[7/24, 6:54 PM] +91 86002 45843: पालक नव्हे मित्र बना
विषय फारच सुंदर आहे तस तर माझे अजून पाल्य नाही त्यामुळे अनुभव गाठीशी कमी आहे पण स्वानुभव जो आला त्यावरून आणि आजकाल च्या जगात आजची तरुण पिढी हि जरा जास्तच फास्टफोर्वोर्ड आहे ,( वेस्टर्न कल्चर ट्रेन) पाश्चिमात्य संस्कृतीचा आकर्षण जरा जास्त आहे त्यातच लहान कुटुंब त्यामुळे मुले मोठी होतात पाळना घरात पालक 12 तास कामावर असतात त्यामुळे पाल्य आणि पालक असा संवाद फार कमी झालाय त्यातच मोबाइल, लॅपटॉप , इंटरनेट सोबतीला आहेच , नको ते संगतीचाही परिणाम पाल्याचा वर्तणुकीवर होत असतो आणि पीढितील विचारातील अंतर याचाही परिणाम दिसून येतो ,मित्र बनने हि काळाची गरज आहे इथे एक स्वानुभव सांगत आहे , मझही कुटुंब तस लहान आम्ही 5 जण होतो आता 4 आहोत अचानक सासरे गेले आणि माझ्यावर बरीच जिमेदारी अली नकळतच मी घातली पालक झाले मला एक लहान नणंद आहे ठेवा ती 10 वी ला होती महत्वाचं वर्ष टायतच अशी घटना घरात घडली नकळत मी तिची पालक झाले होते त्यावेळी जाणवले की फक्त पालक होणं सोपं आहे आदेश करणे सोपं आहे पण मित्र बाणाने अवघड त्यातच तिचे वय हि असे होते तिला एका मैत्रिणीची गरज होती आणि मी ती होण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मला तिचयानेक अडचणी लक्षात आल्या आणि मी त्यावर उपाय हि केला त्याचक्षणी मी ठरवले की मी पालक नव्हे मित्र च बनेल
श्रुती खडकीकर नवी मुंबई 61
[7/24, 6:57 PM] 10 Meena Sanap: 🍁आंतरराष्ट्रीय पालक दिना निमित्त
साहित्य दर्पण आयोजित वैचारिक लेख स्पर्धा 🍁
***********************
पालक नव्हे मित्र बना !!
*********-*********
आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांच्या सार्वांगिण विकासाकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ नाही. दोघेही कमावणारी त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेऊन जाणारे आई वडील संध्याकाळी थकुन भागुन घरी येतात. आणि मग मुलांच्या विकासाकडे कधी लक्षदेणार
मुलांचे संगोपन महत्वाचे नसुन संवर्धन महत्वाचे आहे.
संगोपन म्हणजे सांभाळणे आणि संवर्धन त्याच्या विकासात येणार्या अडचणीचा विचार करुन त्यावर उपाय योजने. झाड लावल्यानंतर आपण त्याचे संवर्धन करतो म्हणजेच त्यावर पडणारे रोग,कोणते औषध फवारायचे याचा विचार करतो म्हणजेच त्याची वाढ योग्य दिशेने होते कि नाही ते पाहतो.
मुल एकदा शाळेत सोडले कि त्याला घडवणे शाळेच्या हाती असा बहुतेक पालकांचा दृष्टीकोन असतो. परंतु त्यांना ठाऊक असायला हवं की प्रेम आणि संरक्षण ही बालकांची मुलभूत गरज आहे.ही गरज आई-वडीलाशिवाय दुसरे कोणी भागवू शकत नाही.
म्हणजेच मुलांच्या जडणघडणीत आई-वडीलांचा फार मोठा वाटा असतो.मुलांवर संस्कार करण्याची हळुवार भुमिका पालकांना पार पाडावी लागते.
