Saturday 17 October 2015

तस्मै श्री गुरवे नम:

कालच आपण सर्वत्र शिक्षकदिन मोठय़ा थाटात साजरा केला. 'गुरूब्रम्हा, गुरूविष्णू, गुरूदेवो महेश्‍वर: गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला खूप मोठे आदराचे स्थान आहे. गुरूमुळे जीवनातील अंधकार नाहीसा होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरतो. म्हणूनच पुरातन काळ म्हणजे रामायण व महाभारताच्या काळापासून गुरूला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या काळातील राजे-महाराजे गुरूच्या सल्ल्याशिवाय पुढील मार्गक्रमण ठरवीत नसत. राजे गुरूंना आदर व सन्मान देत असत त्यामुळे राज्यातील जनता सुद्धा त्यांचा आदर करीत असत. गुरूच्या मनाविरूद्ध वागल्यास गुरू क्रोधीत होतील,त्यांना संताप येईल आणि रागाच्या भरात शाप देतील अशी भिती सुद्धा लोकांच्या मनात होती. याचाच अर्थ समाजात गुरूचा फार मोठा दबदबा होता. त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी करून घेण्याची कला राजा जवळ असणे आवश्यक होती. त्याकाळात गुरूगृही जाऊन विद्या शिकण्याची पद्धत होती ज्यास 'गुरूकूल' पद्धत असे संबोधल्या जाई. परंतु या गुरूकूल मध्ये काही ठराविक लोकांनाच विद्यादान केल्या जात असे. कारण द्रोणाचार्य गुरूंनी एकलव्यास विद्या शिकविण्यास नकार दिला होता परंतु त्याच्या गुरू भक्तीमुळे त्याला ज्ञान मिळविता आले. याचा एक अर्थ आपण असा काढू शकतो की, त्याकाळी सुद्धा गुरूंना शासनाचेच (राजांचे) ऐकावेच लागत असे. राजाच्या परवानगी शिवाय राजगुरूला कोणालाही शिकविता येत नव्हते.

कालाय तस्मै नम: नुसार काळ बदलत गेला आणि त्या अनुषंगाने समाज सुद्धा बदलत गेला. गुरूच्या घरी जाऊन शिकण्याच्या पद्धतीत हळूहळू बदल होत गेला. गुरूची जागा शिक्षकाने घेतली. समाजात आज वेगवेगळया क्षेत्रात वेगवेगळे प्रकारचे गुरू आहेत. मात्र समाजाचा सर्वात जास्त विश्‍वास ज्या गुरूवर आहे तो म्हणजे शिक्षक. परिस्थितीनुसार काळ बदलत राहतो आणि काळानुरूप परिस्थिती बदलते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले, त्यांना शाळेतला गुरू लाभलाच नाही तर ते एवढे मोठे साहित्यिक कसे झाले? गुरूदेव रविंद्रनाथ टागोर एक दिवस शाळेत जाऊन एवढे महान कवी कसे बनले? कवयित्री बहिणाबाई चौधरी एकही दिवस शाळेत न जाता प्रसिद्ध साहित्यिक कसे बनू शकल्या? तर त्याचे उत्तर आहे अनुभव. त्यांचा गुरू होता अनुभव आणि विलक्षण बुद्धीमत्ता यामुळे ते शक्य झाले. परंतु आपण सामान्य असलेले व्यक्ती आपणाला पदोपदी मार्गदर्शन करणारे, दिशा देणारे आणि रस्त्यावरून चालवत नेणार्‍या गुरूची गरज भासते. गुरूविना आपले जीवन अपूर्ण आहे.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे सांगणारे महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा अपार कष्ट सोसले. लोकांकडून त्यांचा खूप छळ केला गेला पण त्यांनी शैक्षणिक काम थांबविले नाही. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यात फुले दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपणास गाव तेथे शाळा बघायला मिळत आहे.

मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असे सध्या जे बोलल्या जात आहे ते महात्मा फुलेंनी सन १८८२ मध्ये हंटर कमिशनच्या समोर दिलेल्या साक्षी मध्ये म्हटले जाते. परंतु त्यांना त्याकाळी अनेक वाईट प्रसंग आणि अनुभवास तोंड द्यावे लागले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली परंतु त्या ठिकाणी श्किविण्यासाठी कोणीच तयार होईना. शिकविण्याचे काम बर्‍याच जणांना तुच्छतेचे वाटत असे. तसेच शिकविण्याचे काम हे येड्यागबाळ्याचे नाही. त्यासाठी खूप मोठी विद्या जवळ असावी लागते असा समज होता. परंतु जोतिबांनी आपल्या निरक्षर पत्नीला म्हणजे सावित्रीबाईला शिकविले आणि देशातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान दिला. समाजात गुरूला कोणत्या संकटाला, त्रासाला तोंड द्यावे लागत होते याची प्रचिती यावरून आपणाला येते. समाजात हळूहळू शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. शिक्षणाचे महत्व लोकांना कळू लागले. देशातील नेते आणि पुढारी समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगू लागले. शिक्षणाविषयी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.' त्याच सोबत ते लोकांना स्वत:चा समाजाचा विकास करायचा असेल तर 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र दिला. त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर श्क्षिणाचा खेडोपाडी दरी खोर्‍यात प्रसार केला. शाळा तर उघडल्या जात होत्या मात्र त्यांना शिकविण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. सन १९९0 च्या दशकापर्यंत मुलांना शिकविण्यासाठी 'शिक्षक' म्हणून नोकरी करण्यासाठी पुढे येणार्‍यांची संख्या फारच कमी होती. कारण या काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजलं जात असे. त्यामुळे सहसा कोणी पुढे येत नव्हते. जे शिक्षक म्हणून काम करीत होते ते कधी तिकडे व्यवसाय म्हणून पाहिले नव्हते. ती त्यांची एक प्रकारे सेवा होती. असा त्यांचा स्वभाव होता.

निस्व:र्थ म्हणता येणार नाही परंतु जेवढे मिळते तेवढय़ावर समाधान मानून सेवाभावी मनाने काम करणारी शिक्षक मंडळी समाजात मानाचे स्थान मिळवून गेले.

आज शाळेतील शिक्षक मंडळी तणावाखाली वावरत आहेत असे म्हटले तर शिक्षकी पेशा सोडून जी मंडळी आहे त्यांना हसू येते आणि विनोदबुद्धी सुचते. मात्र जे या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना हे सत्य आहे असे वाटेल. शाळेमधून मुलांवर संस्कार करण्याचे काम शिक्षकांनी करणे खरे तर आवश्यक आहे. मात्र किती शाळेतून मुलांवर संस्कार केले जातात. याची चाचपणी केल्या जात नाही. कारण आज त्यांना अभ्यासक्रमासमोर संस्कार काहीच वाटत नाही. येथूनच समाज रसातळाला जाणे प्रारंभ झाली म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. समाजात आज सुद्धा तस्मै श्री गुरवे नम: ची खरी गरज आहे. फक्त शिक्षक दिन आले म्हणून शिक्षकांचा सन्मान किंवा सत्कार न करता या दिवसांसारखे रोजच त्यांना सन्मान देणे खरेच गरजेचे आहे असे वाटते.

नागोराव सा. येवतीकर
मो. ९४२३६२५७६९
तस्मै श्री गुरवे नमः 

दैनिक देशोन्नती च्या फन क्लब पेज वर माझे शब्द शोध क्रमांक 02 प्रकाशित झाले आहे. ते कोडे खालील उपक्रम मधून तयार झाले

@ मराठी शब्दसंपत्ती वाढविण्याचा उपक्रम @

मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी मी घेतलेला एक छोटा सा उपक्रम ज्यामुळे मुले उत्साही तर झालीच शिवाय त्यांना मराठी भाषेतील समान अर्थी शब्दाची ओळख ही झाली

