Saturday, 27 August 2016

तरुण भारत देश

*तरुण भारत देश घडवू या .....!*

जगात लोकसंखेच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. आज भारत देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी च्या वर पोहोचली आहे. यात 20 % बालक आणि 20 %  वृध्द तर बाकी 60 % च्या वर तरुणाची संख्या आहे हे विशेष म्हणूनच भारताला तरुणाचा देश असे संबोधले जाते. ज्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणाची संख्या असेल तर त्या देशाची प्रगती लक्षणीय आणि वेगात असायला पाहिजे. पण नेमके उलट या ठिकाणी पाहायला मिळते. आमच्या कडे मनुष्यबळ, शक्ती आणि युक्ती सर्व आहे, तरी भारत आज स्वातंत्र्याच्या सत्तरीत असून देखील प्रगती पथावरच आहे म्हणजे अजून ही रस्त्यावर आहे त्याला अजून खूप काही करणे शिल्लक आहे. असे का ? आज आपण जपान या देशाच्या विकासाकडे पाहिलो तर लक्षात येईल की त्या देशाने कमी वेळात एवढी प्रगती कशी केली असेल ? त्याला एकमेव कारण म्हणजे तेथील कोणताच व्यक्ती रिकामा नसतो, बेरोजगार नसतो. तो सदानकदा काही ना काही काम करीत असतो. आळस हा माणसाचा शत्रू आहे हे गौतम बुध्दाचे वचन त्यांनी आत्मसात केले म्हणून आज जपान मधील प्रत्येक वस्तु देश विदेशात आढळून येते. वास्तविक पाहता जपानची लोकसंख्या भारतच्या तुलनेत फार कमी आहे परंतु तेथे बेरोजगार कमी आहेत हे विशेष. त्याउलट आपल्या देशात दिसून येते. येथे आपल्या देशात आळस हा माणसाचा शत्रू नसून मित्र बनला आहे. काम करणाऱ्या युवकापेक्षा बेरोजगार युवकांची संख्या भरमसाठ आहे. व्यक्तीच्या हाताला काम असेल तर त्या ठिकाणी फक्त त्या व्यक्तीचा विकास होत नसून त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा, राज्याचा पर्यायाने देशाचा विकास होतो. परन्तु आपल्या देशातील युवकांना रोजगार का मिळत नाही किंवा युवक असे भटकण्याच्या कोंडीत का सापडत आहेत ? यावर विचार करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या शंभरीत तरी भारत जगाच्या नकाशावर ठळक उठून दिसण्यासाठी आज या समस्येची उकल शोधणे किंवा यावर संशोधन करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