त्यात थोडी जरी कुचराई झाली तरी मुलांचे आयुष्य वाया जाते.संस्कार हे घरात च होत असतात म्हणुण पालकांनी मुलांचे मित्र बनुन अधिक सजग बनायला हवे
त्यातुनच मुलांचे व्यक्तीमत्व साकारणार असते.मित्र हे आरशाप्रमाणे असतत .आरसा खरे रुप दाखवतो त्याप्रमाणे पालकांना आपली भुमिका बजवायची आहे.
मित्र ज्याप्रमाणे आपल्या सुखदुःखात समरस होतात त्याप्रमाणे पालकांनी आपल्या पाल्यांचा मित्र बनुन त्यांच्या
अडचणी समजुन घेऊन लक्ष
देणे गरजेचे आहे.
शरीराच्या सुदृढते इतकी मनाची सुदृढता महत्वाची आसते .मुलांचे मन निरोगी रहावे म्हणुण पालकांनी प्रयत्न करायला हवेत.मुलांच्या वर्तनाच्या संदर्भात पालकांना
अनेक समस्या जाणवतात.त्यासाठी मुलांच्या वर्तणुकी कडे पालकानी डोळसपणे, समंजसपणे बघण्याची गरज आहे.
लहानपणी अती लाडाने मुले आगदी आक्रस्ताळेपणाने वागु लागतात.आज , आत्ता, ताबडतोब इच्छा पुर्ती व्हावी असे त्यांना वाटते.सारे घर प्रत्येक जण आपल्या सेवेसाठी आहे.असे त्यांना सवयीने वाटते.कधी कधी अती लाडाने वाढाविलेल्या मुलाला लहान भावंडाच्या आगमनाने काहिंसे दुर्लक्षहोते
त्यामूळे मुले एकलकोंडी होतात.तर काही वेळेला वाईट सवयी असलेल्या इतर मुलांच्या प्रभावाखाली आपली मुले आक्रमक वागतात.अशा वेळी पालकांनी मुलांना मारहाण न करता मुलांना वेगळे पर्याय संधी देऊन समाधान दिले पाहिजे.
मुळातच मुलानी जसे वागु नये
असे आपल्याला वाटते तसे
आई वडीलानीही तसे वागु नये मुलीने स्वतःचे कपडे व्यवस्थित ठेवावे आसे वाटत असेल तर आईने आपला पोशाख चांगला ठेवला पाहिजे.मुलानी खुप वेळ टि.व्ही.बघत बसु नये असे वाटत असेल पालकांनी स्वतःवर निर्बंध घालुन घेतले पाहिजेत घरात प्रेम मिळाले नाही तर मुलांचा भावनिक विकास नीट होत नाही. मुलांचे वाईट वागणे थांबविण्यासाठी तौयाला गोड बोलुन समजावणे केव्हांही चांगले त्याच्या आवगुणाकडे आपण लक्षवेधुन आपण त्याना दुषणे देणे योग्य नाही..अती लाड , अती शिस्त, अती अपेक्षा या सारख्या प्रकारामुळे मुलांच्या मनावर ताण पडतो.मुलांशी बरोबरीच्या नात्याने वागावे .
त्यांच्या भावना , अपेक्षा त्याना काय करावेसे वाटते हे समजुन घ्यावे.मुलांमध्ये सुप्त गुण असतात ते आई वडीलांना शोधुन काढायचे असतात.परत्येक मुल म्हणजे निसर्गाने निर्माण केलेला अलौकिक चमत्कार आहे.
फुल कसे , कधी फुलावे व केवढे फुलावे हे आपण ठरवु शकत नाही.तसे मुलाला पोषण देणे, फुलण्यासाठी शक्ती देणे हे काम पालकांचे आहे.लहानपणापासुनच मुलामध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची क्षमता निर्माण केल्यास मुलाच्यांत धाडस व चिकाटी रुजेल पण केव्हा पालख जेव्हा मुलांचे मित्र बनतील.
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
[7/24, 7:30 PM] +91 90117 42342: 📚साहित्य दर्पण 📚
🏵द्वारा आयोजीत🏵
🌸स्पर्धेसाठी🌸
🌺विषय:- मी एक पालक🌺
मी एक पालक या नात्याने आज माझ्या लेखात फक्त आणि फक्त स्वत:चाअनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे.
