Friday, 30 October 2015

 🔵 " काव्यमंथन " चारोळी स्पर्धा
 🔴 दिनांक : 30 ऑक्टोबर 2015
 🔵 संयोजक व परिक्षक : सौ सुजाता ताई मोघे
 🔴 ग्राफिक्स : उत्कर्ष देवणीकर
 🔵 विषय :- " सय" / आठवण
******************************************


सयीवर सयी,
कितीच्या काही.
एक जाई तो दुसरी,
किती त्यांना घाई.

सुधीर काटे

******************************************

सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवते
जगण्याला अर्थ देते
हृदयी दाटूनी येते,
ती सय मला उमेद देते,
म्हणून मी जगते.

सुलभा कुलकणीॅ

******************************************

फुलांची शय्या नाही नशिबी
शेज माझी काट्यांनी सजून गेली ।
वैरीन झाली रात्र सजना
आठवण अश्रूंनी भिजून गेली

*अरविंद कुलकर्णी

******************************************

दिवस मजेचे बालपणीचे
तारूण्य हे सरून गेल
सांजवेळ ही आयुष्याची
मन आठवणीत विरून गेल

* अरविंद कुलकर्णी
******************************************

 तुझी आठवण प्रिये
माझ्या उरात दाटुन                    
तुज विन माझे
आता जगणे कठीण

संपत

******************************************

हे जाणे तुझे घडले अवचीत,
हुरहुर ह्या मनी कशी लावली?
नयनांनी बांध असे तोडले की,
आठवण अश्रूत भिजून गेली..

 @ उत्कर्ष देवणीकर....

******************************************

त्या भेटींची आठवण येवूनी,
दु:ख मनी असं भरुनी आलं..
मज डोळ्यांना हे अश्रु देवूनी,
मनं आठवणीत विरुनी गेलं...

  @ उत्कर्ष देवणीकर......

******************************************

 आठवणी तुज्या प्रिया...
आठवता या मनी...
भाव विभोर मन माझे....
प्रीतीच्या या सुरेल  क्षणी...
       @ उत्कर्ष देवणीकर...
******************************************


आठवण येते सखी,
त्या चिंब पावसाची....
वाट बघतोय चातक,
त्या मृग नक्षत्राची....
🔴गजानन वारणकर, नांदेड 🔴
******************************************

ती जा म्हणूनी जात नाही
ती ये म्हणूनी येत नाही,
पण ती पाठलाग सोडत नाही
मनात आठवणींना जागा नाही
असे कसे म्हणू मी ?

सुलभा  कुलकणीॅ.

******************************************

आज पुन्हा बघ तुझी,
आठवण मनात येऊन गेली.
झुळझुळ पाणी मंजुळ गाणी,
धमाल मोटेवरली.

सुधीर काटे
******************************************

आला पाऊसं पाऊसं मला सखी आठवली ।
जणू सांगावा सखीनं सरीसंगं पाठवली ॥
वाट पाहूनं पाहूनं जीव झाला येडा पिसा ।
सखी डोळ्यांत वसली सय उरी साठवली ॥

राजेसाहेब कदम

******************************************

🌹 शुभ सकाळ 🌹
=============
:II गोष्ट मनातली II::
============
सहज आज आठवली..
शाळेतली अधुरी कहाणी..
अजुन आहे कोरी तशी..
जराशी जुनी पुराणी..!!

भोसल्यांची ती होती..
खोसल्यांचा तो होता..
दिसायला ती सुंदर होती..
यथा तथाच तो होता..!!

बसत होते शेजारी पण..
ओळख ना झाली साधी..
कळले ना त्याचे त्याला..
प्रेमात तो पडला कधी..!!

चोरून तिज पाहे रोज..
पण धाडस ना बोलायला..
पाठीमागून जात असे..
नकळत घरी सोडायला..!!

किती क्षण आले गेले..
गाठावे ते क्षितिज कुठले..
नजरेचे ते खेळ सारे..
शब्दांना ना कंठ फुटले..!!

दिवस सरले वर्ष सरले..
आठवणीचे मेघ दाटले..
मनातल्या त्या गोष्टीने..
मनातले एक घर गाठले..!!
*******सुनील पवार.....

******************************************

वाहवा किती सार्या या साठवणी
काळजात दडवून ठेवलेल्या आठवणी
कशाला ठेवायच्या त्या दडवूनी
मनमोकळ्या लिहा आठवूनी
.. जागृती निखारे

******************************************


सुरासंगे वा-यावरून आली तुझी सय .....
विरहातील एकांताचे वाटेना झाले भय.....।

वाटते एकेक इंद्रधनू आठवण
करते आनंदी क्षणांची साठवण !

सुजाता मोघे
******************************************

प्रिती हसरी तुझीच ती
छेड़ते कधीची मजला..!
नजरेचा बान आठवण,
हृदयाला पुरता लागला..!!

✏ - - - - - - - जी.पी

******************************************

अश्रु येती नयनी,
आठवता काळे पाणी......
जीवन अर्पण केले त्यांनी,
भूमातेच्या चरणी...
🔴गजानन वारणकर, नांदेड 🔴
       👉🏼नांदेड👈🏼

******************************************


जीवनात काही  आठवणी
काही गोड तर काही कडू
चांगल्या लक्षात घ्याव्या
कडू विसरून जाव्या
 जागृती निखारे

******************************************

रातराणी फुलली
घरासी घरासी
तुझी याद आली
जरासी जरासी
* अरविंद कुलकर्णी

******************************************

आठवणी सुखाच्या,
नसतातच आठवणीत...
आठवणी दु:खाच्या मात्र,
आठवतात सदोदीत....

     @ उत्कर्ष देवणीकर...

******************************************

तुझ्या आठवणीत मला                  
माझ्या संपण्याचे भय                  
आता तुच माझा श्वास                  
अन् तुच माझी सय
संपत

******************************************

 विसरून दुष्काळ झळा
शेतकरी तलाठ्यादारी..!
आठवणी दुःखाच्या ठेवल्या,
पदरात बांधून दारोदारी..!!
✏ - - - - - - जी.पी
******************************************

तु माझ्यात इतकी भिनलीस की    
तुझी सय मला येते प्रत्येक श्वासाबरोबर
अन् तुझ्या मिलना सखे                                
माझा जीव हा झुरतो प्रत्येक श्वासाबरोबर

संपत
******************************************

झिडकारून निराशा
आठवणीत सज्ज झाला खरा..!
गाठी बांधून दुःख सर्व,
पेरणीस उभा झाला बरा..!!
✏ - - - - - - - - जी.पी
******************************************

आठवण तुझी निघता
मनाचा जाईल वाटते तोल..!
श्वासा श्वासाला दडला सखे ,
तुझ्या शब्दात आहे मोल..!!
✏ - - - - - - - जी.पी
******************************************

प्रिती वेडी तुझी सख्खे
आठवणीत वेडावत राही..!
भान नसे जीवनाचे,
गुंफण वेली मनातील पाही..!!
✏ - - - - - - - जी.पी
******************************************

तुझ्या विरहात मला                                    
माझ्या संपण्याचे भय                                      
आता तुच माझा श्वास                                      
अन् तुच माझी सय

संपत

******************************************

गुंतलेल्या हृदयाशी
सल बैसला काळजावरी..!
कधी वाटते प्रित वेडी,
घोर निराशा देहावरी..!!
✏ - - - - - - जी.पी
******************************************

तुझ्या त्या आठवणी,
मनं विचलीत करतात....
त्या मखमली आठवणी मज,
काट्या समं बोचतात...

    @ उत्कर्ष देवणीकर...
******************************************


आठवता ते पारतंत्र,
आठवले बलीदानी वीर...
नका करु तुम्ही मित्रांनो,
स्वतंत्र्यचा कसाही गैरवापर..

    @ उत्कर्ष देवणीकर....
******************************************

छळतात गं तुझ्या त्या,
भेटीच्या आठवणी...
येणार नाहीस परत तु,
माहीतं मज असोनी....

       @ उत्कर्ष देवणीकर..
******************************************

येईल परतून माते येथे
तुझ्याच जन्मा उदरी ..!
आठवण होता देशभक्ताची,
भगतसिंग पाहिला डोळा भरी..!!
✏ - - - - - - - जी.पी
******************************************

गेलीस का मज सोडुनी?
तुझ्या आठवणीच्या गुंत्यात..
जगतोय आजही असाच मी,
तुझ्या आठवणीच्या प्रेमात...

     @ उत्कर्ष देवणीकर..
******************************************

💥💥काव्यमंथन 💥💥
⛳चारोळी स्पर्धा ⛳
🌹🌹"सय "🌹🌹

सैनिकांची "सय "ही मोठया विरहाची |

नात्यांच्या पलीकडे जिम्मेदारीची ||

देश सेवा करी नित्य नियमांची |

भारत मातेवर नजर ना पडो कुण्या दुष्ट-दुष्मनाची ||
✏✏✒
आप्पासाहेब सुरवसे लाखनगांवकर
******************************************

🌸 चारोळी स्पर्धा 🌸
     आठवण - सय

1 )जा बाबांनो आठवणींनो
सताविता का मजला घेरून
पुढील जन्म तरी मजसाठी
सुख क्षणांना वेचण्यासाठी
- - - - - - - - - - - - -
2 )
किती काळ आठवणींना
पुन्हा पुन्हा जगवत रहायचं
जखमेवरची खपली काढून
पुन्हा पुन्हा जिवंत ठेवायचं
- - - - - - - - - - - - -
3 )
सुखद दु:खद आठवणींचा
प्रवाह अखंड वहात राहतो शीतलपासून दारूणपर्यंत भावपंचमीत बुडवून काढतो
- - - - - - - - - - - - -
4 )
बालपणीच्या आठवणी
मनातून जात नाहीत
आता फिरून ते दिवस
कधीच मिळणार नाहीत
- - - - - - - - - - - - -
5 )
डाचणार्या  सलणार्या
किती गोष्टी आयुष्यात!
सय येता त्या सर्वांची
अर्थ न उरे जगण्यात!
                 डाॅ. शरयू शहा.
- - - - - - - - - - - - -
******************************************

💥💥काव्यमंथन 💥💥

⛳🌼चारोळी स्पर्धा 🌼⛳

👪 "आठवण "👪

सासरी असता आठवण येते मज माहेराची |

माहेरी असता आठवण येते मज माझ्या राजाची ||

सख्या- मैत्रीणीच्या  मसलतीत असतो माझा राजाज नयनासमोर |

किती घालू मी घालू मनाला आवर आवर ||
✏✒✏✒✏✒✏
आप्पासाहेब सुरवसे लाखनगांवकर..
******************************************

आठवणीच्या आठवणी,
आठवणीतुनीच आठवतात...
आठवणी या आठवताना,
आठवणी आठवणीच का राहतात..?

     @ उत्कर्ष देवणीकर...

******************************************

स्वप्ने तुटली, स्वप्ने भंगली
मनामनाची नातें खुंटली
सुख हेच कां माझ्या भाळी
नशिबाची ही थट्टा आगळी
जागृती निखारे
******************************************

चारोळी स्पर्धेसाठी
सुखद सयींच तोरणं
मनाच्या चौकटीला
 दु:खद सयीचं बोचणं
 अन बेचैनी जीवनाला।
अंजना कर्णिक
******************************************

चारोळी -आठवण,
झिंम्माड पाऊस आठवांचा
त्यात चिंबचिंब  मन
हिंदोळा गत स्मृतिंचा
अवघ्या आयुष्यात तुफान।
अंजना कर्णिक

******************************************

स्मृती मंजूषेच्या कप्यात
दडली आठवणींची गाठोडी
उकलगांठ उकलतांना त्यात
 मिळाली  नाजूक नाती
जागृती निखारे
******************************************

अबोल तू असताना
मी शब्द बनुनी यावे
ओल्या अधरांवरती
पाकळी होऊन बरसावे

प्राजक्त तुझ्या ओठी
असाच बहरून यावा
त्याच्या सुवासा मध्ये
प्रेमरंग बहरावे

सखे सोडून दे अबोला
चांदणे धुंद मोहरले
तुझ्या भेटी साठी
हे हळवे मन विरघळले
प्रिया वैद्य
******************************************

सोडू नकोस स्वप्न जग जिंकण्याचे,
जरी साथीदार पेंगुळले आहे...
पहा तो येत आहे भानुराज,
आशा तुझी होऊ पाहे...

