Saturday, 23 April 2016




📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- 2 रा दुसरा
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 24 एप्रिल 2016
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
==================
📝  विषय:- "शिक्षण" जीवन विकासाचे साधन
==================
💥 संकल्पना :→आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
**************************
💥 संयोजक - सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे
************************
💥 परीक्षक - ज्योती बोंदरे, नागपुर
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"''''''''''''''''''''''''''''
💥 संकलन - प्रविण रसाळ, मुंबई
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
💥 ग्राफिक्स - मारुती खुडे माहुर
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम - 

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे. 
💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे
💥 या  स्पर्धेचा निकाल खालील blog वर पाहण्यास मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये. 
http://nasayeotikar.blogspot.com/2016/04/sahity-darbar-bhag-2-24042016-2-24-2016.html
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

==================================

👤 नासा येवतीकर, धर्माबाद 
📱 09423625769'

=================================
निबंध  स्पर्धा 

* शिक्षण : जीवन विकासाचे साधन *

शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो. आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे  आहे. कारण, शिक्षण हे कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक व मानसिक परिवर्तनाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. मानवी जीवनाच्या विकासाचा तो पाया आहे.चांगली सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न व सृजनशील  पिढी फक्त शिक्षणातूनच घडविता येते. शिक्षणातून माणूस आपल्या बुध्दीच्या आधारे उत्तम विचार करायला लागतो. खरे काय आणि खोटे काय यांचा छडा लावू शकतो.म्हणूनच शिक्षणातून माणूस स्वत:सोबत कुटुंबाचा आणि समाजाचादेखील विकास करू शकतो
महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाविषयी बरेच काही सांगितले आहे. त्यांनी नुसते सांगून थांबले नाही तर तळागाळातील लोकांना शिक्षणाचे द्वार उघडण्यासाठी पुण्यातील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पाहिली शाळा सुरू केली. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार यांसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. कारण शिक्षणाशिवाय लोकांचा विकास होणे शक्य नाही हे जाणून होते. विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, 
नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, 
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना स्पष्ट केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर शिक्षणाला वाघिणीचे दुध असे संबोधिले आहे. यावरून आपणाला जीवनात शिक्षणाचे किती महत्व आहे हे कळून चुकेल.
माणसांना परमेश्वराने दोन डोळे दिले आहेत ज्याच्या आधारे तो संपूर्ण सृष्टी पाहू शकतो. मात्र या दृष्टीला ज्ञानाची जोड नसेल तर पाहत असलेल्या दृष्टीमध्ये चांगली सृष्टी बघायला मिळणार नाही आणि बघितलेले चिरकाल टिकून राहणार नाही. प्रसिद्ध विचारवंत म्हणतो की, विस्मृतीमध्ये गेलेले आठवणे तेच खरे शिक्षण. ज्ञान मिळविण्यासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता असते. शिक्षणाशिवाय कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान मिळत नाही. आपणांस एखाद्या विषयांत सखोल ज्ञान मिळवायचे असेल तर त्यासाठी त्यांचे शिक्षण ध्यासपूर्वक होणे गरजेचे आहे.
शाळेतूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया शिक्षणातून रचला जातो. शाळेतून शिकविण्यात आलेल्या अनेक संस्कारक्षम मुल्यांच्या आधारावरच मुलांचे पुढील जीवनातील यश अवलंबून असते. म्हणूनच शाळेतूनच देशाचे भवितव्य घडते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात शालेय शिक्षणाचे खूप महत्व आहे. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. स्वामी विवेकानंद म्हणतात की माणसांतील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण होय.  आपल्या स्व ची ओळख या शिक्षणातून होते. आजपर्यंत जे शिकले नाहीत ते काय जगले नाहीत काय ? ते जगले पण त्यांच्या जगण्याला काही एक अर्थ नव्हता. जन्मलास म्हणूनी जगलास आणि काळ येताच  मेला, तुझ्या या जीवनी काय अर्थ राहिला ? या ओळीनुसार. आपण का जगतो याचे उत्तर ज्याला मिळेल त्यांचे जीवन सार्थ होईल. त्यासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात की, शिक्षण कोणतीही गोष्ट नव्याने निर्माण करण्याचे व अस्तित्वात आणण्याचे कार्य करीत नाही. सुप्त, चैतन्य व निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे साधन म्हणजे शिक्षण. आपले जीवन चैतन्यमय आणि आनंदी करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासुन मरणापर्यंत चाललेली शिकण्याची प्रक्रिया आहे जी की अविरतपणे चालूच असते. थांबला तो संपला असे जे म्हटले जाते ते या शिक्षण प्रक्रियेला लागू होते. ईश्वराशिवाय कोणीही परिपूर्ण नाही. त्यामूळे आपण किती ही ज्ञानी असले तरी आपल्यापेक्षा वरचढ जगात कोणी तरी आणि कुठे तरी ज्या वेळी भेटतो त्यावेळी आपण नाराज होतो स्वतः ला स्वतः ची लाज वाटायला लागते. त्यामूळे प्रत्येक नवीन बाब आत्मसात करण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे अन्यथा आपणांस वाळीत टाकण्याची शक्यता नाकारता येते नाही. त्याचमुळे आपले व आपल्या परिवारातील आणि शेजारील व्यक्तीचे जीवन सुधारण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे शिक्षण.
-  नागोराव सा. येवतीकर 
   मु. येवती ता. धर्माबाद 
   09423625769
======================================

