Saturday, 31 March 2018

बालपणीचे संस्कार भाग 01


बचत करण्याची चांगली सवय.

मुलांनो, आपणाला बचत करण्याची सवय लागणे हे फारच महत्त्वाचे आहे. बचत म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर फक्त पैशांचीच बचत येते. पैशाची बचत करणेही तर चांगली गोष्ट आहेच, त्यासोबत इतर काही गोष्टींची ही बचत करण्यास शिकलो, तर जीवनात आपणाला बरेच काही मिळू शकते. घरात, परिसरात, समाजात आणि शाळेत वावरताना आपणाला पदोपदी पैशांची बचत करण्याविषयी शिकवण दिली जाते आणि आपण सुद्धा वाडवडिलांची शिकवण लक्षात घेऊन आपल्याकडे खाऊसाठी आलेला पैसा आपल्या मिनीबँकेमध्ये नित्यनेमाने जमा करीत असतो. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे आपल्या मिनी बँकेत वर्षभरात बरीच रक्कम जमा होते. मग बचतीतून जमा झालेल्या रकमेतून आपणास आवश्यक असलेली वस्तू विकत घेता येऊ शकेल. ही बचत करण्याची सवय वाईट आहे, असे कोणीच म्हणणार नाही. उलट असे काम करणाऱ्या मुलांचे घरात व शाळेत कौतुक केले जाईल. बचतीची सवय जर शिस्तीत रूपांतरित होऊन त्यात नियमितपणा ठेवल्यास आयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगात नक्कीच मदत होऊ शकते. जीवनात फक्त पैशांची बचत महत्त्वाची आहे, असे नाही. इतर काही बाबतीत सुद्धा आपणास बचत करण्याची सवय लावून घेता येईल का ? त्यांची बचतसुद्धा पैशांच्या बचतीएवढेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. चला तर मग कोणकोणत्या बाबतीत आपणाला बचत करता येईल याचा आपण विचार करूया.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...