Saturday, 13 August 2016

नमस्कार मित्रांनो,

पाहता पाहता *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* एक वर्षाचे होत आहे.


आपणास सदरील बुलेटिन कसे वाटते हे कमीत कमी शब्दात 
09423625769 
किंवा 
09970558244 
या whatsapp क्रमांक वर कळवा. प्रतिक्रियेखाली आपले पूर्ण नाव, पद आणि गाव जिल्हा जरूर लिहावे

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी आवश्यक आहेत 

ही नम्र विनंती

*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीम*
===========================================


[8/13, 6:07 PM]  Anjana karnik:

स्तुत्य ऊपक्रम आहे. मेहनतही आहे ! आणि सकाळी बसल्याजागी ऐकायला मिळते बातमीपत्र! चहा पिता पिताना ! धन्यवाद!
अंजना कर्णिक
मुंबई 9820758820

******************************************
[8/13, 6:13 PM]
एकदम छान उपक्रम वाटला या मुळे मला दररोज न्यूज़ समजत आहेत .धन्यवाद फ्रेश मॉर्निंग बुलेटिन .
गंभिरे विष्णु
संस्कार कोचिंग अकेडमी धर्माबाद
******************************************

[8/13, 6:15 PM]
आपले फ्रेश भाॅनिॅग बुलेटिन मुळे जगातील घटनांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे  दिनविशेष समजते बोधकथा बोध देऊन जातात. वाढदिवस लक्षात येतात. नवीन उपक्रमांची ओळख होते .ऑडीओमुळे शब्दोचार कसे असावे याचे ज्ञान मिळते  य
थोड्यावेळात जगाची सफर केली जाते. सणांचे महत्व समजते. बुलेटिन शतायुषी होओ.अशी परमेश्वराजवळ प्रार्थना .धन्यवाद!
सुलभा कुलकणीॅ मुंबई.
******************************************

[8/13, 6:21 PM] govind hanbarde
 Fresh morning bulletins is very informativ news bulletin.if I have not seen it in the mourning l feel that I have mist something important.it gives knowledge of various happening in the district, region,country and in the world.now a days bulletins giving us good Marla stories.thanks to the editorial team.
Keep it up.
******************************************

[8/13, 6:21 PM] Rajapurkar Yogesh
 मी लहान असताना आकाशवाणी वर 6:50च्या बातम्या रेडिओ वर ऐकायचो त्याची आठवण येते - खुप छान उपक्रम
******************************************

[8/13, 6:27 PM] Ramrav Jadhav Kaka
खुप प्रभावी आणि लोकप्रिय उपक्रम.
त्यासोबत ऑडिओ आणि गुगली हे सुध्दा पुरक उपक्रम अत्यंत परिपुर्ण.
मी या सदराचा नियमित वाचक आहे.
वेळोवेळी केलेल्या सुधारणाही लक्षवेधी भासतात.
वर्षपुर्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन  व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
रामराव जाधव.
तिसगाव ता. पाथर्डी
जि.अहमदनगर.
पिन 414106
मो 7743840604
     9422903357
******************************************

[8/13, 6:35 PM] Avadutwar
*वर्षपूर्ती निमित्त अभिनंदन ! सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त*
******************************************

[8/13, 6:42 PM] ganesh umarekar:
🌹🌹अप्रतिम उपक्रमआहे मिञा. आपला हा उपक्रम चालु घडामोडिवर आसल्यामुळे कमीतकमी  कालावधीमघे   अतिशय  लोकप्रि झाला आहे मिञा ..धन्यवाद🌹🌹🌺👌👌🙏🙏🌹🌹

******************************************
[8/13, 7:01 PM]
सर नमस्कार,
यशस्वी प्रवासाबद्दल मनपूर्वक अभिनंदन!

सद्याचे जीवन हे अतिशय धावपळीचे आहे. प्रत्येक सदस्याला बातम्या किंवा मजकूर वाचण्यास वेळ देणे शक्य होत नाही. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील बंधू - भगिनींना शैक्षणिक गुणवत्तेशी निगडीत पण पोषक बाबींकडे हटकून लक्ष देणे तर अवघडच. आपल्या *फ्रेश मॉर्निग बुलेटिन* च्या माध्यमातून मात्र हे शक्य होत आहे. कमी वेळात, कमी त्रासात मिळणारे हे एक अमृतच आहे. ह्या अमृतरुपी ज्ञानाला असेच यशस्वी वाहून नेण्यासाठी आपल्या समूहाला हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐
कन्हैया परमानंद भांडारकर
मु. दिघोरी, पो. नान्होरी
ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर

******************************************
[8/13, 7:15 PM]
🙏 *फ्रेश माँर्निंग बुलेटीन हे सदर अतिशय उपयुक्त व माहितीत भर घालणारे आहे. देशाचे हित जोपासना ह्यामुळे घडुन येते. चालू घडामोडी सर्व  जनतेला समजुन घेता येतात. ह्या ज्ञानकुंभाची आजच्या काळात गरज आहे.*

श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा.वाटेगाव. ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*🇭🇺जय हिंद जय भारत🙏*
******************************************

[8/13, 7:33 PM]  Hemant wagre
💐💐💐💐
अभिनंदन सर
💐💐💐💐
आपल्या बुलेटिनचा उपयोग मला स्पर्धा परिक्षेसाठी होतो कारण यात  बातम्या सोबतच दिनविशेष असतो, याच बरोबर दररोज शाळेत होणाऱ्या परिपाठामधे दिनविशेष,बातम्या,बोधकथा,यांचा समावेश आम्ही दररोज करत असतो,
फ्रेश मॉर्निंग बुलेटेन म्हणजे आमच्यासाठी माहितीचा खजाना आहे,
आपल्या कार्यासाठी मनपूर्वक शुभकामना.....
💐💐💐💐💐    
हेमंतकुमार शंकरराव वागरे
ता जि नांदेड
******************************************

[8/13, 7:35 PM] सुनील उमरी
 whatssap वरील अत्यंत उपयोगी mgs म्हणजे " फ्रेश माॅर्निंग बुलेटिन" . यामुळे फ्रेश मूड मध्ये फ्रेश न्युज मिळतात. अत्यंत स्तूत्य उपक्रम.
👌👌👌👏👏👍👍🙏🙏💐💐

******************************************
[8/13, 7:35 PM] Meena Sanap
प्रति---आदरणीय ना.सा.भाऊ,
कुठल्या शब्दांनी आपले आभार व्यक्त करावेत समजत नाही.फ्रेश माँर्निंग बुलेटिन आता एक वर्षाच झालं हे वाचुन  खुप खुप आनंद झाला.मला साहित्य दर्पणवर रुजु होऊन 6महिने झाले .असा एकही दिवस गेला नाही मी आपण पाठवलेल्या बुलेटिन ऐकल्या नाहीत.आपले विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम ही वाखाणण्या जोगे आहेत.मोबाईलवर बुलेटिन ऐकता येतात त्यामुळे माझा  वेळ वाचतो स्वयंपाक करता करता मी ऐकते.आपण साहित्य दर्पणवर भारावल्यासारखे प्रेम करता हे बघुनआपलं कौतुक करावं तेवढ थोडच आहे.आपला अमुल्य वेळ दर्पणला देऊन सर्वाना ज्ञान देता , त्याबद्दल पुनश्च अभिनंदन.असेच आपले साहित्य दर्पण बाळसे धरुन उत्तरोत्तर प्रगत होवो हिच अपेक्षा.धन्यवाद
 सौ.मीना सानप ( मु. अ.)
प्रा .शा. मुर्शदपुर के.राजुरी (न.) 
ता.जि.बीड👆
******************************************
[8/13, 7:59 PM] Warle M S
 नासा ,आपले कुठलेही कार्य हे मनस्वी आनंदातून केलेले असल्याने ते प्रत्येकाला आवडत असते. जेवढे तुम्हाला आवडते. आपले स्तूत्य कार्य असेच पुढे चालू ठेवावे ही नम्र विनंती
आपला
वारले माधव संभाजीराव
💐💐💐💐💐👏
******************************************

[8/13, 8:46 PM] sanjeevkumar Hammad
खरच हा उपक्रम नवोपक्रम ,स्तूत्य असा आहे असे विचार मनात आल्यानंतर ते करने आणी त्यात सात्यत्य टिकवने आणी त्यातुन लोकांची गरज भागने याला जोड नाही unbilivable 👍
******************************************

[8/13, 8:53 PM] Srikrishn Rachamale
सर्वांच्या मागे धावपळ असते या धावपळीत कधीच बातम्या ऐकायला वेळ मिळत नाही आणि जर मिळाला तरआठवण राहत नाही आपल्या या बुलेटीन उपक्रमा मूले वेळेनुसार बातमी वाचता येतात ,ऐकता येतात अतिशय छान उपक्रम आहे तुम्हाला यासाठी किती कष्ट पडत असतिल याचा विचार न केलेला बरा
असेच कार्य पुढे चालू रहावे हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना

******************************************
[8/13, 9:05 PM] 612 अवधुत भूपाल चेंडके
आपले काम शब्दात व्यक्त करणे सोपे नाही .अवर्णीय आहे.आपले काम अशेच पुढे चालू ठेवा .आपल्या कामासाठी शुभेच्छा
******************************************

[8/13, 9:11 PM] govind Dada jadhav Roshangavkar
जरी कोंबडा नाही आरवला तरीही दिवस उजडणारच,तसाच आपला उपक्रम आहे.
दिवसभर व्यस्त असताना देखील समाजसेवेचा छंद जोपणारा व्यक्ती आमचा मित्र *ना.सा.*आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
*आपले हार्दिक अभिनंदन*
******************************************

[8/13, 9:44 PM] Satish Kotgire
फ्रेश मॉर्निंग बुलेटिन म्हणजे सकाळी फ्रेश मूड मध्ये ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी मिळणारे महत्वपूर्ण चालते बोलते वर्तमानपत्र
सतीश कोटगिरे
धर्माबाद
******************************************

[8/13, 9:51 PM]
*फ्रेश बुलेटीन प्रथम वर्धापन दिन*


आजपर्यत फ्रेश बुलेटीन  दूरदर्शन वरूनच  पहात होते.
 पण रोज सकाळी  येणार्‍या वर्तमान पत्रापूर्वी आपल्या WhatsApp ग्रृपवरून बुलेटिन हजर असते.
आमच्या मुंबईतील सगळ्या साद माणुसकीची ग्रृपची सुरूवात आपल्या फ्रेश बुलेटीन होते
आणि सगळेच ताजेतवाने होतात.
आम्हा शिक्षकांना मुलांकडून परिपाठ करून घेताना फ्रेश बुलेटिनचा  आधार वाटतो.
काळानुसार आपल्या फ्रेश बुलेटीनचे बदलते रूप आवश्यक वाटते
हळूहळू मराठी सोबत इंग्रजीचाही समावेश केल्यास माध्यमिकच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतील  असे वाटते . आॅॅडिओ बुलेटिनही मस्त वाटत.थोड्यावेळात अचूक योग्य बातम्या समजतात.
फ्रेश बुलेटिनचे हेच वैशिष्ट्य आहे.
फ्रेश बुलेटिनसाठी नासा सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच.
यापुढेही फ्रेश बुलेटीनला तुफान प्रतिसाद लाभो.
स्नेहल आयरे मुंबई
💐💐👌👌👍
******************************************

[8/13, 9:53 PM] 61 Nagorav Tippalwad barabada:
ना.सा. येवतीकर सर धन्यवाद। सर तुम्ही सुरु केलेल्या फ्रेश मॉर्निंग बुलेतींमुळे एक तर मला लवकर उठायची सवय लागली आणि दुसरे म्हणजे तुमच्या बुलेटिनचा माझ्या गावातील सर्व लोकांना व्हाट्सअप ग्रुपद्वारे फायदा होतोय तो वाचनाचा आणि बातम्या ऐकायचा. सर तुमचे कार्य अतिशय चांगले आहे आणि ते पुढेही असेच चालू राहावे हि मनःपूर्वक सदिच्छा.                              
तिप्पलवाड नागोराव मारोती    
मु.पोष्ट बरबडा ता नायगाव जि नांदेड
******************************************
*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* 
संपादक श्री नासा येवतिकर ... 
आपण सुरु केलेला हा स्तुत्य उपक्रम सुरु करुन एक वर्ष  होतो आहे.. सर्वप्रथम आपले अभिनंदन !                                                  
स्थानिक बातम्या, स्नेहांचे वाढदिवस, गुगली व आता बोधकथा.. असा विविधांगी स्वरुपात नियमित सकाळी वाचायला & ऐकायलाही मिळत आहे.. पुन्हा एकदा आपल्याला खुप शुभेच्छा ! बुलेटीन प्रगती पथावर जावो..                                                  
- आपलाच नियमित वाचक..  
रमेश मुनेश्वर, किनवट
******************************************
सर,
फ्रेश माँर्निग बुलेटिनमुळे शाळेत परिपाठासाठी माहिती संकलीत करण्याची चिंता मिटली.