"आधी केले मग सांगितले " या उक्ती प्रमाणे माझा मुलगा अवघ्या 6 वर्षाचा आहे.तरी तो कोणतेही पुस्तक वाचतो हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो.I am proud of my son.
असेच एकदा पहिलीच्या पुस्तकातील पहिलीच कविता 'आला पाऊस आला' वाचत असताना शेवटच्या ओळीतील 'आईच्या कुशीत' या शब्दा खालील त्याने रेषा ओढली.मी आश्चर्याने त्याला विचारले , काय रे बाळ,हे अस का केल? त्याच उत्तर ऐकून माझं हृदय हेलाउन गेल.तो म्हणाला,आईच्या कुशीत ती मूल दडुन बसलीत मग तू माझी आई आहेसना ? पटकन मी त्याला खरच माझ्या कुशीत घेतलं,आणि खुप पापे घेतले.
आणखी एकदा प्रतिज्ञावाचत असताना त्याने 'भारत' या शब्दा खाली रेघ मारली.त्याही वेळी विचारल्यावर तो म्हणाला ,भारत आपलाच देश आहे ना! म्हणून रेघ मारली.त्या ही वेळी माझा उर अभिमानाने भरून आला.हे का झाल? कशामुळे घडल ?या विषयावर चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आलं की,मी स्वत:एखादे पुस्तक वाचताना महत्वाच्या शब्दा खाली ओळी खाली रेषा ओढते हे त्याने पहिले होते .वाचलेल्या पुस्तकांचा सारांश मी लिहून ठेवते या वरुन मला एवढेच सांगावेसे वाटते,मुलांना उपदेश करण्यापेक्षा जर ती गोष्ट आपण स्वत: केली तर ती ,मूले ही न सांगता करतात.
प्रा.ग.प.प्रधान म्हणतात,मूल ही फूल असतात,त्यांना त्यांच्या आंतरीक उर्मिन फुलू द्यायच आसत.
परवाच घडलेला एक प्रसंग आहे.मी मुक्त कविता स्पर्धेसाठी कविता करत असताना माझा मुलगा जवळ आला आणि म्हणाला , आई,मी पण कविता करतो.मी सहज म्हटल कर आणि खरच त्याने पुढील ओळी कागदावर लिहिल्या
'घोड़ा आणि माकड फिरायला गेले ,
नंतर घरी आले ,
नंतर झोपले ,
नंतर सकाळी उठले'
कल्पना करा हे पाहून किती हर्षाने फुलून गेली असेल मी! एवढ सांगण्याचा उहापोह मी का करते कारण मूल ही अनुकरण प्रिय असतात.ती घरातील व्यक्ती,मित्र,शिक्षक यांचे अनुकरण करत असतात .म्हणून मला वाटते की मुलांवर संस्कार करणे हे पालक व शिक्षक दोघांवर अवलंबून आहे.
मुलांना शिवाजी महाराज, जिजाऊ , आंबेडकर,ज्योतिबा फूले ,सावित्रीबाई ,संत कबीर,संत तुकाराम,संत नामदेव ,भगतसिंग, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या गोष्टी मुलांना सांगून त्यांच्यावर चांगले संस्कार कसे करता येतील या साठी पालकांनी सतत प्रयत्नशील राहायला हवे .या प्रसंगी। " शिक्षका चल उठ आता" या वसंत हंकारे च्या पुस्तकातील पुढील ओळी आठवतात,
' म्हणून सांगतो पालका,
तू फक्त एवढंच कर,
या शूर विरांच्या विचाराच दान तु त्याला कर.'
