Saturday, 26 December 2015

ताजा है . . . . . 
गरम है . . . . . . 
बढ़िया है . . . . . . 

नगरच्या आठवणी घेऊन 

लवकरच येत आहोत . . . . . 

प्रतीक्षा असावी . . . . 👀
=========********============


=========********============
|| आठवणी अहमद नगरच्या ||
●●●●●●●●●●●●●●●●●
एक अवलिया शब्दवेडा 
व्हाट्सअप ग्रुप काढता झाला
न थांबला इथेच मात्र
एक एक कवी वेचता झाला..!!

नामी शक्कल त्याच्या मस्तकी
वापर तयांचा करता झाला..
ठेविल्या स्पर्धा नाना विविध
लेखणीत बळ भरता झाला..!!

उत्साहीत सारे नव कवी
उधाण तयांना देता झाला..
संग्रह काढू चारोळ्यांचा
प्रस्ताव असा मांडता झाला..!!

न बोलले नुसते खरे केले
शिव धनुष्य लीलया पेलता झाला..
साथ मित्रांची मोलाची त्याला
दिन रात उत्साही राबता झाला..!!

भरले स्वप्न डोळ्यात सर्वांच्या
सुख स्वप्न असे साकारता झाला..
एक एक मोती नीवडत वेचत
लडी सुरेख आकारता झाला..!!

शिल्पकार तोच सोहळ्याचा
आनंद मेळा भरवता झाला..
एक एक मित्र आला भेटीला
प्रेम आनंद भरता झाला..!!

रंगला सोहळा प्रकाशनाचा
साहत्य इतिहास घडविता झाला..
न भूतो भविष्याती अशी
भेट आम्हांस देता झाला..!!
🙏 धन्यवाद अरविंदजी आणि सहकारी

*****सुनिल पवार......
=========********============

#आठवणी अहमदनगरच्या#      

"उठीउठी गोपाळा"अशी भुपाळी कानी यावी अश्या अमृतवेळेस मला थंडीची दुलई पांघरून नगरच्या जुन्या बसस्टॉपवर  ट्रॅव्हलने सोडले.
      अंधाराचं साम्राज्य अजून होतं म्हणून तिथेच थांबलॆ.उगीच त्रास नको म्हणून आत्याला कळविले नाही.तेवढ्यात साहीत्य यात्रेचे बांधव दिलीपजी....वारंगकरजी....संदीपजी....नासाजी भेटले.शतजन्मीची ओळख असल्याप्रमाने सगळे एकमेकांना प्रेमाने विचारपूस करीत होते.
      नंतर साधारण साडेबाराला हसतमुखाने सगळे पटवर्धन हॉलला भेटलो.अरविंदकाका....जाधवकाका  यांचा चरणस्पर्श सुखावून गेला.साग्रसंगित असं नियोजन बघून काकांच्या आयोजनाला मनोमन सलाम ठोकला🙏🏼 तेवढ्यात सोवनीजिंनी माझ्याकडून स्वागतगीत चाचपडून घेतले😀
       काकांच्या आदेशानुसार पार्वती कॉर्नरला लंचचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचलो.जामूनके साथ दिलीपजी फोटो खिंच रहे थे.तेवढ्यात मुंबई च्या मैत्रिणी पोहोचल्या.कडकडून भेटी झाल्या.....त्यांचा बॉंबे टू नगर प्रवास फूल टू धमाल झालेला त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता.
      अगदी थोड्या गॅपमधे मी एक चोरटी धाव घेतली.पटकन रेडीओसिटीवर जावून आर जे प्रभूला भेटूव आले.स्मरणीय भेट ठरली.लागलीच हॉलकडे मोर्चा वळविला.साहीत्य यात्रेचे बरेच मानकरी जमले होते.वृषालीताई....माधवसक....जाधवकाकी विचारपीठावर स्थानापन्न झाले.शिल्पाताईंनी  सुत्र हाती घेतलॆ.पुजन आटोपले.गळा नसून मी स्वागतगीत म्हटले अन आपण गो़ड मानून घेतले.नंतर पाहुण्यांचे स्वागत झाले.संगितीाईंनी अलंकारीक भाषेत व सुहास्यवदने मान्यवरांचा परीचय करून दिला.
       वृृषाली ताईंचा सुसंवाद जिव लावून गेला.माधवसरांचा 'तो चंद्रमा'गतकाळात घेवून गेला.जाधवकाकांनी रजा घेतली ती जिवनगौरव पुरस्कार स्विकारून.कृतार्थ वाटलॆ.
    नंतर नासा सरांनी माईकचा ताबा घेतला व दोन चार षटकार मारले.प्रत्येक कविची ओळख व सादरीकरण झालॆ.सर्वजण फोटो...शूट घेण्यात मग्न होते.हो....देवणीकरांना सर्व😌मीस करत होते.
       तेवढ्यात माझ्या आग्रहाखातर गृपचे फोटो घेतलॆ.सोबतच गारव्याची तोड चहा आली.लागलीच संगित रजनी सुरू झाली.नंदकुमारजींनी ऐसी लागी लगन या भजनाने जोरदार सुरूवात केली.मी निवेदनाद्वारे थोडा हातभार लावला.भजन .....गझल...
.शिटीवरील गाणं.....असं संगितमय वातावरण झालं.मी एक फर्मा्ईश केली व त्यानुसार अजीज नाजाची फर्मास कव्वाली झाली.
  जागृतीताईही उत्तम गायल्या.
हळूहऴू समारोपाची वेळ आली.शेवटी नासा सरांनी व दोन्ही ताईंनी छान पसायदान म्हटले व आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.एकमेकांना पुस्तके भेट देवून भरून पावलो.स्नेहालयला थो़डीफार मदत झाली.जाताजाता काकांनी पुढील सूत्र नासा सरांकडे सोपविली. कुलकर्णी परीवाराचा छोटेखानी सत्कार झाला.आणि ज़ड अंतःतरणाने निरोप घेतला तो पुन्हा भेटण्यासाठी.
        दुसरया दिवशी मी अरविंद काकांकडे जावून कृतज्ञता व्यक्त केली.आत्याबाईचा साडीचोळीचा आहेर पदरात घेतला व गो़ड मिष्टांनासह गोड आठवणी उराशी बाळगून नगरचा निरोप घेतला.
"निरोपाचे बोलतांना
हास्य थोडे देवून जावे
जाताजाता मात्र दुःख
त्यांचे घेवून जावे"...
  पुन्हा भेटू लवकरच🙋🏻