आपल्या कार्यास सलाम, सर
महेश गोंदिया 
******************************************
*नासाजी फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे.... सकाळी सकळी देशाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचायला आणि ऐकायला कुणालाहि आवडतीलच...

आपल्या ग्रुप वर सुद्धा आपण *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* प्रसारित कराव्या अशी मी आपणास *ग्रुप अडमीन* या नात्याने विनंती करतो आहे...
प्रेमकुमार ढगे
🙏🏻🙏🏻🙏🏻
******************************************

[8/14, 7:08 AM] 
फ्रेश buletin ला एक वर्ष पुर्ण झाल्या बदल 
आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा
 💐💐💐 नागेश काळे
सर्वमान्य वधू वर सूचक सेवा लातूर , बिदर 
वासुदेव समाज ग्रूप सोलापूर 
बजरंग दल बसव कल्याण 
चाकुर मार्केट watsapp 
आम्ही गोंधळी ग्रूप नागपूर 
यश मराठा ग्रूप हैदराबाद 
नम कर्नाटक ग्रूप गुलबर्गा
******************************************

[8/14, 7:10 AM] 
सर नमस्कार बुलेटिन हा उपक्रम खुप छान आहे 
विशेष म्हणजे कमी शब्दात पूर्ण headline वाचायला मिळतात 
वेळेची बचत होते 
विनामूल्य सेवा 
स्तुत्य उपक्रम आहे
शंकर जाधव प्रा शि
Zpps Shankarnagar 
ता मुदखेड 
कैलासनगर नांदेड
******************************************

[8/14, 7:25 AM] 
फ्रेश मॉर्निंग बुलेटिन हे एक महत्त्वाचे व माहितीपुर्ण सदर आहे.ज्यामुळे सकाळीच महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात कळतात.मला तर पेपर वाचायचं काम पडत नाही.परिपाठासाठी उपयुक्त माहिती जसे दिनविशेष व सुविचार यातुन मिळतो.मी हे सदर माझ्या c.p.s.ग्रुपवर टाकत असतो,ज्याचा फायदा सर्वांना होतो.
     हे सदर असेच भरभराटीस येवो अशा ना.सा.येवतीकर सरांना शुभेच्छा..!
----- दिलीप धामणे,(जि.प.शिक्षक)
हिंगोली(मराठ्वाडा)
******************************************

[8/14, 7:38 AM]
आपले बुलेटीन खूप माहितीपूण॔ आहे.जर मी एखाद्या दिवशी ते वाचले नाही तर काहीतरी महत्वाचे वाचावयाचे राहून गेलेले आहे असे वाटते.आपले बुलेटीन स्थानिक च नाही तर प्रांत आणि देशविदेशातीलही बातम्या आमच्या पयंत पोंचविते.आपल्या बुलेटीन मधिल मोरल स्टोरीज खूप छान असतात.आपले हे काम दखलपातृ आहे.
असेच चालू ठेवा ही विनंती.
प्रा. गोविंद हंबर्डे नांदेड
******************************************

[8/14, 8:11 AM]
Fresh morning buletin is important for all, & I  
also use in my daily work.
thanks yeotikar sir for your extra work.

Regards
Jitendra aher
Deola ( Nashik )
******************************************

[8/14, 9:15 AM] 
फ्रेश मार्निंग बुलेटीन आमच्या साठी फार लाभदायक  आहे कारण आम्हाला सकाळी सकाळी विविध आणि अपडेट माहिती प्राप्त होते
मुखीत अहमद जि प हा करखेली 
******************************************

[8/14, 9:29 AM
आमच्या शाळेचा परिपाठ *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* वर विसंबुन असतो. त्याचप्रमाणे आता हा कार्यक्रम आमच्या शाळेसारख्या अनेक शाळांचा अविभाज्य घटक बनलेला आहे.

त्यामुळे हा कार्यक्रम चालू ठेवून आपली मैत्री टिकवावी.
ही मैत्रीपूर्ण धमकी.😜🙏🏽
क्रांती बुध्देवार सर्पमित्र धर्माबाद******************************************










💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻















नमस्कार मित्रांनो,

पाहता पाहता *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* एक वर्षाचे होत आहे.


आपणास सदरील बुलेटिन कसे वाटते हे कमीत कमी शब्दात 
09423625769 
किंवा 
09970558244 
या whatsapp क्रमांक वर कळवा. प्रतिक्रियेखाली आपले पूर्ण नाव, पद आणि गाव जिल्हा जरूर लिहावे

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी आवश्यक आहेत 

ही नम्र विनंती

*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीम*
===========================================


[8/13, 6:07 PM]  Anjana karnik:

स्तुत्य ऊपक्रम आहे. मेहनतही आहे ! आणि सकाळी बसल्याजागी ऐकायला मिळते बातमीपत्र! चहा पिता पिताना ! धन्यवाद!
अंजना कर्णिक
मुंबई 9820758820

******************************************
[8/13, 6:13 PM]
एकदम छान उपक्रम वाटला या मुळे मला दररोज न्यूज़ समजत आहेत .धन्यवाद फ्रेश मॉर्निंग बुलेटिन .
गंभिरे विष्णु
संस्कार कोचिंग अकेडमी धर्माबाद
******************************************

[8/13, 6:15 PM]
आपले फ्रेश भाॅनिॅग बुलेटिन मुळे जगातील घटनांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे  दिनविशेष समजते बोधकथा बोध देऊन जातात. वाढदिवस लक्षात येतात. नवीन उपक्रमांची ओळख होते .ऑडीओमुळे शब्दोचार कसे असावे याचे ज्ञान मिळते  य
थोड्यावेळात जगाची सफर केली जाते. सणांचे महत्व समजते. बुलेटिन शतायुषी होओ.अशी परमेश्वराजवळ प्रार्थना .धन्यवाद!
सुलभा कुलकणीॅ मुंबई.
******************************************

[8/13, 6:21 PM] govind hanbarde
 Fresh morning bulletins is very informativ news bulletin.if I have not seen it in the mourning l feel that I have mist something important.it gives knowledge of various happening in the district, region,country and in the world.now a days bulletins giving us good Marla stories.thanks to the editorial team.
Keep it up.
******************************************

[8/13, 6:21 PM] Rajapurkar Yogesh
 मी लहान असताना आकाशवाणी वर 6:50च्या बातम्या रेडिओ वर ऐकायचो त्याची आठवण येते - खुप छान उपक्रम
******************************************

[8/13, 6:27 PM] Ramrav Jadhav Kaka
खुप प्रभावी आणि लोकप्रिय उपक्रम.
त्यासोबत ऑडिओ आणि गुगली हे सुध्दा पुरक उपक्रम अत्यंत परिपुर्ण.
मी या सदराचा नियमित वाचक आहे.
वेळोवेळी केलेल्या सुधारणाही लक्षवेधी भासतात.
वर्षपुर्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन  व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
रामराव जाधव.
तिसगाव ता. पाथर्डी
जि.अहमदनगर.
पिन 414106
मो 7743840604
     9422903357
******************************************

[8/13, 6:35 PM] Avadutwar
*वर्षपूर्ती निमित्त अभिनंदन ! सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त*
******************************************

[8/13, 6:42 PM] ganesh umarekar:
🌹🌹अप्रतिम उपक्रमआहे मिञा. आपला हा उपक्रम चालु घडामोडिवर आसल्यामुळे कमीतकमी  कालावधीमघे   अतिशय  लोकप्रि झाला आहे मिञा ..धन्यवाद🌹🌹🌺👌👌🙏🙏🌹🌹

******************************************
[8/13, 7:01 PM]
सर नमस्कार,
यशस्वी प्रवासाबद्दल मनपूर्वक अभिनंदन!

सद्याचे जीवन हे अतिशय धावपळीचे आहे. प्रत्येक सदस्याला बातम्या किंवा मजकूर वाचण्यास वेळ देणे शक्य होत नाही. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील बंधू - भगिनींना शैक्षणिक गुणवत्तेशी निगडीत पण पोषक बाबींकडे हटकून लक्ष देणे तर अवघडच. आपल्या *फ्रेश मॉर्निग बुलेटिन* च्या माध्यमातून मात्र हे शक्य होत आहे. कमी वेळात, कमी त्रासात मिळणारे हे एक अमृतच आहे. ह्या अमृतरुपी ज्ञानाला असेच यशस्वी वाहून नेण्यासाठी आपल्या समूहाला हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐
कन्हैया परमानंद भांडारकर
मु. दिघोरी, पो. नान्होरी
ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर

******************************************
[8/13, 7:15 PM]
🙏 *फ्रेश माँर्निंग बुलेटीन हे सदर अतिशय उपयुक्त व माहितीत भर घालणारे आहे. देशाचे हित जोपासना ह्यामुळे घडुन येते. चालू घडामोडी सर्व  जनतेला समजुन घेता येतात. ह्या ज्ञानकुंभाची आजच्या काळात गरज आहे.*

श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा.वाटेगाव. ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*🇭🇺जय हिंद जय भारत🙏*
******************************************

[8/13, 7:33 PM]  Hemant wagre
💐💐💐💐
अभिनंदन सर
💐💐💐💐
आपल्या बुलेटिनचा उपयोग मला स्पर्धा परिक्षेसाठी होतो कारण यात  बातम्या सोबतच दिनविशेष असतो, याच बरोबर दररोज शाळेत होणाऱ्या परिपाठामधे दिनविशेष,बातम्या,बोधकथा,यांचा समावेश आम्ही दररोज करत असतो,
फ्रेश मॉर्निंग बुलेटेन म्हणजे आमच्यासाठी माहितीचा खजाना आहे,
आपल्या कार्यासाठी मनपूर्वक शुभकामना.....
💐💐💐💐💐    
हेमंतकुमार शंकरराव वागरे
ता जि नांदेड
******************************************

[8/13, 7:35 PM] सुनील उमरी
 whatssap वरील अत्यंत उपयोगी mgs म्हणजे " फ्रेश माॅर्निंग बुलेटिन" . यामुळे फ्रेश मूड मध्ये फ्रेश न्युज मिळतात. अत्यंत स्तूत्य उपक्रम.
👌👌👌👏👏👍👍🙏🙏💐💐

******************************************
[8/13, 7:35 PM] Meena Sanap
प्रति---आदरणीय ना.सा.भाऊ,
कुठल्या शब्दांनी आपले आभार व्यक्त करावेत समजत नाही.फ्रेश माँर्निंग बुलेटिन आता एक वर्षाच झालं हे वाचुन  खुप खुप आनंद झाला.मला साहित्य दर्पणवर रुजु होऊन 6महिने झाले .असा एकही दिवस गेला नाही मी आपण पाठवलेल्या बुलेटिन ऐकल्या नाहीत.आपले विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम ही वाखाणण्या जोगे आहेत.मोबाईलवर बुलेटिन ऐकता येतात त्यामुळे माझा  वेळ वाचतो स्वयंपाक करता करता मी ऐकते.आपण साहित्य दर्पणवर भारावल्यासारखे प्रेम करता हे बघुनआपलं कौतुक करावं तेवढ थोडच आहे.आपला अमुल्य वेळ दर्पणला देऊन सर्वाना ज्ञान देता , त्याबद्दल पुनश्च अभिनंदन.असेच आपले साहित्य दर्पण बाळसे धरुन उत्तरोत्तर प्रगत होवो हिच अपेक्षा.धन्यवाद
 सौ.मीना सानप ( मु. अ.)
प्रा .शा. मुर्शदपुर के.राजुरी (न.) 
ता.जि.बीड👆
******************************************
[8/13, 7:59 PM] Warle M S
 नासा ,आपले कुठलेही कार्य हे मनस्वी आनंदातून केलेले असल्याने ते प्रत्येकाला आवडत असते. जेवढे तुम्हाला आवडते. आपले स्तूत्य कार्य असेच पुढे चालू ठेवावे ही नम्र विनंती
आपला
वारले माधव संभाजीराव
💐💐💐💐💐👏
******************************************

[8/13, 8:46 PM] sanjeevkumar Hammad
खरच हा उपक्रम नवोपक्रम ,स्तूप असा आहे अशे विचार मनात आल्यानंतर ते करने आणी त्यात सात्यत्य टिकवने आणी त्यातुन लोकांची गरज भागने याला जोड नाही unbilivable 👍
******************************************