मी अतिश्योक्ति नाही सांगत माझ्या मुलाने आत्ता पर्यंत आवंतर गोष्टींची विस पुस्तके वाचली आहेत हे सांगताना माझ हृदय अभिमानाने फुलून येतय.हे घरातील वातावरणा मुळे शक्य झाले मी आणि माझे पती सतत काही तरी वाचन करत असतात. घरात वर्तमानपत्र,स्वत:च ग्रंथालय आहे.तो आमचेच अनुकरण करतो .त्याने कमीत कमी 50चित्रे रंगवली आहेत.म्हणून म्हणते मुलांना शिकवायच नसत शिकू द्यायच असत .आपण फक्त त्यांना पोषक वातावरण निर्माण करायच असत! आम्ही त्याला पूर्ण स्वातंत्र्य देतो .
रेणूताई गावसकर म्हणतात,' मुलांनाही एक स्वत:च,स्वतंत्र अस अस्तित्व असत.'
माझ्या मुलावर जे संस्कार झाले ते माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते मी पुर्ण करणारच!शाळेतील प्रत्येक मुलाचे आदर्श पालक आणि शिक्षक व्हायचच आहे .
सर्व पालक वर्गाला एक विनंती करु इच्छिते ,ज्या गोष्टींची तुम्ही मुलांन कडून अपेक्षा करता त्याच गोष्टी अगोदर तुम्ही स्वत: कराव्यात मग बघा! कसा ' स्वप्नालाही सत्याचा स्पर्श होतो ते!'
शेवटी मी एक पालक म्हणून समस्त गुरुजी वर्गाकडून एक माफक अपेक्षा करते,
' हसत खेळत शिकवा गुरुजी,
सांगू तुम्हाला किती,
डॉक्टर इंजिनिअर नंतर बनवा ,
माणूस बनुद्या आधी. '
🌺धन्यवाद🌺
मिनाक्षी तुकाराम माळकर
चौसाळा ता.जि.बीड
[7/24, 7:39 PM] Kunda pitre: 🍇साहित्यमंथन 🍇
स्पर्धेसाठी- पालक नव्हे मित्र बना
=====================
किती लवचिकता आहे शब्दात ! पालक म्हटली की, गंभीर स्वरूपाचे,दटावणारे आई बाबा दिसू लागतात.पण मित्र म्हटलं की, प्रेमळपणाचे वारूळ भेटते! खरचं आजकाल असं वातावरण घरा घरातून आहे कां ?
नोकरी,तंत्रज्ञान,शाळेची सतत बदलणारी गृहितकं ! हे पहाता मला वाटतं या आजच्या धावपळीच्या ,रस्सीखेचीच्या,स्पर्धेच्या,आत्मसम्मान वागविण्याच्या,पैशाच्या,इन्सटंट ,झटपट पाहिजेच्या,उधळ विचाराच्या,भडक जीवन शैली असलेल्यांच्या,महागाईच्या विळख्यात सांपडलेल्यांच्या,दुष्काळ पिडितांच्या,भूकबळी बनलेल्याच्या या जमान्यात सम + विषम परिमाणच पहायला मिळतं याला कारण पैसा आहे.तो मिळविण्यासाठी घरातील सारीच माणसं वेठीला धरली गेली आहेत.
जीव जन्माला येतो त्यावेळी त्याला अनेक नाती चिकटून येतात.आई बाबा आजी आजोबा काका काकू आत्या मामा त्या नात्यात तो जीव वाढू लगतो.पूर्वी एकत्र कुटुःब पध्दतिमुळे सगळ्या नात्यांचे भाव विभास ते मुल आत्मसात करीत असे. मग त्यात प्रेम,तडजोड,हेवा दावा न करणे,स्पर्धा न करणे. सांमजस्य ,समाधानी वृत्ति,देवाचे संस्कार हे सारं या नात्यातून मुलाला शिकायला मिळत असे.त्यामुळे घरात संस्कारांच रोपटं आपोआप फुलायचं ! ही मुस मुलाची आयुष्यभराची शिदोरी असयची! तेव्हा मनोरंजनाची साधने मर्यादित होती.मैदानी खेळ,अभ्यास,वाचन,मित्र मैत्रिणी म्हणजे मधाचे पोवळे असायचे!