संपन्न कुलकर्णी
******************************************

धुक्यामाध्ल्या संध्याकाळी
निळसर वारा शीळ घालतो
तश्यात तुझी आठवण ओली
माझ्या मधला मी हरवतो
@ प्रिया वैद्य
******************************************

🌸 आठवण - सय 🌸
     
1 )
सुखदुःखांच्या आठवणींनी
अंत:करणी मांडली आरास
दबून गेलेय.. वाकून गेलेय
वाहून या..अवजड भारास
- -  - -  - -  - -  - -  - -
2 )
 सय येते बाळा...
 बोबड्या बोलाची ।
माझ्या मागे  मागे
दुडुदुडू धावण्याची ॥
-  -  -  -  -  -  -  -  -
3 )
आठवणींच्या धारेमध्ये
भिजल्या सार्या नरनारी ।
भावनांची ही रंग पंचमी
मन बनले आल्हादकारी ॥
-  -  -  -  -  -  -  -  -  -
4 )
येता माहेराची सय
आठवती दादामाय ।
वात्सल्य अरुणोदय
दूरच दू ऽ र तापत्रय ॥
-  -  -  -  -  -  -  -  -
5 )
साहित्यामधि .. गुंतता
कटु आठवणींचा..लय ।
मन बेचैनीचा .. विलय
अवघा आनंद प्रत्यय ॥
              डाॅ. शरयू शहा.
-  -  -  -  -  -  -  -  -  -

******************************************
काव्यमंथन
चारोळी स्पर्धा
विषय--आठव/सय
============
प्रेषक --- कुंदा पित्रे
============
आठवांच्या जखमा सोसण्याचे वय, निघुन गेले !!
त्या जखमांचे व्रण मिरविते आता
आयुष्य हे असे,तर या उंब-यावर थांबलेले !!
नव आठवांचे भान नाही आता


*****************************************

आठवणी सुखदुःखाच्या
लपून राहती कशा मनात ही..!
हळूवार वलयाकार घेता,
तेव्हा उफाळून वाहती प्रवाही..!!
✏ - - - - - - - जी.पी

******************************************


दु:ख म्हणालं सुखाला
किती कमी रे तुझ्या सयी ?
सुख म्हणालं,पण माझी एकटी
आयुष्य फुलवते की नाही?
सुधीर काटे
******************************************

गोफ गुंफला आठवणींचा
फेर धरला मनीमनाचा
सय येता चुके ठेका काळजाचा
कशी सावरू देह साठीचा.
        सुलभा कूलकणीॅ.

******************************************

अनेक आठवे आठवांची
वेणी करून गुंफतो  आहे
भास होण्या आधी त्याचा
गंध उराशी जपतो आहे
प्रिया वैद्य
******************************************

मनाच्या खोल कुपीत
झुलतो आठवणींचा हिंदोळा,
सय येता तुझी कातर वेळी,
जीव होतो गोळा...!!!
- अनुजा देशमुख
******************************************

आठव

सांजावल्यावेळी आठवांचा
थर साचतो!!
एक एक सय पुढे येता
गळा दाटून येतो!!
सयीचा गोतावळा,मागे जाता
हिंदोळा पुढे जातो!!
सखे ,सोबती ,साथी मिळता
जीव चिंब भिजतो !!
प्रेषक --कुंदा पित्रे
******************************************

बालपणीचा काळ सुखाचा
सर्वांनी याची आहे जाण
दिवस सरतात जसे जसे
आठवून ते सारे जाई प्राण

🎋 नागोराव सा. येवतीकर 🎋
******************************************

सय -

सय नेहमीच येते कातरवेळी
आईची माया दाटते उरी
साईचं दही व लोणच भात
प्रेमळ हात फिरे केसावरी
प्रेषक --कुंदा पित्रे
******************************************

🌸 आठवण 🌸

अ च्या बाराखडीने
प्रत्येक शब्दाची सुरुवात.-
1 )
अगतिक आयुष्याच्या
आर्त ओल्या आठवणी ।
 अस्वस्थ उद्वेगकारक
अतर्क्याची ओवाळणी ॥
-  -  -  -  -  -  -  -  -  -
2 )
आजवरची उलथापालथ
आंदोलते आतल्या आत ।
अस्थिरता अशांततेच्या
आठवणी अंत:करणात ॥
3 )
अंतर्मनावर आठवणींचे
अद्दश्य असे.. आवरण ।
अंतरामध्ये अमावास्येचे
अजूनही .... एकाकीपण ॥
-  -  -  -  -  -  -  -  -  -
4 )
अनुभवलेल्या आठवणी
अजून इथे अवतीभवती ।
आजवर अद्दष्ट अरिष्टानेच
ओवाळली आहे आरती ॥
-  -  -  -  -  -  -  -  -  -
5 )
अशातशा उन्हातल्या
अनवाणी आठवणी ।
इतरांना अज्ञेय अशा
अनुत्सुक आठवणी ॥
-  -  -  -  -  -  -  -  -
6 )
आठवणी .. इथवरच्या
एकात एक अडकलेल्या ।
 अनपेक्षित अकल्पितपणे
अवचित उसळून आल्या ॥
-  -  -  -  -  -  -  -  -  -
7 )
आठवणींनी अजूनही
आवंढा अडकतो आहे ।
अंतरात असह्य असा
ओरखडा उमटतो आहे ॥
             डाॅ. शरयू शहा.
-  -  -   -  -  -  -  -  -
******************************************

आठवण

आठवणी सोडून गेलो परदेशी
शिकलो,फिरलो,रमलो सारीकडे
ती दिसली,आठवाचं दार उघडलं
अन् भरधाव सुटलो भारताकडे
प्रेषक --कुंदा पित्रे.
******************************************

जागृती निखारे:
माझिया सख्यांना
आज माझी सय आली
आनंदभावनांच्या ओघातं
 मनं प्राजक्तांनी न्हाली
******************************************

आठवण
1.
म्हणता बाबा मी परक्याचे धन,
लवकरच कराल ही माझी पाठवण,
पण काय कराल बाबा,
जेव्हा येईल तुम्हां माझी आठवण.

2.
आठवणींच्या महासागरातही,
येते भरती अन् आहोटी,
निघतात जेव्हा माझ्या,
बालपणीच्या आठवणी .

3.
जीवन जगण्यासाठी,
लागे आठवणींचा आधार,
दुखदायी वाटेवरती,
हलका करण्या भार .

🌺🌺संदीप पाटील,नांदेड .

******************************************
***************** समाप्त *****************
******************************************

Sunday, 25 October 2015

मराठी भाषेचा विकास सर्वांच्या हाती 

Saturday, 24 October 2015

🔺लेक वाचवा ; लेक शिकवा 🔺
                    - नागोराव सा. येवतीकर 

कॉलेजला जाण्यासाठी एसटीच्या पासचे २६० रुपये पैसे नाहीत, वडिलांना आपल्या लग्नाची चिंता आहे, या कारणावरून लातूर जिल्ह्यातील जढाळा गावातील स्वाती विठ्ठल पिटले या विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे वर्तमानपत्रातील बातमी वाचून खूप दुःख झाले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने वडिलांच्या नावे पत्र लिहून ठेवले. 'माझ्या मरणाचं कारण एवढंच आहे की, माझ्या बसचा पास संपला होता म्हणून आठ दिवस कॉलेजला गेले नाही. आईने कोणाकडून उसने पैसे घेऊन मला पास काढण्यासाठी दिले. त्यानंतर मी कॉलेजला गेले. रोजरोजचे हे टेन्शन असह्य होत आहे,' एवढेच नाही तर तिने पुढे पत्रात म्हटले आहे की,'आई-वडील इतके काबाडकष्ट करतात आणि देव त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ देत नाही. पप्पा मी तुमची परेशानी समजू शकते. आजकाल तुमच्या चेहऱ्यावर खुशी दिसत नाही. मला माहिती आहे, तुम्ही जास्त टेन्शन कोणत्या गोष्टीचं घेता. हेच ना, की तुमच्या दोन मुली लग्नाला आल्यात,' असेही स्वातीने या पत्रात लिहिले आहे. खरोखरच मुलीच्या बापाला खूपच टेंशन असते. गरीब शेतकरी किंवा शेतमजूर यास जर दोन्ही मुली असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च आणि त्यानंतर तिच्या लग्नाच्या खर्चाचा विचार केल्यास टेंशन तर येणारच यात शंका नाही. त्यातल्या त्यात येथील लग्नाच्या पध्दतीने तर वधुपित्याची एकप्रकारे अग्निपरीक्षा होते. वर पक्षाला द्यावयाची वरदक्षिणा म्हणजे हुंडा आणि लग्नात करायचा मानपान याच्या खर्चामुळे वधूपित्याचे अक्षरश: कंबरडे मोडते. त्यात गेल्या दोन - तीन वर्षापासुन निसर्गाची साथ बरोबर नव्हती त्यामुळे सर्वच शेतकरी चिंतातूर होते. स्वातीच्या वडिलांनी २५ हजार रुपये खर्चून टोमॅटोचे पीक लावले होते. ते जळून गेले. त्यातच मळणी यंत्राचे हप्ते थकले. बँकेचा तगादा सुरू होता. त्यात मुलांना शिकवायचे कसे आणि घर चालवायचे कसे, असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. ही सारी परिस्थिती पाहून स्वाती खचून गेली आणि तिने जीवनयात्रा संपविली.
आजपर्यंत दुष्काळी परिस्थितीचे चटके शेतकरी यांना लागत होते त्यामु़ळे त्यांच्या आत्महत्या हा एक चिंतेचा विषय होता. याची थोड्या फार प्रमाणात महिलांना सुध्दा जाणवू लागले होते परंतु सध्या दुष्काळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात सापडले आहे. औरंगाबादमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरून दैनंदिन खर्चासाठी पैसे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडण्याच्या बेतात आहेत. अशी स्थिती प्रत्येक शहरात दिसून येत आहे. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत सुध्दा काही चांगले चित्र पाहण्यास मिळत नाही. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा आहे त्याच वर्गापर्यंत शाळा शिकावे अशी बंधने मुलीवर असतात त्यामुळे ते पुढील शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. काही जागरूक पालक आपल्या मुलींना शिकविण्यासाठी गावाबाहेर पाठवीतात परंतु त्याना अनेक दिव्यसंकटातून मार्ग काढावा लागतो. शासन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवली आहे आणि राबवित ही आहे. मात्र वीस ते पंचवीस वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या योजना त्यात काहीच बदल न करता जशास तशी राबविली जात आहेत.  महागाई एवढी वाढलेली असताना योजनेत काहीच बदल झाला नाही किंवा बदल करण्यात आला नाही. त्यामुळे ही मदत मुलींच्या पालकासाठी तोकडे ठरत आहे. तरी त्यात काही प्रमाणात बदल केल्यास मुलींच्या पालकांना खूप मोठा दिलासा मिळेल.
** 1 ली ते 4 थी वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी त्यांच्या दररोज च्या उपस्थिती नुसार उपस्थिती भत्ता दिली जाते. ती फारच तोकडी म्हणजे 1 रू. प्रति दिवस याप्रमाणे आहे त्या ऐवजी 5 रू. केल्यास मुलींच्या पालकांना खरी मदत मिळेल
आणि ते मुलींना शालेय इतर साहित्य खरेदी करू शकतील.

** इयत्ता 5 वी  ते 7 वी वर्गात शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती भत्ता 60 रू. प्रति महीना असे 10 महिन्यांचे 600 रू. मिळतात. त्या ऐवजी सरसकट सर्वच मुलींना 200 रू. केल्यास मुलींच्या पालकांना खरी मदत मिळेल
आणि मुलींचे उच्च शिक्षण चालू राहील.

** इयत्ता 8 वी  ते 10 वी वर्गात शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती भत्ता 100 रू. प्रति महीना असे 10 महिन्यांचे 1000 रू. मिळतात. त्या ऐवजी सरसकट सर्वच मुलींना 300 रू. केल्यास मुलींच्या पालकांना खरी मदत मिळेल

** अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना पदवी पर्यंत करावी त्यामुळे मुलींच्या शिक्षणात वाढ होईल
**
 शहरी पेक्षा ग्रामीण मुलींच्या शिक्षणाची हेळसांड जास्त होते म्हणून विशेष करून ग्रामीण मुलींच्या शिक्षणाला अधिकचे प्राधान्य देण्यात यावे
** प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इयत्ता 5 वी ते 10 वी साठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय च्या धर्तीवर 150 मुलींसाठी निवासी वस्तीगृह निर्माण करावेत ज्यामुळे गरीब मुली शिकू शकतील
आणि त्याचा ताण मुलींच्या पालकांवर राहणार नाही.

** " मानव विकास मिशन" अंतर्गत 1ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी मुलींना मोफत पुस्तके ,पास ,वर्षातून कमीतकमी 4 गणवेश आणि मासिक 300 रू. विद्यावेतन देण्यात यावे यामध्ये प्राथमिक ,उच्च प्राथमिक , माध्यमिक ,उच्च माध्यमिक असे टप्पे पाडण्यात यावेत

** एकंदरीतच ग्रामीण भागात बालविवाहचे प्रमाण लक्षणीय आहे .त्यातच 12 वी पर्यंतचे शिक्षण योग्य त्या सोयी सवलती सह आणि अनिवार्य केल्यास, एक तर 18 वर्षापर्यंत शिक्षण होईल आणि मुलींची शारीरिक आणि मानसिक सोबतच सर्वांगीण विकास होईल. आणि त्यातूनच एक सशक्त सबला नारी  आणि कर्तव्यदक्ष महिला म्हणून ती मुलगी तिच्या भावी जीवनात यशस्वी होईल. तेंव्हा कुठे  लेक वाचवा आणि लेक शिकवा उपक्रम खऱ्या अर्थाने राबविली असे म्हणता येईल.

Friday, 23 October 2015

** विचार मंथन ** ग्रुप आयोजित
** काव्य मंथन विषय - पौर्णिमा **
** दिनांक : 23 ऑक्टोबर 2015

********************************
चांद मातला नभात
रात पुनवेची आली
साजनाच्या भेटीसाठी
माझी काया आसुसली
* अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
पाहुनी तुझा चेहरा,
मन माझं वेडावलं....
पौर्णिमेच्या चंद्रा समं,
तेज तुजला लाभलं....

