Friday, 21 October 2016

जुनी पेंशन योजना

शासकीय कर्मचाऱ्यासाठी जुनी पेंशन योजना बंद
*शासन नव्हे शोषण व्यवस्था .....!*

शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल होतो. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे सांगणारे महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा त्यासाठी अपार कष्ट सोसले. लोकांकडून फुले दाम्पत्याचा खूप छळ केला गेला पण त्यांनी आपले शैक्षणिक कार्य थांबविले नाही. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यात फुले दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपणास गाव तेथे शाळा बघायला मिळत आहे आणि तळागाळातील व्यक्ती सुध्दा शिक्षण घेत आहे.
आज शासनाने जे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण चालू केले आहे ते महात्मा फुलेंनी सन १८८२ मध्ये हंटर कमिशनच्या समोर दिलेल्या साक्षी मध्ये म्हटले होते की " सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना  मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण दिले जावे " परंतु त्यांना त्याकाळी अनेक वाईट प्रसंग आणि अनुभवास तोंड द्यावे लागले. दिनाक १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली परंतु त्या ठिकाणी शिकविण्यासाठी कोणीच तयार होईना. त्या काळी शिकविण्याचे काम बर्‍याच जणांना तुच्छतेचे वाटत असे. तसेच शिकविण्याचे काम हे येड्यागबाळ्याचे नाही, त्यासाठी खूप मोठी विद्या जवळ असावी लागते असा ही गैरसमज होता. परंतु जोतिबांनी आपल्या निरक्षर पत्नीला म्हणजे सावित्रीबाईला घरीच शिकविले आणि देशातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान दिला. समाजात गुरूला कोणत्या संकटाला, त्रासाला तोंड द्यावे लागत होते याची प्रचिती यावरून आपणाला येते. समाजात हळूहळू शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. शिक्षणाचे महत्व लोकांना कळू लागले. देशातील नेते आणि पुढारी समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगू लागले. शिक्षणाविषयी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.' त्याच सोबत ते लोकांना स्वत:चा समाजाचा विकास करायचा असेल तर 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र दिला. त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर शिक्षणाचा खेडोपाडी दरी-खोर्‍यात प्रसार झाला. शाळा तर उघडल्या जात होत्या मात्र त्यांना शिकविण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते अशी स्थिती नव्वदच्या दशकात होती. सन १९९० च्या दशकापर्यंत मुलांना शिकविण्यासाठी 'शिक्षक' म्हणून नोकरी करण्यासाठी पुढे येणार्‍यांची संख्या फारच कमी होती. कारण या काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजलं जात असे. त्यामुळे सहसा कोणी पुढे येत नव्हते. जे शिक्षक म्हणून काम करीत होते ते कधी तिकडे व्यवसाय म्हणून पाहिले नव्हते. ती त्यांची एक प्रकारे सेवा होती. असा त्यांचा स्वभाव होता.
निःस्वार्थ म्हणता येणार नाही परंतु जेवढे मिळते तेवढय़ावर समाधान मानून सेवाभावी मनाने काम करणारी शिक्षक मंडळी समाजात मानाचे स्थान मिळवून गेले. परंतु पुढील दहा वर्षात शिक्षक पेशेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि झटपट नोकरी म्हणून प्रत्येक जन या क्षेत्रास पहिली पसंदी देऊ लागले. बघता बघता या क्षेत्रात स्पर्धा वाढू लागली. पाचवा वेतन आयोग लागू झाला अन शिक्षक मंडळीचे पगार तीन पट वाढले तसे लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पगारात वाढ झाली तसे शासनाच्या तिजोरीवर ताण पडल्याचे कारण समोर आणत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकार मधील शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शिक्षण सेवक ह्या पदाची निर्मिती केली. तीन वर्षे तीन हजार रुपया वर नोकरी करायची आणि तीन वर्षानंतर शिक्षक म्हणून नेमणुक करण्याची पध्दत सुरुवात केली. येथपासून शिक्षण क्षेत्रात घसरण सुरु झाली. शाळेत दोन प्रकारचे शिक्षक काम करू लागले एक फुल पगारी तर दुसरा अगदी तुटपुंजी वेतनावर. समान काम समान वेतन कायदा असून देखील तो या ठिकाणी लागू होत नव्हता. हे सरळ सरळ त्यांच्यावर अन्यायच होता आणि आहे. मात्र याबाबत अजुन लपर्यन्त काहीही झाले नाही. यापुढे जाऊन शासनाने 01 