* बेरोजगार युवक - देशात सध्या दोन प्रकारचे बेरोजगार युवक आढळून येतात. अशिक्षित आणि सुशिक्षित बेरोजगार. अशिक्षित मंडळी त्यांना ज्याप्रकारचे काम जमते त्याप्रकारचे काम ढोर मेहनत करीत करतात. त्याचा म्हणावा तसा मोबादला त्याला मिळत नाही म्हणून खूप कष्ट आणि काम करून देखील त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा विकास होत नाही. त्याच्याकडे शक्ती आहे मात्र त्या शक्तिचा वापर योग्य प्रकारे कसा करावा याचे ज्ञान नसल्यामुळे त्याची पूर्ण मेहनत त्याचा विकास करू शकत नाही. त्यासाठी या युवकांना प्रथम आपल्या शक्ती आणि त्याच्या किमतीची जाणीव करून द्यायला हवी. अश्या बेरोजगार युवकाची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र सुशिक्षित बेरोजगार युवकाची संख्या भरपूर आहे ज्याचा विपरीत परिणाम देशाच्या विकासवर होत आहे.
वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की तो भारताचा सक्षम नागरिक बनतो. त्याला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. या वयापर्यन्त त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण देखील पूर्ण झालेले असते. येथून पुढे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळणार असते. या वयात घेतलेल्या निर्णयावर संपूर्ण आयुष्य अवलंबून असते. येथील निर्णय अचूक असणे आवश्यक असतात आणि येथेच चूका होताना दिसून येत आहे म्हणून खूप मोठी समस्या निर्माण होत आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेताना मुलांना भविष्यातील त्यांचे चित्र दाखविण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून येथे करायला पाहिजे. काही व्यावसायिक शिक्षणाची ओळख येथे झाल्यास मुले त्या अभ्यासक्रमाकडे वळु शकतील.त्यांच्या मध्ये व्यवसाय विषयी गोडी निर्माण होईल. सर्वच मुले हुशार नसतात त्यामुळे त्यांच्या क्षमता ओळखून तसे शिक्षण घेण्याची सुविधा या स्तरावर मिळाले तर योग्य राहते. मात्र याच ठिकाणी मुलांना मार्गदर्शन मिळत नाही आणि भविष्यात ते भटकतात. एखादे कौशल्यपूर्ण शिक्षण पूर्ण केल्यास शिकलेल्या माणसाला त्यात मार्ग सापडतो. मात्र युवक या क्षेत्रात येण्यास तयार नाहीत.त्यांना बेकार फिरणे आवडत आहे मात्र काम करणे अजिबात आवडत नाही. कारण त्यांना या विषयी काहीच गंध नसतो, त्यांच्या मध्ये काम करण्याची चेतना जागीच केल्या जात नहीं. आज श्रमप्रतिष्ठा हे मूल्य कमी होत चालले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याचाच विपरीत परिणाम युवकाच्या जीवनावर झाला आहे किंवा होत आहे. रिकाम्या माणसाच्या डोक्यात भुताचा वास असतो असे इंग्रजीत एक वाक्य आहे त्यानुसार बेरोजगर युवक म्हणजे रिकामी डोके त्यामुळे त्यांच्या डोक्यात नेहमी भुताचा वास असतो. ते देशाच्या प्रगतीचे विचार करण्याऐवजी देश विघातक किंवा वाईट काम करण्यास प्रवृत्त होत आहेत. समाधानकारक जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे पैसा आणि पैसा कमविण्यासाठी काम करावे लागते. दे रे हरी पलंगावरी च्या वृत्तीनुसार आळसी बनलेल्या युवकांना काम न करता झटपट खूप पैसा मिळावा अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी ते कोणतेही काम मग ते चांगले असो किंवा वाईट याचा अजिबात विचार न करता काम करायला तयार असतात. याचाच गैरफायदा काही लोक घेतात. देश विघातक कार्य करणारे काही समाजकंटक लोक अश्या गरजू युवकाना अलगद जाळ्यात अडकवितात आणि मग सुरु होतो त्याचा जीवघेणा प्रवास. ते अश्या दलदल मध्ये फसतात की त्यांची ईच्छा असून देखील त्यांना बाहेर पडता येत नाही. दहशतवादी किंवा नक्षलवादी बनण्यात युवकाची संख्या मोठी असण्यामागे हेच कारण नसेल कश्यावरुन ?
हाताला काम नसल्यामुळे हे युवक वाईट व्यसनाच्या विळख्यात अडकले आहेत. दारु पिणे, तंबाखू खाणे, चरस, गांजा, अफु याचे सेवन करणे आणि समाजात गैरवर्तन करणे असे प्रकार वाढीस लागले त्यास फक्त एकच कारण आहे ते म्हणजे युवकाच्या हाताला काहीच काम नसणे. त्यामुळे युवकास काम देणे गरजेचे आहे. रिकामटेकडे इकडून तिकडे फिरणे, दिवसभर अन रात्रभर फेसबुक आणि व्हाट्सएप्प सारख्या सोशल मिडियाचा जास्त वापर करणे, मित्रासोबत अवांतर गप्पा मारत बसणे याशिवाय सध्या युवकांना दूसरे काहीच काम दिसत नाही. सुखदेव राजगुरु आणि भगत सिंग यांच्या सारखी स्फूर्ती आजच्या युवकात दिसून येत नाही कारण आज आपण स्वतंत्र आहोत आपणास त्यासाठी कोणाला भांडण करत बसायचे काम नाही. याची जाणीव त्यांना झाली आहे. सर्व काही आयते मिळत आहे त्यांना त्यासाठी वेगळे कष्ट करण्याची गरज नाही. मुले रिकामी हाताने फिरत आहेत याची काळजी त्या युवकापेक्षा त्याच्या पालकाना जास्त आहे. शिक्षण घेतलेला युवक आज शेतात काम करायला तयार नाही. मग एवढं शिक्षण घेऊन काय फायदा असे त्याचे बोलणे असते. यात युवकाची स्थिती मात्र धोबी का कुत्ता सारखी झाली आहे ना घरचा ना घाटचा. काम नसलेल्या व्यक्तीला समाजात दुय्यम स्थान असते असे म्हणण्यापेक्षा कुणी ही विचारत नाही. समाजात आपली पत आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी काम करणे अत्यंत महत्वाचे आहे.
देशातील गलिच्छ राजकरणाचे युवक बळी पडत आहेत. हुशार राजकारणी मंडळी या युवकांचा निवडणुकीच्या कामासाठी तात्पुरता वापर करतात आणि निवडणूक संपल्यावर वाऱ्यावर सोडून देतात. काही ठिकाणी असे दिसून आले आहे की बरीच नेते मंडळी आपल्या सोईसाठी काही युवकाचे पालनपोषण करतात. त्यांना आळशी बनवितात. यामुळे आत्ता युवकांनी जागे होऊन स्वतः राजकारणात शिरकाव करणे आवश्यक आहे त्या शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. युवकांनी रोजगाराच्या मागे न धावता आपण रोजगार तयार करणे देशाची गरज आहे. आज भारत देशाला नरेंद्र मोदी सारखे हुशार पंतप्रधान लाभले आहेत. त्यामुळे जगाचा भारत देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोण देखील बदलला आहे. मेक इन इंडिया सारखे उपक्रम देशात चालू झाले आहेत. आज देशाला हुशार, उद्योगी आणि कर्तबगार युवकाची खरी गरज आहे. युवक मित्रांनो आळस झटका आणि कामाला लागून एक समृद्ध भारत घडवू या.

