*फ्रेश मॉर्निंग बुलेटिनची वर्षपूर्ति*
शब्दांकन : कुणाल पवारे
सोशल मीडिया मध्ये फेसबुकच्या नंतर whatsapp चा वापर खुप वाढला.परंतु लोक याचा चांगला वापर करण्याऐवजी रोज सकाळी सुप्रभात आणि संध्याकाळी शुभ रात्री च्या पोस्ट टाकून परेशान करतात, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. ग्रुप मध्ये तर सांगायला सोय नाही काही महत्वाचे तर काही खुपच तकलादु पोस्ट पाहण्यास मिळतात. त्यामुळे सर्व सदस्य मंडळी कंटाळून जातात. ग्रुप सोडता ही येत नाही आणि संदेश स्वीकार केल्याशिवाय पर्याय नसतो. अश्या या विपरीत परिस्थितीत "नासा ग्रुप धर्माबाद" चे एडमिन असलेले ना.सा. येवतीकर व त्यांचे सहसंयोजक कुणाल पवारे यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट 2015 रोजी *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* पोस्ट करण्यास सुरुवात केली. ज्यास आज एक वर्ष पूर्ण होत असून आज दुसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
*कशी चालू झाली ही बुलेटिन* याबाबत माहिती जाणुन घेतली असता मिळालेली माहिती अशी
नासा येवतीकर हे धर्माबाद तालुक्यातील येवती येथील रहिवाशी असून त्यांना वृत्तपत्र क्षेत्रात रूची असल्यामुळे ते अधुनमधून विविध वृत्तपत्रात स्फुटलेखन व स्तंभलेखन करतात. तालुक्यातील सर्व शिक्षक मित्रांना एकदाच एकत्रित माहिती उपलब्ध व्हावी या उद्देश्याने त्यांनी *नासा ग्रुप धर्माबाद* च्या नावाने whatsapp ग्रुप तयार केले. पूर्वी या ग्रुप मध्ये फक्त 100 सदस्य असायचे त्यावेळी तालुक्यातील अनेक शिक्षक मित्रांना या ग्रुप मध्ये येता आले नाही पण सदस्य संख्याची मर्यादा वाढल्यानंतर तालुक्यातील सर्वाना यात समाविष्ट होण्याची संधी मिळाली. धर्माबाद तालुक्यातील पाटोदा येथील के. एम. पाटील विद्यालय मधील शिक्षक कुणाल पवारे जे की कुंडलवाड़ी येथून विविध वृत्तपत्रात वार्तांकन करतात. त्यांनी एक कल्पना मांडली की, रोज शाळेत परिपाठच्या वेळी बातम्या वाचन हे उपक्रम राबवित असताना शिक्षक आणि विद्यार्थ्याची खुप धावपळ होत आहे. त्यासाठी आपल्या ग्रुप वर रोज सकाळी आठच्या पूर्वी पाच सहा बातम्या पोस्ट केले तर कसे राहील ? या विषयी ग्रुप वर चर्चा करण्यात आली आणि या बुलेटिनचा जन्म झाला.
कुणाल पवारे हे वृत्तपत्राचे प्रतिनिधी असल्यामुळे दररोज सायंकाळी 10:00 ते ना.सा. येवतीकर यांना 6 - 7 निवडक बातम्या पाठवितात त्याचे संकलन करून त्यावर थोड़ संस्करण करून नासा ग्रुप धर्माबाद वर सकाळी 7 - 8 च्या दरम्यान पोस्ट करण्याची जबाबदारी ना.सा. येवतीकर यांनी घेतली सुरुवातीला या बुलेटिन चे नाव *सकाळचे बातमीपत्र* असे नाव होते परंतु दैनिक एकमतचे प्रतिनिधी माधव हणमंते यांनी एके दिवशी सकाळचे बातमीपत्र ऐवजी दूसरे नाव दिले तर बरे राहील. त्यांची सूचना ग्रुप वर चर्चिले गेले आणि शेवटी *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन*असे नामकरण करण्यात आले. जे आज पर्यन्त चालू आहे. अल्पावधीत ही बुलेटिन ग्रुपच्या बाहेर ही पोस्ट केल्या जाऊ लागली आणि या पोस्टचे चाहता वर्ग तर तयार झाला. शिवाय या पोस्टची मागणी वाढली. अनेक ग्रुप मध्ये समाविष्ट करण्यात येऊ लागले. पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रात बुलेटिन पोहोचली. रोज सकाळी 07 च्या पूर्वी प्रत्येकाच्या whatsapp वर बुलेटिन पोस्ट होऊ लागली.
या बुलेटिनचे अजून एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ना. सा. येवतीकर आपल्या खास निवेदन शैलीत बुलेटिनची ऑडियो क्लिप तयार करतात आणि जणू आपण आकाशवाणी वरील सकाळच्या बातम्या ऐकत आहोत असा भास होतो. यामुळे प्रत्येक जन या बुलेटिनची सकाळी सकाळी आतुरतेने वाट पाहत असतात.