      @ उत्कर्ष देवणीकर...
**************************************

💥 पौर्णिमा 💥

पौर्णिमेच्या रात्री
चांदण्यांची बरसात
माझ्या सुखी जीवनी
भेटली तुझी साथ
🔺 नासा, धर्माबाद 🔺
**************************************

पुनवेचा चांद अन
दर्याला आला पुर
एका लाटेसरशी
माझ्या नाखव्याला नेल दुर

अरविंद कुलकर्णी
**************************************

तुझ्यासवे मी असेल सखये,
जेंव्हा गगनी पूर्ण चंद्रमा.
दावीन तयाला तुझा चेहरा,
धरतीवरली रूप पौर्णीमा.
सुधीर काटे
**************************************

नजर तुझी झुकलेली
गोर्या गालावर लालीमा
बाहूत अलगद माझ्या आला
तुझा पौर्णिमेचा मुखचंद्रमा
* अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
------पौर्णिमा------
       
पौर्णिमेच्या रात्रि,
होते चांदणे टिपुर.....
माझ्या स्वप्नी आली,
प्रियतमा वाजवत नृपुर...

🔵WARANKAR G🔵
      👉नांदेड👈
********************************
सय येता तुझी , प्रिया
दाह होतो रे मनाचा
पोळते हे चांदणे
त्यात हा चंद्र पौर्णिमेचा
* अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
तुझ्यासवे मी असेल सखये,
जेंव्हा गगनी पूर्ण चंद्रमा.
दावीन तयाला तुझा चेहरा,
धरतीवरली रूप पौर्णीमा.

डॉ.सुधीर काटे...निगडी,पुणे
********************************
तूच भवानी , रेणूकामाता
अगाध तुझा महीमा ।
तुझी कृपा घेउन आली
कोजागरी पौर्णिमा ।
* अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
टिपूर चांदणे शितलता
सुखद सहवास तमा.
जागवत सारे सुखात राहू
कोजागिरीची पौर्णीमा.

डॉ.सुधीर काटे
********************************
तुच माझी सखी
 अन् माझी रती
पोर्णीमेच्या चंद्राहुनही
 प्रेमळ तुझी मजवर प्रिती
संपत
********************************
तू ही अधिर मी ही अधिर
वेळ चालला धिमा ।
प्रतिपदेच्या चंद्राची
होईल कधी ग पौर्णिमा ।
* अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
पौर्णिमा===स्पर्धासाठी
================
==प्रेषक-- कुंदा पित्रे==
-------------------------------
चांदणी रात मनात रमली
कि,तुझे नि माझे मैत्र आगळे
टिपुर पुनव उरातच घुसली
कि,अद्वैताचे रूपच वेगळे
********************************
⚪     पौर्णिमा     ⚪
बारा महिन्याचे बारा
प्रत्येक पौर्णिमा महत्वाची
दुधात साखर पडे ती
पौर्णिमा कोजगिरीची
🔺 नागोराव सा. येवतीकर
     मु. येवती ता. धर्माबाद 🔺
( स्पर्धेसाठी )

********************************
नभी उभा सखा चंद्रमा
वाट बघताना पौर्णिमेची..!
आतुरलेल्या चांदन्या सह,
शुभ्र वस्त्र परिधान कलेची..!!
✏ ----------- जी.पी
********************************
रात्र पौर्णिमेची अशी..
विरहात मज पोळते...
आठव निरोप देताना..
पाखराचेही मनं बोलते...

   - सौ.कस्तुरी.
********************************
जीवनीचा खेळ खरा
अमावस कधी पौर्णिमा..!
पाठशिवणीचा मेळ सारा
हास्य वदनी मुखी चंद्रमा..!!
✏ - - - - - - - जी.पी
(स्पर्धे साठी नाही )
********************************
वेडी झाली चांदणी
पाहून चंद्र पौर्णिमेचा..!
उमटली प्रतिमा नभातून,
आठवता दिन कोजागिरीचा..!!
✏ - - - - - - - - - जी.पी
( स्पर्धे साठी नाही )
********************************
सागरास ओढ पौर्णिमेची
शिंपीते जळी  चंदेरी सडा
चांदव्यासंगे मस्ती लाटांची
संगे खेळण्या  येती चांदण्या
अंजना कर्णिक
********************************
चारोळी स्पर्धा
         पौर्णिमा

मनाजोगती होवो वृष्टी
धन धान्याची  संतुष्टी ।
पौर्णिमेचे आनंद गाणे
उमटो बळिराजा ओठी ॥
            डाॅ. शरयू शहा.
********************************
घडो सहवास कोजागिरी
पौर्णिमा थाटात घरी आली..!
लाजली गाली कळी चांदणीची,
 मुखावरि हास्य करून गेली..!!
✏ - - - - - - - - जी.पी
( स्पर्धे साठी नाही )
********************************
ही शरदातील पौर्णिमा
कि प्रभा तव कांतीची
देखणा अति मुखचंद्रमा
ऊताविळ धीट प्रितीची।
अंजना
********************************
जेव्हा केव्हा अपुल्या देशात
नीतीस्वच्छतासत्याचे दर्शन
तेव्हाच होईल खर्या अर्थाने
भारत पौर्णिमा असे हे वर्णन
                  डाॅ.शरयू शहा.
********************************
वाईटाला जाळते  ती होळी पौर्णिमा
सांगे गुरूची महती आषाढ
पौर्णिमाऊत्सव..........।
नवरंगाचे दीवस संपले
वास्तवाचे  येवो आता भान
देव्यांचे विर्सजनझाले
अन सर्वत्र खरकटी घाण।

गणपती नवरात्र दिवाळी
ईद ऊलफित्र वा नाताळ
अख्ख् शहर  कचराकुंडी
अन रोगराईला आमंत्रण।

सण म्हणजे  ध्वनीप्रदुषण
ऊत्सवाचा वेडा ऊन्माद
याचे ही एक राजकारण
कधी होणार परिर्वतन?

ऊत्सवातून जूळतात मनं
कधी भडकतात दंगली
संस्काराच विसरून भान
माणसं होतात जंगली।
अंजना कर्णीक
********************************
✏✒काव्यमंथन ✏✒
 🚩चारोळी स्पर्धा🚩        
 💥पौर्णिमा💥                      
नवरात्रीची पौर्णिमा ती कोजागिरी |                      
दीपावलीची ती पौर्णिमा त्रिपुरारी ||                  
 ख्रिसमस नाताळी असते ती मार्गशिरी |                      
पौष पौर्णिमेस म्हणती शांकभरी  ||                            
----------------------------------------------
आप्पासाहेब सुरवसे , लाखनगांवकर.
********************************
चारोळी स्पर्धा--
पौर्णिमा - -

चंद्र येतो पूर्ण भराला
  कोजागिरी पौर्णिमेला
    हवेतच की सहस्त्र नेत्र
      अवघे सौंदर्य टिपायला
                 डाॅ. शरयू शहा.
********************************
शाकंभरी पौर्णिमा
माया धरतीची।
शारद  पौर्णिमा
चंदेरी रातीची।
होळी पौर्णिमा
वाइटास जाळी।
पुनव कोजागिरी
लक्ष्मी नभी आली।
अंजना कर्णिक
********************************
चारोळी स्पर्धा
पौर्णिमा - -

चिंता काळजी विवंचनाचे
राहू  केतू  ग्रासत असती
पुरुषार्थाची होता पौर्णिमा
सर्व अडचणी  दूर  होती
             डाॅ. शरयू शहा.
********************************
चांदण्या खेळगडी
कॅप्टन पुनवेचा चांद
आकाशीच्या अंगणी
पोचले लाटांच गान।
अंजना
********************************
चारोळी स्पर्धा - -
पौर्णिमा - -

जीवनसाथी गेला सोडून
प्राण कसा हा तगमगतो ।
पौर्णिमेच्या चांदण्यातही
जीव कसा पोळून निघतो ॥
               डाॅ. शरयू शहा.
********************************
किती सूदंर चारोळी
प्रत्येकाची न्यारी
मी वाचून झालो मंत्रमुग्ध
ही चारोळी स्पर्धा आहे प्यारी

ही रात्र अंधारी
नाही कूठे चंद्रमा
फिरतो मी बेभान
कूठे माझी पौर्णिमा
- हुसेन शेख

********************************
पायतळी जरी अंगार
मनी  करुणेची पोर्णिमा
ज्ञानदेव क्षमेचा सागर
दिवा ज्ञानाचा ऊजळला.
अंजना कणिक
********************************
संत सज्जनांची कृपा
धवल चांदणे पौर्णिमेचे
गीत गायन भक्तीने
चभगवताचे पांघरावे चांदणे!
अंजना
********************************
💥💥काव्यमंथन💥💥
📍🚩चारोळी स्पर्धा 🚩📍

 🌙🌜चारोळी स्पर्धा🌜🌙

पुनवचा चांद लय भारी
माझी प्रीति तुझ या वरी
समजून घे गं सजने सणावारी
 महागाई ने घेतली गगन भरारी
 ------------------------
आप्पासाहेब सुरवसे , लाखनगांवकर   .
********************************
स्पर्घेसाठी --
तारुण्य सरले, आली आता पन्नाशी,
पौर्णिमेचा चंद्र आला तुझ्या डोई
आणि त्याचे रुपेरी चांदणे
स्पर्धा करतेय् माझ्या केसांशी ....!
 -सुजाता

********************************
शांत चंद्र होता साक्षीला
तुझी माझी प्रित सजली
त्या पौर्णिमेच्या रात्रीला
उगा नियतीनं फारकत केली
कुंदा पित्रे
********************************
निशीगंधाच  बेभान फुलणं
  सुगंधी लाट  पौर्णिमेला
शरदपुनवेच  शुभ्र चांदणं
अन प्रीति ऐन भराला ।
अंजना
********************************
ही रात्र पौर्णिमेची
हा वेगळा रुप चंद्रमा..!
कलेवराची सुंदर मोहक,
भान विसरे चांदण प्रेमा..!!
✏ - - - - - - - जी.पी
( स्पर्धे साठी नाही )
********************************
शुभ्र तुझी कांती,
कोमल तुझी काया,
पूनवेचा चंद्र ही आला,
मुखदर्शन करावया.
      संदीप,नांदेड.
********************************
अमावास्येचा चंद्र,
कलेकलेने वाढला,
सखे,तुझे वदन,
मज पौर्णिमेचा चंद्र भासला.
     संदीप,नांदेड .
********************************
⚪   पौर्णिमेचा महिमा  ⚪

बारा महिन्याचे बारा
प्रत्येक पौर्णिमा महत्वाची
महिमा पाहूया गडे
प्रत्येक पौर्णिमेची

हनुमान जयंती असे
चैत्र पौर्णिमेला
बुध्द पौर्णिमा येतो
वैशाख महिन्याला

ज्येष्ठ महिन्यात
महिलांची वटपौर्णिमा
आषाढ महिन्यात
शिष्य करे गुरुपौर्णिमा

नारळी पौर्णिमा येते
श्रावण महिन्यात
कोजगिरी म्हणते
आश्विन महिन्यात

कार्तिक महिन्यात
गुरु नानक जयंती
मार्गशीर्ष मध्ये येतो
देवाची दत्त जयंती

पौष महिन्यातील
पौर्णिमा शाकंभरी
शेवटच्या फाल्गुनात
दुर्गुणाची होळी

🔺 नागोराव सा. येवतीकर
     मु. येवती ता. धर्माबाद 🔺
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
पूनवेच्या कोजागीरी,
केशरयुक्त दूध,
शोधित होतो चंद्र त्यात,
पण प्रिये,दिसले तुझे मुख.
          संदीप,नांदेड.
********************************
पौर्णिमेच्या राती,
चंद्र,तारकांची आरास,
खुलले तुझे सौंदर्य,
प्रवेशीली जेव्हा माझ्या घरास.
     संदीप,नांदेड .
********************************
पौर्णिमेच्या रातीने,
चंद्र,तारकांच्या साक्षीने,
मागतो मी तुला,
तुझ्याच वतीने .
संदीप,नांदेड .
********************************
चारोळी स्पर्धा
पौर्णिमा - -

बाळराजा जेव्हा
        येतो घराशी ।
पौर्णिमेचा चंद्रच
      अपुल्यापाशी ॥
           डाॅ. शरयू शहा.
********************************
अंधारात फिरलो वन वन
पाहाण्यास चंद्रमा
फार फिरलो पण मज
घरात भेटली पौर्णिमा
* शेख हुसेन , हडोळती ( लातूर )
********************************
पौर्णिमेचा चंद्र,
आज वेगळाच भासला,
जणू तारकांच्या मालेने,
गगनीं स्वयंवर मांडिला.
       संदीप,नांदेड .
********************************
पौर्णिमा== प्रेषक  ==कुंदा पित्रे
ज्ञानोबांच्या पौर्णिमेत
सारी मराठी नहाली
पैसाचा खांब मनांत
तुका गाथा सावली

Tuesday, 20 October 2015

Monday, 19 October 2015

वडिलांची सजग भूमिका 

ऑफ पिरियड

श्रध्दा आणि अंधश्रध्दा 

T V न पाहण्याचा संकल्प 


वाचकिया


सौजन्य : नासा
❗: : महाराष्ट्रातील ब्लॉगर टिचर
संकलन
❗ संकलनकर्ता- श्री. सुहास श्रीरंग कोळेकर
zpprimaryschoolkayre.blogspot.in


💻ब्लाॅगर टीचर्स महाराष्ट्र 💻या व्हॉटस अँप ब्लॉगिंग ग्रुपवर असलेले ब्लॉगर टिचर .....