[8/13, 8:53 PM] Srikrishn Rachamale
सर्वांच्या मागे धावपळ असते या धावपळीत कधीच बातम्या ऐकायला वेळ मिळत नाही आणि जर मिळाला तरआठवण राहत नाही आपल्या या बुलेटीन उपक्रमा मूले वेळेनुसार बातमी वाचता येतात ,ऐकता येतात अतिशय छान उपक्रम आहे तुम्हाला यासाठी किती कष्ट पडत असतिल याचा विचार न केलेला बरा
असेच कार्य पुढे चालू रहावे हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना

******************************************
[8/13, 9:05 PM] 612 अवधुत भूपाल चेंडके
आपले काम शब्दात व्यक्त करणे सोपे नाही .अवर्णीय आहे.आपले काम अशेच पुढे चालू ठेवा .आपल्या कामासाठी शुभेच्छा
******************************************

[8/13, 9:11 PM] govind Dada jadhav Roshangavkar
जरी कोंबडा नाही आरवला तरीही दिवस उजडणारच,तसाच आपला उपक्रम आहे.
दिवसभर व्यस्त असताना देखील समाजसेवेचा छंद जोपणारा व्यक्ती आमचा मित्र *ना.सा.*आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
*आपले हार्दिक अभिनंदन*
******************************************

[8/13, 9:44 PM] Satish Kotgire
फ्रेश मॉर्निंग बुलेटिन म्हणजे सकाळी फ्रेश मूड मध्ये ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी मिळणारे महत्वपूर्ण चालते बोलते वर्तमानपत्र
सतीश कोटगिरे
धर्माबाद
******************************************

[8/13, 9:51 PM]
*फ्रेश बुलेटीन प्रथम वर्धापन दिन*


आजपर्यत फ्रेश बुलेटीन  दूरदर्शन वरूनच  पहात होते.
 पण रोज सकाळी  येणार्‍या वर्तमान पत्रापूर्वी आपल्या WhatsApp ग्रृपवरून बुलेटिन हजर असते.
आमच्या मुंबईतील सगळ्या साद माणुसकीची ग्रृपची सुरूवात आपल्या फ्रेश बुलेटीन होते
आणि सगळेच ताजेतवाने होतात.
आम्हा शिक्षकांना मुलांकडून परिपाठ करून घेताना फ्रेश बुलेटिनचा  आधार वाटतो.
काळानुसार आपल्या फ्रेश बुलेटीनचे बदलते रूप आवश्यक वाटते
हळूहळू मराठी सोबत इंग्रजीचाही समावेश केल्यास माध्यमिकच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतील  असे वाटते . आॅॅडिओ बुलेटिनही मस्त वाटत.थोड्यावेळात अचूक योग्य बातम्या समजतात.
फ्रेश बुलेटिनचे हेच वैशिष्ट्य आहे.
फ्रेश बुलेटिनसाठी नासा सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच.
यापुढेही फ्रेश बुलेटीनला तुफान प्रतिसाद लाभो.
स्नेहल आयरे मुंबई
💐💐👌👌👍
******************************************

[8/13, 9:53 PM] 61 Nagorav Tippalwad barabada:
ना.सा. येवतीकर सर धन्यवाद। सर तुम्ही सुरु केलेल्या फ्रेश मॉर्निंग बुलेतींमुळे एक तर मला लवकर उठायची सवय लागली आणि दुसरे म्हणजे तुमच्या बुलेटिनचा माझ्या गावातील सर्व लोकांना व्हाट्सअप ग्रुपद्वारे फायदा होतोय तो वाचनाचा आणि बातम्या ऐकायचा. सर तुमचे कार्य अतिशय चांगले आहे आणि ते पुढेही असेच चालू राहावे हि मनःपूर्वक सदिच्छा.                              
तिप्पलवाड नागोराव मारोती    
मु.पोष्ट बरबडा ता नायगाव जि नांदेड
******************************************
*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* 
संपादक श्री नासा येवतिकर ... 
आपण सुरु केलेला हा स्तुत्य उपक्रम सुरु करुन एक वर्ष  होतो आहे.. सर्वप्रथम आपले अभिनंदन !                                                  
स्थानिक बातम्या, स्नेहांचे वाढदिवस, गुगली व आता बोधकथा.. असा विविधांगी स्वरुपात नियमित सकाळी वाचायला & ऐकायलाही मिळत आहे.. पुन्हा एकदा आपल्याला खुप शुभेच्छा ! बुलेटीन प्रगती पथावर जावो..                                                  
- आपलाच नियमित वाचक..  
रमेश मुनेश्वर, किनवट
******************************************
सर,
फ्रेश माँर्निग बुलेटिनमुळे शाळेत परिपाठासाठी माहिती संकलीत करण्याची चिंता मिटली.

आपल्या कार्यास सलाम, सर
महेश गोंदिया 
******************************************












💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Friday, 12 August 2016


माझी शाळा

मला लहानपणापासून शाळा आवडत होती काय ? या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही असेच येईल. मी घरात सर्वात लहान. त्यामूळे सर्वाचे माझ्यावर प्रेम असायचे. खास करून माझी छोटी बहीण. जिच्यामुळे मी शाळेत जायला शिकलो. माझे घर म्हणजे अगदी छोटे दोन रूमचे. वडील शिक्षक होते, पण ते दर आठवड्यास भेटायचे. त्यांच्याजवळ नेहमी एक सायकल आणि छत्री असायची. उन्हाळा पावसाळा असो वा हिवाळा. त्यांच्या विषयी माझ्या मनात नेहमीच आदरयुक्त भीती असायची. त्यांनी मला कधी रागावले नाही पण मनात एक वेगळीच धाक होती. अर्थातच मी पहिली आणि दुसऱ्या वर्गात रडत रडतच गेलो. तिसऱ्या वर्गात मात्र माझ्या सोबत ताई नव्हती कारण ती चौथी पास झाली आणि पुढील वर्ग त्या शाळेत नव्हते. त्यामूळे मला ताई शिवाय शाळेत जावे लागले आणि येथूनच कदाचित शाळेची गोडी लागली. या वर्गात शिकविणारे सर जेंव्हा बाजारात मला भेटतात तेंव्हा त्यांना खूप आनंद होतो हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यांना आनंदी पाहून माझे ही मन भरून येते. माझ्या पाऊलवाट पुस्तकाचे प्रकाशन झाल्याची बातमी वाचून माझे प्राथमिक शाळेतील शिक्षकानी चारचौघात कौतूक केले तेंव्हा मला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा किती तरी पटीने माझ्या गुरुजनांना झाला. मी तसा खूप हुशार असा विद्यार्थी नक्कीच नव्हतो पण पहिल्या दहा मध्ये नेहमीच असायचो. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी धर्माबाद या मोठ्या शहरात शिकण्यासाठी आलो. मी खेड्यातून आल्यामुळे मला " ड " वर्गात प्रवेश देण्यात आला. या शाळेची पध्दतच होती की खेड्यातील मुलांचा वर्ग वेगळा ठेवण्याचा, ही शाळेची पध्दत मला कदापिच रुचली नाही तरी मला काही करता येत नव्हते. एक दोन वेळा प्रयत्न केला की अ किंवा ब या तुकडीत प्रवेश द्यावा पण मिळाला नाही. ड तुकडीच्या वर्गात सर्वच प्रकारची विद्यार्थी होती. अर्थातच सर्वगुणसंपन्न असा आमचा वर्ग. या वर्गातील सर्व विद्यार्थी ज्यात मी अभ्यासात वर्गात नेहमीच पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर. घरापासून आणि आईपासून दूर राहताना खूप दुःख वाटायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाण्याची ओढ लागायची. गावाकडील मित्र आणि त्यांच्या सोबत खेळण्याची मजा काही औरच. येथे भरपूर लिहिण्याचा योग आला ज्यामुळे माझे अक्षर लेखन सुधारणा झाली. दररोज जवळपास सर्वच विषयांच्या प्रश्नोत्तर लिहावे लागायचे आणि वही पूर्ण न केल्यास शिक्षा मिळायची. शाळेत वेळेवर जाणे आणि दिलेले काम पूर्ण करणे या दोन चांगल्या बाबीच्या सवयी या शाळेतच घडले. म्हणूनच या माध्यमिक शाळेने मला घडविले असे मी आज ही मोठ्या अभिमानाने सांगू शकतो. आज ही या शाळेतील मला शिकविलेले माझे शिक्षक मला जेंव्हा भेटतात तेंव्हा माझी आस्थापूर्वक चौकशी करतात. माझ्या गावातील प्राथमिक शाळा आणि धर्माबादची हुतात्मा पानसरे माध्यमिक शाळा यांना मी कधीच विसरू शकत नाही. शाळेच्या खूप आठवणी समोर येत आहेत मात्र त्यांना शब्दांत मांडणे होत नाही.
- ना.सा. येवतीकर धर्माबाद
माझा जिल्हा - माझा तालुका


नांदेड जिल्ह्यात एकूण 16 तालुके आहेत आणि माझ्या तिसऱ्या वर्गात ही मुलांची संख्या 16 आहे याच योगायोग जुळलेल्या गोष्टीचा विचार करून हजेरी घेताना येस सर किंवा हजर सर असे बोलन्याऐवजी तालुक्याचे नाव घेतले तर ........
बस मग काय डोक्यात कल्पना आली आणि ती प्रत्यक्षात राबविन्यासाठी सुरु केली. सुरुवात जिल्ह्याच्या ठिकाणा पासून करण्यात आली. नांदेड हा जिल्हा तसेच तालुका आहे याची जाणीव करून दिली आणि तो क्रमांक वर्गातील चुणचुणित व हुशार मुलीस मिळाले. राहिले पंधरा तालुके त्यासाठी पंधरा चिठ्या तयार करण्यात आले आणि प्रत्येक चिठ्ठीवर एक तालुका लिहून त्याची फोल्ड करून फरशिवर टाकण्यात आले आणि प्रत्येकास एक या प्रमाणे उचलान्यास सांगितले आत्ता सर्व मुलांना तालुक्याचे नाव मिळाले होते मुलांना सूचना देण्यात आली की हजेरी घेताना मी ज्याचे नाव उच्चारण करेन त्यांनी आपल्या जवळ असलेल्या तालुक्याचे नाव घ्यायचे यामुळे काय झाले
* स्वतः च्या जिल्ह्याच्या मुख्यालय ची ओळख झाली
* जिल्ह्यात सोळा तालुके आहेत हे कळले
* सोळा तालुक्याची नावे सुद्धा लक्षात राहिली
* पूर्वी सोळा तालुक्याचे नाव सांगत असताना जे गडबड किंवा गोंधळ व्हायचा तो टळला
* एखाद्या दिवशी विद्यार्थी शाळेत आला नाही तर खास करून *आज कोणता तालुका अनुपस्थित आहे ?* असे म्हणून त्या तालुक्याची विशेष ओळख अजून करून द्यायचे आहे
* ज्याला तालुका मिळाला त्याने त्या तालुक्याची विशेषता लक्षात ठेवायचे हे त्यात पुढे वाढ करून खेळात रंजकता आनता येईल.

हा खेळ आपणास कसा वाटला आम्हाला कळविन्यास विसरु नका

आमचा पत्ता आहे
www.nasayeotikar. blogspot.com

Thursday, 11 August 2016



हे असं का घडतं ?
            - नागोराव सा. येवतीकर
               09423625769

स्त्याने चालता चालता माझे लक्ष का भिंतीवर गेले. त्या ठिकाणी लिहिले होते की, येथे कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. त्याच ठिकाणी मात्र कचर्‍याचा ढीग दिसून येत होता. त्या कचर्‍यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती आणि त्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होत होता. हे असे का न उलगडणारे कोडे मला पडले. घरात असलेल्या लहान मुलांना आपण नेहमी हे करू नका, ते करू नका, तिकडे जाऊ नका असे विविध प्रकारचे बंधने टाकतो. म्हणजे एक प्रकारे ते मनाईच आहे. परंतु ती लहान मुले आपण ज्या ज्या गोष्टीवर बंधने टाकली किंवा करण्यास मनाई केली तरी त्या सर्व बाबी एकदा तरी करून पाहिल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. बंधने टाकलेली बाब कधी एकदा करून बघू अशी उत्सुकता त्यांच्या मनात दडलेली असते. कदाचित हीच सवय पुढे मोठेपणी दिसून येते की काय, अशी शंका राहून राहून मनात येते.

