Sunday 10 July 2016

📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- ( 12वा)- बारावा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - _10/07/2016_
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00


★★★★★★★
*आषाढी एकादशी निमित्त*
††††††††††††††††††
========
*पाऊले चालती पंढरीची वाट*

_किंवा_

*माझे माहेर पंढरी*

==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.ना सा येवतीकर सर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री आप्पासाहेब सुरवसे
************************
💥 परीक्षक -  *न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी साहेब,रत्नागिरी*
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :--श्री  हणमंत पडवळ,उस्मानाबाद
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _11 जूलै 2016_ रोजी सायंकाळी 9:00 Pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702

http://sahitydaarpan.blogspot.com/2016/10/whatsapp-8-05-2016-1000-700.html
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आषाढी एकादशी निमित्य
➖➖➖➖➖➖➖➖
पाऊले चालती पंढरीची वाट
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
आषाढ महिना आला की वारकरी मंडळींना वेध लागतात ते पंढरीचे
माझे माहेर पंढरी।
आहे भिवरेच्या तीरी
जशी एखादी सासुरवाशीन खुप दिवसाने माहेरी जाण्यासाठी निघते तिच्या मनातील ती ओढ उत्कंठा या वारकर्याच्या मनात असते कधी एकदा पंढरीला जाईल व विठुरायाचे मुख पाहील अशी भावना
     पंढरीची वारी काही वारकरी महिण्याला करतात परंतु आषाढी कार्तिकीच्या वारीचे विशेष महत्व त्यात आषाढी चा महिमा तर आणखी वेगळा परवा आमच्या गावातुन श्रीसंत भगवान बाबा भगवान गडकर यांची दिंडी गेली आणी या दिंडीच्या सहवासात दोन तास राहण्याचा योग आला खरच घरी याव अशी इच्छा होत नव्हतीअसो
    संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या काळापासुन पंढरीची वारी आहे टाळ मृदंगाचा गजर भगवे ध्वज पालखी कलशधारी महिला डोक्यावर तुळस  शिस्तबध्द पध्दतीने चाललेली दिंडी पाहिली की अस वाटतय या भक्तिमय वातावरणात पुर्णपणे न्हावुन निघाव पहा दिंडीमध्ये कोणताही भेदभाव नाही महिला पुरुष अगदी चला माऊली असे संबोधतात मजल दरमजल करत चालायचे मुखाने भजन काय तो आनंद
 पंढरीच्या वारीला गेल्यावर काही नियम असतात अगोदर चंद्रभागेच स्नान नंतर पुंडलीकाचे दर्शन त्यानंतर बारीने जाणे पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर नामदेव पायरी आहे संत चोखामेळा यांचे अगोदर दर्शन मग विठुरायाचे म्हणजेच विठु माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा
    अशी ही वारी प्रत्येकाने एकदा तरी करावी व खर्या जगण्याचा आनंद घ्यावा युगे अठ्ठावीस विटेवरी उभा कर कटीवर ठेवुनीया असा हा देव भक्ताची वाट पाहतो संकटकाळी आपल्याला देव आठवतो पण तो निरंतर आपल रक्षण करत असतो
     अवघा महाराष्ट्र सध्याया भक्तिमय वातावरणात आहेचला तर आपणही जमेल तस विठुरायाच स्मरण करुया कधी तरी एकदा वारीला जावुया
बोला पुडलीका वरदे हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ
   महाराज की जय
     खेडकर सुभद्रा बीड (२०)
मोऩ (९४०३५९३७६४)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
 स्पर्धेसाठी
आषाढी एकादशीनिमित्
**********************
पाऊले चालती पंढरीची वाट
***********************

