Monday 10 April 2017

मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया

*'मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी'*

हा विषय आपल्या सगळ्यांच्याच जवळचा.. प्रत्येक वर्षी आपल्या जवळपास एकदा तरी ही चर्चा ऐकू येतेच. मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा या दोघांचेही काही फायदे आणि काही तोटे असू शकतात.. पण मुलांच्या भवितव्याचा विचार करता, आपण नेमकं काय निवडायचं ? मराठी की इंग्रजी ? तुम्हाला काय वाटतं ?

http://beta1.esakal.com/saptarang/should-we-prefer-primary-school-education-mother-tongue-39069

या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया
----------------------------------------------------
Sai Patil  
इंग्रजी येणे ही काळाची गरज आहे परंतु त्यासाठी आपण आपली संस्कृती विसरून इंग्रजी शिक्षण घेणे योग्य नाही आणि असे नाही की आपले पाल्य मराठी शाळेत गेल्यास त्यांना इंग्रजी येत नाही मराठी शाळेत पण खूप दिग्गज आहेत इंग्रजी येण्यासारखे आणि इंग्रजी शाळेत फक्त बोलता येते पण मराठी शाळेत गेल्यास परिपूर्ण (व्याकरण पुर्ण) इंग्रजी येते. आज लोकांकडे पैसा जास्त असल्या कारणाने Competition मध्ये स्वतःचे Status वाढण्यासाठी काहीतरी नवीन करीत आहेत
----------------------------------------------------
Santosh  

मराठी भाषा सर्व शाळांमधून पहिलीपासून सक्तीची करा आणि मग कोणत्याही माध्यमातून बाकीचे विषय शिका. ज्याची जशी मातृभाषा असेल त्याप्रमाणे किंवा उच्च शिक्षणाचा विचार करून ! प्रश्न आहे तो महाराष्ट्रात मराठी भाषेला दुय्यम दर्जा मिळण्याचा . याबाबतीत दाक्षिणात्य राज्याचे उदाहरण घ्या. उच्च शिक्षणाकडे बघून ते इंग्लिश मध्यम मध्ये शिकत असतीलही पण त्यांची मातृभाषा पक्की असते. एकवेळ हिंदी नाही आले तरी चालेल.
----------------------------------------------------
Manoj  

आपली लोकं दुसऱ्याला मराठी चा अभिमान वैगेरे चे सल्ले देतात ...स्वतः ची पोरं मात्र कॉन्व्हेंट मध्ये... दूर कशाला जात ...या राजकारण्यांची पोरं काय मराठीं शाळेत शिकतात का ? मग काय आमच्या पोरांनी मराठी मध्ये शिकण्याचा ठेका घेतला आहे का ?
----------------------------------------------------
Anand  

संपूर्ण देशात केंद्रीय बोर्ड असावे. संपूर्ण देशात १-१० वी पर्यंत त्रिभाषा सूत्र असावे. प्रथम भाषा: मातृ भाषा (त्या-त्या राज्याची भाषा, धर्माच्या नावावर उर्दू किंवा इंग्रजी हि प्रथम भाषा होऊ शकत नाही.), शिक्षणाचे माध्यमही प्रथम भाषा हेच असावे. द्वितीय भाषा: जी प्रथम भाषा आहे ती सोडून देशातली कोणतीही एक भाषा. तृतीय भाषा: जगातल्या प्रमुख भाषां पैकी कोणतीही एक भाषा. इंग्रजी हि जगातली एक प्रमुख भाषा आहे. जागतिक भाषा नव्हे. अभियांत्रिकी व वैद्यकीय भ्यास क्रम सहित उच्चं शिक्षण मातृभाषेतून उपलब्ध असावे. तसेच ते हिंदी आणि संस्कृत मध्ये उपलब्ध असावे. ज्याला इंग्रजीत उच्चं शिक्षण घयायचे आहे तो इंग्लड अमेरिकेत जाऊन शिकेल. या प्रमाणे सरकारने इच्छा शक्ती दाखवावी. जावडेकर साहेब लक्ष घालतील तर बरे होईल.
----------------------------------------------------
Prasad Joshi  

इन्ग्रजी भाषा जगात सर्वात भारी आहे. सर्व विद्याशाखांचे शब्दकोश फक्त इंग्रजीतूनच उपलब्ध आहेत.मराठी पूर्णपणे कुचकामी आहे. आठवीपर्यंत शिकवा नंतर बंद करा.
----------------------------------------------------
Dilip Bokil  

शिक्षण मातृभाषेत असावे. इंग्रजी भाषा चांगली यावी. मात्र त्यासाठी सर्व विषय इंग्रजीतून शिकण्याची गरज नाही. दुसरे असे कि इंग्रजी माध्यमाच्या शाळा मुलांना गृहपाठ देऊन देऊन त्यांना इतर काही करण्यास वेळच मिळून देत नाहीत. शिक्षण तसे तेथे दर्जेदार मिळते असे खात्रीलायक रित्या म्हणता येत नाही. उलट त्यांचे विद्यार्थ्यांशी व पालकांशी असलेले वर्तन गुलाम व मालक सारखे असते. त्यांचे म्हणणे मान्य नसेल तर मुलाला शाळेतून काढा असे त्यांचे पालुपद असते. जणूकाही विद्यार्थ्यांची गरज नाही. अशा तर्हेचा ताठा / माजुर्डेपणा असतो.
----------------------------------------------------
Meera  

दिलीप बोकील यांनी खरे लिहिले, शिक्षण मराठीत असावे आणि इंग्रजी पहिली पासून सुरु करावी. मी जपानी मुलीना इंग्रजी शिकवते पण त्या सर्व स्वतः च्या भाषेत पारंगत आहेत आणि अनुवाद वैगेरे बरे पडते जर मातृभाषा चांगली असली तरच. आणि पालक जर गृहपाठ समजून घेत असले तर शिक्षण सुरळीत राहते. मीरा
----------------------------------------------------
Ankit  

मराठीचा अभिमान असावा ठीक आहे ? पण जे लोक अभिमान असावा व मराठी साठी आंदोलन करत आहे त्याचीच पोर कॉन्व्हेंट मध्ये इंग्लिश मध्ये शिकत आहेत ? आज मी या वेबसाइट वर प्रतिक्रिया देत आहे ती सुद्धा durpal सारख्या CMS वर उभी आहे , वेबसाईट बनवायला सुद्धा इंग्लिश आलं पाहिजे , येथी किती तरी गोष्टी या अजूनही इंग्लिश मधेच आहे जस कि post आणि star , कस आहे ना आजोबा , प्रवचन देणं खूप सोपं असत पण जेथे पोट्या पाण्याचा प्रश्न असतो तेथे survival is the fittest नियमावर काम करावं लागत ,इंग्लिश न येणार्यला साधी पिऊन ची सुद्धा नौकरी मिळत नाही at least लिहिता व थोडी फार वाचता आली पाहिजे , आणि आपल्या हुशार साहित्य संमेलकानी केलाच काय मराठी साठी ??? टोरांटो मध्ये मराठी साहित्य संमेलन घेतली ! मराठी जातीय साहित्य संमेलन दुबईत घेतली घेतली ...........आणि सरकार कडून १०००० करोड खिश्यात घातले , विदेशात कोणता मराठी प्रेमी आहे त्यासाठी तुम्ही असली साहित्य संमेलने घेतली खरा वाचक वर्ग खेड्यात आहे ! तेथे का नाही घेत ! आणि शेवटी किती science ची technology ची वा medical ची पुस्तके मराठीत आणलीत ??? मोजके लेखात असती त्यातले त्यात माझ्यातरी फक्त ३ वा ४ रच माहिती आहे (मोहन आपटे ,जयंत नारळीकर अत्युक्ट गोडबोले बस !!!) याच्या पैकी किती जणांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनवलं आजपर्यंत ???
----------------------------------------------------
प्रदीप शेटे  

सरकारला शिक्षणासाठी खर्च करायचा नाही. सरकार मधील काही हुशार लोकांना हे (नॉन productive field) आहे असे वाटते. 
अखेर मेकॅले जिंकला. त्याचे काळे इंग्रज तयार करण्याचे स्वप्न, आपल्या यंत्रणेमुळे सत्यात आले.
----------------------------------------------------
Vinit Patil  