- नागोराव सा येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769

ऑफलाइन शाळेची ऑनलाइन कामे





ऑफलाइन शाळेची ऑनलाइन कामे
प्रत्येक बाबतीत समाजात आज प्रगती दिसून येत आहे. डिजिटल च्या तंत्रज्ञान युगात सर्व काही ऑनलाइन चालू आहे. प्रत्येक जण जे काही बोलत आहे ते सर्व ऑनलाइन च्याच भाषेत होत आहे. बाजारात एखादी चक्कर मारली तर लक्षात येते की येथे सुध्दा सारेचजन ऑनलाइन वरच काम करीत आहेत कोणी फेसबुक बघण्यात गुंग आहे तर कोणी व्हाट्सएप्प बघण्यात प्रत्येक ठिकाणी आत्ता संगणकावर कामे केल्या जात आहेत असे एक ही कार्यालय नाही ज्याठिकाणी ऑनलाइन काम चालू नाही ? प्रत्येक ठिकाणी आज या संगणक आणि ऑनलाइन प्रक्रियेने आपले हातपाय पसरले आहेत असे दिसून येते त्यात जर संगणक बिघडले विद्युत् पुरवठा खंडित झाला किंवा इंटरनेट मध्ये काही समस्या निर्माण झाली की सर्व कामे मग ठप्प काहीच करता येत नाही अर्थातच ऑनलाइनमुळे कामे वेगात होत आहेत मात्र यामुळे मनुष्य आलशि बनून परावलंबी जीवन जगत आहे कम्प्यूटर चालले तर ऑफिस चालणार लाइटआणि नेट असेल तरच कार्यालयतील कामे होणार नसता नाही अशी स्थिती आज निर्माण झाले आहे. त्याचा जसा फायदा दिसतो तसा नुकसान ही आहे हेच तंत्रज्ञान शाळाशाळातुन वापर झाल्यास शाळाची संपूर्ण माहिती क्षणात मिळावी यासाठी शासन सर्वतोपरि प्रयत्न करीत आहे त्याबद्दल शासनाचे अभिनंदन करावेसे वाटते मात्र अभिनंदन करताना इकडे शाळेत काय त्रास होत आहे याची जाणीव कदाचित शासकीय वरच्या स्तरतील अधिकारी - पदाधिकारी यांना नाही असे वाटते. कारण रोज काही तरी नविन बाब ऑनलाइन करण्याच्या सूचना शाळाना दिली जाते आणि शाळेतील शिक्षक व् मुख्यध्यापकचि त्रेधातिरपिट होते. वास्तविक पाहता सर्व शाळा ऑफलाइन असताना ऑनलाइनची कामे करावी कशी हे एक न सुतनरे कोडे आहे ज्याची सोडवणूक करताना शाळेच्या प्रमुखाचि हवा निघून जात आहे आज शाळेत कोणकोणती कामे ऑनलाइन करावी लागत आहे.

