Monday, 30 November 2015


वर्धिष्णू दिवाळी 2015 अंकात प्रकाशित 
 कथा - मुख्यालय 
शिक्षकाना मुख्यालय राहण्याची सक्ती करण्यात येत असल्याच्या बातमीनुसार एका शिक्षकाची मनोरंजनात्मक कथा 







वर्धिष्णू दिवाळी 2015 अंकात प्रकाशित 
कथा - साहस




** . .  मुझे पीने का शौक नहीँ . . **
केरळ पाठोपाठ बिहार राज्यात दारूबंदी होत आहे आणि महाराष्ट्रात मात्र तसे होऊ शकत नाही असे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळे दारूप्रेमी लोकांना हायसे वाटले असेल यात शंका नाही. आज शासनाला या दारू विक्री वर कोट्यावधी रूपयाचा महसूल मिळतो ज्यावर सरकार आपला कार्यभार व्यवस्थित सांभाळत आहे. सरकार समोर आज भरपूर प्रश्न तोंड वासुन उभे आहेत आणि सर्व समस्याची सोडवणूक अर्थातच पैश्यानेच करावी लागते. सगळ्या प्रकारची सोंग करता येतात मात्र पैश्याचे सोंग करता येत नाही. वास्तविक पाहता बंदी करुच नये. कोणत्याही गोष्टीवर बंदी टाकली की जनता त्याच गोष्टी वापरण्यावर जास्त भर टाकतात. आपल्या लोकांची एक वाईट सवय आहे जेथे मनाई किंवा बंदी असते नेमके त्याच ठिकाणी घाई करतात. गेल्या दोन वर्षापासून गुटखा विक्री वर बंदी टाकण्यात आली पण खरोखरच गुटखा विक्री बंद आहे का ? तर नाही उलट फार मोठ्या प्रमाणावर या गुटख्याची तस्करी चालू आहे. या बंदीमुळे काही लोकांची चांदी होत आहे. याचा त्रास मात्र सामान्य नागरिक आणि विक्री करणाऱ्या लोकांना होतो. असंच काही या दारूबंदी वर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहा एक वर्षापूर्वी  महाराष्ट्र लगतच्या आंध्रप्रदेश सरकारने दारूवर बंदी आणली होती तेव्हा सीमावर्ती भागात दारूचा महापूर पसरला होता. जागोजागी परमीट रूम उघडण्यात आले होते. बऱ्याच लोकांची चांदी झाली या बंदीमुळे मात्र दारू पिणे आवश्यक असलेल्या लोकांचे  खूपच हाल झाले. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते. दारू बंदी करण्याऐवजी त्यांची विक्री आणि दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत काही नियमावली तयार करून त्यांची अंमलबजावणी केल्यास याचे चांगले परिणाम बघायला मिळतील
जसे की दारू विक्री च्या वेळेचे तंतोतंत पालन करण्याकडे लक्ष ठेवावे. दारू विक्री ज्या दिवशी बंद असते त्यादिवशी विशेष पथक ठेवण्यात यावे. सर्व प्रकारच्या दारूच्या किमतींचे फलक दुकानात  दर्शनी भागावर लावण्यात यावे आणि ज्या व्यक्ती जवळ दारू पिण्याचा परवाना आहे त्या व्यक्तीलाच दारू विक्री करण्यात यावी. परवाना नसलेल्या व्यक्तीला दारू विक्री होत असेल तर त्या दुकानांस तत्काळ सील ठोकण्यात यावे. प्रत्येक नागरिक ज्यांना दारू पिण्याची हौस आहे त्यांनी परवाना घेणे बंधनकारक केल्यास या दारू चे सध्या जे दुष्परिणाम दिसत आहेत ते नक्कीच कमी होतील. आजची परिस्थिती अशी आहे की दारू विक्री वर कोणाचे बंधन नाही आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीवर सुध्दा नाही.  दारू पिऊन रस्त्यावर लोळणाऱ्या व्यक्तींना एकदा तुरुंगवास भोगायला लावले की अश्या लोकांची संख्या आपोआप कमी होते. दारू पिऊन घरात गोंधळ घालणे, कुटुंबातील सदस्याना मारझोड करणे, रस्त्याने मोठ्याने ओरडत फिरणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी गांभीर्यपूर्वक घेतल्यास या दारूचा त्रास नक्कीच कमी होतो. शासनाने दारूविक्री बंदी करण्यापेक्षा यावर कडक अंमलबजावणी केल्यास जनता सुखात राहू शकेल अन्यथा दारू बंदी करून ही त्याचा काही फायदा होणार नाही.
