Saturday, 17 October 2015

पर्यावरण आणि मानवी जीवन 

** मराठीच्या विकासासाठी हे करू या . . . . . .

** उपक्रमशील शिक्षकाचे नाव **
नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली
ता. धर्माबाद जि. नांदेड

** मराठी - व्याकरण **

** तुम्हांला माहीत असलेले शब्द शोधा ज्यात शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावी **
- - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
** शाळेतल्या विद्यार्थ्याकरिता हा एक उत्तम उपक्रम असून यातून मराठी शब्द शुध्द लिहिण्याचा सराव होतो. हा एक शाब्दिक खेळ आहे, ज्यात मुले स्वतःहून शब्द शोधण्यास प्रारंभ करतात. त्यांना शब्द शोधण्यासाठी आपण फक्त मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

** या खेळाचा उपयोग काय होतो ?  तर मुलांना शब्दाची अचूक ओळख होते आणि मराठीत काही मोजकीच शब्द वगळले तर सर्व शब्द ज्याच्या शेवटचे अक्षर क आहे त्यापूर्वीच्या अक्षरांवर पहिली वेलांटी येते हे मुलांना तात्काळ समजण्यासाठी मदत होते.

** अश्याच छोट्या छोट्या उपक्रम व खेळातून मुलांना मराठीच्या शब्दाची ओळख करून देता येईल.

** शब्दाची यादी तयार करण्याचे काम अर्थातच विद्यार्थ्याना लावले तर अजून मजा येईल. यादी तयार करीत असताना पाठ्यपुस्तक वापरणे बंधनकारक करावे. शब्द अंदाजे लिहू नये. शुद्ध शब्द लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तक वापरण्याचा आग्रह धरल्यास मुले अचूक शब्द लिहितिल अन्यथा पुन्हा चूका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

** हा उपक्रम आपण तिसऱ्या वर्गपासून घेता येवू शकतो.

** हा उपक्रम खालील प्रकारात विभागणी करून यादी तयार करावी.

* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे तीन अक्षरी शब्द शोधा -
* उदा. - आर्थिक
*************************************
. . शब्द शोध क्रमांक 09. .                                   
                      -  नागोराव सा. येवतीकर
*************************************
शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे तीन अक्षरी शब्द शोधा

01. दररोज प्रकाशित होणारे . [  ] [  ] [  ]
02. पंधरा दिवसांतून. . . . . .  [  ] [  ] [  ]
03. महिना एकदा होणारे . . . [  ] [  ] [  ]
04. वर्षातून एकदा होणारे . . .[  ] [  ] [  ]
05. देशाचे रक्षण करणारे. . . [  ] [  ] [  ]
06. हीरे, मोती . . . . . . . . .  [  ] [  ] [  ]
07. क्षणापुरते . . . . . . . .  .  [  ] [  ] [  ] 
08. मिसळण, बेरीज . . . . . . [  ] [  ] [  ]
09. नाव चालविणारा .  . . . . [  ] [  ] [  ]
10. देवास मानणारा .  . . . . .[  ] [  ] [  ]
*************************************
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे चार अक्षरी शब्द शोधा -
उदा. - सामाजिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे पाच अक्षरी शब्द शोधा -
उदा. - राजनैतिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे सहा अक्षरी शब्द शोधा -
उदा. -  नियतकालिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
प्रत्येक प्रकारात आपण भर टाकावी
चला तर मग . . . . . . . . .
आपण शब्द शोधू या आणि आपली व आपल्या विद्यार्थ्यांची मराठी शब्दसंपत्ती वाढवू या.
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
नोट : -
** हा खेळ तुम्हांला कसा वाटला . . ?
** विद्यार्थ्यांनी कसा प्रतिसाद दिला . . . . ?
** या उपक्रमाचा काही फायदा आपणास झाला काय . . . ? किंवा
** या उपक्रमात काही त्रुटी, कमतरता, चुका असल्यास, वा काही बदल करावा असे आपणास वाटत असेल तर . . . . . . .
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
जरूर आपले मत व्यक्त करावे. आपल्या अभिप्रायाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद.
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
आपले मत येथे व्यक्त करा
** nagorao26@gmail.com
** 9423625769

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती पो. येताळा
  ता. धर्माबाद जि. नांदेड
  पिन 431809