- सौ. जयश्री पाटील वसमत 
=========********============
*अहमदनगरच्या आठवणी*

       तसं म्हणाल तर या स्पर्धेमध्ये लिहिणं मला जमणारच नाही...कारण मी या कार्यक्रमाला हजरच नव्हतो..पण प्रत्येक तासाच्या  updates ग्रुप वर येतच होत्या...कोण कधी आले,कधी 
 गेले,कधी पोहचले व काय बोलले,या सर्वांची माहितीफोटो व व्हिडियो ने कळतच होतीे...मी या ग्रुप मध्ये तसा ऊशीराच आलो...या कार्यक्रमाबद्दलही जास्त काही माहित नव्हते...आणि जेव्हा पुर्ण कळाले,तेव्हा थोडासा ऊशीर झाला होता...याबद्दल दिलगीरी तर व्यक्त होतच आहे....!
     काही घरगुती कार्यक्रमांत अडकुन असल्याने पोस्ट पण वेळचेवर वाचता येत नव्हत्या...पण वेळेतला वेळ काढुन उत्सुकतेपोटी वाचन होतच होत...मी नंतर सर्व पोस्ट,फोटो,लेखन,व्हिडिओ पाहिल्या आणि खुप miss केला हा कार्यक्रम...
कधी न भेटलेल्या अनोळखी व्यक्ती...पण नातं...???"सख्ख्या भाऊ-बहिणिंसारखच"...या संदर्भातलाही प्रसंग ऐकावयास मिळाला...रामराव जाधव सर जी यांनी लिहिलेली आठवण ही वाचली आत्ताच...अभिमान ही वाटला😇काहीजणांना कायम वाटत असते,हे सोशल मेसेजींग वर नुसता गप्पा टप्पा व बोलणी वा नुसता बोलबच्चन टाईप होतात...पण ईथ याला अपवाद आहे....याच बोलबच्चन नेटवर्कींग चा वापर लोकांना खरोखर बोलता करण्यासाठी झाला...!नुसता online होणारे contacts गाठी-भेटीत झाले...chatting चंही गप्पागोष्टींत व चर्चेत रुपांतर झाल...मी यातला थोडाला भाग नाही अनुभवु शकलो,पण आहे त्यात समाधानीही झालोय😊तसपण लहान असल्याने घरच्यांनीपण नसतं सोडलं ईतक्या लांब,पण घरात बसुनच या कार्यक्रमाचा आनंद लुटता आला...मनापासुन धन्यवाद
       मी लिहिलेल्या या ओळी स्पर्धेच्या विषयाला अनुसरुन नसतीलही,कारण मी तीथे हजर नव्हतो...पण हा कार्यक्रम माझ्या देखतच झालाय अस मात्र वाटत आहे... या सर्व आठवणींच्या पुस्तकातील एक पान बनवल्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो...आणि हा कार्यक्रम पार पाडताना  लहानस्या खारुताईच्या वाट्याप्रमाणे वाटा असणार्यांपासुन सर्वांनाच heartly  congratulations💐✌🏻
You all made it real😊

:-निलेश सुरेश आळंदे.

गडहिंग्लज.(कोल्हापुर)
=========********============
पान क्रमांक 01
 पान क्रमांक 02
 पान क्रमांक 03

=========********============

"आठवणी अहमदनगरच्या"

नगर ला जाऊ असे मी मनात
ठरवून निघालो. पहाटेच्या २ वा.पासून जागाच होतो.बुलडाणा ते नगर अंतर खूप दूर किमान
२५० ते ३०० किमी मनाची तयारी केव्हाचीच झाली होती. कडाक्याची थंडी मी म्हणत होती. घर ते एस टी स्टॅड अंतर खूप सोबत एक
दिवस पुरेल एवढे सामान. निघालो एकदाचा पहाटेचे ५ वाजले असतील बायकोचे
मन थोड़े थोड़े होत होते.परत
लवकर निघण्याच्या अटीवर
तिला निरोप दिला रस्त्याने
पायही गारठून गेले होते बस
५.३० ची होती मी 
पोहोचलो तेव्हा १० मी उशीर झाला होता....!
अरे देवा माझ्या जीवाची घालमेल सुरु झाली होती.
धावतच चौकशी खिड़की
गाठली तर......! बस आलेली
आहे फलाटावर बघा लगेच फलाट गाठला तर बस निमुटपणे माझीच वाट पहात
उभी...! तड़क सिटवर जावून
बसलो थंडितही गर्दी कमी
नव्हती. एकदाचा प्रवास सुरु
झाला.
   आनंद गगनात मावत नव्हता 
"भेटी लागी जीवा....
लागलिसे आस।"
गीत ओठावर तरळत होते.
सोहळा कसा असेल यापेक्षा
माझे मित्र भाऊ भगिनी कशा
असतील असे अनेक प्रश्न मनात तरळत होते.
खिड़कीतून थंडीची लाट मध्येच डोकावत अंगावर शहारे आणत होती.डोक्यात
उत्सुकतेचे वारे घोंगावत होते.
    एकूणच प्रवास कुड़कुडत सुरु झाला होता.
पण आनंद गगनात मावत
नव्हता ज्याला कधीही बघितले नाही केवळ आंतरजाला द्वारे मुक्या-मुक्या
बोलणे तर वारंवार झाले होते.
    आता प्रत्यक्ष भेटीची वेळ
जवळ जवळ काही तासांवर 
येवून ठेपलि होती.
    कार्यक्रमाला जायचेच
म्हणून कित्येकदा दचकुन
बेरात्रि जाग आली होती.
आज मात्र रात्री दोन वाजता
पासून झोपच येइना.अचानक
थंडीने कधी डोळा लागायचा.
      कधीतरी एकदाचे ११ वाजून गेले.नेवासा फाटा आला कंडक्टर ओरडला
गाडी १५ मि.थांबेल चहा
नास्ता उरकुन घ्या.आता
काही मिनिटाचा वेळ उरला
होता.ठरल्या प्रमाणे पत्ता
विचारण्या साठी अरविंद
काकांना फोन लावला लगेच
उत्तर आले "पाईप लाइनला
उतरा." जीव एकदाचा भांड्यात पडला.
     पोहोचलो बुवा एकदाचे.
ठिकाण काही क्षणावर येवून
ठेपले.रिक्शा पकडून रावसाहेब पटवर्धन सभागृह
गाठले कुळकर्णी काका ,वारणकरजि,धामणे वाटच बघत होते काही वेळात रामराव काका आले.एक एक जण
प्रवेश करीत होता आपला
परिचय देत व् घेत होता.
पोटात भूकेचा डोंब उसळला
होता.अरविंद काकांनी पासेस
दिल्या मंदार,मी,वारणकरजि,
धामणेजी जेवणास पार्वती
जेवणावळ गाठली.एकेक
प्रसंग डोक्यात झेरॉक्स काढावि तसा कॉपी होत होता.अखेर मनसोक्त जेवण
आटोपले.
     कार्यक्रम स्थळी गर्दी 
वाढतच होती.सर्वांचे चेहरे
अगदी उत्सुकतेने ताणले
गेले होते.मला माझा मित्र
सुनील पवारला भेटण्याची
आस लागली होती.पण ते
कुठेतरी भेटीला गेल्याचे
कळले. असो आता कार्यक्रम
सुरु झाला अध्यक्ष म्हणून
माधवराव व प्रमुख पाहुण्या
वृषाली जी अगदी दोन्ही
देखणे व्यक्तिमत्व आपापल्या
क्षेत्रात गाजलेली.
होती.
    कार्यक्रमात प्रस्ताविक
अरविंद काकांनी सुरु केले
अन् कॅमेरे सरसावाले फोटो 
वर फोटो उडू लागले. प्रत्येक
जण आपले मनोगत व्यक्त करीत होता
कार्यक्रम सुरु असतांना ओळखींची देवाण घेवाण ही
सुरुच होती.कोण कसा दिसतोय ? याकडे सर्व मंडळी डोळे किलकिले करुन
बघायची मी सुद्धा ओळख
देत होतो.माझ्या बाबतीत
मात्र अनेकांनी गाटांगळी
खाल्ली होती.माझा fb व
व्हाट्सअप वरचा फोटोने
घोर केला होता.या बाबिने
का होईना हास्याचे फवारे
उडतच होते.सर्वांचे चेहरे
आनंदाने ओसांडून वाहत
होते.
    एक एक करुन भाषणे
संपत्त आली होती.शेवटी
दूसरे सत्र सुरु झाले.
       सोवनी सर गायला
लागले "ऐसी लागि लगन....!"
टाळ्यांचा कडकडात सुरु
झाला....सा नि ध प म ग रे सा........आ...आ..आ...
संगीत सुरांची मैफल सजलि.
एक एक करीत कार्यक्रमाचि
सांगता झाली.
     डोळे घराकडे लागले होते.
पण कुणाचाही पाय सभागृहातून बाहेर पडण्यास
तयार नव्हता शेवटी फोटो
सेशन झाले व् जड़ अंत:करणाने काढता पाय
"आठवणीची झोळी" भरुन
घेवून काढता पाय घेतला.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👏🏼👏🏼👏🏼👏🏼😜😔😔

माझ्या जीवनात एक मजेशीर गोष्ट घडत आहे...