मुझे पीने का शौक नहीँ, पिता हूँ गम भूलाने को चित्रपटातील या गीताप्रमाणे बऱ्याच लोकांची अवस्था असते. दारू पिल्यामुळे थोडीशी झिंग येते आणि काही काळासाठी तो वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो. यामूळे सर्व दुःख, वेदना आणि त्रास विस्मृतीत जाते मात्र कायमचे नष्ट होत नाही. जेंव्हा नशा संपते आणि माणूस पूर्व पदावर येतो त्यावेळी पुन्हा तोच त्रास जाणवतो आणि त्यासाठी परत दारूची मदत घेतली जाते. काही लोक आनंदात दारू पितात. असे करता करता दारू कधी त्याच्या घरात प्रवेश केला हे त्याला देखील समजत नाही. काही लोक डॉक्टर लोकांचा हवाला देऊन म्हणतात की  दारू शरीरासाठी खूप आवश्यक घटक आहे. परंतु काही मर्यादेत कदाचित ते शरीरासाठी आवश्यक आणि चांगला घटक असेल ही. आपण त्याचा योग्य ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे. आज त्याचे दुष्परिणाम जास्त झाले आहेत. जयंती आणि पुण्यतिथी निमित्त जे रॅली काढली जाते त्यात नाचणारे बहुतांश जण दारुने झिंगलेले असतात. त्यांना त्या कार्यक्रमाशी काही देणे-घेणे नसते. यामूळे कित्येक लोकांच्या रोजच्या राहणीमानावर परिणाम पडतो, याचे जरासुध्दा भान ठेवत नाहीत.
राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या एकच प्याला या नाटकांतून सुधाकर चे चित्र समाजासमोर खूपच चांगल्या पध्दतीने मांडले होते त्याचा किती परिणाम झाला हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. दारूमुळे आज कित्येक संसार उघड्यावर आलेली आहेत. काही लोकांना दारू पिऊन गाडी चालविण्याची सवय आहे. मात्र दारू पिऊन गाडी चालविणे अत्यंत धोकादायक आहे. रोज सरासरी दोन तरी अपघात दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होतात आणि चार - पाच जिवांना हकनाक मुकावे लागते. या अपघातात मरण पावलेल्याचे कुटुंब वाऱ्यावर पडते. त्याच्या कुटुंबातील सदस्याचे खूपच हाल होतात. संपूर्ण कुटुंबच भेदरलेले आणि विस्कळीत असते.
काल शाळेत का आला नाहीस ? या प्रश्नाचे उत्तर कधी कधी शाळेतील चिमुकल्या मुलांच्या तोंडून ऐकण्यात आलं की " काल माझ्या बाबांनी माझ्या आईला खूप मारलं आणि शिव्या दिलं म्हणून माझ्या आईसोबत मी गावी गेलो होतो. " तेवढ्यात बाजूची पोरं जोरात ओरडून सांगतात " सर याचे बाबा रोज दारू पिऊन घरात भांडण करतात आणि ह्याच्या आई सोबत ह्याला सुध्दा मारतात " तेंव्हा त्या मुलाचा चेहरा उदास आणि काहीसा गडबडलेल्या अवस्थेत असतो. शाळेतून त्याच्यावर खूप काही चांगले संस्कार होत असतील, तो शाळेत कदाचित हुशार ही असेल परंतु कुटुंबाची वाताहत त्याला त्या असंस्कृत वातावरणात परफटत घेऊन जाते. अश्या प्रकारांवर कुठे तरी आळा बसायला हवे
दारूचे दुष्परिणाम सांगून लोकांवर काही फरक पडत नाही. शंभरातून एखादा व्यक्तीच हे समजून घेवू शकतो. बाकीच्या लोकांना कायद्याच्या भाषेतूनच सांगावे लागते. देशात शांतता व सुव्यवस्था रहावी यांसाठी कायद्याची निर्मीती आहे म्हणून त्याचा योग्य वापर होणे हे पुढील काळाची खरी गरज आहे. आज समाजात एक चांगला संदेश पाठविले तर त्याचे चित्रे पुढील काळात नक्कीच चांगले पहायला मिळेल. तेंव्हा आपण एक जागरूक नागरिक असाल तर याविषयी नक्की लढा उभारू या.
                            -  नागोराव सा. येवतीकर
                                मु. येवती ता. धर्माबाद
                                9423625769