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्याना पेंशन योजना बंद करण्याची अधिसूचना 2009 मध्ये काढली त्यामुळे ही शिक्षक मंडळी पुन्हा हतबल झाली. शासकीय कर्मचारी हा सेवानिवृत्ती नंतर फक्त पेंशनवरच जगु शकतो. त्याशिवाय त्याचे उर्वरित आयुष्य जगणे फारच कठीण याची जाणीव शासनाला होऊ नये याचा अर्थ हे शासन नसून शोषण व्यवस्था आहे असे खेदाने म्हणावे लागेल, असे ही शिक्षक मंडळी आपसात बोलताना व्यक्त होत आहेत. शिक्षणावर मोठमोठ्या गोष्टी करणारे मंत्रीमंडळ यांच्या बाबतीत असा निर्णय का घेत असेल ? आमदारकी किंवा खासदारकी म्हणून पाच वर्षासाठी एकदा निवडून गेले की त्यांना पेंशन मिळते. पण तीस वर्षे जनतेची सेवा केलेल्या कर्मचारी वर्गास पेंशन दिले जात नाही हे खरोखरच खुप क्लेशदायक वाटत नाही काय ?
पेंशन ची गरज -
माणूस कोणत्या वयापर्यंत काम करू शकतो. साधारणपणे 58 वयापर्यंत अगदी चांगल्या पध्दतीने काम करतो. सेवानिवृत्तीनंतर पेंशन मिळत असल्यामुळे तो चिंतामुक्त असतो. त्याला कश्याची काळजी वाटत नाही, कसे ही आपला परिवार जगवू शकतो एवढं पेंशन मिळते या भरवश्या वर तो जगत राहतो. पेंशन असल्यामुळे घरात थोडी फार इज्जत देखील मिळते. म्हातारपणात कुणी जरी साथ दिली नाही तरी पेंशन मात्र निश्चितपने आधार बनते. याचा अनुभव आजपर्यंतच्या पेंशनधारक लोकांना आलेले आहे. पण मध्येच ही योजना बंद केल्यामुळे आज सन 2005 नंतरचा प्रत्येक सरकारी कर्मचारी चिंताग्रस्त आहे, त्यातल्या त्यात शिक्षक मंडळी तर जास्तच आहेत. आज त्यांच्याकडे भविष्य निर्वाह निधी च्या खात्या ऐवजी सन 2009 पासून खास या लोंकासाठी DCPS नावाचे खाते चालू करण्यात आले. ज्यात एकूण पगारीच्या 10 टक्के रक्कम जमा करावीच लागते असे बंधन आहे. या योजनेत खाते असलेल्या अनेक कर्मचारी मंडळींना खाते क्रमांक मिळाले नाही, या खात्यात जमा झालेला पैसा कुठे आहे याचा मागमुस नाही, पैसे भरल्याची पावत्या नाहीत. सर्व काही आलबेल चालू आहे. सर्व जमा रक्कम गोपनीय आहे मात्र त्यांचा पैसा त्यांना परत मिळत नाही ही खरी शोकांतिका आहे. घटनेतील कलम सहा नुसार संधीची व दर्जाची समानता असावी असे म्हटले जाते मग इथे ही असमानता का ? 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी चे लोक जनतेची सेवा करीत आहेत म्हणून त्यांना पेंशन आणि त्यानंतर जे शासकीय कर्मचारी म्हणून जनतेची सेवा करीत नाहीत काय ? मग त्यांना पेंशन पासून दूर का केल्या जातोय ? सध्या हा प्रश्न राज्यातील लाखाच्या वर कर्मचारी लोकांच्या मनात छळत आहे. पेंशन बंद झाल्यामुळे त्यांना पुढील जीवन अंधकारमय दिसत आहे. याच काळजीपायी अनेक शिक्षक मंडळीचा मृत्यु देखील झाला. त्याबदल्यात कुटुंबाला काहीही मिळाले नाही असे सांगणारे कुटुंब देखील आज राज्यात आढळून येतात. त्यांचे कुटुंब उघड्यावर आणि पोरं वाऱ्यावर आहेत. शाळेत न येणाऱ्या मुलांसाठी शासन खुप पैसा खर्च करते, मात्र त्याच व्यवस्थेतील कुटुंबाला मात्र काही मिळत नाही. याच संदर्भात शासन समोर आपले म्हणणे मांडण्यासाठी रविवारी 23 ऑक्टोबर रोजी शिक्षक, ग्रामसेवका सह सर्व शासकीय कर्मचाऱ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्मचारी लोकांना आक्रोश करण्याची त्यांच्यावर वेळ यावी यापेक्षा नामुश्की काय असू शकेल. एकाच राज्यात एक कर्मचारी तुपाशी आणि एक कर्मचारी उपाशी हा दुजाभाव कशासाठी ? अश्या बाबीमुळे कर्मचारी मन लावून काम करेल काय ? सध्या राज्यात जे डिजिटल चे वारे चालू आहेत. त्यात या काळातील शिक्षक मंडळीचा सिंहाचा वाटा आहे. आधुनिक तंत्रज्ञाना मध्ये ही मंडळी खूपच हुशार असल्या कारणामुळे शाळा डिजिटल होण्याचे प्रमाण वाढीस लागले हे सत्य नाकारुन चालणार नाही. ज्याप्रकारे बुडत्याला काठीचा आधार जिवंत ठेवतो अगदी त्याच पध्दतीने शासकीय कर्मचारी साठी पेंशन ही एक आधाराची काठी आहे. तेंव्हा शासनाने याविषयी राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी लोकांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याचे चांगले परिणाम नक्कीच पाहायला मिळेल असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
   मु. येवती ता. धर्माबाद
   09423625769


Tuesday, 18 October 2016

वृत्तपत्र email

महाराष्ट्रातील काही प्रमुख वर्तमानपत्र व इतर नियतकालिकाची email id देत आहे.

