Saturday 25 May 2019

आषाढी एकादशी

सकाळी रेडियोवर पं.भीमसेन जोशी यांच्या आवाजातील माझे माहेर पंढरी ,आहे भीम रे त्या तिरी हे गाणे ऐकत ऐकतच उठायचो. लहान असल्यापासून या पंढरीच्या विट्ठलाचे आकर्षण असायाचे त्याला कारण ही तसेच होते. माझे काका वारकरी संप्रदायतील होते ,त्यामुळे ते आषाढी एकादशीला पंढरीची वारी करून परत यायचे आणि येताना आम्हां लहान मुलांसाठी काही आणित असत. त्याचे आम्हाला उत्सुकता असायची. वर्षामागून वर्ष सरले आणि आम्ही मोठे झालो तसे या वारीचे आकर्षण कमी झाले. पण वारी समजू लागलो आणि वारी मध्ये जायचे असेल तर भजन करावे लागते ही अट गावातील चर्चेमधुन ऐकन्यास मिळाले. यामुळे भजन करण्याकडे वळलो .टाळ कधी हातात घेता आले नाही, मात्र हाताने टाळ वाजवायचो आणि भजनी मंडळात सामिल व्हायचो, असे शालेय जीवनात घडले. हे सर्व त्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी करायचो. शालेय जीवन संपले आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर या भजना पासून दूर झालो. मात्र पंढरीचे आकर्षण कमी झाली नाही यामागे काय कारण असेल .....?
आषाढी एकादशी ही पंढरीची वारी पावासळ्याच्या तोंडावर येते. वारकरी मंडळी सहसा शेतकरी असतो आणि शेतात आपली पेरणी पूर्ण करून वारी साठी रवाना होत असतो. कधी कधी निसर्ग नियम मोडते आणि पेरणी करायला उशीर होतो. तरी शेतकरी आपली वारी चुकवत नाहीत. या वारीत बरेच काही शिकायला मिळते. मुंगी ज्याप्रमाणे वाटचाल करतात अगदी त्याच प्रकारे वारकरी आपल्या घरातून जथयाच्या जथ्थी निघातात आणि वारीत सामिल होतात. *शिस्त* ही त्यांच्या अंगात असलेली एक अत्यंत महत्वाचे गुण येथे दिसून येते. कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसताना ही वारकरी लोकांची स्वयंशिस्त पाहन्याजोगे असते. स्वतः तयार केलेली शिस्त असल्यामुळे ते मोडन्याचा प्रश्नच येत नाही.
या लोकांमध्ये अजुन एक महत्वाचे गुण दिसून येते ते म्हणजे इतरांना सहकार्य करणे .वारीमध्ये पायी चालत असताना अनेक समस्या निर्माण होतात पण त्याचे काहीच वाटत नाही .कारण वारी मधे लोक एकमेकांना सहकार्य करीत वाटचाल करीत असतात. त्यामुळे कोणालाही समस्या निर्माण झाली तरी त्याचे काही वाटत नाही .प्रेम करीत जा आपणास नक्कीच प्रेम मिळेल द्वेषातुन द्वेष च निर्माण होते याची प्रचिती सुद्धा या निमित्ताने येते .सासरी गेलेल्या मुलीला आषाढी च्या निमित्ताने माहेरी जाण्याचा योग येतो वर्षातील सणांची सुरुवात या सणाने होते जसी तिला माहेराचि ओढ लागलेली असते.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...