विभक्त कुटुंबे निर्माण झाली ,बाबांच्या बरोबरीने आई नोकरीसाठी बाहेर पडू लागली. आजी आजोबा वृध्दाश्रमात भरती होऊ लागले.मनोरंजनाची साधने अचाट अफाट वाढू लागली.शाळा काॅलेजात सुध्दा पैशाशिवाय पान हलत नाही.हीही कारणे आई नोकरीसाठी बाहेर पडायला आहेतच आणखी खुप लिहता येईल .!----
आता आईच आपल्या मुलावर संस्कार करते .तीच मुलाच्या जास्त जवळ असते.बाबा नोकरी वा व्यवसाय करीत असतात.तेव्हा त्यांचीसुध्दा आपले मुल काय करते इकडे लक्ष दिले पाहिजे.तो काय करतो कुठे जातो,त्याचे मित्र कोण?त्याचा कोणत्या विषयाकडे कल आहे ?त्याची इच्छा आहे ती पैशाने पुरी करू शकू कां?ही जाणीव मुलाला विश्वासात घेऊन समजाऊन सांगितली पाहिजे !आई दिवसभर नोकरी करते --पण एकदा आई झाल्यावर आपल्या गरजा व छानछोकी बाजुला ठेऊन पूर्ण लक्ष आपल्या मुलावर केंद्रित केले पाहिजे.तो म्हणेल तेव्हा पैसे न देता त्याचा विनियोग मुलगा कसा करतो हे त्याला हाॅरॅस न करता पहाणे,वाचन ,शिक्षण, खेळ ,आजुबाजुच जग कसे ते समजावणे या सगळ्याला आईने वेळ द्यावा. शनिवार रविवार असतोच !नुसते मुलाला पैसे देऊन भागत नाही. निदान आईने तरी समजू नये.त्याच्यासर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे.
त्या विचाराना जीवघेण्या स्पर्धेपासुन वाचवले पाहिजे.तुझं माझं चे कुंपण मोडून काढले पाहिजे.अशा निकृष्ट विचाराना खतपाणी घालू नये.आहे त्यात समाधानी वृत्ति जोपासायला शिकविली पाहिजे.आठवड्याला त्याचे शिक्षक,मित्रमैत्रिणीना भेटून तो काय करतो कसं चाललं हे पाहिले पाहिजे.आईने आपलं तेच खरं वा आपल्याच कळते हा बाणा सोडून आपल्या मुलात रममाण व्हावं त्याचा सर्वागीण विकास पहावा.लहानपणी केलेले संस्कार वा दिलेले वळण कधीच कठेहि पुसले जात नाही.कारण विचार पक्के झालेले असतात.
आज डिव्होर्स,बलात्कार,खून,यांचं थैमान चालले आहे.इथं प्रेमभावनाच आटलेय !तडजोड
मिटून गेलेय! समतोल साधणं हे आजच्या पिढीच्या रक्तातच नाही.याचा पाया कुठे असतो घरकुलात असतो.आईमध्ये असतो. मुल कुणाकडे वाढतेय काका मामा आत्या यावरही अवलंबून असते.! रक्तच पातळ होत चाललयं तर सख्यत्व व मित्रत्व कसं जुळणार !
मुलाला जन्म दिला --कपडालत्ता ,स्मार्ट फोन ,खर्चाला पाॅकेट मनी दिला की कर्तव्य संपत नाही.
मुल हे भातीचा गोळा असते त्याला आकार द्यावा तसे ते घडते.
लहानपणापासूनच पालक जागरूक राहून त्याला आंजारून गोंजारून प्रेमाच,शिस्तिच,खरेपणाचं,निर्लोभाचं,सामजस्यचं,भूतदयैचं, तडजोडीचं,संघर्षाला तोंड देण्याचं,शिक्षणाचं बाळकडू हळूहळू मुलाच्या रक्तात भिनवलं तर ते मुल समाजात -पी जे अब्दुल कलामा सारखं मोठं कां नाही बनणार ? (इतकं मोठेपण नाही मिळालं तरी देशाला भुषणावह काम तरी करेल)
हे काम आई वा ज्यांच्यावर त्या मुलाची जबाबदारी असते ती मोठ्या माणसांनीच पार पाडली पाहिजे ! पालक या जड शब्दाच्या धाकापेक्षा मित्रत्वाच्या नात्याने जर मुलाशी संवाद साधलात तर ते मुलाच्या आयुष्यात मोलाचे ठरेल.!