* सरल प्रणाली अपडेट करणे -
पटपडताळणी झाल्यानंतर बरीच बोगस पटसंख्या उघडकीस आली म्हणून राज्यातील सर्व शाळा आणि तेथील सर्व माहिती एका क्लिक वर मिळावे यासाठी शासनाने गेल्या वर्षी सरल प्रणाली विकसित केली जेथुन शाळेतील ऑनलाइन प्रक्रियेला शुभारंभ करण्यात अला असे म्हांन्यास हरकत नाही. या प्रणालीत शाळेची इत्यंभूत माहिती भरण्यात आली. त्यात शाळा विद्यार्थी आणि शिक्षक हे तीन घटक परिपूर्ण रित्या भरण्यात आले. पण ही माहिती भरताना काय त्रास झाला हे शाळाप्रमुख या नात्याने मुख्याध्यापक आणि माहिती भरणाऱ्या व्यक्ती लाच माहित आहे. सरल प्रणाली एवद्यावर्च थांबली नाही तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षाचे गुण त्या विद्यार्थयाच्या नावसम्पर ऑनलाइन भरणे हे ही काम करावे लागले. यापुढे खरा त्रास जनवले ते म्हणजे विद्यार्थी शाळा सोडून जाताना. विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे याच प्रणाली वर अवलबुंन असल्यामुळे पुढील शाळा विद्यार्थी प्रवेश देण्यसाठी संबधित शाळेला विनंती करने आणि ती विनंती शाळेने मान्य करने ते ही ऑनलाइन त्यामुळे पुन्हा त्रास झाला. एवढा सारा खटाटोप करून काय मिलविता आले ? हा एक संशोधनाच विषय आहे. शिक्षण अधिकार कायदा सर्व बाबतीत राबविला जातो तर विद्यार्थी प्रमाणात शिक्षकचि नेमणूक करण्यासाठी हे अधिनियम का बाजूला ठेवण्यात येते आज राज्यात कित्येक शाळेत मुलांना शिकविन्यस्थि पुरेश्य प्रमाणात शिक्षक नाहीत शासन प्राथमिक शिक्षकांची भरती करण्या बाबत उदासीन आहे गेल्या पाच सहा वर्षपसुन एकाही शिकहकचि भरती करण्यात आली नाही आहे त्या संखेवर आज मुलांना शिकविन्याचे नहीं टार फक्त संभलण्याचे काम चालू आहे. शिक्षक भरती बाबत कुठे तरी सकारात्मक विचार केल्यास राज्यातील बेरोजगार युवकांच्या हात ला काही तरी काम मिळेल.

* स्वच्छ शाळा पुरस्कार -
केंद्र सर्कार कडून गेल्या महिन्यात स्वच्छ शाळा पुरस्कार साठी ऑनलाइन माहिती भरण्यात आले त्यासाठी शाळेतील सध्या असलेल्या स्थितिचा अंदाज यात प्रश्नावली च्या स्वरुपात भRनयात आले वास्तविक पाहता ते ऑनलाइन भरणे सक्तीचे नव्हते पण क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शाळाना सक्तीचे आहे म्हणून त्यांच्या अधिनिस्त असलेल्या सर्व शाळा या पुरस्कार साठी नोंदणी करने बंधनकारक केले. राज्यातील जवालापस 90 % शाळा स्वच्छ विद्यालय पुरस्कार साठी आपली नोंदणी केली होती.

* शिक्षकांना राज्य पुरस्कार साठी अर्ज करणे -
उत्तम अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना शाळा स्टारपासून ते देश स्तरपर्यन्त पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो त्यांना सन्मान दिला जातो यासाठी मात्र आपण स्वतः या पुरस्कार साठी कसे पात्र आहोत हे कागद पत्राच्या आधार घेऊन दखाववे लागते दरवर्षी ही प्रक्रिया ऑफलाइन होत होती यावर्षी मात्र हे ऑनलाइन काम करावे लगले यामुळे प्रशकीय यंत्रनाएच भरपूर वेळ वाचला मात्र याचा शिक्षक मंडळी ना त्रास सोसावे लागले दुर्गम भागात नोकरी करणाऱ्या शिक्षकांना याचा गंध ही लागला नसेल तोपर्यन्त वेळ संपली.

* अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज करणे -
इयत्ता पहिली ते दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील मुलांना सरकारने शिष्यवृत्ती देते त्यासाठी मात्र त्याचे विहित नामुन्यातील अर्ज ऑनलाइन भरणे गरजेचे आहे आणि ते पूर्णपणे मुख्यध्यापकचि जबाबदारी आहे असे यावेळी आदेश देण्यात आले अल्पसंख्यांक मुलाचे आधार कार्ड आणि बँकेतील खाते हे दोन बाबी पूर्ण नसल्यास अर्ज भरणे अशक्य आहे मग मुख्याध्यापक या बबिसाठी त्यांच्या मागे फिरत राहील की शाळा करेल त्याच सोबत त्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी वेळेची मर्यादा ? अश्या वेळी मुख्याध्यापक मंडळी नी काय करावे ? या प्रश्नांची सोडवणूक कोणी करेल काय ?

