Friday 11 December 2015

चारोळी स्पर्धा क्र 14
॥ करावे तसे भरावे ॥
वरील म्हण चारोळीतील कोणत्याही ओळीत आली तरी चालेल !
चारोळी ही 4 ओळीचीच असावी !
दुसर्या व चौथ्या ओळीत यमक असावे !
जी चारोळी स्पर्धेसाठी टाकणार आहात त्या चारोळी च्या वर " स्पर्धेसाठी " असा स्पष्ट उल्लेख करावा
स्पर्धेसाठी फक्त एकच  चारोळी पात्र धरण्यात येईल
* स्पर्धा सुरू झाल्यावर संपेपर्यत फक्त चारोळ्याच पोस्टकराव्यात, अन्य पोस्टटाकू नयेत !
* धन्यवाद !
====================================
***********************************************
====================================
🔴चारोळी स्पर्धा क्र 14🔴
डबल धमाका , एकावर एक फ्रि ऑफर

किती सांगू तुम्हाला धनी
तरी * पालथ्या घड्यावर पाणी * ।
॥ करावे तसे भरावे ॥
ही म्हणच आहे जुनी ।
@ अरविंद कुलकर्णी
====================================
***********************************************
====================================
।।करावे तसे भरावे ।।
^^^^^^^^^^^^^^^
इश्वरा मनोमनी स्मरावे
नित्य सत्य कर्म करावे.!
बुरखा घालता दुष्ट कर्माचा,
मग ''करावे तसे भरावे''.!!
✏__________ जी.पी
====================================
***********************************************
====================================

2) 🔴चारोळी स्पर्धा क्र 14🔴
पेरतो जे तेच उगवते
पापाचे खजिने किती भरावे
पुर्वज आपले सांगून गेले
॥ करावे तसे भरावे ॥
@ अरविंद कुलकर्णी

====================================
***********************************************
====================================
दुष्टांचे संगती वावरताना
सज्जनां सांगत रहावे .!
सांगून न ऐकतील जरी,
करावे तसे भरावे..!!
✏____________ जी.पी
====================================
***********************************************
====================================
चारोळी स्पर्धा
"करावे तसे भरावे"

१ अमेरीकन ट्वीन टाॅवर   झळकणारे।
 क्षणात  आघात होता
 बेचिराख झाले।
'करावे तसे भरावे', आता तरी कळाले!
ज्यांनी अतिरेक्यांस शस्रास्र
 पुरवुनी पोसले।

अंजना कर्णिक.

२  सासुने पसरले काटे
 स्नुषेच्या ऊमलत्या संसारी
  ऊमजले,करावे तसे भरावे
 वृद्धत्वी पडता वृद्धाश्रमी।

३ क्रृत्रिम खतं अन हायब्रिड बियाणं
सोसासोसान भरपूर पीक
काढलं
'कराव तसं भरावं' दावलं
भूमायनं
नापीकतेचा  शाप देऊन
शिकवल!

४ घरं ,गाडी ,पैका ,सोने
यांच्या पाठी धावले पालक
'करावं तस भराव,ऊमजले
  पोटचं पोर  पार वाया गेलं
अंजना कर्णिक
====================================
***********************************************
====================================
१)महापापाने वसुंधरा थरथरली
'करावे तसे भरावे ' बोलली
आता तरी जागृत हो मानवा
प्रेम आधार दे दुबळ्या जीवा

© जागृती निखारे.११/१२/२०१५

२) 'करावे तसे भरावे' न्याय मनुजाचा
     परपीडा देती , कष्टवी मानवी मना
  सुडातच संपवी आनंद जीवनाचा
         करून पहा जरा क्षमायाचना
©जागृती निखारे ११/१२/२०१५.

आधी ईन्सुलीन घेत जा बरे
जेवणाआधीच्या सुपसारखे
नाहीतर' करावे तसे भरावे'
ब्लडशुगर वाढल्यावर कळते बरं का

© जागृती निखारे११/१२/ २०१५

नाही ऐकले वैद्याचे
नाही घेतली गोळी आज
'करावे तसे भरावे' या न्यायाचे
तनुने दिधले उत्तर आज.