मोठमोठय़ा शहरात नो पार्किंगच्या ठिकाणी आपली गाडी पार्किंग केली की, आपणाला नक्कीच दंड भरावा लागतो. याची जाणीव असल्यामुळे किंवा दंडाच्या भीतीपोटी सहसा या नियमांचे उल्लंघन फार कमी प्रमाणात बघायला मिळते. असाच प्रकार वन वे मार्गावर दिसून येतो. त्या ठिकाणी सूचना लक्षात घेतली नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूचना फलकांचे अनुपालन न करता त्या ठिकाणी घाई केल्यास त्याचे वाईट परिणाम तात्काळ बघायला मिळतात. मुले लहान असताना त्याला खूप सूचना दिल्या जातात. परंतु ते मूल कोणत्याच सूचनेचे पालन करीत नाही. गरम चहाचा कप मुलाच्या समोर ठेवलेला आहे आणि त्यास हात लावू नको, अशी आईची सूचना आहे. मानवी स्वभावानुसार ते मूल त्या कपाला हात लावते आणि जोराचा चटका बसतो. म्हणजे त्याला शिक्षा मिळते. त्याच्या मनात एवढी भीती बसते की, त्यास नुसते चहाचे कप जरी दाखविले तरी तो दूर पळतो. म्हणजे प्रत्येक नियम भंगास दंडाची तरतूद ठेवावी लागेल असे वाटते.

ज्या ठिकाणी सूचनांचे पालन न केल्यास वाईट परिणाम बघायला मिळत नाही किंवा दंड भरावे लागत नाही, अशा ठिकाणी सूचनांचे उल्लंघन करणे योग्य आहे का? आपणास मिळत असलेल्या सूचनांचे पालन केले नाही तर समाजात खरोखरच आपणाला मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळेल काय. याचे उत्तर अर्थातच नाही असे येते. नियमांचे पालन न करणार्‍या व्यक्तीला समाज उर्मट, उद्धट, बेशरम, नालायक अशा विविध उपाधीने सन्मानित करतो. तेव्हा समाजात वावरत असताना आपणाला ही उपाधी मिळवायची आहे का. याचा एकदा तरी जरूर विचार करावा आणि चांगले राहण्याचा प्रयत्न करावा. दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन तेथील नियमांचे पालन करावे. यामुळे नक्कीच आपण एक आदर्श नागरिक म्हणून सन्मानाने जगता येईल.

आपली जवळची व्यक्ती आजारी असेल तर त्यांना भेटण्यासाठी आपण दवाखान्यात जातो. त्या ठिकाणी एक सूचना टांगलेली असते की, मोबाईल बंद करा किंवा सायलेंट मोडवर ठेवा. ज्यामुळे दवाखान्यात आजारी व्यक्तीला जी शांतता हवी आहे ती मिळू शकते. परंतु आपण ती सूचना वाचूनसुद्धा त्याकडे कानाडोळा करतो. थोड्याच वेळात आपली मोबाईलची रिंग वाजते आणि दवाखान्यातील शांततेचा भंग होतो. दवाखाना जवळ रस्त्यावर नो हॉर्न म्हणून पाटी दिसते. मात्र त्याच ठिकाणी गाड्यांचा फार मोठा गोंगाट ऐकायला मिळतो. कान बधिर होतील एवढे कर्णकर्कश हॉर्न वाजविले जातात. ज्यामुळे रुग्णांना त्याचा त्रास होतो. दुसर्‍यांना मोबाईल बंद करा, अशी सूचना देणारी दवाखान्यातील इतर मंडळी जेव्हा मोबाईलवर दिसतात तेव्हा मात्र सामान्य जणांना राग येणारच. आजारी व्यक्तीला भेटण्यास आलेले नातेवाईक असो वा प्रत्यक्ष रुग्ण यांच्याशी वार्तालाप करण्याच्या ऐवजी ते जर मोबाईलवरील गेम (उदा. कँडी, क्रॅश) खेळण्यात मग्न असतील तर त्यांचे वागणे ही नियम उल्लंघनच आहे.

शाळेच्या नियोजित वेळापत्रकानुसार शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्याचे उल्लंघन केल्यास त्याचा फटका आपणाला जरूर बसतो. वर्गात अध्यापन करताना मोबाईल वापरू नये, अशी सूचना किती शिक्षकांनी अमलात आणली असेल हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. मोबाईल वापरणार्‍या शिक्षकांना ५0 रुपये दंड लावण्याचा फतवा एका जिल्हा परिषदने काढला. परंतु आजपर्यंत मोबाईल वापरामुळे शिक्षकांना दंड भरावा लागला, अशी बातमी ऐकायला मिळाली नाही. शिक्षक मंडळींनीसुद्धा या नियमाचा जरूर विचार करावा. कारण वर्गात आपले उत्साहपूर्ण अध्यापन चालू असताना मोबाईलची रिंग वाजली तर माझ्या मनाला पटत नाही म्हणून वर्ग अध्यापनात मोबाईल वापरणार नाही, अशी दीक्षा घेणे गरजेचे आहे. पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा, असे सूचना फलक असूनसुद्धा मागे शाळेजवळील अपघातात एका शाळकरी मुलांचा अंत झाला. तंबाखू खाणे शरीरास हानिकारक आहे, अशी ठळक सूचना प्रत्येक तंबाखूच्या उत्पादनावर छापलेली असते. तरी त्या सूचनांकडे साफ दुर्लक्ष होते. शासनाने यावर बंदी टाकली असली तरी मानवाच्या या विचित्र स्वभावामुळे त्याची काळय़ाबाजारातून फार मोठी विक्री होत आहे. म्हणजे जनता आता दोन बाजूंनी लुटली जात आहे. एक शारीरिक हानी तर होतच आहे. शिवाय तंबाखूवरील बंदीमुळे जादा दराने खरेदी करून खाण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानसुद्धा आपले वागणे, बोलणे आणि चालण्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. समाजात तयार केलेले नियम व सूचना आपल्या भलाईसाठी असतात. त्यामुळे तेथे घाई करण्यात काही अर्थ नाही. कारण घाईत घेतलेले निर्णय वा कृती बर्‍याच वेळा चुकीचे ठरतात.

Wednesday, 10 August 2016




"  शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा "

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा ते आपल्या आत्याच्या घरी राहून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत शिकून लष्कराच्याच शाळेत नोकरी करीत होते. ते सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले होते. शिक्षणाविषयी त्यांचे वडील जागरूक होते, त्यामुळे त्यांनी भीमरावाच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. बाबासाहेब लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हटले की, ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. आपण फुकट वेळ घालवायचा नाही, झटून अभ्यास करायचा ही वडीलांची लहानपणीची शिकवण त्यांनी संपूर्ण जीवनभर अवलंबिले. आजुबाजुला घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीकडे बाबासाहेबांचे बारकाईने लक्ष असॆ. बाबासाहेबांना लहानपणापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. शाळेत शिकत असताना त्यांना स्वतःच्या गोणपाटावर बसावे लागायचे, तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या हौदेला हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेत चपरासी उपस्थित असेल तरच पिण्यासाठी पाणी मिळत असॆ अन्यथा तसेच घरी जावे लागत असॆ. ओंजळीने पाणी प्यावे लागत असॆ.  सर्व मित्रांसोबत एकत्र बसण्याची परवानगी नव्हती लहानपणी त्यांच्या जीवनात आलेल्या या कटू अनुभव आणि दाहकता त्यांच्या मनाला चटके देऊन गेली. यातूनच बाबासाहेब घडत गेले. याच प्रसंगांतून शिकवण घेऊन त्यांनी सन 1927 मध्ये इतिहासात खूपच प्रसिध्द असलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, येथूनच त्यांच्या लढ्यास प्रारंभ झाला असॆ म्हणण्यास काही हरकत नसावी. त्यानंतर त्यांनी नाशिकचा काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी लढा दिला आणि त्यात ते यशस्वी सुध्दा झाले. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, त्या लोकांचा उध्दार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणिव ज्यांना आहे ते धन्य होत असॆ ते मानीत. त्यांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. स्वतःचा समाज आणि जमात यांच्याविषयी ज्यांच्या मनात तळमळ राहत नाही, त्यास जगण्याचा खरा अर्थ ही कळत नाही. बाबासाहेबांना स्वतःच्या समाजाविषयी व जातीविषयी खूप तळमळ होती. लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांना अस्वस्थ वाटायचे.  लहानपणी बाबासाहेबांना ज्या ज्या गोष्टीचा त्रास झाला, तो तो त्रास समाजातील इतर बांधवांना होऊ नये यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शेवटी सनातन्यांच्या अवमानी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मांतराचा. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता. बाबासाहेबांना बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण , सदाचार , समता , स्वातंत्र्य व बंधुतेचा वाटला, बौद्ध धर्माचे त्यांना खूप आकर्षण होते. ह्याच धर्माच्या आधाराने आपल्या लोकांचा विकास साधता येतो म्हणून विजयादशमीच्या पर्वावर दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर हजारों अनुयाया सोबत बौद्ध धर्माचा जाहिररित्या स्विकार केला आणि “साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन ” अशी गगनभेदी भीमगर्जना केली.
देशांतील अतिगरीब आणि अति मागास असलेल्या लोकांना शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले. शिक्षणानेच समाज परिवर्तन होऊ शकते असे त्यांचे मत होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यांचे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असॆ त्यांनी लोकाना सांगितले होते. शिक्षण प्राप्त झाल्याने मनुष्य विचाराने समृद्ध होतो. माणसाला काय  चांगले आणि काय वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा , शील आणि करुणा  हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच लोकांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले आणि स्वतः सोबत आपल्या परिवाराचा पर्यायाने समाजाचा विकास साधला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले म्हणून त्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असॆ म्हटले त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यांसाठी त्यांनी १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले . राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय, असे त्यांचे म्हणणे होते.
प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वतःला एक अस्मिता आहे. याची जाणिव प्रत्येकाना होणे गरजेचे म्हणूनच ते एका जातींतल्या लोकांना नाही तर समस्त लोकाना उद्देशून म्हटले आहे की, गुलामाला गुलाम असल्याची जाणिव करून द्या तो नक्की बंड करून उठेल. याच अर्थातून माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न सुध्दा त्यांनी केला. म्हणूनच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर देवासमान आहेत. गौतम बुध्दाच्या शिकवणीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असॆ गौतम बुध्दानी जे म्हटले त्याचा बाबासाहेबानी आयुष्यभर पालन केले. त्यांचे पुस्तक वाचनावर विशेष प्रेम होते, त्यांना वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे सदानकदा ते वाचन करताना आढळून येत असत. एकदा वाचन करीत बसले की सर्व काही विसरून जात असत. सलग 18 - 18 तास अभ्यास करायचे. या वाचनामुळेच त्यांच्या ज्ञानात भरमसाठ वाढ होत गेली. त्यांचे घर पुस्तकाने भरून गेले होते. त्यांनी अनेक पुस्तकांची अभ्यास केले आणि बरीच पुस्तके लिहली. त्यांची कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या दोन गोष्टीमुळे भारताचा कायापालट झाला असॆ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्यांनी दोन वर्ष अकरा महीने सतरा दिवस अहोरात्र विविध देशाच्या कायद्याचाअभ्यास करून भारताची घटना संविधान तयार केली. त्याच घटनेवर आज भारत देश सुरक्षित असून प्रगतशील राष्ट्रांच्या यादीमध्ये भारत अगदी वरच्या स्थानावर आहे. त्यांच्यामुळेच आज देशांतील प्रत्येक व्यक्तीला हक्काने जीवन जगता येतो. आपल्यावर अन्याय होत आहे असॆ वाटल्यास न्यायालयाद्वारे प्रत्येकाला न्याय मिळविता येतो. समता, बंधूता आणि समानता या राष्ट्रीय मूल्यांची जोपासना या घटनेद्वारे केल्या जाते. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असॆ म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली . त्यांनी मनुष्यमात्रांच्या जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण ज्ञान आणि माहितीच्या बळावर रंजल्या-गांजल्या जनतेच्या , शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या तसेच स्त्री वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून योग्य रस्ता दाखविले आणि मानवतेची दिव्यज्योत निर्माण केले. त्यांनी फक्त दलित लोकांचाच उध्दार केला नसून समस्त भारतीय लोकांना आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाव दिलेला आहे. ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती सर्वाना नेहमीच प्रेरक ठरते. या महामानवाचे कार्य म्हणजे समाजासाठी व देशासाठी एक दिशादर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अश्या महामानवाची आज शतकोत्तर रौप्य महोत्सवी म्हणजे 125 वी जयंती त्यानिमित्त कोटी कोटी प्रणाम.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद 
साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप आणि तुम्ही आम्ही पालक मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित .

