Saturday, 30 January 2016


📚 नागोराव येवतीकर यांच्या पाऊलवाट पुस्तकाचे यवतमाळ येथे प्रकाशन 


📖 विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त असे  वैचारिक पुस्तक :- 



मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांतील धर्माबाद तालुक्यापासून दहा किमी अंतरावर असलेल्या येवती येथील प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक नागोराव येवतीकर यांच्या पाऊलवाट या वैचारिक पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 30 जानेवारी रोजी यवतमाळ येथील राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनामध्ये मान्यवराच्या हस्ते संपन्न झाले. शालेय जीवनापासुनच लिखाण करण्याची फारच आवड असल्यामुळे नागोराव येवतीकर हे गत 20 वर्षा पासून राज्यातल्या विविध वर्तमानपत्र, साप्ताहिक आणि मासिकातून शैक्षणिक, सामाजिक, व कौटुंबिक विषयावर वैचारिक लेख लिहीत असतात.
       जीवन-शिक्षण या शैक्षणिक मासिकातून सुध्दा यापूर्वी त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. सध्या दैनिक लोकपत्रमध्ये दर सोमवारी ऑफ पिरियड सदराखाली क्रमशः लेख प्रकाशित होत आहेत, ज्यात ते शैक्षणिकसह वैचारिक बाबी विषयी विचार मांडत आहेत. लहान मुलांसाठी सुध्दा छोटेखानी लेख लिहिण्याचा छंद आहे. त्याच माध्यमांतून या पुस्तकांची निर्मिती झाली असे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.
       तसेच मुलांची मनोरंजनातून शब्दसंपत्ती वाढवी यांसाठी विविध मनोरंजक शब्दकोडे तयार करतात. जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त नांदेडच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या विषयी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. तसेच उत्कृष्ट लेखनाबद्दल अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ मुंबई यांचेकडून राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रसिद्ध लेखिका श्रीमती विजया वाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजातील सर्वच घटकांना समजेल, रुचेल, आणि पचेल अश्या दमदार शैलीत ते लेखन करतात त्यामुळे त्यांचा फार मोठ वाचक वर्ग तयार झाला आहे.
       वर्तमानपत्रामधून आजपर्यंत प्रसिद्ध झालेले सर्व लेख एकत्र संग्रह करून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त असे पाऊलवाट नावाचे वैचारिक पुस्तक अमरावतीच्या पायगुण प्रकाशनाद्वारे तयार करण्यात आले. यवतमाळ येथे संपन्न झालेल्या चौथ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते पाऊलवाट या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी , उदघाटक यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल राज्यमंत्री मा. संजय राठोड, यवतमाळ विधानसभेचे आमदार मा. मदन येरावार, शिक्षक साहित्य संघ यवतमाळचे जिल्हाध्यक्ष किशोर तळोकर, पायगुण प्रकाशनाच्या प्रकाशिका सौ. संध्या राजेश बाहे, मुद्रक राजेश बाहे, आनंद पेंडकर, सुधाकर बरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...