माझी आई मला सांगते की , तुझे नाव घुगऱ्या घालून ठेवले आहे...
ते आप्पा 
आप्पासाहेब....
पण मला माझ्या या नावाचा गर्व आणि अभिमान वाटतो...
तो पुढील प्रसंग असा....

माझा मुलगा English Mediam मध्ये इयत्ता 1 ली मध्ये शिकतोय...
आणि मला बूुधवारी हाफ डे असतो 
मी त्या दिवशी असाच माझ्या  लाडाच्या ""अथर्व""ला शाळेत आणायला गेलो..
आणि माझा अथर्व मला पाहिले की माझ्याकडे पळत आला...
आणि मला म्हणाला की ...
आज ते ...ss न ......ते.... सपाटे सर ,,,,,,,,,म्हणत होते..होते...की...
सुरवसे सर म्हणजे साहित्य मंथन 
म्हणजे 

📚📚साहित्य मंथन....📚📚
कारण मला त्यावेळी काहीच सुचेना ...मन भरून आले..तसाच मी आलेला आवंढा गिळला...
मनोमन धन्य झालो असे वाटले...
साहित्यमंथन नी माझी ओळख आणि अस्तित्व नव निर्माण केले आहे.... ...
साहित्य मंथन आणि ना सा ग्रुप हे फक्त माझ्या साठीच एकाच नाण्याच्या दोन बाजु वाटतात...

अगदी खणखणीत नाणे.....!!!

आणि हाच माझा... ***अथर्व ****

ना सा ग्रुप वरील सकाळचे
फ्रेश मॉर्निंग बुलेटिन नित्यनियमाने ऐकतो हे मला तरी न उलघडलेले कोडे आहे....
धन्यवाद ...
साहित्य मंथन 
मला एक नवी ओळख आणि अस्तित्व प्राप्त करून दिल्याबद्दल...
- अप्पासाहेब सुरवसे, लाखनगाव 
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾💐💐💐💐💐💐💐💐
 ।।ग्रुप संकल्प।।

हा ग्रुप करेल,
आणखी घट्ट विण नात्यांची।।

हा ग्रुप धरेल,
कास नव्या विचारांची ।।

हा ग्रुप देईल संधी,
प्रेमानं आनंद वाटण्याची ।।

हा ग्रुप देईल ताकद,
दुखः विसरून जाण्याची ।।

हा ग्रुप देईल शक्ती,
एकमेका आधाराची ।।

हा ग्रुप नेहमीच करेल,
बात लाखमोलाची ।।

हा ग्रुप घेईल प्रतिज्ञा,
खदखदून हसवयाची ।।

हा ग्रुप दाखवेल नवी दिशा,
आयुष्य उपभोगणयाची ।।

हा ग्रुप राहो कायम चिरतरूण...
घ्या नव वर्षा च्या शुभेच्छा भरभरून..
====================================
 🎯🎯साहित्यमंथन 🎯🎯 आयोजित भाग ======36
---------------------------------
अहमदनगरच्या आठवणी
---------------------------------
📚📚📚📚📚📚📚

साहित्य मंथनच्या आठवणी
काढता  डोळ्यात येते पाणी
नवरंग प्रकाशनाच्या दिनी
मज गेले आजोबा सोडुनी


  मज वाटे खूप हुरहुर
  इकडे आड तिकडे विहीर
  मनी केला पक्का निर्धार
  जाई आजोळी आईच्या  माहेर

सोबत सखा मा.तु.खुडे गुरु
पण मी मना कसे आवरु
मा.तु.मज धीर देत सावरी
असा हा योगायोग जिव्हारी

   नवरंगचा रंगारंग सोहळा
   लागी लगन सोवनींच्या गळा
   मज घाली पुन्हा पुन्हा भुरळ
   डोळ्यातूनी पाणी सहज तरळ


अमरावती ,वसमत , नांदेड
अहमदनगर, उस्मानाबाद की बीड
बुलढाणा की मग दादर, मुंबई 
सोहळयाची चर्चा होई स्नेहालयी


  सोशल मेडियाचा हा ग्रुप आदर्श
  लोक होती उत्सुक घेण्या प्रवेश
  नयनी साठवून दिव्य अप्रूप
 सदस्य घेती एकमेकांचा  निरोप


