युवकांच्या हाती हुंड्याची दोरी
स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर ही हुंडयासारखी सामाजिक समस्या आजही ज्वलंत आणि उग्र स्वरुप धारण केले आहे. लातूर जिल्ह्यातील शीतलच्या बळीने हा प्रश्न समाजापुढे एका वेगळ्या स्वरुपात समोर आले आहे. हुंड्यामुळे कोण कोण त्रस्त होत असतो ? याची जराशी कल्पना यामुळे आली. समाजात आजही हुंडयापायी कोणाचे लग्न थांबणे, नववधुंचा छळ करणे, या सर्व हुंडाबळीच्या घटना आपण डोळ्याने आजही पाहतो आणि वाचन करीत आहोत. समाजातून हुंडा पध्दती समूळ नष्ट करणे म्हणजे समाजातील रुढी आणि परंपरा यांच्याविरुध्द दिलेला एक लढाच नव्हे काय ?
प्रत्यक्षात समाजात काय घडते ? वधू पिता आपल्या मुलींसाठी वर शोधत फिरत असतो. चांगले स्थळ मिळावे यासाठी तो सर्व प्रयत्न करतो. प्रत्येक वधू पित्याची ईच्छा असते की आपली मुलगी ज्या घरी पाठवित आहोत ते घर सुख समृद्धिचे असावे, तिला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन सोयरीक जुळविली जाते. मग त्यासाठी हवी ती किंमत मोजण्याची तयारी वधूपिता दर्शवितो. याच गोष्टीचा फायदा वरपक्षाकडील मंडळी घेतात. त्यातल्या त्यात मुलगा सरकारी नोकरी किंवा चांगल्या हुद्यावर आणि पगारीवर असेल तर मग मनाला वाटेल ती रक्कम मागितली जाते. सध्या डॉक्टर, इंजिनियर, पोलिस आणि शिक्षक नवरदेवाचे भाव गगनाला भिडले आहेत.
लग्नाच्या प्रक्रियेत सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नवरदेव. त्याने जर मनात आणले तर ही हुंडा पध्दत समूळ नष्ट होऊ शकते. लग्न जुळते वेळी ही नवरदेव मंडळी याविषयी ब्र ही काढत नाहीत त्यामुळे ही पध्दत फोफावत चालली आहे. सध्या जे युवक लग्न करण्यासाठी बोहल्यावर चढणार आहेत त्यांनी हुंडा न घेता साध्या पध्दतीने लग्न करून घेतल्यास त्याची नोंद समाज नक्की घेईल. प्रत्येक नवरदेवाने याविषयी एक वेळ तरी आत्मचिंतन करावे. आपल्या एवढ्या शिक्षणाचा काही अर्थ राहणार नाही असे वाटते. हुंडा न घेतल्याने समाजात जे मान सन्मान आणि स्वतः ला जो मानसिक समाधान मिळते ते किती ही पैसा देऊन मिळविता येत नाही, हे सत्य आहे. वधूने किंवा वधूच्या पित्याने हुंडा घेणाऱ्या नवरदेवाला मुलगी देणार नाही अशी शपथ घेऊन काही फायदा होईल असे वाटत नाही त्या ऐवजी नवरदेव किंवा त्यांच्या आई-वडिलांनी हुंडा घेणार नाही ही शपथ जास्त फलदायी ठरेल असे वाटते. जे युवक असे लग्न करतील अश्या कुटुंबाचे समाजाने नागरी सत्कार करावा म्हणजे हुंडा न घेता लग्न करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि जे अनपेक्षित घटना घडत आहेत ते घडणार नाहीत. हुंडा ही आपणच पेरलेले बी आहे तर त्याचे उच्चाटन आपणालाच करावे लागेल, एवढे मात्र खरे आहे.

नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment