Friday, 15 January 2016

📚📚साहित्य मंथन 📚📚

                           आयोजित
🎤🎼काव्यमंथन🎤🎼

 🌐🌐चारोळी स्पर्धा🌐🌐
       ===========
विषय:- तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
~~~~~~~~~~~~~~~~~~
संयोजक :-श्री अरविंद जी कुलकर्णी सर

परीक्षक:-श्री गजानन जी पवार पाटिल सर

ग्राफिक्स:-श्री क्रांती बुद्धेवार सर जी
@@@@@@@@@@@@@@@

तिळ गुळासम व्रद्धिंगत राहो
साहित्य मंथन वरिल प्रेम..
''तिळगूळ घ्या गोडगोड बोला''
मंत्र जीवनातील सर्वांसाठी सेम..!!
✏______ गजानन पवार
        @स्पर्धेसाठी नाही
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सोडा सगळे गीले शिकवे,
मोल फक्त प्रेमाचेच तोला...
करा सुरवात प्रेम पर्वाची,
तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला..

     @ उत्कर्ष देवणीकर....
👆स्पर्धसाठी नाही....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
 तिळगूळा सारखा वाढावा
जिव्हाळा सर्व नात्यातला..!
नको कटुता भेदमिटता तेथे ,
उडे आनंदे पतंग मनातला..!!
✏________ जी.पी.
@स्पर्धेसाठी नाही. .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला
असं फक्त म्हणु नका
तर प्रत्यक्षात करुन दाखवा
सगळ्या जगालाच आनंदी ठेवा
मगच तुम्हाला गवसेल सुखांचा मेवा !
✏✒
निलाक्षी विध्वंस

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

"तिळातिळाने वाढवूया
गोडवा मनाचा
कलीुगात वधारो
भाव माणूसकीचा"

"एक दिवस गोड बोलून
कसे बरे चालायचे?
सत्कृत्याची सुरूवात
स्वतःपासून व्हायला पाहीजे"

"वाण देवून सुविचाराचे
लुटून घेवूया आनंद
माणसाला माणूस जोडणे
हाच संक्रांतीचा छंद"
        ✒✏✒
         .........जयश्री पाटील
स्पर्धेसाठी👆🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

"तिळगूळ घ्या गोड गोड बोला"

१)
"तिळ आणि गुळाच्या मिलनाने
वाढते स्निग्धता आणि गोडी,
यातूनच जपली जावी
सामंजस्य आणि एकतेची जोडी"



२)
 "तिळगूळ,वाण हाच
  भारतीय संस्कृतीचा वारसा,
  हेवेदावे मिटले जावेत
  मन बनावे शुध्द आरसा "
            ✏✏✒
        -संगीता देशमुख,वसमत
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तिळगूळ घ्या गोड गोड बोला,
कधिच लागू नये खरंतर म्हणायला.
किती वर्ष लागतात ना समजायला?
साधं,सोपं,सहज,समजून वागायला.
        ✏✒✏✒
         डॉ.सुधीर अनंत काटे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तिळ गुळ घ्या हो ।
सदा गोड बोला
नको हेवे दावे
सोडा तो अबोला ।
               📝📝📝
@ अरविंद कुलकर्णी
(स्पर्धेसाठी नाही )
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
|| तिळगुळ घ्या गोड बोला ||
=●=●=●=●=●=●=●=●=
तिळगुळ घ्या गोड बोला
मुहूर्त चांगला आहे मौन सोडा..
होऊ द्या कोत्या मनाच संक्रमण..
माणसांनो माणुसकीशी नात जोड़ा..!!