** प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे ** 

* उपक्रमाची प्रस्तावना -
प्रश्न म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठ्या  पडतात. प्रश्नाचे उत्तर देतांना अनेकांच्या नाकी नऊ येते. प्रश्नाचे उत्तर आठवत नसले की, मन कसे अस्वस्थ होते आणि त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी शोधाशोध सुरू होते, याबाबतीत जे जाणकार किंवा तज्ञ असतील अश्या काही मित्रांना या प्रश्नांच्या उत्तराबाबत चौकशी केली जाते. बहुतांश वेळा विद्यार्थ्याना पाठ समजलेला असतो मात्र प्रश्नाचे उत्तर सांगता येत नाही आणि सांगता येत नसल्यामुळे लिहिता येत नाही ही समस्या प्राथमिक शाळेत फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. विद्यार्थ्याची ही समस्या कशी  सोडविता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर चटकन कसे सांगतील आणि लिहितिल यांसाठी मी सातव्या वर्गातील एकूण 50 विद्यार्थ्याना डोळ्यासमोर ठेवून सदरील उपक्रमाची निवड केली.

** उपक्रमाचे नाव : -  प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे
या उपक्रमाची सुरुवात करीत असताना विद्यार्थ्याना या उपक्रमाची तोंडओळख द्यावी जेणेकरून विद्यार्थ्याना याची संपूर्ण माहिती होईल. उपक्रमाची ओळख झाली तरच उपक्रम यशस्वी होते अन्यथा हा उपक्रम फक्त हुशार विद्यार्थ्यानाच फायदेशीर ठरेल.
सर्वप्रथम विद्यार्थ्याना पाठाचे अध्यापन करावे आणि पाठातील छोट्या छोट्या प्रश्नांची ओळख द्यावी. प्रश्न आणि उत्तर विद्यार्थ्याच्या वहीत लिहिण्यास सांगावे. पाठ पूर्ण संपल्यावर सर्व प्रश्न एकत्र करावे आणि ते सर्व प्रश्न परत एकदा वर्गात सर्वाना विचारून उत्तराचा सराव करावा. यामूळे विद्यार्थ्याना प्रश्न आणि उत्तराची पूर्ण ओळख होईल. या प्रक्रियेनंतर मग या उपक्रमाला सुरुवात करावयाचे आहे.

*** उपक्रमाची कृती : -
पाठ शिकविणे पूर्ण झाल्यानंतर ज्या प्रश्नांची आपण यादी केली किंवा विद्यार्थ्याना वहीत लिहिण्यासाठी सांगितलेले ते सर्व प्रश्न जाड कागदावर खालीलप्रमाणे लिहावे. यांसाठी लग्नपत्रिकाचा वापर टाकाऊ पासून टिकाऊ म्हणून करता येईल. मराठीसाठी M, पाठ पहिला म्हणून 1 आणि या पाठातील प्रश्नांचे अनुक्रमांक 1 ते पुढील . . . . . असे वरच्या भागावर नमूद करून प्रश्न पट्टी तयार करावी. उदा.
---------------------------------------------------------------------
l M/1/1
l कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन कोण करीत असत ?                               
उत्तर : विष्णू वामन शिरवाडकर
---------------------------------------------------------------------

