Thursday 18 August 2016

आई माझा गुरु
जीवनामध्ये गुरुचे स्थान अनन्य साधारण महत्वाचे आहे. गुरु विना ज्ञान मिळविणे अशक्य आहे,असे संत कबीर आपल्या दोहात सांगतात. लहानपणापासून ते वृध्द अवस्थेपर्यन्त आपणास गुरुची आवश्यकता भासते.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक वळणावर आपणास गुरुची गरज भासते.गुरु म्हणजे कोण असतो ? गुरु म्हणजे मार्गदर्शक, गुरु म्हणजे ज्ञान देणारा, गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधारात दिवा लावून ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा, गुरु म्हणजे दिशादर्शक. जेव्हा जेव्हा आपणास काही अडचणी निर्माण होतात, समस्या उद्भवतात तेंव्हा तेंव्हा आपणास जाणकार तज्ञ व्यक्तिकडे जावे लागते. म्हणजेच गुरुकडे जावे लागते. गुरु म्हणजे लघू नसलेला, लहान नसलेला. ज्याच्याकडे भरपूर ज्ञान व विद्या आहे तोच खरा गुरु. जे लोक गुरु होण्याचा मुखवटा धारण करतात ते एक ना एक दिवस उघडे पडतात आणि त्यांची पत घसरल्याशिवाय राहत नाही. आपले स्थान टिकविण्यासाठी गुरु लोकांना खुप मेहनत घ्यावी लागते.आपले ज्ञान सतत वाढवत ठेवावे लगाते.त्यासाठी नियमित अभ्यासाचा सराव करावा लागतो.
पूर्वीच्या काळात गुरुच्या घरी जाऊन आणि तेथेच राहुन शिक्षण घ्यावे लागत असे त्यास गुरुकुल पद्धत असे म्हटले जाते. त्याठिकाणी गुरु हा शिष्याना ज्ञान देण्याचे काम करीत असत आणि त्या विभागाचा राजा त्या गुरुचा यथायोग्य धनसंपत्ती देऊन स्वागत करायचा, ही पध्दत होती. ही गुरुकुल पद्धत आत्ता हॉस्टेलच्या स्वरुपात दिसून येते. मात्र त्यात गुरुकुल मध्ये जी आत्मीयता , प्रेम किंवा जिव्हाळा दिसून येत असे ते मात्र दिसून येत नाही.मधल्या काळात गावोगावी गुरुकुल ऐवजी शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा उदयास आली आणि गुरुकुल मधील गुरु हे शिक्षक या नावाने ओळखले जाऊ लागले.विद्येचे घर अगदी आपल्या घराजवळ उपलब्ध झाल्यामुळे शिक्षण घेणारे आणि देणारे यांची संख्या वाढीस लागली. राजाच्या ठिकाणी शासन त्यांना दरमहा वेतन देत शासकीय कर्मचारी केले. असे हळूहळू गुरुचे पद व्यावसायिक होत गेले. गुरुच्या व्यवसायात जैसेही लक्ष्मी, पैसा प्रवेश केला तैसे विद्या मंद गतीने दूर निघून गेली. कारण लक्ष्मी आणि सरस्वती सहसा एकत्र राहू शकत नाहीत.
