या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
Monday, 30 November 2015
** . . मुझे पीने का शौक नहीँ . . **
केरळ पाठोपाठ बिहार राज्यात दारूबंदी होत आहे आणि महाराष्ट्रात मात्र तसे होऊ शकत नाही असे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळे दारूप्रेमी लोकांना हायसे वाटले असेल यात शंका नाही. आज शासनाला या दारू विक्री वर कोट्यावधी रूपयाचा महसूल मिळतो ज्यावर सरकार आपला कार्यभार व्यवस्थित सांभाळत आहे. सरकार समोर आज भरपूर प्रश्न तोंड वासुन उभे आहेत आणि सर्व समस्याची सोडवणूक अर्थातच पैश्यानेच करावी लागते. सगळ्या प्रकारची सोंग करता येतात मात्र पैश्याचे सोंग करता येत नाही. वास्तविक पाहता बंदी करुच नये. कोणत्याही गोष्टीवर बंदी टाकली की जनता त्याच गोष्टी वापरण्यावर जास्त भर टाकतात. आपल्या लोकांची एक वाईट सवय आहे जेथे मनाई किंवा बंदी असते नेमके त्याच ठिकाणी घाई करतात. गेल्या दोन वर्षापासून गुटखा विक्री वर बंदी टाकण्यात आली पण खरोखरच गुटखा विक्री बंद आहे का ? तर नाही उलट फार मोठ्या प्रमाणावर या गुटख्याची तस्करी चालू आहे. या बंदीमुळे काही लोकांची चांदी होत आहे. याचा त्रास मात्र सामान्य नागरिक आणि विक्री करणाऱ्या लोकांना होतो. असंच काही या दारूबंदी वर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहा एक वर्षापूर्वी महाराष्ट्र लगतच्या आंध्रप्रदेश सरकारने दारूवर बंदी आणली होती तेव्हा सीमावर्ती भागात दारूचा महापूर पसरला होता. जागोजागी परमीट रूम उघडण्यात आले होते. बऱ्याच लोकांची चांदी झाली या बंदीमुळे मात्र दारू पिणे आवश्यक असलेल्या लोकांचे खूपच हाल झाले. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते. दारू बंदी करण्याऐवजी त्यांची विक्री आणि दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत काही नियमावली तयार करून त्यांची अंमलबजावणी केल्यास याचे चांगले परिणाम बघायला मिळतील
जसे की दारू विक्री च्या वेळेचे तंतोतंत पालन करण्याकडे लक्ष ठेवावे. दारू विक्री ज्या दिवशी बंद असते त्यादिवशी विशेष पथक ठेवण्यात यावे. सर्व प्रकारच्या दारूच्या किमतींचे फलक दुकानात दर्शनी भागावर लावण्यात यावे आणि ज्या व्यक्ती जवळ दारू पिण्याचा परवाना आहे त्या व्यक्तीलाच दारू विक्री करण्यात यावी. परवाना नसलेल्या व्यक्तीला दारू विक्री होत असेल तर त्या दुकानांस तत्काळ सील ठोकण्यात यावे. प्रत्येक नागरिक ज्यांना दारू पिण्याची हौस आहे त्यांनी परवाना घेणे बंधनकारक केल्यास या दारू चे सध्या जे दुष्परिणाम दिसत आहेत ते नक्कीच कमी होतील. आजची परिस्थिती अशी आहे की दारू विक्री वर कोणाचे बंधन नाही आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीवर सुध्दा नाही. दारू पिऊन रस्त्यावर लोळणाऱ्या व्यक्तींना एकदा तुरुंगवास भोगायला लावले की अश्या लोकांची संख्या आपोआप कमी होते. दारू पिऊन घरात गोंधळ घालणे, कुटुंबातील सदस्याना मारझोड करणे, रस्त्याने मोठ्याने ओरडत फिरणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी गांभीर्यपूर्वक घेतल्यास या दारूचा त्रास नक्कीच कमी होतो. शासनाने दारूविक्री बंदी करण्यापेक्षा यावर कडक अंमलबजावणी केल्यास जनता सुखात राहू शकेल अन्यथा दारू बंदी करून ही त्याचा काही फायदा होणार नाही.
मुझे पीने का शौक नहीँ, पिता हूँ गम भूलाने को चित्रपटातील या गीताप्रमाणे बऱ्याच लोकांची अवस्था असते. दारू पिल्यामुळे थोडीशी झिंग येते आणि काही काळासाठी तो वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो. यामूळे सर्व दुःख, वेदना आणि त्रास विस्मृतीत जाते मात्र कायमचे नष्ट होत नाही. जेंव्हा नशा संपते आणि माणूस पूर्व पदावर येतो त्यावेळी पुन्हा तोच त्रास जाणवतो आणि त्यासाठी परत दारूची मदत घेतली जाते. काही लोक आनंदात दारू पितात. असे करता करता दारू कधी त्याच्या घरात प्रवेश केला हे त्याला देखील समजत नाही. काही लोक डॉक्टर लोकांचा हवाला देऊन म्हणतात की दारू शरीरासाठी खूप आवश्यक घटक आहे. परंतु काही मर्यादेत कदाचित ते शरीरासाठी आवश्यक आणि चांगला घटक असेल ही. आपण त्याचा योग्य ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे. आज त्याचे दुष्परिणाम जास्त झाले आहेत. जयंती आणि पुण्यतिथी निमित्त जे रॅली काढली जाते त्यात नाचणारे बहुतांश जण दारुने झिंगलेले असतात. त्यांना त्या कार्यक्रमाशी काही देणे-घेणे नसते. यामूळे कित्येक लोकांच्या रोजच्या राहणीमानावर परिणाम पडतो, याचे जरासुध्दा भान ठेवत नाहीत.
राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या एकच प्याला या नाटकांतून सुधाकर चे चित्र समाजासमोर खूपच चांगल्या पध्दतीने मांडले होते त्याचा किती परिणाम झाला हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. दारूमुळे आज कित्येक संसार उघड्यावर आलेली आहेत. काही लोकांना दारू पिऊन गाडी चालविण्याची सवय आहे. मात्र दारू पिऊन गाडी चालविणे अत्यंत धोकादायक आहे. रोज सरासरी दोन तरी अपघात दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होतात आणि चार - पाच जिवांना हकनाक मुकावे लागते. या अपघातात मरण पावलेल्याचे कुटुंब वाऱ्यावर पडते. त्याच्या कुटुंबातील सदस्याचे खूपच हाल होतात. संपूर्ण कुटुंबच भेदरलेले आणि विस्कळीत असते.
काल शाळेत का आला नाहीस ? या प्रश्नाचे उत्तर कधी कधी शाळेतील चिमुकल्या मुलांच्या तोंडून ऐकण्यात आलं की " काल माझ्या बाबांनी माझ्या आईला खूप मारलं आणि शिव्या दिलं म्हणून माझ्या आईसोबत मी गावी गेलो होतो. " तेवढ्यात बाजूची पोरं जोरात ओरडून सांगतात " सर याचे बाबा रोज दारू पिऊन घरात भांडण करतात आणि ह्याच्या आई सोबत ह्याला सुध्दा मारतात " तेंव्हा त्या मुलाचा चेहरा उदास आणि काहीसा गडबडलेल्या अवस्थेत असतो. शाळेतून त्याच्यावर खूप काही चांगले संस्कार होत असतील, तो शाळेत कदाचित हुशार ही असेल परंतु कुटुंबाची वाताहत त्याला त्या असंस्कृत वातावरणात परफटत घेऊन जाते. अश्या प्रकारांवर कुठे तरी आळा बसायला हवे
दारूचे दुष्परिणाम सांगून लोकांवर काही फरक पडत नाही. शंभरातून एखादा व्यक्तीच हे समजून घेवू शकतो. बाकीच्या लोकांना कायद्याच्या भाषेतूनच सांगावे लागते. देशात शांतता व सुव्यवस्था रहावी यांसाठी कायद्याची निर्मीती आहे म्हणून त्याचा योग्य वापर होणे हे पुढील काळाची खरी गरज आहे. आज समाजात एक चांगला संदेश पाठविले तर त्याचे चित्रे पुढील काळात नक्कीच चांगले पहायला मिळेल. तेंव्हा आपण एक जागरूक नागरिक असाल तर याविषयी नक्की लढा उभारू या.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Sunday, 29 November 2015
सुप्रभात....