त्या पाठातील एकूण अश्या प्रश्न पट्टी तयार कराव्यात.  विद्यार्थ्याना ते प्रश्न क्रमाक्रमाने विचारावेत.
* पहिल्यांदा पाच प्रश्न सलगपणे वर्गातील हुशार विद्यार्थ्यास विचारावे.
* हुशार, मध्यम आणि अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्याना याच क्रमाने प्रश्न विचारावे.
* संपूर्ण वर्गात या पध्दतीने प्रश्न विचारले तर सर्व विद्यार्थ्याना त्या प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ होऊन जातील.
* आत्ता आपण हा उपक्रम खेळाच्या स्वरूपात मुलांसमोर घेऊन जाण्यास तयार आहोत.
* एक डबा घ्यावा त्यावर दर्शनी भागावर  विषयाचे नाव " मराठी " असे लिहावे. त्यात सर्व प्रश्न पट्टी टाकाव्यात एक मुलगा आणि एक मुलगी या क्रमाने विद्यार्थ्याना समोर बोलाविले जाऊन त्याना प्रश्न पट्टी उचलण्यास सांगावे.
* सुरुवातीला ती प्रश्न पट्टीचे शिक्षक वाचन करतील आणि विद्यार्थ्याना उत्तरे सांगण्यास प्रोत्साहित करतील
* यात पुढे बदल करून जो विद्यार्थी प्रश्न पट्टी उचलण्यास समोर येईल तो वर्गातील सर्व विद्यार्थ्याना प्रश्न विचारेल.
* प्रश्नपट्टी वर उत्तर लिहिलेले असल्यामुळे समोर आलेल्या विद्यार्थ्याना उत्तर माहीत असेल. मुलांनी प्रश्नांची उत्तर बरोबर दिली असेल तर हे उत्तर बरोबर आहे असे सांगून विद्यार्थी जागेवर बसतील.
* या क्रमाने संपूर्ण वर्गाला एक प्रश्न विचारण्यास संधी मिळते आणि विद्यार्थ्याना प्रश्न उत्तराचा सराव होऊन सर्व प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ होतात.
* प्रश्नांची उत्तरे सांगता आली की विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यासाठी आत्ता विद्यार्थ्याना प्रश्नांची उत्तरे लिहिता आली पाहिजे असे वाटणे साहजिक आहे.
* यांसाठी डब्यातुन शिक्षकांनी प्रश्नपट्टी उचलावी त्याचे वाचन करावे आणि मुलांना फक्त उत्तरे लिहिण्यास सांगावे.
* एका वेळी पाच प्रश्न देऊन त्याचे उत्तर विद्यार्थ्याना आपापसात वही बदलून तपासून घेण्याची सूचना द्यावी.
* त्या पाच प्रश्नांची उत्तरे परत एकदा शिक्षकांनी सांगावे.
* ज्या विद्यार्थ्याचे पाचही उत्तरे बरोबर आली त्या विद्यार्थ्याची वर्गात सर्वांसमक्ष अभिनंदन करावे.
* अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्याचे पाचपैकी एक जरी बरोबर आले असेल तरी त्यांचे अभिनंदन करावे आणि प्रोत्साहन द्यावे, शाबासकी द्यावी.
* यापुढील पायरी म्हणजे याच प्रश्नांवर आधारित 20 गुणांची सराव परीक्षा घेण्यात यावी आणि त्याना किती प्रश्न परीक्षेत आठवतात यांची चाचपणी करावी.
* शक्यतो हा उपक्रम दिवसाच्या शेवटच्या दोन तासिकेत घ्यावे. म्हणजे विद्यार्थ्याना मनोरंजनासोबत अभ्यास ही होईल.
* ज्या दिवशी विषय शिक्षक उपस्थित नसेल त्या दिवशी इतर शिक्षकाची त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली जाते.
* त्या शिक्षकांना प्रश्न पडतो की काय शिकवावे ?
* पण या उपक्रमाने त्यांचा प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. प्रश्न पट्टीवर प्रश्न आणि उत्तर लिहील्यामुळे कोणालाही हा उपक्रम अगदी सहजरित्या घेता येऊ शकेल.
* य उपक्रमाचा फायदा असा आहे की विद्यार्थ्याना पाठावरील सर्व प्रश्नांची उत्तरे चटकन आठवण येतात आणि त्यांच्या आकलनशक्तित वाढ होते. प्रश्नांची उत्तरे आल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी सुध्दा स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करतात
* या उपक्रमांत एकच उणीव किंवा त्रुटी दिसून येते ते म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताना वेळ खूप लागतो आणि आपल्याकडे त्याचीच कमतरता असते.
* मात्र विद्यार्थ्याना या खेळात खूपच मजा येते. विद्यार्थी वारंवार हे उपक्रम घेण्याबाबत हट्ट करतात यावरून या उपक्रमाची सफलता नक्की दिसून येते.
*** प्रतिसाद . . . . . . . . .
आपण ही हा उपक्रम आपल्या शाळेत सुरू करावा आणि आपणांस काय वाटले ? विद्यार्थ्याचा प्रतिसाद कसा मिळाला ? विद्यार्थ्याची प्रगती झाली का ? किंवा या उपक्रमात काही बदल करावा असे आपणांस वाटत असेल तर आपले अभिप्राय नक्की कळवावे.