   ✏🎯🎯🎯✒
  आप्पासाहेब सुरवसे सर
   लाखनगांवकर
===========================
 🌸साहित्य मंथन आयोजित 🌸
      🌸भाग ==== 36🌸
                 विषय - 
  🌹अहमदनगरच्याआठवणी🌹
     🌹प्रेषक --कुंदा पित्रे🌹
            🍁स्पर्धेसाठी🍁
=====================
खरं  म्हटलं तर मी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर नव्हते तेव्हा प्रत्यक्ष पाहणं व फोटोज्,ऑडियोज्,अनुभवलेल्या क्षणांच लेखन  हे सारं दृग्गोचर करणे यात जमीन अस्मानाचं अंतर आहे .तरी देखील वरील सारं व्हाॅटस् अप वरून पाहून खूपच फ्रेश व्हायला झालं! माझा सहभाग नव्हता याची रूखरूख लागली व मी मनाला समजावलं --फिर कभी !!
 मग म्हणावस वाटले🍁🍁
आठव दृष्यांचा सजला झुला
परि नसे जरी मी तेथे
गोंजारले मन क्षणा क्षणाला
शब्दांगणी ,असे मी तिथे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
यह समा,यह आसमा
खींचकर बुला रहा था
लेकिन कठिन रक्तिमा
बंधनोमे उलझ रहा था
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
  It was glorius show
   wish shuld have 
   attended it
 seeing the photographs        now.
 lost joy , I can not get it.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आणि मग मला मोत्यांच्या लडी दिसू लागल्या.
मागे मी लिहल्याप्रमाणे व्हाॅटस् अप वरील चारोळ्याचं नवरंग हे पुस्तक हे आपल्या मैत्रांगणाचे पहिलं अपत्य !! या पहिल्या अपत्याचे बारसं इतकं धुमधडाक्यात झालं की, साहित्यप्रेमीनी हजेरी लावली त्याला तोड नाही.कारण जयश्री पाटील वसमतहून भल्या पहाटे बसस्टाॅन्डवर काळोखात एकट्या सकाळ होण्याची वाट पहात थांबल्या खरं धाडस !!
दिलीपजी हिंगोलीहून,ना.सा.सर धर्माबादहून,वारणकरजी नांदेडहून एव्हढ्या लांबच्या पल्ल्याची माणसे थंडीत कुडकुडत रहायला हाॅटेल मिळते काय शोधत होती .कमाल झाली.
अनिल हिस्सल बुलढाण्याचे 300 कि.मी.अंतर काटून रात्रभर झोप नाही ,पहाटे बस घेऊन कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता अहमदनगरला हजेरी लावली.प्रकृति साथ देत नसूनसुध्दा श्री.रामराव जाथव यानी हजेरी लावली !अरविंदजीनी त्यांचा जीवनगौरव करून यथोचित मान राखला. यातून एकच निष्कर्ष निघतो.अमाप साहित्य प्रेम व आपलं लेखन कोणीतरी वाचतयं हे मानसिक समाधान!! पण कुणीहि आठवण लिहताना नकारात्मक लिहले नाही. यावरून
अरविंदसरांच कुशल ऑर्गनाजेशन दिसून आले.एकदा समारंभ स्थळी पोहचल्यावर अभ्यागताना कोणती उणीव भासली नाही असे दिसले .कार्यक्रम वेळेवर सुरू होऊन ,वेळेवर संपला हे जाणवले. गाण्याची मैफल चांगली रंगली असावी कारण त्याची ऑडियो ऐकायला मिळाली नाही.मलाही गाणं म्हणता आले असते.असो. शिल्पाताईचे सुत्रसंचालन मोजकेच नेमके असावे असे फोटोवरून जाणवले.अध्यक्षिय भाषणाची ऑडियो पाहिजे होती .अध्यक्ष वैशाली शिंदे काय बोलल्या कळले नाही. सुलभाताई कुलकर्णी यांची व्हिडियो फिल्म पुनःप्रत्याचा अनुभव देऊन गेली. प्रत्यक्ष ओळख नाही . तरी नांवे असल्याने फोटोवरून व्यक्ति  कळल्या.पडद्यामगचे अरविंदजी दिसत होतेच.एकुण उपस्थितानी नवरंग चारोळी पुस्तक प्रकाशनाचा सोहळ्याचा आनंद मनी साठवला.
व्हाॅटस्अपमुळे जग किती जवळ आलेय हो!
नाहीतर जन्मात कधी कोल्हापूर,पुणे,नांदेड,औरंगाबाद,अहमदनगर,हिंगोली,धर्माबाद,
वसमत,रत्नागिरी येथील व्यक्तींचे लेखन कथी समजलेच नसते.
खरंच अरविंदजी  तुम्ही साहित्यगंगेचा  सुंदर प्रवाह निर्माण केलात असाच तो पुढे मोठा होऊ दे  व छोटे लेखक मोठे होऊ देत .त्यात मी पण आलेच.
आता माझ्या नजरेसमोर आपल्या इतर साहित्य प्रकाशनाचा सोहळा तरंगतो आहे.
धन्यवाद 
इथेच थांबते
============================
91 74989 64901‬: 
विषयमंथन भाग: ३६
विषय: अहमदनगरच्या आठवण.       

 आतुरआत्मा आनंदतरंग
आसुसलेले अंतरमन
अहमदनगरची आस
    असे मनी मानसी वसलेल्या आम्ही चौघी सुलभाताई, शिल्पाताई, वृषालीताई आणि मी .सोबतीला सुनिल पवार ही होते.थंडी गुलाबी, हवा ही शराबी असे धुंद वातावरण आणि ऊत्साहात निघालेले साहित्यिक, मग गप्पांचे काय? "आनंदाचे डोही आनंदतरंग "असे मस्त खेळीमेळीचे वैचारिक देवाण- घेवाणीचे सत्र आमच्या डौलाने निघालेल्या तव्हेरा गाडीत पार पडत होते.शिल्पा जुनी मैत्रिण , बाकी सगळ्या नव्या ओळखी( प्रत्यक्षातल्या), वॉट्स अँपच्या होत्याच.वृषाली माझ्यासारखीच हंसरी , खेळकर पट्कन आमच्यात मिसळली. माळशेज घाटातून जातांना१० मिनिटांची सुंदरशी सहल अनुभवली.शिल्पाचे सँडविचेस्, माझे पालक परोठे, लिंबू क्रश गोड लोणचे वर थर्मासमधून आणलेल्या गरमागरम चहाचा घोट, सोबतीला थंडगार हवा, वानरांच्या गोड हालचाली,  हिरवेकंच डोंगर वाहवा! मस्त मज्जा! तृप्तीचा ढेकर देऊन निघालो.डौलदार वळणांमधून, डोंगरदर्या पार करत १.३० ला आमची तव्हेरा पोहचली. सर्वजण वाटेला डोळे लावून बसलेले.आम्हाला पाहतांच आनंदले.मग पार्वती कॉर्नरला भोजनासाठी गेलो.नंदकिशोरजी, अंजनाजी, कुलकर्णी सरांची मंडळी, अशी बरीच लेखक मंडळी भेटली.वाटलेच नाही त्यांना पहिल्यांदाच भेटतोय.फारच बरें वाटले.
 माझ्या मामांकडे (श्री. विनायक ढेपे)जाऊन समारंभासाठी तयार झालो.चहा घेतला.२.३० ला कार्यक्रम सुरू झाला.
 कवि माधव सावंत, वृषाली शिंदे, कुलकर्णीसरांनी दिप प्रज्वलन केले.शिल्पाताईंनी सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतली.शारदेची पूजा सुरू असतांना स्वरचित शारदा स्तुती गायली.पाहुण्यांनी स्थानापन्न  झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.श्रीफळ, मोमेंटो आणि शाल देऊन.यावेळी साहित्य - मंथनचे महामेरू श्री .रामराव जाधवकाकांचा जीवनगौरव करण्यात आला.तब्येत बरी नसतांनाही काका आम्हा सर्वांना आशिर्वाद द्यायला आले होते. हे त्याच्या मनाचे मोठेपण!
त्यानंतर नवरंग चारोळी संग्रहाचे प्रकाशन प्रतिलिपी .कॉमच्या मराठी विभाग प्रमुख वृषाली शिंदे आणि कवी माधव सावंतसर ह्यांच्या हस्ते पार पडले.अंजना भालसिंग यांनी खुमासदार शैलीत पाहुण्यांचा परिचय त्याच्यावरील कविता शब्दबद्ध करून गाऊनकरून दिला.कुलकर्णी सर, वृषालीताई यानी आपले मनोगत फारच सुंदर सादर केले.कवी माधव सावंतांनी मस्त कविता सादर केल्या ;जीवनातील जुन्या चंद्राची आठवण  काढत, प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत.नंतर नवरंग मधे सहभागी झालेल्या प्रत्येक कवि, कवयित्रींनी आपापली ओळख, आपापल्या खुमासदार शैलीत करून दिली, आणि स्वरचित चारोळ्यांची बरसात प्रेक्षकांवर करून त्यांना नवरंगाच्या होळीत चिंब भिजविले.अनेक कँमेरे सरसावत होते, फोटो निघत होते.प्रत्येकाची शैली वेगवेगळी, पण भावना परिपूर्णतेनी भारलेली. ना.सा.सरांनी केलेली मदत दिसत होती.सत्र पहिले असे संपले.
चहापानाचा कार्यक्रम झाला.समस्त मंडळी पुनःश्चः ताजीतवानी झाली.३००/३५० मैलांचा प्रवास , रात्रभर जागरण, झोंबणारी थंडी सहन करून सारी लेखक मंडळी हजर होती.ऊत्साहाचा झरा खळाळत होता सगळ्यांमध्ये! नमन सगळ्यांमधील  आंनदाच्या उधाणाला.हे श्रेय सगळ्यांना एकत्रित आणणार्या जादूगाराला श्री.अरविंद कुलकर्णी सरांना जाते.नमन सर तुम्हाला.

