वसमत ते तरोडा नाका चे टिकिट
तरोडा नाका ते वसमत चे टिकिट
*गोष्ट एका रूपयाची*
तसे तर एक रूपयाला आज तेवढी किंमत नाही. अगदी 20 - 25 वर्षापूर्वीची जर बाब विचारात घेतली तर लक्षात येईल की, एक रूपया किती महत्वाचे आहे ? त्या काळी 5 पैश्याला सुद्धा वस्तु मिळत होती आणि खिशात एक रूपया आहे म्हणजे खुप बरे वाटायाचे. दिवस सरले काळ बदलला. रुपयाचे अवमूल्यन सुरु झाले. त्या रूपयाला कोणी विचारेनासे झाले. आज भिकारी सुद्धा एक रूपया घेत नाही. अहो बाजारात रूपयला काहीही येत नाही. असे तो बोलतो. घरात मुले ही रूपया घेत नाहीत आणि सरकारने सुध्दा या रुपयांचा आकार खुपच लहान करून टाकले. पूर्वीची चवन्नी किंवा आठ आनेच्या आकारांत एक रूपयाची बंदा केली आहे. एवढं सगळ रूपयाची गोष्ट सांगण्यामागे कारण म्हणजे इकडे जरी एक रूपयाची किंमत कमी झाली असली तरी, एक घटना आज अशी घडली की हाच एक रूपया त्यास मूल्य देऊन गेला.मी नुकतेच वसमत ला जाण्यासाठी तरोडा नाका येथून बस क्रमांक MH 20 L 0336 या राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजे ST बस मध्ये बसलो. वसमत पर्यन्तचे भाडे होते 29 रु. ( आकस्मिक सहायता निधी एक रु.) म्हणजे 30 रूपयाला फक्त एक रूपाया कमी. माझ्या अगोदर एकाने वसमतचे टिकिट घेतले त्यास त्या वाहकाने म्हणजे कंडक्टरने एक रूपया परत दिले नाही. त्यानंतर मी टिकिट घेतलो. एक रूपयाची मागणी केली तेंव्हा सूटे नाहीत उतरताना घ्या. म्हणजे मला ही त्यांनी एक रूपया परत दिले नाही. असे त्या गाडीतील जवळपास 25 - 30 प्रवासी होते. ज्याना त्या कंडक्टरने तिकीटातील उरलेला एक रूपया परत दिला नाही. मला एक रूपया मिळाला नाही त्याचे दुख मला नव्हते पण थेंबे थेंबे तळे साचे या म्हणी नुसार त्यांच्या जवळ जवळपास 25- 30 प्रवाश्यचे तेवढे एक रूपया प्रमाणे पैसे जमा झाले. ज्याप्रकारे सरकार आकस्मिक सहायता निधी म्हणून शासन प्रवाश्याकडून प्रति व्यक्ती एक रूपाया घेत आहे. त्याच पद्धतीने यांचा ही कंडक्टर सहायता निधी चालू आहे की काय ? असे वाटते. विचार करू या दिवसभरात तो कंडक्टर प्रत्येक प्रवाश्यचे एक रूपया प्रवाश्यना परत न करता किती रुपये जमा करीत असेल ?एक रूपया कंडक्टर ला कसा मागावा ? स्वतः च्या स्टेटसचा विचार करून कोणताही प्रवासी त्या कंडक्टरला एक रूपया मागत नाही आणि एखाद्याने एक रूपया मागितले तर त्यास उत्तर मिळते उतरताना घ्या. बस उतरताना एक तर प्रवश्याना घाईत लक्षात राहत नाही किंवा कंडक्टर कडे शेवटपर्यन्त रूपया शिल्लक नसते.मी या एक रूपया बद्दल बोलत नाही. मात्र माणसाची लालसा अश्या छोट्या छोट्या कृतीतुन तयार होते आणि त्याचे मोठे स्वरुप म्हणजे लाच घेणे आणि भ्रष्टाचार करणे.बसमध्ये लिहिलेले असते की बसचे योग्य भाडे देऊन प्रवास करा. वास्तविक पाहता त्या कंडक्टरचे कर्तव्य आहे की टिकिट दिल्यानंतर प्रवाश्यचे उरलेले शिल्लक पैसे परत करणे मग ते एक रूपया असो वा पाच रुपये. प्रवाश्यचा एक रूपया आपण ठेवून घेतो याचा अर्थ असा होतो की आपण काही तरी चोरी केली आहे त्यामुळे मनास शांती किंवा समाधान मिळत नाही. तेच जर प्रवाश्याचे उर्वरित पैसे प्रमाणिकपणे आपण परत केलो तर नक्की आपणास समाधन मिळेल यात शंका नाही. या पध्दतीने सदरील कंडक्टर रोज अगाऊ पैसा कमावितो त्याला त्या एक रूपयाची चटक लागली असे म्हणायला हरकत नाही. तो जर खरोखरच प्रमाणिक असेल तर शिल्लक एक रूपया चॉकलेट च्या स्वरुपात देऊ शकतो. बाहेरच्या दुकानात किंवा काही ठिकाणी रूपए दोन रुपए शिल्लक राहत असल्यास ते चॉकलेट देतात. तसे यांना देता येत नाही का ? प्रवाशी नक्कीच खुश राहतील आणि मनास शांती ही मिळेल. वसमत वरुन सायंकाळी परत नांदेड ला जाण्यासाठी निघालो परत ST ने. गाडी क्रमांक MH 14 BT 1841 या बसने. तरोडा पर्यन्त टिकिट घेतल तर 29 रु. आणि परत या कंडक्टर ने सुध्दा मलाच नाही कोणालाच एक रूपाया परत केला नाही. जर एखाद्या वेळी आपल्या जवळ तिकीटातील एक रूपाया कमी असेल तर आपणास टिकिट मिळणार नाही. कारण यावेळी कंडक्टर हमखास म्हणतो की मी कुठून भरू आणि आपण ही याबाबत कशाला त्याला त्रास म्हणत बरोबर किंवा जस्ट पैसे देऊन टिकिट घेतो.राज्य परिवहन महामंडळ या बाबीवर काही तरी तोडगा काढावा. टिकिट 5 किंवा 10 च्या पूर्ण पटीत ठेवावा. ज्यामुळे वाहकाला शिल्लक पैसे ठेवून घेण्याचे मनात सुध्दा येणार नाही आणि व्यवहार सुरळीत व चांगले होईल. राज्य परिवहन विभाग या एक रूपया आणि दोन रुपयांच्या शिल्लक बाबीचा जरूर विचार करून टिकिटचे स्वरुप बदलेल काय ? राज्याचे परिवहन मंत्री मा. आ. दिवाकर रावते याकडे लक्ष देतील अशी आशा आहे.
ना.सा. येवतीकर
येवती ता. धर्माबादजि. नांदेड
No comments:
Post a Comment