लेख क्रंमांक दोन 

" Education  is the third eye of human life"
     असं म्हटलयं ते उगिच नव्हे. अन खर्या अर्थानं जिवन जगण्यास शिकविते तेच खरे शिक्षण होय.एखादा विद्यार्थी अपयश आले म्हणून आत्महत्येचा विचार करीत असेल तर तो शिकलाच नाही.एखादी व्यक्ती जर सुशिक्षित म्हणून मिरवत असेल व निंदा....चहाडी....चोरी....द्वेष... मत्सर करीत असेल तर तो अडाणीच.त्यापेक्षा असिक्षीत बहिणाबाई बरया ज्यांना जिवनशिक्षण न शिकताचं समजल.
       एक व्यक्ती शिकून जर सामाजीक बांधिलकी जपत असेल तर अनेकांचा उद्धार होवू सकतो.मग तो शिक्षक असो उद्योजक असो लेखक असो आपापल्या परीसरात कायापालट करू शकतात एवढी ताकत शिक्षणात आहे.बाबासाहेब म्हणूनच तर म्हणत की, "आयुष्यभर जरी आपण शिकलो तरी ज्ञानसागराच्या गुडघाभर पाण्यात देखिल आपण पोहोचणार नाही".
        हो पण उच्चशिक्षण घेवून परदेशात सेवा देत असेल तर तो करंटेपणा ठरतो.कृतज्ञता जपत आपण आपल्याच मायभुमिचे पांग फेडू शकतो.आपल्या परीसरात छोटा मोठा उद्योग उभारून कित्येक हातांना काम देता येते व शिक्षणांचे योग्य उपयोजन होवू शकते.केवळ स्वतःचा उद्धार करणे हे शिक्षणाचे फलित कधिही असू नये.कर्मविर भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेत "कमवा व शिका" हे बाळकडू म्हणूनच दिले जाते ज्यायोगे घामाचे व शिक्षणाचे महत्व विषद होते.
       माझ्यामते ज्या शिक्षणाने मानवाचा शारीरीक,  मानसिक, बौद्धीक व सामाजीक विकास होतो तेच खरे शिक्षण.सुटाबुटात वावरणे व मायबापाला वृद्धाश्रमात ठेवणे हे समिकरण जुळत नाही.
मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण गर्वानं म्हणतो पण तीच मुलगी जर सुनेच्या मैत्रिणीच्या सहकारयाच्या भुमिकेत चुकत असेल तर ती कसली प्रगती? .शिकून सवरूनही आपण एकमेकांचे पाय खेचत असू तर आपण शेखचिल्लीच ठरू.शिकलेल्याचं मन विशाल असावं.आज डी.एस.के.बजाज...मित्तल...बिर्ला हे लोक स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधत आहेत.कारण अनेक चुली त्यांच्यामुळे पेटतात जेणेकरून पुढील जन्माचेही पुण्य गाठीशी जमतयं
        वर्ग एक व दोन साठी जेव्हा नेमणूका होतात तेव्हा तोंडीपरीक्षेला म्हणूनच एवढे महत्व असते.कारण एक जबाबदार व्यक्ती हा सर्वांगिण विकसीतच असावा लागतो ्न्यथा अनर्थ घडतो. मानसशास्त्र....बालमानसशास्त्र ....अर्थशास्त्र व तर्कशास्त्र या शाखा त्यासाठीच तर आहेत.खरा शिक्षित व्यक्ती हा सुसमायोजीत असतो.हवा-नको संघर्ष तो सहज सांभाळतो . प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, निर्णयक्षमता ह्या बाबी शैक्षणिक प्रगतीच्या सावल्या आहेत.
        शिक्षण व अनुभव यांची सांगड घालता आली तर दुधात साखरच. तिस वर्षापुर्वी जर कुणी म्हटलं असतं की एक दिवस तुमच्या डोक्यात घंटी वाजेल तर कदाचीत ते आपणास खोटे वाटले असते...हो नं.पण आज ते सत्य आहे.उद्या डोक्यातही घंटी वाजू शकते.तयार रहा कारण हा विकास व ही प्रगती हू शिक्षणाचीच अपत्य आहेत.
      जाता जाता...." वाचेल तो वाचेल" व "शिकेल तो टिकेल"....
........जयश्री पाटील.
=========================================