**** रीत : सर्वात पहिल्यांदा वर्गातील मुलांना " आज आपण एक खेळ खेळूया " अशी सुरुवात केल्यास मुले प्रोत्साहित होतील आणि आपणास प्रतिसाद मिळेल. ज्या वेळी मुले अभ्यास करून खूपच कंटाळून जातात त्यावेळी या खेळाचा वापर केल्यास त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतात. खेळाची सुरुवात " शब्दांच्या शेवटी - - - - येणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा." मुले त्यांना माहीत असलेले खूप शब्द लिहतिल. ते सर्व उत्तरे स्विकार करावे.

**** त्यात सुधारणा काय करावी ?
असे शब्द लिहिल्यानंतर " आत्ता तुम्हांला ज्या शब्दाचा समान अर्थी म्हणजे त्याच शब्दाचा दुसरा अर्थ माहीत आहे ते लिहा. " मुले त्यांना माहीत असलेल्या शब्दाचे समान अर्थी शब्द लिहतिल, यामुळे त्याचे समान अर्थी शब्दाचे दृढीकरण करून घेता येईल. आणि ज्या शब्दाचे समान अर्थी शब्द मुलांना लिहिता आले नाही ते समान अर्थी शब्द आपण सांगायचे. वर्गातील सर्व मुलांच्या शब्दाचे संकलन करून आपण आपला नवीन मराठी शब्द कोश तयार करता येवू शकेल.

**** कोडे कोणी सोडवावे :
वरील कोडे शाळेतल्या मुलांकडुन किंवा आपल्या घरातील शालेय मुलांकडुन सोडवून घेण्याचा प्रयत्न करा. इयत्ता 4 थी ते10 वी या वर्गात खूपच प्रतिसाद मिळेल याची मला खात्रीआहे.

**** प्रतिसाद द्यावे :
तेंव्हा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला किंवा काय समस्या उद्भवल्या हे माझ्या पर्सनल अकाउंटवर पोस्ट करायला विसरू नका.पोस्ट टाकते वेळी मात्र आपले नाव व शाळेचे नाव टाकण्यास विसरू नका.
nagorao26@gmail.com या ई मेल वर किंवा+919423625769 या whatsapp क्रंमाकावर आपल्या प्रतिक्रिया पाठवावे.


पर्यावरण आणि मानवी जीवन 

** मराठीच्या विकासासाठी हे करू या . . . . . .

** उपक्रमशील शिक्षकाचे नाव **
नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली
ता. धर्माबाद जि. नांदेड

** मराठी - व्याकरण **

** तुम्हांला माहीत असलेले शब्द शोधा ज्यात शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावी **
- - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
** शाळेतल्या विद्यार्थ्याकरिता हा एक उत्तम उपक्रम असून यातून मराठी शब्द शुध्द लिहिण्याचा सराव होतो. हा एक शाब्दिक खेळ आहे, ज्यात मुले स्वतःहून शब्द शोधण्यास प्रारंभ करतात. त्यांना शब्द शोधण्यासाठी आपण फक्त मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

** या खेळाचा उपयोग काय होतो ?  तर मुलांना शब्दाची अचूक ओळख होते आणि मराठीत काही मोजकीच शब्द वगळले तर सर्व शब्द ज्याच्या शेवटचे अक्षर क आहे त्यापूर्वीच्या अक्षरांवर पहिली वेलांटी येते हे मुलांना तात्काळ समजण्यासाठी मदत होते.

