Friday, 30 October 2015

 🔵 " काव्यमंथन " चारोळी स्पर्धा
 🔴 दिनांक : 30 ऑक्टोबर 2015
 🔵 संयोजक व परिक्षक : सौ सुजाता ताई मोघे
 🔴 ग्राफिक्स : उत्कर्ष देवणीकर
 🔵 विषय :- " सय" / आठवण
******************************************

सयीवर सयी,
कितीच्या काही.
एक जाई तो दुसरी,
किती त्यांना घाई.

सुधीर काटे

******************************************

सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवते
जगण्याला अर्थ देते
हृदयी दाटूनी येते,
ती सय मला उमेद देते,
म्हणून मी जगते.

सुलभा कुलकणीॅ

******************************************

फुलांची शय्या नाही नशिबी
शेज माझी काट्यांनी सजून गेली ।
वैरीन झाली रात्र सजना
आठवण अश्रूंनी भिजून गेली

*अरविंद कुलकर्णी

******************************************

दिवस मजेचे बालपणीचे
तारूण्य हे सरून गेल
सांजवेळ ही आयुष्याची
मन आठवणीत विरून गेल

* अरविंद कुलकर्णी
******************************************

 तुझी आठवण प्रिये
माझ्या उरात दाटुन                    
तुज विन माझे
आता जगणे कठीण

संपत

******************************************

हे जाणे तुझे घडले अवचीत,
हुरहुर ह्या मनी कशी लावली?
नयनांनी बांध असे तोडले की,
आठवण अश्रूत भिजून गेली..

 @ उत्कर्ष देवणीकर....

******************************************

त्या भेटींची आठवण येवूनी,
दु:ख मनी असं भरुनी आलं..
मज डोळ्यांना हे अश्रु देवूनी,
मनं आठवणीत विरुनी गेलं...

  @ उत्कर्ष देवणीकर......

******************************************

 आठवणी तुज्या प्रिया...
आठवता या मनी...
भाव विभोर मन माझे....
प्रीतीच्या या सुरेल  क्षणी...
       @ उत्कर्ष देवणीकर...
******************************************

आठवण येते सखी,
त्या चिंब पावसाची....
वाट बघतोय चातक,
त्या मृग नक्षत्राची....
🔴गजानन वारणकर, नांदेड 🔴
******************************************

ती जा म्हणूनी जात नाही
ती ये म्हणूनी येत नाही,
पण ती पाठलाग सोडत नाही
मनात आठवणींना जागा नाही
असे कसे म्हणू मी ?

सुलभा  कुलकणीॅ.

******************************************

आज पुन्हा बघ तुझी,
आठवण मनात येऊन गेली.
झुळझुळ पाणी मंजुळ गाणी,
धमाल मोटेवरली.

सुधीर काटे
******************************************

आला पाऊसं पाऊसं मला सखी आठवली ।
जणू सांगावा सखीनं सरीसंगं पाठवली ॥
वाट पाहूनं पाहूनं जीव झाला येडा पिसा ।
सखी डोळ्यांत वसली सय उरी साठवली ॥

राजेसाहेब कदम

******************************************

🌹 शुभ सकाळ 🌹
=============
:II गोष्ट मनातली II::
============
सहज आज आठवली..
शाळेतली अधुरी कहाणी..
अजुन आहे कोरी तशी..
जराशी जुनी पुराणी..!!

भोसल्यांची ती होती..
खोसल्यांचा तो होता..
दिसायला ती सुंदर होती..
यथा तथाच तो होता..!!

बसत होते शेजारी पण..
ओळख ना झाली साधी..
कळले ना त्याचे त्याला..
प्रेमात तो पडला कधी..!!

चोरून तिज पाहे रोज..
पण धाडस ना बोलायला..
पाठीमागून जात असे..
नकळत घरी सोडायला..!!