*🗽  साहित्य दरबार वैचारिक लेखमाला  🗽*

भाग :- (सोळावा )
दिनांक - 07/08/2016
वार - रविवार
वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★★★★★★★★

विषय - शिक्षक काल आणि आज


💥 संकल्पना :- ना सा येवतीकर धर्माबाद

💥 संयोजक - आप्पासाहेब सुरवसे लाखणगाव

💥 परीक्षक - सौ. स्नेहल आयरे ठाणे

💥संकलन - जी पी पवार पाटिल हिंगोली

💥 ग्राफिक्स :- क्रांती बुद्धेवार धर्माबाद

💥 मार्गदर्शक :- हरीश बुटले संपादक तुम्ही आम्ही पालक मासिक


===========================
प्रथम क्रमांक विभागून : लेख


शिक्षक विद्यार्थ्याचे दैवत

   'गुरूविन कोण दाखवीन वाट',अशी एक म्हण आहे,आणि हो ,आपल्या जीवनातील एक विशिष्ट वळण देणारी,वाट दाखवणारी व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे, आपले आदरस्थान शिक्षक .आई प्रथम गुरू आहे ती तर आपल्याला जन्मापासूनच जगण्याचे सर्वच पाठ देत असते परंतु शिक्षक आपल्याला जगाच्या उच्च पातळीवर जगण्यासाठी प्रबळ बनवत असतात.शि-शिस्त, क्ष-क्षमता,क-कार्य या तीन गोष्टीचासंगम घडवतो तोच शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा ,जगण्याचा एक अविभाज्य घटक असतो शिक्षक.
              शिक्षकाची भूमिका वीसतीस वर्षापूर्वी पाहिलेतर,पायात कोल्हापुरी वाहाणा अंगात नेहरू शर्ट,धोतर किवा पायजमा अशा वेशभुषेत शिक्षक होता.शिकवताना आवाजातील रुबाब,पोर..कशी टर्की भ्यायची.पाढे आलेच पाहिजेत असा अट्टाहास करणारा शिक्षक विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी पाठांतरीत असण्यासाठीआग्रही असायचा.पूर्ण पुस्तक विद्यार्थ्यांना पाठ करायला लावणारा शिक्षक प्रसंगी छडीच्या धाकावर विद्यार्थ्यांना झुलवत असे."छडी लागे छमछम विद्या येई घमघम",अशा प्रकारची गाणी प्रसारमाध्यमांतून देखील प्रसारीत होत.विद्यार्थी देखील शिक्षकांच्या शब्दाचा बाहेर नव्हती.शिक्षक  म्हणजे समाजातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती असा बोलबाला होता.समाजातील लोकांच्या घरातील अडीअडचणी सोडवणारा एक समजुतदार व समंजस सुशिक्षित आदरणीय व्यक्ती म्हणुन त्याची ख्याती होती.गावागावात शिक्षकांचा शब्द कोणी ओलांडत नसत.शिक्षकाला पूज्य मानणारी मंडळी घरातील दैवताप्रमाणे मानणारी मंडळी शिक्षकाला खूपआदर देत असे.
             शिक्षक देखील विद्यार्थ्यांना दैवत मानुन त्याना मनोभावे शिक्षण देत असे ज्ञानाचे अमृत विद्यार्थ्यांना पाजणे संस्कारक्षम   रामायण ,महाभारतातील कथा सांगणे एकच ध्यास शिक्षकाला होता.प्रशासनाने नेमुन दिलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गळी उतरवणेत्याना उच्च पदस्थ करणे व शिक्षणाला धर्म मानणारा शिक्षक शाळेप्रती अर्पितो होता.त्यावेळी विद्यार्थी देखील शिक्षकांच्या प्रत्येक शब्दाला मान देणारा होता.गुरुजी म्हणतील तिच पूर्व दिशा एवढा विश्वास शिक्षकांच्या शब्दावर होता."बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही ".गुरुजींना विचारतो असे वाक्य विद्यार्थ्यांच्या तोंडुन ऐकायला मिळायचे.ज्ञान विद्यार्थ्यांनप्रती पोहचवणे व त्याना समाजात एक प्रतिष्ठीत, मूल्यवान बनवणे हाच ध्यास शिक्षकांना होता.
          दिवसेनदिवस शिक्षणाच्या या प्रवाहात बदल होत गेले.अभ्यासक्रम बदलले.लोकसंख्या वाढली नियमीत पणे शिकवणा-या शिक्षकांच्या भूमिकेत देखील बदल झाले .व्यावसायिक  अभ्यास अभ्यासक्रमात समाविष्ट झाला व कृतीयुक्त अभ्यासाला महत्व आले .परीक्षा पध्दती बदलली.कार्याला,कृतीला,शा.शि.ला महत्त्व आले.व पर्यायाने शिक्षकांच्या भूमिकेत बदल झाला.देशातील निवडणुका असतील जनगणना असेल कुठल्याही गोष्टीची निवड असेल शिक्षकांच्या सहभागाशिवाय तिला पूर्णत्वयेईना गेले व पर्यायाने शिक्षकांच्या हालचालीत बदल झाला .विद्यार्थ्यांना जे ज्ञान दान दिले जात असे त्यात थोडा कोरडेपणा येऊ लागला.राष्ट्रीय कार्यातील कामाला तर शिक्षकाला हातभार लावावाच लागतो त्या ठिकाणी पर्याय नसतो.शिक्षकांच्या अध्यापनाच्या कार्यात थोडा अडसर निर्माण होतो परंतु शिक्षकांनी स्वतःला सावरुन अध्यापनाच्या कार्यात यशस्वीता ठेवली.
         दिलेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा व शोधकवृत्तीने प्रश्नाची उत्तरे कशी शोधायची आपल्याला असलेल्या बुद्धीचा वापर करुन स्वयंअध्ययनकसे करायचे या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी शिक्षकाने दिग्दर्शकाची भूमिका पार पाडायला आता सुरुवात केली आहे.
        न्युटन ने ज्या प्रमाणे स्वत: विचार करुन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याप्रमाणे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भावी शास्त्रज्ञ बनवण्याचे काम सध्या  शिक्षक  करत आहे.विद्यार्थ्यांत आत्मजागृती ,ज्ञानरचनावाद जागृत करण्याचे काम व सर्वगुणसंपन्न विद्यार्थी बनवण्याचे काम शिक्षक  करत आहे.विद्यार्थ्यांना चौकोनी चिरा बनवण्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून शिक्षक जात आहे.छडी गेली ..विद्यार्थ्यांन सोबत एकरुप होवुन शिक्षक नाचु गाऊ लागला.विद्यार्थ्यांच्या पाठीवरुन हात फिरवु लागला .लेकरही ज्ञानाचे धडे गिरवु लागले.
पर्यायाने विद्यार्थी स्वयंअध्ययनाचे पाठ गिरवण्याचा प्रयत्न करत आहे जेणे करुन भविष्यात येणा-या संकटाला त्याला तोंड देण्याची क्षमता प्राप्त होईल.अशारितीने शिक्षकाला देखील अतिशय काटेकोरपणे स्वत:च्या चारित्र्याला जपावे लागत आहे कुठलीही वाईट गोष्ट करणे शिक्षकाला टाळणे अपरिहार्य झाले आहे.
        पूर्वी शिक्षकाच्या छडीच्या,त्याच्या आदराच्या तालावर विद्यार्थी मोठा झाला संस्कारी झालाखूप मोठा साहेब झाला.परंतु ज्ञानेश्वरानी भिंत चालवली म्हणुन नतमस्तक होणारा विद्यार्थी व शिक्षक आज मात्र भिंत कशी चालवली या गोष्टीचा विचार करतो आहे व तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे प्रयोग करुन नासा या वैज्ञानिक प्रयोगशाळेत, मायक्रोसॉफ्टच्या कंपन्या न मध्ये जागतिक पातळीवर देशाच नाव करत आहेत पर्यायाने शिक्षकाचे देखील नाव होत आहे.
       आमच्या शिक्षकांनी ,गुरुजींनी भले ही गुरूकुल पद्धतीत छडीचा धाक दाखवुन श्रमप्रतिष्ठा ,ज्ञान आमच्या अंगी बाणुन आम्हाला शिकवले.परंतु मित्रांनो, आजचा शिक्षक मात्र विद्यार्थ्यांचा मित्र झाला आहे.तो मुलांना सांगतो,तुम्ही डिस्कव्हरी चॅनल पाहा,हिन्दी, इग्रंजी बातम्या ऐक व पाहा .पूर्वी मात्र सिनेमा पाहिला म्हटले की छडी मिळत असे.
        काळ बदलला गरजा बदलल्या स्पर्धा वाढली व शिक्षकाला देखील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासासाठी,"आधी केले मग सांगितले "याप्रमाणे अक्षरशः नाचवावे लागते हो!.शाळेत होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारी साठी विद्यार्थ्यांना अगोदर नृत्य करुन दाखवावे लागते नंतरच ते नृत्य करतात.असा हा आमचा आजचा आदर्श शिक्षक सर्वगुणसंपन्न आहे.पूर्वी ही होता परंतु मुलांच्या कलागुणाना वाव देत त्याचे सुप्तगुण सुद्धा आता प्रकट झाले आहेत व विद्यार्थी देखील मित्रत्वाच्या नात्याने सर ,"तुमच्या मोबाईलवरचे ते देशभक्तीपर गीत दाखवा बरे"!असे म्हणत आहेत.त्याना शिक्षकांचा आदर आहे भिती नाही.
         कालपर्यंत डोळे मोठे करुन,हातात छडी घेऊन शिकवणारा शिक्षक आज मात्र मान डोलवीत ,डोळ्यांच्या खाणाखुणा करत ,गाण्याच्या तालावर हातवारे करत विद्यार्थ्यांन सोबत ज्ञानसागरात मंत्रमुग्ध झाला आहे.
    म्हणुन म्हणावेसे वाटते..
"नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
 सत्यम् शिवम् सुंदरा
विद्या धन दे आम्हास एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा".

          सौ. स्नेहलता विष्णूदास कुलथे
           प्रा. पदवीधर
           जि.प.प्रा. शा.किट्टी आडगाव
            ता. माजलगाव जि बीड
           मोबा 7588055882
           साहित्य दर्पण पुरोगामी संघ
           समूह क्रमांक 37


