जीवनात तिघांना मदत करावी
आपल्या जीवनात निदान तीन व्यक्तींना सर्वतोपरी मदत करण्याचा एक प्रयोग आपणासमोर मांडत आहे. कदाचित काहींना हा प्रयोग एक भन्नाट कल्पना किंवा निरर्थक वाढण्याची शक्यता आहे. परंतु आज समाजात असे कितीतरी गरजू लोक आहेत ज्यांना आपल्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. तन-मन-धन यापैकी कोणत्याही साधनांचा वापर करून इतरांना आपण मदत करू शकतो. या मदतीतून गरजू व्यक्तीला मिळालेला दिलासा आपणास कितीतरी आत्मिक समाधान मिळवून जातो आणि हे समाधान कितीतरी संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे.
सिकंदर सर्व जग जिंकण्यास निघाला होता. त्याच्याजवळ भरपूर पैसा व संपत्ती होती परंतु परतला मात्र तो रिक्त हातानेच. आपणही एक दिवस रिक्त हातानेच जाणार आहोत. तेव्हा थोड्या गरजू लोकांना मदत केली तर आपले नाव समाजात सदोदित राहून जाईल. गरजू व्यक्तीला मदत केल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती व्यक्ती नक्कीच धन्यवाद म्हणेल. आपण ते धन्यवाद स्वीकारून ओशाळून न जाता लगेच त्याला इतर तिघांना जसे जमेल तसे मदत करण्याचा मंत्र द्यावा. या मंत्राचा जर समाजात प्रसार होऊ लागला तर सध्या समाजात चालू असलेल्या बऱ्याच अनैतिक गोष्टी कमी होण्यास मदत मिळेल. जीवनात तिघांना मदत करणे हा निदान मंत्र आहे त्यास आपण अंशतः बदल करीत दिवसापासून सुरुवात करून वर्षापर्यंतच्या कालावधीत समाविष्ट केल्यास बराच काही बदल आपल्या आजूबाजूला दिसून येईल.
तेव्हा चला तर मग या मंत्राची सुरुवात स्वतःपासून करूया. महात्मा गांधीजी यांनी म्हटलेच आहे की, एखादा प्रयोग व प्रकल्प सुरु करायचा असेल त्याचा निकाल चांगला लागावा असे वाटत असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करावी. जीवनात तिघांना मदत करायची शपथ घेऊया व सर्व समाज सुखी करू या.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment