Saturday 18 November 2017

जागतिक शौचालय दिन

जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रासंगिक लेख

*मोबाईल महत्वाचे की शौचालय*

जगभरातील सुमारे एक अब्ज जनता आज ही उघड्यावर शौचास जाते आणि भारत देश यात अव्वलस्थानी असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या तज्ञानी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंबंधीच्या एका अभ्यासाचा शुभारंभ करताना नुकतेच व्यक्त केले आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या बाबतीत बांग्लादेश आणि व्हिएतनाम सारख्या अनेक देशानी समाधान कारक प्रगती केली आहे. सबसहारन आफ्रिकेतील 26 देशानीही याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन केल्यामुळे अतिसार, आमांश, कावीळ आणि विषमज्वर यासारखे अनेक आजार होण्याची शक्यता असते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वच्छता व आरोग्य कार्यक्रमाचे समन्वयक ब्रूस गॉर्डन यांनी म्हटले आहे. उघड्यावर शौचास बसण्याचे गंभीर प्रभाव पाच वर्षाखालील मुलांवर जास्त प्रमाणात दिसून येतो आणि ही मुले दगावण्याची शक्यता जास्त असते.
भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजमितिला देशातील जवळपास अर्धे लोक म्हणजे 60 कोटी जनता ही उघड्यावर शौचास जाते. भारत हा खेडीप्रधान देश आहे. ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्याची संख्या भरमसाठ आहे. त्यापेक्षा शहरात कमी प्रमाणात आढळून येते. शहरात मोकळी जागाच उपलब्ध नसते त्यामुळे त्यांना शौचालायाचा वापर केल्याशिवाय पर्याय नसतो. याउलट ग्रामीण भागातील चित्र पहावयास मिळते. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे या भागातील लोकांना उघड्यावर शौच केल्याने काही वाटत नाही. भारत सरकार तर्फे निर्मलग्राम योजना राबवून अनेक गावात स्वच्छतेबाबत लोकांचे जनजागरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान ही चळवळच्या स्वरुपात राज्यभर राबवून लोकांच्या मनात स्वछतेविषयी जागृती करण्याचे काम केले आहे. गावागावात स्वच्छतेच्या बाबतीत स्पर्धा लावून सुंदर आणि स्वच्छ गावांना पारितोषिक सुध्दा दिल्या गेली. तरी सुध्दा ये रे माझ्या मागल्या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील जनता आज ही उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्यात समाधान मानते. शौचालयाचा वापर करण्यास मागे पुढे पाहते.
स्वच्छता आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध असतो. याचा विचार करून प्रत्येक नागरिकांनी उघड्यावर मलमूत्र विसर्जन करून स्वतःसोबत समाजाचे आरोग्य बिघडणार नाही यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबातील एखादा व्यक्ती अस्वच्छतेमुळे आजारी पडला की, आपले डोळे उघडतात. आजारातून मुक्ती मिळविताना दवाखान्यात जो पैसा खर्च केल्या जातो तेवढ्या पैशात शौचालय बांधता आले असते याची जाणीव त्यावेळी होते. आजार बरा झाला की, शौचालय बांधकाम करण्याचे पुन्हा विसरून जातात. एकंदरीत आपले वागणे माकडाच्या गोष्टीतील माकड घर बांधायचे ज्याप्रकारे विसरतो त्याचप्रकारे घडत असते. शौचालय बांधणे आणि त्याचा वापर करणे या बाबीकडे लोक गंभीर्याने का लक्ष देत नाहीत, याची अनेक कारणे आहेत.
स्वच्छतेविषयी अनास्था -
आपल्या जीवनात स्वच्छतेचे किती महत्त्व आहे ? यापासून जनता कोसो दूर आहे. याउलट घराबाहेर जाऊन करावयाची क्रिया घरात केल्याने अस्वच्छता अजुन वाढते असा गैरसमज लोकांच्या मनात आज ही घर करून आहे. शौच करणे म्हणजे पोटातील सर्व घाण बाहेर टाकणे होय, मग ती क्रिया घरात करण्यापेक्षा घराबाहेर केलेलेच बरे असे लोकांना वाटते. परंतु तीच घाण विविध आजाराच्या स्वरुपात अधुनमधून घरात शिरकाव करते याची त्यांना पर्वा नसते. मोठी माणसे गावाबहेर जातील परंतु लहान मुले तर घराच्या आजूबाजूला शौच करतात. त्या घाण विष्ठेवर बसलेले माशा घरात येऊन अन्नावर बसतात याकडे साफ दुर्लक्ष केल्या जाते. घराच्या आजूबाजूला लहान मुले शौचास बसण्याच्या कारणावरुन बऱ्याच ठिकाणी वाद, तंटे, भांडण सुध्दा होतात. महिला भगिनीना उघड्यावर शौचास