लेख क्रंमांक : तीन 
+91 97636 67401‬: 
स्पर्धेसाठी 
विषय :- "शिक्षण" जीवन विकासाचे साधन 

"शिक्षण "म्हणजे तिसरा डोळा 
शिक्षण म्हणजे संस्कार सोहळा
शिक्षण म्हणजे ज्ञानामृत 
शिक्षणाने घडतो माणूस 
शिक्षणाने स्त्री होते सुसंस्कृत 

'शिक्षण म्हणजे सरस्वतीची आराधना 'आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, शिक्षण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे शिक्षण आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 
शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे शिक्षणाचे विविध पैलू आहेत, अर्थात त्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणही तितकेच अनिवार्य आहे. शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया आहे मग ते कोणत्याही प्रकारचे असो, शिक्षण म्हणजे 'आत्मविश्वास' 
शिक्षण म्हणजे 'मोकळा श्वास' 
स्त्रियांसाठी तर शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण स्त्री म्हणजे कुटुंबाचा कणखर कणा आहे, मानवी जीवनात स्त्री महत्वाची भूमिका बजावत असते तिच्यावर मातृत्वाची व पालनपोषणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे माता आणि पिता दोघेही पालनपोषण करतात पण बालवयात आई मुलांच्या अधिक जवळ असते आई प्रथम गुरू आहे असे म्हटले जाते. एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबावर चांगले संस्कार करू शकते. शिकलेली स्त्री अर्थार्जन करुन कुटुंबाला हातभार लावू शकते, त्यामुळे ती समाजात आत्मविश्वासाने वावरु शकते पूर्वी स्त्रीयांना शिक्षणासाठी घराबाहेर पडण्याची बंदी होती, चुल आणि मुल एवढेच तिचे विश्व होते. 
इ. सन. 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलिची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली आणि ज्ञानाची कवाडे स्त्रियांसाठी खुली झाली. 
शिक्षणाने माणूस विचार करू लागतो स्वतःच्या हक्कांसाठी बोलू शकतो, अन्यायाला वाचा फोडू शकतो पर्यायाने त्याच्या विकासाचा पाया पक्का होतोच शिक्षण अर्धवट सोडून दिलेली व्यक्ती आयुष्यभर न्यूनगंडाची शिकार होते, मग ती स्त्री असो अथवा पुरूष. 
शिक्षणाने अर्थार्जनाचे साधन तर उपलब्ध होतेच परंतू माणसाचा सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. 
व्यावसायिक प्रशिक्षण देखील खूपच महत्त्वाचे आहे,असे असताना आज स्त्री पुरुष समानतेच्या काळातही फक्त 14 %स्त्रिया या व्यावसायिक शिक्षण घेतात हा भेदभाव जेव्हा संपेल आणि शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने या देशाचा सर्वांगीण विकास होईल. 
परंतू एका गोष्टीचे वाईट वाटते, आज शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे, खाजगी शाळा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायला आधी डोनेशन आणि नंतर भरमसाठ फी द्यावी लागते, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना शिक्षणापासून काही वेळा वंचित राहावे लागते, किंवा शिक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. 
