Sunday, 15 May 2016

जागतिक कुटुंब दिवस निमित्ताने लेख 

" वसुदेव कुटुंबकम "

कुटुंब म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते एक असे चित्रं ज्यात आजी आजोबा आई वडील भाऊ बहीण काका काकू आणि इतर मंडळी असा जवळपास दहा ते पंधरा लोकांचा समूह. या कुटुंबात वावरत असताना मिळतो अनेक गोष्टीचे संस्कार जसे की वडिलांनी एखादी वस्तू घरात आणली असेल तर ती सर्वांनी मिळून मिसळून खावी. यामूळे मुलांवर समानता या मूल्यांची नकळत रुजवण होते. घरात वाडवडिलांचा वावर असल्यामुळे घरातील सर्वच जण दबक्या आवाजात संवाद करतात. म्हणजे नवरा बायको, भाऊ बहीण यांच्यात होणारे भांडण किंवा धुसफुस ला आळा बसतो. कोणी मोठ्या आवाजात बोलत नाही. घरातील सर्व कामे विभागली जातात. ज्यांना जे काम जमते ते काम कुणी सांगण्याच्या अगोदर केली जातात. काही जण तर वडील मंडळीकडून शाबासकी मिळविण्यासाठी पुढे पुढे येऊन काम करतात. जणू त्यांचामध्ये स्पर्धा लागली असेल. घरातल्या प्रत्येक बाबींवर नियंत्रण असते. ते मग खरेदी करण्याचे असेल वा कुठे गावाला जायचे असेल. प्रत्येक गोष्ट वडील मंडळींना विचारूनच करावे लागते त्यामूळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चैन किंवा ऐश आरामच्या बाबीला एकप्रकारे लगाम घातल्या जाते. एकत्रित कुटुंब पध्दतीमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतात. लहान मुलांना घरातील आजी अन् आजोबा व्यवस्थितरित्या सांभाळ करतात. त्यांना रामायण महाभारत इसापनीती किंवा इतर गोष्टी सांगतात. आजी गाणे ऐकवते त्यामूळे मुले भविष्यात चांगले व्यक्ती बनू शकतात. परंतु सध्याच्या नवीन पध्दतीमधील जोडप्याना असे एकत्र कुटुंब पध्दत म्हणजे डोक्याला ताप वाटत असते. वधूपिता आपल्या मुलीसाठी स्थळ शोधत असताना प्रत्येक गोष्टीची चौकशी करतो त्यात हे पण विचारपूस करतो की लग्नानंतर मुलगा कोठे राहणार आहे ? मुलगा स्वतंत्र राहणार असेल तरच वधूपिता लग्नासाठी होकार देतो अन्यथा नाही. यांत त्या वधूपित्याची काय चूक असते. आपल्या मुलीला सासरी जास्त कष्ट पडू नये, तिने सुखात रहावे याच विचारात प्रत्येक वधूपिता असतो. ज्यावेळी आपल्या मुलांच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा मात्र हाच वधू पिता सासरी आलेल्या मुलीला नावे ठेवतो. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केली. सासू सासऱ्या सोबत राहिले तर हिला जास्त काम करावे लागते म्हणून तिच्या घरांच्या लोकांनी आमचं नातं तोडून काढलं असा आव आणतात. परंतु प्रत्यक्षात त्यांची सु्रुवात माझ्याकडून झाली याचा मात्र विचार केला जात नाही. याच विचार शैलीतून आज एकत्रित असलेली कुटुंब पध्दती विभक्त झाली आहेत. हम दो हमारे दो किंवा आम्ही दोघे राजा - राणी, नको आमच्यात कोणी या ही भावना दिवसेंदिवस बळावत चालली आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कदाचित या गोष्टीची चिंता कोणी करीत नाहीत किंवा त्यांची जाणिव त्यांना अजून झाली नाही. आपल्या आई वडिलांपासून विभक्त राहून खरेच आपल्या कुटुंबाची प्रगती होते काय ? या गोष्टीचा गंभीरतापूर्वक विचार केल्यास नाही हेच उत्तर येते. मात्र तरी सुध्दा वेगळी चूल मांडण्याचा अट्टाहास कधी बायकोकडून तर कधी नवऱ्याकडून होते. यांत कोणाचा दोष आहे ? यांपेक्षा याची झळ आपल्या लेकरांना लागते हे आपण कधीच विचार करीत नाहीत.विभक्त कुटुंबात राहणारी मुले सहसा एकलकोंडी होतात. प्रत्येक गोष्ट मागितली की मिळते त्यामुळे हट्टी होतात. घरात आणलेली वस्तू आपलीच, त्याच्यावर आपलाच जास्त अधिकार आहे या सवयीमुळे  त्याच्यात स्वार्थी भावना खोलपर्यंत रुजते. त्यांच्यावर आजीच्या गाणी आणि आजोबांच्या गोष्टी ऐवजी टीव्ही वरील अश्लील व बिभत्स गोष्टीचे संस्कार होतात. समाजात काही अनैतिक बाब घडली की आपणंच बोलून मोकळे होतो काय ही आजकालची पोरं. काहीच मॅनर नाहीत. सर्वाना समान हक्क या कायद्याने आज स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत, रोजगार करीत आहेत आणि मिळेल ती नौकरी ही करीत आहेत. घरातील नवरा बायको दोघे पण आज आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवीत आहेत. ही आनंदाची बाब आहे, यांत शंकाच नाही. मात्र नौकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यावर चिमुकली लेकरे दुसऱ्याच्या हाती सोपवली जाते. तेंव्हा त्यांच्याकडून कोणत्या संस्काराची आपण अपेक्षा करणार ? अश्या वेळी नक्कीच आपणास आजी आजोबांची क्षणभर का होईना आठवण आल्याशिवाय राहणार नाही. घराघरात नवरा - बायको यांच्या वादविवाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसान घटस्फोटमध्ये होण्याचे प्रमाण वाढण्यामागे सुध्दा ही विभक्त कुटुंब पध्दत कारणीभूत आहे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. घरातील नवरा बायकोच्या भांडणाचे प्रतिकूल परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो. रात्री भांडण झाले की दिवस उगवला की बाई माहेरी जाते, जाताना सोबत लेकरांना घेऊन जाते. पण लेकरांची शाळा बुडेल, त्याचा अभ्यास राहून जाईल या गोष्टीचा विचार ते कदापिच करणार नाहीत. शहरांत अश्या घटना फार कमी घडत असतील मात्र ग्रामिण भागात असे प्रकार सर्रास घडतात.बायको म्हणेल तसा नवरा ऐकावेच लागते किंवा नवरा म्हणेल तसे बायकोला ऐकावेच लागते असे चित्रं या राजा राणी च्या कुटुंबात दिसून येते. अश्या कुटुंबात एकमेकास विरोध झाला की भांडण होणार हे ठरलेलं आहे. परंतु जर राजा व राणी दोघेही सामंजस्यपणाने एकमेकाला समजून घेऊन संसार केल्यास त्यांच्या एवढा सुखी जगात शोधूनही सापडणार नाहीत.
आजची कुटुंब व्यवस्था कशी ही असेल आणि आपण एकत्रित असो वा विभक्त कुटुब पध्दती मध्ये राहत असो आपल्या लेकरांसाठी वर्षातून किमान एक दोन वेळा तरी काही ना काही कारणांनी एकत्र आले पाहिजे
मौजमस्ती केली पाहिजे
यामुळे मुलांवर योग्य संस्कार होतात जे की किती ही पैसा खर्च केला तरी विकत मिळणारी वस्तू नव्हे त्यासाठी आपण आपल्या वागणूकीत बदल केला पाहिजे. सुखी कुटुंबात सर्व लोकं एकमेकाना समजून घेऊन राहतात म्हणूनच ते दूर दूर राहून सुध्दा सुखी राहतात. त्यांच्याजवळ काही जादूटोणा नाही की मंत्र तंत्र नाही. चला आपण ही सर्वच जण या गोष्टीचा अंगीकार करू आणि संपूर्ण देश वसुदेव कुटुंबकम म्हणजेच सुखी कुटुंब करू या