शाळेच्या बाबतीत सुध्दा असेच घडले शाळेत जैसे ही लक्ष्मीने प्रवेश केला तसे शाळेचेही रूप पालटले. पूर्वी शाळेतल्या गुरुजींना खुप मान सन्मान मिळायाचा, आदर मिळायाचा, लोक त्यांना सन्मानाने बोलायचे,मात्र आज तशी परिस्थिती नाही. आज गुरूजी बदलले,समाज बदललला, आणि परिस्थिती सुद्धा बदलली. आज कोणालाही शाळेतील गुरूजीची गरज भासत नाही. कारण त्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी घरात संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल, स्मार्ट फोन सारखे तंत्रज्ञान 24 तास त्यांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना गुरुचे ज्ञान तोकडे वाटत असेल ? सोशल मिडियाच्या विविध माध्यमातून ज्ञानाची झरे वाहत आहेत. काही वर्षानंतर गुरुची संकल्पना मागे पडते की काय ?अशी भीती सुध्दा राहुन राहुन मनात येते.त्यासोबत अजुन ही या गोष्टीवर विश्वास वाटतो की गुरुशिवाय मनुष्याचे जीवन सफल होऊच शकत नाही. संगणका सारखे निर्जीव वस्तू बटण दाबता क्षणी माहिती देईल ;परंतु गुरु -शिष्य या दोन सजीवात ज्ञानाची जी देवाणघेवाण ते कदापि ही शक्य नाही. मुलांवर संस्कार टाकण्याचे काम निर्जीव वस्तू नक्कीच करू शकणार नाही, त्यासाठी सजीव व्यक्तीच पाहिजे.
मनुष्याच्या जीवनात गुरुचे पहिले स्थान हे आपणास जन्म देणाऱ्या आईला दिले जाते. पृथ्वीवर जन्माला येण्यापूर्वी पासून आईचा संबंध येतो. आई आपल्या बाळाला नऊ महीने नऊ दिवस गर्भात वाढवून मोठी करते. गर्भसंस्कार सुध्दा जीवनात मोलाचे काम करतात. आई आपल्या मुलांवर वेगवेगळ्या प्रकारे संस्कार करते आणि मुलभुत ज्ञान सुध्दा देते. ऐकणे आणि बोलण्याची क्रिया आईने जर शिकविली नसती तर त्या मुलाचा काय विकास होऊ शकतो ? याची आपण कल्पना करू शकतो. समाजामध्ये आणि शाळेत पाऊल ठेवण्यापूर्वी प्रत्येक मुलांना आई ज्ञानाचे धडे देऊन तयार करते. म्हणूनच आई माझा गुरु आई कल्पतरु असे एका कवीने आपल्या कवितेत म्हटले आहे.इतर सर्व गुरुपेक्षा आई ही अत्यंत महत्वाची आद्य गुरु होय. आपले मूल चांगले संस्कारी, हुशार आणि सुजाण नागरिक म्हणून समाजात जगावे असे वाटत असेल तर प्रत्येक आईने तज्ञ गुरुच्या भूमिकेतून आपल्या मुलांना घडविण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र राज्याचे आणि हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांची आई राजमाता जिजाऊ यांनी घडविले म्हणून ते लहान वयात सुध्दा खुप मोठा पराक्रम करून दाखवू शकले. परमपूज्य सानेगुरूजी सारखा हळव्या मनाचा आणि आईच्या हृद्याचा व्यक्ती आपणास लाभला ते फक्त त्यांच्या आईमुळेच, हे त्यांच्या श्यामची आई पुस्तकातुन पानोपानी दृष्टिस पडते. अशियम्मा सारख्या मातेच्या संस्कारामुळे ए पी जे अब्दुल कलाम सारखे मिसाईल मैन देशाला राष्ट्रपती म्हणून मिळाले.आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुला वंदन तर करायचेच, शिवाय आपल्या आद्य गुरुला म्हणजे आईला ही वंदन करण्यास विसरून चालणार नाही.
- नागोराव सा येवतीकर
  मु येवती ता धर्माबाद

