या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
Friday, 3 June 2016
शाळेचा पहिला दिवस - 15 जून
नेमिचि येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे जून महिना उजाडला की पावसाळ्याला जशी सुरूवात होते अगदी त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेलाही याच महिन्यात सुरूवात होते. जसे शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून नवीन उत्पन्न घेण्यासाठी पावसाची जशी चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहतो. अगदी तसेच शाळकरी मुले शाळा सुरू होण्याच्या तारखेकडे, शाळेच्या घण घण आवाज करणा-या घंटेकडे आतुरतेने वाट पाहत असतातच. तब्बल दीड ते दोन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज शाळेला सुरुवात होत आहे. उन्हाळ्यातील प्रचंड उष्णता, गरमी आणि तेवढाच वातावरणातील उकाडा, रोज घरातच बंदीस्त राहून, मित्राची ताटातूट झालेली, तेच ते कार्टून बघून सर्व मुलांना याचा ऊब आला असेल आणि शाळा सुरू होण्याची ते वाट बघत असतील असे म्हणणे आश्चर्याचे वाटणार नाही. नवीन शाळा, नवे मित्र , नव्या वर्गात प्रवेश करणा-या सर्वच मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता लागलेली असते. कधी एकदा शाळेत जाईन आणि नव्या मित्रांना नव्या शिक्षकांना भेटेन अशी उत्सुकता त्यांच्या मनात असते त्याचमूळे शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरतेने प्रतिक्षा करणारी बच्चे कंपनी जाम आनंदात असतात. नवीन मित्रांसोबतच नवी कोरी करकरीत पुस्तके त्यांना आकर्षित करतात. कधी एकदा पुस्तके हातात पडतात असे मुलांना वाटत असते आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके देण्याच्या शासनाच्या उपक्रमामुळे सुद्धा मुलांना या दिवसापर्यंत वाट पहावीच लागते. पूर्वी जेव्हा शाळेतून पुस्तक वाटप केल्या जात नव्हते तेव्हा पालक मंडळीकडे तगादा लावून बच्चे कंपनी शाळा सुरू होण्यापूर्वी बाजारातून पुस्तके खरेदी करीत असत तर काही जण जुने पुस्तके जवळच्या मित्रांकडून अर्ध्या किमतीत खरेदी करीत. तो व्यवहार घरातील मोठ्यांना न कळविता देणे घेण्याचा व्यवहार पूर्ण झाल्यावर सांगितले जायचे. त्यामुळे किती पैसा वाचविला याचे सुद्धा गणित करायचो. मात्र त्याची मजा आज नक्कीच नाही. पुस्तके मोफत मिळत असल्यामुळे जुन्या पुस्तकाना कोणी विचारीत नाही, फुकटात मिळणाऱ्या पुस्तकाची त्यांनाअजिबात महत्त्व वाटत नाही आणि बाजारातून खरेदी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामूळे सद्यस्थितीत पुन्हा पुन्हा वापरा पद्धतीला तिलांजली मिळाली असून वापरा आणि फेका अशी संस्कृती उदयास येत आहे, असे वाटते. त्यास्तव कागद निर्मितीसाठी पर्यावरणावर त्याचा अतिरिक्त भार पडत आहे, हे निराळेच.
शाळकरी मुलांसोबतच त्याच्या पालक वर्गांना सुद्धा शाळा कधी सुरू होते ? याची प्रतिक्षा लागून राहते. दिवसभर मुलांना नियंत्रणात ठेवणे, त्यांना कामात व्यस्त ठेवणे, त्यांचे मनोरंजन करणे, त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे खरोखरच कठीण काम असल्याची जाणीव पालकांना या सुट्टीच्या निमित्ताने नक्कीच झाली असेल यात शंका नाही. त्यास्तव शाळा सुरू होण्याची आतुरता पालक वर्गातही असतेच. सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात पालक आपल्या मुलांना वयाच्या तीन वर्षापासून शाळेत धाडत असतो. नर्सरी, एल.के.जी., व यु.के.जी. हे तीन वर्ष शाळा पूर्व तयारीच्या नावाखाली मुलांना शाळेत पाठविले जाते. परंतु त्यांची खरीखुरी शाळा ही वयाच्या सहाव्या वर्षी इयत्ता पहिली वर्गापासून सुरूवात होते. मुलाचे सहा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्यास इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश देऊ नये, यामागे शिक्षणतज्ञ मानसिक बाब स्पष्ट करतात. परंतु पालक या बाबीकडे साफ दुर्लक्ष करीत लहान वयातच मुलांना पहिल्या वर्गात प्रवेश देतात. साधारणपणे अशा मुलांना प्रवेश दिल्यानंतर याचे परिणाम तीन-चार वर्षानंतर बघावयास मिळतात आणि तोपर्यंत नक्कीच उशीर झालेला असतो. त्यास्तव ज्या मुलांची वय प्रवेश समयी सहा वर्षे पूर्ण झाले नाही त्यांना पहिल्या वर्गात पालकांनी प्रवेश देण्याचा हट्ट धरू नये. वयोमानानुसार अभ्यासक्रमाची रचना व आराखडा तयार केला जातो व कमी वयाच्या मुलांना दरवर्षी वर्ग बदलत गेल्यानंतर वरील वर्गाचा अभ्यासक्रम झेपत नाही. त्यामूळे अशी मुले अभ्यासापासून, शाळेपासून, गुणवत्तेपासून दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या मनात शाळा व अभ्यास याविषयी भीती निर्माण होते. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्याऐवजी न्यूनगंड निर्माण होते आणि त्याचा कधीच विकास होत नाही. अर्थातच ह्या मुलांना शाळेचा पहिला दिवस काय कोणताच दिवस आकर्षित करू शकत नाही. त्यास्तव आपल्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसाचेच नाही तर शाळेचे नेहमीच आकर्षण राहील याकडे शिक्षक आणि पालकानी लक्ष देणे आवश्यक आहे.
नागोराव सा.येवतीकर
मु.येवती, ता.धर्माबाद.
मो.9423625769
जागतिक पर्यावरण दिन - 05 जून लेख
पर्यावरण आणि मानवी जीवन
पृथ्वीवर सर्वात बुद्धीमान जर कोणी असेल तर तो मानव. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धीमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला. मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला. एखाद्या व्यक्तीकडून वा समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रती नेहमी कृतज्ञ राहतो, कधीही कृतघ्न होत नाही. हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीच पाळला नाही. त्यामुळे आज ''पर्यावरण वाचवा' यासारखे वाक्ये कानी पडत आहेत.
जगातील लोकांच्या मनात पर्यावरणविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी. पर्यावरणाचा र्हास थांबावा या उद्देशाने दि.५ जून हा दिवस जगात ''पर्यावरण दिन'' म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाविषयी खुप काही जागृती केल्यावर सुद्धा मानवाच्या वर्तनात किंचीतसुद्धा परिवर्तन झाले नाही, बदल झाला नाही. ही फारच काळजी करण्यासारखी आणि भविष्यात चिंतेची बाब आहे. जगप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ डॉ. रास पर्यावरण बद्दल म्हणतात की, 'मानवी जीवनावर परिणाम करणारी कोणतीही बाह्यशक्ती म्हणजे पर्यावरण होय.' वनस्पतीपासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांच्याच जीवनावर या पर्यावरणाचा प्रभाव आढळून येतो. पर्यावरणाशी जो योग्य प्रकारे समन्वय साधतो तोच या पर्यावरणात जिवंत राहू शकतो. मानवी जीवन सुद्धा याला अपवाद नाही. पर्यावरणाने मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत सोयीसह अन्य अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु मानवाच्या स्वार्थी, अज्ञानी, बेदरकारी, अडाणी, बेफिकीर, निर्धास्त आणि अविचारी वृत्तीने पर्यावरणाचा बेसुमार वापर करून त्याचा र्हास केल्यामुळे अनेक जटील समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणीय व्यवस्थेत असंतुलितपणा निर्माण होऊन प्राणीमात्रास धोका उत्पन्न होत आहे. मानवाच्या अविचारी वागण्यामुळे जल, हवा, ध्वनी, भूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. औद्योगिक व रासायनिक दुषितीकरणामुळे विविध प्रकारचे आजार वाढत आहेत. ओझोन वायूचा क्षय, आम्लपर्जन्य, सागरी परिसंस्थेचा असमतोल, प्राणी व पक्षी यांचे नामशेष, नागरीकरण, वाळवंटीकरण इत्यादी समस्येसोबत वातावरणात आकस्मिक बदल हे नित्याचेच झाले. त्यामुळे रोज नवे संकट आपणांसमोर तोंड वासून उभे होत आहे. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येकांनी सावधरित्या पाऊल उचलणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुंटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेऊन वागतो त्यामुळेच त्या कुंटुंबात सुख, समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. पर्यावरणाचे सुद्धा थोडेफार तसेच आहे. असे वाटत नाही काय? तसेच पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे हे ही ध्यानात असू द्यावे. पर्यावरणाचा र्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुंटुंबातील संख्या वाढ लागली की त्यांचे घर वाढतात आणि घरे बांधण्यासाठी जमिन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यासाठी कुंटुंब नियोजन सारख्या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार अधिक वेगात करणे आवश्यक आहे. लोकसंख्येला आळा घा तल्याशिवाय आपली कोणतीही प्रगती शक्य नाही व आपला देश महासत्ता होणार नाही.