©जागृती निखारे११/१२/२०१५
====================================
***********************************************
====================================
आपली माय तिले तुप साय ,
सासुले पाण्यात फाय.....
आजची सुन उद्याची सासु हाय
करायच तसच भरायच हाय...
🔵WARANKAR G🔵
       👉🏼नांदेड👈🏼
====================================
***********************************************
====================================

करावे तसे भरावे,
फूल होऊन जगावे.
सुगंध देऊन सर्वांना
निर्माल्य होऊन जावे.

डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.
====================================
***********************************************
====================================
चारोळी स्पर्धा
 रावण  मोठा शक्तीमान
रसातळासी गेला  हो
'करावे तसे भरावे'  हा धड
नियतीने दावीला हो ।

दृढविश्वासातून तरले
भक्त प्रल्हाद पुराणकाळी
'करावे तसे भरावे' न ऊरले
भ्रष्ट मोकाट कली काळी।
अंजना
====================================
***********************************************
====================================
करावे तसे भरावे हे
स्मरणात असू द्यावे
आई - वडिलांची सेवा
नेहमी करीत रहावे
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
====================================
***********************************************
====================================
पुराणातली वांगी पुराणात राहिली
'करावे तसे भरावे "म्हण व्यर्थ ठरली
माणंस चिरडून  खुनी मोकाट राही
करून काॅप्या पोरटी
पास होती।
अंजना कर्णिक
====================================
***********************************************
====================================
मी सुलभा कुलकणीॅ चारोळी स्पधाॅ.
    करावे तसे भरावे.
1)नको तुला फुकाचा गवॅ,
     नको करू पैशाची हाव,
     लागत नाही मनाचा ठाव,
     लक्षात ठेव करावे तसे भरावे.
2)  अहो,एवढासा तो जीव,
      त्याचे कितीही चोचले पुरवा,
     सुटत नाही त्याची हाव,
     करावे तसे भरावे,लक्षात ठेवा.
3) हे!तेहतीस कोटी देवा,
     तुला रे कशाला प्रसाद हवा?
     करावे तसे भरावे,
 हे पण कसा विसरलास राव?
4) अंधश्रद्धेचा फेकूनी बुरखा,
    जिवनाची चालव रे नाव,
    पापपुण्याचा नको घेऊ ठाव,
     असू दे ध्यानी कराव तस भराव.
5)नको रे मला त्रास देवू,  
   मला मनासारखे वागव,
    करावे तसे भरावे,
    तुला नाही का ठाव?.
====================================
***********************************************
====================================

मंथरेच्या नादाने बिथरली कैकयी
वनवास दिधला रामराया
भरतही विसरला तिची माया
करावे तसे भरावे हा मंत्र दिला राया
©जागृती निखारे.१२/११/२०१५

====================================
***********************************************
====================================

3) आई बाबांनी तुमच्या साठी
खुप खाल्यात खस्ता ।
आठवण ठेवा त्यांची नसता
करावे तसे भरावे न्यायाने
दाखवतील वृद्धाश्रमाचा रस्ता
@ अरविद कुलकर्णी
====================================
***********************************************
====================================
चारोळी स्पर्धा
कुत्री मांजरी पाळली
हौस भागली।
आई बापाची तेवढी
सेवा राहिली।
केली चुकी आता
ध्यानी आली!
अपत्यांच्या विरहानी
भरावी लागली।
'करावे तसे भरावे '
शिकवले होते शाळेत
  आयुष्यभर पाप केले
आता आठवतय का रे !
अंजना कर्णिक
====================================
***********************************************
====================================
काव्य लेखनाची सारी
भागतेय  पुरेपूर हौस ।
दमदार या चारोळ्यांचा
पडतोय जोरदार पाऊस ॥
                   शरयू शहा
====================================
***********************************************
====================================
4)  करावे तसे भरावे , असा
उपदेश करतोस छान ।
दुसर्यांना देतो ज्ञान
आपण कोरडे पाषाण ।
@ अरविंद कुलकर्णी
====================================
***********************************************
====================================

💥💥साहित्य मंथन 💥💥
                    आयोजित
🎤🎤काव्यमंथन🎤🎤

✏✏चारोळी स्पर्धा✏✏

🌻करावे तसे भरावे🌻

कंस ,दुर्योधन असो की दू:शासण
घडवती महाभारत नि रामायण
परी न्याय होई समान सर्वे
म्हण उपयोगी  करावे तसे भरावे
✒🎯🎯🎯✒
आप्पासाहेब सुरवसे
लाखनगांवकर
====================================
***********************************************
====================================
कर्म आपुले करीतच जावे,
हास्य वदनी सदा असावे,
सत्य हे करावे तसे भरावे,
म्हणून सत्कर्म सदा करावे....
निर्मला सोनी 
====================================
***********************************************
====================================
💥साहित्यमंथन- काव्यमंथन💥