किती क्षण आले गेले..
गाठावे ते क्षितिज कुठले..
नजरेचे ते खेळ सारे..
शब्दांना ना कंठ फुटले..!!

दिवस सरले वर्ष सरले..
आठवणीचे मेघ दाटले..
मनातल्या त्या गोष्टीने..
मनातले एक घर गाठले..!!
*******सुनील पवार.....

******************************************

वाहवा किती सार्या या साठवणी
काळजात दडवून ठेवलेल्या आठवणी
कशाला ठेवायच्या त्या दडवूनी
मनमोकळ्या लिहा आठवूनी
.. जागृती निखारे

******************************************

सुरासंगे वा-यावरून आली तुझी सय .....
विरहातील एकांताचे वाटेना झाले भय.....।

वाटते एकेक इंद्रधनू आठवण
करते आनंदी क्षणांची साठवण !

सुजाता मोघे
******************************************

प्रिती हसरी तुझीच ती
छेड़ते कधीची मजला..!
नजरेचा बान आठवण,
हृदयाला पुरता लागला..!!

✏ - - - - - - - जी.पी

******************************************

अश्रु येती नयनी,
आठवता काळे पाणी......
जीवन अर्पण केले त्यांनी,
भूमातेच्या चरणी...
🔴गजानन वारणकर, नांदेड 🔴
       👉🏼नांदेड👈🏼

******************************************

जीवनात काही  आठवणी
काही गोड तर काही कडू
चांगल्या लक्षात घ्याव्या
कडू विसरून जाव्या
 जागृती निखारे

******************************************

रातराणी फुलली
घरासी घरासी
तुझी याद आली
जरासी जरासी
* अरविंद कुलकर्णी

******************************************

आठवणी सुखाच्या,
नसतातच आठवणीत...
आठवणी दु:खाच्या मात्र,
आठवतात सदोदीत....

     @ उत्कर्ष देवणीकर...

******************************************

तुझ्या आठवणीत मला                  
माझ्या संपण्याचे भय                  
आता तुच माझा श्वास                  
अन् तुच माझी सय
संपत

******************************************

 विसरून दुष्काळ झळा
शेतकरी तलाठ्यादारी..!
आठवणी दुःखाच्या ठेवल्या,
पदरात बांधून दारोदारी..!!
✏ - - - - - - जी.पी
******************************************

तु माझ्यात इतकी भिनलीस की    
तुझी सय मला येते प्रत्येक श्वासाबरोबर
अन् तुझ्या मिलना सखे                                
माझा जीव हा झुरतो प्रत्येक श्वासाबरोबर

संपत
******************************************

झिडकारून निराशा
आठवणीत सज्ज झाला खरा..!
गाठी बांधून दुःख सर्व,
पेरणीस उभा झाला बरा..!!
✏ - - - - - - - - जी.पी
******************************************

आठवण तुझी निघता
मनाचा जाईल वाटते तोल..!
श्वासा श्वासाला दडला सखे ,
तुझ्या शब्दात आहे मोल..!!
✏ - - - - - - - जी.पी
******************************************

प्रिती वेडी तुझी सख्खे
आठवणीत वेडावत राही..!
भान नसे जीवनाचे,
गुंफण वेली मनातील पाही..!!
✏ - - - - - - - जी.पी
******************************************

तुझ्या विरहात मला                                    
माझ्या संपण्याचे भय                                      
आता तुच माझा श्वास                                      
अन् तुच माझी सय

संपत

******************************************

गुंतलेल्या हृदयाशी
सल बैसला काळजावरी..!
कधी वाटते प्रित वेडी,
घोर निराशा देहावरी..!!
✏ - - - - - - जी.पी
******************************************

तुझ्या त्या आठवणी,
मनं विचलीत करतात....
त्या मखमली आठवणी मज,
काट्या समं बोचतात...