जाताना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. घरातील महिलांना मानसन्मान मिळावे, त्यांची लाज राखली जावी याचा विचार करताना ती शौचास उघड्यावर जाऊ नये याचा मात्र कुणी विचार करीत नाहीत. वयोवृध्द लोकांना सुध्दा उघड्यावर शौचास जाताना त्रास होतो. थकलेले वय आणि चालणे होत नसल्यामुळे त्यांची सुध्दा कुचंबणा होते. विशेष करून पावसाळ्यात घरातील सर्वच सदस्याना उघड्यावार शौचास जाताना त्रास सहन करावा लागतो. तरी ही लोकांना शौचालयाचा वापर करावा असे वाटत नाही याचा अर्थ लोकांमध्ये याबाबतीत फारच अनास्था दिसून येते. त्यास्तव अजुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अत्यावश्यक आहे, असे वाटते.
पैशाची कमतरता -
दोन वेळेसचे खायाला पोटभर मिळत नाही तेंव्हा शौचालय कुठून बांधणार ? असा सवाल ग्रामीण भागातील लोक सहजतेने बोलून जातात. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट व कठीण असल्यामुळे ते स्वतःसाठी चांगला निवारा बांधू शकत नाही तेंव्हा शौचालयाचा विचार त्यांच्या डोक्यात तरी कसा येईल ? ग्रामीण भागातील बहुतांश जनता दारिद्रयरेषेखालील जीवन जगतात. त्यांचे पोट रोजच्या मोलमजुरीवर अवलंबून असते. त्याचसोबत त्यांच्या घरात खाणाऱ्याची तोंडे जास्त आणि कमाविणाऱ्याचे हात कमी यामुळे नेहमीच आर्थिक चणचण त्यांना सतावित असते. शौचालयापेक्षा त्यांना पोट भरण्याची काळजी जास्त असते. म्हणूनच ते या विषयाकडे म्हणावे तेवढे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.याउपर ही अशा गरीब आणि दारिद्रयाच्या खाईत असलेल्या लोकांनी मनात आणले तर थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे पैशाची नियमित बचत करून शौचालय बांधू शकतात. आज ग्रामीण भागात ज्याच्या हातात मोबाईल नाही असे एक ही घर शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या घरी शौचालय नाही मात्र मोबाईल नक्कीच सापडेल. कारण आज लोकांना त्याची जास्त गरज वाटू लागली आहे. याविषयी जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका मारिया नीरा यांनी म्हटले होते की, ग्रामीण भागात एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात लोटा असे विदारक चित्र दिसून येते. लोकांना शौचालयापेक्षा मोबाईल खुप महत्वाचे वाटते, त्यामुळे आपण निर्णय घ्यायचे आहे  मोबाईल महत्वाचे आहे की शौचालय !
भारतातील हे चित्र बदलण्यासाठी सरकार दरवर्षी नवनवीन योजना तयार करते. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य होत नाही किंवा लोकांचा प्रतिसाद कमी असतो त्यामुळे ह्या योजना सपशेल आपटतात. यापूर्वी शौचालय नसणाऱ्या लोकांना ग्रामपंचायतीतून देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रावर लाल शिक्का मारले जायचे. त्यामुळे त्यांचे कोणतेच सरकारी काम पूर्णत्वास जात नव्हते. पण मध्यंतरी ते बंद पडले आहे, पुनश्च ते चालू केल्यास लोक शौचालयाचा वापर करण्याकडे लक्ष देतील.शौचालय असणाऱ्या लोकांनाच शासनाच्या सर्व सुविधा मिळतील, निवडणुकीत सहभागी होता येईल, सरकारी नोकरी मिळेल अशा प्रकारच्या अटी टाकल्यास जनता याविषयाकडे गांभीर्याने लक्ष देतील. त्याचसोबत शासनाने प्रत्येक गावात निदान एक तरी मोबाईल शौचालयाची निर्मिती करावी. त्याचा नियमित वापर करीत राहिल्यास लोकांच्या मानसिकतेत हळूहळू तरी बदल होईल असे वाटते. लोकांच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी अक्षयकुमार अभिनय केलेला शौचालय - एक प्रेमकथा प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून पहावे. गावागावात आणि शाळाशाळामध्ये हा चित्रपट अवश्य दाखवायलाच हवे. आज जागतिक शौचालय दिन त्यानिमित्ताने प्रत्येकाने शौचालयाचा नियमित वापर करण्याचा संकल्प करावे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गृहभेटी घेणे, कोपरा बैठका, समूह चर्चा, स्वयंसहाय्यता बचतगटासोबत बैठका, तरुण-तरुणी मंडळासोबत खुली चर्चा, तसेच भजनी मंडळ सोबत गावस्तरावरील चर्चा करून स्वच्छ भारत ; समृद्ध भारत बनविण्याचे स्वप्न पूर्ण करू या.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