सत्र दुसरे
सूत्रसंचालनाचे कार्य शिल्पाताईंनी जयश्रीताईंच्या हातात सोपविली.
नंदकिशोरजींच्या गोड आवाजातील धुंद करणार्या गीतगायनाचा, विडंबनगीताचा आणि शीळवादनाचा हा कार्यक्रम ऐसी लागी लगन ह्या भजनाने सुरू झाला.आणि प्रेक्षकवर्ग तालासुरांच्या रंगात न्हाऊन गेले.
मी पण एक भावगीत आणि क्लासिकल सिनेगीत सादर केले.पुणे- मुंबई विदाऊट प्रँक्टिस गाणे होते.पण तबलजीची आणि नंदकिशोरजींच्या हारमोनियमनी गाण्यात मजा आणली. असे हे सत्र नंदकिशोरजींनी आपल्या गाण्याने समाप्त केले.
मनात , अंतरंगात नवरंग साठवून समस्त कविमंडळी परत नांदेडला कथासंग्रहाच्या निमित्ताने पुढच्या २५ डिसेंबरला भेट म्हणून.निरोप घेती झाली. 
©जागृती निखारे.
============================

91 74989 64901‬: 
कधीही न भेटलेल्या
सहवासात कविंच्या
गप्पागोष्टी फुललेल्या
नवरंगात भिजलेल्या
----------------------------

मनोगत मांडतांना
सहजस्फुर्त बोलतांना
चाचपले प्रेक्षकांना
आनंदभाव अर्पितांना
-------------------------------
गाण्याची पकड
मनाने घेतली
निरपेक्ष फुलपाकळी
अंतरंगी साठविली
------------------------------
चहा वाफाळलेला
घोटघोटांनी घेतलेला
अंतःकरणी साठविला
प्रेमानी अजमाविला
© जागृती निखारे
२५-१२-२०१५.
============================

91 98207 58823‬: 
नवरंग प्रकाशनाचा क्षण 
ऊजळला सरत्या वर्षी

न भेटलेल्या सुह्रुदाचा योग
जुळला, जुळली घट्ट मैत्री

अरविंदजी काका आणि
सहकार्‍यांनी घातला घाट

परगांवच्या पाहुण्यांचा तर
काय ऊडवला थाट 

हजर नव्हते समारंभी जरी
साकारले चित्र सामोरी

सार्‍यांच्याच नजरा आनदी
अन हुहहूर दाटली ऊरी

कृतज्ञता अन सार्थकतेचे
दाटले होते नयनी पाणी

नवरंगी स्वभावाचे नवेनवे
जुळले धागे मृदु रेशमी

एक एक करके बढता रहा
 जथ्था लिखनेवालोका

नवे संकल्प ,नवी स्वप्न मनी
निर्धार नवनिर्मीतीचा

ऊगवत्या सुर्याच्या साक्षीने
नवे स्वप्न साकारायचे

प्रत्येकाने झटून एकजुटीने
साहित्य मंथन ऊंचवायचे

अंजना कर्णिक
============================













Friday, 25 December 2015

25 डिसेंबर 2015 ची क्षणचित्र

साहित्य मंथन व्हाट्सअप ग्रूप द्वारे आयोजित 
" नवरंग चारोळी संग्रह प्रकाशन " 
सोहळ्याचे काही क्षणचित्रे 