- नागोराव सा. येवतीकर,
  शिक्षक व स्तंभलेखक, धर्माबाद

Saturday, 14 May 2016



शिक्षण अधिकार कायदा 2009 नुसार

25 % प्रवेश मिळेल . . . . पण विद्यार्थी टिकेल काय ?


शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो, असे यापूर्वी अनेकांनी सांगितले आहे.  महात्‍मा फुले यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे म्‍हटले आहे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध असे संबोधले आहे.  शिक्षणामुळे माणसाच्‍या शारिरीक, अध्‍यात्मिक, मानसिक अंगातील उत्‍कृष्‍टतेचा विकास होतो, असे महात्‍मा गांधीजी यांनी म्‍हटले आहे.  माणसातील पूर्णत्‍वाचा अविष्‍कार म्‍हणजे शिक्षण असे स्‍वामी विवेकानंद यांनी म्‍हटले आहे.  शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असे म्‍हटले जाते.  माणसांना परमेश्‍वराने दोन डोळे दिले आहेत, ज्‍याच्‍या आधारे संपूर्ण सृष्‍टी पाहू शकतो; मात्र या दृष्‍टीला ज्ञानाचा आधार मिळाला तर पाहत असलेल्‍या दृष्‍टीमध्‍ये चांगली सृष्‍टी बघायला मिळेल.  ज्ञान मिळविण्‍यासाठी मग शिक्षणाची अत्‍यंत आवश्‍यकता असते.  शिक्षणाशिवाय कोणत्‍याही विषयाचे सखोल ज्ञान मिळत नाही.  आपणास एखाद्या विषयात खूप माहिती मिळवायची असेल तर त्‍यासाठी त्‍याचे शिक्षण ध्‍यासपूर्वक घेणे अत्‍यंत गरजेचे आहे.  आज एकविसाव्‍या संगणकाच्‍या युगात वावरत असताना एखाद्याला शिक्षणाचे महत्‍त्‍व पटवून सांगणे एकतर मूर्खपणाचे किंवा अतिशयोक्‍तीचे ठरणार असे वाटते.  तरी पण देशात आजही असा समाज किंवा जमात दृष्‍टीस पडते की, ज्‍यांना शिक्षणाचे महत्‍त्‍व समजावून सांगावे लागते.  दारिद्रयाच्‍या खाईत असलेले, अत्‍यंत गरीब परिस्थितीमधील आणि मजूरदार असलेल्‍या लोकांना शिक्षणाचे महत्‍त्‍व पटवून देणे गरजेचे वाटते.
सध्‍या सर्वत्र जागरूक पालक दिसून येतात आणि आपल्‍या मुलांना उत्‍तमातील उत्‍तम शिक्षण कसे मिळेल? या दृष्टिकोनातून विचार करणारे पालकसुद्धा आढळून येतात.  तशी ही आनंदाची बाब आहे.  प्रत्‍येक पालक आपल्‍या मुलांना चांगल्‍यात चांगल्‍या शाळेत प्रवेश मिळवून देण्‍यासाठी धडपड करतात.  त्‍यासाठी लाखो रूपये खर्च करण्‍याची सुद्धा तयारी दाखवितात.  पालकांच्‍या याच मानसिकतेतून राज्‍यात गेल्‍या १०-१५ वर्षांत Convent किंवा English माध्‍यमाच्‍या शाळांचा पूर आला आहे असे वाटते.  पूर्वी महानगर किंवा शहरापुरते मर्यादित असलेल्‍या या विनाअनुदानित शाळा शहरांच्‍या गल्‍लोगल्‍लीत आणि ग्रामीण भागात गावोगावी झाल्‍या आहेत.  शाळेच्‍या आत-बाहेर आकर्षक रंगरंगोटी, सजावट, उच्‍च प्रतीचे गणवेश, टाय,बेल्‍ट आणि शूज अर्थात टापटीपपणा यात लोकांना नेहमीच आकर्षून घेतो अशा बाह्य अंगाचा विचार करून पालक मंडळी या विनाअनुदानित शाळेकडे वेधले जातात अन् आपले मूल याच शाळेत प्रवेश घेऊन शिकावे, असे त्‍यांना वाटायला लागते.  यात आश्‍चर्यसुद्धा असे काही नाही.  कारण प्रत्‍येक पालक आपले स्‍वत:चे प्रतिबिं‍ब आपल्‍या पाल्‍यामध्‍ये पाहतात, यात त्‍यांची चूक कदापिच नाही; मात्र त्‍या स्‍वप्‍नपूर्तीसाठी आपल्‍या चिमुकल्‍या लेकरांच्‍या कलचा अजिबात विचार करीत नाही असे दिसून येते.  सध्‍या संपूर्ण राज्‍यात RTE नुसार 25 टक्‍के प्रवेश SC-ST आणि दारिद्रय रेषेखालील पालकांच्‍या मुलांना 25 टक्‍के कोट्यातून प्रवेश देण्‍याची Online प्रक्रिया चालू झाली आहे; परंतु खरोखरच या प्रक्रियेतून प्रवेश देण्‍यात आलेली मुले शाळेतल्‍या शेवटच्‍या वर्गापर्यंत टिकतील काय?  असा एक प्रश्‍न निर्माण होणे साहजिक आहे.  विनाअनुदानित शाळा या मोठ्या प्रमाणात English माध्‍यमाच्‍या शाळा आहेत, असे गृहित धरण्‍यास काही एक हरकत नाही.  तेव्‍हा या माध्‍यमातील विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेणारा विद्यार्थी व त्‍याचे अपडेट कसे असते, हे आपणा सर्वांना माहीतच आहे.  शाळेत जाण्‍यासाठी उच्‍च दर्जाचा गणवेश त्‍यासोबत टाय, बेल्‍ट, सॉक्‍स आणि शूज आवश्‍यक असतात.  शालेय दप्‍तर, त्‍यातील वह्या, पेना, कंपास, वाटर बॉटल, टिफिन बॉक्‍स सर्व वस्‍तू शासनाकडून मोफत मिळत नाहीत.  त्‍याचा खर्च अर्थातच पालकांना करावा लागणार आहे.  