फ...फजीतीचा....😆😆😆
विचार मंथनच्या या सदरात ...आपली झालेली फजीती किंवा जीवनात वावरताना आपणास एखादा दुसऱ्याच्य झालेल्या फजीतीचा कीस्सा..तसेच एैकीव फजीतीचे किस्से ऑडीओ किंवा..लीखीत स्वरुपात पाठवायचे आहे..ह्या कार्यक्रमाचा उद्देश फक्त निखळ हस्याचा आनंद लुटणे हा असेल..यातील बाबी विनोद म्हणुनचं घ्याव्यात तसेच कोणीही इतरांच्या भावना दुखावतील असे कोणतेही क्रृत्य करु नये..तर
व्हा तयार...हसण्यासाठी व हसवण्यासाठी...
आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी 10AM ते 7 PM...
=======================================================
विचारमंथन: २९/११/२०१५
© जागृती निखारे.
विषय: फ-:फजिती
तर सांगायची गोष्ट अशी की, फजिती ची गंमत सांगायची कशी? मोठ्ठा गहन प्रश्न ;हसूं कसं करून घ्यायचं हो सगळ्यांसमोर! बरें असो. हंसू द्या सार्याना ,दिवस आनंदी जाउ द्या.
तर सांगायची गंमत अशी , गोष्ट तशी छोटी गंमत मात्र मोठी! मी नवीन नवीन गाणे शिकले.आमच्या महिला विकास मंडळात भावगीत स्पर्धा होत असतं.(आमचे हे मंडळ म्हणजे पु.लं.चे.अतिविशाल महिलामंडळ) .तर मी पण मैत्रिणींच्या आग्रहाखातर स्पर्धेत भाग घेतला.मंडळातर्फे छानपैकी रोज प्रँक्टीस व्हायची. छान बसले माझे भावगीत.शब्द होते: दूर कुठे चंदनाचे बन जळते..... तुला कळते रे मला कळते...दू..र.
मग काय आला ना स्पर्धेचा दिवस, जमली सारी थोर मंडळी, परिक्षक ! १०० महिलांनी हॉल गच्च भरला होता.एवढ्या सगळ्या महिलांसमोर गाणे😳.बापरे! १ नंबर झाला , असे करता करता माझा नंबर आला .गाणे सुरू झाले ,वा! सुरही मस्त लागला होता. दोन कडवी झाली, तिसरे कडवे आठवेना: मागे मैत्रिण बसली होती.म्युझिक चालू असतांना मान मागे करून तिला पुढचे कडवे विचारले , तिने पहिल्या शब्दाचा क्लु दिला.मग गाणे पुढे सरकले.ईतकी गर्दी आणि माझी गर्दीसमोर गायची पहिली वेळ! अशी फजिती झाली.
पण आता मॉबची भिती गेली मनातून!
======================================================
विचारमंथन: फ- फजिती
©जागृती निखारे.
वर्षापूर्वीची गोष्ट! माझ्या धाकट्या मामाच्या मुलाचे लग्न होते कोपरगावला.लग्न सकाळी लावले.जेवायला वेळ होता.माझ्या ताईचे नातेवाईक कोपरगावला राहतात, त्यांना भेटून यावे असे आमचे ठरले.मी, ताईआणि आमची मावस बहिण अशा तिघीही निघालो.सभागृहापासून कोपरगाव जाण्यास १५/२०मिनिटे लागतात असे कळले.रस्ता क्रॉस केला जी रिक्षा दिसली, तिला थांबवून पत्ता दिला.रिक्षेत बसलो रिक्षा सुरू झाली. १५/२० मिनिटे उलटली तरी आमचा पत्ता मिळेना.आम्ही बहिणी हंसत , खेळत रस्ता पाहत पाहत मार्गक्रमण करत होतो.तेवढ्यात मी ताईला म्हटले ,अग ताई , कोपरगांव अगदी प्रति शिर्डीसारखेच दिसतेय. मग द्वारकामाईकडे लक्ष गेले.रिक्षावाला म्हणाला, तुम्ही शिर्डीलाच आलात ताई! अरे बाबा आम्हाला कोपरगाव जायचे आहे.मग तो म्ह्णाला तुम्ही उलट्या दिशेचा रिक्षा पकडला.आम्ही बाहेरूनच साईबाबांचे दर्शन घेतले तोच ऑटो रिक्षा घेऊन निघालो.आणि कोपरगांवला त्याने बरोबर पत्त्याजवळ सोडले.पण वाट चुकवली पुज्य साईंनी ,आम्हाला दर्शन देण्यासाठी! उलट्या वाटेची रिक्षा पकडल्यामुळे फजिती झाली खरी पण त्यामुळे साईदर्शन झाले आणि शिर्डीचे चवदार पेरूही खायला मिळाले.आणि त्यातून निर्माण झालेले हास्यविनोद मन प्रफुल्लीत करून गेले.काल बरोबर वर्ष झाले.
अहो होऊ द्या फजिती, त्यातूनच फुलू द्या हास्यदरबार!
चुकलेल्या वाटा आणि झालेली फजिती जीवनात आनंद यात्रा आणतात.
=======================================================
मी नुकताच 10 वी पास होऊन कॉलेजला जायला लागलो होतो..मला चीत्रपट पाहायची खुप आवड होती..त्या वेळी आमच्या गावी एकच चीत्रपटगृह होतं..त्यतही सीटींग आरेज्मेंट नंबरने राहात नसे..तीकीटावर सीटचे नंबर रहायचे नाहीत..
कोणीही कोठेही बसायचे..मी एकटाच चीत्रपट पाहाण्यास गेलेला होतो..चीत्रपट सुरु झालेला होता..लाइट्स बंद झालेल्य होत्या..चीत्रपटाच्या अंधुक प्रकाशात चाचपडत मी सीट शोधत होतो..गेटकीपर कुठल्यातरी कामात असावा अन्यथा ते बॅटरी घेऊन सीट दाखवण्यास येत असे..एक रीकामी सीट दीसली..अंधुक प्रकाशात हे ही दीसलं की बाजुच्या सीटवर काही मुली बसलेल्या आहेत...मन आनंदलं..मी हळुवार पणे रीकाम्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केला..थोड्या स्टाइलमधेच...आणी मी दानकन आपटलो..कारण खुर्चीला खालचा पृष्टभाग नव्हताच..तुटला होता..फक्त खुर्चीचे दोन हात व मागचा पाठ टेकवण्याचाच भाग होता
मी आपटलेला पाहुन मुलींचा बाजुलाच बसलेला हसायला लागला..मला समजलं की स्टाइल मारण्याच्या नादात माझा पोपट झाला होता..मी सरळ उठलो व मागे न पाहाता सरळ चीत्रपटगृहाच्या बाहेर पडलो..नंतर कॉलेजमधे पण ही गोष्ट समजली..कारण त्या मुली माझ्याच कॉलेजच्या होत्या..त्यातील काही मुली आजही माझ्या मीत्र आहेत..आम्ही एकत्र जमल्यानंतर ह्या गोष्टी आठऊन खुप हसतो..
अशी माझी फ..फजीती(चा) झाली होती...
उत्कर्ष देवनीकर
=======================================================
एकदा कुत्र्यात अनं गाढवात पैंज लागते कि जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावाच्या पलीकडच्या सिंहासनावर बसेन तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले , कुत्र्याला वाटले मिच जिंकेन कारण गाढवापेक्षा मी जोरात धाऊ शकतो ,
पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते.
शर्यत सुरु झाली.
कुत्रा जोरात धाऊ लागला; पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली. असेच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , प्रत्येक सिग्नल वर घडत राहिले.
कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्याच्या आधीच पोहचले होते तिकडे.
अन त्यांनी शर्यत जिंकून ते 'राजा' झाले होते.
अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि....
"जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते."
तात्पर्य काय ???
तर सामाजिक,धार्मिक आणि उद्योगधंदा यांच्या बाबतीत....
१.आपल्या माणसांना विश्वासात घ्या.