अजून बरेच विचार थैमान घालत आहेत .
खुप प्रकल्प मनात असतात त्यासाठी --
पैसा+मॅनपाॅवर+जागा+वेळ हेही पाहावे लागेल ! या वयात ते आता शक्य नाही!
परंतु जेव्हढी विचारधारा होती तेव्हढी लिहली .वेळेही बंधन आहेच ! इथेच थांबते !✍
जय हिंद ञय महाराष्ट्र !🙏
==================
प्रेषक --कुंदा पित्रे (46)🍒
शिवाजी पार्क
दादर , मुंबई 28
9324746706 🍒
📝📝📝📝📝📝📝📝
[7/24, 7:52 PM] +91 99234 45306: 🌹स्पर्धेसाठी🌹
पालक दिनानिमित्त--
पालक म्हणुन,मुल समजुन घेताना
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
सध्या पालकांचे दोन वर्ग दिसुन येतात.शिक्षा करुन मुलांवर योग्य संस्कार घडविता येतात असे मानणारे व संयमाने त्यांच्या भावना जाणुनघेणारे पालक.प्रत्येकच लहान मोठ्या चुकांना शिक्षा करणे योग्य नव्हे.काही पालक तर एवढी कठोर शिक्षा करतात की,अंगावर आगदी काटाच उभा राहतो.सध्या RTE act 2009 मधील कलम १७ नुसार बालकांना शारीरिक शिक्षाव मानसिक त्रास यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मी सध्या ज्या शाळेत आहे तेथे घडलेला किस्सा मी सांगते.ऋतुजा ही इ.२रीतील विद्यार्थिनी,अगदी हुशार व चुणचुणीत.स्वच्छता व टापटीप,वक्तशीरपणा,आज्ञाधारकपणा इ.गुणसंपन्न मुलगी.परंतु एके दिवशी परिपाठ चालु असतानाच तिची आई तिला घेऊन आली व ओक्साबोक्सी रडु लागली.काय करावे कळेचना!एवढ्यात त्यांनीच स्वत:ला सावरत सांगण्यास सुरुवात केली.माझ्यासह सर्व विद्यार्थ्यांनाही अश्रु आवरता आले नाहीत.ऋुतुजाच्या पाठीवर काळेनिळे वळ उमटले होते.याचे कारण म्हणजे तिने घरातील १०००रु ची नोट १०रु समजुन खाऊ खाण्यास आणली पण खेड्यात सकाळी १०वा दुकाने बंद व रात्री पुन्हा चालु .तो पर्यंत तिने ती नोट मैत्रिणीच्या आईकडे ठेवण्यास दिली.त्यांनी लगेच ओळखले की हिने न सांगताच घरातील पैसे आणलेत.संध्याकाळी तिची आई वआजीला ती नोट देउन त्या घरी गेल्या .झाला प्रकार ऋुतुजाच्या वडिलांस समजला.त्यांनी तिला बेल्टने एवढे मारले की काळेनिळे वळच ऊमटले.किती ही अघोरी शिक्षा.खुप गंभीर बाब ही.तिच्या आईशी बोलताना समजले की,आम्ही तिला कोणतीही गोष्ट मागण्यापुर्वीच हजर करतो.तिला कशाचीच कमतरता नाही.तरीही तिने घरातच चोरी करावी ही खुप काळजी करण्याची बाब आहे असं त्या म्हणाल्या.मी श्रुतुजाला जवळ घेऊन समजावले.तर तिने सांगीतले की ,मला ही कधीकधी मैत्रिणींबरोबर खाऊ खावा वाटतो.घरी पैसे मागितले तर देत नाहीत म्हणुन मी चोरी केली.तिनेअगदी प्रमाणिकपणे कबुल केले.पुढे सलग काही दिवस परिपाठातच चोरी करणे किती चुक आहेहे कथेद्वारे समजुन सांगीतले.तेंव्हापासुन ऋुतुजाच काय पण शाळेतील एकाही विद्यार्थ्याची चोरीविषयक घरी अथवा शाळेत तक्रार नाही.याचे मला खुपखुप समाधान आहे.सध्या ऋतुजा इ.४थीत आहे.मला एवढेच सांगावेसे वाटते की,खुप अघोरी शिक्षा करुन मुलांवर संस्कार होतात हा चुकीचा समज आहे.संस्कार हे करायचे नसतात तर ते रुजवायचे असतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