Sunday, 29 November 2015

सुप्रभात....
फ...फजीतीचा....😆😆😆
     विचार मंथनच्या या सदरात ...आपली झालेली फजीती किंवा जीवनात वावरताना आपणास एखादा दुसऱ्याच्य झालेल्या फजीतीचा कीस्सा..तसेच एैकीव फजीतीचे किस्से ऑडीओ किंवा..लीखीत स्वरुपात पाठवायचे आहे..ह्या कार्यक्रमाचा उद्देश फक्त निखळ हस्याचा आनंद लुटणे हा असेल..यातील बाबी विनोद म्हणुनचं घ्याव्यात तसेच कोणीही इतरांच्या भावना दुखावतील असे कोणतेही क्रृत्य करु नये..तर
व्हा तयार...हसण्यासाठी व हसवण्यासाठी...

आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी 10AM ते 7 PM...
=======================================================
विचारमंथन: २९/११/२०१५
© जागृती निखारे.
विषय: फ-:फजिती
          तर सांगायची गोष्ट अशी की, फजिती ची गंमत सांगायची कशी? मोठ्ठा गहन प्रश्न ;हसूं कसं करून घ्यायचं हो सगळ्यांसमोर! बरें असो. हंसू द्या सार्याना ,दिवस आनंदी  जाउ द्या.
    तर सांगायची गंमत अशी , गोष्ट तशी छोटी गंमत मात्र मोठी! मी नवीन नवीन गाणे शिकले.आमच्या महिला विकास मंडळात भावगीत स्पर्धा होत असतं.(आमचे हे मंडळ म्हणजे  पु.लं.चे.अतिविशाल महिलामंडळ) .तर मी पण मैत्रिणींच्या आग्रहाखातर स्पर्धेत भाग घेतला.मंडळातर्फे छानपैकी रोज प्रँक्टीस व्हायची. छान बसले माझे भावगीत.शब्द होते: दूर कुठे चंदनाचे बन जळते..... तुला कळते रे मला कळते...दू..र.
     मग काय आला ना स्पर्धेचा दिवस, जमली सारी थोर मंडळी, परिक्षक ! १०० महिलांनी हॉल गच्च भरला होता.एवढ्या सगळ्या महिलांसमोर गाणे😳.बापरे! १ नंबर झाला , असे करता करता माझा नंबर आला .गाणे सुरू झाले ,वा! सुरही मस्त लागला होता. दोन कडवी झाली, तिसरे कडवे आठवेना: मागे मैत्रिण बसली होती.म्युझिक चालू असतांना मान मागे करून तिला पुढचे कडवे विचारले , तिने पहिल्या शब्दाचा क्लु दिला.मग गाणे पुढे सरकले.ईतकी गर्दी आणि माझी गर्दीसमोर गायची पहिली वेळ! अशी फजिती झाली.
      पण आता मॉबची भिती गेली मनातून!
======================================================

विचारमंथन: फ- फजिती
©जागृती निखारे.
        वर्षापूर्वीची गोष्ट! माझ्या धाकट्या मामाच्या मुलाचे लग्न होते कोपरगावला.लग्न सकाळी लावले.जेवायला वेळ होता.माझ्या ताईचे  नातेवाईक कोपरगावला राहतात, त्यांना भेटून यावे असे आमचे ठरले.मी, ताईआणि आमची मावस बहिण अशा तिघीही निघालो.सभागृहापासून कोपरगाव जाण्यास  १५/२०मिनिटे लागतात असे कळले.रस्ता क्रॉस केला जी रिक्षा दिसली, तिला थांबवून पत्ता दिला.रिक्षेत बसलो रिक्षा सुरू झाली. १५/२० मिनिटे उलटली तरी आमचा पत्ता मिळेना.आम्ही बहिणी हंसत , खेळत रस्ता पाहत पाहत मार्गक्रमण करत होतो.तेवढ्यात मी ताईला म्हटले ,अग ताई , कोपरगांव अगदी प्रति शिर्डीसारखेच दिसतेय. मग द्वारकामाईकडे लक्ष गेले.रिक्षावाला म्हणाला, तुम्ही शिर्डीलाच आलात ताई! अरे बाबा आम्हाला कोपरगाव जायचे आहे.मग तो म्ह्णाला तुम्ही उलट्या दिशेचा रिक्षा पकडला.आम्ही बाहेरूनच साईबाबांचे दर्शन घेतले तोच ऑटो रिक्षा घेऊन निघालो.आणि कोपरगांवला त्याने बरोबर पत्त्याजवळ सोडले.पण  वाट चुकवली पुज्य साईंनी ,आम्हाला दर्शन देण्यासाठी! उलट्या वाटेची रिक्षा पकडल्यामुळे फजिती झाली खरी पण त्यामुळे साईदर्शन झाले आणि शिर्डीचे चवदार पेरूही खायला मिळाले.आणि त्यातून निर्माण झालेले हास्यविनोद मन प्रफुल्लीत करून गेले.काल बरोबर वर्ष झाले.
 अहो होऊ द्या फजिती, त्यातूनच फुलू द्या हास्यदरबार!
चुकलेल्या वाटा आणि झालेली फजिती जीवनात आनंद यात्रा आणतात.
=======================================================
मी नुकताच 10 वी पास होऊन कॉलेजला जायला लागलो होतो..मला चीत्रपट पाहायची खुप आवड होती..त्या वेळी आमच्या गावी एकच चीत्रपटगृह होतं..त्यतही सीटींग आरेज्मेंट नंबरने राहात नसे..तीकीटावर सीटचे नंबर रहायचे नाहीत..
कोणीही कोठेही बसायचे..मी एकटाच चीत्रपट पाहाण्यास गेलेला होतो..चीत्रपट सुरु झालेला होता..लाइट्स बंद झालेल्य होत्या..चीत्रपटाच्या अंधुक प्रकाशात चाचपडत मी सीट शोधत होतो..गेटकीपर कुठल्यातरी कामात असावा अन्यथा ते बॅटरी घेऊन सीट दाखवण्यास येत असे..एक रीकामी सीट दीसली..अंधुक प्रकाशात हे ही दीसलं की बाजुच्या सीटवर काही मुली बसलेल्या आहेत...मन आनंदलं..मी हळुवार पणे रीकाम्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केला..थोड्या स्टाइलमधेच...आणी मी दानकन आपटलो..कारण खुर्चीला खालचा पृष्टभाग नव्हताच..तुटला होता..फक्त खुर्चीचे दोन हात व मागचा पाठ टेकवण्याचाच भाग होता
मी आपटलेला पाहुन मुलींचा बाजुलाच बसलेला हसायला लागला..मला समजलं की स्टाइल मारण्याच्या नादात माझा पोपट झाला होता..मी सरळ उठलो व मागे न पाहाता सरळ चीत्रपटगृहाच्या बाहेर पडलो..नंतर कॉलेजमधे पण ही गोष्ट समजली..कारण त्या मुली माझ्याच कॉलेजच्या होत्या..त्यातील काही मुली आजही माझ्या मीत्र आहेत..आम्ही एकत्र जमल्यानंतर ह्या गोष्टी आठऊन खुप हसतो..
अशी माझी फ..फजीती(चा) झाली होती...