२.आपल्या माणसांना पुढे जाण्यास सहकार्य करा,
त्याना प्रोत्साहन द्या.
३.नाहीतर उद्या बाहेरची गाढ़व आपल्यावर राज्य
करतील.
४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा ....🙏🙏
पतीचे श्लोक : नक्की वाचा..अफलातून आहे
=======================================================
मना सज्जना केर वारे करावे
पहाटे भल्या रोज पाणी भरावे
धुवावी अशी घासघासून लादी
पसारा नको आवरा नीट गादी
मना सज्जना तोच राणी उठावी
तिची त्याक्षणी जीभ वेगे सुटावी
चहा पाजुनी थंड डोके करावे
पती चांगला नाव ऐसे मिळावे
त्वरेने पुन्हा भात पोळी करावी
विळी घेउनी योग्य भाजी चिरावी
डबा रोजचा एक जैसा नसावा
शिरा न्याहरीला जरूरी असावा
प्रभाते मनी बायकोला भजावे
तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे
पगारास हाती तिच्या सोपवावे
कमावून जास्ती तिला तोषवावे
तिचे पाय रात्री जरासे चुरावे
माका तेल ते चोळुनी जे मुरावे
निजायास गादी उशी शाल द्यावी
अशी चाकरी नित्य संपन्न व्हावी
नको रे मना बोल ते बायकोचे
असे की जणू बाण छातीत टोचे
तिच्या ह्या जिव्हा कोण घाले लगाम
अश्या शूरवीरा हजारो सलाम
अशी बायको ही कशी आवरावी
तिची भ्रष्ट बुध्दी कशी सावरावी
कुणी थोर तो काय सांगेल युक्ती
तया पावलांची शिरी लावु माती
कसा जीवघेणा अघोरीच त्रास
सुखाचा ठरे त्यापरी स्वर्गवास
तुम्हा सांगतो नीट ध्यानी धरावे
मरावे परी लग्न कधी न करावे
- जय जय पतीवीर Samarth.
संकलन - नासा येवतीकर
=======================================================
मित्रांनो,प्रसंग माझ्या B.sc. शिकत असतानाचा आहे,जेव्हा आमच्या क्लास मध्ये आम्ही केवळ 5 students ते ही सर्व मुलेच
....आणि सगळेच्या सगळे घट्ट मित्र होतो,एवढे की बाहेरगावी राहाणाऱ्या दोन मित्रांच्या रूमवर आम्ही क्लास पूर्वी अन् क्लास नंतर
दिवसच नाही तर रात्र रात्र सुद्धा असायचो.... आमच्यापैकी एक हा संस्थाचालक चा मुलगा होता अन् घरमालक हा त्या
शाळेचे क्लर्क होते त्यामुळे रूम सहज मिळाल्या अन् आमची guarranty ही स्वतः घरमालकाला च घ्यावी लागली ...
तसे आम्ही सुस्वभावी,अभ्यासू मुले होतोत पण विनोदाचि एकही संधी कोणीही गमावत नसे,मग तेंव्हा वेळेचे ही भान नसे,
असाच एक प्रसंग,रात्री अंदाजे 9 च्या आसपासची वेळ होती,अभ्यासुन गुणवाण मंडळी सर्व अभ्यास करीत असताना
अचानक लाइट गेली अन् सर्वत्र अंधार झाला... शांत स्वभावाचा खराखूरा भाडेकरू शिवशंकर आतल्या रूम(3 room) मध्ये गेला,
अन त्याची गम्मत घ्यावी म्हणून मी त्याच्या मागे गेलो,पण अंधारात काही दिसेना,मी त्याला शोधत होतो,हे त्याच्या लक्षात
आले होते जणू म्हणून तो दबा धरून बसला,काहीतरी हाताला लागले की त्याला मारायचे अन् बाहेरच्या रूम मध्ये धावत येऊन
आनंद घ्यायचा असा पोरखेळ सुरू होता,हे पाहून माझ्या इतर मित्रांनी ही त्यात सहभाग घेतला अन् जो तो आत जायचा जो
हाताला लागेल त्याला मारून बाहेर हसत सुटू लागला ....पण शिवशंकर कोणाला दिसयचा नाही अंधारात ....
एव्हाना आमचा गोंधळ संपूर्ण गल्लीत ऐकू येऊ लागला असेन,पण याचे आमच्या पैकी नक्कीच कोणालाही भान
नव्हतेच मुळी ...आम्ही आमच्यात रममान झालेले होतो.
मग मी एक शक्कल लढवली त्याला पकडण्याची,एक घोंगडी हातात घेऊन दरवाज्यास वाट पाहत स्तब्ध उभा होतो,
थोडावेळ कोणीही हालचाल केली नसल्यामुळे खेळ संम्पला या विचाराने शिव बाहेर आला अन् लागलीच मी ती
घोंगडी त्याच्या अंगावर टाकली अन् आनंदाने त्याला धरून ओरडत होतो "पकडलो,पकडलो " सर्व जन एकाच
बाहेरच्या रूम मध्ये जमा होऊन त्याच्या कडे धावत होती,पण एकाएकी सर्वजण शांत झाली,काय झाले यांची
मला काही कल्पना नव्हती...मी एकटाच ओरडत होतो,बिचारा शिव घोंगडीत होता,माझ्या तोंडावर अचानक
प्रकाश पडत असल्याचे मला जाणवले,नीट पाहिले तर खिडकी उघडून घरमालक जाधव काका कंदील हातात घेऊन
जणू "गदर" मधिल सन्नी देओल सारखे माझ्याकडे पाहत होते,मी आसपास एकटा नाही म्हणून नजर फिरवली तर
पाहतो तर काय सर्वजण कोपरा धरून बसलेले ....अन् मग मी ही घोंगडी काढत बाजूला झालो शिव सुद्धा sarakalaa
मग तेथून.... jadhaav काकांनी ही काहीही न बोलता तेथून बाजूलाच लागून असलेल्या स्वग्रुही परतले ......
ते निघून जाताच शिवशंकर कडे असलेला आता पर्यंतचा रोख माझ्यावर परतला ...तेवढ्यात लाइट आली अन् सबंध रात्र
म ग घडलेल्या प्रसंगाची पुन्हा punha चर्चा रंगली अन् माझी गम्मत कशी झाली हे सांगून रात्रभर हशा पिकला .....
त्यनंतर कित्येक दिवस घोंगडी, कंदील अन् "पकडलो,पकडलो " यांचीच रूमवर चर्चा होती ...
अशा गमती,फजीती,मजा अन् आनंदाचे क्षण असे कित्येक प्रसंग माझ्या मित्रांच्या सहवासात आले,आज
आम्ही सर्वजण वेगवेगळया क्षेत्रात settled आहोत,आजही सर्व प्रसंग लहान सहान गोष्टी जशाच्या तशा आठवतो आणि
आनंद lutato.... आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने मला माझ्याशी घडलेला एक विनोदी प्रसंग share करण्याची
संधी साहित्य मंथन ने दिली त्याबद्दल आभार,हा अनुभव share करून आपल्या चेहऱ्यावर थोडसं का होईना
हसू आणता यावे,एवढाच काय तो आग्रह....
साहित्य मंथन अंतर्गत विचार मंथन स्पर्धेसाठी "फ ....फजीतीचा " साठी मी ------
संदीप धोंडगे पाटील,नांदेड.
( पुन्हा एकदा माझ्या मित्रांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी त्यांच्या ग्रूप मध्ये ही पोस्ट करू का,
त्याना ही आनंद पुन्हा मिळेल )
=======================================================
|| कभी कभी ||
=========
कभी कभी हसीं गुन्हा
करने को जी चाहता है--
रूबरू हो जावु उनसे
के मरने को जी चाहता है-!!
सिले सिले होट मगर
कुछ कहने को जी चाहता है--
आँखों आंको में बतलादु
के बहने को जी चाहता है--!!
राह अंजानी सही
पहचानने को जी चाहता है;-
हमसफ़र बन जाओ अगर
साथ चलने को जी चाहता है--!!
हर घडी हर लमहा
इंतज़ार करने को जी चाहता है--
वोह बेखबर ही सही
के प्यार करने को जी चाहता है--!!