पर्यावरणातून आपणांस हवा, पाणी आणि नैसर्गिक समृद्धी मिळते ज्याद्वारे आपण चांगले जीवन व्यतीत करू शकातो. अन्नाशिवाय मनुष्य एखादा दिवस जगू शकतो परंतु पाण्यावाचून तो जगू शकत नाही. मात्र मानवाने पाण्याचा उपसा करीत त्याचा गैरवापर केल्यामुळे आज देशात पाण्याची समस्या खुपच गंभीर बनत चालले आहे. देशातल्या एका भागात पाण्याने लोकं मरतात तर दुसर्या भागात पाण्यावाचून लोक तडफडून मरतात. काही लोक पाण्याचा पैसा करतात तर काही लोक पाण्यासाठी पैसे मोजतात. तीस एक वर्षापुर्वी जर असे म्हटले गेले की, लोक पाणी विकून पैसा करतात. या वक्तव्यावर ते लोक हसत होते आणि पाणी कोण विकत घेणार? असा सवाल करीत. पंरतू आज तेच लोक पैसे देऊन पाणी विकत घेत आहेत. खरोखरच पाण्याच्या या व्यवहाराने पर्यावरणाचा पूर्णत: समतोलपणा बिघडविला आहे. या बाबीकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. पाण्याची बचत व त्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय प्रत्येकांनी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे उपक्रमाची प्रत्येकांना जाणीव करून देणे व ज्या ठिकाणी सदरील उपक्रम यशस्वी झाले आहे अशा राळेगण सिद्धी किंवा हिवरे बाजार याठिकाणी भेटीचे प्रत्येकांनी करावे.
आपण अन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो मात्र हवेतील ऑक्सिजन शिवाय क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाही. आणि ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य पसरणातील वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात आणि हवेतील कार्बन डायक्साईड म्हणजे खराब हवा वायू शोषून मानवास उपयुक्त असे ऑक्सिजन म्हणजे शुद्ध हवा वायू हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती व वृक्षांची लागवड व संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. जंगलतोड फार मोठय़ा प्रमाणावर होतांना जंगल वाचविण्यासाठी व लोकांमध्ये वृक्षाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी ''चिपको आंदोलन'' चालविले आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले. वृक्षांचे महत्व अपरंपार आहे, हे आपल्या पूर्वजांनी सुद्धा जाणून होते. संत तुकाराम महाराज याविषयी म्हणतात की, ''वृक्षवल्ली, आम्हां सोयरे, वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती.'' खरंच वृक्ष हे आपले सगे सोयरे, नातलग, मित्र परिवारातीलच नव्हे कां? वृक्षांच्या महत्वाविषयी आपले पुर्वज संत, महात्मे आणि समाजसुधारकांनी ज्या बाबी सांगितल्या आहेत ते सामान्यांतल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्वाचे आहे.
जंगलतोड वाढत चालल्यामुळे दिवसेंदिवस वनाचे क्षेत्र कमी कमी होत आहे. त्यामुळे जंगलात वास्तव करून राहणारे पशू - पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांनी फक्त झू पार्क मध्येच एखादा प्राणी - पक्षी बघायला मिळेल की काय अशी शंका मनात येते. पूर्वी सकाळी पक्ष्यांच्या चिवचिव - किलबिल आवाजाने जाग यायची. आजही त्याच आवाजाने जाग येते. मात्र आजचा आवाज नैसर्गिक नसून ती मोबाईलची रिंगटोन असते. मोबाईलमुळे खूप दूरवरचे मित्र, कुटुंबातील सदस्य, नातलग आणि पाहुणे हे सर्व आपल्याजवळ असल्यासारखा भास होत आहे आणि आपल्या सहवासात असलेला निसर्ग मात्र दूर गेले आहे. त्यास्तव निदान वनाचे संरक्षण करण्यात आपण यशस्वी झालो तर पशू-पक्ष्यांचे आपोआप संरक्षण होईल. आपल्या जीवनाप्रमाणे पशू-पक्ष्यांचे जीवनसुध्दा महत्वाचे आहे हे विसरून चालणार नाही
आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. येथील एक तृतियांश जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. अधिक उत्पन्न काढण्याच्या स्वार्थासाठी शेतकरी आपल्या शेतीची जुनी पध्दत बंद केली असून, रासायनिक औषध व खताचा बेसुमार वापर करीत आहेत. त्यामूळे दिवसेंदिवस जमिनीचा कस तर नष्ट होतच आहे. शिवाय त्या रासायनिक घटकांचा प्रतिकूल परिणाम मानवाच्या आरोग्यावर होऊन हानी पोहोचत आहे. डीडीटी या किटकनाशक औषधाचा अति वापर केल्यामुळे किटकनाशक मानवाच्या शरीरात कशी पोहोचली जातात आणि ते पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचे सत्य कॉर्सने सन 1962 मध्ये सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडले होते. उत्पादन कमी निघाले तरी चालेल परंतु रासायनिक औषध व खताचा अनावश्यक वापर टाळून सेंद्रीय खताचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. सर्वच शेतकऱ्यांनी आपली संघटन तयार करून सेंद्रीय पध्दतीने शेती करण्याचे ठरविले तरच सर्वांना त्याचा फायदा होतो, हे लक्षात घ्यावे.
नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये सौर ऊर्जा हे कधीही न संपणारी संपत्ती आहे. भविष्यात सौर उर्जेच्या वापरात वाढ करणे म्हणजे एकप्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्यासारखे आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यकाळात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा जपून वापर करण्यातच शहाणपणा आहे. सोबतच अमर्यादित अश्या सौर उर्जेचा इंधनासाठी पर्याय म्हणून वापर करण्यासाठी सुरुवात केल्यास भविष्यातील अनेक संकटापासून मुक्तता मिळू शकेल. आज ज्या सौर उर्जेचा वापर नगण्य स्वरूपात आहे, म्हणजेच पूर्णपणे वाया जात आहे. त्याचा अनेक माध्यमातून विविध साधनाच्या मदतीने वापर करता येऊ शकते आणि पर्यावरणाचा असमतोल थांबविता येऊ शकेल. सौर बंब, सौर चूल, आणि सौर उर्जेवर चालणाऱ्या विविध उपकरण यांचा जनतेनी जास्तीत जास्त वापर कसे करू शकतील ? यांविषयी शासनाने महत्वाचे फायदेशीर निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती जि. नांदेड
९४२३६२५७६९
Thursday, 2 June 2016
📚 साहित्य दर्पण 📚
द्वारा आयोजित
📢नाद चारोळी स्पर्धा📢
==================
भाग :::---सातवा [ 7 वा]
~~~~~~~~~~~~~~~~
विषय :---सखा --सखी
★★★★★★★★
संकल्पना:--श्री आप्पासाहेब सुरवसे सर,बीड -उस्मानाबाद
≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠
संयोजक:--श्री.ना सा येवतीकर सर ,धर्माबाद
*************************
परीक्षक:--श्री.आप्पासाहेब सुरवसे, लाखणगांवकर
#################
भावनेचा सागर
एकांताचा वादळ वारा
प्रितीच्या होडीला सखी
लाभला तुझ्यामुळेच किनारा
✏✏
नरेंद्र म्हस्के , शिरपूर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
व्याकुळलो मी गतकाळाच्या स्मृतींनी तुझ्या
सुखचिंब सखी जीव सहवासात तुझ्या
पुनर्भेटीची आंस उरी लौकिकी आतुरी
स्वप्नांत भोगिली चैतन्य वीज देही तुझ्या
✒✒
बाबू फिलीप डिसोजा
@ - 39
निगडी, पुणे
💐💐💐💐💐💐💐
सखी आहे माझी
नक्षत्राची खाण।
तिच्यामुळे च मला
जगात आहे मान।
✏✒
कविता बडवे. बीड
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
शीतल जलाच्या सखीसाठी
झुरतोय हा चातकसखा
कधी मिळेल गारवा हृदयाला
वाट पाहत राही सारखा
✒🖋
- दिनेश चौडेकर@36
🔑🔑🔑🔑🔑🔑🔑
संसाररूपी नौका किनारा पार करण्यास,
सख्यास हवी समतोल सखी.