१. दैनिक देशोन्नती - deshonnati2008@gmail.com

२. दैनिक पुण्यनगरी - punya.aurangabad@gmail.com

३. दैनिक गांववाला - gaonwaladaily@gmail.com

४. दैनिक एकमत - dainikekmat@gmail.com

५. दैनिक एकजूट - dailyekjoot@yahoo.co.in

६. दैनिक संघर्ष - dailysangharsh@gmail.com

७. दैनिक सत्यप्रभा -  dainiksatyaprabha@yahoo.com

८. दैनिक लोकपत्र - lokpatra2016@gmail.com

९. दैनिक वाचकमंच - vachakmanch@gmail.com

१०.दैनिक सकाळ - editor@esakal.com

११. दैनिक उद्याचा मराठवाडा - umarathwada@gmail.com

१२. दैनिक गोदातीर - godatir@gmail.com

१३. दैनिक प्रजावाणी - prajawani@rediffmail.com

१४. दैनिक मराठवाडा नेता - marathwadaneta@gmail.com

१५. दैनिक सामना - saamana.a@gmail.com

१६.दैनिक लोकसत्ता - loksatta@expressindia.com

१७. दैनिक राजसम्राट - rajsamratjln@gmail.com

१८. दैनिक पुढारी - news.kop@pudhari.co.in

१९. दैनिक लोकमत - nskedit@gmail.com

२०. दैनिक गावकरी - newsadarshgavkari@gmail.com

२१. दैनिक देशदूत - info@deshdoot.com

२२. दैनिक नवाकाळ - navakal.1923@gmail.com

२३. दैनिक रिपब्लिकन गार्ड - republicanguard@gmail.com

२४. दैनिक समता दर्पण - samtadarpan@gmail.com

२५. दैनिक युगांतर - dainikyugantar@gmail.com

२६. दैनिक समीक्षा - dainikyugantar@gmail.com

२७. दैनिक राष्ट्रशिल्पकार - rsvnanded@yahoo.com

साप्ताहिक

१. साप्ताहिक लोकसंकेत - namdevyelkatwar.nnd@gmail.com


पाक्षिक


मासिक

०१. तुम्ही आम्ही पालक - tumhiaamhipalak@gmail.com


त्रैमासिक



सहामाही



वार्षिक


वरील यादीत आपणास माहित असलेल्या वर्तमानपत्राची नाव आणि email id लिहून सहकार्य करावे. तसेच काही चूक निदर्शनास आल्यास खालील comment box मध्ये लिहावे दुरुस्ती होईल.


जनहितार्थ ...........!

धन्यवाद........!

Saturday, 15 October 2016

स्वच्छतेचे महत्व

                