जालना जिल्ह्यातील सेलू येथील प्राथमिक शिक्षक तथा कवी शरद ठाकर यांची गुगली रोज फेसबुक किंवा इतरत्र वाचण्यात येत असे. त्यांना स्वतः नासा येवतीकर यांनी संपर्क केला आणि बुलेटिन साठी रोज गुगली पाठविण्याची विनंती केली तेंव्हा त्यांनी लगेच होकार दिला आणि या बुलेटिनमध्ये *गुगली* चा समावेश करण्यात आला.
आपल्या स्वकीय मित्राच्या वाढदिवसाची आठवण करून देण्यासाठी *रवी यमेवार* यांच्या वाढदिवसापासून *आजचा वाढदिवस* या उपक्रमचा यात समावेश करण्यात आला. त्यामुळे आज प्रत्येक मित्राचा वाढदिवस सर्व मित्रापर्यन्त बुलेटिनच्या माध्यमातून पोहोचत आहे. एक दिवस किंवा दोन दिवस पूर्वी वाढदिवस असल्याची कल्पना दिली जाते. आणि त्याची नोंद घेतली जाते.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील शिक्षिका सौ संगीता देशमुख यांनी या बुलेटिन मध्ये दिनविशेषचा समावेश केल्यास शाळेतील परिपाठासाठी कामाला येईल, अशी विनंती वजा सूचना देण्यात आली ते लक्षात घेऊन जानेवारीच्या नविन वर्षात दिनविशेषचा बुलेटिनमध्ये समावेश करण्यात आला
महाराष्ट्रात असे अनेक शिक्षक आहेत ज्यांचे ब्लॉग खुप सूंदर आणि माहितीपूर्ण आहेत त्यांची सर्व शिक्षक मंडळीना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या ब्लॉगची लिंक यात जोडण्यात आली
यावर्षीच्या जून महिन्यापासुन मराठी भाषेचा विकास व्हावा आणि मुलांना कठीण किंवा बुचकळ्यात टाकणारे शब्दाची ओळख व्हावी यासाठी *आजचा मराठी शब्द* बुलेटिन मध्ये समाविष्ट करण्यात आले.
एका मित्राने या बुलेटिन मध्ये *बोधकथा* असावी असे सुचविले होते त्यानुसार हदगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे यांची बोधकथा रोज पोस्ट करण्यास परवानगी मिळाली आणि मित्रांची ती ही ईच्छा पूर्ण करता आले.
*बुलेटिन ऑनलाइन रेडियोवर*
नाशिकच्या गुरुकुल रेडियोच्या शेखर ठाकुर यांना संपर्क करून सदरील बुलेटिनची ऑडियो गुरुकुल रेडियोवर प्रसारण करता येईल काय ? याविषयी विचारणे झाले. त्यांनी लगेच होकार दिला आणि गुरुकुल रेडियो वर संपूर्ण महाराष्ट्रात ही बुलेटिन पोहोचली. या बुलेटिनची नोंद प्रसिध्द शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी दैनिक लोकमतच्या मंथन पुरवणीत " मोबाईल मुलांचा अभ्यासु दोस्त " या त्यांच्या लेखात घेतली हे विशेष
*या बुलेटिन विषयी काही निवडक प्रतिक्रिया*
मला तर फारच उपयोगी आहे आपले बुलेटीन . तुम्हाला धन्यवाद द्यायला माझ्याकडचे शब्द कमी पडतील . माझ्या शाळेच्या गावी कोणाकडेच वर्तमानपत्र येत नाही आणि मला शाळेत जाताना न्यायला जमत नाही , पण इच्छाशक्ती असली ती गोष्ट घडतेच त्या प्रमाणे तुमचे बुलेटीन माझ्या उपयोगी पडले . तुमचे आभार मानण्या पेक्षा तुमच्या ऋणात रहायला आवडेल तुमचे नुसते बुलेटीनच नाही तर त्यातले सर्वच घटक उपयुक्त असतात . उपक्रम तर खुपच छान . अगदी सोपे आणी मुलांना सहज जमणारे nice. खुप खुप धन्यवाद .
स्मिता भंडारे .
रा .जि . प शाळा नवेदरबेली
केंद्र नागाव ता . अलिबाग रायगड
=====*****======******======
खुप प्रभावी आणि लोकप्रिय उपक्रम.
त्यासोबत ऑडिओ आणि गुगली हे सुध्दा पुरक उपक्रम अत्यंत परिपुर्ण.
मी या सदराचा नियमित वाचक आहे.
वेळोवेळी केलेल्या सुधारणाही लक्षवेधी भासतात.
वर्षपुर्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
रामराव जाधव.
तिसगाव ता. पाथर्डी
जि.अहमदनगर.