Wednesday 17 August 2016

आेवाळायला नाही आरती.

आई बाप राबती, मग मीळेल एक पैसा.

अकाश आहे घर, अन धरनीच आपुला सोफा.

पीझा, बर्रगर नको,  हवा रोटीचा एक तुकडा.

देऊ नको आेवाळनी, प्रेमाची मी भुकेली.

अनोळखी जगात
 जगने आहे कठीण,
जीव कासावीस झाला.

एवढे सांगने आहे तुला,
साथ हवी मला...

फक्त साथ हवी मला...

बांधीला मी धागा प्रेमाचा तुला.

R. N. BHALKE

रक्षा बंधन निमित्त संकलित लेख

*👸👸👸 माझी ताई  👸👸👸*

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण. असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं.

मी असंख्य उदाहरणे पाहिलीत व ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ पाहून थक्क झालोय. पोटची पोरगी असली की आईला मुलाची काळजी नसते. तिच्या पदरात मुलाला टाकून ती निर्धास्त होते. बहीण स्वत:ची व आईची अशा दोन्ही भूमिका निभावत असते. वडील असू देत, भाऊ असू देत, काका-मामा असू देत, मावश्या-आत्या असू देत; पण बहीण ती बहीणच हे सगळे मिळून एका रक्ताच्या बहिणीची जागा घेऊ शकत नाहीत.