ग्रीष्म सरुन वर्षा ऋतू येतो,आषाढ मासाची चाहूल लागताच वारकरी आनंदून जातात.पंढरीच्या वारीची ओढ त्यांच्या मनाला लागते,
संसाराची चिंता सोडून वारकरी पंढरपूरला त्यांच्या विठूमाऊलीला भेटण्यासाठी आतुर होतात,
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
अभंगात म्हटल्याप्रमाणे पंढरीला दिंडीतून निघतात.
ज्संत ज्ञानेश्वर जदगुरु संत तुकाराम ,संत गजानन महाराज ,संतजगनाडे महाराज
आदि संतांची  पालखी दिंडीसह मार्गाक्रमणा करु लागतात .
   या दिंड्याचे एक वैशिष्ठ्य् आहे इथे जातीभेद,धर्मभेद नाही .सारी विठूमाऊलीची लेकरे अशी मनाची धारणा असते..या पालख्यांची मार्गक्रमणा ठरलेली असते.
देहूचे संत तुकाराम महाराज आणि आळंदीचे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांचा पुण्यनगरीत मुक्काम असतो.मग तेथून त्यांची मार्गक्रमणा बदलते
ज्ञानोबा माऊली सासवड जेजुरी नीरामार्गे जाते.
सोपानदेवांचीही पालखी निघते.वाटेत रिंगण होते माऊलींचा अश्व धावतो त्यापाठोपाठ वारक-यांचेही रिंगण होते .माऊलींच्या अश्वाची पायधूळ भाविक वारकरी आपल्या कपाळी मोठ्या श्रध्देने लावतात.
हा सोहळा पाहण्यासारखा होते.तुकोबांच्या पालखीचेही रिंगण होते मजल दरमजल करीत पालख्या पंढरपूरला पोहोचतात.
वाटेत आनेक दिंड्या भेटतात.दिवासभर चाल रात्री जागर असतो प्रवचन भजन भारुड कीर्तन भक्तीचा मळा फुललेला असतो.
 वाटेत जनसमुदाय दर्शन घेतो  स्त्रियाहु मोठ्या प्रमाणावर पंढरीची वारी करतात .वाटेत लोक पालखीचे दर्शन करतात पालखीला औक्षण करतात
वारक-यांना आन्नदान वस्त्रदान करतात,डाँक्टरवर्गही कार्यरत असतो वारक-यांची काळजी घेतात
  टाळझांजांचा गजर, माऊली माऊली गजर ,विठ्ठल विठ्ठल नामात पंढरी कधी जवळ आली ते कळतही नाही वेळापूरला पालख्या पुनः एकत्र येतात शेगाव भांडगांव पैठण आदी पालख्यांचा नि वारक-यांचा मिलाफ होतो.
वारकरी आनंदून जातात.
  पंढरीचा कळस दिसू लागतो वारक-यांचा आनंद गगनात मावेनासा होतो
     चंद्रभागा दुथडी भरुन वहातेय वारकरी चंद्रभागेत स्नान खरतात दर्शन बारीत उभे रहातात चोखोबांच्या पायरीशी नतमस्तक होतात.
हे सारे शिस्तीत चाललेले असते.
  मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करताच वारकरी विठूमाऊलीचे दर्शन घेतात.
सावळे ते रुप
कटीवरी कर
उभे वीटेवर
पांडुरंग

तुळशीच्या माळा
वैजयंती माळा
रुळतात गळा
विठ्ठलाच्या

मकर कुंडले
 शोभतात कानी
भान हरपूनी
वारकरी

जाहले दर्शन
धन्य वारकरी
आला तो माहेरी
पंढरीत

डोळा भरुनिया
राहतो पहात
नेत्री साठवत
वारकरी

परतीची वाट
निघेना पाऊल
भक्त तो व्याकूळ
वारकरी
अशी जीवाशिवाची भेट होते.
पुढल्या वर्षी येण्याचे विठाईशी मनोगत होते.राही रखुमाईचे आणि पुंडलीकाचे दर्शन घेतात.द्वादशीला पारणे होऊन वारकरी परतीच्या मार्गाला लागतात
  बुधवार हा विठोबाचा वार मानतात पंढरी माहेर त्यामुळे वारकरी कधीही बुधवारी माघारी फिरत नाहीत
पुढच्या वर्षी
 फिरुन येईन
दर्शन घेईन
सांगे वारकरी
जय विठाई माऊली
ज्ञानोबा तुकाराम एकनाथ नामदेव असा गजर करीत वारकरी परत फिरतात
  प्राची देशपांडे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*माझे माहेर पंढरी*