🔵🔴चारोळी स्पर्धा🔴🔵

🌹🌹करावे तसे भरावे🌹🌹

करावे तसे भरावे नि कसे सावरावे
कोणत्या मापानं हे तरी मोजावे
अशी लागे ही  केंव्हाही पाठी
न उठे वळ न मोडे लाठी
✒🎯🎯🎯✏
  आप्पासाहेब सुरवसे सर            लाखनगांवकर
====================================
***********************************************
====================================
💥साहित्यमंथन- काव्यमंथन💥

🔵🔴चारोळी स्पर्धा🔴🔵

🌹🌹करावे तसे भरावे🌹🌹

करावे तसे भरावे नि कसे सावरावे
कोणत्या मापानं हे तरी मोजावे
अशी लागे ही  केंव्हाही पाठी
न उठे वळ न मोडे लाठी
✒🎯🎯🎯✏
  आप्पासाहेब सुरवसे सर            लाखनगांवकर
====================================
***********************************************
====================================
💥💥साहित्य मंथन💥💥

द्वारा आयोजित 

🎌🎌काव्यमंथन🎌🎌

📍📍चारोळी स्पर्धा📍📍

🌻🌻करावे तसे भरावे🌻🌻
पाप करी की मग पुण्य करी
ज्याचा त्याचा होई मानकरी
म्हणे मरावे परी कीर्ति रूपी उरावे
शिवाय काय उणे करावे तसे भरावे
✒🎯🎯🎯✒
आप्पासाहेब सुरवसे सर                   लाखनगांवकर
====================================
***********************************************
====================================
💥साहित्यमंथन- काव्यमंथन💥

🔵🔴चारोळी स्पर्धा🔴🔵

🌹🌹करावे तसे भरावे🌹🌹

करावे तसे भरावे नि कसे सावरावे
कोणत्या मापानं हे तरी मोजावे
अशी लागे ही  केंव्हाही पाठी
न उठे वळ न मोडे लाठी
✒🎯🎯🎯✏
  आप्पासाहेब सुरवसे सर            लाखनगांवकर
====================================
***********************************************
====================================
म्हणींचा योग्य 
वापर करून ।
काव्यशलाका 
येती उतरून। ॥
            
❄  ❄  ❄  ❄  ❄

आज साहित्य मंथन येथे 
उसळली  गर्दी उत्सवाची ।
साहित्य प्रेमी सारे पूजक
बांधती पूजा शब्दफुलांची ॥

                      शरयू शहा
====================================
***********************************************
====================================

💎साहित्यमंथन- काव्यमंथन💎

🌸चारोळी स्पर्धा🌸

🍃🍁🍃करावे तसे भरावे🍃🍁

"तिर्थरूपांना वृद्धाश्रमी ठेवून
एकाने ठरवले मस्त फिरून यावे
घरी जाताच सुनेचे दुसरे बर्हाड
तंतोतंत न्याय'करावे तसे भरावे' "
............🍃🍁जयश्री पाटील
            वसमतनगर🍁🍃
====================================
***********************************************
====================================
करावे तसे भरावे 

निवासासाठी करती समुद्रावरही अतिक्रमण,
अचंभित का व्हावे पाहुनी त्सुनामीचे तांडव,
अरे वेड्या माणसा नको तोडू प्रकृतीचे नियम,
'करावे तसे भरावे' हेच जगण्याचे सूत्र घडव.

         🌺🌺🌺संदीप पाटील,नांदेड .
====================================
***********************************************
====================================
साहित्य मंथन - काव्यमंथन
चारोळी स्पर्धा
स्पर्धेसाठी चारोळी...