आपली कामे

आपली कामे आपणच करावीत

मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी पंचाईत मुलींच्या बाबतीत सुध्दा घडते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामाची विभागणी करून घेते. त्यामुळे असा प्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यास्तव कामाची विभागणी न करता प्रत्येक व्यक्तीने सर्वच कामे करायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. घरात झाडू मारणे, भांडे घासणे, कपडे धुणे, भाजी निवडणे, दळण आणणे, स्वयंपाक करणे ही कामे आई किंवा बहिणीनेच करावीत असा काही लिखित नियम नाही. ही कामे मुलांनी स्वतःहुन केलीच पाहिजेत तरच भविष्यात जेंव्हा शिक्षणासाठी घर सोडून बाहेरगावी राहण्याचा प्रसंग येतो त्यावेळी केलेल्या या कामाचा अनुभव कामाला येतो. बाजारातून भाजीपाला खरेदी करणे, किराणा सामान आणणे, कपडे इस्त्री करून आणणे, वृत्तपत्र आणणे इत्यादी घराबाहेर करावयाची कामे वडील किंवा भावंडांची कामे मुलींनी वेळ मिळेल तशी आवर्जून करावीत. ही कामे मुलांची आणि ती मुलींची असे कामाचे वर्गीकरण मुळात करूच नये. सकाळी झोपेतून उठल्यावर आई सांगण्याच्या अगोदर अंथरूण, पांघरूण घडी करून व्यवस्थित ठेवणे, जेवायला बसताना निदान स्वतःपुरते तरी ताट, वाटी आणि पाण्याने भरलेला ग्लास घेणे, जेवण संपल्यावर ताट नियोजित धुण्याच्या ठिकाणी ठेवणे, आपली पुस्तके, वह्या, पेन, दप्तर इत्यादी सर्व व्यवस्थित ठेवून घेणे यासारख्या लहानसहान कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपली कामे आपणच करायची सवय लहानपणापासून लावून घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी उदाहरण म्हणू आपल्या सर्वांचे आवडते परमपूज्य साने गुरुजी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जीवनचरित्र वाचल्यास आपली कामे आपण का करावीत याचे महत्व कळते. समर्थ रामदास स्वामी यांनी तर जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला असा उपदेश दिला आहे. त्यामुळे आज नाही, आतापासूनच आपण आपली कामे करायला सुरुवात करू या.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जि. प. प्रा. शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

चारोळी संग्रह - चौकार

आला श्रावण श्रावण
घेऊन आनंदाचे क्षण
पाहून हिरवळ चहूकडे
तृप्त झाले माझे मन

आपल्या माघारी ही
आपलं गुण गान व्हावं
जातीधर्माच्या पल्याड
अशी आपली मैत्री असावं

वाचन करावे रोज म्हणजे
डोळ्याला मिळतो व्यायाम
खुप माहिती तर मिळतेच
सोबत मेंदुला मिळतो आयाम

पटसंख्या किती ही असो
शाळा बंद व्ह्ययलाच नको
सारे शिकूया पुढे जाऊया
ब्रीद शिक्षणाचे विसरायला नको

सोबत असते तुझी तेंव्हा
रात्र अशी सहज संपते
पण नसतेस जेंव्हा तू
रातभर जागरण होते

प्रत्येकाचे असते एक स्वप्न
असावे सुंदर आपले घरटे
त्याचसाठी सारी धडपड
शक्य नाही करणे ते एकटे

कीर्तनात रंगले गुरुजी
हातात त्यांच्या टाळ
त्यागून सारा मोह त्यांनी
गळ्यात घातली माळ

भेटले चार जुने मित्र
काढल्या जुन्या आठवणी
बोलताना एकमेकांच्या
डोळ्यात आले पाणी

कुणाची स्तुती केली की
ते लगेचच मित्र बनतात
त्यांच्या उणीवा दाखविल्या की
कैलेंडर सारखे चित्र बदलतात

शेतकऱ्यांच्या नशिबात पहा
नेहमी रांगच रांग लिहिले आहे
नोटबंदीमुळे बेहाल झाले होते
पीक विमासाठी मरण पाहिले आहे