** अश्याच छोट्या छोट्या उपक्रम व खेळातून मुलांना मराठीच्या शब्दाची ओळख करून देता येईल.

** शब्दाची यादी तयार करण्याचे काम अर्थातच विद्यार्थ्याना लावले तर अजून मजा येईल. यादी तयार करीत असताना पाठ्यपुस्तक वापरणे बंधनकारक करावे. शब्द अंदाजे लिहू नये. शुद्ध शब्द लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तक वापरण्याचा आग्रह धरल्यास मुले अचूक शब्द लिहितिल अन्यथा पुन्हा चूका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

** हा उपक्रम आपण तिसऱ्या वर्गपासून घेता येवू शकतो.

** हा उपक्रम खालील प्रकारात विभागणी करून यादी तयार करावी.

* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे तीन अक्षरी शब्द शोधा -
* उदा. - आर्थिक
*************************************
. . शब्द शोध क्रमांक 09. .                                   
                      -  नागोराव सा. येवतीकर
*************************************
शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे तीन अक्षरी शब्द शोधा

01. दररोज प्रकाशित होणारे . [  ] [  ] [  ]
02. पंधरा दिवसांतून. . . . . .  [  ] [  ] [  ]
03. महिना एकदा होणारे . . . [  ] [  ] [  ]
04. वर्षातून एकदा होणारे . . .[  ] [  ] [  ]
05. देशाचे रक्षण करणारे. . . [  ] [  ] [  ]
06. हीरे, मोती . . . . . . . . .  [  ] [  ] [  ]
07. क्षणापुरते . . . . . . . .  .  [  ] [  ] [  ] 
08. मिसळण, बेरीज . . . . . . [  ] [  ] [  ]
09. नाव चालविणारा .  . . . . [  ] [  ] [  ]
10. देवास मानणारा .  . . . . .[  ] [  ] [  ]
*************************************
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे चार अक्षरी शब्द शोधा -
उदा. - सामाजिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे पाच अक्षरी शब्द शोधा -
उदा. - राजनैतिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे सहा अक्षरी शब्द शोधा -
उदा. -  नियतकालिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
प्रत्येक प्रकारात आपण भर टाकावी
चला तर मग . . . . . . . . .
आपण शब्द शोधू या आणि आपली व आपल्या विद्यार्थ्यांची मराठी शब्दसंपत्ती वाढवू या.
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
नोट : -
** हा खेळ तुम्हांला कसा वाटला . . ?
** विद्यार्थ्यांनी कसा प्रतिसाद दिला . . . . ?
** या उपक्रमाचा काही फायदा आपणास झाला काय . . . ? किंवा
** या उपक्रमात काही त्रुटी, कमतरता, चुका असल्यास, वा काही बदल करावा असे आपणास वाटत असेल तर . . . . . . .
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
जरूर आपले मत व्यक्त करावे. आपल्या अभिप्रायाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद.
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
आपले मत येथे व्यक्त करा
** nagorao26@gmail.com
** 9423625769

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती पो. येताळा
  ता. धर्माबाद जि. नांदेड
  पिन 431809

** प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे ** 

* उपक्रमाची प्रस्तावना -
प्रश्न म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठ्या  पडतात. प्रश्नाचे उत्तर देतांना अनेकांच्या नाकी नऊ येते. प्रश्नाचे उत्तर आठवत नसले की, मन कसे अस्वस्थ होते आणि त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी शोधाशोध सुरू होते, याबाबतीत जे जाणकार किंवा तज्ञ असतील अश्या काही मित्रांना या प्रश्नांच्या उत्तराबाबत चौकशी केली जाते. बहुतांश वेळा विद्यार्थ्याना पाठ समजलेला असतो मात्र प्रश्नाचे उत्तर सांगता येत नाही आणि सांगता येत नसल्यामुळे लिहिता येत नाही ही समस्या प्राथमिक शाळेत फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. विद्यार्थ्याची ही समस्या कशी  सोडविता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर चटकन कसे सांगतील आणि लिहितिल यांसाठी मी सातव्या वर्गातील एकूण 50 विद्यार्थ्याना डोळ्यासमोर ठेवून सदरील उपक्रमाची निवड केली.