राज्य असरकारने आधी स्वतःच्या ताब्यातील जिल्हा परिषदच्या शाळांची परिस्थिती सुधारावी . राखीव जागांमधून जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये दि एड पस होऊन नोकरीला लागलेला युवक सरकारी वेतन आयोगाप्रमाणे पूर्ण पगार घेतो , त्याच शाळेत ओपन मधून नॊकरी ला लागलेला तरुण महिना फक्त ७००० रुपये प्रमाणे कंत्राट पद्धतीवर नियुक्त होतो त्यासाठी मुलाखतीचा कौल काढण्यासाठी पुढर्यांना पैसे चार्व लागतात नंतर कितीतरी वर्षे अशीच कंत्रटवार घासल्यावर नॊकरीत कायम करतात , त्याची पत्नी पण शिक्षिका सोसेल तो तिची नेमणूक कोकणात आणि तो मराठवाडा अथवा खान्देशात अशी नेमणूक देतात परत त्यांना शाळेत बदलीसाठी पॅसीए खाऊ घालावी लागतात . अशी जर परिस्थिती असेल तर कसा काय महार शिखासनात पुढे जाईल . खासगी विनाअनुदानित मराठी शाळेमधील शिक्षणाचे हाल तर कुत्राही खात नाही . रजिस्टरवर जबरदस्तीने सही घेऊन एक पगार दाखवतात आणि हातात फक्त ५ ते १० पगार टेकवतात . 

असेच जर कायम सुरु राहिले तर कसा आपल्या राज्याची प्रगती होईल ?
----------------------------------------------------
subhash  

प्रार्थमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच हवे. मातृभाषा चांगली आल्याशिवाय इंगरजी भाषा चांगली आत्मसात करता येणार नाही.
----------------------------------------------------
sunil  

इंग्रजी हि फक्त एक भाषा म्हणून शिका आणि त्यात प्राविण्यही मिळवा. पण शिक्षण हे मातृभाषेतच असायला हवे. आणि त्यात शासनाने पुढाकार घ्यायला हवा. पण आमचे राज्यकर्ते आणि मराठीचा टेम्भा मिरवणारे युगपुरुष आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकण्यात धन्यता मानतात. वडापावची गाडी लावायला सांगतात आणि स्वतः बर्गर पिझ्झा खातात.
----------------------------------------------------
raju narkar  

पूर्वीच्या काळी कुठे होती असली इंग्लिश मिडीयमची फॅड. त्याकाळी शिकून अनेक विध्यार्थी परदेशी मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. आज राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी मराठीचा पुळका आणतात आणि स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. मराठीतून शिकण्याची लाज बाळगण्यापेक्षा आरक्षणाची लाज वाटली तर आपण प्रगती करू.
----------------------------------------------------
Nikhil  

खरंतर ज्ञानसाठी शाळेत जायची गरज नाही हे मागील शतकानु शतके दिसले गेले आहे. असो मुळात "शालेय शिक्षण" कश्यासाठी घ्यायचं याचा विचार आधी करू, साधार व्यवहारीक दृष्टीकोनातून पहिले तर , मोठंझाल्यावर उदरनिर्वाह पाहिजे म्हणून, हेच सत्य आहे कोणी कितीही काही म्हंटले तरी (ज्ञान आत्मसात करणे, बुध्यांक वाढविणे, आत्मविकास हे सगळं सांगणे म्हणजे दिखावा आहे, शॉट घालण्याचा मागचा खरा हेतू ९० % पालकांचा हेतू असतो कि मुलं मोठी होऊन कमावती कशी होतील ते पाहणं ). आता पाहू नोकरी किंवा व्यवहारया साठी वापरली जाणारी भाषा, सध्या चे ढोबळ जॉब मार्केट किंवा व्यापारी क्षेत्र पहिला तर ते आहे उत्पादन, माहिती आणि तंत्रज्ञान, कॉमर्स, मार्केटिंग, बुसीन्सस मानजमेंट, इम्पोर्ट/एक्स्पोर्ट , याचा अभ्यास केलात तर किती टक्के क्षेत्र फॅक्ट मराठी ज्ञानावर चालू शकेल ?
आजकाल जॉब आणि व्यापाराच्या निम्मिताने तुम्ही फक्त महाराष्ट्र नाही तर, बाकीचे राज्य, देश विदेश अनेक लोकांशी संबन्धित येतया, यामध्ये किती मराठी वापरली जाते ? बार आपण पहिले ते चौथी ग, मा भा, ना शिकायचे आणि खरा अभ्यास इंजिनीरिंग, मेडिकल, आर्टस्, कॉमर्स इंग्लिश मधून शिकायचे, आपला मराठी चा स्वाभिमान फक्त प्राथमिक शाळे पुरता ???? का ??? कारण आपल्ह्यात एवढी धमक नाही कि आपण पुढचा अभ्यास मराठीत शिकवू , उद्योग धंदे मराठीत करू, मराठी व्यवहारामध्ये जागतिक पातळीवर घेऊन जाऊ. आहे आपल्यात तेवढी जिद्द ?? शिक्षण मराठीतून द्यायचेच असेल तर ते इंजिनीरिंग , मेडिकल मराठीतून अभषक्रम उभा करून दाखवा, नाही तर मुलांना लहान पण पासूनच त्यांचा पुढील फायद्या साठी इंग्लिश मधून शिकवा.