    @ उत्कर्ष देवणीकर...
******************************************

आठवता ते पारतंत्र,
आठवले बलीदानी वीर...
नका करु तुम्ही मित्रांनो,
स्वतंत्र्यचा कसाही गैरवापर..

    @ उत्कर्ष देवणीकर....
******************************************

छळतात गं तुझ्या त्या,
भेटीच्या आठवणी...
येणार नाहीस परत तु,
माहीतं मज असोनी....

       @ उत्कर्ष देवणीकर..
******************************************

येईल परतून माते येथे
तुझ्याच जन्मा उदरी ..!
आठवण होता देशभक्ताची,
भगतसिंग पाहिला डोळा भरी..!!
✏ - - - - - - - जी.पी
******************************************

गेलीस का मज सोडुनी?
तुझ्या आठवणीच्या गुंत्यात..
जगतोय आजही असाच मी,
तुझ्या आठवणीच्या प्रेमात...

     @ उत्कर्ष देवणीकर..
******************************************

💥💥काव्यमंथन 💥💥
⛳चारोळी स्पर्धा ⛳
🌹🌹"सय "🌹🌹

सैनिकांची "सय "ही मोठया विरहाची |

नात्यांच्या पलीकडे जिम्मेदारीची ||

देश सेवा करी नित्य नियमांची |

भारत मातेवर नजर ना पडो कुण्या दुष्ट-दुष्मनाची ||
✏✏✒
आप्पासाहेब सुरवसे लाखनगांवकर
******************************************

🌸 चारोळी स्पर्धा 🌸
     आठवण - सय

1 )जा बाबांनो आठवणींनो
सताविता का मजला घेरून
पुढील जन्म तरी मजसाठी
सुख क्षणांना वेचण्यासाठी
- - - - - - - - - - - - -
2 )
किती काळ आठवणींना
पुन्हा पुन्हा जगवत रहायचं
जखमेवरची खपली काढून
पुन्हा पुन्हा जिवंत ठेवायचं
- - - - - - - - - - - - -
3 )
सुखद दु:खद आठवणींचा
प्रवाह अखंड वहात राहतो शीतलपासून दारूणपर्यंत भावपंचमीत बुडवून काढतो
- - - - - - - - - - - - -
4 )
बालपणीच्या आठवणी
मनातून जात नाहीत
आता फिरून ते दिवस
कधीच मिळणार नाहीत
- - - - - - - - - - - - -
5 )
डाचणार्या  सलणार्या
किती गोष्टी आयुष्यात!
सय येता त्या सर्वांची
अर्थ न उरे जगण्यात!
                 डाॅ. शरयू शहा.
- - - - - - - - - - - - -
******************************************

💥💥काव्यमंथन 💥💥

⛳🌼चारोळी स्पर्धा 🌼⛳

👪 "आठवण "👪

सासरी असता आठवण येते मज माहेराची |

माहेरी असता आठवण येते मज माझ्या राजाची ||

सख्या- मैत्रीणीच्या  मसलतीत असतो माझा राजाज नयनासमोर |

किती घालू मी घालू मनाला आवर आवर ||
✏✒✏✒✏✒✏
आप्पासाहेब सुरवसे लाखनगांवकर..
******************************************

आठवणीच्या आठवणी,
आठवणीतुनीच आठवतात...
आठवणी या आठवताना,
आठवणी आठवणीच का राहतात..?

     @ उत्कर्ष देवणीकर...