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक,
जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली
ता. धर्माबाद जि. नांदेड
nagorao26@gmail.com
9423625769

पालक नव्हे ; मित्र बना 

शाळा व्यवस्थापन समितीची आवश्यकता 

** आधी वंदू तुज मोरया . . .



वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा

मुलांनो,आपल्या सर्वाचा लाडका देव म्हणजे गणपती बाप्पा. देव कसला तुम्ही तर त्यांना माय फ्रेंड गणेशा असे म्हणता. पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिल्यामुळे गणेशोत्सव कधी एकदा येतो याची आपणाला उत्सुकता लागलेली असते. प्रत्येक शुभ कार्यात मग तो लग्न समारंभ असो वा  लक्ष्मीपूजन असो, कोनशिला समारंभ असो वा  वास्तू शांती असो की सत्यनारायणाची पूजा असो त्यात सर्वसाधारपणे सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. म्हणूनच श्री गणेशाला आद्य दैवत म्हटले जाते. हिंदू धर्मातील लोकांच्या उंबरठय़ाकडे लक्ष दिल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे घराच्या  चौकटीतील वरच्या आडव्या लाकडी फटीवर श्री गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते. त्याशिवाय घराला घरपण येत नाही. ज्यांच्या घराच्या चौकटींवर श्री गणेशाची मूर्ती नाही असे घर शोधून सुध्दा सापडणार नाही. घरातून बाहेर पडताना आपण कोणत्या कामांसाठी बाहेर जात आहोत ?  स्वार्थासाठी की निस्वार्थ कामांसाठी जात आहोत यांची नोंद चौकटींवर विराजमान असलेले श्री गणेशा करतात, असे पुराणात सांगितले आहे. त्याचमुळे घराबाहेर पडताना वडील मंडळी विशेष करून महिला नेहमीच चौकटीचे दर्शन घेतांना आढळून येतात व ठरविलेले काम वेळेत पूर्ण होवो अशी प्रार्थना श्री गणेशाजवळ करतात.
तसे पाहिले तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला घरात श्री गणेशाची पूजा केली जाते. मात्र भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला घराघरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून विधिवत त्यांची पूजा केली जाते. याच दिवसाची आबाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आतुरतेने वाट पाहतात.  हत्तीचे सोंड असलेले तोंड, सुपासारखे मोठे कान, बारीक डोळे, अगडबंब पोट आणि त्याचा लहानसा वाहन मुषकराज या सर्वाविषयी आपल्या मनात कमालीची उत्सुकता असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घरोघरी श्री गणेशाची स्थापना केली जात असे असा उल्लेख इतिहासात आढळते. भारतीय असंतोषाचे जनक आणि जहाल नेते लोकमान्य टिळकांनी इंग्रजाच्या जुलमी राजवटीविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, लोकांत एकता आणि एकात्मतेचे वातावरण तयार व्हावे म्हणून सन 1890 च्या दशकात श्री गणेशाच्या घराघरातील उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची सन 1894 मध्ये स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केली.  तेंव्हापासून आजतागायत आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू लागलोत. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केली तो उद्देश आज सफल होत आहे काय ? यांचा विचार करण्याची वेळ आपणावर आलेली आहे. या दिवसांत " गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया " या गीतांने सर्वत्र चैतन्यमय वातावरण होऊन जाते. तेंव्हा बोला एकदाचे गणपती बाप्पा $$$$ मोरया $$$$$$.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
nagorao26@gmail.com

नमस्कार मित्रांनो ,
मी नागोराव सा. येवतीकर
अभिमानाने आपणासाठी घेऊन आलोय....

माझ्या ब्लॉगचे GOOGLE PLAY STORE APP जेथुन तुम्हाला browser मध्ये जाऊन ब्लॉग open करण्याची आवश्यकता भासणार नाही.

वेळ कमी आहे ,चटकन ब्लॉग open करायचाय, browser त्रास देतंय....तर मग Na.Sa. हे app open करा व ब्लॉग वरील प्रमुख पोस्टस चा आनंद लुटा...

app पुर्णपणे free असुन केवळ 224kb चे आहे .म्हणजे मेमरीची चिंता करायची गरजच नाहि.
     Na.Sa. हे app डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा....

http://app.appsgeyser.com/Na.%20Sa.

यासोबतच पुढिल लिंकला क्लिक करुन ही डाउनलोड करु शकतात .....

 http://www.appsgeyser.com/2213717

फक्त install लिंकला क्लिक करा व डाउनलोड करा.

   
हे  app आपणांस कसे वाटले ? हे मला माझ्या मोबाईलवर सांगायला विसरु नका.

धन्यवाद आपलाच नासा

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...