ष वेली।
प्रतिपदी शके सुरु झाले वाहन शाली।
ब्रह्मदेवानेेे तव नवनिर्माण सृष्टी केली।
आले राम अयोध्येत वध करुनी वाली।
धनद पाटील बोरिवली
==========================

[4/8, 11:54 AM] Dr. Sunil Bende Vasmat
⛳चारोळी स्पर्धा ⛳
आला गुढी-पाडव्याचा सण
चला उभारूया उंच गुढी
जात, धर्म, व पंथ भेदुनी
 चला मारूया लांब उडी
     सुनिल बेंडे वसमत
==========================

[4/8, 11:56 AM] ‪+91 99690 71390‬
अरविंद कलकर्णी काका,09689077239
चारोळी स्पर्धा!
          पाडवा !
पाडवा हिंदुंनचा नववर्षाचा सण मोठा,
ह्या दिवशी आनंदा नाही तोटा !
कशी विसरु माझ्या माझ्या शेतकरी बंधुंना,
माझ्या ओठांत गोड घास नाही उतरला !
सौ. निलाक्षी विद्वांस .माहीम. मुंबई.
9969071390
==========================

[4/8, 12:03 PM] 1000 Anuradhaa: 
🎋🌺🍃🍋🌳🍋🍃🌺🎋

साहीत्याची गुढी  बाई
चारोळ्यांनी सजवा..
आंबटगोड क्षणानी सई
साजरा करू पाडवा..

     - राधायादव✍🏻
🎋🌺🍃🍋🌳🍋🍃🌺🎋
==========================

[4/8, 12:16 PM] ‪+91 94237 93288‬
 🌹 साहित्य मंथन समूह 🌹

   चारोळी स्पर्धा

🌹 गुढी पाडवा  🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

आंनद कलशाला कौतुकाची गाठी ,
समतेचे वस्त्र,बंधुतेच्या काठीला ...
मराठी मनाच्या,प्रेमळ मातीत ,
मानव्याची गुढी,उंच उभारु चला ...

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.०८ एप्रिल २०१६
spsfun.com
नववर्ष गुढी पाडव्याच्या सर्वाना
हार्दिक शुभेच्छा 
💐💐💐💐💐💐💐💐
==========================

[4/8, 12:40 PM] ‪+91 98603 14260‬
चारोळी स्पर्धा 
संस्कृतीचे जतन करुया
मंगलतोरण बांधू या द्वाराला
जातीधर्मभेद सारे विसरुन जाऊ 
हिंदु नववर्षदिनी समतेची गुढी उभारु चला
 प्राची देशपांडे
==========================

[4/8, 1:00 PM] ‪+91 98697 85379‬
मराठी अस्मिता मराठी मान,
मराठी सौंदर्याची मराठी शान,
आज सोन्याचा दिवस घेऊन 
आला चैतन्याची खान......
💐💐💐💐💐💐💐💐
==========================

[4/8, 1:24 PM] ‪+91 96190 14050‬
 गुढी उभारु नव चैतन्याची 
नव्या विचारांची  अन संकल्पांची
रोपे रुजवु  कडुलिंबाची
मंगल  शुध्द पर्यावरणाची
--डा.ज्योत्स्ना सुभाष कुळकर्णी
चारोळी स्पर्धेच्या  निमित्ताने  !
==========================

[4/8, 1:32 PM] ‪+91 97650 01266‬
 स्पर्धेसाठी...

नववर्षाची सुरवात अन् मांगल्याची मनोकामना,
हीच आपली संस्कृती, आपली परंपरा अन् रुढी,
विसरुनी मत्सर चला रे गाठू या यशाचे शिखर,
याच शिखरावर साफल्याची उंच उभारु  गुढी...