         ✏✒✏
     *****सुनिल पवार.....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹चारोळी स्पर्धा🌹
तिळगुळ घ्या गोड बोला
1
खमंग गरम गूळाची पोळी
चविष्ट पौष्टिक तीळ वडी
परस्परांमध्ये स्नेह राहो
मनीची इच्छा हीच एवढी
 2            💎
दुरावा कटुता काढूनटाकून
मने व्हावीत स्वच्छ स्वच्छ
मकर- संक्रांतीच्या दिवशी
मनतळातील इच्छा ... हीच
3            💎  
तिळ गुळ... मन उदारतेचा
हलवा ...नीती चारित्र्याचा
उंच आलेख स्वजीवनाचा
असाच अर्थ .. संक्रांतीचा
4            💎
रुसवाफुगवा अन् गैरसमज
नकोच चीड अढी तिरस्कार
काही काही नकोच मनी या
हलका व्हावा हा सारा भार
5             💎
विहिणीविहिणी जावाजावा
सासू सून..नणंद भावजया
गोडवा वाढेल या नात्यांचा
मगचसाजरासणसंक्रांतीचा
6              💎
मनामनातील शत्रुत्व संपावे
कटु भावनांचा व्हावा निरास
मकर - संक्रांतीच्या दिवशी
एवढीच इच्छा .. आहे खास
7               💎
तिळगुळ घ्या गो ऽ ड बोला
असेचम्हणायचे का दरवेळी
गोड गोड तर बोलतोच की
पण भेटूया अता वेळोवेळी
     ✒✒✒✏
                डाॅ.शरयू शहा.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
चारोळी स्पर्धा ......

सण संक्रांतीच गोडवा घेवून येणारा,
द्वेष विसरुन माणूसकीला जपणारा,
तीळ-गुळ घ्या अन् गोड गोड बोला,
हे ब्रीद सा-या जगास पटवून देणारा ....
           ✏✒✏
               निर्मला सोनी.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तिळगुळाची देवाण - घेवाण , वर्षभर गोड बोलण्याचा पण, चला साजरा करूया एकमेव खगोलशास्त्राधारित एकमेव हिंदु सण --------------

-स्पर्धेसाठी ---------
✏✒✏✒✏
शंतनु विजय भालेराव, पुणे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चंद्रकलेप्रमाणे रोज
प्रेम वाढत जाऊ द्या
तिळगुळ देऊन एकमेका
गोड बोलण्याचा वसा घ्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गोड बोलण्याचा संदेश
देत आली मकरसंक्रांती
तिळगुळ देऊन सर्वांना
उजळू या आपली नाती गोती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तीळ व गुळाची मिश्रण
असते किती गोड
दुरावलेल्या माणसाना
करीत असते जोड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगात वाटूनी प्रेम
माणसे चला जोडीत
एकमेका गोड बोलुनी
भांडण काढूया मोडीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🔅" तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला "
- नागोराव सा. येवतीकर
   मु. येवती ता. धर्माबाद
www.nasayeotikar.blgspot.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🍃हर पतंग जानती हे,

   अंत में  कचरे मे जाना हे ।

लेकिन उसके पहले हमे,

आसमान छूकर दिखाना हे  ।🍃
          ✏✒✏✒
            सुजाता मोघे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
 🍁चारोळी मंथन स्पर्धा🍁

गर्व अहंकाराचे हनन करुनी
तीळगुळ घ्या गोड गोड बोला
स्वैर झालेल्या जीवांना या
बंध मानुसकीचे अाज घाला

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅


मानवता हा धर्म पाळूनी
भविष्य उज्ज्वल घडवू चला
तीळगुळ घेवूनी गोड बोलूनी
द्वेष मत्सराला तुडवू चला
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
     
          🎯 मारुती खुडे
           (9823922702)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**चारोळी स्पर्धेसाठी**

आला आला सण संक्रांतीचा,
पतंग लागले हवेत ऊडु,
पुन्हा करु जगण्यास सुरवात,
विसरुनी सर्व आठवणी कडु...
🍥🍥🍥🍥🍥🍥🍥

सण संक्रांतीचा गोड आपुलकीचा,
तीळ-गुळ मुखी सर्वांना देऊ,
पाया पडतोय आशिर्वादही द्या,
हसत खेळत सुखात राहु...
🍥 🍥 🍥 🍥 🍥 🍥

सण पहा संक्रांतीचा आला,
रागद्वेष सर्व मागेची राहिला,
जुण्या आठवणींना बहार आला,
तीळगुळ घ्या अन् गोडगोड बोला...