शिक्षण कमी असले तर नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळून काम करावे लागते, पर्यायाने सर्व प्रकारचा विकास खुंटतो, शिक्षण कमी असले तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल अशी अपेक्षा ठेवता येत नाही, आर्थिक सामाजिक विकास कमी होतो, ज्या समाजातील किंवा कुटुंबातील व्यक्ती उच्च शिक्षण घेतात त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असते, पुढची पिढी ही सुसंस्कृत आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होते.
 शेवटी म्हणावेसे वाटते, 
"जिच्या हाती लेखणी 
तिच खरी देखणी
शोधूनी ज्ञानामृताच्या खाणी 
ती संपविल सारी दुखणी "
थोडक्यात शिक्षण म्हणजे आनंद, समाधान, उत्साह 
विकास, ज्ञानाचा प्रकाश 
शाहू महाराजांनी शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले होते, आंबेडकरांनी शिक्षण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या व देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले होते, आंबेडकरांनी शिक्षण घेतले म्हणून त्यांनी देशाची राज्यघटना आहे लिहिली स्त्रियांना शिक्षणाचे हक्क दिले, "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो हे पिणार तो गुरगुरणारच, म्हणजे शिक्षणाने माणूस सर्व बाबतित जागृत होईल, विकसीत होईल 
हे बाबासाहेबांनी समाजाला तेव्हाच पटवून दिले होते. 
जेव्हा या भारतातील 100 %स्त्रीया आणि पुरूष शिक्षण घेतिल तेव्हाच भारताचा सर्वांगीण विकास होईल आणि भारत एक विकसीत, समृद्ध राष्ट्र म्हणून उदयास येईल. 
" जयहिंद जय महाराष्ट्र "

लेखिका - सौ. शशिकला बनकर, इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे
=========================================

लेख क्रमांक : चार 

'जीवन प्रवाहातील तरुण जाण्यासाठीचा मार्ग म्हणजे शिक्षण'' शिक्षण ज्ञानरुपी तिसरा डोळा ज्यामुळे आपल्याला या जगातील घडणाऱ्या गोष्टीचा आभ्यास करायला मिळतो काळाणुसार शिक्षणातील बरेच काही बदल झाले त्याला एक व्यवहारीक , व्यावसायिक स्वरुप निर्माण झाले या स्पर्धेच्या युगात जो तो पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण कसे देता येईल याचाच विचार करत असतो चांगली गोष्ट आहे की प्रत्येक जनानी शिकायलाच पाहिजे गाडगेबाबा एकेठिकाणी सांगतात ''बापाहो खायला भाकर नसेल तर अर्ध्या पोटाने उपाशी रहा पण लेकराले शिकवा,बायकोला साडी हलकी घ्या पण लेकरायले शिक्षण द्या'' या शांतीदुताचा संदेश खुप काही सांगुन जातो म्हणून शिक्षण हे जगातील सर्वात श्रेष्ठ धनसंपत्ती आहे ही आपल्या पासुन कोणीच हिरावून घेऊ शकत नाही