सकाळी सकाळी रेडियोवर पं.भीमसेन जोशी यांच्या आवाजातील *माझे माहेर पंढरी ,आहे भीम रे त्या तिरी* हे गाणे ऐकत ऐकतच उठायचो. त्या काळी टी व्ही नव्हते फेसबुक आणि व्हाट्सएप्प तर दुरची गोष्ट होती. लहानपणापासून या पंढरीच्या विठ्ठलाचे आकर्षण असायाचे त्याला कारण ही तसेच होते. माझे काका वारकरी सांप्रदायतील होते, त्यामुळे ते आषाढी एकादशीला पंढरीची वारी करून परत यायचे आणि येताना आम्हां लहान मुलांसाठी काही खेळणी आणित असत. त्याचे गोष्टीची आम्हाला उत्सुकता असायची. वर्षामागून वर्ष सरले आणि आम्ही मोठे झालो तसे या वारीचे आकर्षण कमी झाले. पण वारी समजू लागलो आणि वारी मध्ये जायचे असेल तर भजन करावे लागते ही अट गावातील चर्चेमधुन ऐकन्यास मिळाले. यामुळे भजन करण्याकडे वळलो .टाळ कधी हातात घेता आले नाही, मात्र हाताने टाळ वाजवायचो आणि भजनी मंडळात सामिल व्हायचो, असे शालेय जीवनात घडले. हे सर्व त्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी करायचो. शालेय जीवन संपले आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर या भजना पासून दूर झालो. मात्र पंढरीचे आकर्षण कमी झाली नाही यामागे काय कारण असेल .....?
आषाढी एकादशी ही पंढरीची वारी पावासळ्याच्या तोंडावर येते. वारकरी मंडळी सहसा शेतकरी असतो आणि शेतात आपली पेरणी पूर्ण करून वारी साठी रवाना होत असतो. कधी कधी निसर्ग नियम मोडते आणि पेरणी करायला उशीर होतो. तरी शेतकरी आपली वारी चुकवत नाहीत. या वारीत बरेच काही शिकायला मिळते. मुंगी ज्याप्रमाणे वाटचाल करतात अगदी त्याच प्रकारे वारकरी आपल्या घरातून जथयाच्या जथ्थी निघातात आणि वारीत सामिल होतात. *शिस्त* ही त्यांच्या अंगात असलेली एक अत्यंत महत्वाचे गुण येथे दिसून येते. कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसताना ही वारकरी लोकांची स्वयंशिस्त पाहन्याजोगे असते. स्वतः तयार केलेली शिस्त असल्यामुळे ते मोडन्याचा प्रश्नच येत नाही.
या लोकांमध्ये अजुन एक महत्वाचे गुण दिसून येते ते म्हणजे इतरांना सहकार्य करणे .वारीमध्ये पायी चालत असताना अनेक समस्या निर्माण होतात पण त्याचे काहीच वाटत नाही .कारण वारी मधे लोक एकमेकांना सहकार्य करीत वाटचाल करीत असतात. त्यामुळे कोणालाही समस्या निर्माण झाली तरी त्याचे काही वाटत नाही .प्रेम करीत जा आपणास नक्कीच प्रेम मिळेल द्वेषातुन द्वेष च निर्माण होते याची प्रचिती सुद्धा या निमित्ताने येते .सासरी गेलेल्या मुलीला आषाढी च्या निमित्ताने माहेरी जाण्याचा योग येतो वर्षातील सणांची सुरुवात या सणाने होते जसी तिला माहेराचि ओढ़ लागलेली असते. अगदी तसेच वारकरी लोकांना पंढरीच्या वारीची ओढ़ लागलेली असते म्हणूनच म्हणावेसे वाटते पाऊले चालती पंढरीची वाट
 हरी ओम विठ्ठला