राहिला विषय मराठी भाषा संवर्धनाचा, सर्वाना मराठी बोली भाषाच अभिमान असलाच पाहिजे, मराठी भाषा (फक्त भाषा म्हणून) शाळेत असलीच पाहिजे, मराठी साहित्य , कला अजरामर आहे आणि ती राहणारच म्हणूनच इंग्लिश मध्यम मध्ये शिकलेले विद्याथी , पुरषोतम करंडकामध्ये सुंदर मराठी कलाकृती सदारकरतात , आणि शेकडो विद्यार्थी ते उचलून धरतात, याला म्हणतात मराठी प्रेम. आजहि "आयष्यावर बोलू काही चे प्रयोग" सुपर हिट होतात , भारत अँड भारत बाहेरही.
मराठी जोपासायची म्हणजे फक्त मराठी शाळा ते पण - पहिले ते चौथी जोपासायचे हा म्हणजे संकुचित , अव्यावहारिक विचार आहे. 
इंग्लिश मध्ये घातले म्हणून मराठी संपत असती तर , एकदा अमेरिकेत महाराष्ट्र मंडळात जाऊन पहा, जी मुले कधी भारतात पण अली नाही ती व्यवस्थित मराठी बोलतात. एल्गीश शकूल मुले मराठी बोली भाषा कधी संपणार नाही, हो तयात बदल कालान्तराने नक्की होतील आणि ते पूर्वीपासून होत आले आहेत, शिवकालीन मराठी आणि आत्ताची मराठी जमीन अस्मानाचा फरक असेल. त्यात काही चुकीचे नाही. 

आता विष आहे मुलांचा आकलनाचा, जगातील सर्व निष्कर्ष असे आहेत कि मुले वयाचे ८ वर्ष पर्यंत अनेक भाषेत पारंगत होतात, त्यांचा त्या शिक्षणाचा वेग आणि क्षमता बालपणी फार मोठी असते. तुमच्या शेजारइ कोणी हिंदी भाषिक असेल तर पहा तुमची मुले थोड्याच काळात किती व्यवस्थित हिंदी बोलतात ना शिकवता, एकंदर मुलांच्या आकलन शक्तीचा आणि भाषेचं काही संबधं नाही, पालकांचा असू शकतो. मुलांना कॉम्पुटर म्हणालात तर लगेच कळेल पण संगणक म्हणालात तर गोंधळतील. 

लेखातले बाराशेचे उतारे गंमतशीर आहेत , म्हणजे इंग्रजी शिक्षक तज्ज्ञ नसतात आणि मराठी शिक्षक असतात ??? हा कुठला शोध लावला ?? बहुतेक लेखकाने हा लेख त्यांच्या नजरे समोरील एक इंग्रजी आणि एक मराठी शिक्षक याना पाहून लिहला आहे. 

असो प्रत्येकाचे आपले विचार, पण थोडा चोफेर एक्सपेरिन्स घेणं गाजेचा आहे, मातृभाषेचा अभिनय सर्वाना असायलाच हवा, ती भाषा जपायलाच पाहिजे पण त्याची व्यवहाराशी सांगड घालून. शेवटी भाषा हि तुम्हा आम्हांसी (मनुष्य जातीशी) सवांद साधण्या पुरतीच असते, तुमच्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचल्या कि झाला, त्या कशा हि पोचावा. त्या जपण्याचा अट्टाहासया पोटी माणुसकीची राख रांगोळी करू नका.
----------------------------------------------------
Shiva  

खूप छान लेख आहे. मला खूप उपयोगी पडला आणि माझ्या मनात असलेल्या बर्याचश्या प्रश्नांचे उत्तर देखील मिळाले 