============================
प्रथम क्रमांक विभागून : लेख

गुरुविन जगी थोर काय
***********************
'' गुरु ईश्वर तात माय ''
''गुरुविन जगी थोर काय ''
आई-वडील , ईश्वर या सगळ्या प्रतिमा कोणामध्ये पहावयास मिळत असतील तर त्या गुरु मध्ये.म्हणजेच सर्वश्रेष्ठ गुरु आहेत, कारण गुरु आपणाजवळचे सर्व ज्ञान शिष्याला देत असतात.म्हणुण संत तुकाराम महाराज म्हणतात---------
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन किंवा गुरुजन. चंदन ज्याप्रमाणे आपला सुगंध इतराना देऊन आपल्या पात्रतेचे बनवतात त्याप्रमाणे गुरु आपल्या शिष्यांना बनवतात. गुरु म्हणजे ज्ञान देणारे.आता आपण त्यांना शिक्षक म्हणतो.
आज आपण कालचा शिक्षक आणि आजचा शिक्षक या विषयी मत व्यक्त करणार आहोत.
शिक्षक होणं हे काही वाटतं तितकं सोप नाही.कारण या पेशामध्ये शिक्षकानं फक्त  द्यायचच असतं आणि ते देणं ही कोणत्ही भौतिक बक्षिसाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने द्यायच असतं
हे मी पुर्वीचे सांगते आहे आता शिक्षकांना भरमसाठ पगार आहे फक्त तो वेळेवर होत नाही,  असो.
पुर्वी च्या काळी गुरुकुल पद्धती अस्तित्वात  होती गुरुच्या घरी राहुन त्यांची सर्व कामे करुन ,सेवा करुन विद्या संपादन करायची .विद्याभ्यास पुर्ण केल्या नंतर शिष्य गुरु दक्षिणा देत असत. नंतर काही श्रीमंत ,जमीनदार आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपल्या घरीच गुरुजीना ठेवत.कालांतराने रविंद्रनाथांच्या शांतीवन सारख्या निसर्ग शाळा सुरु झाल्या.जमीनदारांच्या राजांच्या मुलांना शिकवण्याच्या बदल्यात गुरुजीनाही बलुतेदार पद्धती प्रमाणे धान्य मिळायचे तरीही
गुरुजी आपले ज्ञानदानाचे पवित्र कार्य इमाने इतबारे करत असत.त्यावेळचे शिक्षण म्हणजे पावकी, निमकी, दिडकी ,अडीचकी आणि या व्दारे तोंडी हिशेब , पुस्तक वाचण्यासाठी बाराखडी तोंडपाठ करुन घेतली जाई.नंतर इंग्रज आले
त्यांनी राज्यकारभाराच्या सोईसाठी शाळा काढल्या.बालवाडी ते ४थी पर्यंत शिक्षण गावातच होई.. ४थी पास झालेले विद्यार्थी  शिक्षक म्हणुण नोकरीस लागत असत.गुरुजी ज्या गावात नोकरीस असत तिथेच वास्तव्यास असत.त्यामुळे गावक-यांच्या सुख-दुःखात समरस होत.गावातील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते.गुरुजीनां राहायला घर फुकट,भाजीपाला, दुध इ.बाबी फुकट.गुरुजींचा पोशाख एकदम साधा , पांढरे शुभ्र धोतर,पांढरा नेहरु, डोक्यावर टोपी.गावात गुरुजीना मान असे लग्न जमवण्यापासुन ते चावडीवरील भांडण मिटवण्या पर्यंत गुरीजींना मान दिला जाई,गुरुजी जे सांगतील ती पुर्वदिशा. गुरुजींच्या शाळेत जायच्य वेळेवर लोक किती वाजले ते सांगत. म्हणजेच वक्तशीरपणा हा गुण पुर्वीच्या गुरुजीकडुन घेण्यासारखा होता.शिस्त तर वाखाणण्या जोगी होती गुरुजी रस्त्यात दिसले तरी मुले घाबरायची म्हणजेच गुरुजीविषयी आदरयुक्त भीती होती.भीतीयुक्त आदर काही कामाचा नाही.गुरुजी तन मन लावुन शिकवायचे .स्पर्धा एवढ्या वाढलेल्या नव्हत्या पाठांतरावर भर होता .अभ्यास नाही केला तर हातावर छड्या भेटायच्या उठाबशा काढायला लागत पण तरी ही पालक भांडायला येत नसत.काँपी हा प्रकार नव्हता त्यामुळे यशस्वी जीवन कसं जगावं याचे धडे शाळेत मिळत.
काळाच्या प्रवाहामध्ये गुरुजी हे नाव बदलुन मास्तर , शिक्षक, आणि आता सर.नावाप्रमाणे भूमिकेतही बदल झाला.पिंजरा सिनेमातील मास्तर पाहून समाजाची शिक्षकाकडे पाहण्याची दृष्टी थोडी बदलली.परंतु आज आपण पाहतो की माझे काही शिक्षक बांधव समाजाच्या रोषाला कारणीभूत होत आहेत.कुंपणानीच जर शेत खाल्लं तर दाद कोणाकडे मागायची अरे आपण समाजाचा आरसा आहोत.हा आरसा कसा स्वच्छ असायला नको ? डागाळलेल्या आरशात समाजाचे प्रतिबिंब दोषयुक्त दिसेल.आपणाला ठाऊक आहे चांगल्या चारिञ्याच्या अभावी असलेले बौध्दिक ज्ञान म्हणजे अत्तर चोपडून सुगंधित केलेले निर्जीव शरीर होय.आज तुमचा आदर्श तुम्हांपुढे बसलेले चिमुकले जीव घेणार आहेत.शिक्षक म्हणजे--शि-शिलवंत., क्ष-क्षमाशिल, क-कर्तव्यदक्ष इतके सुंदर जर आपले नामकरण असेल तर जागा ना त्या नावाला, मला येथे आवर्जुन सांगावे वाटते कि सर्वच शिक्षक आसे नाहीत फक्त बोटावर मोजण्या इतकेच शिक्षक आपल्या कर्तव्यात कसुर करताना दिसतात.परंतु आपणाला माहित आहे एक आंबा नासला तर शेतकरी म्हणतो सगळे आंबे नासतील.म्हणुण माझ्या बांधवाना नम्रतेची विनंती आपल्या कर्तव्यापासुन यत्किंचितही ढळू नका.गुरु या प्रतीचा असावा की, ज्याच्या केवळ काल्पनिक अस्तित्वानेही अर्जुनाच्या तोडीचा एकलव्य तयार व्हावा.
पोटार्थी विद्या व्यापारी म्हणजे गुरु किंवा शिक्षक नव्हे.अशी आपली प्रतिमा असायला हवी.
सद्याच्या काळात त्याच चाकोरीबद्ध पद्धतीने शिकवणे कालबाह्य झाले आहे .त्यातुन नव्या ज्ञानरचना वादाच्या निमित्ताने शिक्षकांच्या अंगभूत गुणांना व कौशल्यानाही नवनवे पैलु पडू लागले आहेत त्यातुन आजचा  शिक्षक वेगळ्या वाटा , वेगळा मार्ग चोखाळू लागले आहेत.नुसता काळ बदलतोय असं नाही तर काळानुरुप तंत्रज्ञानही बदलतय, ही बदलाची पावलं ओळखून आजचा शिक्षक तंत्रज्ञानाची कास धरुन पूढील वाटचाल करीत आहे.आदर्श शिक्षक किंवा गुरु समाजाचूया विकासाच रहस्य आहे . हे मानवतेचं मूलस्थान आहे मात्र गरज आहे ते जपण्याची.
थोड लक्षात घ्या, समजा कमरेला धोतर, अंगात कुडता, डोकीला पागोटे, खांद्यावर घोंगडे,हातात एक काठी घेऊन एखादा माणुस रस्त्याने निघाला तर त्याला आपण महात्मा म्हणू ? शक्य नाही.
महात्म्याचे महात्म्य हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबुन असते.असे थोर कर्तृत्व फुल्यांच्या ठाई होते. आणि म्हणुण प्रवाहाच्या विरोधात जाऊन शिक्षकाचे पवित्र कार्य केले. म्हणुण शिक्षकांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले पाहिजे.आणि खरच काही शि क्षक उदात्त भावनेने हे कार्य करीत आहेत .कारण तत्वाने भारलेली माणसे तपशिलाच्या विचारात पडत नाहीत.सर्व कामे आँनलाईन असली तरी शाळेतील शिक्षकांना फक्त  शिकवू द्यायचच काम करु द्याव .
पन्नास कामं शिक्षकांच्या  मागे लावता उदा. खिचडी ,बांधकाम,गावात किती शौचालय आहेत.इ. आणि विचारता गुणवत्ता कशी नाही
या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवा .आणि बांकाम अजीबात शिक्षका कडे देऊ नका .किती त्रास देतात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष
       उत्तम तयारीचे विद्यार्थी  देशाच्या प्रगतीत मोलाची भर घालतात हे आमच्या  शिक्षकांनी जाणले आहे त्या दृष्टीने ते काम करीतही आहेत.
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
या दृष्टीने माझ शिक्षक बांधव  तळागाळातील विद्यार्थ्यांना  ज्ञान देण्यासाठी ज्ञान रचनावादी दृष्टीकोन घेऊन पुढे चालला आहे,निश्चितच तो आपला विद्यार्थी  21 व्या शतकाच्या स्पर्धेत समर्थपणे तोंड देण्यास तयार यात शंका नाही

सौ.मीना सानप
व्दारका निवास ,
ग्रामसेवक काँलनी,
नगर रोड , बीड
9423715865
साहित्य दर्पण पुरोगामी संघ
समूह क्रमांक 07


**************************************
द्वितीय क्रमांक विभागून : लेख

हायटेक शिक्षका ची गरज

  जो मा म्हणजे आईच्या स्तरावर जाऊन शिक्षण देतो तो म्हणजे मास्तर .आज मास्तर ते सर असा प्रवास कसा व कधी झाला हे शिक्षकाला कळलेच नाही. गुरुपौर्णिमा, आणि शिक्षक दिनी शिक्षकाचा गौरव केला जातो. गुरु: साक्षात् परब्रह्म म्हणून शिक्षकांचा स्तुती सुमनांनी सत्कार केला जातो आणि अगदी दुसऱ्या दिवसापासून मुलांच्या सर्वांगीण विकासाचे आणि असंख्य अपेक्षाचे ओझे घेऊन त्या शिक्षकाला सतत उपेक्षेला आणि टीकेला सामोरे जावे लागते .
हे कटु सत्य वास्तव जरी असले तरी हा शिक्षक खरेच शिक्षणव्यवस्थेतील   इतका बेजबाबदार आणि निष्क्रिय घटक आहे का? याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे .
    फार पूर्वी गुरुकुल पद्धती होती. मुलं बारा वर्षे गुरुगृही राहून
"जीवनशिक्षण" घेत ,सर्व विद्या आणि कला यांचा ज्याच्या त्याच्या कुवतीनं अभ्यास करुन हे सारं त्यांना प्राप्त  करुन देण्यात गुरूंचे मोठे योगदान असे. गुरु कर्तव्यात तसूभरही कमतरता न येता सारं भरभरून देत.  या सर्वांबद्दल समाजातही  असाधारण आदर होता ; शाळा आस्तित्वात आल्यावर नियमित वेतन होऊनही १९८५ ते १९९०पर्यंत शिक्षकांना वेतन अल्प होते ;  परंतु तरीही काही अपवाद वगळता शिक्षक कर्तव्यदक्ष होते .समाजानेही या वर्गास सतत एक वेगळा दर्जा दिला होता .आता शिक्षकाला त्याची नोकरी  आणि स्थैर्य याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही म्हणूनच शिक्षकांकडून किमान गुणवत्तेची अपेक्षा असणे यात काही गैर नाही .
    शिक्षकाने काळाची आव्हाने स्वीकारली पाहिजेत hitek होणाऱ्या या संगणक युगात आपल्याला मिळालेल्या सोईचा आपल्या अध्यापनात उपयोग करुन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ केली पाहिजे आता अध्यापनात सी .डी .एल .सी डी .अशांचा उपयोग करणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढते आहे . एखादी शंका विद्यार्थ्याने विचारली तर कमीपणा न मानता ,उद्या सांगतो असे सांगून संदर्भ बघणारे शिक्षकही आहेत .
त्याचबरोबर तक्रारी करणारे शिक्षकही यात आहेत .वर्गात विद्यार्थी संख्या खूप असते ,नोंदी ठेवण्याचा त्रास होतो ,कारकुनी करावी लागते. शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही ,आजचे विद्यार्थी बेशिस्त  आहेत ,त्यांना अभ्यास न करता पुढच्या वर्गात ढकलने म्हणजे मोठी कसरत असते अशा अनेक तक्रारी सांगून पाट्या टाकणारा मोठा शिक्षक वर्गही आहे .
शिक्षकाने आजच्या पिढीला घडवताना स्वतः ला update ठेवलेच पाहिजे .वाचनावर भर दिला पाहिजे .कारण आजचा शिक्षक उद्याचा नागरिक घडवत असतो . तो कर्तव्यनिष्ठ पारदर्शक विचारांचा असला पाहिजे .मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत .बाहेरच्या बेहिशेबी जगाचे तडाखे पचवण्यची, धैर्याने मुकाबला करण्याची ताकत त्याच्यात निर्माण झाली पाहिजे
 शिक्षक साधारण नाही .शिक्षक हा देशाची सामर्थ्यता जाग्रुत करण्यास असमर्थ झाला आणि शिक्षकाने  पराजय स्वीकारला तर तो पराजय देशाला नष्ट करणारा असेल ; कारण
 व्यक्तिकडून समाज आणि
समाजाकडून राष्ट्राचे एकत्रीकरण होत असते .शिक्षकाने हे आव्हान स्वीकारले पाहिजेच. त्याला अनेक अडचणींवर मात करुन घेतले व्रत पूर्णत्वास नेलेच पाहिजे .
सौ .आशा मदन तेलंगे
वरिष्ठ शिक्षिका , ठाणे महानगरपालिका

302,मोहनदीप ,
चंदनवाडी ,ठाणे पश्चिम 400602
ठाणे जिल्हा समन्वयक
साद माणुसकिची
90117 42342‬:
साहित्य दर्पण पुरोगामी संघ
समूह क्रमांक