** उपक्रमाचे नाव : -  प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे
या उपक्रमाची सुरुवात करीत असताना विद्यार्थ्याना या उपक्रमाची तोंडओळख द्यावी जेणेकरून विद्यार्थ्याना याची संपूर्ण माहिती होईल. उपक्रमाची ओळख झाली तरच उपक्रम यशस्वी होते अन्यथा हा उपक्रम फक्त हुशार विद्यार्थ्यानाच फायदेशीर ठरेल.
सर्वप्रथम विद्यार्थ्याना पाठाचे अध्यापन करावे आणि पाठातील छोट्या छोट्या प्रश्नांची ओळख द्यावी. प्रश्न आणि उत्तर विद्यार्थ्याच्या वहीत लिहिण्यास सांगावे. पाठ पूर्ण संपल्यावर सर्व प्रश्न एकत्र करावे आणि ते सर्व प्रश्न परत एकदा वर्गात सर्वाना विचारून उत्तराचा सराव करावा. यामूळे विद्यार्थ्याना प्रश्न आणि उत्तराची पूर्ण ओळख होईल. या प्रक्रियेनंतर मग या उपक्रमाला सुरुवात करावयाचे आहे.

*** उपक्रमाची कृती : -
पाठ शिकविणे पूर्ण झाल्यानंतर ज्या प्रश्नांची आपण यादी केली किंवा विद्यार्थ्याना वहीत लिहिण्यासाठी सांगितलेले ते सर्व प्रश्न जाड कागदावर खालीलप्रमाणे लिहावे. यांसाठी लग्नपत्रिकाचा वापर टाकाऊ पासून टिकाऊ म्हणून करता येईल. मराठीसाठी M, पाठ पहिला म्हणून 1 आणि या पाठातील प्रश्नांचे अनुक्रमांक 1 ते पुढील . . . . . असे वरच्या भागावर नमूद करून प्रश्न पट्टी तयार करावी. उदा.
---------------------------------------------------------------------
l M/1/1
l कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन कोण करीत असत ?                               
उत्तर : विष्णू वामन शिरवाडकर
---------------------------------------------------------------------