 उत्कर्ष देवनीकर
=======================================================
एकदा कुत्र्यात अनं गाढवात पैंज लागते कि जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावाच्या पलीकडच्या सिंहासनावर बसेन तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले , कुत्र्याला वाटले मिच जिंकेन कारण गाढवापेक्षा मी जोरात धाऊ शकतो ,
पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते.
शर्यत सुरु झाली.
कुत्रा जोरात धाऊ लागला; पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली. असेच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , प्रत्येक सिग्नल वर घडत राहिले.
कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्याच्या आधीच पोहचले होते तिकडे.
अन त्यांनी शर्यत जिंकून ते 'राजा' झाले होते.
अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि....

 "जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते."

तात्पर्य काय ???
तर सामाजिक,धार्मिक आणि उद्योगधंदा यांच्या  बाबतीत....

१.आपल्या माणसांना विश्वासात घ्या.
२.आपल्या माणसांना पुढे जाण्यास सहकार्य करा,
    त्याना प्रोत्साहन द्या.
३.नाहीतर उद्या बाहेरची गाढ़व आपल्यावर राज्य
    करतील.
४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा ....🙏🙏
पतीचे श्लोक : नक्की वाचा..अफलातून आहे
=======================================================
मना सज्जना केर वारे करावे
पहाटे भल्या रोज पाणी भरावे
धुवावी अशी घासघासून लादी
पसारा नको आवरा नीट गादी

मना सज्जना तोच राणी उठावी
तिची त्याक्षणी जीभ वेगे सुटावी
चहा पाजुनी थंड डोके करावे
पती चांगला नाव ऐसे मिळावे

त्वरेने पुन्हा भात पोळी करावी
विळी घेउनी योग्य भाजी चिरावी
डबा रोजचा एक जैसा नसावा
शिरा न्याहरीला जरूरी असावा

प्रभाते मनी बायकोला भजावे
तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे
पगारास हाती तिच्या सोपवावे
कमावून जास्ती तिला तोषवावे

तिचे पाय रात्री जरासे चुरावे
माका तेल ते चोळुनी जे मुरावे
निजायास गादी उशी शाल द्यावी
अशी चाकरी नित्य संपन्न व्हावी

नको रे मना बोल ते बायकोचे
असे की जणू बाण छातीत टोचे
तिच्या ह्या जिव्हा कोण घाले लगाम
अश्या शूरवीरा हजारो सलाम

अशी बायको ही कशी आवरावी
तिची भ्रष्ट बुध्दी कशी सावरावी
कुणी थोर तो काय सांगेल युक्ती
तया पावलांची शिरी लावु माती

कसा जीवघेणा अघोरीच त्रास
सुखाचा ठरे त्यापरी स्वर्गवास
तुम्हा सांगतो नीट ध्यानी धरावे
मरावे परी लग्न कधी न  करावे