दोन भाऊ जरी असतिल तरी संपत्तीसाठी धना साठी भांडणे करतील वेळप्रसंगी 'सुई दोरा' सुद्धा वाटून घेतील परंतु शिक्षणासारखी महानसंपत्ती हिरावून घेतली जात नाही .म्हणून खुप शिका शिकवा संघटीत व्हा. आपल्याला जरी काही कारणाने शिकता नाही आले तरी पण आपल्या मुलांना शिकवा त्यात आपले समाधान बघा आज ज्ञानाच्याच बळावर भारत देश सर्व देशांशी स्पर्धा करू शकतो
थोरांचे विचार अंगीकारा शिक्षणासारखे दुसरे कुठलेच साधन नाही म्हणून शिक्षण हेच सर्व श्रेष्ठ आहे...
एका निरक्षर गावाची लोकसंख्या जवळपास दहा हजारावर होती पण गाव शिक्षण पासुन वंचित राहिलेले आणि तेथील एक परम्परागत संस्कृति चालत आलेली रुढी परंपरा की, गावातील जो कोणी राज्यकारभार सांभाळेल त्यांनी पाच वर्षे सांभाळावा आणि शेवटी पाच वर्षे संपल्या नंतर सर्व गावकरी त्या राजाची मिरवणूक काढून गावाजवळील सरोवरातील बेटावर राजाला सोडून दिले जायचे पण जंगलातून ती व्यक्ती परत गावात येत नव्हती कारण त्या सरोवरातील बेटावर सर्व प्रकारचे हिंस्त्रप्राणी त्या राजाला मारून खात होते.
पुढे गावातील कोणतीच व्यक्ती राज्यकारभार सांभाळायला तयार होत नव्हती पण एक त्याच गावातील तरुण युवक थोडा फार बाहेर गावातून शिक्षण शिकून आला होता त्याने राज्यकारभार स्विकारण्याची जवाबदारी घेतली हा तरुण होता त्यामुळे लोकांना याचे आश्चर्य वाटत होते की हा बालवयातच आपले आयुष्य पणाला लावत आहे सर्व दुःख व्यक्त करीत होते!सोबत आनंद ही होता.
आता या युवकांनी आपले पाच वर्षांत पुर्ण सरोवरातील बेटावरील झाडे ,वेली तेथील हिंस्त्रप्राण्यांना त्यांच्या निवा-यासाठी दुसर्‍या जंगलात नेऊन सोडले आणि सुंदर आशा प्रकारचा बेटावर राजमहल उभारून काढला.
आता पाच वर्षे पुर्ण होत आले होते सर्व लोक रडत दुःखी अंतःकरणाने निरोप देत होते पण हा युवक येथे हस्त हस्त सरोवराकडे चालला होता कारण त्याच्या शिक्षणाने ज्ञानाच्या बळावर आपला मार्ग मोकळा केला होता...
सांगायचं तात्पर्य :- येवढेच आहे की शिक्षण हेच जगात तारणारे आहे ,शिक्षणानेच जीवन घडते म्हणून सर्वांनी शिकले पाहिजे....
........साहित्य दर्पण आयोजित दरबार...
  ________ गजानन पवार पाटील
=============^============================