त्या पाठातील एकूण अश्या प्रश्न पट्टी तयार कराव्यात.  विद्यार्थ्याना ते प्रश्न क्रमाक्रमाने विचारावेत.
* पहिल्यांदा पाच प्रश्न सलगपणे वर्गातील हुशार विद्यार्थ्यास विचारावे.
* हुशार, मध्यम आणि अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्याना याच क्रमाने प्रश्न विचारावे.
* संपूर्ण वर्गात या पध्दतीने प्रश्न विचारले तर सर्व विद्यार्थ्याना त्या प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ होऊन जातील.
* आत्ता आपण हा उपक्रम खेळाच्या स्वरूपात मुलांसमोर घेऊन जाण्यास तयार आहोत.
* एक डबा घ्यावा त्यावर दर्शनी भागावर  विषयाचे नाव " मराठी " असे लिहावे. त्यात सर्व प्रश्न पट्टी टाकाव्यात एक मुलगा आणि एक मुलगी या क्रमाने विद्यार्थ्याना समोर बोलाविले जाऊन त्याना प्रश्न पट्टी उचलण्यास सांगावे.
* सुरुवातीला ती प्रश्न पट्टीचे शिक्षक वाचन करतील आणि विद्यार्थ्याना उत्तरे सांगण्यास प्रोत्साहित करतील
* यात पुढे बदल करून जो विद्यार्थी प्रश्न पट्टी उचलण्यास समोर येईल तो वर्गातील सर्व विद्यार्थ्याना प्रश्न विचारेल.
* प्रश्नपट्टी वर उत्तर लिहिलेले असल्यामुळे समोर आलेल्या विद्यार्थ्याना उत्तर माहीत असेल. मुलांनी प्रश्नांची उत्तर बरोबर दिली असेल तर हे उत्तर बरोबर आहे असे सांगून विद्यार्थी जागेवर बसतील.
* या क्रमाने संपूर्ण वर्गाला एक प्रश्न विचारण्यास संधी मिळते आणि विद्यार्थ्याना प्रश्न उत्तराचा सराव होऊन सर्व प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ होतात.
* प्रश्नांची उत्तरे सांगता आली की विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यासाठी आत्ता विद्यार्थ्याना प्रश्नांची उत्तरे लिहिता आली पाहिजे असे वाटणे साहजिक आहे.
* यांसाठी डब्यातुन शिक्षकांनी प्रश्नपट्टी उचलावी त्याचे वाचन करावे आणि मुलांना फक्त उत्तरे लिहिण्यास सांगावे.
* एका वेळी पाच प्रश्न देऊन त्याचे उत्तर विद्यार्थ्याना आपापसात वही बदलून तपासून घेण्याची सूचना द्यावी.
* त्या पाच प्रश्नांची उत्तरे परत एकदा शिक्षकांनी सांगावे.
* ज्या विद्यार्थ्याचे पाचही उत्तरे बरोबर आली त्या विद्यार्थ्याची वर्गात सर्वांसमक्ष अभिनंदन करावे.
* अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्याचे पाचपैकी एक जरी बरोबर आले असेल तरी त्यांचे अभिनंदन करावे आणि प्रोत्साहन द्यावे, शाबासकी द्यावी.
* यापुढील पायरी म्हणजे याच प्रश्नांवर आधारित 20 गुणांची सराव परीक्षा घेण्यात यावी आणि त्याना किती प्रश्न परीक्षेत आठवतात यांची चाचपणी करावी.
* शक्यतो हा उपक्रम दिवसाच्या शेवटच्या दोन तासिकेत घ्यावे. म्हणजे विद्यार्थ्याना मनोरंजनासोबत अभ्यास ही होईल.
* ज्या दिवशी विषय शिक्षक उपस्थित नसेल त्या दिवशी इतर शिक्षकाची त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली जाते.
* त्या शिक्षकांना प्रश्न पडतो की काय शिकवावे ?
* पण या उपक्रमाने त्यांचा प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. प्रश्न पट्टीवर प्रश्न आणि उत्तर लिहील्यामुळे कोणालाही हा उपक्रम अगदी सहजरित्या घेता येऊ शकेल.
* य उपक्रमाचा फायदा असा आहे की विद्यार्थ्याना पाठावरील सर्व प्रश्नांची उत्तरे चटकन आठवण येतात आणि त्यांच्या आकलनशक्तित वाढ होते. प्रश्नांची उत्तरे आल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी सुध्दा स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करतात
* या उपक्रमांत एकच उणीव किंवा त्रुटी दिसून येते ते म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताना वेळ खूप लागतो आणि आपल्याकडे त्याचीच कमतरता असते.
* मात्र विद्यार्थ्याना या खेळात खूपच मजा येते. विद्यार्थी वारंवार हे उपक्रम घेण्याबाबत हट्ट करतात यावरून या उपक्रमाची सफलता नक्की दिसून येते.
*** प्रतिसाद . . . . . . . . .
आपण ही हा उपक्रम आपल्या शाळेत सुरू करावा आणि आपणांस काय वाटले ? विद्यार्थ्याचा प्रतिसाद कसा मिळाला ? विद्यार्थ्याची प्रगती झाली का ? किंवा या उपक्रमात काही बदल करावा असे आपणांस वाटत असेल तर आपले अभिप्राय नक्की कळवावे.

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक,
जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली
ता. धर्माबाद जि. नांदेड
nagorao26@gmail.com
9423625769