******सुनिल पवार-----/
=======================================================
प्रसंग साधा पण
क्षण फजितीचा!
जानेवारी 1970 ची घटणा आहे. त्यावेळी मला इंदापुर तालुक्यात निमगाव-केतकी येथे नोकरीला लागुन आडीच महिणे झाले होते.
त्यादिवशी वडील आजारी असल्याची तार आली होती. व घाईने मी गावी जाण्यास निघालो होतो व बऱ्याच ठिकाणी गाडी बदलावी लागत होती. इंदापुरहुन टेंभुर्णीला आल्यावर करमाळा गाडीने करमाळा येथे पोचलो त्याचवेळी करमळा ते "अनगर" असा बोर्ड असलेली गाडी निघु लागली होती व मी गाडी थांबवून आंत कंडक्टर शेजारी बसलो व गाडी फाकटा बाहेर पडतांनाच एक अहमदनगरचे तिकीट द्या अशी मागणी केली. त्या बरोबर कंडक्टरने बेल वाजवुन गाडी थांबवली व मला उतरण्याचा इशारा केला. मी मात्र चकीत झालो. त्याला विनंती केली कीं मला अहमदनगरहुन पुढे लवकर जायचे आहे व माझे जाणे फार जरुर आहे आणि जागा असुन तुम्ही माझी अडवणुक करत आहात. मी उतरणार नाही उलट तुमच्या विरुद्ध तक्रार करीन.
प्रसंग जरा गंभीर बनत होता. म्हणून एक सुज्ञ माणसाने मला समजावले तुम्ही या भागात नवीन दिसता त्यामुळे तुमचा गैरसमज होतोय ही गाडी अहमदनगरला जाणारी नसुन "अनगर"ला जातेय जे या भागातले एक मोठे गांव आहे.
माझी चुक माझ्या लक्षात आली आणि कंडक्टरला "साॅरी" बोलुन खाली उतरलो.
वडील अजारी असल्याने मनस्थिती बिघडलेली असतांना हा प्रखार घडला आणि "फजीती" झाली.
रामराव जाधव.
=======================================================
एकदा की नाही 🚶
पाटलाच्या बोटात💍 आंगठी चमकत होती ।
परंतु 💎खडा चमकतच न्हवता मी विचारलं
🚶पाटिल लगिन ठरलंकि काय ।
🚶पाटिल म्हनाले नाय रे मर्दा ।
मी ईचारलं मग ही💍 आंगठी कसलि रे ।
🚶पाटिल म्हनाले २३०९० रूपयेची 💍आंगठी हाय ती।
मग मी विचारलं 💎खडा असा कारे ।
🚶पाटिल म्हनाले 💍आंगठी ९० रुपयाची हाय।
आणि त्यातला 💎खडा २३००० रुपयाचा हाय।
मी इचारलं कस काय रं।
🚶तो म्हणाला मला मुत खडा झाला होता तो अॉफरेशन करुन बाहेर काढला त्याचा खर्च २३०००, रुपये आला ।
आता सांग एवढा म्हागाचा 💎खडा टाकून द्यायचा कारे।
म्हनुन 💍आंगटी ९०,रूपयाची बनवली आणि तो खडा त्यात बशीवला ।
हाय किनाय डोकं😁।
ह्या 🚶पाटलाच ।
😍😄😃😀☺😜😝😛😜😜😜😜😜😜😜😝😛
=======================================================
फ :- फजितीचा
माझ्या जीवनातील अनुभव सांगतो शालेय जीवनात इयत्ता सातवी मध्ये असताना आमच्या शाळेत स्नेह संमेलन आयोजित केले होते.
आमच्या वर्ग शिक्षकांनी संमेलनासाठी एक "नाटक "बसविले होते नाटकाचे नाव " सुर्याला आले पडसे " आणि मला भुमिका मिळाली नारदमुनीची 😂 विशेष सांगायचे म्हणजे 26 जानेवारी महिन्यात थंडीचा दिवस आणि हे मुनी महाराज फक्त पंच नेसलेले रात्रीचा समय होता थंडीचा कडाका वाढलेला सुर्य सोबत असुन ही थंडी आवरत नव्हती नाटकाला सुरूवात झाली आधीच थंडीमुळे सर्व अंग कापत होते आणि समोर प्रेक्षक पाहून जास्तच हलायला सुरूवात झाली मग काय जे पाठ डायलॉग विसरून मनाचे सुरू झाले..
पण त्यामुळे समोरच्यांना काय म्हणायचे कळत नव्हते.
थंडीमुळे दात कुडकुडत होते.
आणि फ:- फजितीला सुरूवात झाली लोक हसत होते काही कुतूहलाने हसत होते एवढ्या थंडीत नारद उघडा यालाच पडसे येणार शेवटी तेच "नारायण नारायण "
😂😂😂😂😂😂
गजानन पवार

हसा आणि हसवा
** . . हसा आणि हसवा . . **
माणसाचे जीवन निरोगी राखायचे असेल तर जीवनात हास्याला मोलाचे स्थान आहे. गंभीर चेहऱ्याचा आणि कधीच न हसणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात चांगली व्यक्ती सुध्दा मानसिकरित्या आजारी पडते. तर विनोदी हसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक आजार असलेल्या व्यक्तीला सुध्दा थोडा वेळ का होईना बरे वाटते. राजेश खन्ना अभिनीत आनंद चित्रपट पाहिल्यावर असे वाटते की, खरोखरच आपल्या जीवनात हास्य राहिले नसते तर आपण जास्त काळ जिवंत राहू शकलो नसतो. हसण्यामुळे मनावरचा ताण क्षणभर नाहीसा होतो आणि मनाला, मेंदूला ताजेतवाने वाटते अन् मोठ्या जोमाने हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेता येते.
कोणतेही काम आत्मिक आनंदाने केले नाही तर त्या केलेल्या कामात काही रुची, चव राहत नाही. मग ते स्वयंपाक असो की, घरकाम असो वा कार्यालयीन काम. विनोदाच्या चार ओळीच दिवसभरातील शीण दूर करतात. समर्थ रामदास स्वामी " टवाळा आवडे विनोद " असे म्हणतात. कारण आज आपण आत्मिक पध्दतीने न हसता इतरांच्या फजितीवर किंवा त्यांची फसवणूक झाल्यावर हसतो. वास्तविक पाहता असे हसणे क्षणिक असावे. आपल्या हसण्याने इतरांना त्रास होणार नाही, याची जाणीव ठेवून विनोद करणे केंव्हाही चांगले. विनोदात शब्द हे खूप मोठे कार्य करतात. शाब्दिक कोट्यावरून भरपूर विनोद तयार केले जातात आणि कधी कधी सहजच विनोद तयार होतात. संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे शब्द हे शस्त्र आहेत जरा जपून वापरा. शब्दाचे घाव इतर घावापेक्षा खोल असतात. त्यामूळे योग्य शब्दाचा योग्य वापर करून विनोद निर्माण करणे आपल्यासाठी आणि समाजांसाठी सुध्दा चांगले असते. जीवनात हसण्याचे प्रसंग बहुतेक वेळा येतात. साध्या साध्या घटनेतून आपण विनोद निर्माण करीत राहिलो तर कुटुंबातील वातावरण हसरे व निकोप राहील. सब टी व्ही वरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रत्येक कुटुंबातील लहान मोठ्या सर्व प्रकारच्या प्रसंगाना विनोदबुध्दीने संकटाना कसे तोंड द्यायचे याचे नमुनेदार प्रसंग दाखवून सर्वांना नेहमी खळखळून हसविण्याचे काम करीत असते. आपण ही त्या पात्राप्रमाणे जगण्याचा प्रयत्न kका करू नये !