भावाची काळजी करणे, त्याच्यासाठी नवस व उपासतापास करणे, त्याच्या यशाने हरखून जाणे हे सगळे ती कोणी सांगायची वाट न पाहता स्वप्रेरणेने, मनापासून करीत असते. भाऊबीज व रक्षाबंधन हे तिच्या वर्षातले सगळ्यात मोठा सण असतात.
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
============≠===================
प्रत्येकाला *एक बहिण* असावी .
मोठी लहान शांत
खोडकर कशीही असावी
पण *एक बहिण* असावी .
मोठी असेल तर आई बाबांपासून
वाचवणारी ,
लहान असेल
तर आपल्या पाठीमागे लपणारी .
मोठी असल्यास गुपचूप
आपल्या पाॅकेट मध्ये पैसे
ठेवणारी .
लहान असल्यास
चुपचाप काढून घेणारी .
लहान असो वा मोठी ,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी .
*एक बहिण* प्रत्येकाला असावी .
मोठी असल्यास आपलं चुकल्यावर
कान ओढणारी .
लहान असल्यास
तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी.
लहान असो वा मोठी आपल्याला
*एक बहिण* आसावी .
आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी "
म्हणून हाक मारणारी
*एक बहिण* प्रत्येकाला असावी .
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी ,
लहान असल्यास प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी .
ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच
ओढीने *राखी* पसंत
करून आणणारी .
*एक बहिण* प्रत्येकाला असावी .
कठीण प्रसंगी खंबीर राहील
स्त्री शक्तीच ती ,
स्वतःपेक्षा हि जास्त
आपल्यावर प्रेम
करणारी
प्रत्येकाला *एक बहिण* असावी......!
आणि म्हणूनच *मुलगी वाचवा देश वाचवा* ।

*रक्षा बंधनाच्या* मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा..

*:- सत्यजीत टिप्रेसवार*

🙏🙏🙏🎁🎁💐💐💐💐💐💐

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*नातं हे कुठलही असो पण ते मनापासून असावं आणि मनापासून निर्माण झालेल्या नात्याला रक्ताच्या नात्याची गरज नसते.गरज असते  ती नाती सांभाळण्याची त्याच्या संरक्षणाची, प्रेमाची , जिव्हाळ्याची, आपुलकिची.*

*हा नात्याचा धागा जोपासणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.* *बहिण भावाला जेव्हा प्रेमाने हा धागा बांधते तेव्हा तो धागा फक्त धागा नसतो तर तिचा जिव्हाळा , आपुलकी आणि आशा असते कि , माझ्या भावाने माझे संरक्षण   केले पाहिजे.* *असा हा बहिण भावाचा कर्तव्यपुर्तीचा जबाबदारीची जाणीव , प्रेमाचा गोडवा आणि नात्याचा संस्कार रुजविणारा सण म्हणजे ' राखी पौर्णिमा '*

*माझ्या सर्व बंधुरायास रक्षाबंधनाच्या सस्नेह शुभेच्छा!*
💐💐💐💐💐💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
।।बहिण।।

        ।। मायेचं साजुक तुप
            आईचं दुसरं रूप।।

       ।।  काळजी रूपी धाक
           प्रेमळ तिची हाक।।

        ।। कधी बचावाची ढाल
      कधी मायेची उबदार शाल।।

      ।। ममतेचं रान ओलांचिंब
   पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

     ।। दुःखाच्या डोहावरील
           आधाराचा सेतू।।

        ।। निरपेक्ष प्रेमामागे
           ना कुठला हेतू।।

        ।।कधी मन धरणारी ,
     तर कधी कान धरणारी.।।

    ।।कधी हक्काने रागवणारी,
 तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

        ।।बहिणीचा रुसवा जणु,
          खेळ उन-सावलीचा.।।

       ।।भरलेले डोळे पुसाया
      आधार माय- माऊलीचा.।।

    ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
          या नात्यात ओढ आहे.।।

       ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
             चिरंतन गोड आहे.।।

    ।।भरलेलं आभाळ रितं कराया
         तिचीच ओंजळ पुढे येई .।।

      ।।जागा जननीची भरुन
    काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।

       ।।निर्मिली देवाने आई नंतर बहिण.।।

।। ज्यांना नाही बहिण, त्यांनी मानावी एक चांगली बहिन ........... ।।

👆Dedicated to all sisters👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻




🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻?