लेख पाचवा 
** शिक्षण जीवन विकासाचे साधन **

               " शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ", असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाविषयी आपले मत प्रकट करताना म्हटले आहे. अर्थातच शिक्षणातून उभारलेला व्यक्ती जीवनाच्या सर्वोच्च शिखरावर जातो. तसेच शिक्षण जीवनाशी सुसंगत हवे ! चांगल्या जीवनासाठी, सुखी, समृध्द जीवनासाठी शिक्षणाची गरज आहे, हे मान्य केल्यावर प्रश्न पडतो, चांगले जीवन असते कसे ? व्यक्ती सुखी, समृद्ध, यशस्वी जीवन जगते आहे, असं केव्हा म्हणता येईल ? जगणं अर्थपूर्ण हवं ! आत्मनिर्भर, स्वावलंबी हवं ! आरोग्यसंपन्न जीवन नसेल तर तेही सुखाचे होणार नाही. जीवनातील सौंदर्य शोधून त्याचा आस्वाद घेता आले पाहिजे. म्हणूनच सुखी, समृद्ध, आनंदमय जीवनाच्या आपल्या ज्या कल्पना आहेत, त्या पूर्ण होतील असे शिक्षण घ्यायला हवे. 
        महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले आदींनी शिक्षणाचं खरं बीज पेरलं. शिक्षणासाठी त्यांनी क्रांतिकारक चळवळ उभी केली. आज त्याच वाटेवर मार्गक्रमण होऊन आम्हाला आमचे जीवनरूपी वृक्ष फुलवायचे आहे. अर्थात शाळेत मिळणारे शिक्षण म्हणजे संपूर्ण ज्ञान नव्हे. ज्ञानाचे दिग्दर्शन करणारी ती एक पायवाट होय. ज्यांच्या अंत:करणात ज्ञानाची तहान असेल तो ही पायवाट पूर्ण करीत जीवनाचे अंतिम क्षितिज गाठण्याचा प्रयत्न करील. 
          शिक्षण ही अखंड, अविरत चालणारी प्रक्रिया आहे. जन्माला आल्यापासून ते मृत्यूला कवटाळण्या पर्यंत व्यक्ती ही विद्यार्थी दशेतच जीवन जगत असते. कधी पुस्तकातून नवं काही शिकायला मिळते तर कधी जीवनातील भलताच एखादा प्रसंग नवा धडा शिकवून जातो. शिक्षण हे फक्त जीवन विकासाचे साधन नसून जीवनाला अधिक परिपक्व आणि प्रगतीशील बनविणारे माध्यम आहे. शिक्षणाने व्यक्तीचे 'मस्तक' सुधारते आणि सुधारलेल्या मस्तकाचे 'हस्तक' कधी रिकामे राहत नाही. म्हणजेच शिक्षणाने व्यक्ती स्वतःच्या जीवन विकासा बरोबरच समाजाचाही विकास साधू शकतो. मान्य आहे की आज शिक्षणाच्या वाटा संकुचित झाल्या आहेत. काही लोकांनी पैशाच्या हव्यासापोटी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. पण जो शिकतो तो संघर्ष केल्याशिवाय थांबत नाही. आणि संघर्ष करणारा व्यक्ती यशो शिखर गाठल्याशिवाय शांत बसत नाही. 
          शिक्षणाने व्यक्तीच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी प्राप्त होते. पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन जगण्याचे ज्ञानही त्याला प्राप्त होते. सुशिक्षित व्यक्तीला समाजात आपोआपच मान-सन्मान प्राप्त व्हायला लागतो. शिक्षणाच्या वाटेवर चालणारी व्यक्ती ही सदैव समाजात ताठ मानेने वावरत असते. शिक्षणाची दारे खुली करणारे महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाच्या आधारेच सावित्रीबाई फुले ह्यांना सुशिक्षित करून त्यामुळेच त्या पहिल्या मुख्याध्यापिका होऊ शकले. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे शिक्षणामुळे व्यक्तीचे जीवन तर सुधारतेच त्या बरोबर विचारांची प्रगल्भताही निर्माण होते. सृजनशीलतेत वाढ होते. सर्वांगिण विकास साधला जातो. म्हणूनच व्यक्तीने शिक्षणाची कास धरून स्वविकासा बरोबरच सामाजिक विकास साधावा. शिक्षणाच्या वाटेवर चालत राष्ट्राचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन राष्ट्र विकासही साधावा. शेवटी शिक्षणातूनच शिक्षणाचा खरा अर्थ कळायला लागतो हेही तितकच सत्य. 
----✎ प्रा. नितीन दारमोड
===========================================