आचार्य अत्रे यांना विनोदाचा बादशहा असे म्हणतात त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक संकटाला विनोदबुध्दीने तोंड दिले चार्ली चप्लीन या जगप्रसिद्ध कलाकाराने संपूर्ण जगाला हसविले म्हणून आपण आज ही त्यांना विसरू शकत नाही चित्रपटात असे भरपूर कलाकार झाले आहेत ज्याना फक्त आपणाला हसविण्याचे काम केले म्हणून आपण त्यांना आठवण करतो. जसे की जुन्या काळातील जॉनी वॉकर, असराणी, महेमुद, जगदीप, जॉनी लिव्हर, दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे इत्यादी. आज टी व्ही वर श्रोत्यांना हसविण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमाची रेलचेल आहे. ज्याद्वारे आपण खूप हसू शकतो. जगज्जेता सिकंदर सर्व जग जिंकला, पण रिकाम्या हाताने परतला. आपण सुध्दा असेच एके दिवशी रिकाम्या हाताने परत जाणार आहोत. तत्पूर्वी काही चांगले काम म्हणजे सर्वांना हसत खेळत ठेवण्याचे काम केलेले बरे ! आपण सर्वजण विदूषकाच्या गमती जमती पाहण्यासाठी सर्कशीला जातो सर्कस पाहुन आपण खूप हसतो त्याला पोट धरून हसणे असे म्हणतात हे कदाचित तिथे कळते. या हसण्यामुळे मनाला आनंद मिळतो. हसण्यामुळे आपल्या शरीरातील सर्वांगाचा व्यायाम होतो. त्यामूळे हसण्याचे जीवनात फारच महत्वाचे आहे. म्हणून कोठेही आणि कसेही हसता येत नाही. आपण मोठमोठ्याने हसलो तर आजूबाजूचे सर्वांचे लक्ष आपल्याकडे जाते त्यामुळे हसताना वेळ आणि जागा याचेही भान असू द्यावे. मुलींनी आणि महिलांनी फारच सांभाळून हसावे लागते. आपल्या हसण्यात सुध्दा सौंदर्य लपलेले असते. खूपच गंभीर वातावरणात थोडसं विनोद सुध्दा संपूर्ण वातावरण बदलवुन टाकू शकते.
मोठ्या शहरात रोजची धावपळ आणि धकाधकीमुळे त्याचे हास्य लोप पावत आहे असे वाटते. त्यामूळे लॉफिंग क्लब उघडण्याची नामुश्की आली आहे. हसनारे बाळ आणि हसरे व्यक्ती आपणा सर्वांना हवेहवेसे वाटतात. पण नुसतेच लटके हसणे, तोंडावरच उसने हसू इतरांच्या मनाला समाधान देवू शकत नाही. त्यासाठी मनातून हसले तरच कोणीतरी आपणाला खरी दाद देतील.
हजरजवाबीपणा आणि चातुर्य विनोद अशा गुणांच्या बाबतीत जुन्या काळातील उत्तर भारतातील बादशहाच्या दरबारातील बिरबल आणि दक्षिण राज्यातील चतुर तेनालीराम यांच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. त्यातून आपणांस त्यांची विनोदबुध्दी स्पष्टपणे जाणवते. त्यानंतर पुढील काळात मराठी साहित्यात आचार्य अत्रे यांचे नाव विनोदाच्या बाबतीत अग्रक्रमाने घेतला जातो. त्यांचीच परंपरा पुढे पु ल देशपांडे यांनी चालविली. त्याचे साहित्य आज ही वाचकांना खळखळून हसविते. चला तर मग असेच काही मजेशीर विनोद वाचू या आणि दिवसाची सुरुवात हसण्याने करू या
**
बंड्याला कम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये
नोकरी मिळाली, पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही. रात्रभर काम करत बसला.
खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं,
" बंड्या, रात्रभर जागून एवढं कसलं काम करत
होतास ?''
बंड्या म्हणाला ''अहो सर, सगळ्या की-बोर्डांवर
'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता. सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या...( हसा )
**
बंड्या नवीनच कामाला लागला होता, सगळा कामाचा प्रकार
समजून घेतल्यावर बंड्याने चहा मागविण्यासाठी फोन
लावला तो बॉस च्या केबिन चा नंबर होता
बॉस : येस कोण बोलतंय ?
बंड्या : ये स्टाफ रूम मध्ये एक चहा पाठव
बॉस (भडकून) : तुला माहिती आहे का ? तू कोणाशी बोलत आहेस ते ? मी ह्या कंपनीचा मालक आहे,
बंड्या गडबडला पण त्याही स्थितीत तो स्वतःला सावरून
बोलला पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलतोय तो ?
बॉस : नाही
बंड्या : वाचलो (बंड्याने फोन आदळला ) . . . . ( हसा )
**
बंड्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून बंड्याला तो प्राणी ओळखायला सांगतात.
बंड्या : काय ओळखू येत नाय.
इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?
बंड्या : माझे पाय बघा आणि तुमीच सांगा. . . . . ( हसा )
**
बंड्या आरसा बघून विचार करायला लागला कि ह्याला कुठे तरी बघितलंय आणि थोड्यावेळाने जोराने ओरडला..
..
..
..
..
... ... ..
..
..
..
..
..
..
..
आयला.. हा तर परवा माझ्याबरोबर केसं कापत होता
( हसा )
***
बंड्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....
गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो....
मला घरी यायला वेळ लागेल...
गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे.....
दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..
सगळे सापडले...
.
.
.
.
.
.
.
मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो..
( हसा )
***
बंड्या पहिल्यांदाच आपल्या
सासरी गेला !
सासूने खूप काही खायचे बनविले.
सासू : जावईबापू तुम्हाला
कोणती डीश आवडते?
.
.
.
..
.
.
.
बंड्या : टाटा स्काय डिश
( हसा )
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
Friday, 27 November 2015
काव्य मंथन अंतर्गत आजचा चारोळी स्पर्धेचा विषय आहे -असहिष्णुता.
1. स्पर्धा ठीक 10 वाजता सुरू होईल व शेवट साय. 7 पर्यंत चालेल.
2. स्पर्धे दरम्यान चारोळी व्यतिरिक्त इतर कोणत्याही पोस्ट टाकू नये.
3. चारोळीत संबंधीत शब्द असावा व चारोळी अर्थपूर्ण असावी.
4. स्पर्धेतील चारोळीमुळे एखादया व्यक्ती,जात अथवा धर्माच्या भावना दूखावल्या जाणार नाहीत,अशीच चारोळी
पोस्ट करण्यात यावीत,याची सर्वानी खबरदारी घ्यावी.
5. सर्व साहित्य मंथन परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून येथेच्छ आनंद लुटावा.
धन्यवाद.🙏
🌺🌺🌺संदीप पाटील,नांदेड.
***************************************
जे जे आले झाले इथले
धर्मपंथा तयां आचरु लागले
घर 'आपुलेच' समजते झाले
'सहिष्णुत्व ' यापरी काय हो वायले?
जयंत देशपांडे
अहमदनगर
***************************************
🇮🇳 मी भारतीय 🇮🇳
माझा भारतीय असण्यावर
आज शंका घेतली जात आहे
मी भारतीय आहे हे जगाला
ओरडून सांगावे लागत आहे
- ना. सा .
***************************************
विचीत्र सवयी विचीत्र व्यसने,
किती सहावे शरिरात्म्याने.
तया शिणवीता,छळता छळता,
असहिष्णूता मग ये ओघाने.
कितीक चुकतो स्वत:हि आपण,
सोडत नाही कुणीहि मी पण.
दाखवितो शरिरात्मा मग इंगा,
असहिष्णूता त्याचीच ही पण.
डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे
***************************************
चारोळी स्पर्था
सहिष्णूता
आर्य चाणाक्य वदले होते एक सत्य,
'केंद्रशासन जेधवा होते देशी समर्थ,
चोर पुढारी ढोंगी म्हणताती
'सारे व्यर्थ!
'सहिष्णूता लयास गेली हो'
बोलती असत्य!
©अंजना कर्णिक,मुंबई
***************************************
💥💥साहित्यमंथन 💥💥
आयोजित
🎼🎼काव्यमंथन🎼🎼
🌍चारोळी स्पर्धा 🌎
================
📢📢असहिष्णुता📢📢
================
सहिष्णुता की असहिष्णुता
माणसा तुझा खरा धर्म कोणता
तू जागव आतंरिक मनाची मानवता
त्या शिवाय पर्याय नसे बा आता
🎯🎯🎯
आप्पासाहेब सुरवसे
लाखनगांवकर
***************************************
जिथे खातो तिथे छेद करतो
जाणता असो अजानता
सोसतो यांचे नखरे ,पुन्हा
आमचीच होते असहिष्णूता
* अरविंद कुलकर्णी
(स्पर्धेसाठी नाही )
***************************************
बलीदान त्या शुरांचे
दवडू नकाच फोल।
गाफील राहू नका रे
सहिष्णूतेचे बडवून ढोल।
©अंजना कर्णिक
***************************************
🔔 असहिष्णुता 🔔
गावागावात अन् घराघरात
आज असहिष्णुता लपलेली आहे
अच्छे दिनच्या शासनात
सहिष्णुता जणू संपली आहे . . . ?