धन्यवाद साहेब
----------------------------------------------------
Sandip Kulkarni  

What school writers kids are in ? 
People who oppose english medium, their kids are always in engLish mesium.
----------------------------------------------------
Agatik  

उत्तम लेख. वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे कि लहानपणापासून मातृभाषेत शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात कुठल्याही भाषेत आपले विचार प्रकट करू शकतात.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मातृभाषेतच असावे. उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण इंग्रजी माध्यमातून असावे. ज्यांच्या लहानपणी त्रिभाषा सूत्र वापरले गेले ते मराठी हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषेत विचार करू शकतात आणि बोलूही शकतात (अर्थात त्यासाठी शिक्षकही तज्ज्ञ असले पाहिजेत). एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी फक्त त्या भाषेत विचार करण्याचा सराव करावा लागतो.
----------------------------------------------------
Ankit  

"उत्तम लेख. वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे कि लहानपणापासून मातृभाषेत शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात कुठल्याही भाषेत आपले विचार प्रकट करू शकतात." pseudo - science बरोबर ? कोणी प्रूफ केलं ? कधी प्रूफ केलं ???
----------------------------------------------------
Girish Lad  

उत्तम लेख पण एकांगी विचारातून लिहिला आहे. शेवटी भाषेचा अभिमान, संस्कृती इ. सर्व लेख लिहायला बरे विषय आहेत पण त्यापेक्ष्या सारासार परिस्थितीच विचारात घ्यावी लागते. जागतिकरणाच्या वादळात आपले मूल मागे राहावे असे कोणत्या पालकाला वाटेल? आज आपण आयटीमध्ये इतर देशांच्या तुलनेत पुढे आहोत याचे बव्हंशी श्रेय इंग्लिश शिक्षणाला जाते हे कसे विसरता? माझ्यामते इंग्लिश साहित्य सोडून (जे अर्थातच इंग्लिशमध्ये असणार) गणित आणि शास्त्र विषय इंग्रजीतून आणि बाकी सारे मातृभाषेतून शिकवावे. पुढे जाऊन जागतिक व्यापारात शेवटी इंग्लिशच बोलावे लागते.
----------------------------------------------------
SS  

स्थानिक भाषा महत्वाचीच आहे. कल्पनाकरा धनेश्वरी इंग्लिश मध्ये लिहली गेली असती का ? पण न्यटन चा नियम संस्कृत मध्ये शिकणे योग्य रहाणार नाही, रामायण महाभारत भारतीय भाषेत शिकणे योग्य, भाषेची नाळ संस्कृतीशी जोडलेली असते, भारतात युद्ध हात असताना परदेशी शोध होत होते, अजूनही भारतात (हिंदूस्थानात) लोकांना भाषिक, भावनिक, प्रांतिक वादात अडकवून प्रगती पासून दूर ठेवले जाते. गरिबी असल्याने अध्ययन,, शिक्षण यापासून आपण दूर आहेत. चांगल्या योजना गुरजूपर्यंत पोचत नाहीत. मराठीत, स्थानिक भाषेतच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण असावे, उच्च शिक्षण इंग्लिश मध्ये असल्यास चालेल.
----------------------------------------------------
sunil  

उच्चं शिक्षण ( खास करून विज्ञान आणि तंत्रज्ञान ) स्थानिक भाषेत असेल तर खेटर कुठे अडतंय? भारतात किती नवीन शोध केले जातात? आजही एक मोठा वर्ग हा इंग्रजीमुळे उच्चं शिक्षण घेत नाही.
----------------------------------------------------
स्वाती पेंडसे  

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच असावे . आमची पिढी इ.आठवीपासून इंग्रजी हा एक विषय शिकली.बाकी माध्यम मराठीच होते .लहान वयात भाषा आपलीच असली की कमी वेळात उत्तम आकलन होते. त्याशिवाय वाचनाची गोडी लागते वगैरे आपण लिहिलेल्या सर्वांशी मी सहमत आहे .इंग्रजी एक विषय म्हणून पाचची पासून शिकून ही उत्तम येतो .
---------------------------------------------------- Gaytri

आपली मातृभाषा व राज्यभाषा ही मराठी आहे म्हणून मराठीच योग्य राहील असे वाटते. 

धन्यवाद

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...