Tuesday 16 August 2016

वसमत ते तरोडा नाका चे टिकिट





तरोडा नाका ते वसमत चे टिकिट



*गोष्ट एका रूपयाची*
तसे तर एक रूपयाला आज तेवढी किंमत नाही. अगदी 20 - 25 वर्षापूर्वीची जर बाब विचारात घेतली तर लक्षात येईल की, एक रूपया किती महत्वाचे आहे ? त्या काळी 5 पैश्याला सुद्धा वस्तु मिळत होती आणि खिशात एक रूपया आहे म्हणजे खुप बरे वाटायाचे. दिवस सरले काळ बदलला. रुपयाचे अवमूल्यन सुरु झाले. त्या रूपयाला कोणी विचारेनासे झाले. आज भिकारी सुद्धा एक रूपया घेत नाही. अहो बाजारात रूपयला काहीही येत नाही. असे तो बोलतो.  घरात मुले ही रूपया घेत नाहीत आणि सरकारने सुध्दा या रुपयांचा आकार खुपच लहान करून टाकले. पूर्वीची चवन्नी किंवा आठ आनेच्या आकारांत एक रूपयाची बंदा केली आहे. एवढं सगळ रूपयाची गोष्ट सांगण्यामागे कारण म्हणजे इकडे जरी एक रूपयाची किंमत कमी झाली असली तरी, एक घटना आज अशी घडली की हाच एक रूपया त्यास मूल्य देऊन गेला.मी नुकतेच वसमत ला जाण्यासाठी तरोडा नाका येथून बस क्रमांक MH 20 L 0336 या राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजे ST बस मध्ये बसलो. वसमत पर्यन्तचे भाडे होते 29 रु. ( आकस्मिक सहायता निधी एक रु.) म्हणजे 30 रूपयाला फक्त एक रूपाया कमी. माझ्या अगोदर एकाने वसमतचे टिकिट घेतले त्यास त्या वाहकाने म्हणजे कंडक्टरने एक रूपया परत दिले नाही. त्यानंतर मी टिकिट घेतलो. एक रूपयाची मागणी केली तेंव्हा सूटे नाहीत उतरताना घ्या. म्हणजे मला ही त्यांनी एक रूपया परत दिले नाही. असे त्या गाडीतील जवळपास 25 - 30 प्रवासी होते. ज्याना त्या कंडक्टरने तिकीटातील उरलेला एक रूपया परत दिला नाही. मला एक रूपया मिळाला नाही त्याचे दुख मला नव्हते पण थेंबे थेंबे तळे साचे या म्हणी नुसार त्यांच्या जवळ जवळपास 25- 30 प्रवाश्यचे तेवढे एक रूपया प्रमाणे पैसे जमा झाले. ज्याप्रकारे सरकार आकस्मिक सहायता निधी म्हणून शासन प्रवाश्याकडून प्रति व्यक्ती एक रूपाया घेत आहे. त्याच पद्धतीने यांचा ही कंडक्टर सहायता निधी चालू आहे की काय ? असे वाटते. विचार करू या दिवसभरात तो कंडक्टर प्रत्येक प्रवाश्यचे एक रूपया प्रवाश्यना परत न करता किती रुपये जमा करीत असेल ?एक रूपया कंडक्टर ला कसा मागावा ? स्वतः च्या स्टेटसचा विचार करून कोणताही प्रवासी त्या कंडक्टरला एक रूपया मागत नाही आणि एखाद्याने एक रूपया मागितले तर त्यास उत्तर मिळते उतरताना घ्या. बस उतरताना एक तर प्रवश्याना घाईत लक्षात राहत नाही किंवा कंडक्टर कडे शेवटपर्यन्त रूपया शिल्लक नसते.मी या एक रूपया बद्दल बोलत नाही. मात्र माणसाची लालसा अश्या छोट्या छोट्या कृतीतुन तयार होते आणि त्याचे मोठे स्वरुप म्हणजे लाच घेणे आणि भ्रष्टाचार करणे.बसमध्ये लिहिलेले असते की बसचे योग्य भाडे देऊन प्रवास करा. वास्तविक पाहता त्या कंडक्टरचे कर्तव्य आहे की टिकिट दिल्यानंतर प्रवाश्यचे उरलेले शिल्लक पैसे परत करणे मग ते एक रूपया असो वा पाच रुपये. प्रवाश्यचा एक रूपया आपण ठेवून घेतो याचा अर्थ असा होतो की आपण काही तरी चोरी केली आहे त्यामुळे मनास शांती किंवा समाधान मिळत नाही. तेच जर प्रवाश्याचे उर्वरित पैसे प्रमाणिकपणे आपण परत केलो तर नक्की आपणास समाधन मिळेल यात शंका नाही. या पध्दतीने सदरील कंडक्टर रोज अगाऊ पैसा कमावितो त्याला त्या एक रूपयाची चटक लागली असे म्हणायला हरकत नाही. तो जर खरोखरच प्रमाणिक असेल तर शिल्लक एक रूपया चॉकलेट च्या स्वरुपात देऊ शकतो. बाहेरच्या दुकानात किंवा काही ठिकाणी रूपए दोन रुपए शिल्लक राहत असल्यास ते चॉकलेट देतात. तसे यांना देता येत नाही का ? प्रवाशी नक्कीच खुश राहतील आणि मनास शांती ही मिळेल. वसमत वरुन सायंकाळी परत नांदेड ला जाण्यासाठी निघालो परत ST ने. गाडी क्रमांक MH 14 BT 1841 या बसने. तरोडा पर्यन्त टिकिट घेतल तर 29 रु. आणि परत या कंडक्टर ने सुध्दा मलाच नाही कोणालाच एक रूपाया परत केला नाही. जर एखाद्या वेळी आपल्या जवळ तिकीटातील एक रूपाया कमी असेल तर आपणास टिकिट मिळणार नाही. कारण यावेळी कंडक्टर हमखास म्हणतो की मी कुठून भरू आणि आपण ही याबाबत कशाला त्याला त्रास म्हणत बरोबर किंवा जस्ट पैसे देऊन टिकिट घेतो.राज्य परिवहन महामंडळ या बाबीवर काही तरी तोडगा काढावा. टिकिट 5 किंवा 10 च्या पूर्ण पटीत ठेवावा. ज्यामुळे वाहकाला शिल्लक पैसे ठेवून घेण्याचे मनात सुध्दा येणार नाही आणि व्यवहार सुरळीत व चांगले होईल. राज्य परिवहन विभाग या एक रूपया आणि दोन रुपयांच्या शिल्लक बाबीचा जरूर विचार करून टिकिटचे स्वरुप बदलेल काय ? राज्याचे परिवहन मंत्री मा. आ. दिवाकर रावते याकडे लक्ष देतील अशी आशा आहे.
ना.सा. येवतीकर
येवती ता. धर्माबादजि. नांदेड