त्‍यामुळे मोफत शिक्षणाचा कायदा असून सुद्धा पालकांच्‍या खिशाला यामुळे आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे.  25 टक्‍क्‍यांच्‍या कोट्यातून प्रवेश मिळणारी पालके  आपल्‍या मुलांसाठी एवढा खर्च करतील काय?  हाही एक प्रश्‍न नक्‍कीच लक्षात घेण्‍यासारखा आहे.  या शाळांमध्‍ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गातील मध्‍यान्‍ह भोजन मिळणार नाही.  मग स्‍वत:चा जेवणाचा डबा घेऊन शाळेत जावे लागेल.  त्‍या मुलाच्‍या वर्गातील इतर मुलांच्‍या डब्‍याची तुलना मुले करू लागली तर या मुलांमध्‍ये न्‍यूनगंड तयार होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  त्‍या मुलांमध्‍ये समानता किंवा समता न राहता दरी वाढत जाऊ शकते.  प्रत्‍येक बाबतीत त्‍या मुलाचे खच्‍चीकरण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  त्‍यापुढील अत्‍यंत महत्‍त्‍वाचे आणि लक्षात घेण्‍यासारखी एक बाब म्‍हणजे या पालकांच्‍या घरातील शैक्षणिक परिस्थिती.  इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत शिकणार्या मुलांच्‍या घरातील शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्‍यास अनुकूल असेल तरच त्‍या प्रवाहात टिकून राहतील अन्‍यथा शिक्षण क्षेत्राच्‍या बाहेर फेकले जाण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  विविध प्रकारचे कार्ये करणे अत्‍यावश्‍यक असते आणि ते पालकांच्‍या नियंत्रणाखालीच मुले करू शकतात तेव्‍हा पालक आपल्‍या मुलांकडे खरोखरच लक्ष देतील काय?  कौटूंबिक आणि सामाजिक परिस्थिती योग्‍य नसल्‍यामुळे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मूल टिकून राहील काय?  हेही लक्षात घेणे आवश्‍यक आहे.
घराजवळच्‍या शाळेत आपल्‍या मुलांना प्रवेश देणे मुलांच्‍या दृष्‍टीने आणि पालकांच्‍या दृष्टिकोनातून हिताचे आहे.  घरापासून दूर असलेल्‍या शाळेत आपल्‍या मुलांना प्रवेश दिला तर त्‍याला शाळेत ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागतो.  त्‍यांना ये-जा करण्‍यासाठी पालकांना वेळ द्यावा लागेल किंवा खाजगी वाहतुकीची व्‍यवस्‍था करावी लागते.  त्‍यासाठी पुन्‍हा आर्थिक झळ सहन करावी लागते.  दूरवरच्‍या शाळेत ये-जा करताना मुलांची सुरक्षितता याची काळजी राहते.  मुलांना सुद्धा मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागतो.  तो नेहमी दबावाखाली वावरत राहतो.  शाळेतून रोजच तो थकून-भागून येतात त्‍यामुळे त्‍याच्‍या चेहर्यावर उदासिनतेचा भाव दिसून येतो.  ते अभ्‍यास न करता झोपी जातीलच शिवाय पालकांशी संवाद करण्‍यास सुद्धा वेळ राहणार नाही अर्थातच यात मुलांचा विकास नक्‍कीच नाही.  याउलट जर आपल्‍या घराजवळील शाळेत (मग ती शाळा कोणतीही असेल) आपल्‍या मुलांना प्रवेश दिला तर वरील सर्व प्रकारातून आणि त्रासातून आपली सुटका होईल आणि मुलांचा सर्वांगीण दृष्टिकोनातून विकास होईल असे वाटते.
सरकारी शाळा आपल्‍यासाठी एक योग्‍य पर्याय आहे.  आज सरकारी शाळा डिजीटल व ज्ञानरचनावादीवर आधारित निर्माण होत आहेत.  या शाळांचा दर्जा सुद्धा वाढीस लागला आहे.  या ठिकाणी सुद्धा चांगल्‍या प्रतीचे शिक्षण मिळत आहे.  आजपर्यंत जे वर्ग 1 व 2 चे अधिकारी झाले आहेत त्‍या सर्वांचे शिक्षण जिल्‍हा पहरषदेच्‍या सरकारी शाळेत झाले आहे असा इतिहास आहे.  मग या शाळेपासून दूर न जाता शक्‍य असेल तर पालकांनी या बाबींचा विचार करून नियम किंवा कायद्याचा विचार बाजूला सोडून खरोखरच आपले मूल या विनाअनुदानित शाळेत टिकेल काय?  याचा किमान एक वेळ तरी विचार करावा.  मुलांच्‍या मायबोलीतून दिलेले शिक्षण त्‍यांना लवकर कळते.  एकदा त्‍यांना मूलभूत ज्ञान मिळाले तर ते ज्ञानाच्‍या बळावर कोणत्‍याही भाषेत व्‍यक्‍त करू शकतात.  आपल्‍या अभ्‍यासावरून या ठिकाणी आपण आपल्‍या मुलांना प्रवेश कशासाठी घेत आहोत?  याबाबत पालकांचे प्रबोधन अधिकारी, शिक्षक आणि जागरूक नागरिकांकडून होणे अपेक्षित आहे.  गेलेली वेळ आणि काळ आपल्‍या आणि मुलांच्‍या आयुष्‍यात कधीच परतणार नाही.  त्‍यामुळे प्रत्‍येक पालकांनी आपल्‍या मुलांना प्रवेश देताना जागरूकपणे विचार करावा.  एवढेच या निमित्‍ताने सुचवावेसे वाटते………!