जीवनात येतील अनंत अडचणी
पण मुळीच घाबरायचे नाही
आपलीच कल्पना सर्वोत्तम
इतरांचे मुळीच वापरायचे नाही

पूर्वीच्या काळी दप्तरात
पाटी न कलम असायचे
दप्तराचे ओझे नाही की
पायात चप्पल ही नसायचे

सूर्य गेला अस्ताला
अंधार झाला सारीकडे
चंद्र निघाले फिरायला
प्रकाश पसरला सगळीकडे

जो शिकवितो तो गुरु
जो ज्ञान देतो तो गुरु
आंधळ्याची काठी होऊन
सर्वाना आधार देतो तो गुरु

हातात धरून लेखनी
गिरवित असतो अक्षर
जीवनाचे धडे मिळती
जर झालो मी साक्षर

मी सुध्दा एका
शाळेचा शिक्षक आहे
विद्यार्थ्याच्या आयुष्याचा
मी रक्षक आहे

अन्न, वस्त्र निवारा
जीवनाचा सहारा
याचसाठी लोकांचा
होतो कोंडामारा

रोजच्या भेटी
प्रेम वाढवी
वर्तणुकीचे नवे
धडे शिकवी

आज जगात उरली नाही
कोणाजवळ आस्था-करूणा
देवा सगळ्याना सुखी ठेवा
हीच एक करतो प्रार्थना

म्हातारपणी आधार म्हणून     
मुलाची काळजी घेतली जाते
मुलगी मात्र आई-बाबाची
लहानपणापासून सावली बनते

डोक्यात काय आहे ?
हे कागदावरी उतरावे
लेखणी माझी देखणी
त्याशिवाय कसे कळावे ?
  
हसणे आणि मदत करणे
यात साम्य काय आहे ?
हसल्यामुळे आपले दुःख विसरतो
तर मदत केल्यामुळे इतरांचे

जीवन बदलण्यासाठी
सर्वानाच वेळ मिळते
पण वेळ बदलण्यासाठी
पुन्हा जीवन कोठे मिळते ?

चांगल्या बाबी लक्षात ठेवू
तर इतर विसरून जाऊ या
चला जीवनाचा आनंद
सर्वासोबत घालवू या

जन्माने कुणीही श्रीमंत
अथवा गरीब असत नाही
परिश्रमानेच मिळते सर्व
दैवाचा खेळ नसतो काही

दैव जर कळले असते
जीवनात काही चव नसते
योगायोग जे म्हटले जाते
ते कुठे बघायला मिळते ?

     ll वंदे मातरम ll
मी हिंदुस्थानमध्ये जन्मलो
त्याचा मला अभिमान आहे
ज्याला पाहून गर्व वाटे ती 
तिरंगा माझी शान आहे

किती दिस झाले पाऊस पडेना
नजरा खिळल्या आकाशाकडे
शेतात पेरुनी बियाणे बळीराजा
काळजीने पाहतो भविष्याकडे

मित्र असावेत मित्रासारखे
नकोत नुसत्या नाती
सुखात आपल्यासोबत अन
संकटात पळून जाती

कदाचित मित्र नसते तर पहा
या जगात काय झाले असते ?
मदत काय असते ही कल्पना
या स्वार्थी जगाला कळलेच नसते

निसर्गाची ही
किमया भारी
पाऊस पाडी
सुगी गेल्यावरी

तिची मनधरणी करण्या
घेऊन जातो तो गजरा
आज काय विशेष आहे ?
मनात शंका करते ती जरा ...!

तीचे आणि त्याचे
रोज होतात वाद
विनाकारण भांडण
थोडे होतात संवाद

ब्ल्यूव्हेलच्या गेमने बघा
घेतले अनेक किशोरांचे बळी
मुलांना ठेवा यापासून दूर
मोबाईल म्हणजे एक अळी

पुरस्काराने माणूस मोठा होतो
की पुरस्कार त्याला मोठा करते
काम तर सदैव करत असतो
मात्र त्यामुळे अजुन प्रेरणा मिळते

सूर्य उगवतो तसा मावळतो
त्याचे काम तो नित्य करतो
मला ही माझे हक्क सांगते
माझे कर्तव्य मी पूर्ण करतो

मन उदास वाटेल तेंव्हा
आवडेल ते काम करा
आनंदी जीवन जगण्यासाठी
इतराना सर्वस्वी मदत करा

सूर्य गेला पहा अस्ताला
खेळू पाण्याच्या लाटासंगे
संधीप्रकाशात सूर्याच्या
आपल्या दोघांचा खेळ रंगे