- नासा येवतीकर धर्माबाद
09423625769
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आषाढी एकादशी निमित्त
साहित्य दरबार आयोजित
स्पर्धा
***********************
माझे माहेर पंढरी
***********************आषाढ महिना लागला कि वेध
वारकर्या सह सर्वांनाच लागतात ते पंढरपुर च्या वारीचे कारण पंढरीशी जारे आल्यानो संसारा..... दिनाचा सोयरा पांडुरंग. माहेर , सोयरा हे शब्द सामन्य जनांच्या खुप जवळचे आहेत
आपण पहातो महाराष्ट्राची ओळख पंढरपुरामुळे आहे.महाराष्ट्राला दिंडीची परंपरा फार पुर्वी पासुन लाभलेली आहे.फक्त महाराष्ट्रातुनच नव्हे तर आंध्र, कर्नाटक,आजुबाजुच्या प्रदेशातुन लोक वारी साठी जातात. ही वारी महाराष्ट्रात ल्या अनेक संतानी सुरु केलेली आहे.संततुकाराम,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ संत नामदेव अशासंतानी पंढरीचे महात्म्य जाणले कारण ते संताचे माहेर आहे.
माहेर हा शब्द भावनेशी जुळलेला आहे, माहेर म्हणजे जिव्हाळा, प्रेम, आईची ममता
आईच्या ह्दयाचे विश्लेषण करता येत नाही परंतु त्या ह्दयाचा अनुभव आयुष्यभर पुरणारा व न पुसणारा असतो.ह्दयातुन ह्दयाला  लावणारी आईच असते, आईला आपल्या बाळाचे हित कशात आहे ते कळते, म्हणुणच मदालसाचे उपदेश हे विचार करायला लावणारे प्रकरण आहे.जगातील दुःखाचा  अनुभव येण्यापुर्वीच तिने आपल्या बाळांना आनंदाने भरुन टाकले म्हणुण परमार्थात संतापेक्षा आईलाच मान आहे कारण ते आईच्या ह्दयातुन जन्माला येत असतात..मग आमुची आई, माऊली पंढरीत राहते त्यामुळे आमचे पाय आपोआप पंढरी कडे वळतात कारण संपत्ती सोहळा नावडे मनाला ,लागला टकळा पंढरीचा....
पंढरीला जाण्यासाठी कधी एकदा आषाढी येते असे वारकर्याना वाटत असते.
शेतीची कामे आटोपुन वारकरी चित्तामध्ये पंढरीचा ध्यास घेऊन बसलेला आसतो. कारण पांडुरंग मोठ्या आतुरतेने भक्तांची वाट पहात असतो.सासुरवाशीणज्या प्रमाणे माहेराला जाण्यासाठी आसुसलेली असते , त्याप्रमाणे वारकरी पंढरीला म्हणजे माहेराला जाण्यासाठी आसुसलेला असतो.तहान भूक विसरुन निरपेक्षप्रेम करणार्या माऊली कडे वारकरी धाव घेत असतोआणि पांडुरंग ही त्यांना म्हणतो आषाढी कार्तिकी विसरु नका मज सांगतसे गुज पांडुरंग .
सुखासाठी कितीही तळमळ करा पण पंढरीला फक्त एकदाच जा मग तुम्हाला सर्व सुख मिळेल एवढेच नव्हे तर तुम्ही जन्मोजन्मीचे दुःख  विसरुन जाल.खरोखर पंढरीचा महिमा काय वर्णावा
चंद्रभागा नुसती डोळ्यानी जरी पाहीली तरी सर्व तिर्थाच दर्शन घडल्याच पुण्य मिळतं
    परवा माझ्या गावावरुन जाणारी श्री श्रेत्र भगवान गड येथील दिंडी सोबत राहण्याचा योग आला मी माझे परम भाग्य समजते
जवळुन पाहिलेला अनुभव
तहान-भूक विसरुन हे वारकरी आपल्याच आनंदातडुंबत असतात . स्वर्ग अवतरे पुढ्यात माझ्या  अस मला झालं.त्यांची शिस्त ,टाळ मृदंगाचा जयघोष, तालात पडणारी त्यांची पाऊले, झेंडेवाले,डोईवर तुळस घेतलेल्या महिला , हंडे घेतलेल्या महिला, भालदार चोपदार,पालखीहे सर्व पाहुन मी भानावर नव्हतेचकारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
उगीच नाही इतके भक्त गण पंढरीशी जात कारण कितीतरी तिर्थे आपण पाहिली आहेत,ऐकली आहेत परंतु सांगा बरे माझ्या  विठु सारखा देव विटेवर कोठे उभा आहे. पंढरपुरातील पांडुरंग  हेच उर्जेच एकत्रीकरण आहे
कणां-कणांत वास्तव्य करणाऱ्या चैतन्याच ते देखणं रुप आहे, तो समता सुचवणारा समचरणी व समदृष्टीचा आहे.
एकदा तुकाराम महाराजानां ताप आल्यामुळे वारी चुकली तर महाराज म्हणतात भोवर्यात सापडलेल्या मनुष्या प्रमाणे माझी  अवस्था झाली.मी पोरका नाही , मला माहेर आहे.यावरुन पंढरीच्या वारीचे वेगळेपण आपणाला जाणवते.पंढरीचे महात्म्य अनेक संतानी विषद केले आहे.कान्होपात्रा म्हणते माझ्या  माहेरात म्हणजे पंढरीत आल्यावर सर्व दुःख , चिंता निवारली जाते .आईला जसे न सांगता आपल्ल्या लेकराचे दुःख  समजते तसे माझ्या  पांडुरंग  मायबापाला काहि सांगण्याची गरज नाही त्याला ते अंतर्यामी  समजते.
दिंडीचा नियम असा आहे पंढरपुरात पोहंचल्यावर अगोदर चंद्रभागेचे स्नान कारण सासरहुन लेक आली किआई अगोदर न्हाऊ घालते आणि सांगते तुझ्या  मनातील वाईट विचार ,कष्ट तु सोडुन दे व माझ्या जवळ आहेस तोवर आनंदात रहा.याला म्हणतात माहेरपण.चंद्रभागेत स्नान झाल्यावर महाव्दारी लोटांगण, नामदेव पायरी दर्शन इणि चोखोबाचे दर्शन घेतलूयाशिवाय माणुस चोख होत नाही व गरुडापुढे कान धरुन नाचुन फुगड्या खेळुन पांडुरंगापुढे शुद्ध होऊन जातात.आणि म्हणुन पांडुरंगाने वैकुंठ भूमीवर आणले आहे.ते या पंढरपुरात आहे म्हणुन माझे माहेर पंढरी सर्वार्थाने श्रेष्ठ आहे आणि इथे जाणारा वारकरी मोक्षाचा अधिकारी आहे.
***********************
स्पर्धेसाठी
***********************
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