नागोराव सा.येवतीकर
     9423625769

Friday, 13 May 2016



* शेतीप्रधान देशांतील दुर्दैवी शेतकरी *

आज काही कामानिमित्त शहराच्या मोंढ्यात जाणे झाले. कामास थोडा अवकाश होता म्हणून इकडेतिकडे नजर फिरवली. वास्तविक पाहता सकाळचे अकरा ही वाजले नव्हते पण दुपार झाल्याची जाणिव होत होती. दुकानाचे मालक जे की " सावकार " या नावानेच ओळखले जातात ते नुकतेच आपल्या मऊशार मुलायम गादीवर विराजमान झाले होते. दुकानाचा कारकून जो पूर्ण लिखापढी हिशेब सांभाळतो ज्यास सर्वजण मुनिम या नावाने हाक मारतात ते आपल्या नाकावरचा चष्मा डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करीत लिहिण्यात गुंग होते. उन्हाचा तडका वाढत चालला होता तसा वरच्या पंखांचा वारा गरम फेकत होता. या मोंढ्यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे येथे काम करणारे बाया, माणसे मजूरदार ज्यांना याठिकाणी हमाल या नावाने पुकारल्या जाते, ते दुकानात प्रवेश केल्या केल्या आपल्या कामास गपगुमानपणे सुरुवात केली. हे मजूरदार कोणाला काही बोलत नव्हते, फक्त काम करण्यावरच त्याचा पूर्ण लक्ष होते. कोणी गोणी उचलत होते आणि ढकल गाड्यांवर टाकीत होते. बाया बाहेरच्या बाजूला झाडलोट करून सर्व धान्य एकत्र करण्यात गुंग होती. बाजूलाच झाडांच्या सावलीत दोन माणसे रिकामे पोते झटकून साफ करीत असताना चांगले पोते एका बाजूला आणि थोडेसे खराब पोते एका बाजूला करीत होते. चांगल्या पोत्याचा गाठ बांधून बाजूला ठेवण्यात येत होती आणि छिद्र असलेल्या पोत्याला टाके सुध्दा मारण्यात येऊन त्यांचे वेगळे गाठी तयार होत होते. हे करताना त्यांच्यात अजिबात बातचीत होत नव्हती . अगदी शांतपणे जो तो आपले काम करण्यात व्यस्त होता. हे चित्र रोजचे होते. यांत काही बदल होणार नाही. पूर्वी बैलगाड्यामधून शेतकरी आपला माल आणित असत मात्र आज येथे ना बैल दिसत होते ना बैलगाड्या. सध्या टेंपो, ऑटो आणि इतर गाड्यामधून माल आणल्या जात होते आणि तेथील हमाल सर्व माल उतरवून मध्ये ठेवत होते. हमाल लोकांची माल उतरवण्याचे बाबतीत पूर्वीच बोलणे झालेले असते त्यामूळे कसल्याच प्रकारची झिगझिग याठिकाणी दिसत नव्हती. हे चित्र मनाला दिलासा देऊन गेला परंतु या उठाठेवची किंमत मात्र शेतकऱ्यांना मोजावे लागते हे समजल्यावर खूपच दुःख वाटले. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असते मात्र याठिकाणी त्यांना सर्वच जण लुबाडतात आणि त्यांना नागवुन सोडतात असे आमच्या एका शेतकरी चळवळीतील मित्राकडून कळल्यावर थोडं अस्वस्थ वाटलं आणि शून्य मनाने विचार करीत असताना बाजूला असलेल्या वर्तमानपत्रावरील " बँकेचे कर्ज व नापिकीला कंटाळून नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या " व आदिवासी शेतकरी कुटुंबातील तिघे जणाची आत्महत्या अश्या दोन बातम्या वाचण्यात आल्या आणि मन सुन्न झाले. डोक्यावर असलेल्या कर्जापायी कुटुंबातील सर्वच सदस्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असे त्या वृतांत म्हटले होते.
शेतकऱ्यांच्या होत आत्महत्या असलेल्या बातम्या आज रोजच प्रकाशित होत आहेत. गेल्या दोन तीन वर्षापासून पाऊसपाणी योग्य न पडल्यामुळे शेतकरी शेतात टाकलेली मुद्द्ल सुध्दा काढू शकला नाही. एकीकडे आसमानी संकट तर दुसरीकडे सुलतानी. प्रशासन सुध्दा आपल्या कागदपत्रावर आधारित काम करताना शेतकऱ्यांच्या काळजात घुसून न पाहिल्यामुळे हे आत्महत्या सत्र काही केल्या थांबता थांबत नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून हे प्रश्न नक्कीच सुटणार नाही. यांसाठी खरी गरज शेतकऱ्यांना जेंव्हा गरज असते तेंव्हाच त्यांना मदत करण्याची. पण तसे होत नाही आणि त्याचा फायदा ही सावकार मंडळी उचलतात. सावकार कर्ज देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनावर डोळा ठेवतात आणि अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांकडून माल घेतला जातो. निरक्षर व अडाणी असलेला शेतकरी नकळत या सावकाराकडून छळल्या जातो. हे कुठे तरी थांबायला पाहिजे आणि सरकारने शेतकऱ्यांना सुगीच्या काळात मदतीचा हात दिल्यास ते नक्कीच या संकटातून सावरतील.
शेतकरी वर्षभर शेतात राब राब राबतो आणि आपल्या कष्टाची सर्व उत्पादने या सिमेंटच्या जंगलातील गोडाउन मध्ये आणून टाकतो. शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला माल सावकार मंडळी जास्त भावात विकून थोड्याच दिवसांत श्रीमंत होतात. म्हणजे काम करून उत्पादन तयार करणारा जगाचा पोशिंदा दरवर्षी याच पध्दतीने लुबाडल्या जातो. शेतकऱ्यांच्या शेतात जेंव्हा माल असतो तेंव्हा त्याच्या मालास काहीच किंमत नसते आणि सावकारकडे साठा असेल तर तोच माल तिप्पट किंवा चौपट भावाने विक्री केल्या जाते. उत्पादकालाच या देशांत एका आण्याची किंमत दिली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. जर याच शेतकऱ्यांने उद्या शेती कसायाची नाही असा निर्धार करून राहिले, शेतातून काही उत्पन्न निघाले नाही तर खरंच आपण सर्व जगू शकतो का ? याचं कुणीतरी एकदा तरी विचार केलाय का ? जे या बाबींचा विचार करतील तेच शेतकऱ्यांकडे सहानभूतीपूर्वक पाहतील.
वास्तविक पाहता अन्नधान्य उत्पादनात भारत पाहिल्या क्रमांकावर आहे. मात्र योग्य प्रकारचे शेतकऱ्यांचे नियोजन आणि प्रशासनाच्या ढिसाळ धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत, याच विचारांच्या तंद्रीत मोंढ्याच्या बाहेर पडलो. शेतीप्रधान देशांत शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयी जोपर्यंत विचार होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास अशक्य आहे असे वाटते.
- ना . सा . येवतीकर, धर्माबाद