Sunday 14 August 2016



*फ्रेश मॉर्निंग बुलेटिनची वर्षपूर्ति*
               शब्दांकन : कुणाल पवारे

सोशल मीडिया मध्ये फेसबुकच्या नंतर whatsapp चा वापर खुप वाढला.परंतु लोक याचा चांगला वापर करण्याऐवजी रोज सकाळी सुप्रभात आणि संध्याकाळी शुभ रात्री च्या पोस्ट टाकून परेशान करतात, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. ग्रुप मध्ये तर सांगायला सोय नाही काही महत्वाचे तर काही खुपच तकलादु पोस्ट पाहण्यास मिळतात. त्यामुळे सर्व सदस्य मंडळी कंटाळून जातात. ग्रुप सोडता ही येत नाही आणि संदेश स्वीकार केल्याशिवाय पर्याय नसतो. अश्या या विपरीत परिस्थितीत "नासा ग्रुप धर्माबाद" चे एडमिन असलेले ना.सा. येवतीकर व त्यांचे सहसंयोजक कुणाल पवारे यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट 2015 रोजी *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* पोस्ट करण्यास सुरुवात केली. ज्यास आज एक वर्ष पूर्ण होत असून आज दुसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

*कशी चालू झाली ही बुलेटिन* याबाबत माहिती जाणुन घेतली असता मिळालेली माहिती अशी
नासा येवतीकर हे धर्माबाद तालुक्यातील येवती येथील रहिवाशी असून त्यांना वृत्तपत्र क्षेत्रात रूची असल्यामुळे ते अधुनमधून विविध वृत्तपत्रात स्फुटलेखन व स्तंभलेखन करतात. तालुक्यातील सर्व शिक्षक मित्रांना एकदाच एकत्रित माहिती उपलब्ध व्हावी या उद्देश्याने त्यांनी *नासा ग्रुप धर्माबाद* च्या नावाने whatsapp ग्रुप तयार केले. पूर्वी या ग्रुप मध्ये फक्त 100 सदस्य असायचे त्यावेळी तालुक्यातील अनेक शिक्षक मित्रांना या ग्रुप मध्ये येता आले नाही पण सदस्य संख्याची मर्यादा वाढल्यानंतर तालुक्यातील सर्वाना यात समाविष्ट होण्याची संधी मिळाली. धर्माबाद तालुक्यातील पाटोदा येथील के. एम. पाटील विद्यालय मधील शिक्षक कुणाल पवारे जे की कुंडलवाड़ी येथून विविध वृत्तपत्रात वार्तांकन करतात. त्यांनी एक कल्पना मांडली की, रोज शाळेत परिपाठच्या वेळी बातम्या वाचन हे उपक्रम राबवित असताना शिक्षक आणि विद्यार्थ्याची खुप धावपळ होत आहे. त्यासाठी आपल्या ग्रुप वर रोज सकाळी आठच्या पूर्वी पाच सहा बातम्या पोस्ट केले तर कसे राहील ? या विषयी ग्रुप वर चर्चा करण्यात आली आणि या बुलेटिनचा जन्म झाला.

कुणाल पवारे हे वृत्तपत्राचे प्रतिनिधी असल्यामुळे दररोज सायंकाळी 10:00 ते ना.सा. येवतीकर यांना 6 - 7 निवडक बातम्या पाठवितात त्याचे संकलन करून त्यावर थोड़ संस्करण करून नासा ग्रुप धर्माबाद वर सकाळी 7 - 8 च्या दरम्यान पोस्ट करण्याची जबाबदारी ना.सा. येवतीकर यांनी घेतली सुरुवातीला या बुलेटिन चे नाव *सकाळचे बातमीपत्र* असे नाव होते परंतु दैनिक एकमतचे प्रतिनिधी माधव हणमंते यांनी एके दिवशी सकाळचे बातमीपत्र ऐवजी दूसरे नाव दिले तर बरे राहील. त्यांची सूचना ग्रुप वर चर्चिले गेले आणि शेवटी *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन*असे नामकरण करण्यात आले. जे आज पर्यन्त चालू आहे. अल्पावधीत ही बुलेटिन ग्रुपच्या बाहेर ही पोस्ट केल्या जाऊ लागली आणि या पोस्टचे चाहता वर्ग तर तयार झाला. शिवाय या पोस्टची मागणी वाढली. अनेक ग्रुप मध्ये समाविष्ट करण्यात येऊ लागले. पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रात बुलेटिन पोहोचली. रोज सकाळी 07 च्या पूर्वी प्रत्येकाच्या whatsapp वर बुलेटिन पोस्ट होऊ लागली.

या बुलेटिनचे अजून एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ना. सा. येवतीकर आपल्या खास निवेदन शैलीत बुलेटिनची ऑडियो क्लिप तयार करतात आणि जणू आपण आकाशवाणी वरील सकाळच्या बातम्या ऐकत आहोत असा भास होतो. यामुळे प्रत्येक जन या बुलेटिनची सकाळी सकाळी आतुरतेने वाट पाहत असतात.

जालना जिल्ह्यातील सेलू येथील प्राथमिक शिक्षक तथा कवी शरद ठाकर यांची गुगली रोज फेसबुक किंवा इतरत्र  वाचण्यात येत असे. त्यांना स्वतः नासा येवतीकर यांनी संपर्क केला आणि बुलेटिन साठी रोज गुगली पाठविण्याची विनंती केली तेंव्हा त्यांनी लगेच होकार दिला आणि या बुलेटिनमध्ये *गुगली* चा समावेश करण्यात आला.
आपल्या स्वकीय मित्राच्या वाढदिवसाची आठवण करून देण्यासाठी *रवी यमेवार* यांच्या वाढदिवसापासून *आजचा वाढदिवस* या उपक्रमचा यात  समावेश करण्यात आला. त्यामुळे आज प्रत्येक मित्राचा वाढदिवस सर्व मित्रापर्यन्त बुलेटिनच्या माध्यमातून पोहोचत आहे. एक दिवस किंवा दोन दिवस पूर्वी वाढदिवस असल्याची कल्पना दिली जाते. आणि त्याची नोंद घेतली जाते.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील शिक्षिका सौ संगीता देशमुख यांनी या बुलेटिन मध्ये दिनविशेषचा समावेश केल्यास शाळेतील परिपाठासाठी कामाला येईल, अशी विनंती वजा सूचना देण्यात आली ते लक्षात घेऊन जानेवारीच्या नविन वर्षात दिनविशेषचा बुलेटिनमध्ये समावेश करण्यात आला