: "पाऊले चालती पंढरीची वाट"
उभ्या महाराष्ट्राचं दैवत पंढरपूरचा विठूराया.या महाराष्ट्रभूमीला वेडावून सोडलेला हा विठूराया
इथल्या भोळया भाबड्या जनाचा जीवन आधार आहे.आषाढ घनानं वसुंधरेला दिलेले हिरवं दान आणि या हिरव्या दानानं नटलेली सृष्टी मना मनाला उत्साहाचं उधान आणते.पाण्याचे झुळझुळ वाहणारे निर्झर जनू विठ्ठलभक्तीत मग्न होऊन अभंग गात आहेत.पाखरांचा किलबीलाट
कोकिळेचं गाणं त्या अभंगाची री ओढत आहेत.
विठूनामात मन कसं तल्लीन होतं आणि सारं सारं
दु:ख ,वेदना विसरायला भाग पाडतं.हरवून जातो
दुष्काळ,हरवून जातात भोगलेल्या यातना आणि
हारवून जातो सारा भूतकाल.उरतो फक्त आणि फक्त ध्यानी मनी विठ्ठल.अवघ्या महाराष्ट्रातून
ओघ चालत असतो पंढरीच्या वाटेने.चालताना भेद नसतो मनात, कोण कोणत्या  जातीचा, कोणत्या धर्माचा आगर कोणत्या पंथाचा.अवघा महाराष्ट्र भक्ती रसात नाहून निघतो.सातशे किलोमीटरचे अंतर सहज पार करत निघालेल्या दिंड्या एक महिन्याचा प्रवास करत पंढरपूरला पोहचतात पण कोणाला थकवा येत नाही की कोणाचा उत्साह कमी होत नाही.विदर्भातील वेगाव ता.मारेगाव,जि.यवतमाळ येथील जगन्नाथ
महाराजाच्या दिंडीचा प्रवास सर्वात लांब पल्याचा आहे.अशा दूरदूरहून येणा-या दिंड्या हा एक अलौकिक असा सोहळा आहे.देहूहून निघणारी संत तुकारामाची पालखी आणि आळंदीहून निघणारी संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी ही तर
भारतीयांच्या बरोबर बाहेरच्यांच्याही कुतूहलाचा विषय आहे.पिढ्यांन पिढ्या पायी वारी करणारी कांही कुटुंबे आहेत.या दिंड्यात सहभागी होणारे
भक्तगन नामजपाबरोबरच नाच किर्तनात गुंग तर होतातच पण समाजाला संदेश देत देत विधायक
काम करत करत पुढे जाताना दिसतात.वृक्षारोपण
सारखा कार्यक्रम राबवत कांही दिंड्या पंढरीवाटेने
जात आहेत.ही नावाजण्याजोगी बाब असून संत
तुकारामाच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...
या अभंगाचा जणू अंगीकारच करत त्या पुढे निघाल्या आहेत.देवधर्म करण्याचे कोणते वय असत नाही,या दिंडी सोहळयाने तरुणाईलाही वेड
लावलेले आज दिसते आहे.कित्येक तरुण तरुणी दिंडीत सहभागी होऊन पंढरी पर्यंत चालत जातात.चालतांना पायात येणारी ताकत आणि मनात भरणारी उर्जा कुठून येते कोणास ठाऊक.ज्यांचे वय झाले असं आपण म्हणतो त्यांच्या उत्साहात तसूभरही कमतरता जाणवत
नाही.ऐवढ्या मोठ्या जनसमुदायाचा, जनसागराचा लोंढा पंढरीकडे जात असताना कुठे