❗श्री. दिपक जाधव
सारोळा कासार अ नगर
www.dipakjadhav888.blogspot.in

❗श्री. संजय पुलकुटे

Www.lmcschools.blogspot.in
Www.lmcschool3.blogspot.in
Www.tcrschool.blogspot.in
Www.tcrschool2.blogspot.in
Www.maazishala.blogspot.in

❗श्री. ज्ञानदेव नवसरे
प्राथ शिक्षक जि प नाशिक
www.dnyanvahak.blogspot.in

❗श्री. गजानन सोळंके
Mirkhel124.blogspot.in

❗श्री. उमेश खोसे
www.umeshkhose.blogspot.in

❗श्री. सुनिल आलूरकर
www.zpguruji.com


🎉 श्री काशिद ए.एस.
गोठोस नं.१,कुडाळ,सिंधुदुर्ग
mahazpschoollive.bloggspot.com/

❗श्री. गजानन बोढे बोढे,सहशिक्षक,जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती ता.सिल्लोड जि.औरंगाबाद.
http://www.misulabhak.blogspot.in

❗श्री. सुहास श्रीरंग कोळेकर
जि प शाळा ,कायरे
ता पेठ,जि नाशिक
www.zpprimaryschoolkayre.blogspot.in

❗श्री. राजकिरण चव्हाण
srujanshilshikshak.blogspot.in

❗श्री. राजेंद्र मोरकर
www.rajumorkar.blogspot.in

❗श्री. भरत पाटील
 माळीनगर ता.मालेगाव
http://bhartpatil.blogspot.in


❗श्री. नागेश (नागजी) टोणगे,
जि.प.हायस्कुल मस्सा (खं.) ,
ता. कळंब जि. उस्मानाबाद.
 gurumauli11.blogspot.in


❗श्री. राम राघोजी माळी
जि. प. केंद्रशाळा मुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे.
www.ramrmali.blogspot.in

❗श्री. आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला
www.zpschooljalgaonnahate.blogspot.in


❗Mr.Sachin vitthalrao shelke
http://zppsmugaon.over-blog.com

❗श्री. शंकर जाधव
shankarjadhav555.blogspot.in


❗श्री. सचिन कडलग, जालना
elearningzp.blogspot.in


❗श्री. अशोक निवृत्ती तळेकर
प्रा.शिक्षक ता.डहाणू  जि.पालघर
👉http://ashoktalekar.blogspot.in/                                                                                                          

❗श्री. संतोष दहिवळ
www.santoshdahiwal.in

❗Shri. Mundhe d d
zpschoolparatwadi.blogspot.in

❗Shri. Govardhan Khambait

Blog address
zpschooljale27201105801peint.blogspot.com
govardhankhambait.blogspot.in

❗Shri. Rajendra pandit
rajendrapandit.blogspot.in

❗श्री. रविंद्र नादरकर
http://ezpschool.blogspot.in/            
❗Shri. Shankar. JADHAV
shankarjadhav55.blogspot.in

❗श्री. आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला
www.zpschooljalgaonnahate.blogspot.in

❗Shri. Pathan  Aadam Khan
Asst.Teacher
Zp devgad
Dist sindhudurg
Zpurduschooldhalavli.blogspot.in

❗ श्री. लक्ष्मण सावंत
http//laxmansawant.blogspot.in

 ❗ श्री. संतोष थोरात
z.p.pri.school, bondarmal
tal-peth, dist-nashik
www.dnyansanjivani.blogspot.in

❗ श्री. शशिकांत फारणे
shashikantfarne.blogspot.in

❗ Shri. Ganesh Satimeshram
zpteacher.weebly.com

❗श्री. खंडागळे सर
khandagaletejal.com

❗श्री. लक्ष्मण वाठोरे
lakshmanwathore.in

❗श्री. रोहोकले सर
mahazpschool.blogspot.in

❗श्री. तानाजी सोमवंशी
tanajisomwanshi.in

❗श्री. हिरोज तडवी
hirojtadvi.blogspot.in

❗श्री. सोमनाथ वाळके
somnathwalke.in

❗श्री. विक्रम अडसुळ
www.krutishilshikshak.blogspot.in

❗श्री. मंगेश मोरे
mangeshmmore.blogspot.in

❗श्री. रमेश वाघ
rameshwagh.blogspot.in

❗श्री. महेश शहाजी लोखंडे
ता.कराड जि.सातारा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) कराड
 http://zppsshindemalasharadnagar.blogspot.com/
पंचायत समिती कराड
http://pskarad.blogspot.com/

❗श्री. निलेश इंगळे
जि प शाळा पारवा
ता. पुसद  जि .यवतमाळ
zpparvaschool.wordpress.com

❗श्री. अशोक फुंदे
शाळा -जि प.प्रा शाळा उभिधोंड.    ता पेठ जि नाशिक zpschoolubhidhond.blogspot.in

❗ श्री. संतोष बोडखे: zppschangdevnagar.blogspot.com
 काम सुरू आहे.

❗श्री. निकाळजे घनश्याम अर्जून ,
जि.प.केंद्रशाळा जोगमोडी, ता.पेठ, जि. नाशिक
zpprischooljogmodi.blogspot.com

❗श्री. हरीदास भांगरे
haridasbhangare.blogspot.com

❗श्री. समाधान शिकेतोड
shikshansanvad.blogspot.com

❗श्री.दिपक बेलवले .
jyotideepakbelawale.blogspot.in

❗श्री. उमेश कोटलवार
hasatkhelatshikshan.blogspot.in

❗श्री. बालाजी मुंडलोड
chhayamundlod.blogspot.in

❗श्री. अरुण सेवलकर
arunsevalkar.blogspot.com

❗श्री. बालाजी केंद्रे
जि प शाळा सोजडबार ता अक्कलकुवा जि नंदुरबार
मुळ गाव लातूर
www.aamhishikshak.blogspot.in

❗श्री. प्रविण डाकरे
Https://pravindakare.blogspot.com


❗ श्री. राजेश्वर पिल्लेवार
ssaparbhani.blogspot.com
rajeshwarpillewar.edublog.org

❗ श्री. रंगनाथ कैले
rangnathkaile.blogspot.com

❗ श्री. रोशन फलके shikshanmarathi.blogspot.com/
आनंदी शिक्षण

❗ श्री. रविंद्र राऊत
जि प प्राथ शाळा देमनवाडी ता कर्जत जि अहमदनगर
demanwadi.blogspot.in

❗ श्री . रवि कोळी सर
जि.प.प्राथमिक शाळा जळू
ता.एरंडोल जि.जळगाव
http://ravikoli.blogspot.com/

❗ श्री. राजु खाडे
khaderaju.blogspot.com

❗ श्री. बालाजी जाधव
www.balajijadhav.in

❗ श्री. रविंद्र भापकर
www.ravibhapkar.in

❗ श्री. समीर लोणकर
zppsjamadadewasti.blogspot.in

❗Shri. Rameshvar Gaikwad  www.zppsganeshwadi.blogspot.com

❗ Shri. Subhash ingle
www.zppsharatkheda.blogspot.com
                                                                    ❗Shri. Anand Anemwad
 http://anandanemwad.blogspot.com/

❗श्री. शाम गिरी
www.zpvenkatitanda.blogspot.com

❗श्री. नागोराव येवतीकर
nasayeotikar.blogspot.com

❗Shri. Syed asif iqbal
HM zp kharepatan tal.kankavli dist.sindhudurg
www.zppskharepatankazi.blogspot.com

❗श्री. तानाजी सोमवंशी
tanajisomwanshi.blogspot.com

❗श्री. भिमा अंदूरे सर. ..
जि.प.प्रा.शा.चिकणगाव
ता.अंबड जि.जालना
Zppschikangaon.blogspot.com

❗श्री. रमेश वाघ
मुक्तचिंतन
rameshmwagh.Blogspot.in

❗श्री. गजानन सोळंके
 Mirkhel123.blogspot.in

❗श्री. शफी सर,ढाणकी
shafisk.wordpress.com

❗श्री. सतिश भोसले सर,बीड
satishbhosale01.blogspot.in

❗ श्री. इब्राहिम चौधरी ,
उमरगा ,उस्मानाबाद
www.guruwarya.blogspot.in

❗श्री. विशाल घोलप, बीड
www.crcpachegaon.blogspot.in
www.aadharprakalpa.blogspot.in

❗श्री. राम सालगुडे
www.ramsalgude.in

🌹: श्री.संदीप वाघमोरे
www.dhyasg.in

💻श्री  निलेश ग्यानोबा इंगळे
जि प शाळा  पारवागाव
ता पुसद जि यवतमाळ
Zpparvaschool.blogspot.com
Zpparvaschool.wordpress.com

💻  आसिफ मौला शेख
मूळ गाव:मु.पो.सिद्धापूर ता:मंगळवेढा
जिल्हा:सोलापूर
शाळा:ज्ञान प्रबोधन विद्यालय,सोलापूर.
pvdnyan.blogspot.in
zpschoolkandalgaon.blogspot.in
तसेच QR CODE तयार केलेला आहे .

💻 श्री प्रसादराजे सर,अकोला
versatileteachers.blogspot.in


📝श्री डाकरे जयदिप दत्तात्रय      जि.प.प्राथमिक शाळा सडादाढोली  ता.पाटण जि.सातारा       jaydipdakare.blogspot.com

🆕 श्री प्रमोद महामुनि
जि प प्रा शाळा,हिवरा,ता.भूम,जि.उस्मानाबाद
eshikshakbhoom.blogspot.com


💻 श्री सुरज शिकलगर
Z.p. school Khandobachiwadi Tal -Palus , Dist ~Sangli
http://eschool4u.blogspot.in

💻 श्री हेमंत मोरे
चाळीसगाव
प्राथमिक आश्रमशाळा राजदेहरे
 http://hemantmore444.blogspot.in

🎉 श्रीमती शुभांगी पोहरे
http://mlmpsubhashmaidan.blogspot.in/2015/10/blog-post.html

🚦श्री  मनोज पटने
जी प प्रा शाळा थड़ी पिम्पलगाव
ता. सोनपेठ जी. परभणी
http://manojpatne.blogspot.in

💾 श्री धम्मानंद बागडे,जळगाव
Zpprimaryschoolkarki.blogspot.in

🛃 श्री सुदाम साळुंके ,
शाळा पेमदरा (आणे)ता.जुन्नर जि.पुणे salunkeguruji.blogspot.in
kendraane.blogspot.in
zpschoolpemdara.blogspot.in

Sunday, 18 October 2015

महिलांच्या प्रगतीत पुरुषांची भूमिका 

विचारधारा भाग - 2
आपल्याला काय वाटत ! आपली मुले चांगली व्हावी, यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकाला वाटत,पण आपण एक सुजाण पालक म्हणून त्यासाठी काय करतो ? आज आपल्या मुलांना वयाची ३ वर्ष पूर्ण होत नाही तर आपण नर्सरी /पाळणाघरात टाकून मोकळे.आपण आपला किती आणि कसा वेळ देतो आपल्या मुलांसाठी ह्याचा कधी विचार केला का ? पोटच्या मुलांना प्रेम देण्याइतका वेळ जर आज पालकांकडे नसेल तर !! "पालक असणं वेगळ आणि सुजाण पालक होणे वेगळ" आजच्या काळात पालक होणे हे एक घडणे आहे...
बालकाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासात कुटूंब खुप जबाबदार आहेतच..
- शाम वैजनाथ स्वामी
हिंगोली

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि शिक्षण हक्क कायदा यामुळे मुलींना प्राथमिक शिक्षण होईपर्यंत फार अडचण येत नाही.खरी समस्या सुरु होते उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेताना.
         'शिकून सवरून तरी काय करणार, लग्नच तर करायचे आहे..पुरे आता शिक्षण' हा ग्रामीण भागातील पालकांचा एकमुखी आवाज मुलींच्या शिक्षणातील मोट्ठा अडसर आहे.हे चित्र सार्वत्रिक आहे..
         दहावी नंतर उच्च शिक्षणासाठी बाहेर शहरात ठेवण्यास किंवा जाणे येणे करण्यास आजही ग्रामीण भागातील पालक तयार होत नाहीत..मात्र हे चित्र बदललं पाहिजे..पालकांचाच मुलींवर विश्वास नसेल तर आपणच इतरांना तसा विचार करायला संधी देत असतो हे वास्तव पालकांनी समजून घ्यायला हवं..
शहरी भागात हे प्रमाण थोडं कमी आहे कारण शिक्षणाच्या संधी उपलब्ध असतात..पण महाविद्यालयीन शिक्षणाच्या बाबतीत शहरी पालक सुद्धा काहीसे उदासीन असतात..मुलाच्या उच्च  शिक्षणासाठी घरदार गहाण ठेवणारा पालक मुलींच्या शिक्षणाचा तितक्याच तोलामोलाने विचार करत नाही हे आजचे वास्तव आहे..
        आज शिक्षणात, नोकरीत ,स्पर्धा परिक्षांत अगदी समुद्री तळातील संशोधना पासून तर अवकाश संशोधना पर्यंत मूली कुठेच कमी नाहीत..अग्रेसरच आहेत..यावर्षीच यूपीएससी परीक्षेत भारतातून प्रथम आलेल्या पहिल्या चारही महिलाच आहेत..महाराष्ट्रातूनही अबोली नरवणे प्रथम आली आहे..त्यांच्या यशात आईवाडिलांचा मोठा वाटा असल्याचं त्या अभिमानानं सांगतात..
         पालकांनीच मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे अन तिला उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले पाहिजे..