******************************************

स्वप्ने तुटली, स्वप्ने भंगली
मनामनाची नातें खुंटली
सुख हेच कां माझ्या भाळी
नशिबाची ही थट्टा आगळी
जागृती निखारे
******************************************

चारोळी स्पर्धेसाठी
सुखद सयींच तोरणं
मनाच्या चौकटीला
 दु:खद सयीचं बोचणं
 अन बेचैनी जीवनाला।
अंजना कर्णिक
******************************************

चारोळी -आठवण,
झिंम्माड पाऊस आठवांचा
त्यात चिंबचिंब  मन
हिंदोळा गत स्मृतिंचा
अवघ्या आयुष्यात तुफान।
अंजना कर्णिक

******************************************

स्मृती मंजूषेच्या कप्यात
दडली आठवणींची गाठोडी
उकलगांठ उकलतांना त्यात
 मिळाली  नाजूक नाती
जागृती निखारे
******************************************

अबोल तू असताना
मी शब्द बनुनी यावे
ओल्या अधरांवरती
पाकळी होऊन बरसावे

प्राजक्त तुझ्या ओठी
असाच बहरून यावा
त्याच्या सुवासा मध्ये
प्रेमरंग बहरावे

सखे सोडून दे अबोला
चांदणे धुंद मोहरले
तुझ्या भेटी साठी
हे हळवे मन विरघळले
प्रिया वैद्य
******************************************

सोडू नकोस स्वप्न जग जिंकण्याचे,
जरी साथीदार पेंगुळले आहे...
पहा तो येत आहे भानुराज,
आशा तुझी होऊ पाहे...

संपन्न कुलकर्णी
******************************************

धुक्यामाध्ल्या संध्याकाळी
निळसर वारा शीळ घालतो
तश्यात तुझी आठवण ओली
माझ्या मधला मी हरवतो
@ प्रिया वैद्य
******************************************

🌸 आठवण - सय 🌸
     
1 )
सुखदुःखांच्या आठवणींनी
अंत:करणी मांडली आरास
दबून गेलेय.. वाकून गेलेय
वाहून या..अवजड भारास
- -  - -  - -  - -  - -  - -
2 )
 सय येते बाळा...
 बोबड्या बोलाची ।
माझ्या मागे  मागे
दुडुदुडू धावण्याची ॥
-  -  -  -  -  -  -  -  -
3 )
आठवणींच्या धारेमध्ये
भिजल्या सार्या नरनारी ।
भावनांची ही रंग पंचमी
मन बनले आल्हादकारी ॥
-  -  -  -  -  -  -  -  -  -
4 )
येता माहेराची सय
आठवती दादामाय ।
वात्सल्य अरुणोदय
दूरच दू ऽ र तापत्रय ॥
-  -  -  -  -  -  -  -  -
5 )
साहित्यामधि .. गुंतता
कटु आठवणींचा..लय ।
मन बेचैनीचा .. विलय
अवघा आनंद प्रत्यय ॥
              डाॅ. शरयू शहा.
-  -  -  -  -  -  -  -  -  -

******************************************
काव्यमंथन
चारोळी स्पर्धा
विषय--आठव/सय
============
प्रेषक --- कुंदा पित्रे
============
आठवांच्या जखमा सोसण्याचे वय, निघुन गेले !!
त्या जखमांचे व्रण मिरविते आता
आयुष्य हे असे,तर या उंब-यावर थांबलेले !!
नव आठवांचे भान नाही आता

*****************************************

आठवणी सुखदुःखाच्या
लपून राहती कशा मनात ही..!
हळूवार वलयाकार घेता,
तेव्हा उफाळून वाहती प्रवाही..!!
✏ - - - - - - - जी.पी

******************************************

दु:ख म्हणालं सुखाला
किती कमी रे तुझ्या सयी ?
सुख म्हणालं,पण माझी एकटी
आयुष्य फुलवते की नाही?
सुधीर काटे
******************************************

गोफ गुंफला आठवणींचा
फेर धरला मनीमनाचा
सय येता चुके ठेका काळजाचा
कशी सावरू देह साठीचा.
        सुलभा कूलकणीॅ.