सुटलास जरी ईथे तू
भोग ना तुला चुकायचा
' करावे तसे भरावे ' हा
न्याय गड्या देवाघरचा

उद्धव कराड.
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नासिक.
====================================
***********************************************
====================================
🌺साहित्यमंथनस्पर्धा🌺
    विषय== करावं तसं भरावं 
=====================
        प्रेषक =कुंदा पित्रे  
=====================
1)  हसली पांचाली दुर्योधनाला
      हरला द्युत मोठा पांडव
       हं पांच गेले वनवासाला
       हो मग करावं तसं भरावं !
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
2)  कर्ण होता पुत्र तरी कुंतीचा
     कपटाने शिकला अस्त्रविद्या
     कसला आव होता भक्तीचा
    करावं तसं भरावं नाही सुविद्या🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
3) अनिती घडली राजदरबारी
      असुया हे जन्मदान ठरावं
      अन् अब्रु गेली बिरादरी
      अक्रिताने करावं तसं भरावं
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
4)नियति नसते तशी आंधळी
    जाणून घे रे जिवा मन्मनी
    इथेच मिळते सजा वेगळी
   करावं तसं भरावं लागे जनी
🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄
5) आज काल करावं तसं भरावं
     असं राहिले आहे काय ?
  की,सलमानने सहीसही सुटावं
    पैसा!,पैसा बोलतो हाय !!
🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
6) ईशाची स्पंदने,मिळवुनि
    ध्यानाची कास असु दे सुलभ
    शांति,सुखाचा वसा घेऊनि
    करावं तसं भरावं होई निष्प्रभ
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
====================
कुंदा पित्रे
====================================
***********************************************
====================================

🌷चारोळीस्पर्धा 🌷
🌻करावे तसे भरावे 🌻

 " निसर्ग कोपतो,शेतकरी भोगतो.
मतदार भुलतो,उमेदवार जिंकतो.
बलात्कार 'त्या'चा..,जीव 'हि'चा जातो.
करावे तसे भरावे,सांगा हा नियम कुठे असतो????"
     --संगीता देशमुख ,
     वसमत
====================================
***********************************************
====================================
संकलन - नासा 


Thursday 10 December 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास आशय ज्ञान चाचणी डिसेंबर पहिला आठवडा
 ( नांदेड जिल्हा मर्यादित )
वर्ग - दुसरा ते पाचवी

वर्ग तिसरा 


वर्ग चौथा 



वर्ग पाचवा 


वर्ग सहावा 


वर्ग सातवा 



वर्ग आठवा 








** प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे **

* उपक्रमाची प्रस्तावना - 
प्रश्न म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठ्या  पडतात. प्रश्नाचे उत्तर देतांना अनेकांच्या नाकी नऊ येते. प्रश्नाचे उत्तर आठवत नसले की, मन कसे अस्वस्थ होते आणि त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी शोधाशोध सुरू होते, याबाबतीत जे जाणकार किंवा तज्ञ असतील अश्या काही मित्रांना या प्रश्नांच्या उत्तराबाबत चौकशी केली जाते. बहुतांश वेळा विद्यार्थ्याना पाठ समजलेला असतो मात्र प्रश्नाचे उत्तर सांगता येत नाही आणि सांगता येत नसल्यामुळे लिहिता येत नाही ही समस्या प्राथमिक शाळेत फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. विद्यार्थ्याची ही समस्या कशी  सोडविता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर चटकन कसे सांगतील आणि लिहितिल यांसाठी मी सातव्या वर्गातील एकूण 50 विद्यार्थ्याना डोळ्यासमोर ठेवून सदरील उपक्रमाची निवड केली.

** उपक्रमाचे नाव : -  प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे 
या उपक्रमाची सुरुवात करीत असताना विद्यार्थ्याना या उपक्रमाची तोंडओळख द्यावी जेणेकरून विद्यार्थ्याना याची संपूर्ण माहिती होईल. उपक्रमाची ओळख झाली तरच उपक्रम यशस्वी होते अन्यथा हा उपक्रम फक्त हुशार विद्यार्थ्यानाच फायदेशीर ठरेल. 
सर्वप्रथम विद्यार्थ्याना पाठाचे अध्यापन करावे आणि पाठातील छोट्या छोट्या प्रश्नांची ओळख द्यावी. प्रश्न आणि उत्तर विद्यार्थ्याच्या वहीत लिहिण्यास सांगावे. पाठ पूर्ण संपल्यावर सर्व प्रश्न एकत्र करावे आणि ते सर्व प्रश्न परत एकदा वर्गात सर्वाना विचारून उत्तराचा सराव करावा. यामूळे विद्यार्थ्याना प्रश्न आणि उत्तराची पूर्ण ओळख होईल. या प्रक्रियेनंतर मग या उपक्रमाला सुरुवात करावयाचे आहे.