🍥 🍥 🍥 🍥 🍥 🍥

:-निलेश सुरेश आळंदे
(8857912164)
गडहिंग्लज.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
📚📚साहित्य मंथन📚📚
                       आयोजित
💥💥काव्य मंथन💥💥

    🗽चारोळी स्पर्धा🗽

विषय : तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
======================


महागाईच्या वणव्यात तीळगुळ झाले कडू
मराठवाड्यात आत्महत्या, आक्रोश अन् रडू
हंडाभर पाण्यासाठी  टैंकरमागे किती पळु
मग गोड गोड बोलण्याकडे सांगा कसा वळु

        ✏🎯🎯🎯✒
     आप्पासाहेब सुरवसे
           लाखनगांवकर
********************************
         🌹चारोळी 🌹

📖प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र📖

कुमटे बीट सातारचा आदर्श घेऊया
ज्ञानरचनावादी अभ्यासक्रम राबवूया
तीळ गुळ वाटुया गोड गोड बोलुया
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया

       ✒🎯🎯🎯✏
आप्पासाहेब सुरवसे
             लाखनगांवकर
#####################

संक्रांतीच्या सणा -वारात
पतंग गेला उंच आकाशात
जशा तीळ मिसळला गुळात
तशा स्नेह वाढवू समाजात

          ✏🎯🎯🎯✒
      आप्पासाहेब सुरवसे सर
           लाखनगांवकर
=======================
संक्राती सण येतो दरवर्षी 15 जानेवारी
मिसळीची भाजी अन् तीळा- बाजरीची भाकरी
नव्याचा करु स्वीकार जळमटे, बुरसटले विचार सारु दूर
तीळ गुळ वाटू चला द्वेष, मत्सर,असूया जाती भूर्र्र
           ✏🎯🎯🎯✒
          आप्पासाहेब सुरवसे
            लाखनगांवकर
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्पर्धेसाठी

असचं राहूद्या प्रेम सुगंध येऊ द्या जरा,
फुला सारखे तुम्ही रोजचं फुला
मागचे-पुढचे विसरून जा सारे,
“तिळगूड घ्या गोड-गोड बोला"
          ✏✒✒✏✒
              पूजा बागूल
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌷 साहित्य मंथन समूह 🌷

      🌷 चारोळी स्पर्धा 🌷

1
गोड बोला तिळगुळ घेऊन
शब्दकाटे मऊ मऊ करा
स्नेह,प्रेम तिळ तिळ वाटून
आनंदाचा वाहू दया झरा

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

2
मानवतेचा अतूट धागा जोडतो
मकर संक्रांत सामाजिक सण
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
माणुसकी तत्व सांगे कण कण

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

✏✒✏✒✒
प्रा. सौ.संगिता भालसिंग
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
उडावा पतंग आकाशी,
यशाचा लाऊनी मांजा....
देव ढिल देईल आयुष्याची,
लुटूया संक्रांतीची मजा...
🔵WARANKAR G🔵
      👉🏼नांदेड👈🏼
🔴स्पर्धे साठी नाही  🔴
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण..!
      ✒✏✒✏✒
           नागेश काळे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्पर्धेसाठी

सगळे काटे टोचक बोचक हलव्या वरचा गोड  काटा
वर्मा वरती घाव घालणं  सोडून दे माणसा  आता
तिळासारखा स्नेह द्यावा गुळासारखी गोडी वाटा
तिळातिळाने स्नेहवाढो तिळगूळ घ्या गोड गोड बोला.
        ✒✏✒✏
       उर्मिला  बांदिवडेकर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वाढऊ प्रेमाची अपार गोडी,
सारे आपण प्रेमाचेच धनी..
तिळगुळ घ्या अन् गोड बोला,
होतील सारे मित्र अन मैत्रीणी..
          ✒✏✒
       @ उत्कर्ष देवणीकर
***************************
सर्व धर्म समभाव अन् बंधुभाव
नांदतोय आमच्या साहित्य मंथनात...
तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला,
वाढऊ गोडी आपल्या बंधुभावात......
     ✒✏✒✏✒
     @ उत्कर्ष देवणीकर.....
👆स्पर्धेसाठी नाही...
=================

आज तृप्त झाले मन,
तिळगुळाच्या गोडीने....
तिळगुळ घ्या अन् गोड बोला,
सांगतोय सर्वांना आवडीने.....

      @ उत्कर्ष देवणीकर...
👆स्पर्धेसाठी नाही....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
किर्तीचा पतंग उंच उडूदे आकाशी..
सुखस्वप्नांचा धागा भिडूदे नभाशी...              
जपून ठेवा नात्यांमधला गंध ओला..