******************************************

अनेक आठवे आठवांची
वेणी करून गुंफतो  आहे
भास होण्या आधी त्याचा
गंध उराशी जपतो आहे
प्रिया वैद्य
******************************************

मनाच्या खोल कुपीत
झुलतो आठवणींचा हिंदोळा,
सय येता तुझी कातर वेळी,
जीव होतो गोळा...!!!
- अनुजा देशमुख
******************************************

आठव

सांजावल्यावेळी आठवांचा
थर साचतो!!
एक एक सय पुढे येता
गळा दाटून येतो!!
सयीचा गोतावळा,मागे जाता
हिंदोळा पुढे जातो!!
सखे ,सोबती ,साथी मिळता
जीव चिंब भिजतो !!
प्रेषक --कुंदा पित्रे
******************************************

बालपणीचा काळ सुखाचा
सर्वांनी याची आहे जाण
दिवस सरतात जसे जसे
आठवून ते सारे जाई प्राण

🎋 नागोराव सा. येवतीकर 🎋
******************************************

सय -

सय नेहमीच येते कातरवेळी
आईची माया दाटते उरी
साईचं दही व लोणच भात
प्रेमळ हात फिरे केसावरी
प्रेषक --कुंदा पित्रे
******************************************

🌸 आठवण 🌸

अ च्या बाराखडीने
प्रत्येक शब्दाची सुरुवात.-
1 )
अगतिक आयुष्याच्या
आर्त ओल्या आठवणी ।
 अस्वस्थ उद्वेगकारक
अतर्क्याची ओवाळणी ॥
-  -  -  -  -  -  -  -  -  -
2 )
आजवरची उलथापालथ
आंदोलते आतल्या आत ।
अस्थिरता अशांततेच्या
आठवणी अंत:करणात ॥
3 )
अंतर्मनावर आठवणींचे
अद्दश्य असे.. आवरण ।
अंतरामध्ये अमावास्येचे
अजूनही .... एकाकीपण ॥
-  -  -  -  -  -  -  -  -  -
4 )
अनुभवलेल्या आठवणी
अजून इथे अवतीभवती ।
आजवर अद्दष्ट अरिष्टानेच
ओवाळली आहे आरती ॥
-  -  -  -  -  -  -  -  -  -
5 )
अशातशा उन्हातल्या
अनवाणी आठवणी ।
इतरांना अज्ञेय अशा
अनुत्सुक आठवणी ॥
-  -  -  -  -  -  -  -  -
6 )
आठवणी .. इथवरच्या
एकात एक अडकलेल्या ।
 अनपेक्षित अकल्पितपणे
अवचित उसळून आल्या ॥
-  -  -  -  -  -  -  -  -  -
7 )
आठवणींनी अजूनही
आवंढा अडकतो आहे ।
अंतरात असह्य असा
ओरखडा उमटतो आहे ॥
             डाॅ. शरयू शहा.
-  -  -   -  -  -  -  -  -
******************************************

आठवण

आठवणी सोडून गेलो परदेशी
शिकलो,फिरलो,रमलो सारीकडे
ती दिसली,आठवाचं दार उघडलं
अन् भरधाव सुटलो भारताकडे
प्रेषक --कुंदा पित्रे.
******************************************

जागृती निखारे:
माझिया सख्यांना
आज माझी सय आली
आनंदभावनांच्या ओघातं
 मनं प्राजक्तांनी न्हाली
******************************************

आठवण
1.
म्हणता बाबा मी परक्याचे धन,
लवकरच कराल ही माझी पाठवण,
पण काय कराल बाबा,
जेव्हा येईल तुम्हां माझी आठवण.

2.
आठवणींच्या महासागरातही,
येते भरती अन् आहोटी,
निघतात जेव्हा माझ्या,
बालपणीच्या आठवणी .

3.
जीवन जगण्यासाठी,
लागे आठवणींचा आधार,
दुखदायी वाटेवरती,
हलका करण्या भार .

🌺🌺संदीप पाटील,नांदेड .

******************************************
***************** समाप्त *****************
******************************************

Sunday, 25 October 2015

मराठी भाषेचा विकास सर्वांच्या हाती 

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...