तरच त्यांचे जीवन होईल,
परिपुर्ण आणि सर्वार्थानी सखी
✒🖋✏
नागनाथ धोंगडे
@34
वाशी ,उस्मानाबाद
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
सखी माझी गोरी पान
दिसते खूप छान।
राखते सगळ्यांचा मान।
आहे घराची शान।
🖊🖋
कविता बडवे बीड
⌚⌚⌚⌚⌚⌚
"सखे माझ्या वरील असा कोणता तुझा रोष गं,
गेलीस सोडून मजला असा कोणता माझा दोष गं "
📝📝
श्री.सुरेंद्रकुमार आकोडे अमरावती
🎯🎯🎯🎯🎯🎯
चादंण्या आहे सोबतीला
सखी श्रृंगार करून ये
कातरवेळी माझ्यात
विसरून जाण्यास ये
✍🏻🖊🖊🖊🖋
संदीप ढाकणे@43
📱7588512467
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*तुझ्या माझ्या नात्याला आकार*
*द्यावा अस ठरवल*
*पण..*
*आकार देता देता ते*
*नातच हरवल..*
✍🖊
श्याम स्वामी
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
१
सखा झाला पांडुरंग
रखुमाई सखी.....
तरायाला भवसिंधू
हरिनाम मुखी....!!
=================
२
वाजवितो पावरी
सखा श्रीहरी.....
नका जाऊ सख्यानों
फिरा माघारी.....!!
==================
३
धरणी माय सखी पाहे
वाट डोळे लावूनी
धुवाधार बरस आता
सखा तिचा बनुनी.....!! (स्पर्धेसाठी)
==================
४
सख्या रे साज केला
आज तुझ्यासाठी...
व्याकुळ तुजविन सखी
नाव तुझेच रे ओठी....
===================
५
तुझा सखा ,आहे गं पक्का
हुकमी एक्का, सखे साजनी...
पुनवेचा चंद्र गं तो ...आणि
त्याची गं तू चांदनी.....!!
===================
श्री.पडवळ हणमंत
उपळे (मा.)ता.उस्मानाबाद.
869806756.
💈💈💈💈💈💈💈
सखे...तुझ्या माझ्या
प्रेमाला झाले एक पर्व
तुला झाला गर्व
संपले माझे सर्व
✍श्याम स्वामी
💐💐💐💐💐💐💐
संसारात रुसवा फुगवा
क्षणात ओसंडते प्रेम.!
सुखात बागडे सख्या,
तुमचे आमचे असे ते सेम.!
✏🖊🖊
गजानन पवार @81
⌚⌚⌚⌚⌚⌚⌚
सखा कृष्ण, राधा सखी
युगायुगांची तलखी
आचंद्रसूर्य निरखी
भक्ती नभी लखलखी
बाबू फिलीप डिसोजा
सभासद संख्या ३९
📢📢📢📢📢📢📢
प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलताना
सखे हवी तुझी निख्खळ साथ
नसेल शक्य ते ही तुला तरी किमान मरताना
असावा तुझा माझ्या हातात हाथ
✎ प्रा. नितीन दारमोड @ 3
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आकाश सखा, वसुंधरा सखी
क्षितिजाला मीलन आंस रेखी
अशक्य भेटी, परि रूखरूखी
आभाळ पाझरले देखादेखी
:बाबू फिलीप डिसोजा
@39
⌚⌚⌚⌚⌚⌚⌚
*नाद चारोळी*
चाँद पुनवाचा मातला परी
नाही तो उतला - उतला
तुझ्या सवे मोबाईलवर चोरून
बोलताना सखे बॅलेन्स संपला
✍🏼🖋🖊🎯🖋🖊
श्री.आप्पासाहेब सुरवसे
लाखणगांवकर
AMKSLWOMIAW
@ ४७
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नको ना रे सख्या,
वाजवू तु बासरी।।
बासरीच्या स्वरांनी,
जीवा होई कसेतरी।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
तु सखा मज भासे
गोकुळातील हरीसम
मी मजलाही समजते
सखी तुझी राधेसम
© स्मिता देशपांडे
@22
🔑🔑🔑🔑🔑🔑🔑
मी तुझ्यावर *कविता* करायची ठरवली
आणि कविता करता करता *सविता* च आठवली
कवितेची *मनिषा* आहे..
मनात *कल्पना* पण आहे..
*संगिताची* पण साथ आहे
सोबतच *आप्पा* चा हात आहे
मग का हा घात आहे.. ??
परत कविता करावी अशी *जागृती*
निर्माण झाली..
*कुंदा सुनंदा* ची मदत पण मिळाली
*रामदास* *हनुमंत* मदतीला आले
*देशमुख देशपांडे* मलाच मिळाले
प्रेमाची *पुजा* यशस्वी झाली
माझी *सखी* मला मिळाली
अशी माझी वि *जयश्री* झाली..
✍🏼✏🖋
श्याम स्वामी
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
आयुष्याच्या संध्याकाळी
हुरहुरणार्या या कातरवेळी
मज उणीव तुझी भासे सखी
लागली असे आता पानगळी.
-------------------------------------
"सखा"
आठवणींच्या या देशी
सखा साद तुज घालते मन
फीरुनी परतुनी येई परत
शब्द माझे बनुनी आर्वतन
🖋✏
© स्मिता देशपांडे
अ.न. 22
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
१
सखा मला प्राणप्रिय
माझा जीवनाधार
येऊ ना देई कधी सय
आहे सासरं, माझे माहेर
------------
२
सखा -सखीच्या नात्याला
पुरावा हवा कशाला
जन्मोजन्मीच्या प्रेमाला
द्यायलाच हवा कां दाखला
----------------
३
प्रेमाला व्यक्त माझ्या
करू कसे सांग सख्या
तुझी सखी मौनातच
मांडते रे गुज सख्या
----------
४
सखी, तुझ्यावर प्रेम करतो
असे बोलणे जमतच नाही
नयनातच छबी तुझी
मनी मानसातून जात नाही
© जागृती निखारे
२/६/२०१६.२.१५
~~~~~~~~~~~~~~~
नाते आपुले जरी पति-पत्नी चे, असू दे .
विश्वास आणि समर्पण त्यात वसू दे ,
सतत नाविण्य -प्रगल्भता त्यात दिसू दे ,
सखा -सखी चा आकार त्यास असू दे .
================
*सौ* *मंजुषा* *देशमुख* @४०📝
*अमरावती*
९४२२८८४१४०
~~~~~~~~~~~~~~
भाग ----2 संकलन
सखा- सखीचे हे नातेच असते गहिरे,
सागरासारखे अथांग खोल!
तरीही किनारा जपणारे,सांभाळणारे,
जसा शिंपातील,मोती अनमोल!
स्वाती केळकर @७१दादर,मुंबई २८
९८७०२५१९५१
&&&&&&&&&&&&&&&
🌹🌹🌹🌹🌹🌹
दृष्ट लागण्या तुम्ही दोघे
गाल बोट ही कुठे नसे
जग दोघांचे असेल सुखी
स्वर्ग त्या पुढे फिका पडे....
श्याम स्वामी सर
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
एक हाक देता सख्या,
धावून तू येशील ना,
मी सखी तुझी प्रिया,
जीव ओवाळशील ना...
✒🖊
निर्मला सोनी (28 )
💐💐💐💐💐💐💐
प्राणप्रिय माझी सखी
ना व तिचे समृद्धी।
दोघे मिळून करु या
सुखी संसाराची
वृद्धि
कविता बडवे@70
🌹🌹🌹🌹🌹
तुमचा आमचा संसार
चालत राहतो दुःखाचा.!
कल्पकतेची घालून झालर,
सख्या अवघा करावा सुखाचा.!!