शिक्षणाने येई ज्ञान, 
शिक्षणाने होई मान!
शिक्षण विना निर्धन,
शिक्षण एक साधन!

शिक्षणाने घडत जाई,
शिक्षणानेच गती घेई! 
शिक्षणाने विकास होई,
विकासानेच सुख येई!

शिक्षणाने वाढे विचार,
शिक्षण सुधारी आचार!
शिक्षणाने होतो उद्धार, 
शिक्षण जीवन आधार!

☆रामराव जाधव. 
7743840604
================================

लेख क्रमांक : सहा 

शिक्षण--विकासाचे साधन**

विकास म्हटल्या नंतर एक तर व्यक्तीचा विकास व पर्यायाने समाज किंवा राष्ट्र विकास अभिप्रेत आहे.शिक्षणहीे औ पचारिक व् अनौपचारिक असे असते  .औपचारिक शिक्षणात अध्ययन व् अध्यापन या प्रक्रियेत शिक्षक जे अध्ययन अनुभव देतात त्यातून विद्यार्थ्यात् वर्तन परिवर्तन घडत असते .त्याच्या वर्तनातील योग्य बदल म्हणजे शिक्षण!
    शिक्षणातून चारीत्र्य घडत असते. व्यक्तिगत विकास होत असतो .खरे तर प्रत्येक देश आपली शिक्षण पद्धति ठरवित असतो.देशाचा विकास कोणत्या दिशेने व्हावा हे एकदा ठरले की मग तसा अभ्यासक्रम ठरविला जातो.उद्याचे नागरिक कसे असावेत हे शाळेतच ठरते. अशा  वेळेस आपला विकास शिक्षणच ठरवीते हेे नक्की!
     विकास  म्हणजे   काय? तर जीवन कौशल्य मिळ उन त्याचा उपयोग जीवनात प्रत्यक्षात् करता येण !
जीवन जगताना  कौशल्याचा वापर करता आला नाही, म्हणजे च त्या व्यक्तीचे शिक्षण योग्य झाले नाही ,असे म्हणावे लागेल !
    कारण शिक्षण हे विकासाचे साधन आहे .
येथे मला एक गोष्ट नमूद करायची आहे ती म्हणजे अशिक्षित लोकही आपला विकास करतात .त्यांचे औपचारिक शिक्षण जरी झाले नसले तरी जीवन विकासाची कौ शल्ये प्राप्त केलेली असतात. निरीक्षणातुन स्वयं अध्ययनातुन ते शिकत असतात.सध्या ज्ञान रचनावाद ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात आहे हे आपणास माहित 
आहेच.निसर्ग हा एक मोठा गुरु आहे.सभोवतालच्या परीस्थि तीतून व्यक्ति शिकत असतात. स्वतःचा विकास साधतात.
  आयुष्य जगताना लागणारी  निर्णयक्षमता ,आत्मविश्वास ,कल्पकता या गोष्टी शिक्षणा
तुन मिळत असतात. म्हणून  शिक्षण हे विकासाचे साधन आहे असे म्हणतात. शिक्षणातून व्यवहार ज्ञान मिळते .सामाजिक भान येते ,राष्ट्रप्रेम निर्माण होते.अर्थार्जनातून व् परस्पर सामं जस्यातुन समाजात आपले स्थान निर्माण करता येते.व्यक्तिमत्व विकास होतो.जगाबद्दलचे ज्ञान मिळवता येते.
    परिपूर्ण व्यक्तिगत विकास घडविण्यात शिक्षण हेच साधन सर्वश्रेष्ठ आहे.शिक्षणाविना झालेला विकास हा भौतिक असू शकतो, परंतु शिक्षणातून झालेला विकास परिपूर्ण व सर्वसमावेशक