निर्मला सोनी
==========================

[4/8, 1:45 PM] ‪+91 99214 87555‬
 विठूराया...
मोह नको....
अहंकार नको....
नको कपडे छान....
२०१६ मध्ये
पिकुदे माझ्या शेतक-याचे रान....
🙏🙏🙏
==========================

[4/8, 1:49 PM] ‪+91 98696 43268‬
एकतेचा मंत्र देती गुढीपाडवा
मांगल्याची गुढी उभी करू या
निसर्ग संवर्धन करतो पाडवा
उज्वल भारताचे स्वप्न पूर्ण करू या.
-  छाया पाटील
==========================

[4/8, 1:55 PM] ‪+91 99690 71390‬
चारोळी स्पर्धा
09689077239
            पाडवा !
पाडवा हिंदुंनचा नववर्षाचा सण मोठा,
ह्या दिवशी नाही आनंदा तोटा !
कशी विसरु माझ्या शेतकरी बंधुंना, 
माझ्या ओठांत गोड घास उतरेना !
सौ. निलाक्षी विद्वांस. माहीम,मुंबई .
9969071390
ही चारोळी स्पर्धेसाठी घ्यावी ही विनंती .
==========================

[4/8, 2:13 PM] ‪+91 99305 09026‬
 चारोळी 
वेळ नका दवडूया करावया पाठवणी
गतवषाॅतील .विसरूनी जाऊ कटू आठवणी,
नव्या जोमाने,निग्रहाने करू यारे आखणी,
गुढी पाडव्याला करू या गुढीची उभारणी.
सुलभा कुलकणीॅ
**************************************
[4/8, 3:12 PM] ‪+91 96047 18866‬
 साहित्य मंथन 
गुढी पाडवा 
 *चारोळी स्पर्धा
वसंत आला रंगात न्हाऊन ,
 वंदन बळीराजाच्या कष्टाला ...
 पाडव्याची गुढी ऊभारु चैत्रात ,
हिरवा बहर चराचर सृष्टीला ....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ सुरेखा जाधव
==========================

[4/8, 4:08 PM] ‪+91 99704 46447‬
 विषय - गुढी पाडवा
स्पर्धेसाठी चारोळी 

जुने ते निश्चित सोने
नवे आग्नीत निखरते
पाडव्याचे क्षण हे नवे
निर्भीड पणे कवेत घे

                        समीर मुल्ला
                    9767868446
                       आकुर्डी पुणे
==========================

[4/8, 4:30 PM] ‪+91 94221 18604‬
 चारोळी🎈स्पर्धा🎈
गुढी पाडवा
प्रवेश वाढवा
मुंलाशी नाते जोडवा
गुरुजी शब्दाला जागवा
................श्री .दिलीपराव चौधरी
==========================

[4/8, 4:41 PM] ‪+91 99704 46447‬
 चारोळी स्पर्धा
विषय - 🎋 गुढीपाडवा 🎋 

१)
गुढी उभारू नवं स्वप्नांची
घेऊ भरारी मनाची
करू प्रफुल्लित मनामनासी
करून वर्षाव नवं वर्ष शुभेच्छांची

२)
गोडाधोड नैवेद्याची प्रसाद थाळी
नवं वस्त्र लेउनी गृहलक्ष्मी सजली
गुढीपाडवा दिनी सुखाची मांदियाळी 
नवं चैतन्य घेऊनि पहाट आली

३)
काठी वस्त्र अन तांब्या लावूनी
उभारू गुढी संस्कृतीची
नवं वर्षी भेद सर्व मिटवुनी 
पाडवा साजरुया एकजुटीनी

४)
ह्या वर्षीचा दुष्काळ न दिसो पुन्हा
बळीराजासाठी प्रार्थना आरजवुनी
गुढी उभारू नवं संकल्प घेऊनी
अवघ्या जनांसी सुखाऊ वृक्ष लागवडीनी
संजय पाटील
SP
निगडी पुणे 
क्रमांक ४ ची चारोळी स्पर्धेसाठी ग्राह्य धरावी
==========================