✍🏻_____ गजानन पवार @81
🎩🎩🎩🎩🎩🎩🎩
माझे मन सख्या तू जाणून घे ना
नाही चहात साखर गोड मानून घे ना
नाही आमटीत मीठ जरा वरून घे ना
करपली पोळी गुमान खाऊन घे ना
✏✒
© सौ.शशिकला बनकर, भोसरी, पुणे
@35
🔑🔑🔑🔑🔑🔑
तूच माय बाप बंधू
तूच माझा सखा
भक्तीस कधी ना करी
विठ्ठला मजसी पारखा
प्राची देशपांडे
⌚⌚⌚⌚⌚⌚⌚
प्रपंचाच्या पंढरीत
पतिदेव पांडूरंग
किती गावू सखे बाई
त्याचे रोज मी अभंग
🖊🖋
© सौ.शशिकला बनकर
💈💈💈💈💈💈
-धन्य धन्य पंढरी
विठूराय विटेवरी
सखीसंगे निघाले
होऊन वारकरी
प्राची देशपांडे
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
सख्या सखीचे अंतःकरण
असावे गंगा जैसी वाहते.!
कधी हट्टी कधी कधी गट्टी,
सुंदर संसार वेली बहरते.!!
✍🏻_____ गजानन पवार @81
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
सप्तपदीची सात पावले
सख्यासंगे चालले
जन्मभराचे सौभाग्यलेणे लाभले
जीवन सफल झाले
🖊🖋
प्राची देशपांडे
💈💈💈💈💈💈
श्याम माझा सखा तू
अन् मी तुझी सखी रे
या नात्याला नाव नाहि
फक्त , प्रेम आहे गहिरे हे
📝 *मंजुषा* *देशमुख*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
का धरलास सांग अबोला
तुजविन सख्या नाही चैन
विरहात जीव झाला अर्धमेला
विसर सारे, सोड आता मौन
✒🖋
© सौ.शशिकला बनकर भोसरी
💈💈💈💈💈💈💈
सखा अन सखीची
खुप जुनी कहाणी
तिच्यासमोर शुन्य आहे
राजा अन राणी....
- सुनिल खंडेलवाल
पिंपरी चिंचवड, पुणे
8805011974
▪▪▪▪▪▪▪
सखी संगे उमा आली काननी
जाऊनी बसली गंगेतीराला
करती शिवपूजन दोघीजणी
पिता हिमालय शोधासी आला
प्राची देशपांडे
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
*नाद चारोळी*
_विषय:--सखा -सखी_
सखे माझा बंधू आहे
शब्दांचा ख़ास व्यापारी
तू त्याची जेव्हा होशील ख़ास
सखी शोभशील खरी नारी
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री.आप्पासाहेब सुरवसे
लाखणगांवकर
🌹ए के ४७🌹
♥♥♥♥♥♥♥
सखा मी तुझा जिवा-भावाचा
का मजवर रागविलीस तू
चल हात हाती दे माझ्या आधी,
सखी माझी प्राणप्रिया तू
📝 *मंजुषा* *देशमुख*
🔺🔺🔺🔺🔺
सखी माझ्यात होती,
अन् मी तिच्यात होतो...
आम्ही दोघे रुजलो,
एकमेकांत होतो...
✍🏻निलेश कवडे अकोला @ 44
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
~नाद चारोळी~
भाऊ माझा जरी नसेल तो सखा
मानलेला असे तो पाठीराखा
रक्षाबंधन नि भाऊबीजेला मज
ओवाळणी घालितो तो खासा
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री. आप्पासाहेब सुरवसे
लाखणगांवकर
🌹ए के ४७🌹
🎩🎩🎩🎩🎩🎩
-प्राणसखा तू माझा
मी सखी भाववेडी मीरा
कृष्णमय होऊन गेली
जणू कोंदणात हिरा
👁👁👁👁👁👁
सखे तुजला पाहता,
मनी मोर फुलला होता।।
बोलण्या तूज सवे परि,
मी शब्द भुलला होता।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050
[02/06 4:11 PM] Bankar Shashi Mam: अजूनही आठवते सख्या
तुझी माझी पहिली भेट
तुझ्यासाठी खास सजले
कॉलेज मध्ये गेले लेट
✏✒
© सौ.शशिकला बनकर @35
🔑🔑🔑🔑🔑🔑🔑
नाते आपुले प्रेमाचे
सखी जपून ठेव मनी
सखा आहे सोबतीला
आयुष्यभर क्षणोक्षणी
==================
सखे तुझ्या प्रेमाचं
याड लागलं मला
सैराट झाला सखा
शोधूनी फक्त तुला
==================
सखा सखी च्या जीवनाला
तेव्हाच येतो आकार
जेव्हा फुलतो प्रेमांकुर
सर्व होते साकार
=================
माझी सखी म्हणजे
आहे प्रेमाची सरिता
येतो प्रेमाचा पुर
माझ्या कुटुंबा करिता
================
टी.शंकर @33
नांदुरघाट
9011383535
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सखे तुझा संग घडला
आनंदाला उधाण आले.!
आयुष्याची सहचारिणी,
तुझ्यामुळे जीवन उजळले.!!
✍🏻____ गजानन पवार @81
💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾
आता रुसवा सोड सखी तू
मानून घे गोडवा ग
तुझ्या या केशसांभारात
माळू दे मला गजरा ग.
📝 *मंजुषा* *देशमुख*
⌚⌚⌚⌚⌚⌚
_नाद चारोळी_
सख्या प्रेमात गतप्राण झाले
हिरराँझा नि शाहजहाँ मुमताज
अन् सैराट होऊनी झिंगाट झाले
कलयुगात परश्या-आर्ची आज
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री .आप्पासाहेब सुरवसे
🌹ए के ४७🌹
🎯🎯🎯🎯🎯🎯
सख्या तू माझा मजनू
मी तुझी लैला
उशीर झाला शाळेत जायला
ये चहा प्यायला
© सौ.शशिकला बनकर
@35
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
*कहाणीत सखा सखीची अखंड साथ,
**साक्षीने धरलेल्या कसा सुटला तो हात,
*रेशमाच्या धाग्यापरिस नाजुक हे नातं ,
**काळाने झड़प घालावीं तसा नियतीने केला घात...
वृषाली वानखड़े....✍🏻
*75*
🌴अमरावती
💈💈💈💈💈💈
***********************
भाग----7वा
विषय---सखा--सखी
1]
सखा तेथे सखी जीवनाचे
समीकरण असते
सखी शिवाय सख्याचे
आयुष्य अधुरेच असते.
***********************
2] विटेवरी उभा हरी
सखा देव पांडुरंग
रुप नेत्री न्याहळीता
चित्त माझे झाले दंग
***********************
3 ] कल्पनेच्या जगात
वास्तवाला ही स्थान असावं
सखा--सखीच्या दिव्य प्रेमात
त्यागाच भान असावं
***********************
4 ] सखे तु जवळ असताना
स्वतःला विसरतो
दुर तु गेल्यावर
तुला क्षणोक्षणी आठवती
***********************
5 ] दुर उभा का असा
सख्या जाऊ नको रे
जगणे अशक्य तुझ्या विना
अंगाई विरहाची गाऊ नको रे
सौ मीना सानप ,बीड
*********************
सखीनं प्रेम आहे सख्यावर
हे केव्हाच त्याला सांगितलं,
पण बोलता येत नव्हतं
म्हणून डोळ्यांचं सहकार्य मागितलं
सुनंदा पाटील
@ 57, मुंबई
👁👁👁👁👁👁👁
सखा- सखीचे,हे नातेच असते गहिरे,
अन् सागरासारखे अथांग खोल!
तरीही किनारा जपणारे,सांभाळणारे,
जसा शिंपल्यातला, मोती अनमोल!
स्वाती केळकर @७१ दादर मुंबई २८
९८७०२५१९५१
@@@@@@@@@@@@
🔑🔑🔑🔑🔑🔑🔑
सखे तुझ्या गालावरच्या लालीशी
सूर्यसुद्धा स्पर्धा करतोय
जणू त्यालाही अंधारूंन टाकणारा
नवा सूर्य उगवतोय
📝📝📝📝📝📝📝
सखे तुला पाहिल्यावर
माझं आयुष्य माझं नसतं
सखे तू जवळ नसतांना
हे जग वाळवंट वाटू लागतं
*🎭प्रविण सानप*
*धुळे @29*
⌚⌚⌚⌚⌚⌚
गझल - सख्या
चोरले का काळजाला हासताना तू सख्या रे
सोडले का बंधनांना बोलताना तू सख्या रे
तोच का तू भेटलेला ओढ का वाटे कळेना जोडले का आज नाते भेटताना तू सख्या रे
काळजाच्या कुंपणाचे बंद होते भाव सारे
खोलले का कुंपणाला पाहताना तू सख्या रे
चांदणीला भेटण्याला चंद्र आला आज वाटे
लाजला का प्रेम पाशा जोडताना तू सख्या रे
रातराणी बहरलेली केवड्याला भाळलेली
धुंद झाला मोगऱ्याला माळताना तू सख्या रे
© सौ.शशिकला बनकर, भोसरी, पुणे
@35
💐💐💐💐💐💐
सख्या पांडुरंगा केलीस करणी ,
लागला झुरणी जीव माझा ...