जरुरी नहीं रौशनी चिरागों से ही  हो ,
बेटियां भी घरमे उजाला करती हैं ।।

राजेश वाघ..
जिल्हा परिषद हायस्कूल बुलडाणा

नमस्कार...

मित्रहो,
        आजच्या काळात आपणास सर्वच क्षेत्रात मुली आघाडीवर दिसत आहेत.आपणास वाटते की मुलींनी पण शिक्षणात खुप प्रगती केली आहे.  हो ! हे खरं आहे.  मुलींना देखील आज शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. संपूर्ण जगात मुंलींच्या शिक्षणाचा प्रसार वाढतोय तरी पण खंत वाटते मित्रहो , की आजही खेड्या गावांत मुलींच्या शिक्षणाकडे जाणिवपुर्वक दूर्लक्ष केल्या जात आहे. खेड्यातील पालक मुलींच्या शिक्षणाकडे विचारपुर्वक लक्ष देत नाहीत.  असे का?
मुली ह्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असताना त्याच्यावर हा अन्याय का?  मी तर म्हणतो की पालकांनी मुलींच्या शिक्षणाकडे ही जाणिवपुर्वक लक्ष दिले पाहीजे. वर्तमान कालीन पालक देखील पुर्वजांप्रमाणे मुलींचे बालवयात विवाह न करता त्यांनाही शिक्षणाची संधी द्यावी. आजही खेड्यातील पालक कॉलेज तर सोडाच हो माध्यमिक शाळेत पाठविण्यास संकोच करतात. या पालकांना आपल्या मुलींवर विश्वास नसतो का? की हे पालक मुद्दाम स्त्री शिक्षणाच्या विरोधात असतात? की हे पालक स्त्री शिक्षणाबद्दल अजाणते आहेत?  या गोष्टीचा विचार केल्यास मला वाटते

""स्त्री जन्मा ही तुझी कहाणी  ! ह्दयी अमृत नयनी पाणी""  म्हणून मला वाटतं मुलींच्या शिक्षणाबाबतीत पालकांनी विचार करावा.

  "मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी"
माझी सर्व पालकांशी एवढीच विनंती आहे की,
सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, यांचा तरी आदर्श मुलींसमोर ठेवुन आपल्या मुलींच्या शिक्षणाची दखल घ्यावी.


धन्यवाद..

संतोष गंगुलवार ,कासराळी.
हु.गो.पानसरे महाविद्यालय अर्जापुर..बिलोली.

📚📚📚📚📚📚📚📚📚

  🙏. विचारधारा भाग दोन 🙏

📚विषय ----- मुलींच्या शिक्षणात पालकांची भुमिका 📚

मुली खूप हुशार असतात !! पण त्यांना पुढे शिक्षणाची संधी मिळत नाही !! त्यांना पुढे शिकविले जात नाही !!
का ???? मुलींना शाळेत पाठविले जात नाही तर का ??
याचा आपण कधी विचार केलाय ?
हो केलाय मग कारण काय ??
कारण मुळातच स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान आहे. पण कशामुळे ? तर खालील कारणांमुळे 👇
🌀 अनिष्ट रूढी व परंपरा ,
🌀 अंधश्रद्धा व निरक्षरता,
🌀 स्वतः ला कमी लेखण्याची वृत्ती ,
🌀 पुरुषप्रधान संस्कृती .
जर आपल्याला मुलींना फुलवायचं असेल, तिला माणुस म्हणून जगायला शिकवायचं असेल तर आपणास हे आवर्जून करावचं लागेल.

👭 तिला शिक्षणाची व आरोग्याची समान संधी ,
👭 आचाराचे व विचाराचे समान स्वातंत्र्य ,
👭 आहारात व कामात समान वागणूक ,
👭 आणि महत्वाचे म्हणजे समान दर्जा ' निर्णयाचा ' द्यावा लागेल .

आणि हे सर्व शिक्षणावाचून येणार नाही. आणि मुलीच्या शिक्षणात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे "पालक". पालकांना आपल्या विचारांना कृती ची जोड द्यावी लागेल पालकांच्या सहभागानेच मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढणार, १००% पटनोंदणी होणार.
पण----------------------------------------
🔷शिक्षणात पालकांचा सहभाग कसा असावा ???
🔷सहभागाची पध्दती कोणती असावी ???
या गोष्टी ची दखल घेणे गरजेचे आहे. मुलींच्या शिक्षणात पालकांचा सहभाग हा दोन प्रकारे घेता येतो ,1⃣ शाळेबाबत 2⃣ घराबाबत

पालकांनी मुलीच्या शिक्षणाबाबत खालील भुमिका घेणे आवश्यक आहे.
🔷शाळेबाबत 🔷
👭 घरकामाचा भार मुलीवर न टाकता तिने वेळेवर शाळेत जावे याकरीता कुटूंबात जाणिव निर्माण करणे.
👭 शैक्षणिक व शिक्षणेतर उपक्रमात सहभागी होण्यासाठी संधी द्यावी जेणेकरून मुलींना भावी आयुष्यात फायदा होईल .
👭 शाळेचा अभ्यास व गुणवत्ता वाढ या संबंधी मुलींशी बोलावे.
👭 अभ्यासासाठी सक्ती व बंधने या पेक्षा समजावणे व योग्य समज देणे.
👭 मैत्रिणी कोण ? कुठे राहतात ? त्यांची कौटूंबिक माहिती काय ? यांची माहिती पालकांना असावी .
👭 शाळेशी व शिक्षकांशी वैयक्तिक संपर्क ठेवल्याने पालक समर्थ बनतात.
👭मुलींबद्दलचा संशय , गैरसमज ,राग, खोटेपणाचा आरोप टाळणे .
🔷घराबाबत 🔷
👭 मुलींना समतोल व सकस आहार देणे. शारिरीक स्वच्छतेविषयी आग्रह धरणे .
👭वेळेच्या योग्य उपयोगावर देखरेख ठेवणे .
👭 मुलींसाठी घरामधे मनमोकळे वातावरण असावे , शाळा , शिक्षक , अभ्यास इत्यादी विषयांवर खूली चर्चा करून मुलींना प्रोत्साहन द्यावे .
👭 मुलींची उपजत आवड लक्षात घेऊन छंद जोपासण्यास मदत करावी.
👭 दुरदर्शन वरील कार्यक्रम पाहण्या संबंधीचे मार्गदर्शन करावे. पालकांनी ही सर्व बंधने पाळावीत .

 🔷पालकांनी मुलींचे मित्र व मार्गदर्शक बनून
मुलींच्या शिक्षणात आपली भुमिका पार पाडावी व तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा. जेणेकरून पर्यायाने समाजाचा व राष्ट्राचा विकास साधला जाईल.🔷




👭👭👭👭👭👭👭👭👭




ज्योती बोंदरे, प्राथमिक शिक्षिका, नागपूर

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


🎯🎯 मुलींच्या शिक्षणात पालकाची भूमिका 🎯🎯


भारताची जगात एक वेगळेपण
असलेला सांस्कृतिक देश म्हणुन ओळख आहे; आज नाही तर फार पूर्वीपासूनच .
आर्यामध्ये पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था होती तरीही स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. त्यावेळी लोपमुद्रा, गार्गी, घोषा, अपाला इत्यादी विदुषी स्त्रिया होत्या.
पण नंतरच्या काळात धार्मिक व
शिक्षण क्षेत्रातून त्यांची हकालपट्टी झाली व स्त्रियांची
स्थिति खालावली.
भारतात ज्यावेळी स्त्रियांना चूल व मुल शिवाय बाहेर पडायची
परवानगी नव्हती त्याच काळात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे जोडप देवदूताप्रमाणे लोकांचा रोष पत्करून शिक्षण क्षेत्रात जोमाने कार्याला लागले. लोकांनी काही सुखासुखी हे कार्य होऊ दिले नाही; कुणी शेण  फेकले तर कुणी चिखल सुद्धा फेकले पण शिक्षण हे जणू त्यांच्या रक्तातच होत. एवढं होऊन ही त्यांनी आपल कार्यात खंड पडू दिले नाही तर उलट जोमाने सुरू ठेवले.
म्हणजे स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सूर्योदय  झाला होता असे म्हणायला काही हरकत नाही.
पण आज जगाची बदलती परिस्थिती पाहता आपण मुलींच्या शिक्षणात पालक म्हणून कितपत योगदान देतो हे
पाहणे महत्त्वाचे ठरते.
कारण आज भारतात मुलीचे शिक्षण पूर्ण न होण्याची काही कारणे आहेत.
पाहिले म्हणजे मुलीचे शिक्षण एवढे महत्त्वाचे वाटत नाही किंवा महत्त्व देत नाहीत.
मुलगी शिक्षण घेवून काय करणार, ती 10 वीच्या वर्गात जाण्याच्या अगोदरच बापाला तिच्या शिक्षणाची नाही तर लग्नाची चिंता लागते.
एक मुलगी शिकली तर तिच्या मुळे पूर्ण कुटुंब सुधारते, सुशिक्षित  होते.
घरात जुन्या चालीरीतींप्रमाणे  वातावरण ठेवले जाते. मुलाना  शिक्षणासाठी बाहेरगावी जाता येते पण मुलीना तशी परवानगी
मिळत नाही.
तिच्यासाठी घरात मोकळे वातावरण नसते एका चौकटीत
तिला वावरावे लागते. आज तसे  पाहिले  तर जवळ जवळ सर्वच  क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत.
मुलींच्या प्रगतीच्या संदर्भातील
बातम्या ऐकून, प्रगती पाहून सुद्धा पालकांच्या मनातील न्यूनगंड दूर होत नाही याला दुर्दैव म्हणावे लागेल.
राजमाता जिजाऊ, रणरागिनी राणी लक्ष्मीबाई, वयाच्या 9 व्या
वर्षापासून मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार
करणाऱ्या अहिल्याबाई होळकर
या एक आदर्श राज्यकर्त्या स्त्रिया होत्या. त्या तशा काळात
त्यांना कुणीतरी आधार दिला मार्गदर्शन केल म्हणून आज त्या
आपल्यासाठी आदर्श उदाहरण  आहेत.
आज आपल्या पाल्यांना मार्गदर्शनाची, आधाराची, त्यांना समजून घेण्याची, आदर्श उदाहरण देऊन त्यांचे मनोबल खंबीर करण्याची गरज आहे.
आज विविध क्षेत्रात भारतीय स्त्रिया आघाडीवर आहेत. जसे की चंद्रा नुई, सी ई ओ पेप्सिको,
किरण बेदी पहिली महिला आई पि एस, मायावती माजी मुख्यमंत्री उत्तरप्रदेश, जयललिता विद्यमान मुख्यमंत्री  तमिळनाडु, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,..........
अशी बरीच उदाहरण आहेत  पालकांनी (आपण सुद्धा लेख वाचनारा प्रत्येक जण) यातून बोध घेवून आपल्या पाल्यांसाठी
त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी

सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेतले तर एक उच्च दर्जाची संस्कारीत, आदर्श जीवन  जगणारी पिढी तयार व्हायला वेळ लागणार नाही.
     
            धन्यवाद....!

👤 बाबाराव रा. पडलवार
      ता. मुखेड जि. नांदेड


शिक्षण म्हणजे मुल स्वतः शिकले पाहिजे .

आपण बलजबरीने आपले विचार मुलीच्या मनावर लादु नये

पालकाने एक मार्गदर्शक म्हणून भुमिका बजावली पाहिजे.


मुलगी शिकत असताना तीला तीच्या वयानुरुप मित्र मैत्रीणी सोबत आपले मन मोकळे करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे




आपण समाजाचे देणे लागतो याची जान करुन देने
तीच्या आरोग्याची काळजी
तिच्यावर करावयाचे संस्कार



गजानन सोळंके परभणी

🌹मुलीच्या शिक्षणात पालकांची भूमिका🌹
 मित्रांनो, कोणत्याच पालकाला वाटत नाही की आपल्या मुलीने न शिकावे उलट मुलगी स्वतःच्याच पायावर उभी कशी राहील याकडेच पालकाचे लक्ष राहते. आज समाजात जी थोडीफार स्री पुरूष समानता दिसतेय ती फक्त पालकांनी आपल्या मुलीला योग्य शिक्षण देऊन स्वतःच्याच पायावर उभी केल्यामुळे दिसत आहे.असे मला वाटते .आपल्या समाजात 3500 जाती आहेत काही जाती अजूनही दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठी तर मुलीचे लग्न हीच मोठी जबाबदारी असते व ते दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात मग्न असतात.तरीदेखील आता बरेचसे पालक शिक्षणाप्रती जागरूक होत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा मुलीचाच आहे .

पंकज भदाणे नंदुरबार


📚 विचारधारा भाग 2 📚
🙍 मुलींच्या शिक्षणात पालकांची  भूमिका🙍

      विषय खुप साधा  व सोपा वाटतो पण खरच खुप विचार करायला लावणारा की  "मुलींच्या शिक्षणात पालकांची भूमिका"!!!