* इयत्ता पाचवी व आठवी वर्गातील मुलांची शिष्यवृत्ती अर्ज भरणे -
या वर्षी नव्याने इयत्ता पाचवी व आठवी वर्गातील मुलांसाठी शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरायचे आहे त्यासाठी परत मुख्याध्यापक ना वेठीस धरल्या जाते. शासन काही प्रमाणात कार्यालयतील ऑनलाइन ची कामे कमी करून राज्यातील मुख्याध्यापक संख्येचा वापर करीत आहे जे काम शासकीय कार्यालयतील कर्मचारी करने आवश्यक आहे ते काम शिक्षक आणि मुख्याध्यापक यंत्रनेकडून करवुन घेतल्या जात आहे म्हणजेच आपला पैसा वेळ आणि धावपळ वचवित आहे याचा त्रास मात्र सर्वात खालच्या स्तरवरील शिक्षक व मुख्यध्यापकस होत आहे याची कोणाला तरी कलाजी आहे काय ?

* शालेय पोषण आहार रोज ऑनलाइन करणे -
शालेय पोषण आहार योजना शाळेचा एक अविभाज्य घटक बनले आहे. फार पूर्वी तीन किलो तांदुळ पाकिट वाटप केल्या जायचे त्यात कसल्याच् प्रकारची किटकिट नव्हती. पण सन 2003 पासून राज्यात इयत्ता पहिली ते पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मध्यान्ह भोजन चालू केली. तेंव्हापासून आजपर्यन्त ही योजना वळण घेत घेत आज रोजच्या रोज ऑनलाइन उपस्थिती नोंद करणे बंधनकारक करण्यात आले. रोजच्या रोज उपस्थिती ऑनलाइन नोंद करणे शाळेवर खूप अवघड काम आहे. पण याची साधी दखल कुणी घेत नाहीत. ऑनलाइन काम झाले पाहिजे असा आदेश मात्र कडकरित्या दिला जातो. एवढं करून त्या कामगारांना एक तारखेला वेतन देता येईल काय ? याबाबत मात्र कुठे ही विचार केला जात नाही.

* शालार्थ प्रणालीद्वारे शिक्षकाचे पगार मागविणे  -
पूर्वीचा एक काळ होता जेथे केंद्रीय मुख्याध्यापक बँकेतून सर्व शिक्षकाचे पगार उचलत असे आणि वाटप करीत असे. अनेक ठिकाणी या बाबतीत गैरव्यवहार झाले म्हणून सर्व शिक्षकाचे वेतन बँकेतून त्याच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. सुरुवातीला केंद्रीय मुख्याध्यापक हाताने लिहून वेतन देयक गटविकास कार्यालयात सादर करायचे आणि गटविकास अधिकारी आपल्या स्वाक्षरीने वेतन अदा करीत असत. पण या प्रक्रियेत बदल करण्यात आला आणि ऑनलाइन पध्दतीने वेतन करण्याचे सुरु करण्यात आले. ज्यात प्रत्येक शाळेचा मुख्याध्यापक हा वेतन अदा करणारे मुख्या झाले. अर्थातच प्रत्येक शाळेचा ऑनलाइन वेतन करण्यात आले आणि त्यास मुख्याध्यापक जबाबदार घटक करण्यात आले. येथे सुध्दा ऑनलाइन प्रकिर्येमुळे मुख्याध्यापक सध्या हैरान होत आहेत. एवढे असून कागदा चा ससेमिरा काही कमी झाला नाही तसेच महिन्याच्या एक तारखेला पगार करायचे स्वप्न अजून तरी पूर्णत्वास गेले नाही.

* विद्यार्थी ऑनलाइन फॉरवर्ड करणे -
गावातील शाळेतील शेवटचा वर्ग संपल्यानंतर किंवा कोणी आपली शाळेतील TC काढल्यानंतर तो दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतो तो कागदावर तात्पुरते कारण जोपर्यन्त ऑनलाइन विद्यार्थी या शाळेतुन त्या शाळेत ट्रान्सफर होत नाही तोपर्यन्त पुढील शाळेला काहीच करता येत नाही. हे सुद्धा ऑनलाइन.
भविष्यात शाळेतील शिक्षकांची उपस्थिती आणि त्यांची अध्यापन प्रक्रिया सुध्दा ऑनलाइन झाल्यास काही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