*** उपक्रमाची कृती : - 
पाठ शिकविणे पूर्ण झाल्यानंतर ज्या प्रश्नांची आपण यादी केली किंवा विद्यार्थ्याना वहीत लिहिण्यासाठी सांगितलेले ते सर्व प्रश्न जाड कागदावर खालीलप्रमाणे लिहावे. यांसाठी लग्नपत्रिकाचा वापर टाकाऊ पासून टिकाऊ म्हणून करता येईल. मराठीसाठी M, पाठ पहिला म्हणून 1 आणि या पाठातील प्रश्नांचे अनुक्रमांक 1 ते पुढील . . . . . असे वरच्या भागावर नमूद करून प्रश्न पट्टी तयार करावी. उदा. 
----------------------------------------------------- 
l M/1/1                                                    l 
l कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन कोण  l                                                          l करीत असत ?                                            l 
l            उत्तर : विष्णू वामन शिरवाडकर           l                                       
-----------------------------------------------------

त्या पाठातील एकूण अश्या प्रश्न पट्टी तयार कराव्यात.  विद्यार्थ्याना ते प्रश्न क्रमाक्रमाने विचारावेत. 
* पहिल्यांदा पाच प्रश्न सलगपणे वर्गातील हुशार विद्यार्थ्यास विचारावे. 
* हुशार, मध्यम आणि अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्याना याच क्रमाने प्रश्न विचारावे. 
* संपूर्ण वर्गात या पध्दतीने प्रश्न विचारले तर सर्व विद्यार्थ्याना त्या प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ होऊन जातील. 
* आत्ता आपण हा उपक्रम खेळाच्या स्वरूपात मुलांसमोर घेऊन जाण्यास तयार आहोत. 
* एक डबा घ्यावा त्यावर दर्शनी भागावर  विषयाचे नाव " मराठी " असे लिहावे. त्यात सर्व प्रश्न पट्टी टाकाव्यात एक मुलगा आणि एक मुलगी या क्रमाने विद्यार्थ्याना समोर बोलाविले जाऊन त्याना प्रश्न पट्टी उचलण्यास सांगावे. 
* सुरुवातीला ती प्रश्न पट्टीचे शिक्षक वाचन करतील आणि विद्यार्थ्याना उत्तरे सांगण्यास प्रोत्साहित करतील 
* यात पुढे बदल करून जो विद्यार्थी प्रश्न पट्टी उचलण्यास समोर येईल तो वर्गातील सर्व विद्यार्थ्याना प्रश्न विचारेल. 
* प्रश्नपट्टी वर उत्तर लिहिलेले असल्यामुळे समोर आलेल्या विद्यार्थ्याना उत्तर माहीत असेल. मुलांनी प्रश्नांची उत्तर बरोबर दिली असेल तर हे उत्तर बरोबर आहे असे सांगून विद्यार्थी जागेवर बसतील. 
* या क्रमाने संपूर्ण वर्गाला एक प्रश्न विचारण्यास संधी मिळते आणि विद्यार्थ्याना प्रश्न उत्तराचा सराव होऊन सर्व प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ होतात. 
* प्रश्नांची उत्तरे सांगता आली की विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यासाठी आत्ता विद्यार्थ्याना प्रश्नांची उत्तरे लिहिता आली पाहिजे असे वाटणे साहजिक आहे. 
* यांसाठी डब्यातुन शिक्षकांनी प्रश्नपट्टी उचलावी त्याचे वाचन करावे आणि मुलांना फक्त उत्तरे लिहिण्यास सांगावे. 
* एका वेळी पाच प्रश्न देऊन त्याचे उत्तर विद्यार्थ्याना आपापसात वही बदलून तपासून घेण्याची सूचना द्यावी. 
* त्या पाच प्रश्नांची उत्तरे परत एकदा शिक्षकांनी सांगावे. 
* ज्या विद्यार्थ्याचे पाचही उत्तरे बरोबर आली त्या विद्यार्थ्याची वर्गात सर्वांसमक्ष अभिनंदन करावे. 
* अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्याचे पाचपैकी एक जरी बरोबर आले असेल तरी त्यांचे अभिनंदन करावे आणि प्रोत्साहन द्यावे, शाबासकी द्यावी. 
* यापुढील पायरी म्हणजे याच प्रश्नांवर आधारित 20 गुणांची सराव परीक्षा घेण्यात यावी आणि त्याना किती प्रश्न परीक्षेत आठवतात यांची चाचपणी करावी. 
* शक्यतो हा उपक्रम दिवसाच्या शेवटच्या दोन तासिकेत घ्यावे. म्हणजे विद्यार्थ्याना मनोरंजनासोबत अभ्यास ही होईल. 
* ज्या दिवशी विषय शिक्षक उपस्थित नसेल त्या दिवशी इतर शिक्षकाची त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली जाते.
* त्या शिक्षकांना प्रश्न पडतो की काय शिकवावे ? 
* पण या उपक्रमाने त्यांचा प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. प्रश्न पट्टीवर प्रश्न आणि उत्तर लिहील्यामुळे कोणालाही हा उपक्रम अगदी सहजरित्या घेता येऊ शकेल. 
* य उपक्रमाचा फायदा असा आहे की विद्यार्थ्याना पाठावरील सर्व प्रश्नांची उत्तरे चटकन आठवण येतात आणि त्यांच्या आकलनशक्तित वाढ होते. प्रश्नांची उत्तरे आल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी सुध्दा स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करतात 
* या उपक्रमांत एकच उणीव किंवा त्रुटी दिसून येते ते म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताना वेळ खूप लागतो आणि आपल्याकडे त्याचीच कमतरता असते. 
* मात्र विद्यार्थ्याना या खेळात खूपच मजा येते. विद्यार्थी वारंवार हे उपक्रम घेण्याबाबत हट्ट करतात यावरून या उपक्रमाची सफलता नक्की दिसून येते. 
*** प्रतिसाद . . . . . . . . . 
आपण ही हा उपक्रम आपल्या शाळेत सुरू करावा आणि आपणांस काय वाटले ? विद्यार्थ्याचा प्रतिसाद कसा मिळाला ? विद्यार्थ्याची प्रगती झाली का ? किंवा या उपक्रमात काही बदल करावा असे आपणांस वाटत असेल तर आपले अभिप्राय नक्की कळवावे.