                     स्वच्छतेचे महत्त्व
                          - नागोराव सा. येवतीकर

स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ह्या एका गुणा मुळे माणसाचे जीवन सुंदर बनते. ही एक सवय आहे. स्वच्छता म्हटली की आपल्या समोर अनेक बाबी उभ्या राहतात. स्वच्छता कश्याकश्याची आणि कशी ठेवायाची हा मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. स्वच्छतेची सुरुवात ही स्वतः पासून म्हणजे स्वतःच्या शरीर स्वच्छते पासून करावी. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या स्वच्छते विषयी आपण जागरूक राहून कार्य केल्यास आपली छाप इतरावर निश्चितपणे पडते. लहानपणी सकाळी उठले की आई मुलांच्या मागे राहून दात स्वच्छ घास, चूळ भर आणि हात-पाय स्वच्छ धुउन घेण्याविषयी तगादा लावते. कारण स्वतः च्या स्वच्छतेची सुरुवात ही याच क्रियेपासून होते. लहानपणी लागलेली स्वच्छतेची चांगली सवय त्यांच्या सोबत आयुष्यभर राहते ही तर चांगली गोष्ट आहेच यासोबत आपल्या दाताचे आयुष्यही वाढते. दाताचे विकार होत नाही. आपल्या जीवनात दाताचे काय महत्त्व आहे हे दात नसणाऱ्या लोकांना विचारून पहिल्याशिवाय कळणार नाही. स्नान करणे ही त्या नंतरची अत्यंत महत्वाची क्रिया. बहुतांश व्यक्ती स्नान ही क्रिया महादेवाला पाणी घातल्यासारखे डोक्यावरुन पाणी ओततात त्यामुळे अंगाची सफाई होत नाही. साबणाचा वापर करीत अंग घासुन स्नान केल्यास आपल्या अंगाचा वास येत नाही. विशेष म्हणजे त्वचा रोगापासून आपण दूर राहू शकतो. दररोज स्वच्छ कपडे परिधान करून बाहेर पडण्याची आपली सवय इतराना त्रासदायक ठरत नाही. मळके कपडे अंगावर असतील आणि प्रवासात कुठे तरी आपण बसलात तर कपड्याच्या दुर्गन्धी मुळे कुणी आपल्याजवळ बसत नाही. शाळेत तर याचा फार वेगळा अनुभव येतो. त्यामुळे घराबाहेर जाताना स्वच्छ कपडे एक तर आपणास शोभुन दिसते आणि आपल्यामुळे इतराना त्रास ही होत नाही. म्हणून स्वच्छ कपडे वापरण्याची सवय शाळेत असताना जी लागते ती आयुष्यभर सोबत राहते. बाहेरुन घरात येताना हात-पाय स्वच्छ धूउन घरात प्रवेश करावा. बहुतांश वेळा मुले बाहेर उघड्यावर खेळतात आणि तसेच घरात प्रवेश करतात. ज्यामुळे बाहेरील अनेक किटक थेट घरात प्रवेश मिळवितात आणि घरातील अनेक लोक आजारी पडतात. शौचास जाऊन आल्यावर सुद्धा स्वच्छ हात-पाय धुवावे आणि मगच घरात यावे. जेवण करण्यापूर्वी हात अगदी स्वच्छ धुवावे आणि कोरड्या रुमालाने साफ करावे. रात्री झोपण्या पूर्वी सुद्धा स्वच्छ हात-पाय धुतल्या नंतर छान झोप लागते की नाही ते पहा. म्हणजे स्वतः ची स्वच्छता ही जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. याशिवाय आपले जीवन दीर्घायुष्य होउच शकत नाही. अस्वच्छ रहाणे म्हणजे आपले अर्धे आयुष्य कमी करून घेण्यासारखे आहे. त्याच अनुषंगाने नुकतेच आपण जागतिक हात धुण्याचा दिवस साजरा केला आहे. त्यातून आपणास हाच संदेश मिळतो की स्वच्छ रहा ; निरोगी रहा.