देहाचे हे खोड़ उगाळी चंदन ,
करिते वंदन पंढरीचा राजा ...
*प्रा.संगीता भालसिंग
🌹🌹🌹🌹🌹🌹
कायम कवीची कविता सखी
सुखदुःखात सांगतीण राखी
शब्दांत व्यक्त भावना अंतरी
सखा लेखणीशी इमान राखी
:बाबू फिलीप डिसोजा
सभासद संख्या ३९
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
शृंगाराच्या साजास
सख्या तुच मोल जाणी|
ओठावरची लाली नि
सोड रे तु गजऱयाची वेणी||
===================
2)
==================
सोडून पाश बाहूचे
सख्या सिमारक्षणार्थ गेलासी |
एक एक रात तुझसाठी
सखीने डोळ्यात जागवल्यांसी ||
==================
3)
===================
प्रेमात नकोत मज
सुर्य,चंद्र अन् तारे |
जन्मजन्मांतरीची साथ
सख्या तुज सखीस दे रे ||
==================
4)
===================
सखा ‘चंद्र’ तो प्रेमात
नित्यनवा रोज भासे |
अन् सखी ‘चांदणी’ ती
प्रेमात वेडीपिसी दिसे ||
===================
5)
===================
तो ‘चंद्रसखा’ प्रेमात जागे
काळोख मिटविण्या |
अन् ती ‘ सखीरात्र’ साथ
देई दिस उजडण्या
कल्पना जगदाळे@8★बीड
📲9921967040
=================
💄💄💄💄💄💄
सखे माझ्या मनातील गुलाब
तुझ्यासाठीच उमलतो आहे
तु येशील या आशेवरच
कितीतरी वादळं झेलतो आहे
🎭प्रविण सानप*
*धुळे @29*
💃🏾💃🏾💃🏾💃🏾
1) सखा सखी चाके दोन
संसाराचा मेळ
इंद्रधनुचा पदर छान
दोघांचा जमवा खेळ
🍁
2) स्पर्धेसाठी-- 👇
कृष्णसखा वाजवी मुरली
राधासखी अद्वैताची मुर्ती
युगायुगाची झिंग ती आली
बिलगे आकाशी मधूरा पुर्ती
🍁 ☝ 🍁
3) पापण्यांचे कांठ मोडून
सख्या मन बेभान झाले
दाट दुःखाचे ओझे घेऊन
सखीचे जिणं वैराण झाले
🍁
4) कां कोवळ्या क्षणी
असती अरूप मोह!
स्मृतिगंध जाणवे तो
अस्फुट मल्मली छाव!
त्यांच्या स्थळीच कांही
नसती असीम दाह!
जपते सांजवेळी ,सखी गं
मनचे अबोल भाव!
🍁
5) सखे तुझ्या डोळ्यात बुडताना
जागी झाली निळी गाणी!
स्वप्नांचा शेला पांघरताना
प्रेम मंदिर झाले सजणी!
🍁प्रेषक--कुंदा पित्रे (46)
मुंबई 28
9424742706 🍁
🎯🎯🎯🎯🎯🎯
भारतीय हिंदू समाजात अर्धवट सखी तुझ्याशिवाय असे सखा अर्धनारीनटेश्वर आहे येथे जीव शिव शंकर पार्वती सखा -------
-७७रामदास देशमुख. तामसी (वाशिम )९९७५१९०३६१
🕹🕹🕹🕹🕹🕹
सागर किनारी कातळी,
सखे तुझी पाहता वाट।।
तव येण्याचा होई भास,
जलभरतीची येता लाट।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
राम झाले उष्ट्या बोरावर तृप्त
कृष्ण सखीच्या हाकेवर लुब्ध
माणसा किती हावरट होशील
निस्वार्थ कामास हो उपलब्ध....
.......जयश्री पाटील
🎩🎩🎩🎩🎩🎩🎩
"तप्त सखी वसुला शमविण्या
सखा मेघ आज बरसला हळुवार,
या प्रेममिलनाचा मृदगंध
दरवळला आसमंतात अलवार"
-संगीता देशमुख,वसमत @14
⌚⌚⌚⌚⌚⌚⌚
सखा आणि सखीचं...
हे नातं अनोखं प्रीतीचं
तल्लीन सदा एकमेकांत
न राहते भान रीतीचं...!!
👆🏻 स्पर्धेसाठी 👆🏻
आज असा अचानक
सख्या तू समोर आलास
काही क्षणांसाठी का होईना
तू माझा होऊन गेलास ....
हे आगळं-वेगळं प्रेम आपलं
सख्या असंच राहू दे कायम
हे जगावेगळं प्रेम आपलं
सख्या असंच राहू दे कायम...
संपूर्ण रात्र जागवतात
सख्या आठवणी या तुझ्या
तरीही आवश्यक आहेत त्या
सख्या जगण्यासाठी माझ्या
-जयश्री हातागले
👁👁👁👁👁👁
हा जीवन भव सिंधू तराया पर्याय नाही सखी शिवाय संसाररूपी रथ चालत नाही सख्या सारथी तुझ्याशिवाय...
रामदास देशमुख
💈💈💈💈💈💈💈
सागर किनारी बागडू सख्या वेगे धावत येई घरचे पाश सुटत नाहीत सखी सांगना कसा येई.....
🖋
रामदास देशमुख
🔑🔑🔑🔑🔑🔑
माझ्या सुखात तू माझ्या दुःखात तू..
सखी तू सर्वस्व आहेस माझे
जीवनसाथी म्हणून सोबतीस आलीस तू
सखा आहे मी तुझा हे परम भाग्य माझे.
✍🏻प्रWIN दाभाडे पाटिल,कन्नड.✍🏻
THE-🅿4⃣📧✔📧®
💈💈🖋💈💈
सखे तुझ्या सोबतीने माझ्या आयुष्यात
प्रत्येक क्षण आनंदाचा यावा
जसा फुलांचा सुगंध हवेत दरवळतो
तसा तो तुझ्या सख्याच्या जीवनात दरवळावा
✍🏻प्रWIN दाभाडे पाटिल,कन्नड✍🏻
🅿D4⃣📧✔📧®
🔴♥🔴♥🔴♥🔴
तुझे माझे प्रेम म्हणजे धरती व
आकाश
म्हणूनच माझे जीवनझाले
भकास
कारण धरती आकाश मिळत नाही
आपले कसेच जुळत नाही...
श्री.श्याम स्वामी
हिंगोली
🌹@ 13🌹
💈💈💈💈💈💈💈
"हे सख्या तुजसाठी
मी परीक्षा दिली कौमार्याची,
पण लक्षात ठेव
विटंबना केलीस स्त्री जातीची"
🖋🖊✒
संजय माचेवार
🙏गृपबाहेरील 🙏
💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾
स्वर्ग सुख देते सख्या,
तुझे मनसोक्त हसणे. ..
तुझ्या आनंदाच होते
माझे द्विगुणित जगणे.
✏🖋✒
सौ संगीता अंबोले
ग्रुप बाहेरील
🌹💐💐💐🌹
★★★★★★★★
संकलन:---सौ .कल्पना जगदाळे -दिघे, बीड
★★★★★★★★
द्वारा आयोजित
📢नाद चारोळी स्पर्धा📢
==================
भाग :::---सातवा [ 7 वा]
~~~~~~~~~~~~~~~~
विषय :---सखा --सखी
★★★★★★★★
संकल्पना:--श्री आप्पासाहेब सुरवसे सर,बीड -उस्मानाबाद
≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠
संयोजक:--श्री.ना सा येवतीकर सर ,धर्माबाद
*************************
परीक्षक:--श्री.आप्पासाहेब सुरवसे, लाखणगांवकर
#################
भावनेचा सागर
एकांताचा वादळ वारा
प्रितीच्या होडीला सखी
लाभला तुझ्यामुळेच किनारा
✏✏
नरेंद्र म्हस्के , शिरपूर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
व्याकुळलो मी गतकाळाच्या स्मृतींनी तुझ्या
सुखचिंब सखी जीव सहवासात तुझ्या
पुनर्भेटीची आंस उरी लौकिकी आतुरी
स्वप्नांत भोगिली चैतन्य वीज देही तुझ्या
✒✒
बाबू फिलीप डिसोजा
@ - 39
निगडी, पुणे
💐💐💐💐💐💐💐
सखी आहे माझी
नक्षत्राची खाण।
तिच्यामुळे च मला
जगात आहे मान।
✏✒
कविता बडवे. बीड
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
शीतल जलाच्या सखीसाठी
झुरतोय हा चातकसखा
कधी मिळेल गारवा हृदयाला
वाट पाहत राही सारखा
✒🖋
- दिनेश चौडेकर@36
🔑🔑🔑🔑🔑🔑🔑
संसाररूपी नौका किनारा पार करण्यास,
सख्यास हवी समतोल सखी.