- ना. सा.
***************************************
स्पर्धैसाठी
बधुभाव हा भारतभू चा असे अमोल अलंकार,
अन ,'अतिथी देवो भव' हा असे आमुचा संस्कार,
परधर्मी वा परदेशींना मिळे
परीपूर्ण सहकार,
तरी कृतघ्न , ढोंगी म्हणती,
इथे असहिष्णूता फार।
©अंजना कर्णिक
***************************************
स्पर्धैसाठी
माझ्या देशीचे लोकशासन असहिष्णू जर तुम्हास वाटे
खुशाल करावे हो देशाट्टन
हेच योग्य जनमनास वाटे!
©अंजना कर्णिक
***************************************
💥💥साहित्यमंथन 💥💥
आयोजित
🎼🎼काव्यमंथन🎼🎼
🌎🌎चारोळी स्पर्धा🌍🌍
===============
🔫🔪असहिष्णुता🔪🔫
============
या भारत देशात आहे लोकशाही
बरी नाही ती लष्करी नि हुकुमशाही
नाहीतर माजेल सर्वत्र अराजकता
नव्हे वाढतील दंगली नि असहिष्णुता
🎯🎯🎯
आप्पासाहेब सुरवसे
लाखनगांवकर
***************************************
💥💥साहित्यमंथन💥💥
आयोजित
🎼🎼काव्यमंथन🎼🎼
🎌🏆चारोळी स्पर्धा🏆🎌
================
📚📚असहिष्णुता📚📚
===============
असहिष्णुता म्हणजे तरी काय ?
होई वाटोळे नि विध्वंस दुसरं काय.
म्हणून सरकार राबवी मूल्यशिक्षण
त्यात असे सर्व धर्म समभावाची शिकवण
✏🎯🎯🎯✒
आप्पासाहेब सुरवसे
लाखनगांवकर
***************************************
💥💥साहित्य मंथन 💥💥
आयोजित
🎼🎼काव्यमंथन🎼🎼
📘📕चारोळी स्पर्धा📔📓
==================
🔪🔫असहिष्णुता🔫🔪
==================
मज देशा गरज ती सहिष्णुतेची
परी भाऊगर्दी झाली असहिष्णुतेची
तया साठी व्हावे वैचारिक परिवर्तन
यासाठी राबवी उपक्रम साहित्यमंथन
✒🎯🎯🎯✏
आप्पासाहेब सुरवसे
लाखनगांवकर
***************************************
💥💥असहिष्णुता 💥💥
उसळल्या येथे कधी जातीय दंगली,
दुखावल्याही आहेत धार्मिक भावना,
बळावली अनेकदा समाजात असहिष्णुता,
तरी जगात दुसरा महान भारत देश गावेना.
🌺🌺 संदीप,नांदेड .
***************************************
स्पर्धेसाठी:-
असहिष्णुतेचे वारे जेव्हा घरादारात पसरले,
सहिष्णुता दुषित झाली हे तेव्हा कळले ,
विकास भारताचा पोहोचला साता समुद्रापार,
मात्र विचारांच्या वावटळीत जनमत अडकले ....
निर्मला सोनी.
***************************************
जे जे आले झाले इथले
धर्मपंथा तयां आचरु लागले
घर 'आपुलेच' समजते झाले
'सहिष्णुत्व ' यापरी काय हो वायले?
जयंत देशपांडे
अहमदनगर
***************************************
जे जे आले झाले इथले
धर्मपंथा तयां आचरु लागले
घर 'आपुलेच' समजते झाले
'असहिष्णता ' कशी हो म्हणू याले?
जयंत देशपांडे
अहमदनगर
***************************************
💫💫💫💫💫💫💫
✨✨✨✨✨✨✨
साहित्य मंथन चारोळी स्पर्धा
✒
मूल्य अन् संस्काराचे धडे
मिळतात ईथल्या या मातीत
असहिष्णुतेचा कलंक नको
ज्योत पेटवा समतेची छातीत
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
✒
रक्तरंजित ईतिहासाचे
पून्हा साक्षीदार होवू नका
असहिष्णुतेला देवून थारा
मूल्यांची चिरफाड करू नका
✨✨✨✨✨✨✨
✒
असहिष्णुतेच्या विख डंकाने
कोलमडतील बांधव सारे
विविधता अन् एकतेची
उजडतील घरे दारे
✨✨✨✨✨✨✨
✒
लाख बंडखोर येतील
सहिष्णुता भंग करायला
रोखा तिथेच चिरडा त्यास
जहरी असहिष्णुतेच्या विषाणुला
💫👆💫👆👆👆💫
🎯 मारुती तु.खुडे
माहूर,नांदेड
***************************************
जाती धर्माच्या नावावर
जे भडकवतात इथे दंगे....
असहिष्णु त्यांना म्हटले
तर दाखवतात तेच इंगे....
डाॅ.लक्ष्मण उगले
***************************************
👮🏻👲🏻👳🏻असहिष्णुता👨🏼👩🏼👸
चारोळी स्पर्धा
जे जे आले झाले इथले
धर्मपंथा तयां आचरु लागले
घर 'आपुलेच' समजते झाले
'असहिष्णुता ' कशी हो म्हणू याले?
जयंत देशपांडे
अहमदनगर
***************************************
अाले किती परकीय आक्रमूनी आमुचेवरी।
झुंजलो बहु राखूनी निज अस्तित्व परी॥
शतकानुशतकांचे होते हेच चक्र जरी।
सामाविले त्या सर्वांशी, सहिष्णुता हीच खरी॥
जयंत देशपांडे
अहमदनगर
***************************************
'क्रांतीवीरां'नी गुंफिली होती 'सोनेरी पाने सहा'।
सहिष्णु हिंदवी मानसिकता पानोपानी पहा ।।
आक्रमणे जितकीही झाली सामावली मातीत ह्या।
वर्धिष्णु जाहली संस्कृती सामावूनी सारा जहाँ ॥
जयंत देशपांडे
अहमदनगर
***************************************
💐💐💐💐💐💐
असहिष्णुतेचा फुटलाय,
म्हणे देशात बॉम्ब.....
यालाच म्हणतात राव,
चोराची उलटी बोंम्ब.....
🔵WARANKAR G🔵
👉🏼नांदेड👈🏼
💐💐💐💐💐💐💐
***************************************
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर
व्यर्थ करती विचार मंथन...
शेतक-याच्या समस्यांचे
शासन करीत नाही चिंतन....
डाॅ.लक्ष्मण उगले....
***************************************
स्वहितासाठी धर्म ठेकेदार
लावती धर्माधर्मात भांडण...
प्रजा सोसते त्याचे परीणाम
हे भरतात संपत्तीने रांजण....
डाॅ.लक्ष्मण उगले....
***************************************
स्पर्धेसाठी....
स्वहितासाठी धर्म ठेकेदार
लावती धर्माधर्मात भांडण....
पसरवून असहिष्णुता इथे
ते स्वताचे भरतात रांजण....
डाॅ.लक्ष्मण उगले....
***************************************
माणुसकीच धर्म खरा,
ओळख तु माणसा रे....
असहिष्णुता जन्म घेइ,
जेथे बंधुभाव मोडला रे...
@ उत्कर्ष देवणीकर...
👆स्पर्धेसाठी नाही...
***************************************
आचार विचारांच्या लढाईत..
असहिष्णूतेचे वहाती वारे...
माणूसकीशी नाळ तुटली अन्..
धर्मयुद्धाचे पेटती निखारे...
- सौ.कस्तुरी.
***************************************
सुलभा कुलकणीॅ.मुंबई.
9930509026.
साहित्य मंथन.आयोजित.