- जय जय पतीवीर Samarth.
संकलन - नासा येवतीकर
=======================================================
मित्रांनो,प्रसंग माझ्या B.sc. शिकत असतानाचा आहे,जेव्हा आमच्या क्लास मध्ये आम्ही केवळ 5 students ते ही सर्व मुलेच
....आणि सगळेच्या सगळे घट्ट मित्र होतो,एवढे की बाहेरगावी राहाणाऱ्या दोन मित्रांच्या रूमवर आम्ही क्लास पूर्वी अन् क्लास नंतर
दिवसच नाही तर रात्र रात्र सुद्धा असायचो.... आमच्यापैकी एक हा संस्थाचालक चा मुलगा होता अन् घरमालक हा त्या
शाळेचे क्लर्क होते त्यामुळे रूम सहज मिळाल्या अन् आमची guarranty ही स्वतः घरमालकाला च  घ्यावी लागली ...
तसे आम्ही सुस्वभावी,अभ्यासू मुले होतोत पण विनोदाचि एकही संधी कोणीही गमावत नसे,मग तेंव्हा वेळेचे ही भान नसे,
           असाच एक प्रसंग,रात्री अंदाजे 9 च्या आसपासची वेळ होती,अभ्यासुन गुणवाण मंडळी सर्व अभ्यास करीत असताना
 अचानक लाइट गेली अन् सर्वत्र अंधार झाला... शांत स्वभावाचा खराखूरा भाडेकरू शिवशंकर आतल्या रूम(3 room) मध्ये गेला,
अन त्याची गम्मत घ्यावी म्हणून मी त्याच्या मागे गेलो,पण अंधारात काही दिसेना,मी त्याला शोधत होतो,हे त्याच्या लक्षात
आले होते जणू म्हणून तो दबा धरून बसला,काहीतरी हाताला लागले की त्याला मारायचे अन् बाहेरच्या रूम मध्ये धावत येऊन
आनंद घ्यायचा असा पोरखेळ सुरू होता,हे पाहून माझ्या इतर मित्रांनी ही त्यात सहभाग घेतला अन् जो तो आत जायचा जो
हाताला लागेल त्याला मारून बाहेर हसत सुटू लागला ....पण शिवशंकर कोणाला दिसयचा नाही अंधारात ....
 एव्हाना आमचा गोंधळ संपूर्ण गल्लीत ऐकू येऊ लागला असेन,पण याचे आमच्या पैकी नक्कीच कोणालाही भान
नव्हतेच मुळी ...आम्ही आमच्यात रममान झालेले होतो.
मग मी एक शक्कल लढवली त्याला पकडण्याची,एक घोंगडी हातात घेऊन दरवाज्यास वाट पाहत स्तब्ध उभा होतो,
थोडावेळ कोणीही हालचाल केली नसल्यामुळे खेळ संम्पला या विचाराने  शिव बाहेर आला अन् लागलीच मी ती
घोंगडी त्याच्या अंगावर टाकली अन् आनंदाने त्याला धरून ओरडत होतो "पकडलो,पकडलो " सर्व जन एकाच
बाहेरच्या रूम मध्ये जमा होऊन त्याच्या कडे धावत होती,पण एकाएकी सर्वजण शांत झाली,काय झाले यांची
मला काही कल्पना नव्हती...मी एकटाच ओरडत होतो,बिचारा शिव घोंगडीत होता,माझ्या तोंडावर अचानक
प्रकाश पडत असल्याचे मला जाणवले,नीट पाहिले तर खिडकी उघडून घरमालक जाधव काका कंदील हातात घेऊन
जणू "गदर" मधिल सन्नी देओल सारखे माझ्याकडे पाहत होते,मी आसपास एकटा नाही म्हणून नजर फिरवली तर
पाहतो तर काय सर्वजण कोपरा धरून बसलेले ....अन् मग मी ही घोंगडी काढत बाजूला झालो शिव सुद्धा sarakalaa
मग तेथून.... jadhaav काकांनी ही काहीही न बोलता तेथून बाजूलाच लागून असलेल्या स्वग्रुही परतले ......
ते निघून जाताच शिवशंकर कडे असलेला आता पर्यंतचा रोख माझ्यावर परतला ...तेवढ्यात लाइट आली अन् सबंध रात्र
म ग घडलेल्या प्रसंगाची पुन्हा punha चर्चा रंगली अन् माझी गम्मत कशी झाली हे सांगून रात्रभर हशा पिकला .....
त्यनंतर कित्येक दिवस घोंगडी, कंदील अन् "पकडलो,पकडलो " यांचीच रूमवर चर्चा होती ...
           अशा गमती,फजीती,मजा अन् आनंदाचे क्षण असे कित्येक प्रसंग माझ्या मित्रांच्या सहवासात आले,आज
आम्ही सर्वजण वेगवेगळया क्षेत्रात settled आहोत,आजही सर्व प्रसंग लहान सहान गोष्टी जशाच्या तशा आठवतो आणि
आनंद lutato.... आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने मला माझ्याशी घडलेला एक विनोदी प्रसंग share करण्याची
संधी साहित्य मंथन ने दिली त्याबद्दल आभार,हा अनुभव share करून आपल्या चेहऱ्यावर थोडसं  का होईना
हसू आणता यावे,एवढाच काय तो आग्रह....
     साहित्य मंथन अंतर्गत विचार मंथन स्पर्धेसाठी "फ ....फजीतीचा " साठी मी ------
संदीप धोंडगे पाटील,नांदेड.