[4/8, 5:54 PM] ‪+91 82752 31641‬
चारोळी स्पर्धेसाठी 

         $$$ रत्नहार $$$

     @ गुढी @

आला आला चैत्र पाडवा 
चला उभारू उंच गुढी .
स्वागत करूया नववर्षाचे 
उतरवूनी मनातली अढी .
      © रत्नाकर जोशी ©
                  जिंतुर 
           8275231641
==========================
[4/8, 6:06 PM] नासा येवतीकर, नांदेड
चैत्रीचा पाडवा 
उभारू गुढी 
शुभेच्छा देऊनी 
काढू मनातील अढी 
- नागोराव सा. येवतीकर 
  09423625769
==========================

[4/8, 6:10 PM] ‪+91 83085 58995‬
 स्पर्धेसाठी
गुढी उभारु समतेची, ममतेची
भिंत पाडूया जाती-धर्मविद्वेषाची
गुढी उभारुया  विश्वबंधुत्वाची
गुढीपाडवा देई शिकवण नीतीची

          सुनीता सुरेश महाबळ
==========================
[4/8, 6:17 PM] ‪+91 98239 22702‬
 स्पेर्धेसाठी...

भुकेल्यास भाकर देऊ या 
अन् तहानलेल्यास पाणी
मांगल्याची गुढी उभारु या
मानवतेचा धरु संकल्प मनी

                🎯 मारुती खुडे.
==========================

[4/8, 6:27 PM] ‪+91 93247 42706‬
🍁साहित्य मंथन🍁
        🍀चारोळी स्पर्धा🍀
     🌱विषय -- गुढी पाडवा🌱
     ================     
     🌴  प्रेषक-- कुंदा पित्रे🌴
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
1) 
गुढीपाडवा नवा आरंभ ,नवा विश्वास!!
गुणात्म क्षणांची चैत्रांगणी नवी पहाट !!
गुलाबी स्वप्ने पुनः पुन्हा जपायची खास !!
गुणगुणते मी,कोकिळ रवाचा असे थाट !!
=========
2) 
गुढी आकाशी उभारूनी!
    मराठी मन,मराठी पाडवा!
    सखे हर्ष  पेरूनि मनोमनी!
    शुध्द,सात्विक देश घडवा!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कुंदा पित्रे
==========================

[4/8, 6:48 PM] P. Gende AV Parbhani
स्पर्धेसाठी

असहिष्णूतेचे गाढून अवशेष
"जय भारता" देऊन नारा
नववर्षाचा संकल्प खरा..
राष्ट्रभक्तीची गुढी उभारा

-आत्तम गेंदे, परभणी
==========================

[4/8, 6:51 PM] ‪+91 93247 42706‬: कुंदा पित्रे 
मो. 9324742706
दादर,शिवाजी पार्क,
मुंबई 28


[4/8, 7:05 PM] ‪+91 74989 64901‬
स्पर्धेसाठी चारोळी

नववर्षारंभी गुढी ऊभारू सौजन्याची 
सहिष्णुता बाणून मनी हंसा हो क्षणोक्षणी
ढोलताशां,लेझीमच्या सुंदरश्या नादाची
चैत्रपालवीच्या नवपालवीच्या
सुगंधची भेट क्षणोक्षणी
© जागृती निखारे
==========================

[4/8, 7:29 PM] ‪+91 99677 08474‬
गुडीपाडव्या च्या दिवशी
काढते मी चैत्रांगण
प्रिया माझा दूर देशी
येते त्याची आठवण
==========================

[4/8, 7:29 PM] ‪+1 (508) 333-3024‬
मांगल्य घेउनी सण येई हा 
    गुढी शोभते दारात 
नविन वर्षाच्या शुभेच्छा घेउनी 
    वसंत फुलुदे घरात …. 

@priya vaidya, Bostan 
==========================

|| पाडवा ||

ऋतुराज प्रसन्न होतो 
नि कात टाकतं चराचर...
उन्हाच्या काहिलीतूनही 
प्रसवतो 
नवा चैतन्यस्पर्शी जीवनांकुर...
ही चैत्रपालवी 
नव्या उन्मेषाचा मंत्र असतो,
प्रतिकुलातही 
अग्रेसर राहण्याचा...