चारोळी स्पधाॅ.भाग12.
विषय असहिष्णुता.
1)आठव शौयॅ त्या अमरजवानांचे,
आठव पराक्रम त्या रणरागिणींचा,
ऐकू येतो ना, आक्रोश भूमातेचा,
कुणी दिला अधिकार तुवा असहिष्णुतेचा.
2)जातोस जा परी,
नको लावू कलंक भूमातेला असहिष्णुतेचा,
जरा ठेव भान आपुल्या इतिहासाच्या पानांचे,
दिधला पोटचा गोळा,आहुती दिली कुंकूवाची,
नकोस ना ! विसरू उपकार आपल्या कमॅभूमीचे.
3) धमाॅधांना वठणीवर आणणे,
ही जर असेल असहिणुता,
तर करा प्रतिज्ञा, घ्या आपुली आण,
करू या महान आपुल्या भारता.
4)असहिष्णुतेचा बळी देऊनी,
वाचवू या आपुल्या देशाला,
सद्सद् विवेक बुद्धी स्मरूनी,
महान बनवू या हिंदुस्थानाला.
5) सहिष्णुतेचा घास गिळूनी नाही गप्प बसला,
विसरला पायाखालील तृणावता भूमातेला,
डोईवरच्या स्वच्छ अशा निलांबरीला,
असहिष्णुतेची कास धराया तू कारे धावला?
***************************************
💣असहिष्णुता 💣
टिव्ही मीडियावर चाललीय गहन चर्चा,
देशात घोंगावतोय असहिष्णुतेचा वारा,
एका वेळेच्या जेवणाची हमी नाही,
जाऊन त्या गरीबांस असहिष्णुतेचा अर्थ विचारा.
🌺🌺 संदीप पाटील,नांदेड.
***स्पर्धेसाठी नाही ***
***************************************
चारोळी स्पर्धा
एका गाली मारली थप्पड
तर करा पुढे दूसरा गाल
इथे ही भुक्कड शिकवण
तरी म्हणे असहिष्णूच फार
अंजना
***************************************
साहित्य मंथन ==स्पर्धा
================
विषय =असहिष्णुता
================
प्रेषक==कुंदा पित्रे
🌸🌸🌸🌸🌸🌸
1) अन्न,वस्त्र,पाणी,निवारा
असहिष्णुतेचा बाजार भरला
अन् विकृतिने मांडला पसारा
नितळ भावनांचा गळा घोटला
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
2) उगाच गप्पा गावरानच्या
मिटावी असहिष्णुता सारी
अर्धी भाकर पोटी कोणाच्या
होता,कोणाला कळवळा भारी
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
3) व्यसन ,धुमसते सुसाट
असहिष्णुता मनी साचते
जनता मरते उगा फुकट
बालजीवांचे संचित नासते
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
4)असहिष्णुतेच्या फुलल्या बागा
जगा जगांची रित निराळी
कां करतो आपण,उगा त्रागा
संस्कृतिंची ओरड ती वेगळी
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
5) बुध्दाची तर ती सहिष्णुवृत्ती
असहिष्णुवर रामदासी कोरडे
अन् हिच असे, संताची प्रवृत्ती
तत्वज्ञ तरी काय करी बापुडे
🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵
कुंदा पित्रे
***************************************
इथे जागोजागी असहिष्णु आहे
कुणाला पाणी मिळत नाही
तर
कुणी खराब रस्त्याचा शिकार होतोय
शेतकऱ्यांना कुणी मदत देत नाही
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
***************************************
सध्याच्या असहिष्णुतेवर आधारित लेख

💥 ** . . मी भारतीय आहे . . ** 💥
शाळेत असताना " भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत." अशी प्रतिज्ञा करतो. या प्रतिज्ञेचा आणि आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचा काही एक संबंध नाही. म्हणजे आपले दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. शाळेतल्या प्रत्येक गोष्टीचा जर माणसाच्या मनावर प्रभाव राहिला तर जगात कोठेही असहिष्णुता दिसून आली नसती. असहिष्णुता म्हणजे काय ? या प्रश्नाचे साध्या आणि सरळ व सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे घटनेने जे स्वातंत्र्य दिले आहे त्यास बाधा पोहोचणे किंवा गळचेपी होणे. मग असहिष्णुतेची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून होते. घरामध्ये पाहतो की आपणाला घरात मुक्तपणे वावरता येत नाही. कुटुंबप्रमुख म्हणून आपल्यावर आई पेक्षा वडिलांचा धाक सर्वात जास्त राहतो. त्यानंतर घरातील मुलीवर नेहमी असहिष्णुता घडत असते. कधी कधी तिच्या मनात येत ही असेल यापेक्षा आपण घरातून निघून गेलेलं बरं. असा विचार तिच्या मनात केंव्हा येतो ? जेव्हा तिला घरात असुरक्षित वाटायला लागते त्यावेळी असा विचार हळूच डोकावून जातो.
घरात सुनेला जी वागणूक मिळते तिथे सुध्दा असहिष्णुता निर्माण होत नाही काय ? मासिक पाळी जे की नैसर्गिक आहे परंतु स्त्रियाना या काळात घरात मुक्तपणे वावरता येत नाही, असे का ? याचा आपण का विचार करीत नाही. गावागावात आणि घराघरात आपणाला पदोपदी असहिष्णुता आढळून येते तर आजच एवढा उहापोह किंवा चर्चा करण्याचे कारण कळत नाही. प्रत्येकाला आपली आणि आपल्या लेकरांची काळजी असते. शाळेला गेलेली मुले शाळेची वेळ संपून गेल्यावर पाच - दहा मिनिटे घरी आले नाही तर आपणाला काळजी लागते. मनात विविध प्रकारचे प्रश्न आणि शंका निर्माण होतात. मुले घरी आल्यावरच जीव भांड्यात पडतो. तेंव्हा राहून राहून मनात येतोच की वातावरण खूपच खराब झाले आहे. कधी कुठे काय होईल याचा काही नेम नसतो. पूर्वीच्या काळी इतर गावाला गेलेला व्यक्ती पत्राद्वारे आपली खुशाली कळवत असे. सासरी असलेली मुलगी कशी आहे हे टपालनेच कळत असे. परंतु काळ बदलला आणि त्याप्रमाणे परिस्थिती सुध्दा. आजच्या मोबाईलमुळे हे फारच जलद आणि स्वस्त झाले आहे. त्यामूळे लवकरात लवकर एकमेकांना निरोप देणे आणि घेणे सोपे बनले आहे. याच मोबाईल मुळे जगात कुठेही घडलेली घटना क्षणात आपणाला कळत आहे. दिवसभर चाललेल्या असहिष्णु विषयी माहिती वाचून वाचून डोकं दुखण्याची वेळ आली होती.
नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलमुर्गी या विचारवंताच्या हत्येनंतर भारतात असहिष्णुतेचे वातावरण पेटू लागले. साहित्यिक मंडळी आपले पुरस्कार सरकारला परत देऊ लागले आणि जो तो या विषयी बोलू लागला. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी वाटू लागली. लोकप्रतिनिधी, अधिकारी, शासकीय कर्मचारी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी आदि सगळ्याना आपले जीवाची पर्वा लागली. शासकीय कर्मचारी वर जेंव्हा कुणी हल्ला करतो तेंव्हा प्रत्येक कर्मचारी विचार करतो की आपले काही खरे नाही. पत्रकार मंडळी वर भरपूर हल्ले होतात. वास्तव लेखन करणाऱ्या लेखकांना जीवन जगणे कठीण होऊन राहते. म्हणजे इंग्रजाचा गुलामगिरी काळात ज्याप्रमाणे लोकाना विचार करण्याची सूट नव्हती. तसाच काहीसा प्रकार येथे दिसून येत आहे. जे कुणी समाजसुधारणा करण्यासाठी पाऊल उचलेल त्याचे पाय कापणे अगदी सर्रासपणे चालू आहे. विचार करणाऱ्या व्यक्तीची हत्या होऊ शकते पण विचाराची नाही हे कदाचित त्यांना ठाऊक नसेल.