तिळगूळ घ्या गोड गोड बोला... !!
       ✏✒✏
   - सौ.कस्तुरी देवरूखकर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
काटा फुलला तिळाला
राग द्वेश अवघा पळाला
मी पणा मग गळाला
साहित्यमंथन चा जेंव्हा
लळा लागला

           📝📝📝📝
@ अरविंद कुलकर्णी
(स्पर्धेसाठी नाही )
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
काव्यमंथन: चारोळी स्पर्धा
।तिळगुळ घ्या गोड बोला।

१)तिळगुळ घ्या गोड बोला
   केवळ ऊपचार व्यर्थ असे
  नित्य वाणीत असे गोडवा  संक्रात त्याने जाणिली असे

२) तिळगुळ देऊ गोड बोलू
कटू भावना विसरून  जाऊ
 सर्वधर्म बधुभाव जागवू
शुभसंक्रातीचा मुहूर्त साधू।

३)तिळ भाजले खमंग झाले
साखरेत घोळता मधूर झाले
लाडू मस्त तबकात सजले
 गोड शब्दात वाण वाटले

४)संक्रांतीच्या सुमुहुर्तावर
   दान गरजूंना वाटायचंय
मर्यादा जरा व्हांट्स अॅपवर
लेखन वाचन वाढवायचय।

५)नववधू नेसते  चंद्रकळा
गोड बोलून जोडते सासुरा
वाटून हळद कुकू वाणाला
आशीर्वादे राखते सौभाग्या।

६)सण संक्रांतीचा, पहिला              नववर्षातला
   ऊबदार प्रकाशात  पतंग
 ऊडवायचा
 विसरून वैर,प्रेम जिव्हाळा वाढवायचा
लुटून तिळगुळ  दुरावलेली
जोडायचा।

७)संक्रातीच्या सणाला
   महत्व आहे दानाला
   वाण द्याव  वंचिताला
   लाभेल आनंद चित्ताला।

८)तिळगुळ वाटते ग्रुपवर
   हलवा घ्या वाटीभर
  तुप ओतते गुळपोळीवर
  स्नेह माझा तुम्हा सर्वांवर।
        ✒✏✒
          अंजना कर्णिक.
                  माहिम ,मुबई.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा..
जीवनाच्या अथांग प्रवाहात
हवा नात्यांचा अनमोल ठेवा..💐✨
       ✒✏✒
अनुजा देशमुख, नाशिक
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सुर्याचा मकर राशीत प्रवेश होतो
आणी सुरू होते उत्तरायन
संक्रांत करूया आनंदाने साजरी
तिळगुळ खाऊन गोड बोलू आपन
     ✏✒✏✒
         सुनिल ल बेंडे, वसमत

*****************************
सभ्य समाज होता आपला,
त्यामुळे होत असता ऊत्क्रांती
विपुल सण निर्माण केले
जसे दसरा दिवाळी मकर     संक्रांति
     ✒✏✒
        सुनिल ल बेंडे
वसमत
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
काव्यमंथन
चारोळी स्पधाॅ
एवढासा तो जीव  तडतड तडकतो
गुळाच्या साथीने छानछान  फुलतो
दागिन्यांचा रूपात हलव्यात लपतो
गोडवा दुस-याला देत हरवून बसतो
*****,,,***********************
2)तिळगूळ घ्या गोडगोड बोला
   मनापासून संदेश देतात संक्रांतीला
    काळी चंद्रीका नेसून सजवतात नववधूला
   कृष्णाच्या मोहक रूपात पाहतात सोनुल्याला
**************************************
3)तिळ आणि गूळ संक्रातीला सजवतो
   कधी लाडू,कधी गूळपोळी,तर हलव्यात दिसतो,
   काटेरी  कुंपणाने दडी मारून बसतो
  तिळगूळ घ्या गोडगोड बोला म्हटले की खुदकन हसतो.
*******************************************
4)कलेकलेने चंद्र वाढतो,आकाशाची शान वाढवतो
    उडत्या पतंगाला पाहून कवेत घेण्याचा प्रयत्न करतो
    गूळाच्या साथीने सौंदयॅ प्रसन्नतेने आपले खुलवतो
    तिळगूळ घ्या गोड गोड बोला असे वदवून घेतो.