Saturday, 7 May 2016

खास शालेय मुलांसाठी तयार करण्यात आलेले शब्दकोडे


आपल्या मुलांकडून नक्की सोडवून घ्या आणि सुट्टीचा आनंद घेऊ या.

कोडे कसे वाटले हे 09423625769 या whatsapp क्रमांकावर जरूर कळवा.
धन्यवाद






















Monday, 2 May 2016

चर्चा -  ग्रामिण भागातील शैक्षणिक समस्या



* साद माणुसकीची अभियानाचे संकल्पक हरीश बुटले -
सुप्रभात
आजच्या दिवसाचे महत्वाचे काम
ग्रामीण भागातील शिक्षणाच्या 25 समस्यांची यादी करायची आहे. सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे.

साद माणुसकीची
समाजिकता अभियान विषयी

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक  आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा सहभाग असलेल्या राज्यव्यापी अभियानात शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, आणि वृद्धसेवा या क्षेत्रात कार्य केले जाणार आहे.

या अभियानातील शिक्षण विषयक कामाला पहिल्या टप्प्यात सुरुवात होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील तालुकानिहाय शिक्षकांची फळी खेडोपाड्यातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक समस्या आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत.

खेडोपाडी शिक्षणविषयक अपडेट्स पोहोचविण्याचे काम "तुम्ही आम्ही पालक" मासिकाच्या माध्यमातून केले जाणार असून या अभियानाचे ते vehicle आहे.

आपल्यापैकी ज्यांना आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यातील शैक्षणिक कामासाठी योगदान द्यायचे असल्यास आपण कोणत्या प्रकारचे योगदान देऊ शकाल ते आम्हाला कळवू शकता.

राज्यभरातील खेडोपाड्यातून शहरात स्थायिक झालेल्या प्रत्येक सफल अश्या नागरिकाला आपल्या गावाकडील समस्यांकडे लक्ष देण्यासाठी सामाजिक अभियानात सामील होण्यासाठी माणुसकीची साद घालत आहोत.


* वाहतुकीची गैरसोय.
* अपुऱ्या भौतिक सुविधा.
* अनुपस्थित विद्यार्थी
* ग्रामिण भागात काम करण्यास  नाखुष असणारे शिक्षक / त्यामुळे ग्रामिण भागात रिक्त राहणारी पदे.
1.पालकांची मानसिकता
2.रोजगार समस्या
3.उदरनिर्वाह प्रश्न
4.शिक्षणाप्रती असलेले अज्ञान
* आर्थिक अडचणी मुळे राहणारे अपुरे शिक्षण
हुशार पण गरीब मुलावर येणारी जबाबदारी ,पालक व्यसनी असणे,घरातील वातावरण तणावयुक्त असणे,हुशार मुलगी असूनही कमी वयात लग्न करणे पालकांना तिच्या शिक्षणाचा बोजा वाटणे इ अनेक समस्यांशी संघर्ष करुन् शिक्षण घेणे अवघड आहे...त्यावर साद माणुसकीची परिवार नक्कीच उपाय शोधेल...

पालकांचे अज्ञान,
गरीबी
आणि
शिक्षणाविषयीची अनस्था

जी समस्या आपण सुचविलेली आहे त्या समस्येविषयी 10 ओळी विवेचन करावं म्हणजे ती समस्या स्पष्ट होईल आणि आज संध्याकाळी ग्रामीण शिक्षणाच्या समस्या या विषयावर एक चांगले टिपण तयार होईल. मग त्यावरील कोणत्या समस्यांना प्राधान्य द्यायचं आणि त्यांच्या उपायांसाठी आपण आपल्या परीने काय करू शकू त्याचा action प्लॅन तयार करून कामाला लागू.

ग्रामीण भागात मुलांच्या शिक्षण पूर्ण होण्यासाठी अनंत अडचणी येतात. त्यांतील प्रामुख्याने म्हणजे मुलांच्या पालकाची आर्थिक बाजू. शासन सर्व शिक्षा अभियान च्या माध्यमांतून इयत्ता आठवी वर्गापर्यंत मोफत शिक्षण देत आहे. त्यामूळे पालकांना या वर्गापर्यंत काही अडचण येत नाही. परंतु त्यापुढील शिक्षणासाठी पालकांना अडचण निर्माण होते. पुस्तकाची खरेदी, वह्या, दफ्तर, शालेय गणवेष, आणि इतर खर्च यामूळे शेतकरी असलेले पालक ऐन बी - बियाणे खरेदीच्या मोसमात शालेय खरेदी करू शकत नाहीत असे चित्र दरवर्षी निदर्शनास येते. यावर आपणांस काही तोडगा काढता येईल काय ? नवव्या आणि दहाव्या वर्गात शिकणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या हुशार मुलांना प्रति विद्यार्थी 1000 रू. च्या किमतींचे वस्तु मदत स्वरूपात देता येईल काय यावर जरूर विचारविमर्श करण्यात यावा आणि तय बाबत चे निकष चर्चेमधुन तयार करावे. ही नम्र विनंती.

तसेच अजून एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे.

तालुकास्तरावर गरीब मुलांसाठी
" अभ्यासिका वर्ग " चालविणे

यांवर ही चर्चा केल्यास काही तरी मार्ग सापडेल
बहुतांश मुलांना रात्रीच्या वेळी अभ्यास करतांना अडचणी निर्माण होतात. कुणाच्या घरी विद्युत सुविधा नसते. कुणाच्या घरी मार्गदर्शन करण्यासाठी कोणी उपलब्ध नसतात अश्या सर्व मुलांसाठी ही दोन तासाची अभ्यासिका खूप काही देऊ शकते.

