Thursday, 3 November 2022

जय हरी विठ्ठल ( Jay Hari Vitthal )

            ।। जय हरी विठ्ठल ।।

मिटवूनी दुःख । मिळे आम्हा सुख ।।
विठ्ठलाचे मुख । पाहुनिया ।।

दूर ती पंढरी । पायी चाले वारी ।।
मूर्ती डोक्यावरी । घेऊनिया ।।

विसरुनी भान । चाले रानोरान ।।
मुखी एक नाम । विठ्ठलाचे ।।

आज एकादशी । बैसे तुजपाशी ।।
प्रत्येक दिवशी । करी ध्यान ।।

एकच मागणी । विठ्ठला चरणी ।।
मिळो अन्नपाणी । बळीराजा ।।

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद 9423625769

सर्व माऊलींना प्रबोधिनी एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा ......!

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती कार्यक्रम सूची ( All in 1 )

📚 दिनविशेष माहिती कार्यक्रम – वार्षिक संदर्भसूची ज्ञान, प्रेरणा आणि संस्कारांचा एक अनोखा उपक्रम संकलन व निवेदन : नासा येवतीकर, धर्माबाद ...