Tuesday, 17 November 2015

साहित्यगंध परिवार सादर करीत आहे
छायाचित्र काव्य, चारोळी स्पर्धा...दिनांक 18 नोव्हेंबर 2015

नियम व अटी:-
१) कविता व चारोळी च्या सुरवातिला 'छायचित्र काव्य स्पर्धा असा उल्लेख करावा.

१) काव्य छायाचित्राला अनुसरुन असावे.

३) प्रथम, व्दितीय, व तृतीय अशी विजेत्याची निवड करण्यात येईल.

४) विजेत्यांच्या काव्याला "साप्ताहिक आंबेडर राज" वर्तमानपत्रातुन दर आठवड्याला प्रसिध्दी देण्यात येईल.

५) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

परीक्षक:- 
१) हरीदासजी कोष्टी
२)संतोषजी कोकाटे
३) प्रमोद अंबडकार

🙏🏻साहित्यगंध प्रकाशन अकोला🙏🏻

भाकरी सोबतच आयुष्यही
हसत-हसत थापतो मी
शेवटी मातीतच मिसळतं सारं
संकटांना कुठे मापतो मी...!
✏तुकारामा
*********************************
 भाकरीचा जाळ उभ्या 
आयुश्याला लागला
संसार सारा हा
उघडयावर मांडला
   — शिवाजी चव्हाण
*********************************
घर  पडले गहाण, 
नसे रहायला थारा
निळ्या आभाळाखाली,
मांडला  संसार  सारा.
- व्ही. बी. मालवदे 
*********************************
आकाश माझे छत 
देह जमिनीवरी 
खाणे पिणे माझे 
झोपणे उघड्यावरी 
- नागोराव सा. येवतीकर 
    धर्माबाद जि. नांदेड
*********************************
निरागस हास्य माझे
अासमंताने हसावे
दुःखाचे ते पूर काय?
सर्व हाश्यात विरावे.
        कलानंद जाधव
               श्रीनगर हिंगोली.
*********************************
पोटातल्या भुकेला कुठे
चार भिंती हव्या असतात,
जगण्यासाठी हरघडीला
समस्या नव्या नव्या असतात 
राजकुमार नायक
सवना जि.हिंगोली
*********************************
उघड्यावर मांडूनिया  डाव
चांदण्यात न्हातो मी,
लपवून अंतरीच्या वेदना
मुखी हास्य आणतो मी.
                  शिवा चौधरी
*********************************
नवाईची दिवाई झाली तरी
खर्चा वर ठेउन  होतो काबू
पण सासरवाडीले गेलो तं
नाहक खिशाले बसला झाबू
- संतोष कोकाटे
*********************************
 राजा धरणीचा
इथे तिथे माझे घर
रात घालतो कुठेही
खातो करून भाकर

मजला नाही कुणीही
मी सा-या जनांचा
भुक्यापोटी घास देतो
वाली मी दीनांचा 
- संदीप गवई
इंदिरा नगर,मेहकर जि.बुलढाणा.
*********************************
यूँ तो हज़ार आशियाने 
मिल जायेंगे तेरे शहर में,
पर मै कहाँ घर बसाऊं 
जिसमे तू मेरे साथ हो !!
- स्वप्निल पाठक 
*********************************
दिवाळीच्या सणाला 
बायको गेली माहेरी 
पोटाची आग शमविन्या 
करतो मी भाकरी 

आज कळले मला 
भूक कशी लागते 
स्वयंपाक करण्यास 
चटके कसे लागते 
- नागोराव सा. येवतीकर 
    धर्माबाद जि. नांदेड 
*********************************
घर नाही दार नाही शिवार नाही
तरीही आयुष्याशी लढतो मी
उघड्या वर जरी संसार माझा 
जगण्याची जिद्द ठेवतो मी
    - सुनिल दिवनाले  अकोला
*********************************
मनमौजी जगणे असे की
छप्पर नाही घरावर
त्रासदायी दुःख फुकाचे
कशास घेऊ उरावर ?

भाकरीचेही गणित सुटते
आतड्यास देता पीळ जरासे
काळोखाच्या भग्न हृदयी
गीत उमटे आर्त स्वराचे
मातीने दिधले बळ असता
कशास चिडू नभावर ?

अन्यायाची तक्रार नाही
न्यायाची मज आस आहे
अंगण मिळो बहरलेले
एवढाच फक्त ध्यास आहे
विसरून सार्‍या वंचना मी
प्रेम करतो जगावर

पोटासाठी वणवण फिरतो
कुठे हरवले गाव माझे ?
रात्रंदिनी केवळ कष्टावयाचे
नशिबी असे का जगणे आले ?
पोटात घालूनी संताप सारा
फूक मारितो चुल्ह्यावर
- दिनेश चौडेकर
*********************************
अंतरंग भरून येत
तीची आठवण आल्यावर
भावरंग दिसतात 
लाजाळूच्या वेलीवर
रानकवी जगदीप वनशिव
पुणे
*********************************
अजून वेदना ओली जळणेही अवघड झाले
गोठून आसवे गेली रडणेही अवघड झाले

उजळले मुखवटे त्यांचे चेहऱ्याची  देऊन ग्वाही
माझीच माणसे आता ओळखणे अवघड झाले

रस्त्यात कुणाचे येथे सत्कार सोहळे होती
हे खेळ बिनपैशाचे टाळणेही अवघड झाले

शब्दांची फसवी भाषा  फासात गुंतलो मी ही
दुर्बोध अर्थ नजरांचे कळणेही अवघड झाले

पोलादी भिंत मठाची गटवार चालते चर्चा 
वाऱ्याच्या कटाची वार्ता कळणेही अवघड झाले
- रानकवी जगदीप वनशिव
शिवापूर वाडा पुणे
*********************************
कितीही खाल्ला पिझ्झा तरी
नाहीच भरनार माझं पोट
कष्टाची भाकरीच बरी मला
जरी नसली खिशात नोटेवर नोट..!
✏तुकारामा
*********************************
चोरलेल्या कल्पना स्वतच्या प्रतिमेत 
रुजुन कोण वेली फुलवतो नभी
आम्ही षंढ नाही आहोत
नको आम्हांला टेस्टटुयुब बेबी
- रानकवी जगदीप वनशिव
शिवापूर वाडा पुणे
*********************************


No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...