तरच त्यांचे जीवन होईल,
परिपुर्ण आणि सर्वार्थानी सखी
✒🖋✏
नागनाथ धोंगडे
@34
वाशी ,उस्मानाबाद
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
सखी माझी गोरी पान
दिसते खूप छान।
राखते सगळ्यांचा मान।
आहे घराची शान।
🖊🖋
कविता बडवे बीड
⌚⌚⌚⌚⌚⌚
"सखे माझ्या वरील असा कोणता तुझा रोष गं,
गेलीस सोडून मजला असा कोणता माझा दोष गं "
📝📝
श्री.सुरेंद्रकुमार आकोडे अमरावती
🎯🎯🎯🎯🎯🎯
चादंण्या आहे सोबतीला
सखी श्रृंगार करून ये
कातरवेळी माझ्यात
विसरून जाण्यास ये
✍🏻🖊🖊🖊🖋
संदीप ढाकणे@43
📱7588512467
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*तुझ्या माझ्या नात्याला आकार*
*द्यावा अस ठरवल*
*पण..*
*आकार देता देता ते*
*नातच हरवल..*
✍🖊
श्याम स्वामी
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
१
सखा झाला पांडुरंग
रखुमाई सखी.....
तरायाला भवसिंधू
हरिनाम मुखी....!!
=================
२
वाजवितो पावरी
सखा श्रीहरी.....
नका जाऊ सख्यानों
फिरा माघारी.....!!
==================
३
धरणी माय सखी पाहे
वाट डोळे लावूनी
धुवाधार बरस आता
सखा तिचा बनुनी.....!! (स्पर्धेसाठी)
==================
४
सख्या रे साज केला
आज तुझ्यासाठी...
व्याकुळ तुजविन सखी
नाव तुझेच रे ओठी....
===================
५
तुझा सखा ,आहे गं पक्का
हुकमी एक्का, सखे साजनी...
पुनवेचा चंद्र गं तो ...आणि
त्याची गं तू चांदनी.....!!
===================
श्री.पडवळ हणमंत
उपळे (मा.)ता.उस्मानाबाद.
869806756.
💈💈💈💈💈💈💈
सखे...तुझ्या माझ्या
प्रेमाला झाले एक पर्व
तुला झाला गर्व
संपले माझे सर्व
✍श्याम स्वामी
💐💐💐💐💐💐💐
संसारात रुसवा फुगवा
क्षणात ओसंडते प्रेम.!
सुखात बागडे सख्या,
तुमचे आमचे असे ते सेम.!
✏🖊🖊
गजानन पवार @81
⌚⌚⌚⌚⌚⌚⌚
सखा कृष्ण, राधा सखी
युगायुगांची तलखी
आचंद्रसूर्य निरखी
भक्ती नभी लखलखी
बाबू फिलीप डिसोजा
सभासद संख्या ३९
📢📢📢📢📢📢📢
प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलताना
सखे हवी तुझी निख्खळ साथ
नसेल शक्य ते ही तुला तरी किमान मरताना
असावा तुझा माझ्या हातात हाथ
✎ प्रा. नितीन दारमोड @ 3
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आकाश सखा, वसुंधरा सखी
क्षितिजाला मीलन आंस रेखी
अशक्य भेटी, परि रूखरूखी
आभाळ पाझरले देखादेखी
:बाबू फिलीप डिसोजा
@39
⌚⌚⌚⌚⌚⌚⌚
*नाद चारोळी*
चाँद पुनवाचा मातला परी
नाही तो उतला - उतला
तुझ्या सवे मोबाईलवर चोरून
बोलताना सखे बॅलेन्स संपला
✍🏼🖋🖊🎯🖋🖊
श्री.आप्पासाहेब सुरवसे
लाखणगांवकर
AMKSLWOMIAW
@ ४७
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नको ना रे सख्या,
वाजवू तु बासरी।।
बासरीच्या स्वरांनी,
जीवा होई कसेतरी।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
तु सखा मज भासे
गोकुळातील हरीसम
मी मजलाही समजते
सखी तुझी राधेसम
© स्मिता देशपांडे
@22
🔑🔑🔑🔑🔑🔑🔑
मी तुझ्यावर *कविता* करायची ठरवली
आणि कविता करता करता *सविता* च आठवली
कवितेची *मनिषा* आहे..
मनात *कल्पना* पण आहे..
*संगिताची* पण साथ आहे
सोबतच *आप्पा* चा हात आहे
मग का हा घात आहे.. ??
परत कविता करावी अशी *जागृती*
निर्माण झाली..
*कुंदा सुनंदा* ची मदत पण मिळाली
*रामदास* *हनुमंत* मदतीला आले
*देशमुख देशपांडे* मलाच मिळाले
प्रेमाची *पुजा* यशस्वी झाली
माझी *सखी* मला मिळाली
अशी माझी वि *जयश्री* झाली..
✍🏼✏🖋
श्याम स्वामी
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
आयुष्याच्या संध्याकाळी
हुरहुरणार्या या कातरवेळी
मज उणीव तुझी भासे सखी
लागली असे आता पानगळी.
-------------------------------------
"सखा"
आठवणींच्या या देशी
सखा साद तुज घालते मन
फीरुनी परतुनी येई परत
शब्द माझे बनुनी आर्वतन
🖋✏
© स्मिता देशपांडे
अ.न. 22
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
१
सखा मला प्राणप्रिय
माझा जीवनाधार
येऊ ना देई कधी सय
आहे सासरं, माझे माहेर
------------
२
सखा -सखीच्या नात्याला
पुरावा हवा कशाला
जन्मोजन्मीच्या प्रेमाला
द्यायलाच हवा कां दाखला
----------------
३
प्रेमाला व्यक्त माझ्या
करू कसे सांग सख्या
तुझी सखी मौनातच
मांडते रे गुज सख्या
----------
४
सखी, तुझ्यावर प्रेम करतो
असे बोलणे जमतच नाही
नयनातच छबी तुझी
मनी मानसातून जात नाही
© जागृती निखारे
२/६/२०१६.२.१५
~~~~~~~~~~~~~~~
नाते आपुले जरी पति-पत्नी चे, असू दे .
विश्वास आणि समर्पण त्यात वसू दे ,
सतत नाविण्य -प्रगल्भता त्यात दिसू दे ,
सखा -सखी चा आकार त्यास असू दे .
================
*सौ* *मंजुषा* *देशमुख* @४०📝
*अमरावती*
९४२२८८४१४०
~~~~~~~~~~~~~~
भाग ----2 संकलन
सखा- सखीचे हे नातेच असते गहिरे,
सागरासारखे अथांग खोल!
तरीही किनारा जपणारे,सांभाळणारे,
जसा शिंपातील,मोती अनमोल!
स्वाती केळकर @७१दादर,मुंबई २८
९८७०२५१९५१
&&&&&&&&&&&&&&&
🌹🌹🌹🌹🌹🌹
दृष्ट लागण्या तुम्ही दोघे
गाल बोट ही कुठे नसे
जग दोघांचे असेल सुखी
स्वर्ग त्या पुढे फिका पडे....
श्याम स्वामी सर
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
एक हाक देता सख्या,
धावून तू येशील ना,
मी सखी तुझी प्रिया,
जीव ओवाळशील ना...
✒🖊
निर्मला सोनी (28 )
💐💐💐💐💐💐💐
प्राणप्रिय माझी सखी
ना व तिचे समृद्धी।
दोघे मिळून करु या
सुखी संसाराची
वृद्धि
कविता बडवे@70
🌹🌹🌹🌹🌹
तुमचा आमचा संसार
चालत राहतो दुःखाचा.!