विविध रंगी फुलपाखरु
उडत बसले फुलांवरी
लाल पिवळ्या फुलातील
मधाचे शोषण करी

मोर आपला राष्ट्रीय पक्षी
त्याचे पंख किती नक्षीदार
पावसाळ्यात नाचतो छान
पिसारा फुलवितो डौलदार

कडक ऊन खडतर रस्ता
सोबतीला नाही कुणी
चालून चालून भेटली सावली
पण मिळत नाही पाणी

विविध रंगात रंगुनी
मी चाललो दूर देशा.
आठवण मला करू नको
असेन मी सगळ्याच दिशा

कित्येक दिवसानंतर आज
अंगणी तुझे आगमन झाले
नखशिखांत भिजलो मी
आनंदाने वेडी झाले

वेड लावले मला
या सोशल मीडियाने
दिवस-रात्र एकच काम
बंद झाले बोलणे

कागद आणि पेन
कविता झाली तयार 
मोबाईल अन चहा
अजुन काय हवे यार ?

पोळ्याचा सण आला
घेऊन पाऊस पाऊस
असा दिसभर पड
नको जाऊस जाऊस

जगात सर्व काही मिळते
ते अडीच अक्षरी प्रेमाने
सुखी समृद्ध जीवन जगू
एकमेकांच्या सहकार्याने

तुला पाहताना माझे
काळीज कसे धडकते
तुला कदाचित माहित नाही
दिसेना तु तर काळजी लागते

बाहेर पाऊस पडताना
काळजीत मी पडतो ....
डोळे घेतले मिटून तरी
तुझाच चेहरा दिसतो....

वचन दिला आहे त्याने
एक दिस नक्की येणार आहे
आज ती खुप निराश होऊन
अजुन वाट पाहत आहे

करू नका अशी मस्ती
जीवन नाही आहे स्वस्त
हसत खेळत आनंदी जगू
जीवनगाणे गाऊ मस्त

जगात कुठे ही गेलो तरी
सर्वत्र एकच सृष्टी असते
जीवन किती सुंदर आहे
हे पाहण्यासाठी दृष्टी लागते

कोण म्हणतय की,
अश्रू वजनदार नसतात
मन खुप हलके होतात जेंव्हा
डोळ्यातून अश्रू गळतात

पर्वता वरुन घसरलेला
पुन्हा प्रयत्न करून चढतो
पण नजरेतून उतरलेला
पुन्हा कसा उभा राहतो ?

बदलून जाईल नशीब
जर असेल काही संकल्प
करावे कष्ट भरपूर कारण
जीवन आहे अल्प

आजकाल रात्री झोप नाही
दिवसा तर दुरची गोष्ट
आठवण येता तुझी
मला होते खुप कष्ट

सामन्यात हरलेला व्यक्ती
पुन्हा जिंकू शकेल पण
मनाने खचलेला व्यक्ती
कसा उभारु शकेल ?

मित्रत्वा मध्ये कधीच नको
माफ करा आणि धन्यवाद
हेच ते दोन शब्द आहेत
ज्यामुळे मित्रात होते विसंवाद

लहानथोर सर्वाना लागली
बाप्पाच्या आगमनाची तयारी
नवचैतन्य पसरले मनामनात
जेंव्हा बाप्पा आले घरी

तु सुखकर्ता तु दुःखहर्ता
तुच आहेस विघ्नविनाशी
सर्वाना सुख-समृध्दी दे
हीच प्रार्थना तुजपाशी

प्रिय,
तुझ्या सर्व आशाआकांक्षा
पूर्ण होवो हीच सदिच्छा
उदंड आयुष्य लाभो
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

वहीत लिहिलो तसा मनात ही
माझे विचार मांडत गेलो
कोणी भेटले नाही मला की
मी स्वतःशी भांडत गेलो

प्रेमाची साक्ष मिळेल
करा वहीची छानणी
शेवटचे पान उघडले
तर कळेल प्रेमकहाणी

मी जेंव्हा जेंव्हा शेजाराच्या
राज्यात प्रवासाला जातो
त्या वेळी आपल्या राज्यातील
रस्त्यांना शिव्या देतो