ही सर्व कामे ऑनलाइन करायची आहेत त्यासाठी प्रत्येक मुख्याध्यापक स्मार्ट फोन धारक आहे ही एकच जमेची बाजु आहे परंतु सर्वाना हे स्मार्ट फोन वापर करता येईल याची खात्री नाही त्यामुळे त्याचा फायदा सरकारी लोकासोबत खाजगी व्यावसायिक लोक घेत आहेत. हे सर्व ऑनलाइन झाल्यामुळे आणि शाळा ऑफलाइन असल्यामुळे खाजगी व्यावसायिक लोकांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे शाळा प्रमुखाला रोज ऑनलाइन प्रक्रियेसाठी महीना काठी जवळपास एक हजार रुपयांच्या वर खर्च करावा लागत आहे. यासाठी शासनाची निधी मात्र तूटपूंजी आहे असे म्हणण्यापेक्षा नसल्यातच जमा आहे. एखादी गोष्ट ऑनलाइन करण्यात आले नाही की मुख्याध्यापकाना नोटिस मिळालीच म्हणून समजा. आज काही शाळेत संगणक तर दुरची गोष्ट त्यांच्याकडे विद्युत पुरवठा ही सुरळीत सुरु नाही. संगणक आहेत परंतु लाईट नाही असे काही ठिकाणी आहे तर काही ठिकाणी संगणक चालवु शकणारे कुशल प्रशिक्षित शिक्षक नाहीत अशी फार मोठी विचित्र परिस्थिती शाळाची आहे याची जाणीव शासन दरबारी नसेल काय? असा प्रश्न कधीतरी मनात निर्माण होतो. ऑनलाइन प्रक्रियेतील प्रत्येक प्रणालीचे यूजर नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवणे अशक्य होत आहे. त्यामुळे मुख्यध्यापकाना डोके खाजविण्याची वेळ आली आहे. शाळेत कसल्याच प्रकारची सुविधा न देता ऑनलाइन कामाची अपेक्षा ठेवणे खरोखर योग्य आहे का ? काहीही करा पण ही कामे ऑनलाइन करवीच लागतील असा आदेश दिल्या जातो. ज्यास कोणत्याही शिक्षक संघटना किंवा मुख्याध्यापक संघ विरोध न करता मुकी बिचारी कुणी ही हाका या धोरणाने चालत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज सरकारी शाळा आणि सरकारी शिक्षक हायटेक झाली आहेत मात्र तंत्रस्नेही शिक्षक बांधवाची संख्या तुलनेने खुप कमी आहे याचा शासन स्तरावर एकदा तरी विचार करावा असे वाटते. एवढे सर्व ऑनलाइन कामे शाळेच्या मुख्याध्यापकानी कसे करावे हा फार मोठा प्रश्न त्याच्या समोर पडला आहे. सध्या तरी खाजगी बाहेरील व्यक्तिकडे म्हणजे कंप्यूटर सेंटरमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे मुख्याध्यापक हे दिवसा शाळेत आणि सायंकाळी  कंप्यूटर सेंटर मध्ये दिसत आहेत

यावर शासन उपाय करू शकते त्यासाठी हवी शासनाची उपाययोजना करण्याची इच्छाशक्ती. आज राज्यात किती तरी संगणक ऑपरेटर बेकार फिरत आहेत त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून दिल्यास बरेच बेरोजगार मुले कामाला लागु शकतात. प्रत्येक केंद्रीय शाळेवर एका संगणक तज्ञाची तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केली आणि केंद्रांतर्गत येणारी सर्व ऑनलाइन ची कामे यांच्या मार्फ़त करून घेतल्यास बऱ्याच शिक्षकांचा त्रास वाचू शकतो. गटसाधन केंद्र म्हणजे तालुका स्तरा वर एक पद सध्या आहेच त्यास एक मदतनिस म्हणुन जर एका पदाची निर्मिती करण्यात आली तर तालुक्याची सर्व कामे ऑनलाइन करण्यास काही अडचण येणार नाही. यामुळे सर्व शाळा संगणक युक्त आणि नेट असलेल्या असणे गरजेचे राहणार नाही. तालुका आणि त्या अंतर्गत येणारी केंद्र शाळेचा जरी गांभीर्याने विचार केला तर शासनाची ऑनलाइन प्रणालीला यश मिळेल असे वाटते अन्यथा असे ऑनलाइन चे काम म्हणजे निव्वळ फार्स असून निव्वळ मुख्याध्यापाकच्या डोक्याला ताप आहे

   - नागोराव सा. येवतीकर
     मु. येवती ता. धर्माबाद
     09423625769








Thursday, 25 August 2016

*तुम्ही आम्ही पालक*
 मासिकाचा
*शिक्षकी पेशा-काल आणि आज*
 *सप्टेंबर 2016* चा अंक प्रकाशित झाला

*वार्षिक वर्गणी ₹700*

आपण अजून मासिकाचे सभासद झाला नसाल तर आपण ऑनलाईन (online) पद्धतीने
*www.sirfoundation.org.in* वर नोंदणी करू शकता किंवा आपली वर्गणी रोख/ चेक/ डीडी ने थेट
 *SIR FOUNDATION*,
Bank of Maharashtra Narayanpeth शाखा , 
*A/c no. 60135365348*
IFSC MAHB0000154 
या खात्यावर भरू शकता. 