- नागोराव सा. येवतीकर, 
प्राथमिक शिक्षक,
जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली 
ता. धर्माबाद जि. नांदेड
nagorao26@gmail.com 
9423625769

Wednesday 9 December 2015

युवकांच्या चांगल्या सवयी




Monday 7 December 2015




📖 एक तास अवांतर वाचन 📝

सायंकाळी शाळेत मुले कुणाचे  काही ऐकत नाही. खेळू घालण्याचा त्यांचा एकच तगादा असतो. दिवसभर अभ्यास करून त्यांना कंटाळा आलेला असतो. त्यासाठीच मुले गोंधळ करतात. यावर उपाय काय करावा असं विचारात असताना वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने मुलांकरिता अवांतर वाचन करून घेण्याविषयीचे शालेय शिक्षण विभागाचे पत्र मिळाले आणि एक कल्पना डोक्यात आली की आपण रोज एक तास मुलांचे अवांतर वाचन घ्यावे. मग त्यानुसार नियोजन तयार करण्यात आले आणि या पध्दतीने हा उपक्रम राबविण्यात आला. 
कृती - 
मुलांना सर्वप्रथम सूचना देण्यात आली. उद्यापासून रोज सायंकाळी एक तास आपण दूसरे पुस्तक वाचन करणार आहोत. यांसाठी आपल्या जवळ असलेले पुस्तक आपण सोबत आणावयाचे किंवा शाळेत उपलब्ध असतील ते पुस्तक आपणास वाचण्यास देण्यात येईल. ज्यात गाणी, गोष्टी, क्रांतिकारकाची ओळख, अकबर - बिरबल च्या गोष्टी, इसापनीती यासारखे पुस्तक उपलब्ध होतील असे सांगण्यात आले. मुले आनंदी  झाली. त्यांना उद्याच्या दिवसाची प्रतीक्षा लागली. प्रत्यक्ष उपक्रम सुरू होण्यापूर्वी प्रत्येक मुलांना एक कागद देण्यात आले ज्यावर दिनांक, वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव आणि त्यासमोर वर्गशिक्षकाची  स्वाक्षरी करण्याचा तक्ता केलेले होते. मुलांच्या हातात पुस्तके देण्यात आली. सर्वप्रथम हातात पडलेले पुस्तक ची माहिती कागदावर लिहून ते शिक्षकाकडे देण्यात आले. मग एकदाची मुले वाचन करण्यास सुरुवात झाली. वर्गात एकदम नीरव शांतता होती प्रत्येकजण वाचन करण्यात मग्न होते. वाचन करीत असताना काही समस्या आली किंवा शब्द कळाले नाही तर वर्गावर उपस्थित असलेल्या शिक्षक ना विचारू लागले. मुले थोडं चौकस होत असल्याचे जाणवू लागले. 
साधारणपणे एक आठवडा उलटले त्यानंतर या उपक्रमाचा मागोवा घेण्यासाठी सर्व मुलांना बोलते केले मुलांनी वाचन केलेल्या पुस्तकाविषयी माहिती सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. काही मुलांनी पुस्तकातील महत्वाची माहिती नोंद करून ठेवली आणि त्याचा वापर प्रश्न मंजूषा सारख्या उपक्रमात करू लागली.