।। जय महाराष्ट्र ।।

आपला सहवास सदा
आठवण येईल पुन्हा
खुप दुःख होत आहे
निरोप तुम्हाला देताना

आई तुझ्यामुळे माझ्या
जीवनाला आकार आहे
तूच माझ्या जीवनाची
खरी शिल्पकार आहे

आई तुझ्यामुळेच माझ्या
जीवनात अर्थ आहे
तुझ्याविना जगु कसा
जीवन माझे स्वार्थ आहे

चेहरे नेहमीच खरे
बोलतात असे काही नाही
नात्याची खरी ओळख
संकटाशिवाय होत नाही

म्हणून संकट आले की
घाबरून जायचे नसते
अश्या वेळी न बोलावता
येणारेच खरे नाते असते

माझ्या जीवनाचा सहारा
नेहमी प्रोत्साहन देणारा
चूका स्पष्ट सांगणारा
तोच माझा मित्र खरा

माझ्या दुःखाने कोणी हसेल
तर काही ही हरकत नाही
पण माझ्या हसण्याने कोणी
दुःखी होता कामा नाही

आजचा दिवस कधीच
उद्या पाहायला मिळत नाही
म्हणून वेळेचे भान ठेवा
गेलेली वेळ परत येत नाही

पैसे असतील जवळ तर
कोणी साथ सोडत नाही
मात्र .......................
पैसे नसतील तर कोणी
साधी ओळख ही देत नाही

काम करता करता
लागते जोराची भूक
डब्याचे रक्षण करण्या
झाडाला करतो हूक

देवा तुझे नाव घेतो
फक्त संकटाच्या वेळी
तूझी मात्र साथ सदा
लाभते मला वेळोवेळी

आठवणी दाटून येती
सर्व मित्र एकत्र भेटले की
जसे डोळे भरून येती
लेक सासरला चालले की

उधार चुकते करत चला
ते कर्ज वाढतच राहते
त्याचा विचार नाही केला
तर एक दिवस जीव घेते

तू सोडून जरी गेलीस
तरी स्वप्न पाहतो तुझी
दिवस सरले कित्येक तरी
आठवें प्रीत तुझी माझी

तू रूपवती तू लावण्यवती
तू आहेस सौंदर्याची खाण
रूप तुझे डोळ्याने पाहता
हरपते माझे सर्वस्वी भान

मेघ बरसले धरतीवर
हिरवळ दाटले चहुकडे
मन प्रसन्न होते पाहून
हिरव्यागार निसर्गाकडे

शाळा समृध्द करूया
भरून शाळा सिध्दी
अ गटात नेण्या शाळा
मिळू द्या सर्वाना बुध्दी

आपली माणसे
आपलीच नाती
जग सारे आपल्या
मैत्रीचे गाणे गाती

स्वप्नात चालणाऱ्यांनो
वास्तवात जरा जगा
स्वप्न सत्यात येईल
असे वास्तवाकडे बघा

तुला हवे असलेला उमेदवार दे निवडून
मग तुला बोलता येईल मुद्दे पकडून
पैसे घेऊन जर तुम्ही कराल मतदान
काय अपेक्षा करणार त्या नेत्यांकडून

दीप जळतात उजेडासाठी
माणूस जगतो कुटुंबासाठी
आपल्यापरीने झिजतात
दोघेही दुसऱ्यांच्या सुखासाठी

बायकोचे नेहमी ऐकले की फायदाच होतो
एखादी नकळत विसरली की कायदाच होतो
नवरा आणि बायको संसाराचे दोन चाकं
लग्नाच्या वेळी सोबतीचा वायदाच होतो

सर्वत्र चालू आहे नवरात्रीची धूम
पोर पोरी नाचून करतात बूम बूम
नवरात्रीच्या दिवसात लोकांची मौज
रात्र रात्र जागून डोळे होतात ठुम

नवरात्र संपतो अन येतो दसरा
जीवनताले सारे दुःख विसरा
मित्रात नेहमी खुश राहण्यास
आपला चेहरा सदा ठेवा हसरा

रिकाम्या वेळी येते तुझी खुप आठवण
विचारांचे काहूर व्याकूळ होई मन
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
किती रम्य ते दिवस जेंव्हा होतो लहान

माझ्या जीवनात नाहीत सरळ रेषा
मी नेहमी पळत राहतो दाहीदिशा
शोधत राहतो मी अनेक पाऊलवाटा
कधी मिळते फूल कधी रुततो काटा

काल सासरी जाता जाता
तिने मागे वळून पाहिले
कंठ आले दाटून अन्
डोळ्यात अश्रू उभे राहिले

        ।। कोजागिरी ।।
चंद्राच्या शुभ्र शीतल छायेत
आज एकत्रित होऊ चला
मध्यरात्री दुधात चंद्र पाहुनी
कोजागिरी साजरी करू चला

आश्विन पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात
चांदणे उतरले पहा सारे जमिनीवरी
दुध, साखर, काजू, आणि चारोळी
एक करून साजरी करूया कोजागिरी