स्वतःच्या स्वच्छतेनंतर आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो आणि ते आवश्यक आहे. कारण आपले ज्याठिकाणी उठणे, बसणे, खाणे, आणि पिणे असते त्या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे आहे. त्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी आपले घर झाड़ूने साफ करीत असतो. आपले अंगण स्वच्छ करतो. घरातील आणि अंगणातील कचरा परिसरात टाकतो. म्हणजे आपणास परिसर घाण असलेले चालते परंतु आपले घर आणि अंगण स्वच्छ असावे असे वाटते ही प्रत्येकाची मानसिकता आहे. हा बदल करण्यासाठी स्वच्छतेचे धडे किंवा पाठ आज समाजाला शिकविण्याची खरी गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे हे चुकीचे आहे हे कळतय पण वळत नाही अशी स्थिती झाली आहे. 
आज ग्रामीण भागात जर गेलो तर गावाच्या प्रवेशालाच दुर्गन्धी सुरु होते. प्रत्येक जण उघड्यावर शौचास जाउन गावाचा प्रवेशाचा संपूर्ण रस्ता अस्वच्छ करतात. यात कधी बदल होणार आहे ? गावात असलेली शाळा आपणास कधीच स्वच्छ ठेवता येत नाही. शाळा सुटली की गावातले काही रिकामटेकडे पोरे शाळेत येऊन वर्ग खोल्याच्या भिंती खराब करतात. काही गुटखा शौकीन मुले पान तंबाखू खातात आणि सर्व परिसर कधी कधी भिंती रंगवून टाकतात. दारू पिणारे मंडळी दारू पितात आणि वर्ग खोलीत बाटली फेकतात तर काही जण बाटली मैदानावर टाकतात, अश्या रीतीने सकाळी स्वच्छ केलेला शाळेचा परिसर सायंकाळी घाण केल्या जातो. शालेय स्वच्छालय कोणत्याच गावात चांगली ठेवली जात नाहीत. ज्या गावात शालेय स्वच्छालयाची देखभाल स्वतः गावकरी करीत असतील त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते. गावात इतर काही ठिकाणी सुध्दा ही मंडळी अस्वच्छता पसरवितात. ज्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे गावात साथीचे अनेक रोग पसरतात. मग दवाखाना आपल्या मागे लागते. जेथे लाखो रुपये खर्च करावे लागते तरी आपले डोळे उघडत नाही आणि आपला गांव स्वच्छ ठेवत नाही. डेंग्यू सारखा आजार तर कधी कधी आपला जीव ही घेतो. हा रोगप्रसार फक्त आणि फक्त आपल्या अस्वच्छतेमुळे होते याची जाणीव आपणास व्हायला हवी. ग्रामपंचायत कार्यालय जमेल तेवढे कार्य करते पण संपूर्णपणे त्यावर अवलंबून रहाणे हे ही चूक आहे. वैयक्तिक स्वच्छते सोबत गावाची स्वच्छता देखील तेवढीच महत्वाची आहे.
सार्वजनिक ठिकाणी आपली वागणूक चांगली असेल तर परिसर स्वच्छ राहू शकते. बरेच जण सार्वजानिक ठिकाणी बेजबाबदरपणे वागतात आणि त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवास करताना असा अनुभव खास करून येतो. बसमध्ये प्रवास करणारे काही मंडळी पान तंबाखू आणि गुटखा खाऊन कोपऱ्यात थुंकुन सर्व जागा घाण करतात. त्यामुळे इतर प्रवाश्याना त्याचा त्रास होतो. धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे ह्या फलक ऐवजी कोपऱ्यात थुंकू नका असे फलक लावावे लागेल असे वाटते. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ करणाऱ्या व्यक्तिस दंड लावण्याचा कायदा अस्तित्वात आहे मात्र फक्त तो कागदावरच आहे. त्याची अंमलबजावणी जर करण्यात आली आणि दंड लावण्याची प्रक्रिया चालू केल्यास अस्वच्छता कमी होईल, असे वाटते. बसनंतर सर्वात जास्त प्रवासी वाहून नेणारे रेल्वेमध्ये स्वच्छता दिसणे खूपच दुरापास्त आहे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणारे नागरिक रेल्वेत मात्र सर्व काही विसरून वागतात. जेथे काही खाल्ली तेथेच कचरा करतात. ज्याचा त्रास इतर प्रवाश्याना होतो. कधी कधी त्याचे बळी आपणच ठरतो हे ही सत्यच आहे. बागेत सुध्दा आपली हीच बेफिकिर वृत्ती दिसून येते. पर्यटननाच्या स्थळी सुध्दा आपण स्वच्छ वागतो असे काही दिसून येत नाही. त्यामुळे बस आणि रेल्वेमधील स्वच्छता असो वा इतर ठिकाणची स्वच्छता ही आपल्या हातात आहे. ती आपली सर्वाची मालमत्ता आहे अशी काळजी घ्यावी. आपण एकटे स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करू या आपल्या सोबत एक-दोन व्यक्ति तरी निश्चितपणे या मार्गावर येतात. महात्मा गांधीजी यांनी ज्याप्रकारे आपल्या जीवनात स्वच्छतेला महत्त्व दिले होते. तसे आपण ही महत्त्व देऊ या. स्वच्छ भारत निर्माण करण्यात आपले ही काही योगदान देऊ या.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769
nagorao26@gmail.com
★★★★★★◆◆◆◆◆◆★★★★★★★★
[10/16, 3:37 PM] ‪+91 99228 61408‬
*स्वच्छतेचे महत्त्व*                 
------------------- शामल कुलकर्णी             
स्वच्छता म्हणजे फक्त बाह्य स्वरूप नाही.तर स्वछता हे आरोग्यदायी जीवनाचे बहुसमावेशक तत्व आहे.ती मनाची व अंतः करणाची अवस्था देखील आहे. ज्यामध्ये आपली नैतिक मूल्ये आणि उपासना यांचा समावेश होतो.                   गावागावातून ज्यांनी स्वच्छतेचे धडे दिले त्या संत गाडगेबाबांना एकाने प्रश्न विचारला , बाबा आपण मंदिरात का येत नाहीत? तेंव्हा बाबा बोलले अरे देव दगडात नाही तर माणसात आहे. आणि त्याच्या निरोगी जीवनासाठी मला हा मंदिराबाहेरील पडलेले फुले, नारळाचा कचरा साफ करणे गरजेचे वाटते. त्यांचा हा विचार आपल्याला अगदी विचार करायला लावणारा आहे.
          जगभरात स्वच्छतेविषयी एकसमान दर्जे नाहीत आणि वेगवेगळ्या लोकांना स्वच्छतेविषयी वेगवेगळ्या कल्पना असतात. पूर्वी, शाळेचा परिसर स्वच्छ, नीटनेटका असायचा आणि त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी चांगल्या सवयी लागत असतात. 