=====================*******=====================




































Monday, 21 December 2015

** विचार मंथन **
विषय : सख्खे शेजारी 



सुलभा कुलकर्णी, बोरीवली मुंबई 



जयश्री पाटील, वसमत 



========================================================
साहित्य मंथन
लेख स्पर्धा: सख्खे शेजारी!!
"शेजारधर्म," "निंदकाचे घर असावे शेजारी", "शेजी बाई शेजी बाई तू माझी आई ताई", असे शब्दप्रयोग आपण सर्रास करतो. अडचणीला प्रथम धावतो तो शेजारी मग रक्ता नात्याचे म्हणून शेजारी हक्काचे ! या न्यायाने आपण शेजार धरून ठेवायचा प्रयत्न करतोच. कधीअगदी शेजारी गुळपीठ  जमते . तर कधी छत्तिसाचा आकडा!
मलाही दोन्ही अनुभव आले.
माझ्या वडीलांची तत्वाला ठाम राहायची वृत्ती! तडजोड स्वभावातच
नाही! म्हणून अनेक नोकर्‍या सुटल्या, नव्या धरल्या व प्रतिवर्षी वनी विटी नराज्य या न्यायानी नवंगांव नंव घर! मला जेथपासून लहानपण आठवत तेव्हापासून ते मॅट्रिक होईयर्यंत म्हणजे १ली ते ११ वी अशा ६ शाळा झाल्या. तेव्हडीच गावे शहाराष्र्टात फिरलो. त्या पैकी एक अजूनही लक्षांत राहीलेला शेजार म्हणजे, सातारारोड कुपर इंजिनीयरींग येथील कर्मचारी वसाहतीमधला भावसारांचा शेजार! प्रकाशदादा, मझ्या बरोबरीची,  बरोबरच रोज शालेला येणारी गीता आणि भावसार काका काकू! "समसमा संयोग झाला" असं म्हणतात.आमचही कौंटुबीक नात जडल याला कारण बाबा व भावसार काका आणि मी व प्रकाशदादा यांची निसर्ग व घरासमोर मागच्या पुढच्या अंगणात येथेच्छ बाग बगीचा फुलवण्याची आवड! भावसार काकांना शेतीचं बागकामाचं चिंगलज्ञान होतं कारणं त्यांची नोकरी बरोबरच स्वत:ची शेतीपण होती. आणि मला तरफुलं झा प्राणी ,बगिचा, भाजीपाला लावणे याची प्रचंड आवड!
सातारारोडचाला या हौसिंग सोसायटीच्या घरासमोर व मागेही भलमोठ पसरलेल व कुंपण असलेलच अंगण!
 बैठ घर! मग काय! झाली आमची जमिन खोदाई, खतं माती घालणी, रोपं लावणी, पाणी चढवणीला सुरवात. त्यातच शेजारचं अंगण व परसदार सुगंधी फुलवेली, फळभाज्यांच्या वेलांनी डवरलेलं! शिवाय दोन्ही घरच्या तट्याच्या कुंपणाखालून  मांजरीच्या पिल्लावळींची ये- जा! आणि अंगणा बाहेर देखण्या कुत्र्याचं सदैव दर्शन! आणखी काय हवं! माझे पाय सारखे सारखे भावसारांच्या बागेत वळायचे! वडीलांनाही बागेसाठी काका स्वत:हून मार्गदर्शन करू लागले . कोणती रोपं कुठे लावावी, जात कशी तपासावी, पाणी किती घालावं, खत किती व कोणतं वापरा, किड व बुरशी  लागली तर काय करावं! एक न दोन! त्यांच्या मदतीने आमचं अंगण बहरलं.सुगंधी झालं घरची ताजी भाजी मिळू लागली. आणि मग सुरू झाली  ती घरच्या पदार्थांची , गोडाधोडाची सणासुदिला फराळाची देवाणघेवाण! नंतर दोन कुटूंबातील मुलाचेवाढदिवस साजरे करणं  रक्षाबंधन, ओवाळणी अंगत पंगत अशी धमाल! फारछान मनमिळाऊ काक काकू आणि प्रकाश गीता तर काय माझे बहीण भाऊच झाले माझे. कारण
मला कोणी भावंडच नाही नं!
पण हे सुख खूप नाही टिकल! २-३ वर्षातच वडीलांच्या हेककेखोर स्वभावामुळे,' कुपर इंजिनियररींगच्या ' व्यवस्थापनेशी वाजलं आणि त्यांची नोकरी व आमच ते हिरवगार बहरलेले घर  व मनमिळाऊ असा प्रेमळ शेजारही सुटला. लहान शाळकरी वय!  आई वडिलजातील तिथे जायचं! काही वर्ष नंतरही संबंध राहीले. आलो गेलो परस्परांकडे! पण..... विचवाच घर पाठीवर या न्यायाने माझी व आईची फरफट गावोगाव
चालूच राहिली. अनेक
शेजार व शाळा बदलल्या मैत्रिणी तुटल्या, नव्या जोडल्या.
या सार्‍याप्रकाराला कंटाळून आईनी हिंगणे स्री शिक्षण संस्थेच्या वसतीगृहावर मेट्रन म्हणून नोकरी धरली व आम्ही पुण्यात आलो. पुन्हा एकदा नवीशाळा!नवं घर! सोमवार पेठेतल्या एका वाड्यात एका खोलीची भाड्याची जागा मिळाली.तेंव्हा मी ७वी  ८ वी मधे मी असेन बहूदा!पुण्यातराहायलाआल्याचाआनंद होता कारण येथे मावश्या व मावस भावंड होती शहरात! शाळाही चांगली !
पण..... या घरात आई नव्हती! तिला वसतीगृहातच राहणं भाग होत.मग सुरूझाला आम्हा बाप लेकीचाच संसार!! घरची सारी जबाबदारी, घरकाम , आलंगेलं ,शाळा बाजारहाट,स्वयंपाकपाणी
सारच माझ्या अपरिपक्व खांद्यावर येऊन पडलं!
आणि अशा वेळी माझ्या मार्गदर्शनाला  सोबतीला मदतीला आले सख्खे दोन शेजारी! खोलीच्या ऊजव्या बाजूला जडे काका काकू, त्यांनी ऊतारवयात झालेली कन्या मिनाक्षी ऊर्फ कमा , ही साधारण माझ्या बरोबरीची व तिच्या आत्याबाई आणि दुसरा शेजार म्हणजे आक्का ऊर्फ फडके काकू , दादा म्हणजे फडके काका  व विजयदादा ऊर्फ आख्या वाड्याचा विज्या!
या दोन कुटूंबांच्या सर्वच चालीरिती ,वर्ण, शिक्षण  वागणूक,यां सर्वात जमिन अस्मानाच अंतर! वर्णात म्हणात तर  एक काळे व लख्ख गोरे! पण दोन्ही कू
========================================================
🌷विचारमंथन🌷
     आपण जन्माला येताना अनेक ऋण घेऊन जन्माला येतो. त्यात समाज ऋण हे अतिशय जबाबदारीचे ऋण आहे. ज्याची देवाणघेवाण ही आपल्या शेजाऱ्यांशी आपण अविरतपणे करत असतो. ती देवाणघेवाण किती निकोप आणि सशक्त आहे,हे दोघांच्याही स्वभावावर अवलंबून असते. ही देवाणघेवाण अनेक प्रकारची असू शकते. जसे की,विचारांची,वस्तूंची उसणवारीची,आर्थिक,मानसिक...इ.इ.दोन्ही शेजाऱ्यांचे संबंध हे त्यांच्या अनौपचारिकतेवर अवलंबून असतात.
  प्रत्येक धर्माचे मूळ सूत्र हेच आहे की,शेजाऱ्यावर प्रेम करा. याचा व्यंगार्थ अनेकानी लावला. पण या जगात निखळ प्रेमाइतके काय शाश्वत आहे.मानवी जीवनात शेजारधर्म किती महत्वाचे आहे!कारण प्रत्येक सुखदुखाचे पहिले वाटेकरी हे आपले शेजारीच असतात न!
आपण घराबाहेर जाताना घराला कुलूप लावतो. मला वाटते,घराचे रक्षण कुलूप नाही तर शेजारी करत असतो. कुलूप तर चोराला हेच सांगत असतो की 'घरात कोणी नाही,ये अन काय न्यायचे ते निवांत ने'. पण आपल्या कुलूपबंद घरासमोर कोणी उभे जरी राहिले तर,'काय काम होत?' ..... ??अशा अनेक प्रश्नाची सरबत्ती करून नवीन माणसाला भंडावून सोडतो. पण ही ग्रामीण भगातील संस्कृती अनेक चांगल्या बाबीसारखी आज लोप पावत चालली आहे. मोठ्या शहरात तर फ्लॅटसिस्टीममुळे अशी शेजार संस्कृती फ्लॅटच झालेली दिसते.पण ग्रामीण भागात अजूनही शेजारधर्म पाळला जातोच!माझी जडणघडण ग्रामीण भागात झालेली असल्याने याचे चांगले अनुभव माझ्या पदरात आहेत.प्रत्येकाच्या घरात शिजलेल्या वेगवेगळ्या भाज्या,नवनवीन पदार्थ एकमेकांच्या घरी आधी जायचे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आमच्या जेवणात वैविध्यता असायची,जेवणात सकसपणा यायचा! जरासं घरात कोणाचे दुखले की सगळेजण भराभर जमा व्हायचे अन ते दुखण क्षणात कमी झाल्यासारखे वाटायचे. कारण म्हणतातच ना,"दु:ख व्यक्त केले की त्याची तीव्रता कमी होते."आनंदाचीही तीव्रता अशी शेजाऱ्यांशी व्यक्त केल्यानेच वाढायची! 
    माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकट्याने राहू शकत नाही हेच खर!म्हणून शेजारी हे सख्खे शेजारीच असावेत. त्यात हेवेदावे ,रुसवेफुगवे हे क्षणिक असावेत.आपल्या घरी आजी नसली तरी शेजारची आजीच आसपासच्या लेकराना बोलावून गोष्टी सांगायची,त्यातून तशा वृध्द लोकानाही त्यांचा वृध्दापकाळ जड जायचा  नाही अन आमच्या सारख्या लेकरांवर अनौपचारिकपणे संस्कारही व्हायचे. पण आता' 'गेले ते दिवस अन उरल्या त्या गोड आठवणी'
   - संगीता देशमुख
वसमत
========================================================
 विचारमंथन -भाग - 35 वा.
विषय  -- सख्खे शेजारी
प्रेषक --  कुंदा पित्रे
===================
माणसांच जीवन नदीसारखी वळणे घेत वाहात असतं ! जिथे जाल तिथे निरनिराळी माणसे भेटतात.त्यांचे चांगले वा विचित्र अनुभव येत असतात.मला जेव्हा जेव्हा अशा माणसाचे अनुभव आले ते तसे कोणी सख्खे शेजारामध्ये मोडणारे नव्हते त्यांचे मला आलेले अनुभव कथन करते.गावाला असताना.माझे मी पंथरा वर्षाची असताना गेले. आम्ही गावातले प्रतिष्ठित. चांगल रहाणीमान ! दोन घर सोडून दुकानदार रहात .बेताचे रहाणीमान परंतु प्रथमच  ऋषिपंचमीचा उपवास आला त्यावेळी त्या दुकानदारच्या बायकानी सारं फराळाचे पाठविले.म्हणजे तुपाची वाटी दह्याची वाटीपासुन सजविलेले ताट आजतागायत माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. इतकी निगुति म्हणजे सख्खे शेजारीच ना ! दुसरे मुंबईस आल्यावर मी शिक्षण घेतले. आमच्या चाळीत गरीब बाई होत्या त्या लहान मुलांच्या शिकवण्या करायच्या.मला वर्गाबरोबर इंग्रजी आणायचे असल्याने मी तिथे सतत बसून ते करून माझा इतरही अभ्यास पुर्ण करी.आजचे शिकविण्याचे तास व पध्दति पाहिली की ती बाई किती समंजस ,पैशाची अपेक्षा न 
ठेवणा-या ,मला हवा तितका वेळ देणा-या होत्या. पुन्हा हसतमुख केव्हाही डिफिकल्टी 
सोडविणा'-या होत्या. हाही  शेजारधर्म नांव हे माझे मत.
मी चाळीत रहात होते तिधे वयस्कर जोडपे होते त्यांना मुलबाळ नव्हते. मी काॅलेजचा अभ्यास करताना त्यांच्याकडे केव्हाही म्हणजे रात्रीसुध्दा अभ्यासाला जाऊन बसे पण किती सहिष्णु वृत्ती !नेहमीच हसतमुखाने चहा देत.मी सासुरवाशिण आहे हे वाटलेच नाही हा धर्म कोणता ? मी हे माझे सख्खे शेजारीच मानते.
दादरला रहायला आले ऑफिसला जाताना रस्ता क्राॅस करताना मला गाडीने उडविले.सकाळची वेळ खिडकीतून ज्या बायकानी पाहिले त्या धाडधाड रस्त्यावल आल्याच शिवाय शेजारच्या पाणी घेऊन आल्या सांगण्याचे कारण सारे दोन दोन कारवाले फक्त माझीच कार नव्हती मी नोकरीवाली ते सारे बिझीनेसमन पण तरीही सारे थावले हे काय आहे ?शेजार सख्खा !! 
अलिकडेच माझा डावा हात घरीच पडून फ्राॅक्चर झाला घरी कोणी नव्हते .आमची तशी हाॅस्पिटलमध्यै ओळख नव्हती .ज्या मुलीला फ्राॅकात पाहिले ती डाॅक्टर झाली होती ती जवळच रहाते शेजारच्यांची मुलगी तिवा जस्ट फोन केला तिने ताबडतोब प्राॅपर मित्राला केस सांगितली त्यांने पुढचे भराभर उरकले कारण कोपराचा चुरा झाला होता.ऑपलेशनही त्याच डाॅक्टरने केले .सक्सेफुल झाले तेव्हा प्रचंड धावपळ करणारी ती छोटी डाॅक्टर पण मन मोठे असणारी व त्यावेळी ऑपरेशन नंतर मला जेवण भरविणा-या वरच्या मजल्यावर रहाणा-या मला मोठ्या भगिनी प्रमाणे असणा-या वहिनी ही माणसे कोण ?त्यांना देखील  त्यांचे व्र्याप असतातच की, !  म्हणूनच अंगचुकारपणा न करता जे धावूषन जातात.त्याना मी नात्यापेक्षा सख्ख मानते .वेअर् होऊन गेलेय आता इथेच थांबते.!
काव्याच्या ओळी सुचत आहेत पण थांबते
कुंदा पित्रे
🌺🌺🌺
========================================================