**************************************
द्वितीय क्रमांक विभागून : लेख

आचार्य देवो भवं

आचार्य देवो भवं असा वेदांचा आदेश,तमसो मा ज्योतिर्गमय असा उपनिषदाचा उपदेश तर नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते असा भगवद् गीतेचा संदेश. भारतीय संस्कृतिचा वसा आणि वारसा जपत जपत पुढे पुढे जात असताना सतत होणारे बदल आपण अंगिकारलेले आहेत.गुरु शिष्याचा वारसा आम्हाला सदैव प्रेरणादायी असाच ठरलेला आहे.शिक्षण म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे ताकद,बळ.या बळाला ओळखूनच
गौतम बुद्धाने सर्वसामान्य जनतेला ज्ञानाचा दीप
प्रज्वलित करण्याचे आवाहन केले.महात्मा फुलेंनी
अविद्येचे अनर्थ सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा,संघर्ष करा हा मुलमंत्र दिला.शिक्षण महर्षि कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्ञानगंगा सामान्याच्या घरापर्यंत पोहचवली,कर्मयोगी संत गाडगेबाबांनी ,एक वेळ
उपाशी राहा पण मुलं शिकवा असा आग्रह धरला.
जीवन शिक्षण सांगणारे संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून उपदेश केला.आगदीच पुराण कालात डोकावले तरी अनेक गुरुशिष्यांच्या जोड्या आपणास दिसतील.आणि त्यांची कतृत्वहीआपणास पहावयास मिळतील.आश्रमात
राहून शिक्षण घेणे आणि तेथेच आपली जडण घडन होणे यात धन्यता असायची. गुरुची आणि शिष्याचीपण..संस्कार शिदोरी उलघडण्याचं कार्य
तेव्हा करावे लागत होते..दाम्यत,ददत आणि दयध्वम अर्थात दमन किंवा मनोनिग्रह,दान,आणि दया याची शिकवण त्याकाळी दिली जायची. खरंतर आजही त्या गोष्टी अंगीकारल्या तर अनेक अनर्थ टळतील.माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचे आहे.आणि हेच रुजवण्याचं आणि बिंबवण्याचं कार्य त्यावेळी गुरुनां करावे लागायचे.धर्म समजून देताना गुरुना
सांगावे लागे की धर्मांचे अंतरंग प्रेम आहे,तर बहिरंग परोपकार आहे.याचे पालन म्हणजेच तर धर्मपालन होय.यातूनच चारित्र्य आणि चरित्र घडत असतात,किर्ती ही वाफेसारखी आहे, लोकप्रियता हा अपघात आहे,श्रीमंती वा-यावर
उडून जाते;कायम टिकणारी गोष्ट एकच,ती म्हणजे चारित्र्य..! हे जाणिव पर्वक शिक्षण देण्याचं कार्य त्या गुरुनां करावे लागत असे.खरं तर शिक्षक काल आणि आज असा शोध घेताना,शिक्षक परवा,काल आणि आज असा शोध घेतला तर खरा बोध होईल.कारण पुराणातून
पुढं आल्या नंतरच्या कालखंडात गुरुचीं वा शिक्षकांची भुमिका आपण अनुभवलेली आहे. तिचा ऊहापोह किंवा विवेचन होणं गरजेचे आहे. "आमच्या लहानपणी" असा शब्दप्रयोग कानावर पडतो तोही काळ गुरुजीच्या वा शिक्षकांच्या कसोटीचाच होता असं म्हणता येईल.शाळा करता करता सरकारी अनेक कामं करुन मुलांच्या आभ्यासाकडे लक्ष देणारे शिक्षक साध्या
राहणीमानातूनही उठून दिसायचे.डोक्यावर गांधी टोपी, तीनगुंड्याचा शर्ट आणि पायघोळ पायजमा
असा स्वच्छ पांढ-या रंगातील पोशाख एक वेगळी
अशी छाप पाडून जायचा.गावोगावी रस्त्यांची
दुर्दशा तशी शिक्षकांच्या प्रवासाचीही दुर्दशा. सायकलवरुन प्रवास करत असताना मटगार्ड आणि चैनकव्हर नसणा-या सायकलचा वापर करत पायजमा दुमडून चिखलातून वाट काढत शाळेत पोहचलेले कालचे गुरुजी मी पाहिले आहेत.हवं तर शाळेतच मुक्काम करुन लोकांत बसून भजन करणारे कालचे शिक्षक मी पाहिले आहेत.गावात पोष्टमास्तरही हेच शाळा शिकवणारे गुरुजी असायचे.दोन दोन कधी चार चार वर्ग एकत्र करुन सर्वच वर्ग सांभाळणारे शिक्षक कालचे म्हणून ओळखले जातात.कालच्या
शिक्षकांना समाजात आणि विद्यार्थ्यात असणारा सन्मान आजच्या आम्हा शिक्षकांना डोळे उघडायला लावणारा आहे.भारताचे भावी आधारस्तंभ निर्माण करणारा शिक्षक,ज्यांच्या डोळयात कांहीतरी स्वप्न,आशा-आकांक्षा आहेत त्या बालकांचा सर्वांगीन विकास करणे हे आद्य कर्तव्य आहे. तो म्हणजे शिक्षक होय.हे कर्तव्य
पार पाडण्याचा मनापासून प्रयत्न करणारे कालचे
शिक्षक होते.गुरुच्या ठायी ज्या गुणांचा संचय हवा
तो या सुभाषितात सांगितला आहे,"सद्वर्तनंच विद्वत्ताच तथाध्यापनकौशलम् | शिष्य प्रियत्वमेतद्वि गुरोर्गुणचतुष्टयम ||"चांगले आचरण
विद्वत्ता,शिकवण्यातील कुशलता आणि शिष्यामध्ये प्रिय असणे या चार गोष्टी गुरुच्या गुणांचा समुदाय आहे.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
म्हणायचे विद्यार्थी घडवणं फक्त हेच काम शिक्षकाचं नाही तर त्यांची मनं चेतवणं,त्यांना प्रेरणा देणं हेही त्यांचंच काम आहे.ही जबाबदारी कायम शिक्षकांनी लक्षात ठेवली पाहिजे.आजच्या शिक्षकांबद्दल अनेक बाजूनी बोलणारे अनेक आहेत.मी पण शिक्षक असताना मला आलेले कांही अनुभव इथं सांगताना लाज वाटणार नाही.कारण कांही बाबी या केवळ मी बोललो नाही किंवा बोललो तरी टळणा-या नाहीत.कारण
वास्तव हे कधी झाकत नाही किंवा नाकारता येत नाही.आजचा शिक्षक हा परिस्थितीनुरुप बदललेला आहे.या सर्व बाबी समाजाबरोबर त्यानेही स्विकारलेल्या आहेत.आज हवा तसा नि तेवढा सन्मान शिक्षकांना मिळत नाही यासाठी केवळ शिक्षकांना दोष देत राहाण्यापेक्षा सर्वाचींच
बदललेली जीवनशैली कारणेभूत नाही का..तसेच
शिक्षण पद्धतीत होत असणारे सततचे बदलही कारणेभूत आहेत.बदलही व्हावेच लागतात पण ते
खरोखरच योग्य आहेत का..?याचा खोल विचार होताना दिसत नाही,सवंग गोष्टीचा भरणा अधिक
असल्याचे दिसते.मग शिक्षक म्हणून घेणारा प्राणी
अधीक संभ्रमावस्थेत जातो आणि फक्त आर्थकारणाशी नोकरीची सांगड जुळवली जाते.व त्यातूनच दोघंही नोकरीत असतील तर असा विचार मनात घर करतो आणि मग चालू होतो लोकांच्या टिका आणि टिप्पणीचा वर्षाव.पाचव्या वेतन आयोगा नंतर ख-या आर्थाने शिक्षक आर्थीक समृद्ध झाला.त्याला सुबद्धता प्राप्त झाली.पैसा शहण्याला वेडं आणि वेड्याला शहाणं करतो.याबाबत जास्त बोलनं वा लिहनं योग्य नाही.पण या मार्गावर वावरणारे सर्वच असत नाहीत हेही नमुद करणे आवश्यक आहे.कांहीच्या
आशा वागण्याने सर्व शिक्षक जात बदनाम होते.
तरीही आगदी अलीकडील शिक्षक आणि त्यांच्या
कतृत्वाकडे डोळेझाकही करुन चालणार नाही.भाकरी दोन्ही बाजूने भाजली तर खाण्यायोग्य होते.हेच तत्व लक्षात घेऊन घरातूनही संस्काराचे ढोस आई बाबाकडून देणे
आवश्यक आहेत.काय करतील ते शिक्षकच आशी भावना ठेऊन आणि आपल्या पाल्यानां सैराट सोडून पुन्हा शिक्षकांना दोष देणारेही समाजात कमी नाहीत.पण आता लक्षणीय बदल
घडतोय,दिसतोय शाळा डिजिटल होतायेत,प्रगत
शैक्षणिक महाराष्ट्र या महत्वकांक्षी कार्यक्रमातून
खरोखरच प्रगती साधताना दिसते आहे. गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या हरेकाला कांही लोकांमुळे समाजाच्या टेकेला तोंड द्यावं लागतं.अशी हेटाळणी जीव्हारी लागते.मला ठाऊक आहे आजच्या शिक्षकांपुढं नवनविन आणि मोठी आव्हानं आहेत.आणि ती पेलण्याची
हिंमतही आजच्या शिक्षकात आहे,फक्त सहकार्य
हवं आहे ते समाज्याच्या पाठबळाचं.आणि शिक्षकांबरोबरच आपलंही कर्तव्य आहे मुलांपुढं
संस्कारीत वागण्याचं.कित्येक घरात मुलांना आभ्यासाच्या नावाखली टीव्ही पाहू दिला जात नाही.आणि अगदी त्याच वेळेत पालक टीव्ही पाहण्यात गुंग असतात.हीच सुरवात असते बिघडण्याची आणि शिक्षकांना नावं ठेवण्याची.पण आज अपण इथं तुलनात्मक विचार मांडत असताना कांही अपवाद वगळता आजचा शिक्षक जबाबदारीची जाणीव ठेवणारा तसेच प्रयत्नवादी आणि तंत्रस्नेही झालेला आहे.उज्वल भारतासाठी कांही दोषयुक्त लोकांमुळं सारी जात बदनाम करणं योग्य होणार नाही.चला हातात हात गुंफू आणि नवा भारत घडवूया..!!

                    श्री.हणमंत पडवळ
          मु.पो.उपळे (मा.)ता.जि.उस्मानाबाद
                     8698067566.
साहित्य दर्पण पुरोगामी संघ
समूह क्रमांक