शिस्तीचा भंग नाही किंवा कांही गोंधळ होत नाही.या सोहळयात आनंदाने सहभागी होणा-या तरुणाईला वर्षभराची जणू ऊर्जाच मिळते.या जनसागराची शिस्त तरुणाईसाठी प्रेरणाच असते.
            पंढरीचा महिमा |
            देता आणीक उपमा ||
            ऐसा ठाव नाही कोठे |
            देव उभा उभी भेटे ||
पंढरीनाथाच्या भेटीची आस धरुन त्याच्या नामाचा अखंड घोष करीत निघालेल्या लाखो वैष्णवांच्या संगतीने स्वत:ला पावन होता येईल यासाठी होईल तेवढी आणि होईल त्या मार्गाने
सेवा करण्यासाठी अनेक संस्था व्यक्ती ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करताना दिसतात.
अनेक मंडळे,संघटना विविध उपक्रम राबवताना दिसतात.भक्तीकल्लोळात सहभागी होण्याची हरेकांची धडपड दिसून येते.एक एक अनुभव नोंद
करून ठेवावे असे असतात,आपल्या घरी खास कारणास्तव आलेल्या पाहुण्यापेक्षाही दिंडीतील वारक-याची चांगली व्यवस्था ठेवण्याची कांहीची
धडपड बघून ज्ञानेश्वरांनी म्हंटल्या प्रमाणे....
      या संतापरीस उदार | त्रिभुवनी नाही थोर |
      मायबाप सहोदर | इष्टमित्र सोईरे ||
याची प्रचीती येते.संतसंगतीसाठी माणसे या मोसमात का असेना पण पुढं येताना दिसतात,
नाहीतरी संत तुकाराम म्हणतातच की,
      संत समागम एखादिया परी |
      राहावे त्याचे द्वारी श्वानयाती ||
      तेथे रामनाम होईल श्रवण |
      घडेल भोजन उच्छिष्टाचे ||
      कामारी बटीक सेवेचे सेवक |
      दीनपण रंक तेथे भलें  ||
      तुका म्हणे सर्व सुख त्या संगती |
      घडेल पंगती संताचिया ||
संतसंगती कोणत्याही मार्गाने करावी.अगदी त्याच्या दारातला कुत्रा होऊन देखील.कारण तेथे
सदैवं रामनामाचे श्रवण घडेल आणि संताचे उष्टे
अन्न खायला मिळेल.त्यांच्यांघरी कामगार म्हणून
किंवा बटीक म्हणून दीनपणे राहणे चांगले.कारण सर्व सुख हे संत संगतीमध्ये आणि त्यांच्या पंगतीमध्ये आहे.
'जाता पंढरीशी सुख वाटे जीवा' या ओळी सार्थ करण्याकरिता प्रत्येक वारकरी पंढरी वाटेवर आनंदाने चालतो आहे....हा अनुभव विचून किंवा फक्त ऐकून वा सांगून समजणारा नाही.यासाठी
अनुभवाची गरज आहे...अनुभवाशिवाय पंढरीचा महिमा कळणार नाही,लेकींना जशी माहेराची ओढ लागते तशीच ओढ आषाढ येता समस्त भक्तांना लागते आणि 'माझे माहेर पंढरी.....'या आसक्तीनं आपोआप पाऊले पंढरीची वाट चालतात...."पाऊले चालती पंढरीची वाट..."