माणसांच्या अडचणी समजून घेऊन त्यांवर तोडगा काढणे हीच आहे खऱ्या अर्थाने साद माणुसकीची असे वाटते

प्रवेशासाठी दिली जाणारी प्रलोभने
ईयत्ता ५ व ८ च्या प्रवेशाकरीता माध्यमिक शिक्षकांकडून विविध प्रकारची प्रलोभणे दिली जातात. त्यामूळे ग्रामीण विभागातील पालक मुलांच्या शिक्षणापेक्षा पैश्याला जास्त महत्व देतात. अक्षरशःदाखल्याचा व्यापार  सूरु आहे.यामूळे असेही लक्षात येते की काही गरीब पालक याला बळी पडतात.दाखल्याची फी आकारल्या जात नसतांना पालक माध्यमिक शिक्षकांकडुन रोख रकमेची मागणी करतात.माध्यमिक शाळेला पटसंखेची असणारी अट कमी होणारी विद्यार्थी संख्या हे मुळ कारण.

Gramin palakachi  shaishanik udasinta

Mulasathi apurya soyi
Suvidha

पालकाचे बेरोजगारी मुले शहरा कड़े धाव घेतात त्यामुळे मुलांची जबाबदारी ते घरातील म्हातार्या मानसाकडे सोपवून जातात आई वडिलांचे पुरशे लक्ष्य नसल्यामुळे अशी मुले कमी वयात व्यस्नधीनतेकड़े वळतात्।त्यांच्या शालेय गरजाकडे लक्ष्य राहत नाही शाळेत अस्थपूर्वक माहिती घेऊन लक्ष्य दिल्या गेले नहीं तर शाळा नकोशो वाटते अशी मुले नीट  समायोजन करू शकत नाही
सर यावर्षी दुष्काळमुले ही समस्या जास्त प्रमाणात जाणवत आहे


पालकाना  गावातरोजगार उपलब्ध नसने त्यामुळे होणारे स्थलांतर

आरोग्याच्या कारणाभावि विद्यार्थी गैरहजर राहतात।


वीटभट्टवर किंवा बांधकाम या ठिकाणी स्वस्त आणि दिर्घकाळ काम करणारे मजूर म्हणून परप्रांतीय लोक काम करतात त्यानां मातृभाषेतून शिक्षण नाही त्या  अभावी ते वंचित राहतात.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या :-
१. पालक त्यांच्या दैनंदिन कामात विद्यार्थ्यांना गुंतवतात.
त्यामुळे त्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र राहत नाही.
२.अनेक मुलींची विवाह इयत्ता ८ते १०वी मध्येच होतात.परिणामी त्यांचे शिक्षण थांबते.
३.गावात पुढील शिक्षणाची सोय नसेल तर शाळेत नियमितता राहत नाही.


बर्‍याच वेळा असे होते  ग्रामिण भागातील मुले शिक्षकांशी मनमोकळेपणे बोलायला घाबरतात . मग त्याच्या अभ्यासातील शंकाचे निरसन होत नाही . म्हणून ते शाळेत जायला घाबरतात , किंवा कंटाळा करतात

१   online चे काम करायला लावताना शालेत computer व साधने नसने
२ कोणतेहि आर्थिक लेखेविशयी प्रशिक्षन न देता १००% काम देण्याची अपेक्षा करणे
३ शालेतील सुविधा पूर्ण करणेकरिता शासनाकडून वारंवार मदत मागूनही  निव्वल समाज सहभागावर विसंबून राहणे
४ mobile teacher व विषयतज्ज्ञा चे कोणतेहि सहकार्य न मिलता फक्त कागदे काले करते

ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना पालकांच्या व्यसनाधिनतेमुळे  योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि दुर्लक्ष  :—
   मी ज्या कार्यक्षेत्रात काम करत आहो तेथील विद्यार्थी हुशार  असूनहि पालकांच्या व्यसनाधिनतेमुळे त्या  मुलांना आवश्यक पुस्तके व शैक्षणिक सुविधा  पुरविल्या जातनाही (शासनाच्या सुविधावगळता) तसेच योग्य मार्गदर्शन  मिळत  नाही.G.D.Yedme

ग्रामिण भागातील शिक्षण विषयक समस्या-
1)विद्यार्थांच्या ग्रुहपाठाकडे पालकांचे दुर्लक्ष.
2)शैक्षणिक जाणिवेचा अभाव.
3)शैक्षणिक साहित्याचा अभाव.

ग्रामीण भागात प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयी पालकांमध्ये गैरसमज मोठया प्रमाणात पसरविल्या जात आहे.
उदा. इंग्रजी माध्यम

शिक्षणातील सकारात्मक बदल 100% शिक्षक स्विकारत नाही.

मुलांना जीवनकौशल्ये, मुल्ये यांचे शिक्षण मिळत नाही.

CBSE curriculum  should b followed in zp  schools to compete convent in rural area

ग्रामीण भागातील मुलांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील टप्प्यावर  योग्य मार्गदर्शन मिळत नाही.

Yogy margdarsha krunhi palak durlaksh krtat


ग्रामीण भागातील विद्यार्ध्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण परिणामकारक मिळत नाही . पालक आपल्या पाल्याविषयी शिक्षणाबाबत जागरूक नाही.

1वर्ग 1शिक्षक पाहिजे
पूर्वप्राथमिक वर्ग शाळेत सुरू करने आवश्यक
50पट असलेली शाळा तिथे 1स्वच्छता करणारी व्यक्ति पाहीजे
उपक्रम नियोजन पाहिजे
शाळा सुरू झाल्या पासून 100%शिक्षक हजर.कोणतेही प्रशिक्षण नको
पालक लक्ष देत नाही

मराठीतून शिक्षण पाहीजे

सर्वात महत्वाचे म्हणजे अधिकृत मुख्याध्यापक पाहिजेत - हेमंत

पुर्व प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळेला जोड़ने आवश्यक आहे

पालकांना माटरूंभाषेतुन शिक्षण घेण्याचे महत्व सम्जौन  आवश्यक आ

मुख्ययाध्यापक पद हे शिक्षकाव्यतिरिक्त असले पाहिजे - हेमंत

ग्रामीण भागत मुलांमध्ये अभ्यास करण्याची सवय नाही

वाचनाची आवड कमी झाली

केबल tv मुळे मुल अभ्यास करत नाही

खुप शाळांना wall compound सुद्धा नाही।

अंगणवाडी मधून सुध्दा चांगले शिक्षण मिळायला पाहिजे, आपल्या मुलांना 3 वर्षापासून अंगणवाडी त जात असला तरी काहीच .शिकवले जात नाहि म्हणून पाया कच्चा राहतो