( पुन्हा एकदा माझ्या मित्रांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी त्यांच्या ग्रूप मध्ये ही पोस्ट करू का,
त्याना ही आनंद पुन्हा  मिळेल )
=======================================================

|| कभी कभी ||
=========
कभी कभी हसीं गुन्हा
करने को जी चाहता है--
रूबरू हो जावु उनसे
के मरने को जी चाहता है-!!

सिले सिले होट मगर
कुछ कहने को जी चाहता है--
आँखों आंको में बतलादु
के बहने को जी चाहता है--!!

राह अंजानी सही
पहचानने को जी चाहता है;-
हमसफ़र बन जाओ अगर
साथ चलने को जी चाहता है--!!

हर घडी हर लमहा
इंतज़ार करने को जी चाहता है--
वोह बेखबर ही सही
के प्यार करने को जी चाहता है--!!
******सुनिल पवार-----/

=======================================================
प्रसंग साधा पण
क्षण फजितीचा!
जानेवारी 1970 ची घटणा आहे. त्यावेळी मला इंदापुर तालुक्यात निमगाव-केतकी येथे नोकरीला लागुन  आडीच महिणे झाले होते.
त्यादिवशी वडील आजारी असल्याची तार आली होती. व घाईने मी गावी जाण्यास निघालो होतो व बऱ्याच ठिकाणी गाडी बदलावी लागत होती. इंदापुरहुन टेंभुर्णीला आल्यावर करमाळा गाडीने करमाळा येथे पोचलो त्याचवेळी  करमळा ते "अनगर" असा बोर्ड असलेली गाडी निघु लागली होती व मी गाडी थांबवून आंत कंडक्टर शेजारी बसलो व गाडी फाकटा बाहेर पडतांनाच एक अहमदनगरचे तिकीट द्या अशी मागणी केली. त्या बरोबर कंडक्टरने बेल वाजवुन गाडी थांबवली व मला उतरण्याचा इशारा केला. मी मात्र चकीत झालो. त्याला विनंती केली कीं मला अहमदनगरहुन पुढे लवकर जायचे आहे व माझे जाणे फार जरुर आहे आणि जागा असुन तुम्ही माझी अडवणुक करत आहात. मी उतरणार नाही उलट तुमच्या विरुद्ध तक्रार करीन.
प्रसंग जरा गंभीर बनत होता. म्हणून एक सुज्ञ माणसाने मला समजावले तुम्ही या भागात नवीन दिसता त्यामुळे तुमचा गैरसमज होतोय ही गाडी अहमदनगरला जाणारी नसुन "अनगर"ला जातेय जे या भागातले एक मोठे गांव आहे.
माझी चुक माझ्या लक्षात आली आणि  कंडक्टरला "साॅरी" बोलुन खाली उतरलो.
वडील अजारी असल्याने मनस्थिती बिघडलेली असतांना हा प्रखार घडला आणि "फजीती" झाली.

रामराव जाधव.
=======================================================
एकदा की नाही 🚶
पाटलाच्या बोटात💍 आंगठी चमकत होती ।

परंतु 💎खडा चमकतच न्हवता मी विचारलं
 🚶पाटिल लगिन ठरलंकि काय ।

🚶पाटिल म्हनाले नाय रे मर्दा ।

मी ईचारलं मग ही💍 आंगठी कसलि रे ।

🚶पाटिल म्हनाले २३०९० रूपयेची 💍आंगठी हाय ती।

मग मी विचारलं 💎खडा असा कारे ।

🚶पाटिल म्हनाले 💍आंगठी ९० रुपयाची हाय।

आणि त्यातला 💎खडा २३००० रुपयाचा हाय।

मी इचारलं कस काय रं।

 🚶तो म्हणाला मला मुत खडा झाला होता तो अॉफरेशन करुन बाहेर काढला त्याचा खर्च २३०००, रुपये आला ।

आता सांग एवढा म्हागाचा 💎खडा टाकून द्यायचा कारे।

 म्हनुन 💍आंगटी ९०,रूपयाची बनवली आणि तो खडा त्यात बशीवला ।
हाय किनाय डोकं😁।

ह्या 🚶पाटलाच ।


😍😄😃😀☺😜😝😛😜😜😜😜😜😜😜😝😛

=======================================================

फ :- फजितीचा

माझ्या जीवनातील अनुभव सांगतो शालेय जीवनात इयत्ता सातवी मध्ये असताना आमच्या शाळेत स्नेह संमेलन आयोजित केले होते.
आमच्या वर्ग शिक्षकांनी संमेलनासाठी एक "नाटक "बसविले होते नाटकाचे नाव " सुर्याला आले पडसे " आणि मला भुमिका मिळाली नारदमुनीची 😂 विशेष सांगायचे म्हणजे 26 जानेवारी महिन्यात थंडीचा दिवस आणि हे मुनी महाराज फक्त पंच नेसलेले रात्रीचा समय होता थंडीचा कडाका वाढलेला सुर्य सोबत असुन ही थंडी आवरत नव्हती नाटकाला सुरूवात झाली आधीच थंडीमुळे सर्व अंग कापत होते आणि समोर प्रेक्षक पाहून जास्तच हलायला सुरूवात झाली मग काय जे पाठ डायलॉग विसरून मनाचे सुरू झाले..
पण त्यामुळे समोरच्यांना काय म्हणायचे कळत नव्हते.
थंडीमुळे दात कुडकुडत होते.
आणि फ:- फजितीला सुरूवात झाली लोक हसत होते काही कुतूहलाने हसत होते एवढ्या थंडीत नारद उघडा यालाच पडसे येणार शेवटी तेच "नारायण नारायण "
😂😂😂😂😂😂