या निसर्ग नियमाला 
अंगीकारू आपणही...

हार्दिक शुभेच्छा....

|| व्यंकटेश चौधरी ||
==========================

$$$$$$$$ T H E - E N D $$$$$$$$









Wednesday 6 April 2016





** पुष्प पहिले *** आरोग्य मथंन : डोळयाची निगा *


डोळा हा परमेश्वराने  दिलेला अनमोल अवयव आहे.  " दृष्टी आहे तर सृष्टी अाहे" या सारखे  वाक्ये आपण सतत ऎकतो.  असे असून आपण डोळयाची काळजी नीट घेत नाही. ती कशी घ्यावी हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
तर प्रथमत: डोळयाची काळजी कशी घ्यावी हेच समजून घेणे अावश्यक अाहे.  डोळयाचे विविध अाजार यात समाविष्ट करणे अशक्य असल्याने प्रत्येक आकारा बाबत एक दिवस ठेवण्यात येईल व सभासदांना आवश्यक वाटल्यास त्या त्या  क्षेत्रातील तज्ञाकडून माहिती सादर करण्यात येईल.
प्रथमतः
डोळयाची काळजी :---
हे याकरिता महत्त्वाचे आहे की अनेक लोकांना कॅामप्यूटर वर, मोबाइल वर, टीव्हीकडे  पहावे लागते.  अशाप्रकारची कार्य. करताना सतत screen कडे न बघता १५/२०मिनीटा नंतर नजर लांबवर इकडेतिकडे टाकावी. अाजुबाजुला हिरवे झाडे असतील तर एखादा मिनीट त्यावर नजर टाकावी. हिरवा तंग डोळयाना शितलता प्रदान करतो. झाडे नसतील तर पडदे अथवा टेबलक्लॉथ हिरवे वापरावेत.  
प्रामुख्याने डोळा लाल होणे याला  आपण डोळे  येणे (conjunctivitis) असे म्हणतो.  परंतु काही वेळेस प्रवास तोही बाईकवर केला तरी डोळे लाल होतात याला डोळे अाले असे म्हणता येणार नाही
  हा प्रकार डोळयाना जास्त वारे लागून ओलावा नष्ट झाल्यामुळे डोळा लाल होऊ शकतो असे होऊ नये यासाठी २०/२५ किलोमीटर प्रवास बाईकवर करणे गरजेचे  असल्यास चांगल्या दर्जाचे सनगॅागल्स वापरावेत.
* डोळयाची स्वच्छता : डोळयाची स्वच्छता रोज करणे आवश्यक अाहे.  स्नान करताना थंड पाण्याने डोळे धुवावेत. कोणतेही घरी उपलब्ध असलेले अोषध डोळयात टाकू नये.  कारण प्रत्येक औषध हे विशिष्ट कारणाकरता दिलेले असतात.  त्याकरता ते इतर कारणासाठी वापरु  नये.  प्रत्येक अोषध फोडताना घरातली सुई, टाचणी बाभळीच्या काटयाचा वापर करु नये. प्रत्येक अोषध फोडण्यासाठी त्याच्या झाकनातच व्यवस्था केलेली असते ते पूर्ण फिरवल्यास ते उघडता येते  न उघडल्यास एक रु ची इंजेक्शनची सुई मिळते  ती वापरावी. एकदा उघडलेले औषध ३० दिवसच वापरता येते त्यापुढे ते निकामी होते करीता ते फेकून द्यावे. डॅाक्टरच्या सल्ल्याने औषध सांगितलं तसेच वापरावे, मनाने अथवा केमिष्टच्या सल्ल्याने वापरू नये.  हायड्रॉक्वारटीझोन असलेले औषध वापरल्याने पारपटल(cornea) कडक होतो ते इष्ट नाही. शक्यतोवर eyedrops छोट्या छोट्या तक्रारी करता वापरू नयेत कारण प्रतिजैविकाची(antibiotics) सवय झाल्यास ते खरोखरची वेळ(emergency) आल्यावर काम करत नाहीत. (Resistancy) येऊन जाते.  डोळयावर जास्त ताण आल्यास पाणी येते ही नैसर्गिक गोष्ट अाहे हा आजार नाही यासाठी औषध उपचार करू नयेत. पण डोळे कोरडे  पडणे याला उपचार करावा लागतो. अोषधी वापरताना expiry date जरूर बघावी.