 दररोजच्या जीवनात किंवा व्यापारी जगातही स्वच्छतेच्या बाबतीत प्रौढ नेहमीच आदर्श नसतात. जसे की, पुष्कळशी सार्वजनिक ठिकाणे घाणेरडी, गलिच्छ असतात. काही कंपन्यांमुळे वातावरणात प्रदूषण होते. प्रदूषणाला, कारखाने आणि व्यापार नव्हे तर त्यातील लोक जबाबदार आहेत. प्रदूषण व त्याच्या दुष्परिणामांच्या जागतिक समस्येचे प्रमुख कारण स्वार्थ असला तरीही लोकांच्या अस्वच्छ वैयक्तिक सवयी देखील काही अंशी याला कारणीभूत आहेत. ऑस्ट्रेलियन राष्ट्रसंघाचे भूतपूर्व अध्यक्ष यांनीही या निष्कर्षाला सहमती दर्शवत असे म्हटले: “सार्वजनिक आरोग्यासंबंधीचे सर्व प्रश्न प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक मुलावर अवलंबून आहेत.”
           स्वच्छता स्वतः पासून सुरु करा . वैयक्तिक  स्वचतेच्या लक्ष्मण रेषा पाळल्या की सामाजिक स्वच्छता आपोआपच घडून येते.
म्हणूनच घेऊ वसा मन प्रसन्न करण्याचा, शरीर निरोगी करण्याचा , घर -परिसर स्वच्छ ठेवण्याचा,समाज निरोगी करण्याचा!!                        शामल कुलकर्णी                      kulkarnishamal79@gmail.com
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

[10/16, 6:25 PM] ‪+91 94228 62625‬

स्वच्छता आपली मुलभूत गरजच आहे.केवळग पंतप्रधानांनी आवाहन केले म्हणुन नाही तर प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून स्वच्छतेच पालन केल पाहीजे.
जवळजवळ ६०% आजारांच मुळ अस्वच्छतेत असत.
प्रत्येक व्यक्तीन लहानपणापासुनच स्वच्छतेचा धडा गिरविला पाहीजे जो आयुष्यभर पक्का लक्षात बसेल..घर, परिसर, गल्ली, गाव, शहर देश  अस स्वच्छतेच अव्याहत चक्र चालु असेल तर आपल जीवन सुकर होईल अन्यथा घाण, रोगराई, प्रदुषण याचा पडत असलेला विळखा आणखी घट्ट होऊन मानवी जीवन जगण कठीण होत जाईल..
आपलआरोग्य निसर्ग याच्या संरक्षणार्थ स्वच्छतेचा मार्ग हाच सुखी जीवनाचा मार्ग असेल 
..पुष्पा गायकवाड 
नांदेड🙏
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

[10/16, 6:41 PM] 
 विश्वची माझे घर असे संत मंडळी बोलून गेलीआहेत .आपण स्वत: ते विश्व या आयुष्याच्या प्रवासात आपले कुटुंब,घर, शेजारी पाजारी,परिसर,गाव ,तालुका,जिल्हा ,राज्य, देश या सार्यांशी आपली व्यक्ती म्हणून देशाचा जबाबदार नागरीक म्हणून बांधिलकी असते.
        'स्वच्छता' ही अशीच वैयक्तिकते कडून सामाजिकते कडे नेणारी गोष्ट आहे.
       स्वच्छतेचे बाळकडू 
बालपणापासून आपणास मिळत आले,स्वच्छतेच्या चांगल्या सवयी जोपासत आपण शाळा शिकलो ,मोठे झालो.कुटुंबातून ,शिक्षकांकडून ,पाठ्यपुस्तकातून स्वच्छता का करायची हे ऐकत आलोआणि तेपटणारेच होते. सकाळच्या रम्य प्रहरी शरीराची ,घराची ,परिसराची स्वच्छता झाली की प्रसन्न वाटते.या प्रसन्नतेत देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले वा घरच्याच देव्हार्यासमोर प्रार्थना श्लोक म्हटले की मनही ताजे तवाने होऊन जाते.मनातील नकारात्मक विचारांची जागा सुविचार कधी घेतात कळतही नाही.आणि मग जाणीव होते स्वच्छता म्हणजे नेमके काय याची.शरीरातील,मनातील घरातील नको असणारे निरूपयोगी,अडगळ ,अस्वच्छ असे सारे दूर केल्याने योग्य विल्हेवाट लावल्याने मंगलमय असे वातावरण तयार होते.ज्याची सर्व प्राणी मात्रांना गरज आहे.
    देह देवाचे मंदीर
    आत्मा एक पंढरपूर
हे खरे आहे.जसे देहामधे परमेश्वराचे अस्तित्व आहे तसेच ते चरचरात भरून उरले आहे मग आपण या सृष्टीची किती स्वच्छता ठेवायला हवी हे वेगळे सांगायला नको. 
      स्वच्छ शरीरामुळे व स्वच्छतेच्या सवयींमुळे उत्तम आरोग्याचा लाभ होतो .हे वैयक्तिक आरोग्य ा बरोबरच सामाजिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे.कचर्याची योग्यप्रकारे सुका कचरा ओला कचरा अशी विभागणी करण्याची सवयही अंगीकारणे गरजेचे आहे.डंपिंग ग्राउंडची समस्या उग्र रूप धारण करते आहे .हे सामाजिक भान आपल्यात जागवणे ही काळाची गरज आहे.आज ई_कचरा ही सुद्धा दिवसा गणिक वाढणारी समस्या ठरते आहे याकडेही  समाजाचे लक्ष वेधणे व स्वच्छतेच्या प्रश्नाकडे अधिक सजगतेने पहाणे गरजेचे आहे.
    मी ,माझ्यापुरते पाहून चालणार नाही.देशाच्या स्वच्छता अभियानाचे आपण सारे जण अग्रदूत होउन काम केले तर स्वच्छ गाव,स्चछ देश हे स्वप्न सत्या त उतरेल नाहीतर माझ्या एकट्याने स्वच्छतेचे महत्व जाणून काय होणार? हा नकारात्मक विचार झटकून स्वच्छतेची क्रांती लाट यायला हवी.विज्ञानयुगात स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणार्या अनेक बातम्या, शोध ,जाहिराती प्रसारीत होतात.अनेक रोगजंतूचा प्रसार रोखण्यासाठी रोग बरे होण्यासाठी औषधांबरोबरच आरोग्यदायी वातावरणाची
नितांत आवश्यकता आहे.
सत्यम शिवम सुंदरम,अशी वाटचाल करायची तर स्वच्छ  शरीर
       व स्वच्छ सुंदर मन
घडवायलाच हवे.ज्याची सुरूवात स्वतापासून करूया तरच स्वताची कर्तव्ये पार पाडण्यासाठी
योग्य उर्जेची प्राप्ती होईल.निसर्ग सुंदर आहे,आयुष्य सुंदरआहे.
चला तर मग हाती घेऊन हात
अस्वच्छतेवर करू मात
सुविचारांना देऊ साथ
आरोग्यदायी  उगवेल प्रभात
[10/16, 6:42 PM] विद्या प्रभू: विद्या प्रभु मुंबई९७६९३९४६४८
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