                  श्री.हणमंत पडवळ
         मु.पो.उपळे (मा.)ता.उस्मानाबाद.
                 8698067566.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🐾🐾पाऊले चालती पंढरीची वाट🐾
            🌴🌴   स्पर्धेसाठी 🌴🌴

आपला देश मुळी शेतीप्रधान 80%शेतक-याची संख्या आहे.दिवसभर शेतात राबणार व रात्री विठ्ठल -मंदिराच्या पारावरती गप्पा मारत बसवणारा,एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा,भक्तीरसात डुंबून जाण्यासाठी टाळ,चिपळ्या,मृदुंग ,तबला,पेटीचा सहारा घेत मुखाने विठ्ठलाच्या नामाचा गजर करत,मोठमोठ्यानी पोटाच्या तिडकीने अभंगांचे गायन मधुर स्वरात करणारा ,टाळ चिपळ्याच्या सान्निध्यात रमणारा हा वारकरी आपल्याला घराघरात दिसतो.कपाळी टिळा ,आवीर बुक्का लावुन आपल्या कर्मात रमणारा हा वैष्णवाचा मेळा वर्षभर मेहनत व नामस्मरणावर तरतो. असे म्हणतात की उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून व कर्मातून निर्माण करावा लागतो.
           हाच त्याग हेच कर्म पाठीशी बांधून  आमच्या या वारक-याचे पाऊल आषाढीला वळतात ते पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनाला.
            विठू माझा लेकूरवाळा
            संगें गोपाळाचा मेळा.
सर्व जातीधर्माच्या लोकांचा समुह अत्यंत आनंदाने एकमेकांचे विचार आचार विसरून लहान मोठा हा भेदभाव बाजुला ठेवून कुठलाही अविचार डोक्यात न ठेवता तो माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होवून  तो म्हणत असतो माऊली-माऊली व चालत असतो पंढरीच्या त्या वाटेवर ,ज्या त्याला भेटणार असतो 'पांडुरंग परब्रह्म श्रीहरी'.
        श्रीहरी पांडुरंगाला ज्या पुंडलिकाने त्याच्या आई वडिलांच्या सेवेपुढे आज्ञा केली --बा विठ्ठला ..ह्या विटेवर उभा रहा मग पाहीन मी तुला ...आई वडिलांची सेवा करत आहे......आणि त्या दिवसापासून पंढरीच्या राजा विटेवरी उभा आहे.म्हणून वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला आद्यस्थान आहे.पुंडलिकाच्या दर्शनाला देखील अग्रणी मानले जाते.
         चंद्रभागेत स्नान केले तर भूतलावरी सर्व तिर्थांचे स्नान केल्याचे पूण्य मिळते .क्षेत्र, तीर्थ म्हणून चंद्रभागा ओळखली जाते.नामदेवाच्या पायरीचे दर्शन. संत चोखोबांचे दर्शन याला विशेष महत्त्व आहे.
             प्रत्येक जातीचा संत पांडुरंगाचा भक्त आहे.नरहरी सोनार महादेवाचे भक्त होते पंढरपूरला राहणा-या या संतांची महती अशी होती की ते पांडुरंगाच्या दर्शनाला कधी जात नसत परंतु जेव्हां ते पांडुरंगाच्या दर्शनाला गेले तेव्हा हाताला पिंडास लागली व तेव्हाच परमेश्वराच्या रूपाचा प्रत्यय आला.तेव्हा पासून ते पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाले व पांडुरंगाच्या भक्ती रसात वाहून गेले.
    देवा तुझा मी सोनार
    तुझे नामाचा व्यवहार
    मन बुद्धीची चाकरी
    राम नाम सोने चोरी
अशा अप्रतिमअभंगाची  निर्मीती झाली.
     विठ्ठल नामाची शाळा भरली
     शाळा सुटताना तहान भुक हरली
त्याप्रमाणे वर्षभर कष्ट करणारा वारकरी पेरणी करतो व पिक विठ्ठलाच्या भरवशावर टाकुन आईच्या दर्शनाला निघतो.माहेरपणाला निघण्याची त्याची ही वेळ ठरलेली असते.संसाराच्या रहाटगाडग्यातुन पुन्हा तरून जाण्यासाठी त्याला याच भक्तीतुन शक्ती मिळते.
       संतमहंताच्या कार्याची प्रचिती घेताना--108वेळागंगेत स्नान करणारे एकनाथ महाराज,इंद्रायणीत गाथा बुडवल्यातरी शांत असणारे तुकोबाराय,आईवडिलांना देहान्त प्रायचित्त देणा-या समाजापुढे नतमस्तक होणारे ज्ञानेश्वर,देवाला घास भरवणारे मनस्वी नामदेव यांच्या आघात शक्तीतील एक थेंब म्हणजे माझी वारी अस म्हणणारा आमचा वारकरी -मनस्वी लाघवी,आनंदी,समर्पित भावनेने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो सर्वस्व अर्पण करतो
       आषाढी एकादशी निमित्त सर्व संताचा मेळा पंढरपूरला पालखी रुपात जमते.प्रत्येक संतानी समाजासाठी केलेल्या कार्याची महती पुनरुज्जीवीत होते
वारकरी सर्व संताच्या पालखीला स्वत:च्या खांद्यावर वाहून नेतो .पालख्यांची गळाभेट होते.पर्यायाने सर्व वारकरी पण गळाभेट घेतात.माऊलीच्या गजरात एकमेकांच्या सुखदुःखाची ओवाळणी पांडुरंग चरणी अर्पिली जाते.पंढरीच्या राजाकडुन सुखाचा ठेवा ,समविचाराची भावना,एकीचे बळ एकवटले जाते व पुन्हा वर्षभरासाठी त्याची साठवण करून वारकरी प्ररतीच्या वाटेला लागतात.
   पाऊले चालती पंढरीची वाट
   मिळे संसाराला दोर-नी रहाट
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
स्नेहलता कुलथे
मोबा 7588055882