ग्रामीण भागत मजूर वर्ग असल्यामुळे मुलांकरिता वेळ देत नाही

एंग्रजि माध्यमातून शिक्षण घेताना येणाऱ्या अड्चनिमुले मुलांचा योग्य विकास होत नाहि असे दिसून येते

शिक्षक नी बदल स्विकार केला पाहीजे

समानता आवश्यक आहे
गणवेष शिष्यव्रुत्ति other योजना

खेळणी साहित्य प्रतेक शाळेला पाहीजे

Workbook आवश्यक

मुले लहान आहे पण समजतात

समस्या पुष्कळ आहेत, प्रत्येकाच्या प्रमाणे त्याचा प्राधान्य क्रम वेगळा असेल,मला असे वाटते की पालकांचे निरक्षर असणे ही मोठी समस्या असू शकते, पालक शिक्षित नसल्यामुळे त्यांना शाळा खेळ वाटते, गेले काय नाही गेले काय त्यांना काहीही फरक पड़त नाही. घरी येउनहि ते मुलांना काहीही विचारत किव्हा सांगत नाही की तू आज काय नवीन शिकला.

शैक्षणिक साहित्य साठी मुलांना अनुदान पाहिजे

2. सर्व शिक्षा अभियानातून class 8 पर्यन्त मुलांना सर्व गोष्टी free मिळतात पण त्या नंतर खर्च वाढत जातो.शाळा खर्चिक आहे असे पालकांना वाटते, मग ते त्या मुलांना शाळे ऐवजी कामाला पाठवने पसंद करतात जेनेकरून शिक्षणाचा खर्च वाचेल व् 2 पैसे मिळतील

Gramin bhagat anek pratibhavan vidhyarthi aahe parantu 8th nantar tyanha yogya margadarshan milatnaslyamule pudhil pravas thamto


Aata aaplya z.p.madhe semi aahe aaplya shaletun pudhchya  shalet  semi nahi tr  students ni kay karaych

गणेश वालवे जि.प.शाला तरोडा प.स.कारंजा.जि वर्धा.
1.पायल चवारे .शैशणिक मदत हवी.
2 परिस्थितीमुळे शिकू शकत नाही. दारूमुळे घरात भांडण होतात.
3.मुलाना चांगल्या सवयी बाबत मार्गदर्शन हवे.
4.मु अ नी वर्ष भराने नियोजन करायला हवे.
5.सवॅ शिशकाची शाळेतर्फे मिटींग
जरूरी.
5 विद्यार्थ्यांसाठी विवीध शिबिरे घेण्यात यावी.
6.शालेला मदतनीस असावे मुंबई. मु.अ.साठी.
7.शिशकाना फवत शिकविणयाचे काम करू द्यावे.
8.शिशकानी शाळेत मिसळून राहावे.
9.परतेक वर्गात संगणक द्यावे
10 निवडणूक कामे देवू नयेत मुलावर परीणाम होतो
11.शालेय अभ्यासक्रम कमी करण्यात यावा.
12. विद्यार्थी शिकविण्यात भर देण्यात यावा.
13.पालक सभा दर महिन्यात घेण्यात   यावी शाळेत
14 क्षुल्लक कारणावरून शिक्षकाला जबाबदार धरू नये
15.शिक्षकाचे अडचणी बाबत चर्चा खुले चर्चा सत्र घेण्यात यावे.
16. उन्हाळी सत्र पुर्ण सुगीचे असावे.
17. निकाल बनविने किचकट नसावे.
18.शिक्षकांचे पगार एक तारखेलाच झाले पाहिजेत.
19. पदवीधर व सहाय्यक शिक्षक असा भेदभाव शाळेत नसावा.
20. एका वर्गाला एक शिक्षक असावा
21. काम करतांना शिक्षकाच्या मानसिकतेचा (दोन वर्गाला एक शिक्षक ) विचार करण्यात यावा.
22.शिक्षकानी आपल्या पेशाला जपावे.
24 शिक्षकाच्या सभेला सभागृह व बसायला बेंच असावे.
25.शिक्षक पुरस्कार योग्य शिक्षकाला मिळावा.


* आज च्या घडीला ग्रामीण  व स्लम भागातील विद्यार्थी  शिक्षनात रस कमी घेतात इतर वाईट गोष्टीकडे जास्त वळतांना दिसतात  उदा.व्यसन करणे अश्यावेळी माझे मते एखादे गाव किंवा एरिया ठरवून तेथील पालक व विद्यार्थ्यां मध्ये योग्य विचारांची पेरणी करण्यासाठी विविध उपक्रम आपल्या समूहातर्फे राबवू शकतो  उदा. सुसंस्कार शिबीर व वर्षभर प्रभावीपणे त्या गोष्टींचा

* पाठपुरावा करण्यासाठी योग्य आखणी व्हावी

* त्यामुळे एकाच ठिकाणी जरी कार्य झाले तरी त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आल्यास इतर ठिकाणी आपोआप बदल दिसू शकतो व या कार्याची समाजात चर्चा होऊन आणखीही काही उपयुक्त लोक अभियानात जोडता येतील

* अनेक शाला मध्ये पुरेशा भेोतिक सुविधा नाहीत केवल कागदोपत्रि दाखवल्या जातात त्यामुले पालक , विद्यार्थी सरकारी शाला कडे पाठ फिरवतात

1)ग्रामीण भागात प्रत्येक विषय वार व वर्गाला शिक्षक असावे
2)प्रशिक्षण कमी असावे
3)गरीब विद्यार्थी यांना गणवेष मोफत असावे
4)शिक्षकांना शिकवू द्यावे etar kamala जूम्पू नये
5)नीर्व्य्सनी असावे विद्यार्थी समोर आदर्श वर्तन असावे
6)ग्रामीण भागात zp नी convent school काढावे किंवा अंगणवाडी चे upgradation करावे