महाराष्ट्रात असे अनेक शिक्षक आहेत ज्यांचे ब्लॉग खुप सूंदर आणि माहितीपूर्ण आहेत त्यांची सर्व शिक्षक मंडळीना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या ब्लॉगची लिंक यात जोडण्यात आली

यावर्षीच्या जून महिन्यापासुन मराठी भाषेचा विकास व्हावा आणि मुलांना कठीण किंवा बुचकळ्यात टाकणारे शब्दाची ओळख व्हावी यासाठी *आजचा मराठी शब्द* बुलेटिन मध्ये समाविष्ट करण्यात आले.
एका मित्राने या बुलेटिन मध्ये *बोधकथा* असावी असे सुचविले होते त्यानुसार हदगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे यांची बोधकथा रोज पोस्ट करण्यास परवानगी मिळाली आणि मित्रांची ती ही ईच्छा पूर्ण करता आले.

*बुलेटिन ऑनलाइन रेडियोवर*

नाशिकच्या गुरुकुल रेडियोच्या शेखर ठाकुर यांना संपर्क करून सदरील बुलेटिनची ऑडियो गुरुकुल रेडियोवर  प्रसारण करता येईल काय ? याविषयी विचारणे झाले. त्यांनी लगेच होकार दिला आणि गुरुकुल रेडियो वर संपूर्ण महाराष्ट्रात ही बुलेटिन पोहोचली. या बुलेटिनची नोंद प्रसिध्द शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी दैनिक लोकमतच्या मंथन पुरवणीत " मोबाईल मुलांचा अभ्यासु दोस्त " या त्यांच्या लेखात घेतली हे विशेष

*या बुलेटिन विषयी काही निवडक प्रतिक्रिया*

मला तर फारच उपयोगी आहे आपले बुलेटीन . तुम्हाला धन्यवाद द्यायला माझ्याकडचे शब्द कमी पडतील . माझ्या शाळेच्या गावी कोणाकडेच वर्तमानपत्र येत  नाही आणि मला शाळेत जाताना न्यायला जमत  नाही , पण  इच्छाशक्ती असली ती गोष्ट  घडतेच त्या प्रमाणे तुमचे बुलेटीन माझ्या उपयोगी पडले . तुमचे आभार मानण्या पेक्षा तुमच्या ऋणात रहायला आवडेल तुमचे नुसते बुलेटीनच नाही तर त्यातले सर्वच घटक उपयुक्त असतात . उपक्रम तर खुपच छान . अगदी सोपे आणी मुलांना सहज जमणारे nice. खुप खुप धन्यवाद .

स्मिता भंडारे .
रा .जि . प शाळा नवेदरबेली
केंद्र नागाव ता . अलिबाग रायगड
=====*****======******======
खुप प्रभावी आणि लोकप्रिय उपक्रम.
त्यासोबत ऑडिओ आणि गुगली हे सुध्दा पुरक उपक्रम अत्यंत परिपुर्ण.
मी या सदराचा नियमित वाचक आहे.
वेळोवेळी केलेल्या सुधारणाही लक्षवेधी भासतात.
वर्षपुर्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन  व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

रामराव जाधव.
तिसगाव ता. पाथर्डी
जि.अहमदनगर.
पिन 414106
मो 7743840604
     942290335
=====*****======******======
आपले फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मुळे जगातील घटनांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे  दिनविशेष समजते बोधकथा बोध देऊन जातात. वाढदिवस लक्षात येतात. नवीन उपक्रमांची ओळख होते. ऑडीओमुळे शब्दोचार कसे असावे याचे ज्ञान मिळते
थोड्यावेळात जगाची सफर केली जाते. सणांचे महत्व समजते. बुलेटिन शतायुषी होओ.अशी परमेश्वराजवळ प्रार्थना .धन्यवाद!