********************************************
        ✒✏✒
           सुलभा कुलकणीॅ
               बोरीवली  
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💐साहित्यमंथन💐
==============
🍁चारोळी स्पर्था🍁
==============
विषय--तिळगुळ घ्या गोड बोला
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
1)तिळा तिळाने मन तुटे तेव्हा
    गरज असते गुळ गोडीची
    शोध घ्याया निघे ,जेव्हा
    साथ  मिळे तिळगुळाची
                   💕
2) तिळाचा स्निग्धपणा मिळाला
    की,गुळाच गोडपण जपायचं
     दोन्हीचाहि संगम सांधला,
      की,नातगोतं सावरायचं !!
                  🎎
3) तिळा गुळाच स्नेहागर
     चौकट त्याला शास्राची
     तरी देशभर असे जागर
     व्हावी मिलने सर्वांची
                 🌍
4) सांधा असू दे स्निग्ध तिळाचा
    गोड गुळचा मनी रूजावा
    बांधा मैतर झणी ऐक्याचा
    माणुसकीचा झरा वहावा
                   🐾
5) आभाळ भिडे क्षितिजाला
     सांजी गोड स्नेह तिथे!!
     सागर घुसळे किना-याला
     तिळगुळाची ओढ जिथे!!
                  🌋✏✒
प्रेषक--कुंदा पित्रे
🌴🌴🌴🌴🌴
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तिळगुळ घ्या गोड बोला,
मंत्र महान हा संक्रांतीचा!
झाले गेले विसरून जाऊ,
स्नेहभाव वाढो कायभचा!
 
              रामराव जाधव.

तिळगुळ घ्या गोड बोला,
मनांत ठेवा आपुलकिचा!
मिटवु मतभेद आपसातले,
करु संपन्न सण संक्रांतीचा!!
        ✒✏✒
            रामराव जाधव.  
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चारोळी स्पर्धा
१५/१/२०१६
संक्रांत सण
**********************
           १
तिळगूळ घ्या गोड बोला
काटेरी हलवा, गुळाचा गोडवा
स्निग्ध तिळ, लाडू वाळा
प्रेमाने द्या, स्नेह वाढवा
**********************
               २
 स्नेहभावाने भारलेला
सण संक्रांतीचा भावला नेसून ललना चंद्रकळा
 हळदीकुंकवाचा सोहळा
**********************
            ३
प्रेमभावना जागविणारा
तिळगूळ लाडू साजरा
मत्सर- कपट मागे सारा
खुशीला द्या, मनात थारा
**********************
              ४
शीतकाळात ऊब देणारे
स्नेहमिलनाचा मंत्र देणारे
तिळगूळ नी हलवा देणारे
संक्रांतीला महत्व देणारे
**********************
              ५
संक्रांतीचा मोठा सण
वनितांचे सुघट वाण
तिळगूळ लाडूंचे दान
नाही आनंदा परिमाण
**********************
गोड बोला गोड बोला रोजच तर बोलतो गोड
साहित्याची  चाखतो गोडी
तिळगूळाची त्यातच गोडी
*********************
          ✒✏✒✏✏
       © जागृती निखारे
१५/१/२०१६.संध्या.६
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
भांडण तंटे पुरे आता,
द्वेष सारे विसरु,
खाऊनी गोड तीळ गुळ,
चल हातात हात घालुनी फिरू.
✏✒✏✒✏✒
       बी.  _ क्रांती
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तिळगुळाची गोडी,
रोजच्या जीवनात वाढवा,
संक्रांतीची वाट कशाला,
जेव्हा मनी असे गोडवा.
    ✒✏✒✏
   संदीप पाटील,नांदेड
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
गोड गोड तीळ,
त्याला गुळाची जोड़,
सुखी जीवन जगण्या,
मायेच्या माणसांची ओढ.
   ✏✒✏✒
  संदीप पाटील,नांदेड .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वर्षातील पहिला सण
आली  पहा संक्रांती
तिळगुळ घेऊन सर्व
गोड गोड बोलती
    ✒✏✒✏
                 - नासा
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
🔎🔎🔎🔎🔎🔎🔎🔎🔎

संकलन:-------
       श्री .आप्पासाहेब सुरवसे
               लाखनगांवकर
🌹📚📚📚📚📚📚📚🌹

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...