गजानन पवार 

हसा आणि हसवा



** . .  हसा आणि हसवा . . **

माणसाचे जीवन निरोगी राखायचे असेल तर जीवनात हास्याला मोलाचे स्थान आहे. गंभीर चेहऱ्याचा आणि कधीच न हसणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात चांगली व्यक्ती सुध्दा मानसिकरित्या आजारी पडते. तर विनोदी हसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक आजार असलेल्या व्यक्तीला सुध्दा थोडा वेळ का होईना बरे वाटते. राजेश खन्ना अभिनीत आनंद चित्रपट पाहिल्यावर असे वाटते की, खरोखरच आपल्या जीवनात हास्य राहिले नसते तर आपण जास्त काळ जिवंत राहू शकलो नसतो.  हसण्यामुळे मनावरचा ताण क्षणभर नाहीसा होतो आणि मनाला, मेंदूला ताजेतवाने वाटते अन् मोठ्या जोमाने हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेता येते.
कोणतेही काम आत्मिक आनंदाने केले नाही तर त्या केलेल्या कामात काही रुची, चव राहत नाही. मग ते स्वयंपाक असो की, घरकाम असो वा कार्यालयीन काम. विनोदाच्या चार ओळीच  दिवसभरातील शीण दूर करतात. समर्थ रामदास स्वामी " टवाळा आवडे विनोद " असे म्हणतात. कारण आज आपण आत्मिक पध्दतीने न हसता इतरांच्या फजितीवर किंवा त्यांची फसवणूक झाल्यावर हसतो. वास्तविक पाहता असे हसणे क्षणिक असावे. आपल्या हसण्याने इतरांना त्रास होणार नाही, याची जाणीव ठेवून विनोद करणे केंव्हाही चांगले. विनोदात शब्द हे खूप मोठे कार्य करतात. शाब्दिक कोट्यावरून भरपूर विनोद तयार केले जातात आणि कधी कधी सहजच विनोद तयार होतात. संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे शब्द हे शस्त्र आहेत जरा जपून वापरा. शब्दाचे घाव इतर घावापेक्षा खोल असतात. त्यामूळे योग्य शब्दाचा योग्य वापर करून विनोद निर्माण करणे आपल्यासाठी आणि समाजांसाठी सुध्दा चांगले असते.  जीवनात हसण्याचे  प्रसंग बहुतेक वेळा येतात. साध्या साध्या घटनेतून आपण विनोद निर्माण करीत राहिलो तर कुटुंबातील वातावरण हसरे व निकोप राहील. सब टी व्ही वरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रत्येक कुटुंबातील लहान मोठ्या सर्व प्रकारच्या प्रसंगाना विनोदबुध्दीने संकटाना कसे तोंड द्यायचे याचे नमुनेदार प्रसंग दाखवून सर्वांना नेहमी खळखळून हसविण्याचे काम करीत असते. आपण ही त्या पात्राप्रमाणे जगण्याचा प्रयत्न kका करू नये ! 
आचार्य अत्रे यांना विनोदाचा बादशहा असे म्हणतात त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक संकटाला विनोदबुध्दीने तोंड दिले चार्ली चप्लीन या जगप्रसिद्ध कलाकाराने संपूर्ण जगाला हसविले म्हणून आपण आज ही त्यांना विसरू शकत नाही चित्रपटात असे भरपूर कलाकार झाले आहेत ज्याना फक्त आपणाला हसविण्याचे काम केले म्हणून आपण त्यांना आठवण करतो. जसे की जुन्या काळातील  जॉनी वॉकर, असराणी, महेमुद, जगदीप, जॉनी लिव्हर, दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे इत्यादी. आज टी व्ही वर श्रोत्यांना हसविण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमाची रेलचेल आहे. ज्याद्वारे आपण खूप हसू शकतो.  जगज्जेता सिकंदर सर्व जग जिंकला, पण रिकाम्या हाताने परतला. आपण सुध्दा असेच एके दिवशी रिकाम्या हाताने परत जाणार आहोत. तत्पूर्वी काही चांगले काम म्हणजे सर्वांना हसत खेळत ठेवण्याचे काम केलेले बरे ! आपण सर्वजण विदूषकाच्या गमती जमती पाहण्यासाठी सर्कशीला जातो सर्कस पाहुन आपण खूप हसतो त्याला पोट धरून हसणे असे म्हणतात हे कदाचित तिथे कळते. या हसण्यामुळे मनाला आनंद मिळतो. हसण्यामुळे आपल्या शरीरातील सर्वांगाचा व्यायाम होतो. त्यामूळे हसण्याचे जीवनात फारच महत्वाचे आहे. म्हणून कोठेही आणि कसेही हसता येत नाही. आपण मोठमोठ्याने हसलो तर आजूबाजूचे सर्वांचे लक्ष आपल्याकडे जाते त्यामुळे हसताना वेळ आणि जागा याचेही भान असू द्यावे. मुलींनी आणि महिलांनी फारच सांभाळून हसावे लागते. आपल्या हसण्यात सुध्दा सौंदर्य लपलेले असते. खूपच गंभीर वातावरणात थोडसं विनोद सुध्दा संपूर्ण वातावरण बदलवुन टाकू शकते. 
मोठ्या शहरात रोजची धावपळ आणि धकाधकीमुळे त्याचे हास्य लोप पावत आहे असे वाटते. त्यामूळे लॉफिंग क्लब उघडण्याची नामुश्की आली आहे. हसनारे बाळ आणि हसरे व्यक्ती आपणा सर्वांना हवेहवेसे वाटतात. पण नुसतेच लटके हसणे, तोंडावरच उसने हसू इतरांच्या मनाला समाधान देवू शकत नाही. त्यासाठी मनातून हसले तरच कोणीतरी आपणाला खरी दाद देतील.
हजरजवाबीपणा आणि चातुर्य विनोद अशा गुणांच्या बाबतीत जुन्या काळातील उत्तर भारतातील बादशहाच्या दरबारातील बिरबल आणि दक्षिण राज्यातील चतुर तेनालीराम यांच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. त्यातून आपणांस त्यांची विनोदबुध्दी स्पष्टपणे जाणवते. त्यानंतर पुढील काळात मराठी साहित्यात आचार्य अत्रे यांचे नाव विनोदाच्या बाबतीत अग्रक्रमाने घेतला जातो. त्यांचीच परंपरा पुढे पु ल देशपांडे यांनी चालविली. त्याचे साहित्य आज ही वाचकांना खळखळून हसविते. चला तर मग असेच काही मजेशीर विनोद वाचू या आणि दिवसाची सुरुवात हसण्याने करू या
**
बंड्याला कम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये
नोकरी मिळाली, पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही. रात्रभर काम करत बसला.
खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं,