चंद्राचा शुभ्र आणि मंद प्रकाश
दुधासोबत असे गोडवा साखरेचा
नात्यात वाढू द्या विश्वास अन
सोबत असू द्या सदैव प्रेमाचा

संकटकाळात पहा सारेच
कसे दूर दूर पळतात
मोठ्यानाही छोटे मंडळी
रागावून डोळे दाखवितात

नव्याने श्रीमंत झालेल्याच्या
घरी अजिबात जाऊ नका
कारण प्रत्येक वस्तुची ते
तुम्हाला किंमत सांगत सुटतात

हृदयाने म्हटले डोळ्याला
कमी बघत जा जरा
कारण तुझ्या घायाळ नजरेने
लाखो युवा मरुन जातील

यावर डोळ्याने म्हटले हृदयाला
कमी विचार करत जा जरा
कारण तुझ्या अति विचाराने
रडून माझे डोळे होतात लाल

दिवाळीला ज्ञानाचे दिवे लावून
विचारांचा प्रकाश सर्वत्र पसरवू या
रोज एक तास पुस्तक वाचनाने
वाचनसंस्कृती निर्माण करू या

।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
लांब पसरलेला निळेशार
समुद्र जसा असतो शांत
अश्याच लोकांच्या मनात
मुळीच नसते काही भ्रांत

ज्यांचे मन आणि काम आहे
महासागरासारखे प्रशांत
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
ज्यांचे नाव आहे " श्रीकांत "

ऐन सुगीच्या हंगामात
येतो परतीचा पाऊस
पीकं येऊ देईना घरी
देतो बळीराजाला त्रास

मनातील विचार करा व्यक्त
लिहा तुम्ही खुप पानोपानी
आवडेल वाचण्यास आम्हा
लेखणी आहेच तुमची देखणी

नका करू आतिषबाजी
दारूगोळा फटाक्याची
यावर्षी करू या संकल्प
प्रदुषणमुक्त दिवाळीची

दिवाळी आहे आनंदाचा सण
कोणाच्या आनंदात नको विरजण
एक वेळा विचार करू सर्वजन
फटाक्याने का करावे प्रदूषण ...?

मातीतून बनते पणती
कापसाची होते वात
मिळते साथ तेलाची
फुलते नवीन ज्योत

दिवाळी सण मोठा
नाही आनंदाला तोटा
मिळेल इष्ट सर्व काही
मन करू नका छोटा

त्या फुलावरती बसली पहा
रंगबिरंगी पंखाची फुलपाखरु
मी एकटक पाहतच राहतो
जशी गोठ्यात वाट पाहते वासरु

मोबाईल पडले हातात की
जगाशी माझे देणे घेणे नसते
दिवसभर बघत राहते चित्र
कंटाळा आला की गेम खेळते

सण मोठा दिवाळीचा
लहान मुलांच्या आवडीचा
नव्या नव्या कपड्याचा
गोडधोड फराळाचा

घरासमोरील अंगणात
विविध रंगाची रांगोळी
पाहून मन हर्षोल्हासित
आनंदून गेली दिवाळी

बागेत फिरताना दृष्टीस पडले
पाहून मनाला पडली भूल
माझ्या बागेत आज फुलले
लाल रंगाचे गुलाबाचे फूल

भावावर खुप प्रेम करणारी
बहिण म्हणजे आईची छाया
उदंड आयुष्य तुला लाभो
ओवाळीते माझ्या भाऊराया

विसरून जाऊ नको समजून 
घे वेड्या बहिणीची ही माया
सदैव तुझ्या सोबत आहे मी
प्रेम जाऊ देऊ नको असे वाया

नेहमी नवे नवे मित्र जोडत असतो
स्वभावाशी न जुळणाऱ्यांना सोडत असतो
सर्वाना कसलेच सहकार्य न करणारे
प्रेमाने न वागणाऱ्यांना तोडत असतो
तोंडावर खुप गोड बोलणारे पण
चुगळी करणाऱ्यांना मोडत असतो

बाहेर खुप पाऊस पडत होता
मनात आठवणी दाटून येत होते
काळ्याकुट्ट आभाळाकडे पाहतांना
जीवन देखील अंधाराचे वाटत होते

ती रोज आपल्या वेळेवर येत होती
आपल्या वेळेवर रोज जात होती
एक दिवस आली नाही वेळेप्रमाणे
तेंव्हा तिची खरी किंमत कळाली होती

मूल्ये सर्वासाठी महत्वाचे
त्याशिवाय जीवन निरर्थक
राजकीय लोकांनी जपली
मूल्ये तर जीवन होईल सार्थक

आम्ही सर्व एकच आहोत
असे म्हणतांना दिसते एकता
बोलण्या वागण्यात असेल फरक
तर कशी टिकेल एकात्मता ?