Friday, 18 December 2015


प्राणी मात्रा वर 
दया हो करावी 
दत्ताची त्रिमूर्ती
आम्हांला शिकवी 
🚩 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 

÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
दत्तगुरू सदया नाथा 
अनाथांचा तूच नाथा
कर्ता आणि करविता नाथा
 सद्बुद्धीचा दाता नाथा
© जागृती निखारे, १८/१२/२०१५
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
|| दत्तगुरु ||
=●=●=●=
एकवटली अद्वितीय त्रिशक्ती
उत्पत्ती, पालन व संहार
नाथांचे नाथ श्री दत्त गुरुदेव
करितो नमन करा स्वीकार..!!
*****सुनिल पवार......
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
चारोळी मंथन स्पर्धा....
ब्रह्म,विष्णु महेशाचे रुप
गुरु दत्तरुपी अवतरले
सकल जनांचा तारक तो
पाहताक्षणी मन गहिवरले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
करण्या जगाचा उद्धार
अवतरले दत्तगुरु पृथ्वीवर
दावूनी मार्ग सुख शांतीचा
झाला दुःखितांचा अाधार
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷    
              🎯 मा.तु.खुडे.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
दत्तमाऊली तू  मार्ग दाखवी
ज्ञानसाधना अन मोक्ष मुक्तीचा
तू  माया  अनुसुया मातेची
संगम ब्रम्हा विष्णू महेशाचा
अंजना कर्णिक
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
स्पर्धेसाठी
मार्गशिर्ष माहे करावे पुजन किर्तन ,अनुष्ठान दत्ताचे
आनंदे करावे गरजूस दान
साधनेत  ध्यान त्रिमुर्तींचे।
अंजना कर्णिक
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
स्पर्धेसाठी
मार्गशिर्ष माहे करावे पुजन किर्तन ,अनुष्ठान दत्ताचे
आनंदे करावे गरजूस दान
साधनेत  ध्यान त्रिमुर्तींचे।
अंजना कर्णिक
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
स्पर्धेसाठी
ऊद्धार करावया आत्म्याचा
अवधुताची कास धरूनी
क्षमा ,शांती, दया, मुक्तीचा
लाभ मिळेल दत्त भजनी!
अंजना कर्णिक
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
औदुंबरी दत्तगुरू माऊली 
मज दिसली गुरुराज माऊली.!
ओढ मनी लागली दर्शनाची,
चिरंतन जीवनी विसावली.!!
✏_____________ जी.पी
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
स्पधॅसाठी
उध्दार कराया जगाचा,
घेतला अवतार त्रिमूतीॅचा,
ध्यास दतात्रय गुरूंचा,
स्विकार करा मम वंदनाचा.-
---------------------------------------
द्या आशिष मजला,
मागणे श्री गुरूरायाला,
दानधमाॅचा मागॅ स्विकारला,
नका वंचित ठेवू मोक्षाला.
सुलभा कुलकणीॅ.
-------------------------------------
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
स्पर्धेसाठी ....