* चष्माचा नियमित वापर : ज्यांना चष्मा आहे त्यांनी तो नियमित वापरावा  आजकाल तरूण वयात, शाळेत जाणाऱ्या मुला/मुलीत चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शासनाने सुध्दा शालेय नेत्रतपासणी कार्यक्रमावर बराच जोर दिला आहे. डोळयाचा नंबर वर्षातुन एकदा तपासणे आवश्यक आहे. वयाच्या ४० व्या वर्षी प्रत्येक व्यक्तीला जवळचे वाचण्यासाठी चष्मा लागतोच.  जवळचे बघण्याची लेन्सची क्षमता या वयात कमी होते यालाच आपल्याकडे चाळीसी लागली असे म्हणतात. हा चष्मा फक्त जवळचे पाहण्यासाठी लावावा लागतो परंतु सध्या मोबाइल मुळे जवळचे वाचण्याची निकड केव्हाही भासू शकते म्हणून हा चष्मा सतत डोळयावर नाही लावला तरी सोबत बाळगावा लागतो. फक्त जवळचा नंबर असेल तर Reading pinto नावाचा छोटा चष्मा मिळतो.  तो सतत बाळगायला सोपा असतो.
जवळचा नंबर (presbiopic correction) हा सुद्धा  वर्षाला तपासून घ्यावा. चाळीशीत लागलेला चष्मा हा पाच वर्षात एक - दोन पॉइंट याप्रमाणे वाढतो, तो वयाच्या ६० वर्षापर्यंत. त्यानंतर मोतीबिंदु व्हायला सुरवात होते. जवळचा चष्मा न लावता वाचायला दिसू लागते हेच मोतीबिंदुचे पहिले लक्षण आहे.
मोतीबिंदु वर कुठलेही अोषध नाही. तो शस्त्रक्रिया करूनच काढावा लागतो. अाजकाल आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने ही शस्त्रक्रिया अगदी सहज सोपी झाली आहे.  
वार्धक्यामुळे होणारा मोतीबिंदु(senile)  याचे प्रमाण जास्त असले तरी मोतीविंदु डोळयाला मार लागल्याने होणारा (traumatic :) अथवा दुसर्या रोगामुळे होणारा (secondary) आणि जन्मजात (congenital)  हे ही प्रकार यात आहेत.
तेंव्हा चला तर मग आपल्या अमूल्य अश्या डोळ्यांची योग्य काळजी घेऊ या. ज्याला डोळे नाहीत त्यालाच या डोळ्यांची किमत कळत असते हे ही सत्यच आहे. ( क्रमशः )
-  डॉ. सुनील बेंडे 
   नेत्र चिकित्सक अधिकारी, 
उपजिल्हा रुग्णालय, वसमत जि. हिंगोली 
संपर्क क्र. : 09404071984
*****************************************************






Sunday 3 April 2016

Sahity - Manthan Group Prize 2016


मा. रामराव जाधव काका
डॉ. शरयूताई शहा 
मा. अंजनाताई कर्णिक
मा . ना सा येवतीकर भाऊ
मा. नंदकिशोर सोवनी सर
मा. जयश्रीताई पाटील
मा. निर्मलाताई सोनी
डॉ. सुनील पवार
मा. दिलीपजी धामणे
मा. मारुतीजी खुडे
मा. क्रांती बुध्देवार
मा. उत्कर्ष देवणीकर 
 
आपण आज विशेष पुरस्काराने सन्मानित झाले आहात. आपले सर्वांचे मन:स्वी अभिनंदन💐💐👍

















 

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...