 जिच्या  जन्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो "ती" च्या शिक्षणाचा विचार तर खुप दूर राहिला. "नकोशी" अशी '"ती"....तिला काय शिकवणार हा समाज ????
       आज काळ थोडा बदलला  आहे (?), असे जरी असले तरी मुलींच्या शिक्षणाबाबत ची उदासीनता तितक्या प्रमाणात कमी झाली असे नाही. मुलभुत अधिकाराच्या नावाखाली  मुलींना प्राथमिक शिक्षण मिळते पण पुढे काय ?? तिच्या शिक्षणविषयी आवडीचा विचार करणारे फार कमी आढ़ळतील. याला कारण केवळ पालकांची उदासीनता नाही तर संपूर्ण समाजाची उदासीनता म्हणणे उचित ठरावे.
       ज्या प्रमाणे समाजात विविध घटना घड़तात , तसेच समाजाची मुलीबाबतची  संकुचित विचार प्रवृती ही बदलत नाही तो पर्यंत मुलींच्या शिक्षणाचा मार्ग हा खड़तरच राहील असे मला वाटते. मुलींच्य्या शिक्षणात पालकांबरोबर  समाजाची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे .समाजातील घडमोडीचा परिणाम हा आपल्या दैनंदिन जीवनवर होत असतो , बहुतेक त्यामुळेच की काय मुलींच्य्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असवा.
त्याच बरोबर आपली परंपरा, पालकांची आर्थिक परिस्थिती ही देखील महत्वाची कारणे आहेतच "ती" च्या शिक्षणात अडथळा निर्माण करणारी..
      पण मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांची शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी वयाची मर्यादा असावी ???? त्या लग्नानंतर शिकु शकत नाहीत का ?  जर महात्मा ज्योतिबा फूलेनी त्यांच्या पत्नीला शिकवले व त्या "सावित्रीबाई" देशाच्या पहिल्या शिक्षिका ठरल्या ... त्या प्रमाणे समाजात अजुन ज्योतिबा फुले निर्माण का नाही होत ? मुलींच्या  शिक्षणात पालकांची भूमिका फार महत्वाची आहेच पण जर आजच्या काळात त्याना आपले भवितव्य घड़वायचे असेल तर त्याना त्यांच्या जोड़ीदाराची देखील "साथ" मिळणे तितकेच महत्वाचे वाटते...


सौ.वैशाली रविंद्र गर्जेपालवे
D.ed,B.A,B.ed,M.A,B.sc(2 nd year)*
शहापुर,ठाणे
 
    शेवटी पद्व्या लिहिन्याचा एकच हेतु की  मी लग्नान्तर अजुन शिकते त्या प्रमाणे आपण हि आपल्या जोडीदाराच्या शिक्षनाच्या आवडीचा जरूर विचार करवा. तरच बहुतेक  आपण  "ती" च्या शिक्षणात केवळ पालकांची भूमिका महत्वाची नसून आपण ही थोडा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करावा अशी अभिलाषा!!!!!
🙏🏻धन्यवाद🙏🏻

गावाला शाळेचा अभिमान असावा 

Saturday, 17 October 2015

तस्मै श्री गुरवे नम:

कालच आपण सर्वत्र शिक्षकदिन मोठय़ा थाटात साजरा केला. 'गुरूब्रम्हा, गुरूविष्णू, गुरूदेवो महेश्‍वर: गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला खूप मोठे आदराचे स्थान आहे. गुरूमुळे जीवनातील अंधकार नाहीसा होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरतो. म्हणूनच पुरातन काळ म्हणजे रामायण व महाभारताच्या काळापासून गुरूला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या काळातील राजे-महाराजे गुरूच्या सल्ल्याशिवाय पुढील मार्गक्रमण ठरवीत नसत. राजे गुरूंना आदर व सन्मान देत असत त्यामुळे राज्यातील जनता सुद्धा त्यांचा आदर करीत असत. गुरूच्या मनाविरूद्ध वागल्यास गुरू क्रोधीत होतील,त्यांना संताप येईल आणि रागाच्या भरात शाप देतील अशी भिती सुद्धा लोकांच्या मनात होती. याचाच अर्थ समाजात गुरूचा फार मोठा दबदबा होता. त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी करून घेण्याची कला राजा जवळ असणे आवश्यक होती. त्याकाळात गुरूगृही जाऊन विद्या शिकण्याची पद्धत होती ज्यास 'गुरूकूल' पद्धत असे संबोधल्या जाई. परंतु या गुरूकूल मध्ये काही ठराविक लोकांनाच विद्यादान केल्या जात असे. कारण द्रोणाचार्य गुरूंनी एकलव्यास विद्या शिकविण्यास नकार दिला होता परंतु त्याच्या गुरू भक्तीमुळे त्याला ज्ञान मिळविता आले. याचा एक अर्थ आपण असा काढू शकतो की, त्याकाळी सुद्धा गुरूंना शासनाचेच (राजांचे) ऐकावेच लागत असे. राजाच्या परवानगी शिवाय राजगुरूला कोणालाही शिकविता येत नव्हते.

कालाय तस्मै नम: नुसार काळ बदलत गेला आणि त्या अनुषंगाने समाज सुद्धा बदलत गेला. गुरूच्या घरी जाऊन शिकण्याच्या पद्धतीत हळूहळू बदल होत गेला. गुरूची जागा शिक्षकाने घेतली. समाजात आज वेगवेगळया क्षेत्रात वेगवेगळे प्रकारचे गुरू आहेत. मात्र समाजाचा सर्वात जास्त विश्‍वास ज्या गुरूवर आहे तो म्हणजे शिक्षक. परिस्थितीनुसार काळ बदलत राहतो आणि काळानुरूप परिस्थिती बदलते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले, त्यांना शाळेतला गुरू लाभलाच नाही तर ते एवढे मोठे साहित्यिक कसे झाले? गुरूदेव रविंद्रनाथ टागोर एक दिवस शाळेत जाऊन एवढे महान कवी कसे बनले? कवयित्री बहिणाबाई चौधरी एकही दिवस शाळेत न जाता प्रसिद्ध साहित्यिक कसे बनू शकल्या? तर त्याचे उत्तर आहे अनुभव. त्यांचा गुरू होता अनुभव आणि विलक्षण बुद्धीमत्ता यामुळे ते शक्य झाले. परंतु आपण सामान्य असलेले व्यक्ती आपणाला पदोपदी मार्गदर्शन करणारे, दिशा देणारे आणि रस्त्यावरून चालवत नेणार्‍या गुरूची गरज भासते. गुरूविना आपले जीवन अपूर्ण आहे.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे सांगणारे महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा अपार कष्ट सोसले. लोकांकडून त्यांचा खूप छळ केला गेला पण त्यांनी शैक्षणिक काम थांबविले नाही. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यात फुले दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपणास गाव तेथे शाळा बघायला मिळत आहे.

मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असे सध्या जे बोलल्या जात आहे ते महात्मा फुलेंनी सन १८८२ मध्ये हंटर कमिशनच्या समोर दिलेल्या साक्षी मध्ये म्हटले जाते. परंतु त्यांना त्याकाळी अनेक वाईट प्रसंग आणि अनुभवास तोंड द्यावे लागले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली परंतु त्या ठिकाणी श्किविण्यासाठी कोणीच तयार होईना. शिकविण्याचे काम बर्‍याच जणांना तुच्छतेचे वाटत असे. तसेच शिकविण्याचे काम हे येड्यागबाळ्याचे नाही. त्यासाठी खूप मोठी विद्या जवळ असावी लागते असा समज होता. परंतु जोतिबांनी आपल्या निरक्षर पत्नीला म्हणजे सावित्रीबाईला शिकविले आणि देशातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान दिला. समाजात गुरूला कोणत्या संकटाला, त्रासाला तोंड द्यावे लागत होते याची प्रचिती यावरून आपणाला येते. समाजात हळूहळू शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. शिक्षणाचे महत्व लोकांना कळू लागले. देशातील नेते आणि पुढारी समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगू लागले. शिक्षणाविषयी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.' त्याच सोबत ते लोकांना स्वत:चा समाजाचा विकास करायचा असेल तर 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र दिला. त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर श्क्षिणाचा खेडोपाडी दरी खोर्‍यात प्रसार केला. शाळा तर उघडल्या जात होत्या मात्र त्यांना शिकविण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. सन १९९0 च्या दशकापर्यंत मुलांना शिकविण्यासाठी 'शिक्षक' म्हणून नोकरी करण्यासाठी पुढे येणार्‍यांची संख्या फारच कमी होती. कारण या काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजलं जात असे. त्यामुळे सहसा कोणी पुढे येत नव्हते. जे शिक्षक म्हणून काम करीत होते ते कधी तिकडे व्यवसाय म्हणून पाहिले नव्हते. ती त्यांची एक प्रकारे सेवा होती. असा त्यांचा स्वभाव होता.

निस्व:र्थ म्हणता येणार नाही परंतु जेवढे मिळते तेवढय़ावर समाधान मानून सेवाभावी मनाने काम करणारी शिक्षक मंडळी समाजात मानाचे स्थान मिळवून गेले.

आज शाळेतील शिक्षक मंडळी तणावाखाली वावरत आहेत असे म्हटले तर शिक्षकी पेशा सोडून जी मंडळी आहे त्यांना हसू येते आणि विनोदबुद्धी सुचते. मात्र जे या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना हे सत्य आहे असे वाटेल. शाळेमधून मुलांवर संस्कार करण्याचे काम शिक्षकांनी करणे खरे तर आवश्यक आहे. मात्र किती शाळेतून मुलांवर संस्कार केले जातात. याची चाचपणी केल्या जात नाही. कारण आज त्यांना अभ्यासक्रमासमोर संस्कार काहीच वाटत नाही. येथूनच समाज रसातळाला जाणे प्रारंभ झाली म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. समाजात आज सुद्धा तस्मै श्री गुरवे नम: ची खरी गरज आहे. फक्त शिक्षक दिन आले म्हणून शिक्षकांचा सन्मान किंवा सत्कार न करता या दिवसांसारखे रोजच त्यांना सन्मान देणे खरेच गरजेचे आहे असे वाटते.

नागोराव सा. येवतीकर
मो. ९४२३६२५७६९
तस्मै श्री गुरवे नमः 

दैनिक देशोन्नती च्या फन क्लब पेज वर माझे शब्द शोध क्रमांक 02 प्रकाशित झाले आहे. ते कोडे खालील उपक्रम मधून तयार झाले

@ मराठी शब्दसंपत्ती वाढविण्याचा उपक्रम @

मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी मी घेतलेला एक छोटा सा उपक्रम ज्यामुळे मुले उत्साही तर झालीच शिवाय त्यांना मराठी भाषेतील समान अर्थी शब्दाची ओळख ही झाली

**** रीत : सर्वात पहिल्यांदा वर्गातील मुलांना " आज आपण एक खेळ खेळूया " अशी सुरुवात केल्यास मुले प्रोत्साहित होतील आणि आपणास प्रतिसाद मिळेल. ज्या वेळी मुले अभ्यास करून खूपच कंटाळून जातात त्यावेळी या खेळाचा वापर केल्यास त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतात. खेळाची सुरुवात " शब्दांच्या शेवटी - - - - येणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा." मुले त्यांना माहीत असलेले खूप शब्द लिहतिल. ते सर्व उत्तरे स्विकार करावे.

**** त्यात सुधारणा काय करावी ?
असे शब्द लिहिल्यानंतर " आत्ता तुम्हांला ज्या शब्दाचा समान अर्थी म्हणजे त्याच शब्दाचा दुसरा अर्थ माहीत आहे ते लिहा. " मुले त्यांना माहीत असलेल्या शब्दाचे समान अर्थी शब्द लिहतिल, यामुळे त्याचे समान अर्थी शब्दाचे दृढीकरण करून घेता येईल. आणि ज्या शब्दाचे समान अर्थी शब्द मुलांना लिहिता आले नाही ते समान अर्थी शब्द आपण सांगायचे. वर्गातील सर्व मुलांच्या शब्दाचे संकलन करून आपण आपला नवीन मराठी शब्द कोश तयार करता येवू शकेल.

**** कोडे कोणी सोडवावे :
वरील कोडे शाळेतल्या मुलांकडुन किंवा आपल्या घरातील शालेय मुलांकडुन सोडवून घेण्याचा प्रयत्न करा. इयत्ता 4 थी ते10 वी या वर्गात खूपच प्रतिसाद मिळेल याची मला खात्रीआहे.

**** प्रतिसाद द्यावे :
तेंव्हा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला किंवा काय समस्या उद्भवल्या हे माझ्या पर्सनल अकाउंटवर पोस्ट करायला विसरू नका.पोस्ट टाकते वेळी मात्र आपले नाव व शाळेचे नाव टाकण्यास विसरू नका.
nagorao26@gmail.com या ई मेल वर किंवा+919423625769 या whatsapp क्रंमाकावर आपल्या प्रतिक्रिया पाठवावे.


पर्यावरण आणि मानवी जीवन 

** मराठीच्या विकासासाठी हे करू या . . . . . .

** उपक्रमशील शिक्षकाचे नाव **
नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली
ता. धर्माबाद जि. नांदेड

** मराठी - व्याकरण **

** तुम्हांला माहीत असलेले शब्द शोधा ज्यात शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावी **
- - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
** शाळेतल्या विद्यार्थ्याकरिता हा एक उत्तम उपक्रम असून यातून मराठी शब्द शुध्द लिहिण्याचा सराव होतो. हा एक शाब्दिक खेळ आहे, ज्यात मुले स्वतःहून शब्द शोधण्यास प्रारंभ करतात. त्यांना शब्द शोधण्यासाठी आपण फक्त मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

** या खेळाचा उपयोग काय होतो ?  तर मुलांना शब्दाची अचूक ओळख होते आणि मराठीत काही मोजकीच शब्द वगळले तर सर्व शब्द ज्याच्या शेवटचे अक्षर क आहे त्यापूर्वीच्या अक्षरांवर पहिली वेलांटी येते हे मुलांना तात्काळ समजण्यासाठी मदत होते.