सायंकाळी खेळण्याचा जो हट्ट मुलांचा राहत होता तो कमी झाला. मुले या तासाचे वाट पाहू लागले. तक्ता असलेला कागद भरू लागला. मुलांसोबत शिक्षक सुध्दा वाचन करू लागले आणि तेही आपल्या वाचलेल्या पुस्तकांची यादी करण्यास सुरुवात केली. 
असा पंधरा दिवसाचा कालावधी मजेत उलटले त्यानंतर डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी सर्व मुलांनी " वाचन प्रेरणा दिवस " साजरा करतांना वाचनाचे महत्व या विषयी भाषण आणि लेखन केले. 
त्यानंतर विद्या परिषद ने पूरक वाचनासाठी एक तास बाबत आदेश काढले आहे असे वाचण्यात आले आणि मुलांना सुध्दा ही बातमी कळाली तेंव्हा मुले आनंदाने नाचू लागली आणि पूर्वी प्रमाणे आपण रोज सायंकाळी एक तास वाचन करण्यासाठी शिक्षकाकडे मागणी करू लागली. 
या उपक्रमातील काही महत्वपूर्ण बाबी 
* पुस्तक मुले निवडणार 
* पुस्तकाचे नाव व लेखकाचे नाव लिहिणार 
* पुस्तकातील महत्वपूर्ण नोंदी वेगळ्या कागदावर घेणार 
* आठवड्यातील एक दिवस वाचलेल्या पुस्तकाविषयी सर्वांसमोर सांगणार 
* नोंदीचा वापर प्रश्नमंजूषा सारख्या उपक्रमात करतील. 
* पुस्तक वर्गात वाचायचे आणि वर्गातच ठेवायचे 
* नोंद केलेला कागदी तक्ता त्यांच्या फाईल ला लावणे. 

असा उपक्रम आहे यात अजून काही बदल करावेसे वाटते का ? 

तरी आपला स्पष्ट अभिप्राय द्यावा ही विनंती



पूरक वाचनाचा एक तास 
                                                                      - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद  
मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांचा भावनिक, सामाजिक व भाषिक विकास व्हावा, म्हणून शाळांच्या वेळापत्रकात आता एक तास हा पूरक वाचनाचा असणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या परिषद) सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. 
भाषेच्या तासिकांपैकी एक तासिका पूरक वाचनासाठी ठेवण्यात यावी, असे या आदेशात सांगितले आहे. त्यामुळे लवकरच आता शाळांमध्ये विद्यार्थी अवांतर वाचन करताना दिसतील. या तासिकेमध्ये विद्यार्थ्यांना वयोगट व अभिरुचीला अनुसरून पूरक वाचन साहित्य शाळांनी उपलब्ध करून द्यायचे आहे. गोष्टीरूप पुस्तके, कथासंग्रह, संतसाहित्य, ऐतिहासिक साहित्य व थोर महापुरुषांचे चरित्रे, तसेच त्यांच्या जीवनातील उल्लेखनीय घटना यांचे वाचन यामध्ये करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांचा इतिहास समजेल व त्यांच्या आदर्शांचा जडणघडणीत उपयोग होऊ शकेल. 









पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...