सुलभा कुलकणीॅ मुंबई.
=====*****======******======
आपले बुलेटीन खूप माहितीपूण॔ आहे.जर मी एखाद्या दिवशी ते वाचले नाही तर काहीतरी महत्वाचे वाचावयाचे राहून गेलेले आहे असे वाटते.आपले बुलेटीन स्थानिक च नाही तर प्रांत आणि देशविदेशातीलही बातम्या आमच्या पयंत पोंचविते.आपल्या बुलेटीन मधिल मोरल स्टोरीज खूप छान असतात.आपले हे काम दखलपातृ आहे.
असेच चालू ठेवा ही विनंती.

- प्रा. गोविंद हंबर्डे नांदेड
=====*****======******======
आपल्या बुलेटिनचा उपयोग मला स्पर्धा परिक्षेसाठी होतो कारण यात  बातम्या सोबतच दिनविशेष असतो, याच बरोबर दररोज शाळेत होणाऱ्या परिपाठामधे दिनविशेष,बातम्या,बोधकथा,यांचा समावेश आम्ही दररोज करत असतो,
फ्रेश मॉर्निंग बुलेटेन म्हणजे आमच्यासाठी माहितीचा खजाना आहे,
आपल्या कार्यासाठी मनपूर्वक शुभकामना.

हेमंतकुमार शंकरराव वागरे
ता जि नांदेड
=====*****======******======
*फ्रेश बुलेटीन प्रथम वर्धापन दिन*
आजपर्यत फ्रेश बुलेटीन  दूरदर्शन वरूनच  पहात होते.
 पण रोज सकाळी  येणार्‍या वर्तमान पत्रापूर्वी आपल्या WhatsApp ग्रृपवरून बुलेटिन हजर असते.
आमच्या मुंबईतील सगळ्या साद माणुसकीची ग्रृपची सुरूवात आपल्या फ्रेश बुलेटीन होते
आणि सगळेच ताजेतवाने होतात.
आम्हा शिक्षकांना मुलांकडून परिपाठ करून घेताना फ्रेश बुलेटिनचा  आधार वाटतो.
काळानुसार आपल्या फ्रेश बुलेटीनचे बदलते रूप आवश्यक वाटते
हळूहळू मराठी सोबत इंग्रजीचाही समावेश केल्यास माध्यमिकच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतील  असे वाटते . आॅॅडिओ बुलेटिनही मस्त वाटत.थोड्यावेळात अचूक योग्य बातम्या समजतात.
फ्रेश बुलेटिनचे हेच वैशिष्ट्य आहे.
फ्रेश बुलेटिनसाठी नासा सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच.
यापुढेही फ्रेश बुलेटीनला तुफान प्रतिसाद लाभो.

स्नेहल आयरे मुंबई
=====*****======******======
फ्रेश मॉर्निंग बुलेटिन हे एक महत्त्वाचे व माहितीपुर्ण सदर आहे.ज्यामुळे सकाळीच महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात कळतात.मला तर पेपर वाचायचं काम पडत नाही.परिपाठासाठी उपयुक्त माहिती जसे दिनविशेष व सुविचार यातुन मिळतो.मी हे सदर माझ्या c.p.s.ग्रुपवर टाकत असतो,ज्याचा फायदा सर्वांना होतो.
     हे सदर असेच भरभराटीस येवो अशा ना.सा.येवतीकर सरांना शुभेच्छा..!
----- दिलीप धामणे, (जि.प.शिक्षक) हिंगोली (मराठवाडा)
=====*****======******======
यशस्वी प्रवासाबद्दल मनपूर्वक अभिनंदन!
सद्याचे जीवन हे अतिशय धावपळीचे आहे. प्रत्येक सदस्याला बातम्या किंवा मजकूर वाचण्यास वेळ देणे शक्य होत नाही. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील बंधू - भगिनींना शैक्षणिक गुणवत्तेशी निगडीत पण पोषक बाबींकडे हटकून लक्ष देणे तर अवघडच. आपल्या *फ्रेश मॉर्निग बुलेटिन* च्या माध्यमातून मात्र हे शक्य होत आहे. कमी वेळात, कमी त्रासात मिळणारे हे एक अमृतच आहे. ह्या अमृतरुपी ज्ञानाला असेच यशस्वी वाहून नेण्यासाठी आपल्या समूहाला हार्दिक शुभेच्छा!

कन्हैया परमानंद भांडारकर
मु. दिघोरी, पो. नान्होरी
ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर
=====*****======******======
*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* बाबत उर्वरित अभिप्राय वाचण्यासाठी खालील ब्लॉग ला भेट दया
=========================
http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/fmbuletin.html
=========================
धन्यवाद

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...