Thursday, 22 June 2017

कविता वीज

⚡⚡ *वीजमरण* ⚡⚡
            - ना. सा. येवतीकर

मृग नक्षत्रा ची सुरुवात
सर्वत्र काळेकुट्ट ढग
काही क्षणात पाऊस पडणार
मोर पिसारा फुलवून नाचणार
गावातील पोरं पाण्यात बागडणार
आई सोबत शेतात गेलेली
लहान पिल्लू काखेत भिजणार
या पावसात हे सर्व घडणार

असे वाटले असताना क्षणात
नको असलेले घडले
आकाशात वीज चमकले
ढगांचा झाला गडगडाट
कुठे तरी वीज पडली
लोकं बोलू लागली
क्षणात एक बातमी आली
राम्याच्या आईवर वीज पडली

काखेतले लेकरु बिलगून
तशीच चिकटुन होती
रडत नव्हती की हसत नव्हती
क्षणात या पावसाने साऱ्या
गावचा आनंद हिरावून नेला
तोच नेहमीचा पाऊस आत्ता
नकोनकोसा वाटू लागला

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

No comments:

Post a Comment

शिक्षा न करता शिस्त कशी घडवावी

शिक्षा न करता शिस्त कशी घडवावी ? " शाळेतील प्रत्येक शिक्षकासमोर उभा असलेला एक गंभीर प्रश्न " शाळा म्हणजे केवळ ज्ञान दे...