Monday 26 April 2021

26/04/2021 bharati sawant

साहित्य विश्वात मदतीचा हात देणारे नासा येवतीकर
लॉकडाऊनच्या काळात घरात बसल्या बसल्या काय करावे ? या विचारात असताना साहित्य सेवक समुहात मी सहभागी झाले आणि याठिकाणी स्तंभलेखक, कवी, कथाकार, उत्तम निवेदक आणि प्राथमिक शिक्षक नासा येवतीकर यांचा परिचय झाला. दुसऱ्यांच्या लेखणीला बळ देण्यासाठी ते नेहमीच कसोशीने प्रयत्न करतात. लेखात काही चुका किंवा दुरुस्त्या असतील तर ते तसे काम करून देतात आणि वृत्तपत्रात देखील प्रसिद्धीसाठी पाठवून देतात. एवढेच नाही तर ते प्रत्येकाला वर्तमानपत्राच्या ई-मेल्स, फोन नंबर देतातच आणि कोणाचे लेख किंवा कविता वृत्तपत्रात छापून आले असेल तर त्याचे कात्रण देखील पाठवतात. लॉकडाऊनच्या काळात गेल्या वर्षी त्यांनी साहित्यसेवक  समूह  स्थापन केला आणि उपक्रमांना सुरुवात केली. रोज एक विषय देऊन लेख लिहिण्यास प्रेरित केले. त्यामुळे माझे जवळ जवळ ४२ लेख लिहून झाले. त्यानंतर त्याचेही ई बुक प्रकाशित केले. कोणाला ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळा करावयाचा असेल तर उत्तम सूत्रसंचालन करण्यात नासा सरांचा एक नंबर, खूप सुंदर नियोजन करून ऑनलाईन प्रकाशन सोहळा पूर्ण करतात. आतापर्यंत आमच्या समुहात अनेकांच्या ई बुकचे ऑनलाईन प्रकाशन झाले आहे. समूहातील बरेच मंडळी नवोदित आहेत पण रोज एक लेख लिहून आपल्या लेखणीत समृद्धता आणले आहेत. आज समूहातील कित्येकजणांचे लेख महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रात प्रकाशित होत आहेत, त्यामागे नासा सरांची प्रेरणा आणि मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे. 
     दुसऱ्यांना लिहिण्याचे बळ देताना, त्यांची ही लेखणी सातत्याने झरझरत असते. रोज एक तरी लेख आणि कविता लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे. त्यातूनच त्यांचे लिखाण आणि ई-बुक  यांचा अमर्याद साठा झाला आहे. आजमितीला त्यांच्या नावावर एकूण 10 पुस्तके प्रकाशित झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक वृत्तपत्रात त्यांचे लेख प्रकाशित झाले आहे. ऑनलाईन आणि सोशल मीडियाचा चाणाक्षपणे वापर करत असतात. त्यांचे सर्व साहित्य वाचकांना अगदी मोफतपणे वाचन वाचण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतो. लेखकांच्या लेखणीला प्रेरणा मिळण्यासाठी त्यांनी हल्लीच 'प्रेरणा ई बुक' सुरू केले आहे. त्यालाही भरघोस यश मिळत आहे. सामाजिक कार्य करत असताना ते स्वतः शिक्षक आहेत म्हणून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणुन नेहमीच प्रयत्नशील असतात. विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना क्रियाशील ठेवतात. शाळेतील फलकावर निरनिराळ्या साहित्यिकांनी रचलेल्या बालकविता रोज एक कविता उपक्रमात लिहून मुलांच्या प्रतिभाशक्तीला प्रेरणा देत असतात. त्यातुनच कवी, लेखक उदयास येण्याचे स्वप्न ते पहातात. विद्यार्थ्यांना घडवत असतानाच  
समूहातील साहित्यिक सहकाऱ्यांना नेहमीच उत्सफुर्त करतात. सर्वांनी काही ना काही लिहावे म्हणून निरनिराळे उपक्रम समुहात नेहमीच राबवत असतात. त्यांच्या लेखणीला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांचा त्यांनी कधी ही गर्व केले नाहीत. अडीअडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. 
नासा येवतीकर सरांचा आज 26 एप्रिल रोजी 45 वा वाढदिवस आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

सौ. भारती सावंत, मुंबई
9653445835

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...