.......✍🏻संगीता भांडवले✍🏻
वाशी, उस्मानाबाद
(१६)
[7/24, 8:09 PM] 15 Kavi Aniket: साहित्य दरबार स्पर्धेसाठी लेख
बाप मिञ सखा जीवनाचा आधारवड
जन्मदाञी माय महान
गातो आवडीने तिचे गुणगाण ।
'बापही' तितकाच महत्त्वाचा
रक्त आटवून रंगवितो जो
आयुष्याचं प्रत्येक पान ।।
माझ्याच एका कवितेतील वरील ओळी आज बापाविषयी लिहीत असतांना एकदम काळजातून दाटून आल्या. आणि बापाविषयी लिहावच लागेल असं डोळ्यांमधून वाट मोकळी करत सांगू लागल्या.
लिहायचं म्हटलं तर 'बाप' हा विषयच मूळात एका लेखात वा काही पानांमध्ये सामावणारा नाही.... नक्कीच नाही!!
बाप हा अनेक रुपांमध्ये आपल्या मुलांना भेटत असतो, त्यांच्याशी हितगुज करित असतो.
कधी गुरु बनून ,कधी मार्गदर्शक म्हणून, कधी पालक वडील बनून, एवढेच काय कधी आई बनून ,तर कधी मिञ बनून, किती किती सांगावीत अशी नानाविध रुपं बाप लिलया पेलत असतो काळजाच्या प्रत्येक कप्यातून !
आपुल्या चिल्यापिल्यांच्या स्वप्नांना वास्तवाचे कोंदण देण्यासाठी सतत अविरत अखंड बाप जळत असतो समईतल्या वातीसिरखा !
तो दिवस मला अजुनही आठवितो-
नुकताच दहाविचा निकाल लागून काही दिवस झाले होते आणि पुढील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती. मला लहानपणापासूनच doctor बद्दल आकर्षण होतं आणि मनोमन मी माझं ध्येय निश्चित केलं होतं की आपण मोठे झाल्यावर doctor बनायचे. आणि त्या दिवशी नकळत माझ्या वडीलांनी मला प्रश्न विचारला कि तुला कशाला प्रवेश घ्यायचा आहे arts commerce कि science आणि मी बिनधास्त सांगितले science!!
मला doctor बनायचे आहे त्यावर वडीलांनी प्रतिक्रियां देणे टाळत चेहऱ्यावर एक उसने स्मित करीत मला ठीक आहे असे सांगितले. काळजात अनेक प्रश्न लपवून .........
माझी स्वारी जाम खुषीत होती कारण मला दहावीला छान गुण मिळाले होते शिवाय मी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेलो होतो .त्यामूळे आपल्याला निश्चितच अकोल्यामधील नामांकीत महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल याची मला खाञी होती.
पण तेंव्हाच वडीलांच्या मनात काहीतरी सुरु असल्याची पुसटशी जाणीव मला व्हायला लागली. त्यातच माझी 11 वी science ची admission पण झाली पण college सुरु ह्वायच्या काही दिवस आधीच एका राञी वडीलांनी मला जवळ बोलाविले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्याशी वर व्यक्त केलेल्या नानाविध रुपांमधून ते कातरत्या व हळव्या स्वरांमध्ये बोलायला लागले.