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला परंतु इतर बाबतीत अजून ही पारतंत्र्यात आहे असे वाटते. स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्यनंतर भारतातील अनेक लोकांना खूप वाईट वागणूक मिळाली पण त्यांच्या डोक्यात कधी भारत सोडावे असे वाटले नाही. हा देश माझा आहे आणि मी या देशाचा एक घटक आहे ही भावना त्यांच्या मनात होती. आजही जेंव्हा विदेशात राष्ट्रगीत ची धून वाजते तेंव्हा आपण सावधान स्थितीमध्ये चटकन उभे राहतो. जे स्वतःचा मर्यादित विचार करतात त्यांना भारतच काय जगात कुठेही सहिष्णुता आढळून येणार नाही. सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे. आपण सर्व भारतीय आहोत या भावनेने एकत्र राहिलो तरच सर्व सुरक्षित राहू. एकमेकांवरचा विश्वास टिकून राहील याची काळजी घेऊ या. मी भारतीय आहे याची जाण राहिली की बाकी कशाचा त्राण वाटत नाही
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
Wednesday, 25 November 2015
🎬 ही चूक कोणाची 🎬
दैनिक लोकमत मध्ये दिनांक 24 नोव्हेंबर रोजी माझा " जागरूक व्हा, प्रदूषण रोका " हा लेख दुसऱ्याच्या नावाने प्रकाशित झाला आहे. रोजच्या प्रमाणे वर्तमानपत्र हातात पडलं आणि वाचण्यास प्रारंभ केलो. वाचता वाचता " प्रदूषण रोका, जागरूक व्हा " असा लेख दृष्टीस पडलं. क्षणभर विचार केला की माझ्या शीर्षकाप्रमाणे दिसतय, म्हणून वाचण्यास सुरू केली. लेखाच्या सुरुवात पासून अगदी शेवट पर्यंत शब्द न शब्द तेच होते. नव्हे ते माझेच लेख होते परंतु शेवटी नाव मात्र दुसऱ्याचे होते. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आणि खपच्या बाबतीत नंबर एक असलेल्या वृत्तपत्राकडून निश्चितच अशी अपेक्षा नाही.
खरोखर चूक कोणाची ? काय झालं असेल ? कोणी अंदाज लावू शकेल काय ?
यापूर्वी सुध्दा माझे लेख दुसऱ्याच्या नावावर इतर वर्तमानपत्रमध्ये प्रकाशित झाले आहेत. यावर काही करता येईल काय . . . . . . ?
Monday, 23 November 2015
📕📗📘📙📓📔📒📚📖📝
भारतीय शिक्षक मंच 1 . . . . . . . . आयोजित . . . . . . . . . . .
🎋 प्रासंगिक विचारधारा 🎋
📆 दिनांक : 24 नोव्हेंबर 2015
🔺वेळ : सकाळी 10 ते रात्री 07
विषय : आपले संविधान आणि आपण किंवा भारतीय संविधान दिन
** नियम व अटी -
🔻 कागदावर लिहून किंवा text मध्ये सुमारे 300 ते 500 शब्द मर्यादे लिहिलेले,
🔺विहित दिनांक आणि वेळेतच आलेले आणि
🔺विषयाला अनुसरून लिहिलेले लेखच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जातील.
🔻परीक्षकाचा निर्णय अंतिम राहिल.
🔺संविधान दिन अर्थात 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता निकाल जाहीर करण्यात येईल.
🔺दुसऱ्याचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
🔻स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात येतील.
🔻खालील मोबाईल क्रमांकावर आपणांस लेख पाठविता येईल.
संयोजन : नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
9423625769
🔭 दिग्दर्शन :
🔻जब्बार मुलाणी, पुणे
9503031146
🔺हरिश्चंद्र भोईर, ठाणे
9226435827
दिग्दर्शन : बाबाराव पडलवार, नांदेड
9403165441
जास्तीत जास्त नागरिकांनी या विचारधारेत सहभागी व्हावे.
ही विनंती
📕📗📘📙📓📔📒📚📖📝
आपल्या ग्रुप आणि मित्राकडे share करावे आणि जास्तीत जास्त मित्रांना यात सहभागी होण्यासाठी मदत करा 🙏🙏
भारतीय संविधान दिन
देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची रचना व अधिकार हे सर्व या संविधानात नमूद केलेले आहे. यामूळे देशाला बराचसा फायदा होतो जसे की, अधिकाराचा दुरुपयोग होण्यास प्रतिबंध करता येते, नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहतात, जनतेचा राज्यकारभारातील सहभाग वाढतो म्हणून संविधानानुसार राज्यकारभार केल्यास लोकशाही बळकट होते.
सन 1942 साली झालेल्या चले जाव लढ्याने देशाला आत्ता लवकरच स्वातंत्र्य मिळणार असे चित्र निर्माण झाल्यावर सन 1946 मध्ये संविधान निर्मीतीची प्रक्रिया सुरू झाली. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा आग्रह स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांचा होता. म्हणूनच आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीला संविधान सभा असे म्हटले आहे. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची तर घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची निवड झाली. संविधानाचा कच्चा आराखडा म्हणजे मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती तयार करण्यात आली व त्याचे अध्यक्ष म्हणून विविध देशाचा कायदा आणि कलम म्हणजेच तेथील संविधानाचा गाढा अभ्यास असलेले डॉ. भीमराव रामजी अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आली.
या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. यात सर्व जाती धर्माच, विविध भाषा बोलणारे आणि विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांचा या समितीत समावेश होता. डॉ. राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे. बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता आदि अनेक मान्यवर या संविधान सभेत सदस्य म्हणून होते. बी. एन. राव या कायदेतज्ज्ञ व्यक्तीची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली.
संविधान सभेचे पहिले अधिवेशन या संविधान सभेचे अध्यक्ष असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 09 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली व प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करण्यात आली. संविधान सभेचे एकूण अकरा अधिवेशने भरविण्यात आले. प्रत्यक्ष कामकाज 165 दिवस चालले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11महीने आणि 17 दिवस असे अहोरात्र अभ्यास व चिंतन करून भारताचे संविधान तयार केले. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला.संविधान सभेत चर्चा, सल्ला मसलत, विचार विनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. घटनेच्या मसुद्यामध्ये 315 कलमे व 7 परिशिष्टे आहेत. विरोधी मतांचा आधार व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार करून या संविधानास मूर्त स्वरूप देण्यात आले आणि अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे तयार करण्यात आलेले संविधान देशाला अर्पण करण्यात आले. म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.
म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सन 1930 मध्ये भरविण्यात आले आणि त्यात 26 जानेवारी हा दिवस " स्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा ठराव करण्यात आला आणि सर्वानी त्यास मंजूरी ही देण्यात आली. इंग्रजांना आत्ता देशातून हाकालून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही अशी शपथ घेण्यात आली आणि स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जोर धरू लागली. इंग्रज भारत सोडून गेले आणि आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वंतत्र झाला. 26 जानेवारी या दिवसाची देशांतील नागरिकांना सतत स्मरण व्हावे यानिमित्ताने या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस 1950 पासून स्वराज्य दिन ऐवजी प्रजासत्ताक दिन वा गणराज्य दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरी करण्यात येत आहे.
भारतीय संविधानात स्वातंत्र्य, समता, समानता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता, या मूल्यांचा स्विकार केलेला आहे. यात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य स्पष्ट सांगितले आहे. आपण सर्व या संविधानाचा आदर केला पाहिजे. चला तर मग आज आपण सर्व संविधानाची शपथ घेऊ या आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,
आमच्या संविधान सभेस आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा.

Subscribe to:
Posts (Atom)
विद्यार्थी प्रिय शिक्षक : कृष्णा येरावार
विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक कृष्णा येरावार धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रातील पी एम श्री जि. प. प्रा. शाळा बे...
-
दीपोत्सवाचा सण : दिवाळी दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळी सणाची आबालापासून वृध्दापर्यंत सर्वानाच चातक पक्ष्य...
-
आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर भारतमातेचे दोन ...
-
कर्मचाऱ्यांच्या जीवनातील एक अनमोल क्षण म्हणजे सेवानिवृत्ती. एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू अशी विपरीत स्थिती यावेळी असते. कभी खुशी, कभी...