पालक नव्हे ; मित्र बना 

शाळा व्यवस्थापन समितीची आवश्यकता 

** आधी वंदू तुज मोरया . . .



वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा

मुलांनो,आपल्या सर्वाचा लाडका देव म्हणजे गणपती बाप्पा. देव कसला तुम्ही तर त्यांना माय फ्रेंड गणेशा असे म्हणता. पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिल्यामुळे गणेशोत्सव कधी एकदा येतो याची आपणाला उत्सुकता लागलेली असते. प्रत्येक शुभ कार्यात मग तो लग्न समारंभ असो वा  लक्ष्मीपूजन असो, कोनशिला समारंभ असो वा  वास्तू शांती असो की सत्यनारायणाची पूजा असो त्यात सर्वसाधारपणे सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. म्हणूनच श्री गणेशाला आद्य दैवत म्हटले जाते. हिंदू धर्मातील लोकांच्या उंबरठय़ाकडे लक्ष दिल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे घराच्या  चौकटीतील वरच्या आडव्या लाकडी फटीवर श्री गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते. त्याशिवाय घराला घरपण येत नाही. ज्यांच्या घराच्या चौकटींवर श्री गणेशाची मूर्ती नाही असे घर शोधून सुध्दा सापडणार नाही. घरातून बाहेर पडताना आपण कोणत्या कामांसाठी बाहेर जात आहोत ?  स्वार्थासाठी की निस्वार्थ कामांसाठी जात आहोत यांची नोंद चौकटींवर विराजमान असलेले श्री गणेशा करतात, असे पुराणात सांगितले आहे. त्याचमुळे घराबाहेर पडताना वडील मंडळी विशेष करून महिला नेहमीच चौकटीचे दर्शन घेतांना आढळून येतात व ठरविलेले काम वेळेत पूर्ण होवो अशी प्रार्थना श्री गणेशाजवळ करतात.
तसे पाहिले तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला घरात श्री गणेशाची पूजा केली जाते. मात्र भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला घराघरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून विधिवत त्यांची पूजा केली जाते. याच दिवसाची आबाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आतुरतेने वाट पाहतात.  हत्तीचे सोंड असलेले तोंड, सुपासारखे मोठे कान, बारीक डोळे, अगडबंब पोट आणि त्याचा लहानसा वाहन मुषकराज या सर्वाविषयी आपल्या मनात कमालीची उत्सुकता असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घरोघरी श्री गणेशाची स्थापना केली जात असे असा उल्लेख इतिहासात आढळते. भारतीय असंतोषाचे जनक आणि जहाल नेते लोकमान्य टिळकांनी इंग्रजाच्या जुलमी राजवटीविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, लोकांत एकता आणि एकात्मतेचे वातावरण तयार व्हावे म्हणून सन 1890 च्या दशकात श्री गणेशाच्या घराघरातील उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची सन 1894 मध्ये स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केली.  तेंव्हापासून आजतागायत आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू लागलोत. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केली तो उद्देश आज सफल होत आहे काय ? यांचा विचार करण्याची वेळ आपणावर आलेली आहे. या दिवसांत " गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया " या गीतांने सर्वत्र चैतन्यमय वातावरण होऊन जाते. तेंव्हा बोला एकदाचे गणपती बाप्पा $$$$ मोरया $$$$$$.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
nagorao26@gmail.com

नमस्कार मित्रांनो ,
मी नागोराव सा. येवतीकर
अभिमानाने आपणासाठी घेऊन आलोय....

माझ्या ब्लॉगचे GOOGLE PLAY STORE APP जेथुन तुम्हाला browser मध्ये जाऊन ब्लॉग open करण्याची आवश्यकता भासणार नाही.

वेळ कमी आहे ,चटकन ब्लॉग open करायचाय, browser त्रास देतंय....तर मग Na.Sa. हे app open करा व ब्लॉग वरील प्रमुख पोस्टस चा आनंद लुटा...

app पुर्णपणे free असुन केवळ 224kb चे आहे .म्हणजे मेमरीची चिंता करायची गरजच नाहि.
     Na.Sa. हे app डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा....

http://app.appsgeyser.com/Na.%20Sa.

यासोबतच पुढिल लिंकला क्लिक करुन ही डाउनलोड करु शकतात .....

 http://www.appsgeyser.com/2213717

फक्त install लिंकला क्लिक करा व डाउनलोड करा.

   
हे  app आपणांस कसे वाटले ? हे मला माझ्या मोबाईलवर सांगायला विसरु नका.

धन्यवाद आपलाच नासा

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...