अनु तू खूप हुशार नि गुणी मुलगा आहेस; आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. तू arts जरी घेतलंस ना तरी तू खूप मोठा होशील शिवाय नोकरी पण लवकरच मिळवशील.
आणि.........
कारण तुझ्यासोबत तुझ्या दोन भावंडांच पण शिक्षण सुरु आहे त्यांचाही खर्च .....
तू जर 'डी. एड 'केलंस तर खूपच छान होईल !
वडील माझ्याशी असं बराच वेळ बोलत होते. आणि उफाळून येणाऱ्या हुंदक्याना आतमध्येच दाबत होते. आमच्या कुटुंबाच्या तत्कालीन बिकट परिस्थितीचे रेखाचिञ मी त्यांच्या चेहऱ्यावर व डोळ्यांमध्ये पाहत होतो. त्यांच्या डोळ्यांमध्ये आमच्या कुटुंबाच्या काळजीचे डोह खोल जात असल्याचे मला जाणवत होते. आणि मग क्षणांर्धात कसलाही विचार न करता मी त्यांना मला 'डी. एड' करुन एक आदर्श शिक्षक बनायचे असल्याचे सांगितले.
कारण तो निर्णय त्यांनी माझ्यावर लादलेला नव्हता तर त्यांच्या रुपात एका सन्मिञाने मला अतीशय हळुवारपणे जगण्याची व जीवनाच्या सारीपाटाची ती उलगडलेली कला होती .
आणि तेंव्हापासुनच मी कल्पनेच्या प्रांतात रमण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवून जगायला शिकलो. आणि कदाचित म्हणूनच आज मी ज्या काही पदावर आहे त्याचे सर्व श्रेय माझ्या वडीलांच्या आणि माझ्यामधील मिञरुपी नात्याला आहे असे मला वाटते.
या प्रसंगावरुन मला आजच्या तरुण पिढीला आवर्जून सांगावेसे वाटते की थोडे आपल्या बापाला समजून घ्यायला शिका तद्वतच वडीलांनीही मुलांना वेळीच वास्तविक जगण्याचे भान मिञ बनून समजावून सांगितले पाहिजे .
कारण आजच्या या डिजीटल युगामध्ये बाप लेकातील सुसंवाद दिवसागणीक कमी कमी होत असल्याचे आर्वजून दिसून येते. फक्त खूप सारा पैसा कमविणे वा श्रीमंतीचा बेगडी लखलखाट मिरविणे म्हणजे जगणे नव्हे हे
आई -वडीलांनी समजून घेवून आपल्या मुलांना त्याची वेळीच जाणीव करुन देणे ही आज काळाची गरज आहे .
त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांना दडपणाखाली न ठेवता स्वच्छंदी पाखरांप्रमाणे ऊडू द्यावे . माञ तेंव्हाच आपल्या प्राणप्रीय पाखरांच्या पंखांमध्ये जिद्द व ध्येय गाठण्याचे बळ निर्माण करण्यासाठी त्यांच्याशी सतत त्यांचा सन्मिञ बनून सुसंवाद साधत राहणे खूप खूप गरजेचे व अत्यावश्यक आहे.
आजच्या या धकाधकिच्या जीवनामध्ये हीच गोष्ट मुलांच्या सैराट वागणुकीस कारणीभूत ठरत आहे कारण काही कारणांमुळे कुटुंबातील हा सुसंवाद दिवसागणीक कमी कमी होत असल्याचे आजच्या परीस्थितिवरुन स्पष्टपणे जाणवते .
म्हणावेसे वाटते की -
बाप म्हणजे मिञ सखा
बाप म्हणजे आधार ।
जीवनाला आकार देणारा
बाप असतो साथिदार ।।
✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
mo-9689634332
©Copyright - Aniket J. Deshmukh
दिनांक २४ जुलै २0१६

No comments:
Post a Comment