** अश्याच छोट्या छोट्या उपक्रम व खेळातून मुलांना मराठीच्या शब्दाची ओळख करून देता येईल.

** शब्दाची यादी तयार करण्याचे काम अर्थातच विद्यार्थ्याना लावले तर अजून मजा येईल. यादी तयार करीत असताना पाठ्यपुस्तक वापरणे बंधनकारक करावे. शब्द अंदाजे लिहू नये. शुद्ध शब्द लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तक वापरण्याचा आग्रह धरल्यास मुले अचूक शब्द लिहितिल अन्यथा पुन्हा चूका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

** हा उपक्रम आपण तिसऱ्या वर्गपासून घेता येवू शकतो.

** हा उपक्रम खालील प्रकारात विभागणी करून यादी तयार करावी.

* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे तीन अक्षरी शब्द शोधा -
* उदा. - आर्थिक
*************************************
. . शब्द शोध क्रमांक 09. .                                   
                      -  नागोराव सा. येवतीकर
*************************************
शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे तीन अक्षरी शब्द शोधा

01. दररोज प्रकाशित होणारे . [  ] [  ] [  ]
02. पंधरा दिवसांतून. . . . . .  [  ] [  ] [  ]
03. महिना एकदा होणारे . . . [  ] [  ] [  ]
04. वर्षातून एकदा होणारे . . .[  ] [  ] [  ]
05. देशाचे रक्षण करणारे. . . [  ] [  ] [  ]
06. हीरे, मोती . . . . . . . . .  [  ] [  ] [  ]
07. क्षणापुरते . . . . . . . .  .  [  ] [  ] [  ] 
08. मिसळण, बेरीज . . . . . . [  ] [  ] [  ]
09. नाव चालविणारा .  . . . . [  ] [  ] [  ]
10. देवास मानणारा .  . . . . .[  ] [  ] [  ]
*************************************
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे चार अक्षरी शब्द शोधा -
उदा. - सामाजिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे पाच अक्षरी शब्द शोधा -
उदा. - राजनैतिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे सहा अक्षरी शब्द शोधा -
उदा. -  नियतकालिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
प्रत्येक प्रकारात आपण भर टाकावी
चला तर मग . . . . . . . . .
आपण शब्द शोधू या आणि आपली व आपल्या विद्यार्थ्यांची मराठी शब्दसंपत्ती वाढवू या.
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
नोट : -
** हा खेळ तुम्हांला कसा वाटला . . ?
** विद्यार्थ्यांनी कसा प्रतिसाद दिला . . . . ?
** या उपक्रमाचा काही फायदा आपणास झाला काय . . . ? किंवा
** या उपक्रमात काही त्रुटी, कमतरता, चुका असल्यास, वा काही बदल करावा असे आपणास वाटत असेल तर . . . . . . .
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
जरूर आपले मत व्यक्त करावे. आपल्या अभिप्रायाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद.
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
आपले मत येथे व्यक्त करा
** nagorao26@gmail.com
** 9423625769

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती पो. येताळा
  ता. धर्माबाद जि. नांदेड
  पिन 431809

** प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे ** 

* उपक्रमाची प्रस्तावना -
प्रश्न म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठ्या  पडतात. प्रश्नाचे उत्तर देतांना अनेकांच्या नाकी नऊ येते. प्रश्नाचे उत्तर आठवत नसले की, मन कसे अस्वस्थ होते आणि त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी शोधाशोध सुरू होते, याबाबतीत जे जाणकार किंवा तज्ञ असतील अश्या काही मित्रांना या प्रश्नांच्या उत्तराबाबत चौकशी केली जाते. बहुतांश वेळा विद्यार्थ्याना पाठ समजलेला असतो मात्र प्रश्नाचे उत्तर सांगता येत नाही आणि सांगता येत नसल्यामुळे लिहिता येत नाही ही समस्या प्राथमिक शाळेत फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. विद्यार्थ्याची ही समस्या कशी  सोडविता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर चटकन कसे सांगतील आणि लिहितिल यांसाठी मी सातव्या वर्गातील एकूण 50 विद्यार्थ्याना डोळ्यासमोर ठेवून सदरील उपक्रमाची निवड केली.

** उपक्रमाचे नाव : -  प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे
या उपक्रमाची सुरुवात करीत असताना विद्यार्थ्याना या उपक्रमाची तोंडओळख द्यावी जेणेकरून विद्यार्थ्याना याची संपूर्ण माहिती होईल. उपक्रमाची ओळख झाली तरच उपक्रम यशस्वी होते अन्यथा हा उपक्रम फक्त हुशार विद्यार्थ्यानाच फायदेशीर ठरेल.
सर्वप्रथम विद्यार्थ्याना पाठाचे अध्यापन करावे आणि पाठातील छोट्या छोट्या प्रश्नांची ओळख द्यावी. प्रश्न आणि उत्तर विद्यार्थ्याच्या वहीत लिहिण्यास सांगावे. पाठ पूर्ण संपल्यावर सर्व प्रश्न एकत्र करावे आणि ते सर्व प्रश्न परत एकदा वर्गात सर्वाना विचारून उत्तराचा सराव करावा. यामूळे विद्यार्थ्याना प्रश्न आणि उत्तराची पूर्ण ओळख होईल. या प्रक्रियेनंतर मग या उपक्रमाला सुरुवात करावयाचे आहे.

*** उपक्रमाची कृती : -
पाठ शिकविणे पूर्ण झाल्यानंतर ज्या प्रश्नांची आपण यादी केली किंवा विद्यार्थ्याना वहीत लिहिण्यासाठी सांगितलेले ते सर्व प्रश्न जाड कागदावर खालीलप्रमाणे लिहावे. यांसाठी लग्नपत्रिकाचा वापर टाकाऊ पासून टिकाऊ म्हणून करता येईल. मराठीसाठी M, पाठ पहिला म्हणून 1 आणि या पाठातील प्रश्नांचे अनुक्रमांक 1 ते पुढील . . . . . असे वरच्या भागावर नमूद करून प्रश्न पट्टी तयार करावी. उदा.
---------------------------------------------------------------------
l M/1/1
l कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन कोण करीत असत ?                               
उत्तर : विष्णू वामन शिरवाडकर
---------------------------------------------------------------------

त्या पाठातील एकूण अश्या प्रश्न पट्टी तयार कराव्यात.  विद्यार्थ्याना ते प्रश्न क्रमाक्रमाने विचारावेत.
* पहिल्यांदा पाच प्रश्न सलगपणे वर्गातील हुशार विद्यार्थ्यास विचारावे.
* हुशार, मध्यम आणि अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्याना याच क्रमाने प्रश्न विचारावे.
* संपूर्ण वर्गात या पध्दतीने प्रश्न विचारले तर सर्व विद्यार्थ्याना त्या प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ होऊन जातील.
* आत्ता आपण हा उपक्रम खेळाच्या स्वरूपात मुलांसमोर घेऊन जाण्यास तयार आहोत.
* एक डबा घ्यावा त्यावर दर्शनी भागावर  विषयाचे नाव " मराठी " असे लिहावे. त्यात सर्व प्रश्न पट्टी टाकाव्यात एक मुलगा आणि एक मुलगी या क्रमाने विद्यार्थ्याना समोर बोलाविले जाऊन त्याना प्रश्न पट्टी उचलण्यास सांगावे.
* सुरुवातीला ती प्रश्न पट्टीचे शिक्षक वाचन करतील आणि विद्यार्थ्याना उत्तरे सांगण्यास प्रोत्साहित करतील
* यात पुढे बदल करून जो विद्यार्थी प्रश्न पट्टी उचलण्यास समोर येईल तो वर्गातील सर्व विद्यार्थ्याना प्रश्न विचारेल.
* प्रश्नपट्टी वर उत्तर लिहिलेले असल्यामुळे समोर आलेल्या विद्यार्थ्याना उत्तर माहीत असेल. मुलांनी प्रश्नांची उत्तर बरोबर दिली असेल तर हे उत्तर बरोबर आहे असे सांगून विद्यार्थी जागेवर बसतील.
* या क्रमाने संपूर्ण वर्गाला एक प्रश्न विचारण्यास संधी मिळते आणि विद्यार्थ्याना प्रश्न उत्तराचा सराव होऊन सर्व प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ होतात.
* प्रश्नांची उत्तरे सांगता आली की विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यासाठी आत्ता विद्यार्थ्याना प्रश्नांची उत्तरे लिहिता आली पाहिजे असे वाटणे साहजिक आहे.
* यांसाठी डब्यातुन शिक्षकांनी प्रश्नपट्टी उचलावी त्याचे वाचन करावे आणि मुलांना फक्त उत्तरे लिहिण्यास सांगावे.
* एका वेळी पाच प्रश्न देऊन त्याचे उत्तर विद्यार्थ्याना आपापसात वही बदलून तपासून घेण्याची सूचना द्यावी.
* त्या पाच प्रश्नांची उत्तरे परत एकदा शिक्षकांनी सांगावे.
* ज्या विद्यार्थ्याचे पाचही उत्तरे बरोबर आली त्या विद्यार्थ्याची वर्गात सर्वांसमक्ष अभिनंदन करावे.
* अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्याचे पाचपैकी एक जरी बरोबर आले असेल तरी त्यांचे अभिनंदन करावे आणि प्रोत्साहन द्यावे, शाबासकी द्यावी.
* यापुढील पायरी म्हणजे याच प्रश्नांवर आधारित 20 गुणांची सराव परीक्षा घेण्यात यावी आणि त्याना किती प्रश्न परीक्षेत आठवतात यांची चाचपणी करावी.
* शक्यतो हा उपक्रम दिवसाच्या शेवटच्या दोन तासिकेत घ्यावे. म्हणजे विद्यार्थ्याना मनोरंजनासोबत अभ्यास ही होईल.
* ज्या दिवशी विषय शिक्षक उपस्थित नसेल त्या दिवशी इतर शिक्षकाची त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली जाते.
* त्या शिक्षकांना प्रश्न पडतो की काय शिकवावे ?
* पण या उपक्रमाने त्यांचा प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. प्रश्न पट्टीवर प्रश्न आणि उत्तर लिहील्यामुळे कोणालाही हा उपक्रम अगदी सहजरित्या घेता येऊ शकेल.
* य उपक्रमाचा फायदा असा आहे की विद्यार्थ्याना पाठावरील सर्व प्रश्नांची उत्तरे चटकन आठवण येतात आणि त्यांच्या आकलनशक्तित वाढ होते. प्रश्नांची उत्तरे आल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी सुध्दा स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करतात
* या उपक्रमांत एकच उणीव किंवा त्रुटी दिसून येते ते म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताना वेळ खूप लागतो आणि आपल्याकडे त्याचीच कमतरता असते.
* मात्र विद्यार्थ्याना या खेळात खूपच मजा येते. विद्यार्थी वारंवार हे उपक्रम घेण्याबाबत हट्ट करतात यावरून या उपक्रमाची सफलता नक्की दिसून येते.
*** प्रतिसाद . . . . . . . . .
आपण ही हा उपक्रम आपल्या शाळेत सुरू करावा आणि आपणांस काय वाटले ? विद्यार्थ्याचा प्रतिसाद कसा मिळाला ? विद्यार्थ्याची प्रगती झाली का ? किंवा या उपक्रमात काही बदल करावा असे आपणांस वाटत असेल तर आपले अभिप्राय नक्की कळवावे.

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक,
जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली
ता. धर्माबाद जि. नांदेड
nagorao26@gmail.com
9423625769

पालक नव्हे ; मित्र बना 

शाळा व्यवस्थापन समितीची आवश्यकता 

** आधी वंदू तुज मोरया . . .



वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा

मुलांनो,आपल्या सर्वाचा लाडका देव म्हणजे गणपती बाप्पा. देव कसला तुम्ही तर त्यांना माय फ्रेंड गणेशा असे म्हणता. पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिल्यामुळे गणेशोत्सव कधी एकदा येतो याची आपणाला उत्सुकता लागलेली असते. प्रत्येक शुभ कार्यात मग तो लग्न समारंभ असो वा  लक्ष्मीपूजन असो, कोनशिला समारंभ असो वा  वास्तू शांती असो की सत्यनारायणाची पूजा असो त्यात सर्वसाधारपणे सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. म्हणूनच श्री गणेशाला आद्य दैवत म्हटले जाते. हिंदू धर्मातील लोकांच्या उंबरठय़ाकडे लक्ष दिल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे घराच्या  चौकटीतील वरच्या आडव्या लाकडी फटीवर श्री गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते. त्याशिवाय घराला घरपण येत नाही. ज्यांच्या घराच्या चौकटींवर श्री गणेशाची मूर्ती नाही असे घर शोधून सुध्दा सापडणार नाही. घरातून बाहेर पडताना आपण कोणत्या कामांसाठी बाहेर जात आहोत ?  स्वार्थासाठी की निस्वार्थ कामांसाठी जात आहोत यांची नोंद चौकटींवर विराजमान असलेले श्री गणेशा करतात, असे पुराणात सांगितले आहे. त्याचमुळे घराबाहेर पडताना वडील मंडळी विशेष करून महिला नेहमीच चौकटीचे दर्शन घेतांना आढळून येतात व ठरविलेले काम वेळेत पूर्ण होवो अशी प्रार्थना श्री गणेशाजवळ करतात.
तसे पाहिले तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला घरात श्री गणेशाची पूजा केली जाते. मात्र भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला घराघरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून विधिवत त्यांची पूजा केली जाते. याच दिवसाची आबाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आतुरतेने वाट पाहतात.  हत्तीचे सोंड असलेले तोंड, सुपासारखे मोठे कान, बारीक डोळे, अगडबंब पोट आणि त्याचा लहानसा वाहन मुषकराज या सर्वाविषयी आपल्या मनात कमालीची उत्सुकता असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घरोघरी श्री गणेशाची स्थापना केली जात असे असा उल्लेख इतिहासात आढळते. भारतीय असंतोषाचे जनक आणि जहाल नेते लोकमान्य टिळकांनी इंग्रजाच्या जुलमी राजवटीविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, लोकांत एकता आणि एकात्मतेचे वातावरण तयार व्हावे म्हणून सन 1890 च्या दशकात श्री गणेशाच्या घराघरातील उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची सन 1894 मध्ये स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केली.  तेंव्हापासून आजतागायत आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू लागलोत. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केली तो उद्देश आज सफल होत आहे काय ? यांचा विचार करण्याची वेळ आपणावर आलेली आहे. या दिवसांत " गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया " या गीतांने सर्वत्र चैतन्यमय वातावरण होऊन जाते. तेंव्हा बोला एकदाचे गणपती बाप्पा $$$$ मोरया $$$$$$.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
nagorao26@gmail.com

नमस्कार मित्रांनो ,
मी नागोराव सा. येवतीकर
अभिमानाने आपणासाठी घेऊन आलोय....