कल्पकतेची घालून झालर,
सख्या अवघा करावा सुखाचा.!!
✍🏻_____ गजानन पवार @81
🎩🎩🎩🎩🎩🎩🎩
माझे मन सख्या तू जाणून घे ना
नाही चहात साखर गोड मानून घे ना
नाही आमटीत मीठ जरा वरून घे ना
करपली पोळी गुमान खाऊन घे ना
✏✒
© सौ.शशिकला बनकर, भोसरी, पुणे
@35
🔑🔑🔑🔑🔑🔑
तूच माय बाप बंधू
तूच माझा सखा
भक्तीस कधी ना करी
विठ्ठला मजसी पारखा
प्राची देशपांडे
⌚⌚⌚⌚⌚⌚⌚
प्रपंचाच्या पंढरीत
पतिदेव पांडूरंग
किती गावू सखे बाई
त्याचे रोज मी अभंग
🖊🖋
© सौ.शशिकला बनकर
💈💈💈💈💈💈
-धन्य धन्य पंढरी
विठूराय विटेवरी
सखीसंगे निघाले
होऊन वारकरी
प्राची देशपांडे
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
सख्या सखीचे अंतःकरण
असावे गंगा जैसी वाहते.!
कधी हट्टी कधी कधी गट्टी,
सुंदर संसार वेली बहरते.!!
✍🏻_____ गजानन पवार @81
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
सप्तपदीची सात पावले
सख्यासंगे चालले
जन्मभराचे सौभाग्यलेणे लाभले
जीवन सफल झाले
🖊🖋
प्राची देशपांडे
💈💈💈💈💈💈
श्याम माझा सखा तू
अन् मी तुझी सखी रे
या नात्याला नाव नाहि
फक्त , प्रेम आहे गहिरे हे
📝 *मंजुषा* *देशमुख*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
का धरलास सांग अबोला
तुजविन सख्या नाही चैन
विरहात जीव झाला अर्धमेला
विसर सारे, सोड आता मौन
✒🖋
© सौ.शशिकला बनकर भोसरी
💈💈💈💈💈💈💈
सखा अन सखीची
खुप जुनी कहाणी
तिच्यासमोर शुन्य आहे
राजा अन राणी....
- सुनिल खंडेलवाल
पिंपरी चिंचवड, पुणे
8805011974
▪▪▪▪▪▪▪
सखी संगे उमा आली काननी
जाऊनी बसली गंगेतीराला
करती शिवपूजन दोघीजणी
पिता हिमालय शोधासी आला
प्राची देशपांडे
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
*नाद चारोळी*
_विषय:--सखा -सखी_
सखे माझा बंधू आहे
शब्दांचा ख़ास व्यापारी
तू त्याची जेव्हा होशील ख़ास
सखी शोभशील खरी नारी
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री.आप्पासाहेब सुरवसे
लाखणगांवकर
🌹ए के ४७🌹
♥♥♥♥♥♥♥
सखा मी तुझा जिवा-भावाचा
का मजवर रागविलीस तू
चल हात हाती दे माझ्या आधी,
सखी माझी प्राणप्रिया तू
📝 *मंजुषा* *देशमुख*
🔺🔺🔺🔺🔺
सखी माझ्यात होती,
अन् मी तिच्यात होतो...
आम्ही दोघे रुजलो,
एकमेकांत होतो...
✍🏻निलेश कवडे अकोला @ 44
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
~नाद चारोळी~
भाऊ माझा जरी नसेल तो सखा
मानलेला असे तो पाठीराखा
रक्षाबंधन नि भाऊबीजेला मज
ओवाळणी घालितो तो खासा
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री. आप्पासाहेब सुरवसे
लाखणगांवकर
🌹ए के ४७🌹
🎩🎩🎩🎩🎩🎩
-प्राणसखा तू माझा
मी सखी भाववेडी मीरा
कृष्णमय होऊन गेली
जणू कोंदणात हिरा
👁👁👁👁👁👁
सखे तुजला पाहता,
मनी मोर फुलला होता।।
बोलण्या तूज सवे परि,
मी शब्द भुलला होता।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050
[02/06 4:11 PM] Bankar Shashi Mam: अजूनही आठवते सख्या
तुझी माझी पहिली भेट
तुझ्यासाठी खास सजले
कॉलेज मध्ये गेले लेट
✏✒
© सौ.शशिकला बनकर @35
🔑🔑🔑🔑🔑🔑🔑
नाते आपुले प्रेमाचे
सखी जपून ठेव मनी
सखा आहे सोबतीला
आयुष्यभर क्षणोक्षणी
==================
सखे तुझ्या प्रेमाचं
याड लागलं मला
सैराट झाला सखा
शोधूनी फक्त तुला
==================
सखा सखी च्या जीवनाला
तेव्हाच येतो आकार
जेव्हा फुलतो प्रेमांकुर
सर्व होते साकार
=================
माझी सखी म्हणजे
आहे प्रेमाची सरिता
येतो प्रेमाचा पुर
माझ्या कुटुंबा करिता
================
टी.शंकर @33
नांदुरघाट
9011383535
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सखे तुझा संग घडला
आनंदाला उधाण आले.!
आयुष्याची सहचारिणी,
तुझ्यामुळे जीवन उजळले.!!
✍🏻____ गजानन पवार @81
💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾
आता रुसवा सोड सखी तू
मानून घे गोडवा ग
तुझ्या या केशसांभारात
माळू दे मला गजरा ग.
📝 *मंजुषा* *देशमुख*
⌚⌚⌚⌚⌚⌚
_नाद चारोळी_
सख्या प्रेमात गतप्राण झाले
हिरराँझा नि शाहजहाँ मुमताज
अन् सैराट होऊनी झिंगाट झाले
कलयुगात परश्या-आर्ची आज
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री .आप्पासाहेब सुरवसे
🌹ए के ४७🌹
🎯🎯🎯🎯🎯🎯
सख्या तू माझा मजनू
मी तुझी लैला
उशीर झाला शाळेत जायला
ये चहा प्यायला
© सौ.शशिकला बनकर
@35
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
*कहाणीत सखा सखीची अखंड साथ,
**साक्षीने धरलेल्या कसा सुटला तो हात,
*रेशमाच्या धाग्यापरिस नाजुक हे नातं ,
**काळाने झड़प घालावीं तसा नियतीने केला घात...
वृषाली वानखड़े....✍🏻
*75*
🌴अमरावती
💈💈💈💈💈💈
***********************
भाग----7वा
विषय---सखा--सखी
1]
सखा तेथे सखी जीवनाचे
समीकरण असते
सखी शिवाय सख्याचे
आयुष्य अधुरेच असते.
***********************
2] विटेवरी उभा हरी
सखा देव पांडुरंग
रुप नेत्री न्याहळीता
चित्त माझे झाले दंग
***********************
3 ] कल्पनेच्या जगात
वास्तवाला ही स्थान असावं
सखा--सखीच्या दिव्य प्रेमात
त्यागाच भान असावं
***********************
4 ] सखे तु जवळ असताना
स्वतःला विसरतो
दुर तु गेल्यावर
तुला क्षणोक्षणी आठवती
***********************
5 ] दुर उभा का असा
सख्या जाऊ नको रे
जगणे अशक्य तुझ्या विना
अंगाई विरहाची गाऊ नको रे
सौ मीना सानप ,बीड
*********************
सखीनं प्रेम आहे सख्यावर
हे केव्हाच त्याला सांगितलं,
पण बोलता येत नव्हतं
म्हणून डोळ्यांचं सहकार्य मागितलं
सुनंदा पाटील
@ 57, मुंबई
👁👁👁👁👁👁👁
सखा- सखीचे,हे नातेच असते गहिरे,
अन् सागरासारखे अथांग खोल!
तरीही किनारा जपणारे,सांभाळणारे,
जसा शिंपल्यातला, मोती अनमोल!