[10/16, 6:51 PM] ‪+91 80079 17680‬

 स्वच्छतेच महत्व 
  स्वच्छता ही एक कला आहे,
    स्वच्छता कशी राखायची,
      हे ज्याने त्याने ठरवायच,
प्रॉब्लेम सर्वानाच असतात,प्रॉब्लेम सोडवायचे,
 की रडत बसायचे 
   हे ज्याने त्याने ठरवायाचे.
खरच स्वच्छता ही आपल्या जीवनात नंदनवन फुलविते.स्वच्छतेचाच आग्रह सर्वानी धरला पाहिजे.त्यामुळे केवळ आपल्या शारीरिक च नव्हे तर सामाजिक तक्रारी देखील दूर होतील.कारण आपण पाहतो आजुबाजुला पडलेला कचरा केवळ आपलेच नाही तर प्राण्यांच्या आरोग्य करिता अपाय कारक आहे.म्हणूनच सर्वाना हीच विनंती की आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच परिसर ही स्वच्छ ठेवन्यास कटीबध् असावे.
 आपण शारीरिक स्वच्छता नियमित करावी.त्यामुळे आपण इतरासाठी आदर्श ठरू शकतो.
  ओला कचरा व् सुका कचरा याचे योग्य व्यवस्थापण व्हायला हवे.चला तर मग स्वच्छता पाळू,रोगराई टाळू.
जायभाये एस बी