माझ्या ब्लॉगचे GOOGLE PLAY STORE APP जेथुन तुम्हाला browser मध्ये जाऊन ब्लॉग open करण्याची आवश्यकता भासणार नाही.

वेळ कमी आहे ,चटकन ब्लॉग open करायचाय, browser त्रास देतंय....तर मग Na.Sa. हे app open करा व ब्लॉग वरील प्रमुख पोस्टस चा आनंद लुटा...

app पुर्णपणे free असुन केवळ 224kb चे आहे .म्हणजे मेमरीची चिंता करायची गरजच नाहि.
     Na.Sa. हे app डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा....

http://app.appsgeyser.com/Na.%20Sa.

यासोबतच पुढिल लिंकला क्लिक करुन ही डाउनलोड करु शकतात .....

 http://www.appsgeyser.com/2213717

फक्त install लिंकला क्लिक करा व डाउनलोड करा.

   
हे  app आपणांस कसे वाटले ? हे मला माझ्या मोबाईलवर सांगायला विसरु नका.

धन्यवाद आपलाच नासा

Saturday, 10 October 2015


 ** अल्प परिचय **

🌹** नाव : नागोराव सा. येवतीकर

🌷** पत्ता : मु. येवती पोस्ट येताळा
            ता. धर्माबाद जि. नांदेड

🏡** व्यवसाय : प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद हायस्कूल,करखेली
            ता. धर्माबाद जि. नांदेड

🌹जन्मदिनांक : 26 एप्रिल 1976

मोबाईल : 9423625769

📕📗📘📙📓📔📒📚📖✏✒

छंद : शालेय जीवनापासुनच लिखाण करण्याची फारच आवड त्यामुळे विविध वर्तमानपत्र, दैनिक, साप्ताहिक, मासिकात वैचारिक लेख लिहिण्याचा छंद आहे. जीवन-शिक्षण या शैक्षणिक मासिकातून सुध्दा यापूर्वी लेख प्रकाशित झाले आहेत. सध्या दैनिक लोकपत्रच्या दर सोमवारी ऑफ पिरियड सदराखाली क्रमशः लेख प्रकाशित होत आहेत, ज्यात शैक्षणिक विषयी विचार मांडत असतात.  लहान मुलांसाठी सुध्दा छोटेखानी लेख लिहितात तसेच त्याना मनोरंजनातून शब्दसंपत्ती वाढवी यांसाठी विविध मनोरंजक शब्दकोडे तयार करतात.  जे की दर रविवारी दैनिक देशोन्नतीच्या फनक्लब पेज वर गेल्या दीड वर्षापासुन क्रमशः  प्रकाशित होत आहे. विद्यार्थ्यांना सतत कामात व्यस्त ठेवण्यासाठी विविध उपक्रम तयार करतात आणि त्यां उपक्रमाच्या माध्यमातून शिकविण्याचा प्रयत्न असतो.
धन्यवाद . . . . . . . !

** लेख :  जनतेचा आधार **
महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली या गावापासून भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत २९ सप्टेंबर २०१० रोजी आधार कार्ड योजनेला सुरुवात करण्यात आली. याच गावातील रंजना सोनवणे हिला देशातील पहिले आधार कार्ड समारंभपूर्वक कार्यक्रमात वाटप करून आधार योजनेची मुहूर्तमेढ साधण्यात आले. आधार कार्डची निर्मिती कशी झाली ? ही माहिती खूपच रंजक आहे.
सन १९९९ च्या कारगील युद्धानंतर के.  सुब्रह्मण्यम यांनी देशाच्या सुरक्षिततेबाबत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ७ जानेवारी २००० रोजी एक अहवाल सादर केला. ज्यात म्हटले होते की, सीमावर्ती भागात राहणार्या लोकांना विशेष ओळखपत्र देण्यात आल्यास भारतात वाढत चाललेली घुसखोरी थांबविता येऊ शकेल. त्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या अहवालाचा अभ्यास करून " बहुउद्देशीय भारतीय ओळखपत्र " या नावाने ओळखपत्र वाटप सुरू करण्याची घोषणा केली. सर्वात पहिल्यांदा सीमावर्ती भागातील लोकांना या ओळखपत्राचे वाटप करून त्यानंतर देशात सर्वत्र वाटप केला जावा असे ठरविण्यात आले. अर्थात आधार कार्डची बीजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पडली होती असे दिसून येते. कदाचित याच घटकाचा विचार करून डॉ. मनमोहन सिंग सरकारने आपल्या कारकिर्दीत आधार संकल्पना पूर्णत्वास नेली असावी असे वाटते. देशातील संपूर्ण नागरिकांना एकच क्रमांक देण्यात यावा आणि देशात कुठेही त्याला स्वत:ची ओळख देता यावी म्हणून शासनाने फेब्रुवारी २००९ मध्ये आधार कार्ड योजनेची संकल्पना तयार केली. या योजनेवर काम करण्यासाठी व याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नंदन निलकेनी यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली. ही जबाबदारी त्यांच्यावर जून २००९ मध्ये सोपविण्यात आली होती. याचाच अर्थ आधार कार्डचे प्रणेते म्हणून आज आपण त्यांचेच नाव घेतो. खरोखरच त्यांनी अथक परिश्रम घेऊन आधारकार्ड लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. या आधार कार्डावर व्यक्तीला बारा अंकी कोड दिल्या जातो. ज्या आधारावर त्याची संपूर्ण माहिती जसे की, संपूर्ण नाव, रहिवाशी पत्ता, डोळ्याची प्रतिमा, दहा बोटांचे ठसे, इतर काही माहितीचा यात समावेश करण्यात आलेला आहे. सदरील योजना प्रत्यक्षात राबविण्यापूर्वी श्रीकांत नथामुने, सलिल प्रभाकर, आर. एस. शर्मा, प्रमोद वर्मा, व्हॅले वाडे इत्यादी तज्ज्ञ लोकांनी यात अथक परिश्रम घेऊन त्या आधार कार्डाला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले आहे. या योजनेचा लोगो अतुल सुधाकरराव पांडे यांनी तयार केला असून ज्यावरून निरक्षर व्यक्तीलाही प्रथम दर्शनी पाहिल्याबरोबर त्याची ओळख होते. सन २०१७ पर्यंत भारतातील सर्व जनतेची स्वत:ची ओळख होण्यासाठी व १८० लक्ष कोटी रुपये अंदाजीत खर्च अपेक्षित धरून आधार योजना तयार करण्यात आली. त्या अनुषंगाने सन २००९-१० या वर्षात २६.२१ कोटी, २०१० - ११ मध्ये २६८.४१ कोटी, २०११-१२ मध्ये११८७.५० कोटी, सन २०१२-१३ मध्ये १३३८.७२ कोटी, २०१३-१४ मध्ये १५४४.४४ कोटी आणि २०१४-१५ मध्ये १६१५.३४ असे एकूण ५९८०.६२ कोटी रु. गेल्या पाच-सहा वर्षांत खर्च झाल्याची आकडेवारी प्रसिध्द झाली आहे.२१ ऑगस्ट २०१५ रोजी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील ९० कोटी लोकांना या आधार कार्डाचे वाटप करण्यात आले. जे की, एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के आहे. म्हणजे अजून ३० टक्के लोकांना विविध कारणांमुळे आधार कार्ड प्राप्त झाले नाही. महाराष्ट्राचा विचार करता येथील एकूण लोकसंख्या ११ कोटी २३ लाख आहे. त्यापैकी ९ कोटी ७८ लाख लोकांना आधार कार्ड वाटप करण्यात आले म्हणजे ८१ टक्के लोकांना आधार कार्ड मिळाले असून अजून १९ टक्के लोक या आधार कार्डपासून वंचित आहेत. आंध्रप्रदेश व केरळमध्ये आधारकार्ड सर्वात जास्त वाटप करण्यात आले. त्या खालोखाल तेलंगणा, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, गोवा, पाँडेचरी, चंदीगड, सिक्कीम, लक्षद्वीप या प्रदेशाचा क्रमांक लागतो. मेघालय व आसाम या प्रदेशात आधार कार्ड खूप कमी प्रमाणात वाटप करण्यात आले. आधार कार्ड लोकांना वाटप न होण्यामागे विविध कारणे आहेत.आधार कार्ड काढणार्या केंद्राची संख्या कमी असणे हे एक प्रमुख कारण त्यात समाविष्ट आहे. नोंदणी केलेल्या व्यक्तींना ३-४ महिने आधार कार्ड न मिळणे हे ही एक कारण आहे. ज्यावर्षी टेंभली गावात आधार कार्ड वाटपाचे उद््घाटन करण्यात आले. त्यावर्षी ग्रामीण भागात ही हे केंद्र जोमाने चालू करण्यात आले होते. मात्र नंतर माशी कुठे शिंकली माहित नाही. या केंद्राने आपला गाशा गुंडाळला तो आजतागायत. ग्रामीण भागात आधार कार्ड केंद्र उघडले नाही. त्यामुळे बरीचशी मंडळी ईच्छा असून सुद्धा आधारकार्ड काढू शकले नाहीत. शिक्षण विभागाने शाळातील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करण्याचा कार्यक्रम आखला होता. परंतु कोणत्याच शाळेत आधार केंद्र चालू झाले नाही. त्यामुळे सरल प्रणालीत विद्यार्थ्यांची माहित भरता आले नाही. मुलांचे आधार कार्ड काढताना पालक व शिक्षकांची एकच तारांबळ झाली. तसेच शासनाने या कार्डाला अती महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून स्थान देत गेल्यामुळे काही आधार केंद्र संचालक मंडळी आधार कार्डची नोंदणीसाठी ५० ते १०० रुपयांची मागणी करीत असल्याची तक्रारी आता समोर येत आहेत. आपल्याजवळ आधार कार्ड नसेल तर शासनाच्या कोणत्याच योजनेतील अनुदानाचा लाभ मिळणार नाही, अशी साशंकता लोकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे प्रत्येक जण आधारकार्ड मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. शासनाने ही योजना सुरूवातीला जनकल्याणासाठीच तयार केली होती; परंतु काही जिल्ह्यातील अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धीमत्तेच्या अधिकार्यांनी या आधार कार्डचा वापर करून गरीब लाभार्थ्यांना विविध योजनेचे थेट अनुदान त्यांच्या खात्यावर देण्याचा यशस्वी उपक्रम राबविला. यातून दलाली बंद झाली आणि सामान्य जनता सुखावली. ज्याद्वारे सरकारने सुद्धा त्याच अनुषंगाने विचार करण्यास सुरूवातकेली. १ जानेवारी २०१३ रोजी सर्व योजनांचे अनुदान आधार कार्डशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे मोदी शासनाने सुद्धा ही योजना कसल्याच प्रकारचा विचार न करता चालू ठेवण्याचा जे पाऊल उचलले आहे ते खरोखरच अभिनंदनीय आहे. बायोमेट्रीक प्रणालीचा वापर शाळा, विद्यालय, कार्यालय अशा विविध ठिकाणी करून कर्मचारी वर्गात सुद्धा सुसंगतपणा आणता येईल. गावोगावी फिरते बँका तयार करून त्या द्वारे आर्थिक व्यवहार करणे सहज, सोपे आणि सुलभ होईल. पोलिसांना सुद्धा या प्रणालीचा खूप मोठा फायदा होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील घुसखोरी थांबविता येईल. आधार कार्ड भविष्यात जनतेचा नक्कीच आधार बनेल यात मुळी शंकाच नाही.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

राजे उमाजी नाईक ( Raje Umaji Naik )

शेतकऱ्यांचा राजा व आद्य क्रांतीकारक - राजे उमाजी राजे नाईक  राजे उमाजी नाईक (१७९१–१८३२) हे मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक श...