" बंड्या, रात्रभर जागून एवढं कसलं काम करत
होतास ?''
बंड्या म्हणाला ''अहो सर, सगळ्या की-बोर्डांवर
'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता. सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या...( हसा )
**
 बंड्या नवीनच कामाला लागला होता, सगळा कामाचा प्रकार
समजून घेतल्यावर बंड्याने चहा मागविण्यासाठी फोन
लावला तो बॉस च्या केबिन चा नंबर होता
बॉस : येस कोण बोलतंय ?
बंड्या : ये स्टाफ रूम मध्ये एक चहा पाठव
बॉस (भडकून) : तुला माहिती आहे का ? तू कोणाशी बोलत आहेस ते ? मी ह्या कंपनीचा मालक आहे,
बंड्या गडबडला पण त्याही स्थितीत तो स्वतःला सावरून
बोलला पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलतोय तो ?
बॉस : नाही
बंड्या : वाचलो (बंड्याने फोन आदळला ) . . . . ( हसा )
**
बंड्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून बंड्याला तो प्राणी ओळखायला सांगतात. 
बंड्या : काय ओळखू येत नाय. 

इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?

बंड्या : माझे पाय बघा आणि तुमीच सांगा. . . . . ( हसा )
**
बंड्या आरसा बघून विचार करायला लागला कि ह्याला कुठे तरी बघितलंय आणि थोड्यावेळाने जोराने ओरडला..
..
..
..
..
... ... ..
..
..
..
..
..
..
..
आयला.. हा तर परवा माझ्याबरोबर केसं कापत होता
( हसा ) 
***
बंड्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....

गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो....

मला घरी यायला वेळ लागेल...

गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे.....

दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..

सगळे सापडले...
.
.
.
.
.
.
.
मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो..
( हसा )
***
 बंड्या पहिल्यांदाच आपल्या
सासरी गेला ! 
सासूने खूप काही खायचे बनविले.
सासू : जावईबापू तुम्हाला
कोणती डीश आवडते?
.
.
.
..
.
.
.
बंड्या : टाटा स्काय डिश 
( हसा )

-  नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Friday, 27 November 2015


पाऊलवाट पुस्तकातील काही भाग 

2 ) वीजेची बचत म्हणजेच वीजनिर्मीती 



पाऊलवाट पुस्तकातील काही भाग 

1) बचत करण्याची चांगली सवय 

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...