पत्रव्यवहाराचा पत्ता: 

*तुम्ही आम्ही पालक* मासिक
*सर फाऊंडेशन*
२०१, बाळकृष्ण अपार्टमेंट,
गजानन चैतन्य बिल्डिंगच्या आत, 
पत्र्या मारुती मंदिराजवळ,
नारायण पेठ, पुणे 411030

आपणांस अधिक माहिती हवी असल्यास 
8605009232
020 24465885/24457781 
या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
info@sirfoundation.org.in


या मासिकात समाविष्ट लेखमाला

*महापालक सन्मान सोहळा वृतांत - 07*


*शिक्षक समाजातील दरी वाढतेच - नाना जोशी - 24*



*आदर कमी झालाय - सुधीर दाणी - 27*



*ज्ञानार्जनाची भूक मंदावाली - नरेंद्र लांजेवार - 31*



*शिक्षकाशिवाय पर्याय नाही -डॉ. व. झा. साळी - 38*



*हाती फक्त खडू द्या - नागोराव सा. येवतीकर - 42*




*शैक्षणिक अहवाल किती खरा, किती खोटा - रणजितसिंह डिसले - 46*



*मानले तरच - शोभा नाखरे -50*

अभिप्राय














Sunday, 21 August 2016




*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*

रिओ ऑलिम्पिक मध्ये भारत पदक तालिकेत आपले खाते उघडते किंवा नाही याबाबत प्रत्येक भारतीयांच्या मनात शंका निर्माण होत असताना साक्षी मलिकने कुस्तीत कास्य पदक जिंकून 125 कोटी भारतीयांची शान राखली तर बैडमिंटनपटु पी व्ही सिंधुने रौप्य पदक मिळवित सर्व भारतीयांची मान उंचावली. तसे पाहिले तर इतर देशाच्या तुलनेत आपली एवढी मोठी लोकसंख्या असून सुध्दा पदक मिळण्याच्या बाबतीत खुपच मागे का आहे ? यावर विचार करणे आवश्यक आहे. खरे तर खेळाची सुरुवात प्राथमिक शाळेपासून व्ह्ययला पाहिजे.
उत्तम आरोग्य असेल तर त्याचे डोके सुध्दा उत्तम असते अश्या अर्थाची एक म्हण वाचण्यात येते. त्याचा अर्थ शालेय जीवनापासून लक्षात घ्यायला हवे. कारण प्राथमिक शिक्षणाची सुरुवात शाळेत होते आणि याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. मुलाचा शारीरिक,भावनिक विकास होण्यासाठी खेळ आवश्यक आहे. मुले खेळण्यात जास्त वेळ घालू लागली की पालकाची ओरड ठरलेली असते की आत्ता किती वेळ खेळणार ? चल बस अभ्यासाला. ही नेहमीची पालक वर्गाची ओरड प्रत्येक घरात दिसून येते. यास पालकाना दोष देऊन चालणार नाही कारण सध्या परिस्थितीच आहे तशी खेळापेक्षा अभ्यासाला महत्व जास्त देण्यात येते.
संगणकच्या युगात काही चांगले घडत आहे तर काही वाईट सुध्दा घडत असताना दिसत आहेत. मोबाईल नावाच्या जादुई खेळणीने मुलांचे सर्वच खेळ हिरावुन घेतले आहे असे वाटते. पूर्वी ग्रामीण भागातील शाळा आणि रिकामी जागा मुलांच्या खेळाने भरून जात असत. शहरात खेळाची मैदाने सायंकाळी आणि रविवारच्या दिवशी मुलांनी फुलून जायचे. पण आज हे चित्र फार कमी पाहायला मिळत आहे. कारण आज मुले घरात बसल्या ठिकाणी मोबाईल वर सर्व खेळ खेळत आहेत. मैदानी खेळ कमी झाले. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. त्यांचा मेंदू काम करेनासे झाले आहे. शरीर जड होत आहे. मुलामध्ये चैतन्य नावाची वस्तु सापडत नाही. या सर्व बाबीवार एकच उपाय ते म्हणजे शारीरिक खेळ. मुलांचा अभ्यास तेंव्हाच चांगला होऊ शकतो ज्यावेळी त्यांचे मन प्रसन्न असेल आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांना मैदानावर खेळण्यास नेणे गरजेचे आहे. मैदानावर फिरणे असो खेळ खेळणे असो वा इतर काही करणे यामुळे मुलांना ताजी हवा मिळते जे की शरीरला आवश्यक आहे आणि मन प्रफुल्लित होते. म्हणून मुलांना नुसते अभ्यास करा असे म्हटल्याने मुलांचा अभ्यास नीट होणार नाही. ते आपल्या धाकामुळे वाचन लेखन अभ्यास करतील पण त्यांच्या लक्षात राहणार नाही, हे ही तेवढेच सत्य आहे त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी थोडा तरी वेळ खेळ खेळणे आवश्यक आहे. पण आज आपल्या मुलांची सकाळ आणि सायंकाळची वेळ ही शिकवणीमध्ये जात आहे. शाळेत सुध्दा खेळाचा एक तास असतो मात्र शाळेत किती व कोणकोणते खेळ शिकवल्या जातात हा एक संशोधन करण्याचा विषय होऊ शकतो. त्यास शिक्षक दोषी आहेत असे नाही कारण तेथे खेळाच्या शिक्षकाची कमतरता भासते. आज कित्येक शाळेत खेळाचे शिक्षकच नाहीत तर काही शाळेत खेळाचे मैदान उपलब्ध नाही तर मुले काय खेळतील आणि कुठे खेळतील ? कधी कधी मुले ज्यांच्या शाळेत मैदान आहे तेथे खेळताना दिसून येतात त्यांना कोणाचे मार्गदर्शन नसते, ना कोणाचा कानमंत्र ते आपले उगीच खेळ खेळत असतात. परंतु त्यांना चांगला गुरु मिळाला तर अनेक स्तरावर आपले नाव व कीर्ती मिळवू शकतात. शाळेत शिकलेल्या खेळाचा आयुष्यात फायदा होतो. शालेय जीवन संपल्या वर आपले कोणत्याच खेळाकडे लक्ष जात नाही कारण त्या खेळाविषयी जी रूची शाळेत तयार व्ह्ययला पाहिजे ते होत नाही. शाळेतील खेळ पावसाळी आणि हिवाळी खेळापूरती औपचारिकपणे पूर्ण केल्या जाऊ नये.
शालेय अभ्यासक्रमात खेळाचा तास हा शेवटचा असतो ज्यात सहसा काहीच होत नाही कारण मुलांना घरी जाण्याचे वेध लागलेले असते. दुपारची पूर्ण वेळ खेळासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. शाळेतून विविध प्रकारच्या खेळाची तयारी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासनाने या बाबिकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. निदान सहाव्या वर्गापासुन तरी खेळाच्या शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुले योग्य दिशेत मोकळेपणाने खेळ खेळतील. एखाद्या खेळात निपुण व्हायाचे असेल तर विषय शिक्षकच फक्त त्यास न्याय देऊ शकतो. तीन वर्षापूर्वी कला , कार्यानुभव आणि क्रीडा विषय शिकविण्यासाठी अंशकालीन निदेशकची नेमणूक करण्यात आली होती. तेंव्हा मुले त्या विषयात अभ्यास करताना आनंदात होती. पण त्यांचा आनंद दीर्घकाळ टिकू शकले नाही. कारण पुढे त्यांची नेमणूक रखडली. प्रत्येक सहावी ते दहावीच्या वर्गासाठी क्रीडा शिक्षक असेल तर भविष्यात साक्षी आणि सिंधू मोठ्या प्रमाणावर तयार होतील. अशी आशा करण्यास हरकत नाही. कोणत्याच सोई सुविधा उपलब्ध नसेल तर आपली मुले स्पर्धेत कशी राहतील याचा विचार करणे आवश्यक नाही काय ?
जर आत्तापर्यन्तच्या ऑलिम्पिक चा इतिहास पाहिले असता भारत देश सन 1900 पासून यात सहभाग घेत आहे. आजपर्यन्त भारताने 9 सुवर्ण चार रौप्य आणि 12 कास्य असे एकूण 25 पदक गेल्या 116 वर्षात मिळविले आहे आणि गेल्या 20 वर्षाचा मगोवा घेतल्यास असे लक्षात येते की सन 1996 पासून भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ कास्य पदकाची कमाई केली याचाच अर्थ गेल्या वीस वर्षपासुन भारताचा ऑलिम्पिक मधील सहभाग वाढला असून जास्तीत जास्त खेळ खेळून पदक मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत म्हणण्यास हरकत नाही. मात्र अजूनही मुलांना या खेळाच्या बाबतीत अधिक जागृत करून त्यांना खेळाकडे आकर्षित करणे आवश्यक आहे. शाळा स्तरापासून ते देश स्तरापर्यन्त विविध स्पर्धाचे आयोजन करून खेळाडूना प्रोत्साहन मिळवून देणे याची आत्ता खरी गरज आहे.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...