**************************************

स्पर्धेतील लक्षवेधी लेख

आपल्या देशात प्राचीन रामायण-महाभारतामधील गुरूपासूनचा  प्रवास आज 'टिचर' पर्यंत येऊन पोहोचला आहे. त्याकाळी राजघराण्यातील मुले गुरूगृही  जाऊन वेगवेगळ्या विद्या,ज्ञान संपादन करीत असत. गुरू आणि शिष्याच्या नात्यात कुठलाही किंतु नसायचा. जीवनाला  योग्य वळण देण्याचे काम गुरू करीत असत,किंबहुना तेच आपले जीवनकार्य मानत असत .राजानी दिलेली गुरुदक्षिणा ही ऐच्छिक  असायची. गुरू गरीबच असत. तरी त्यांच्याघरी राजपुत्रानी दैनंदिन कामे करणे ही गुरूसेवा समजली जायची. आणि ही गुरुसेवा राजपुत्र अगदी निष्ठेने करीत असत. गुरू आपल्या कुवतीनुसार राजपुत्राना निसर्गाच्या सहवासात शिक्षण देऊन कर्तव्य पूर्ण करीत असत.म्हणूनच -
"गुरुर ब्रम्हा,गुरुर विष्णू,गुरुर्देवो महेश्वरा|
गुरुर साक्षात परब्रम्ह,तस्मै श्री गुरुवर्ये नम:||"
एवढा गुरुप्रति आदरभाव त्या  शिष्यालाच  नाहीतर समाजाला सुध्दा होता.द्रोणाचार्यासारखा गुरू,एकलव्यासारख्या  शिष्याला विद्या न देताही गुरुदक्षिणेचा मात्र दावेदार ठरायचा! त्यात पीडित एकलव्याला किंवा समाजालाही ते गैर वाटत नसे.
        त्यानंतरच्या काळात या गुरूचे स्थान व्यावसायिक 'गुरूजी'नी घेतले. गुरुजी आणि विद्यार्थी यांचे नाते घनिष्ठ असायचे. हे  गुरुजी फक्त शाळेतील विद्यार्थ्यांचाच मार्गदर्शक नसायचे;तर त्या गावातील सर्व कारभार,लग्ने,महत्वाची कामे यात मार्गदर्शन करण्याचे कामही गुरूजीनाच करावे लागायचे. कोणत्याही कामात त्यांचाच सल्ला महत्वाचा ठरायचा.म्हणूनच शेतातली नवाळी असो,घरातील शिजलेला नवा पदार्थ असो,आधी गुरुजीच्या घरी अगदी नित्यनेमाने, सेवाभावाने आणि व्रतस्थपणे जात असे.शिक्षक हे शाळेपुरते मर्यादित नसून त्यांची बांधिलकी समाजाशी असायची.मिळणाऱ्या  तुटपुंज्या पगारात संसार चालवून ते समाधानी असायचे. निर्व्यसनी,सालस,कर्तव्यनिष्ठ,कर्तव्यतत्पर असायचे. विद्यार्थ्याशी भावनिक नाळ चांगली जोडलेली असायची. विद्यार्थ्याला घरची अडचण असो अथवा शाळेची,शिक्षक हे  भावनिक,मानसिक,सामाजिक  आधारस्तंभ  वाटायचे. शिक्षक असूनही गावाशी,शेतीशी नाळ जोडलेली असायची.म्हणूनच समाज व विद्यार्थी त्या शिक्षकाकडे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आदराने पाहायचे. विद्यार्थी सुध्दा आपले आदर्शस्थान,श्रध्दास्थान म्हणून आपल्या शिक्षकाकडे पहायचे. आणि त्याकाळी आदर्श मानावा असे जीवनमान सर्वच शिक्षकाचे असायचे. शिकवण्यातून मिळणाऱ्या पैशापेक्षा विद्यार्थी घडविण्यात जास्त आनंद असायचा.
          हे झाले कालपर्यंतचे शिक्षक! आपण आपल्या वडिलाना,आजोबाना त्यांच्या शिक्षकाबद्दल बोललो तर आजचा शिक्षक आणि कालचा शिक्षक यांच्यातील बदलते स्वरुप आपल्या लक्षात येईल. कारण  आजचा शिक्षक हा आज आपणासमोरच आहे. आज सर्वत्र इंग्रजी शाळांचे पेव फुटले आणि गुरूपासून गुरुजी,आणि गुरुजीपासून टिचर असे स्वरुप बदलत गेले.इंग्रजीपुढे  मायबोलीतला गोडवा जसा सपक झाला तसा गुरुजीमधला आदर कमी होऊन विद्यार्थ्याच्या आणि समाजाच्याही नजरेत आजचा शिक्षक हा "आधर"झाला. काळ बदलतो तशा सर्वच बाबी बदलत जातात. तसे शिक्षणक्षेत्रात फारमोठे संक्रमण झालेले आहे.आजच्या शिक्षकाची गावाची नाळ तुटली. त्यांच्या मनाला आणि पायालाही ओढ ही शहराची लागली. मातीच्या सहवासातून येणारा मनाचा ओलावा कमी झाला आणि शहरातील फ्लॅटमध्ये राहून भावनाही फ्लॅट व्हायला लागल्या. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापुरताच संबंध उरला. त्याहीपलीकडे आजच्या विद्यार्थ्याला शाळेतल्या शिक्षकापेक्षा बाहेरच्या खासगी शिकवणी घेणारा पोटभरू ( गल्लाभरू )शिक्षक हा जवळचा वाटू लागला.आजच्या पालकांचाही विश्वास हा शाळेतील शिक्षकापेक्षा खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकावरच अधिक दिसून येतो.आजच्या शिक्षकांचाही  शाळेत विद्यार्थ्याना शिकवण्यापेक्षा त्याच विद्यार्थ्याना खासगी शिकवणी घेऊन शिकवण्याकडे कल वाढला आहे.पूर्वीसारखे आजही आधुनिक  द्रोणाचार्य पुन्हा दिसू लागले. त्या द्रोणाचार्याने एकलव्याला न शिकवता त्याचे श्रेय घेतले होते,त्यानी अगंठा मागितला होता. आजचे खासगी शिकवण्या घेणारे द्रोणाचार्य हे असेच आपण न शिकवलेल्या पण  यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव  आपल्या फ्लेक्सवर लावून त्याचे श्रेय घेताना दिसून येतात. म्हणूनच एक यशस्वी विद्यार्थी एकाचवेळी  अनेक फ्लेक्सवर झळकताना दिसतो. वेतनातून मिळणारा पैसा कमी वाटू लागल्याने की काय,शिक्षकी नोकरीसोबतच अजून एखादा जोडधंदा स्वीकारण्याकडे कल वाढला. त्यामुळे आपोआपच शिक्षकी पेशावरची निष्ठाही ढळली. हे सांगण्याचे वैषम्यही वाटते की,आजच्या शिक्षकाजवळ पहिल्यापेक्षा अधिक पैसा जवळ खुळखुळु लागल्याने आजचा शिक्षक व्यसनाधिन  बनला आहे. संध्याकाळी गावातील लोकांसोबत गावच्या  पारावर बसून लोकांशी नाळ जोडणारा  शिक्षक आज संध्याकाळी नित्यनियमाने  बारमध्ये बसताना दिसतो.आजचे सर्वच शिक्षक असे  आहेत असे मी म्हणणार नाही,याला काही सन्माननीय अपवादही आहेत,जे की आजही अनेक विद्यार्थ्याना ते दिपस्तंभच  वाटतात. आजचेही अनेक शिक्षक समाजोपयोगी कार्य करताना,समाजाशी नाळ जोडलेले दिसून येतात.पण खेदाने सांगावे लागते की,हे प्रमाण फार कमी आहे. आज जिल्हा परीषदेच्या शाळा ह्या फार मोठ्या संक्रमणातून जात आहेत. त्या अनेक शाळानी आज कात टाकलेली आहे.अनेक शाळातील शिक्षक फार मोठ्या जिद्दीने या बदलासाठी पेटून उठलेले दिसून येत आहेत.आणि हा बदल गरीब,ग्रामीण विद्यार्थ्यासाठी खूप मोठी पर्वणी ठरणार आहे. स्वामी विवेकानंद यानी  म्हणाले होते की ,If a poor student can not come to education,education itself must go at his doorsteps .आजचा शिक्षक हा गरजूपर्यंत ज्ञान घेऊन पोहोचला आहे.यातून अनेक संवेदनशील लोकांच्या मनाला कुठूनतरी एक आशेचा किरण दिसू लागला आहे,पुन्हा एकदा खूप मोठ्या काळानंतर गरीबांसाठी शिक्षण येवू पहाते आहे. हा आशादायी बदल चिरकाल टिकावा एवढेच! त्यासोबतच आज शिक्षकावर आलेल्या शिक्षणेत्तर कामाचा बोजा कमी झाला तर,शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी अधिक वेळ देईल,अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.असे घडले तर पुन्हा एकदा समाज- विद्यार्थी-शिक्षक यांचे नाते दृढ होईल. साने गुरुजी म्हणतात,
"तुम्ही आदर्श असाल की नाही माहीत नाही,पण तुमच्यापुढे बसलेले १५०-२००विद्यार्थी मात्र तुम्हाला आदर्श मानतात. त्याप्रमाणे आपले आचरण असावे!" एवढे जरी आजच्या शिक्षकाने मनावर बिंबवले तर  आजचा शिक्षक स्वत:च्याही मनात आदर्श बनू शकतो.

संगीता किशनराव देशमुख
"प्राज्वल्य" चौधरी नगर,
वसमत जि. हिंगोली
साहित्य दर्पण पुरोगामी संघ
समूह क्रमांक 14


============================

धन्यवाद

Tuesday, 9 August 2016



*मरावे परी कीर्तिरूपे उरावे *

          - नागोराव सा. येवतीकर 
            मु. येवती ता. धर्माबाद
            जि. नांदेड 
            09423625769

आज भारताचा 69 वा स्वातंत्र्य दिन. ह्या सोनेरी दिवसाची पहाट पाहण्यासाठी कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. इंग्रजांच्या जुलमी गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 15 आॅगस्ट, अर्थात स्वातंत्र्य दिन ! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. आजच्या दिवशी आपण ह्या सर्व थोर मंडळीची आठवण करतो.
" भारतमाता की जय " असा नारा देतांना त्या छोट्याशा शिरीषकुमारची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो शाळकरी वयाचा म्हणजे जेमतेम 10 वर्षाचा होता. इंग्रजांचा विरोधात नारे दिल्यामुळे आणि भारतमातेची सेवा केल्यामुळे त्याला इंग्रजांनी ठार केले. परदेशी कपड्यांच्या गाडीसमोर स्वतःचे बलिदान करणारे बाबू गेनूला आपण कसे विसरू. शिरीषकुमार व बाबू गेनू आज आपल्यात नाहीत परंतु त्याच्या आठवणी, त्याचे कार्य अजूनही स्मरणात आहे. आपण ते कधीच विसरु शकत नाही. 
स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पेटविणारे मंगल पांडेे, सुराज्याला स्वराज्याची सर येणार नाही आम्हाला स्वराज्य पाहिजे असे इंग्रज सरकारला ठासुन सांगणारे पितामह दादाभाई नोरोजी, स्वातंत्र्यसाठी अगदी तरुण वयात सर्वस्व पणाला लावणारे सुखदेव, राजगुरु आणि भगतसिंग, सायमन कमिशन ला विरोध करणारे प्रथम भारतीय लाला लजपतराय, प्रार्थना समाजाची निर्मिति करून समाजाला व्यपक धर्म तत्वाची ओळख करून देणारे न्यायमूर्ती रानडे,  आपल्या कुशाग्र बुद्धिमतेच्या जोरावर ज्यानी वयाच्या आठरव्या वर्षी पदवी मिळविली आणि देशातील सर्व प्रश्नाना प्राधान्य देऊन त्याची सोडवणूक केली असे ना. गोपाळ कृष्ण गोखले, तरुण वयातच समाज सुधारण्यासाठी व समाजाच्या ऐक्यसाठी आणि जागृतीसाठी ज्यानी लेखणीला तलवार केले असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यलढा चे प्रमुख ,अहिंसा व सत्याग्रहाचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी, महाराष्ट्रात प्रती सरकार स्थापन करणारे क्रांतीसिंह नाना पाटील ,तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूँगा असे देशातील लोकांना आवाहन करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, भारताचे पोलादी पुरुष म्हणून ज्याची ख्याती अजरामर आहे असे थोर  सरदार वल्लभभाई पटेल , मौलाना अबुल कलाम आझाद, अस्पृश्यता समूळ नष्ट करणारे व दलिताच्या उध्दारासाठी अविरत धडपडणाऱ्या झुंजार व्यक्तिमत्व असलेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या घरच्या वैभवापेक्षा देशाच्या स्वातंत्र्याच्या वैभववर लक्ष ठेवलले लहान मुलांचे आवडते चाचा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादीसह अनेक जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली व देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांनी पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. समाजातील रुढ, परंपरा व सनातन पद्धतीच्या काळात फुले दाम्पत्याना खूप हालअपेष्टा सोसावे लागले. तरीही त्या॑नी न डगमगता शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचे महान काम केले त्यास्तव शैक्षणिक क्षेत्रातील त्याचे कार्य विसरून चालणार नाही. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले हे तर लक्षात राहतेच शिवाय त्यांना घडविणारी राजमाता जिजाऊ यांची आठवण पदोपदी येत राहते. भारतीय स्वातंत्र्य युध्दात ज्या महान स्त्रियांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवला वाहले त्यात सरोजिनी नायडू यांचे नाव प्रथम घ्यावे लागते. भारत छोडो आंदोलनात भूमिगत राहून महत्वाचे काम करणाऱ्या अरुणा असफअली, सहा महिन्यांचे तान्हे बाळ पाठीशी बांधून इंग्रज लोकांशी दोन हात करणारी आणि मेरी झाँसी नहीँ दूँगी अशी ठणकावून सांगणारी राणी लक्ष्मीबाईचे शौर्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. गरीब व अनाथांची आई मदर तेरेसा हे त्यांच्या अविरत सेवेमुळे कायम स्मरणात राहतात. या सर्वच लोकाना जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांचे नाव आपण स्मरणात ठेवतो, आठवण करतो, त्यांना विसरत नाही. कारण त्या॑नी कामच असे केले आहे की त्यास कोणीच विसरू शकत नाही यालाच म्हणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. 

आपणाला सुद्धा असेच काही लोकांच्या आठवणीत, स्मरणात रहावे असे कार्य करणे गरजेचे आहे. तसा निर्धार आपण करायला हवे. प्रसिद्ध विचारवंत साईरस म्हणतो की, ' कीर्ती मिळविण्यासाठी चांगल्या प्रकारची पुष्कळ कामे करावी लागतात ; मात्र अपकिर्ती होण्यासाठी एक वाईट काम पुरेसे असते'. अनेक लोक जन्मतात आणि किती तरी लोक रोज मरण पावतात. परंतु ज्यांनी समाजाच्या उपयोगी पडेल असे काम केले आहे त्यांचीच समाजामध्ये कीर्ती आणि नाव शिल्लक राहते. स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व धडपडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील सदस्यच तेवढे लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे हेन्नी एस. सटन यांनी म्हटल्याप्रमाणे ' कीर्ती मिळवायचे असेल तर दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करा'. आपण जेंव्हा इतरांचे दुःख समजून घेऊन त्याना हातभार किंवा दिलासा देतो तेंव्हा त्याच्या मनात आपल्याविषयी करुणा, प्रेम, माया आणि ममतेची भावना निर्माण होते आणि नक्कीच आपली कीर्ती होते. या जगात आपण रिकाम्या हाताने आलोत आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत ही जगज्जेता सिकंदराची शिकवण विसरून चालणार नाही. कविवर्य भा. रा. तांबे आपल्या कवितेत म्हणतात की, ' जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय ? ' असा प्रश्न त्या॑नी सर्वांना विचारला  परंतु आपल्या मृत्यूनंतर या जगात काय उरते तर ते फक्त नाव आणि कीर्ती. म्हणून आपल्या माघारी आपले नाव सर्वांनी घ्यावे असे वाटत असेल तर काही जगापेक्षा वेगळे करू या. स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. 








मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...