* अनेक होतकरु विद्यार्थी अार्थिक परिस्थितिमुले मागे राहतात

Thursday, 28 April 2016



सार्वत्रिक बदल्या आवश्यक : कही खुशी कही गम

बदल हा संसाराचा नियम असतो. पावसाळ्यानंतर हिवाळा आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा मग पुन्हा पावसाळा हा निसर्ग नियम जर मोडीत निघाले तर पर्यावरण चक्र सुध्दा बिघडते. अर्थातच मानवी जीवनासह पशू पक्षी वेली, वृक्ष यांचे ही जीवन संकटात पडते. त्यामूळे ज्या क्रिया जेव्हा घडायाला पाहिजे त्याच वेळेला घडत राहिले तर सर्व काही योग्य होत राहते. हे बदल आठवण येण्याचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेले सार्वत्रिक बदल्या. तसेच एप्रिल आणि मे महिना उजाडला की सर्वत्र कर्मचाऱ्याचा बदलीचा प्रश्न सर्वांच्या मनात चर्चिले जाते. बदल्या होणार की नाही, झाल्या तर किती टक्के होणार, प्रशासकीय होतील काय, कोणत्या नियमानुसार होतील या सारख्या विविध प्रश्नांची चर्चा केली जाते. जिल्हा परिषद मध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी कार्यरत असतात मात्र सर्वांचे लक्ष शिक्षकांच्या बदल्याकडे सर्वात जास्त लागून असते. दरवर्षी एप्रिल महीना उजाडला की शिक्षकाच्या बदल्याच्या चर्चेला प्रारंभ होते आणि मे महीना संपेपर्यंत हे चर्चेचे गु-हाळ चालूच राहते. सन 2013 या वर्षापासून विविध कारणांमुळे शिक्षकांच्या बदल्या प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. त्यामूळे शिक्षक वर्गात नाराजीचे सुर पसरले असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता कर्मचाऱ्याची बदली करणे हा काही जनांना क्लेशदायक वाटत असते तर काही जनांना आनंद देणारी वाटते. जे मूळ गावापासून खूप दूर अंतरावर काम करीत आहेत त्यांना आपल्या गावाकडे परत येण्याचे वेध लागलेले असतात. जे शिक्षक शहरापासून 20- 25 किमी दूर अंतरावर खेड्यात, वाडी वस्त्या पाडी तांड्यावर काम करीत आहेत त्यांना शहरांजवळ किंवा सोईस्कर शाळा मिळावी असे वाटते त्यात त्याचे काय चुकले. गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी भागात काम करणारे किती वर्ष अजून तेथेच खितपत पडावे ? त्यांना सुध्दा या भागात काम करण्याची ओढ लागलेली असते. ही मंडळी बदली प्रक्रियेची चातक पक्ष्यांसारखे वाट पाहत असतात. 
बदली प्रत्येकाना हवीहवीशी वाटत नाही. जे आज सुखात आहेत त्यांना बदली कधीच होऊ नये असे वाटते. कारण त्यांचे सर्व काही सुखात, मजेत आणि आनंदात चाललेले असते. मात्र जे दुःखात, कष्टात काम करीत आहेत त्यांना बदल्या हे एक सुखाचा आशेचा किरण वाटतो. नेमके त्यांच्या आनंदावर बदल्या न करता विरजन टाकल्या जाते. आदिवासी तालुक्यांत काम करणारा आमचा शिक्षक मित्र गेल्या पाच वर्षापासून मूळ तालुक्यांत बदली मिळविण्यासाठी खूप धडपड केली. पण दरवर्षी वेगवेगळ्या कारणाने त्याची बदली काही झाली नाही. आपल्या कुटुंबापासून दूर राहून नौकरी केली आणि अचानक एके दिवशी आमच्या सर्वामधुन निघून गेला, त्याची मूळ तालुक्यात येऊन नौकरी करण्याचे स्वप्नं स्वप्नच राहिले. घरापासून दूर नौकरी करीत असलेली मंडळी कौटुंबिक सूखापासून वंचित राहतात. त्यांचे मानसिक समाधान नसते. अशी मंडळी शारीरिक बाजूने सुध्दा खचलेली असतात. मग शाळेत परिणामकारक अध्यापन करू शकतील काय ? या समस्येवर अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना आणि प्रशासन अजिबात विचार करताना दिसत नाही, यामूळे शिक्षक वर्गात नाराजीचे सुर पसरत आहे. यामूळे प्रगत महाराष्ट्र चे स्वप्न खरोखरच पूर्णत्वास जाईल काय ? अशी शंका सुध्दा राहून राहून मनात येत राहते. 
कधी समायोजन झाले नाही म्हणून बदल्या रद्द होतात तर कधी पदोन्नती झाली नाही म्हणून बदल्या रद्द केल्या जातात. बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. मात्र दरवर्षी या हक्कांवर या ना त्या कारणांमुळे गदा आणली जाते आणि बदल्याची प्रक्रिया रेंगाळते. खरोखरच समायोजन किंवा पदोन्नती करण्याचे काम कोणाचे आहे ? या कारणांमुळे बदली झाली नसल्यास किंवा रद्द करावे लागल्यास यांत शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या प्रक्रियेतील दोषी व्यक्तींना जबाबदार धरण्यात येऊन प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केल्याशिवाय हे समायोजन आणि पदोन्नतीचा प्रश्नांची सोडवणूक होणार नाही, त्यामूळे वर्षानुवर्षे समायोजन आणि पदोन्नती असेच रखडल्या जातात. पात्र शिक्षक दरवर्षी यापासून वंचित राहतात. यावर सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे अत्यंत गरजेचे आहे, असे वाटते. दोष कुणाचा आणि त्याची सजा कुणाला याचा शिक्षक संघटनानी एकत्र येऊन विचार करायला हवे. यावर्षी सार्वत्रिक बदल्या व्ह्ययल्याच पाहिजे त्यातल्या त्यात शिक्षकाच्या बदल्या झाल्याच पाहिजे यावर भर दिला पाहिजे. आज कित्येक शिक्षक मंडळी या बदल्याच्या प्रक्रियेवर आपली पुढील आशा स्वप्नं रंगवून ठेवलेले आहेत. कर्मचाऱ्याना त्यांच्या सोइच्या जागी बदली होणे, त्यांच्या कार्याची गती वाढविण्यासाठी आवश्यक आहे. मनात आलेली मरगळ दूर करण्यासाठी, शिक्षकामध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण होण्यासाठी बदल्या आवश्यक आहेत. या सार्वत्रिक बदल्याचा कर्मचाऱ्यात कही खुशी कही गम असे दिसून येईल यांत शंका नाही. मात्र बदल्या झाल्याच पाहिजे, बदल्या झाल्या तरच महाराष्ट्र पूर्णपणे प्रगत होण्यास मदतच होईल असे वाटते. 
- नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...