स्वाती केळकर @७१ दादर मुंबई २८
९८७०२५१९५१
@@@@@@@@@@@@
🔑🔑🔑🔑🔑🔑🔑
सखे तुझ्या गालावरच्या लालीशी
सूर्यसुद्धा स्पर्धा करतोय
जणू त्यालाही अंधारूंन टाकणारा
नवा सूर्य उगवतोय
📝📝📝📝📝📝📝
सखे तुला पाहिल्यावर
माझं आयुष्य माझं नसतं
सखे तू जवळ नसतांना
हे जग वाळवंट वाटू लागतं
*🎭प्रविण सानप*
*धुळे @29*
⌚⌚⌚⌚⌚⌚
गझल - सख्या
चोरले का काळजाला हासताना तू सख्या रे
सोडले का बंधनांना बोलताना तू सख्या रे
तोच का तू भेटलेला ओढ का वाटे कळेना जोडले का आज नाते भेटताना तू सख्या रे
काळजाच्या कुंपणाचे बंद होते भाव सारे
खोलले का कुंपणाला पाहताना तू सख्या रे
चांदणीला भेटण्याला चंद्र आला आज वाटे
लाजला का प्रेम पाशा जोडताना तू सख्या रे
रातराणी बहरलेली केवड्याला भाळलेली
धुंद झाला मोगऱ्याला माळताना तू सख्या रे
© सौ.शशिकला बनकर, भोसरी, पुणे
@35
💐💐💐💐💐💐
सख्या पांडुरंगा केलीस करणी ,
लागला झुरणी जीव माझा ...
देहाचे हे खोड़ उगाळी चंदन ,
करिते वंदन पंढरीचा राजा ...
*प्रा.संगीता भालसिंग
🌹🌹🌹🌹🌹🌹
कायम कवीची कविता सखी
सुखदुःखात सांगतीण राखी
शब्दांत व्यक्त भावना अंतरी
सखा लेखणीशी इमान राखी
:बाबू फिलीप डिसोजा
सभासद संख्या ३९
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
शृंगाराच्या साजास
सख्या तुच मोल जाणी|
ओठावरची लाली नि
सोड रे तु गजऱयाची वेणी||
===================
2)
==================
सोडून पाश बाहूचे
सख्या सिमारक्षणार्थ गेलासी |
एक एक रात तुझसाठी
सखीने डोळ्यात जागवल्यांसी ||
==================
3)
===================
प्रेमात नकोत मज
सुर्य,चंद्र अन् तारे |
जन्मजन्मांतरीची साथ
सख्या तुज सखीस दे रे ||
==================
4)
===================
सखा ‘चंद्र’ तो प्रेमात
नित्यनवा रोज भासे |
अन् सखी ‘चांदणी’ ती
प्रेमात वेडीपिसी दिसे ||
===================
5)
===================
तो ‘चंद्रसखा’ प्रेमात जागे
काळोख मिटविण्या |
अन् ती ‘ सखीरात्र’ साथ
देई दिस उजडण्या
कल्पना जगदाळे@8★बीड
📲9921967040
=================
💄💄💄💄💄💄
सखे माझ्या मनातील गुलाब
तुझ्यासाठीच उमलतो आहे
तु येशील या आशेवरच
कितीतरी वादळं झेलतो आहे
🎭प्रविण सानप*
*धुळे @29*
💃🏾💃🏾💃🏾💃🏾
1) सखा सखी चाके दोन
संसाराचा मेळ
इंद्रधनुचा पदर छान
दोघांचा जमवा खेळ
🍁
2) स्पर्धेसाठी-- 👇
कृष्णसखा वाजवी मुरली
राधासखी अद्वैताची मुर्ती
युगायुगाची झिंग ती आली
बिलगे आकाशी मधूरा पुर्ती
🍁 ☝ 🍁
3) पापण्यांचे कांठ मोडून
सख्या मन बेभान झाले
दाट दुःखाचे ओझे घेऊन
सखीचे जिणं वैराण झाले
🍁
4) कां कोवळ्या क्षणी
असती अरूप मोह!
स्मृतिगंध जाणवे तो
अस्फुट मल्मली छाव!
त्यांच्या स्थळीच कांही
नसती असीम दाह!
जपते सांजवेळी ,सखी गं
मनचे अबोल भाव!
🍁
5) सखे तुझ्या डोळ्यात बुडताना
जागी झाली निळी गाणी!
स्वप्नांचा शेला पांघरताना
प्रेम मंदिर झाले सजणी!
🍁प्रेषक--कुंदा पित्रे (46)
मुंबई 28
9424742706 🍁
🎯🎯🎯🎯🎯🎯
भारतीय हिंदू समाजात अर्धवट सखी तुझ्याशिवाय असे सखा अर्धनारीनटेश्वर आहे येथे जीव शिव शंकर पार्वती सखा -------
-७७रामदास देशमुख. तामसी (वाशिम )९९७५१९०३६१
🕹🕹🕹🕹🕹🕹
सागर किनारी कातळी,
सखे तुझी पाहता वाट।।
तव येण्याचा होई भास,
जलभरतीची येता लाट।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
राम झाले उष्ट्या बोरावर तृप्त
कृष्ण सखीच्या हाकेवर लुब्ध
माणसा किती हावरट होशील
निस्वार्थ कामास हो उपलब्ध....
.......जयश्री पाटील
🎩🎩🎩🎩🎩🎩🎩
"तप्त सखी वसुला शमविण्या
सखा मेघ आज बरसला हळुवार,
या प्रेममिलनाचा मृदगंध
दरवळला आसमंतात अलवार"
-संगीता देशमुख,वसमत @14
⌚⌚⌚⌚⌚⌚⌚
सखा आणि सखीचं...
हे नातं अनोखं प्रीतीचं
तल्लीन सदा एकमेकांत
न राहते भान रीतीचं...!!
👆🏻 स्पर्धेसाठी 👆🏻
आज असा अचानक
सख्या तू समोर आलास
काही क्षणांसाठी का होईना
तू माझा होऊन गेलास ....
हे आगळं-वेगळं प्रेम आपलं
सख्या असंच राहू दे कायम
हे जगावेगळं प्रेम आपलं
सख्या असंच राहू दे कायम...
संपूर्ण रात्र जागवतात
सख्या आठवणी या तुझ्या
तरीही आवश्यक आहेत त्या
सख्या जगण्यासाठी माझ्या
-जयश्री हातागले
👁👁👁👁👁👁
हा जीवन भव सिंधू तराया पर्याय नाही सखी शिवाय संसाररूपी रथ चालत नाही सख्या सारथी तुझ्याशिवाय...
रामदास देशमुख
💈💈💈💈💈💈💈
सागर किनारी बागडू सख्या वेगे धावत येई घरचे पाश सुटत नाहीत सखी सांगना कसा येई.....
🖋
रामदास देशमुख
🔑🔑🔑🔑🔑🔑
माझ्या सुखात तू माझ्या दुःखात तू..
सखी तू सर्वस्व आहेस माझे
जीवनसाथी म्हणून सोबतीस आलीस तू
सखा आहे मी तुझा हे परम भाग्य माझे.
✍🏻प्रWIN दाभाडे पाटिल,कन्नड.✍🏻
THE-🅿4⃣📧✔📧®
💈💈🖋💈💈
सखे तुझ्या सोबतीने माझ्या आयुष्यात
प्रत्येक क्षण आनंदाचा यावा
जसा फुलांचा सुगंध हवेत दरवळतो
तसा तो तुझ्या सख्याच्या जीवनात दरवळावा
✍🏻प्रWIN दाभाडे पाटिल,कन्नड✍🏻
🅿D4⃣📧✔📧®
🔴♥🔴♥🔴♥🔴
तुझे माझे प्रेम म्हणजे धरती व
आकाश
म्हणूनच माझे जीवनझाले
भकास
कारण धरती आकाश मिळत नाही
आपले कसेच जुळत नाही...
श्री.श्याम स्वामी
हिंगोली
🌹@ 13🌹
💈💈💈💈💈💈💈
"हे सख्या तुजसाठी
मी परीक्षा दिली कौमार्याची,
पण लक्षात ठेव
विटंबना केलीस स्त्री जातीची"
🖋🖊✒
संजय माचेवार
🙏गृपबाहेरील 🙏
💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾
स्वर्ग सुख देते सख्या,
तुझे मनसोक्त हसणे. ..
तुझ्या आनंदाच होते
माझे द्विगुणित जगणे.
✏🖋✒
सौ संगीता अंबोले
ग्रुप बाहेरील
🌹💐💐💐🌹
★★★★★★★★
संकलन:---सौ .कल्पना जगदाळे -दिघे, बीड
★★★★★★★★
Subscribe to:
Posts (Atom)
मतदान जनजागृती ( Voting Awarness )
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. चला मतदान करू .......! ...
-
दीपोत्सवाचा सण : दिवाळी दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळी सणाची आबालापासून वृध्दापर्यंत सर्वानाच चातक पक्ष्य...
-
संतुलित आहार - नागोराव सा. येवतीकर , मु. येवती ता. धर्माबाद अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा...
-
सूर्यमाला व त्यातील विविध ग्रहांची माहिती फोटोसह सूर्यमाला सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्य...