Friday, 14 October 2016

वाचन प्रेरणा दिन

वाचन प्रेरणा दिन निमित्त

वाचाल तर वाचाल अशी एक म्हण आपल्याकडे प्रसिध्द आहे. वाचन हा प्रत्येक मानवाच्या मेंदुचा खुराक आहे. वाचन केल्यामुळे आपणास बरीच माहिती मिळते. ज्ञानाचा साठा वाढतो. त्याच सोबत आपण प्रगल्भ देखील बनत असतो. आजकाल वाचन करणे फार कमी होत चालले आहे अशी समाजात ओरड सुरु आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. याउलट सोशल मीडिया नावाच्या whatsapp आणि फेसबुक मुळे लोकांची वाचन संस्कृती वाढली असे म्हणण्यास काही हरकत नसावी. दिवसातुन अनेक ग्रुपच्या माध्यमातुन बरीच अनोळखी माहिती बघायला आणि वाचायला मिळत आहे. हे काय कमी आहे. त्यातल्या त्यात ebook लाईब्रेरी मुळे तर पुस्तकांच्या पुस्तके pdf मध्ये वाचता येत आहेत. आज जे पुस्तक म्हटले त्या पुस्तकाची माहिती नेट वर उपलब्ध होत आहे आणि त्यातून वाचन संस्कृती मध्ये वाढ होत आहे. असे जरी दिसत असेल किंवा भास होत असेल तरी वास्तव थोडे वेगळे आहे. हे ही नाकारुन चालत नाही.
वाचनाच्या प्रक्रियेला शाळेतुन सुरु होते. तसे मुले लहान असताना चित्र वाचन अगदी छान रित्या करतात. तेथून त्यांच्या वाचन कौशल्य विकसित होण्यास सुरु होते. मग त्यानंतर अक्षर आणि अंकाची ओळख होते. हळूहळू वाचन कला जमायला लागते. भाषा कौशल्यामध्ये श्रवण व भाषण हे फार महत्वाचे आहे. कारण त्यावरच वाचन ही क्रिया पूर्णपणे अवलंबून आहे. ज्यांच्या वरील दोन क्रिया योग्य प्रकारे होते त्या मुलांचा विकास योग्य दिशेने होतो. तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना श्रवण व भाषण ही क्रिया जमवण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी केला जातो. तेथे प्रगती नक्की दिसते. खाजगी शाळेत यावर आवर्जून लक्ष दिले जाते. तर इकडे सरकारी बालवाडी मध्ये खाऊ वाटप करण्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही. यात मला त्यांना दोष द्यायचा नाही पण पाया मजबूत करण्याकडे कुणाचेच अजिबात लक्ष नसते आणि मुले वरच्या वर्गात गेली की त्याला लिहिता वाचता येत नाही म्हणून त्या दोषाचे खापर शिक्षकांच्या अंगी फोडून मोकळे होणे एवढे मात्र सर्वाना जमते. एखादा रस्ता ख़राब होताना वेळीच लक्ष दिले आणि तातपुरती दुरुस्ती केली तर रस्ता दीर्घकाळ टिकू शकतो. त्याकडे लक्षच दिले नाही तर रस्ता पुन्हा नव्याने करावा लागतो. विद्यार्थ्यांचे जवळपास तसेच आहे. प्राथमिक वर्गात असताना त्यांच्या चूका व त्रुटी लक्षात घेऊन त्यात दुरुस्ती केल्यास ती मुले शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाणार नाहीत. अमुक विद्यार्थ्याला लिहिता वाचता येत नाही हे वरच्या वर्गात गेल्यावर लक्षात आल्यास काहीच करता येत नाही. रस्ता पुन्हा नव्याने करता येऊ शकेल पण विद्यार्थ्यांना पुन्हा पाहिली किंवा दूसरी चा अभ्यास शिकवून तयार करणे फार कठीन आणि जिकरीचे आहे. त्यासाठी वेळीच पालक शिक्षक यांनी जागरूक होऊन त्यांच्या प्रगती कडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांच्या एकूणच शैक्षणिक प्रगती मध्ये वाचनाचा सिंहाचा वाटा आहे. जी मुले योग्य गतीत वाचन करतात त्यांची प्रगती नियमानुसार होत राहते. वाचन केल्याचा खरा आनंद जर आपणास पहायचा असेल तर ते पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील मुलांच्या चेहऱ्यावर पाहता येईल. वर्गातील एक दोन मुले खुप छान वाचन करतात तेंव्हा ज्याना वाचन करता येत नाही त्यांना त्या मुलाचा हेवा वाटते. वर्गातील सर्वच्या सर्व मुले वाचू लागली की त्याचा खरा आनंद त्या शिक्षकाना होतो. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी ठळक दिसून येते. असा आनंद मिळविण्यासाठी मात्र शिक्षक मंडळींना खुप प्रयत्न करावे लागते हे ही सत्य आहे. वाचन प्रेरणा दिवस साजरा करून कोणाची वाचन कौशल्य मध्ये प्रगती होणार नाही त्यासाठी दररोज अर्धा तास तरी मुले वाचन करतील असे नियोजन शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. दिनविशेष पुरते त्याला बंधनात न ठेवता ती प्रक्रिया रोज राबविण्यासाठी मुलांकडून पाठाच्या उताऱ्यातील पाच वाक्याचे रोज वाचन करून घ्यावे. वाचन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण कितीही वाचन केलो तरी नित्य नविन माहिती मिळविण्यासाठी वाचन हे करावेच लागते. रोज पाच वाक्य वाचन करण्याचा सराव कधी पाठ वाचन करण्यात होते हे कळतच नाही. मुले सुद्धा अगदी योग्य गतीत वाचन करतात. वर्गातील धीम्या गतीने वाचन करणारा मुलगा देखील येथे गती घेतो. हा प्रयोग मात्र सतत चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सतत वाचन करण्यात व्यस्त असत त्या वाचनातुन ते विद्वान झाले. असेच अजून एक महान व्यक्ती म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, यांनी सुद्धा आपल्या जीवनात वाचनाला खुप महत्त्व दिले आहे. ते दिवसाचे सोळा-सतरा तास वाचनात घालवित असे. म्हणूनच त्यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर  संपूर्ण महाराष्ट्रात *वाचन प्रेरणा दिवस* म्हणून गेल्या वर्षीपासून साजरी केली जात आहे. फक्त आजच्या दिवशी एक तासभर वाचन करण्यापेक्षा रोज किमान पाच वाक्याचे वाचन प्राथमिक वर्गात केल्यास त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...