पिन 414106
मो 7743840604
942290335
=====*****======******======
आपले फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मुळे जगातील घटनांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे दिनविशेष समजते बोधकथा बोध देऊन जातात. वाढदिवस लक्षात येतात. नवीन उपक्रमांची ओळख होते. ऑडीओमुळे शब्दोचार कसे असावे याचे ज्ञान मिळते
थोड्यावेळात जगाची सफर केली जाते. सणांचे महत्व समजते. बुलेटिन शतायुषी होओ.अशी परमेश्वराजवळ प्रार्थना .धन्यवाद!
सुलभा कुलकणीॅ मुंबई.
=====*****======******======
आपले बुलेटीन खूप माहितीपूण॔ आहे.जर मी एखाद्या दिवशी ते वाचले नाही तर काहीतरी महत्वाचे वाचावयाचे राहून गेलेले आहे असे वाटते.आपले बुलेटीन स्थानिक च नाही तर प्रांत आणि देशविदेशातीलही बातम्या आमच्या पयंत पोंचविते.आपल्या बुलेटीन मधिल मोरल स्टोरीज खूप छान असतात.आपले हे काम दखलपातृ आहे.
असेच चालू ठेवा ही विनंती.
- प्रा. गोविंद हंबर्डे नांदेड
=====*****======******======
आपल्या बुलेटिनचा उपयोग मला स्पर्धा परिक्षेसाठी होतो कारण यात बातम्या सोबतच दिनविशेष असतो, याच बरोबर दररोज शाळेत होणाऱ्या परिपाठामधे दिनविशेष,बातम्या,बोधकथा,यांचा समावेश आम्ही दररोज करत असतो,
फ्रेश मॉर्निंग बुलेटेन म्हणजे आमच्यासाठी माहितीचा खजाना आहे,
आपल्या कार्यासाठी मनपूर्वक शुभकामना.
हेमंतकुमार शंकरराव वागरे
ता जि नांदेड
=====*****======******======
*फ्रेश बुलेटीन प्रथम वर्धापन दिन*
आजपर्यत फ्रेश बुलेटीन दूरदर्शन वरूनच पहात होते.
पण रोज सकाळी येणार्या वर्तमान पत्रापूर्वी आपल्या WhatsApp ग्रृपवरून बुलेटिन हजर असते.
आमच्या मुंबईतील सगळ्या साद माणुसकीची ग्रृपची सुरूवात आपल्या फ्रेश बुलेटीन होते
आणि सगळेच ताजेतवाने होतात.
आम्हा शिक्षकांना मुलांकडून परिपाठ करून घेताना फ्रेश बुलेटिनचा आधार वाटतो.
काळानुसार आपल्या फ्रेश बुलेटीनचे बदलते रूप आवश्यक वाटते
हळूहळू मराठी सोबत इंग्रजीचाही समावेश केल्यास माध्यमिकच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतील असे वाटते . आॅॅडिओ बुलेटिनही मस्त वाटत.थोड्यावेळात अचूक योग्य बातम्या समजतात.
फ्रेश बुलेटिनचे हेच वैशिष्ट्य आहे.
फ्रेश बुलेटिनसाठी नासा सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच.
यापुढेही फ्रेश बुलेटीनला तुफान प्रतिसाद लाभो.
स्नेहल आयरे मुंबई
=====*****======******======
फ्रेश मॉर्निंग बुलेटिन हे एक महत्त्वाचे व माहितीपुर्ण सदर आहे.ज्यामुळे सकाळीच महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात कळतात.मला तर पेपर वाचायचं काम पडत नाही.परिपाठासाठी उपयुक्त माहिती जसे दिनविशेष व सुविचार यातुन मिळतो.मी हे सदर माझ्या c.p.s.ग्रुपवर टाकत असतो,ज्याचा फायदा सर्वांना होतो.
हे सदर असेच भरभराटीस येवो अशा ना.सा.येवतीकर सरांना शुभेच्छा..!
----- दिलीप धामणे, (जि.प.शिक्षक) हिंगोली (मराठवाडा)
=====*****======******======
यशस्वी प्रवासाबद्दल मनपूर्वक अभिनंदन!
सद्याचे जीवन हे अतिशय धावपळीचे आहे. प्रत्येक सदस्याला बातम्या किंवा मजकूर वाचण्यास वेळ देणे शक्य होत नाही. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील बंधू - भगिनींना शैक्षणिक गुणवत्तेशी निगडीत पण पोषक बाबींकडे हटकून लक्ष देणे तर अवघडच. आपल्या *फ्रेश मॉर्निग बुलेटिन* च्या माध्यमातून मात्र हे शक्य होत आहे. कमी वेळात, कमी त्रासात मिळणारे हे एक अमृतच आहे. ह्या अमृतरुपी ज्ञानाला असेच यशस्वी वाहून नेण्यासाठी आपल्या समूहाला हार्दिक शुभेच्छा!
कन्हैया परमानंद भांडारकर
मु. दिघोरी, पो. नान्होरी
ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर
=====*****======******======
*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* बाबत उर्वरित अभिप्राय वाचण्यासाठी खालील ब्लॉग ला भेट दया
=========================
http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/fmbuletin.html
=========================
धन्यवाद
No comments:
Post a Comment