सदगुरु नाथा, ऐक माझी गाथा,
तुझ्या चरणी, ठेविते मी माथा,
तूच कृपाळू, तूच दयाळू रे भगवंता, 
हो तयांचा तू, जे देती हाक नाथा ....
निर्मला सोनी.
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
स्पर्धेसाठी
सुंदर ते रूप सद्गुरूंचे
विलसे हास्य मुखावरी
श्वान  अन गाय वासरूचे
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
स्पर्धेसाठी
नवनाथांपासून ते समर्थ रामदासापर्यत।
हे तो दत्तात्रयाचे कृपाछत्र
भक्तांप्रती।
जगाच्या आरंभापासून
अंतापर्यंत।
सद्गुरवाचून आम्हा कैसी
मिळे गती।
अंजना कर्णिक.
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
👆🏻वरील अर्धवट लिहलेली गेलेली चारोळी खाली दिली आहे 
सुंदर ते रूप सद्गुरूंचे
विलसे हास्य मुखावरती
श्वान अन गाय वासरूचे
अस्तीत्व शोभते सभोवती
अंजना कर्णिक.
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
स्पधॅसाठी.
नको रे मना चलबिचल होऊ,
चल,दत्तदिगंबरा,भजनी दंग होऊ
त्रिमूतीॅ आहे उभी होऊनी भाऊ,
गाणगापुरी दशॅना सत्वरी जाऊ.
       सुलभा कुलकणीॅ.
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
स्पर्धेसाठी
कृपाळूपणे  रे अवधूता
पाहसी भक्तांकडे
सर्वस्वी शरण मी तुला
ने मज मानवतेकडे
अंजना कर्णिक
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
ब्रह्मा विष्णू महेश
रूप हे दत्ताचे
परीक्षती बाळरूपे
सत्व अनुसयेचे.........
जयश्री पाटील.
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
ब्रह्मा विष्णू महेश
रूप हे दत्ताचे
परीक्षती बाळरूपे
सत्व अनुसयेचे.........
जयश्री पाटील.
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
हे दत्तगुरू ,दे आशिष साहित्य मंथनाला,
चारोळ्यांच्या मोत्याची
घालू माळ तुजला,
हजर रहा तू,नवरंगाच्या प्रकाशनाला,
सवॅ देव आहेत तेथे तुझ्या भेटीला.
    सुलभा कुलकणीॅ.
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
🌸🌸दत्त महाराज 🌸🌸

माहूरगड निवासी दत्त महाराज,
देवांचे देव घेती सत्व जगन्नाथ,
अवतरले कुटीरी अनुसये,
ब्रम्हा,विष्णु अन् महेश रूपात.

 🌺🌺संदीप धोंडगे पाटील,नांदेड.
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
माहूरगडावरी 
अवतरले दत्तगुरू 
देवा दत्ता चा नाम 
जप चला करू 
🚩 नासा
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
🌸 साहित्य मंथन 🌸
 ❄ चारोळीस्पर्धा ❄
🍂विषय दत्त गुरू🍂

1 )अंतरी दाटून
       अज्ञान अंधार ।
            न्या भव- पार
                     दत्त गुरू ॥
शरयू शहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
2 )
आयुष्यभराची  वाटचाल
किती उलाढाल उलाघाल ।
हवे आता... शाश्वत सुख
द्यावे..दत्त गुरू चिरकाल ॥
शरयू शहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
3 ) 
हे कमलनयन मनमोहन
हे मम आनंद वन भुवन ।
आवरी मम  अध:पतन
देई  गुरू सुख चिरंतन ॥
शरयू शहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
4 )
जन्म मृत्यूच्या.. येराझारा
प्रपंचाचा हा फापटपसारा ।
पण दत्तगुरूंच्या भक्तीमुळे
लाभे मना शांती -पिसारा ॥
शरयू शहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
5 )
अस्वस्थता ही आजुबाजुला
जीव आला ना मेटाकुटीला ।
चतुर्गतीमध्ये  जखडून गेला
दत्तगुरू न्या हो परमपदाला 
शरयू शहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
6 )
मी तर भवभवाची यात्रेकरू
पण तू खेवटिया जगद् गुरू
देवा दत्त गुरू तू  कल्पतरू
तूच माझा आधारू उध्दरू॥
शरयू शहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
7 )
गुरू दत्त तू प्रात:संस्मरणीय
तू लक्षणीय परमआदरणीय
अतुलनीय अन् विश्वसनीय
अजोड दाता तू ... अद्वितीय
शरयू शहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
8 )
तूच कर्ता धर्ता आणि हर्ता
असीम  अगाध अथांगता ।
तूच एकमेव शरण - दाता
हीच जीवन इतिकर्तव्यता ॥
शरयू शहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
9 ) 
आलीय आता तिन्हीसांज
किनारी लागो तारूजहाज ।
हवा मोक्षमय सुवर्ण साज
द्यावे वरदान गुरूदत्त राज॥
शरयू शहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
10 )
साहित्य मंथन.. पूर्णरूपाने
समृध्द होते किती विषयाने 
पण दत्तगुरू स्मृती वंदनाने
आले आले परिपूर्ण रूपा ते
शरयू शहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
शब्दफुलांच्या दहाचारोळ्या
दत्त गुरू-चरणी  वाहिल्या स्वस्थ चित्त हे मन होवोनी
शत दलांनी त्या मोहरल्या॥
शरयू शहा
9619023330
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
÷÷÷÷÷÷ 💫💫💫💫💫💫💫÷÷÷÷÷÷
तू समर्थ, तू अवधूत, तूच दत्तदिगंबरा
ब्रह्मा विष्णू महेशाचा ,त्रिगुणी अवतारा तूच त्रैलोक्यराणा ,
तूच गगनाचा तारा
 तूच सार्या जगताचा ,रे पालन हारा     © जागृती निखारे १८/१२/ २०१५ मुंबई पुणे मुंबई😊

🍀🍀श्री दत्तगुरू 🍀🍀

सुख समाधान मिळवण्या,
करावे श्री दत्तगुरुंचे पारायण,
देती दृष्टांत श्री गुरुदत्त सत्वरी,
करता श्री गुरुचरित्र पठन.

🍁🍁संदीप धोंडगे पाटील,नांदेड.

🙏🏻चारोळी स्पर्धा 🙏🏻
  1 अनाथाच्या नाथा 
श्री गुरु देव दत्ता,
पुरवी घास सकल प्राणिमात्रा
तुझ्या कृपेने रे आता 🙏🏻



2 🙏🏻 गुरु दत्त दिगंबरा
मागणे एक मनी धरा,
अधीर तुमच्या आशीषा
अतृप्त ही वसुंधरा🙏🏻

--संगीता देशमुख,
वसमत

🌸🌸श्री गुरुदत्त 🌸🌸

दिगंबरा ओ दिगंबरा,
दर्शन दया हो मज कृपा करा,
क्षणभंगुर सारे इहलोकी या,
गुरु चरणी स्थान दया मज पामरा.

🍁🍁संदीप धोंडगे पाटील,नांदेड.

🌺साहित्य मंथन🌺
🍁चारोळी स्पर्धा🍁
   🎀विषय-दत्तगुरू🎀

1) अत्रीमुनी स्त्री अनसुया
     पातिव्रत्य पाहून तिचे
     इंद्रादि देव होती चिंतया
     आठवीत दत्तगुरू सत्वाचे
2) श्री गुरूदेव दत्त आले
      अनसुये मंदिरी
      तेजा पाहून मनी तोषले
       अगे दे भिक्षा सुंदरी
3) अनसुया मनी बावरली
      स्मरण करी पतिचे
      आणि भिक्षा दोन करावली
       बोले गुरू दत्त ना वस्त्र अंगीचे

4) गुरू दत्तांची अनगळ अट
     अनसुया करी पातिव्रत्य सबळ
     प्रोक्षून ते मंत्र  चटाचट
     होती तीन ती लहान बाळं

5)श्री गुरू दत्त होऊन जगी
    भाव जागे मनी अंगणी
    कृपाप्रसादे तराल या जगी
     जीवन फुलेल तत् क्षणी

कुंदा पित्रे .







स्पधॅसाठी.

Monday, 14 December 2015

सन 2016 या वर्षात  राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती  व पुण्यतिथी दिन व अन्बाय राष्बट्तरीय दिन साजरी करण्याबाबत शासन परिपत्रक


दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...