आम्हाला भूकेची नसते चिंता
ना अन्नाची असते काळजी
मिळेल ते अन्न वाटून घेतो
शिळे असेल वा असेल ताजी

।। हास्य ।।

आम्हाला नाही कशाची पर्वा
कळले आम्हाला हे रहस्य
दुसरे तिसरे काही नसून
जीवन म्हणजे निखळ हास्य

माणूस पैश्याने श्रीमंत नाही तर
स्व साहित्यांने समृद्ध झाला पाहिजे
घरात धन दौलत नसेल तरी चालेल
मातृभाषेच्या शब्दाने संपन्न झाला पाहिजे

प्रेम आणि वाद यांचे
एक अतुट नाते आहे
कोणाचे रडगाणे आहे तर
कोणी गीत गाते आहे

सोडला सर्व अहं भाव
तेंव्हा नाही होणार वाद
एकमेका समजून घेतलो
तरच होतो चांगला संवाद

एकलकोंडे विचारात राहून
अर्थ कसे कळेल जगण्याचा
इतरांशी प्रेमाने राहून बघा
कळेल आशय पूर्ण आयुष्याचा

इंद्रधनूच्या सात रंगात
कळले मला जगणे
प्रत्येक रंग सांगतो
कसे असावे वागणे

🍃🌾🌸🌾🍃🍃🌾🌸🌾🍃

मैं उसे रोज याद करता हूँ
जो मेरे ख्वाब में आती हैं ।
मैं रोज उसकी फरियाद करता हूँ
जो मेरे लिए रोजा रखती हैं ।

🎆🎇💥🎆🎇💥🎆🎇

दिल में अगर चाह हैं तो
राह जरूर मिलती हैं
कोशिश करोगे बार बार तो
मंजिल जरूर मिलती हैं

गम भुलाने के लिए
हमने किससे सहारा माँगी
जिसे भूला देना चाहा
वही याद आने लग

उसके आने का इंतजार
हम आज भी करते है
नाजाने वो कब आयेगी
इसी आस में रहते है

हम उसके इंतजार में
आँखे बिछाये बैठे है
वो ना आई इसलिए
खोये खोये रहते हैं

हमारा ये कसूर है की
हम कुछ कहते नहीं
और जब हम कहते है तो
हमारे पास कोई रुकते नहीं ।

हमें प्यार जताना ना आया तो क्या हुआ
हम आज भी उसे बेहद याद करते है ।
हमें उसे मनाना ना आया तो क्या हुआ
हम आज भी हमारे दिल को मनाते है ।

बदसूरत चेहरे कभी
दगा नहीं करते और .....
खुबसूरत चेहरे कभी
जान लगा नहीं देते

बात दिल की जब जुबाँ पे आकर रुक जाती है,
क्योंकि ....
तुम सामने होती हो तो सिर्फ आँखे बात करती है

जिधर भी जाओ तुम आपके साथ  हमारा साया है
क्योंकि
बहोत दिन पहले हमने आपके दिल में घर बसाया है

.     *।। चलते - चलते ।।*

हम आज भी उन्हें याद करते है
जो दिल के करीब है ।
हम आज भी उन्हें साथ देते है
जो धन से गरीब है ।

तुम आज भी हमें हरवक्त याद करते होंगे
क्योंकि हम है ही ऐसे बंदे तुम कैसे भूलोगे

तेरी मुस्कुराहट ही बहुत कुछ है मेरे जीने के लिए
एक तेरी झलक ही बहुत कुछ है मेरे मरने के लिए
मैं हरदिन हरपल बस तुझे याद करता रहता हूँ
एक तेरा चेहरा ही बहुत कुछ है मेरे जाने के लिए
मैं खोया खोया सा रहता हूँ अक्सर रातों में
एक तेरी बिंदिया ही बहुत कुछ हैं मेरे सोने के लिए

गम भुलाने के लिए अक्सर लोग हंसी का सहारा लेते है
हम अक्सर अपना गम भुलाने के लिए  पहारा करते है

रब का दिया सब कुछ है मेरे पास
एक तुझे छोड के
जरा तो खयाल कर क्या मिलेगा तुझे
मेरा दिल तोड के

✍ नागोराव सा. येवतीकर
      मु. येवती ता. धर्माबाद
http://nasayeotikar.blogspot.com

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...