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*माझे माहेर पंढरी*

================

*माहेर म्हटल की किती सुखद जागा आठवते अन् आज तर माझे माहेर पंढरी हा विषय देवुन महिला वर्गाला जणु माहेरच्या आठवणीत पाठवणी केली आहे.*

*महाराष्ट्र हा जास्त करून शेती प्रधान भाग आहे. इथे शेतकरी लोक जास्त अन् ही लोक भक्ती मार्गाने जाणारी लोक असतात आणि वारकरी लोक जास्त आहेत.म्हणुच भक्तिमार्गाना ओढा यानंमध्ये जास्त दिसुन येतो.*

*आषाढात पेरण्या मशागती पुर्ण होऊन शेतकरी लोक आपला भक्तीभाव जोपासत पंढरीच्या मार्गान दिंड्या घेवूनि मार्गस्त झालेली असतात जणु माहेरा सासुरवासिन जाते. तसा आनंद,उत्साह,प्रेम, प्रसंन्न मुद्रेन,हा लहान-थोर,तरूण-म्हातारी जणसमुदाय विठुमाऊलीला भेटावयास जातो.जणु मनी एकच भाव घेवुनी माझे माहेर पंढरी.*

विठुरायाचा जयघोष,मुखी नाम,मुखी जप,विठुरायाचाच.
यात सगळ्या जणु या लोकांच्या आधीव्याधी नाहिश्या होतात. अन् म्हातारी लोक जणु तरूणासारखी तरूणतुर्क  होऊन विठुगजर करत करत माऊली चरणी देह लीन होतात


काय नि किती वर्णु मी महिमा या विठोबाचा. लागे जीवा वेड विठुरायाचे.या मनभावात सारा जणसागर असतो अन् इद्रभागेच्या तरी जाऊन सारी मळभ,शिन,थकवा,कष्ट हि वारकरी लोक दुर सारतात.
आणि जणु आईजवळ आपली सुख-दुख सांगावित तशी हि भोळीभाबडी लोक आपल मन मनी विठु चरणी स्मरणी,दर्शनी व्यक्त करतात.जणु ही माऊली त्यांची सारी दु:ख आत्ताच दुर करणार आहेत.पंरतु त्यांच्या मनातल भाव तितकाच शक्तीशाली असतो.

म्हणुच या वेड्या मायेपोटी हा वारकरी माझ्या माहेरा पंढरपुरा जाऊन विठुरायाचरणी नतमस्तक होतो.

अन् या विठोबाच्या मुखड्याकडे पाहुन,तेथील निनाद,गुंज,जयघोष ऐकुन आपसुकच ओठातुन शब्द निघतात.

*माझे माहेर पंढरी*

*मुखी नाम असु दे*

 *रे नित्य श्रीहरि हरि*

*माझे माहेर हे पंढरी*

🖊🖊🖊🖊🖊🖊

*कल्पना जगदाळे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐












No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...