असतो,अंतर्बाह्य असतो.उगिचच शिक्षणाला तिसरा डोळा म्हणत नाहीत!
     दोन डोळे सर्वानाच असतात तिसरा डोळा असणारे निश्चितच थोड़े जास्त पाहू शकतात! स्वतःचे जीवन यशस्वी जगतात शिवाय इतराना ही मदत करतात.
       परंतु सद्य स्थिती थोड़ी काळजित टाकणारी आहे. स्वा मी विवेकानंदानी म्हटल्या प्रमाणे चारित्र्य गेले तर सर्व गेले! हे समाजाची आजची अवस्था पहिल्यावर मन खिन्न होते.पिढ्या घडवताना सामाजिक मुल्ये रुजवताना आपण कमी पड़तोय का?विकासाचे जे साधन आहे त्यात दोष आहे की राबवणा ऱ्या
पद्धतित हे तपासले पाहिजे .विकसच्या नावावर दुर्गति होता कामा नये .आपण आशावादी राहु या! शिक्षणातून ज्ञाना बरोबर संस्कार व् मूल्यशिक्षण मिळावेे 
विकास तर अमेरिका व् इतर पश्चिमी देशाचा झाला असे आपण म्हणतो च की परंतु तेथील कुटुंब संस्था असेल की सामाजिक परिवेश असेल ,अध्या त्मिक् प्रगति असेल आपली बरोबरी करू शकत नाही. आपल्या शिक्षण पद्धति ला वै दिक परंपरा आहे.वेदांचे अधिष्ठान आहे.म्हणूनच विकास साधताना संयम आहे.भारताची प्रगतिकडे वाटचाल महासत्ता म्ह णुन चालू आहे कारण हा विकास शिक्षणातील क्रांतिमुळेच झाला आहे.नागरिकांच्या जीवन विकासातूनच देशाचा विकास घडत असतो.सुशिक्षित व् सूज्ञ  नागरिक लोकशाहीचे संरक्षण व् संवर्धन योग्य प्रकारे करू शकतात. शिक्षण आणि विकासाचा संबन्ध या अर्थाने सुद्धा फार महत्वाचा आहे.स्वातंत्र्य पूर्व काळात अनेक नेते पर देशात जाऊन आले तेथील विकास त्यानी पहिला म्हणूनच तत्कालीन सामाजिक स्थितिची दुरावस्था त्यांच्या लक्ष्या त आली व् चळवळीचे प्रगतिचे वारे वाहु लागले.हे शिक्षणातून विकासाकडे वाहणारे वारे होते .जीवन शिक्षणातून जीवन विकासाकडे हेच खरे तत्व!
जीवन विकास हा मूल्याधिष्टित शिक्षण प्रणालीतूनच होतो हेच खरे!!

            प्राचार्य सौ शांता ठुबे

अहमदनगर,
मोबाईल--9850136419
===============================================

लेख क्रमांक : सात 
* शिक्षण : जीवन विकासाचे साधन *

शिक्षण म्हणजे ज्ञानामृत. ज्ञानरुपी अमृत घेतल्यावर ख-या अर्थाने माणूस जीवन जगण्यास लायक होतो, सक्षम होतो. माणसाला विधात्याकडून बुध्दिचे वरदान मिळाले आणि माणसाने आपल्या बुध्दिच्या जोरावर अश्वकाळापासुनच प्रगतीपथावर वाटचाल करु लागला. त्या काळी अनुभुतीने तो विकसनशील होत होता आणि इतराना मार्गदर्शन करत होता. इथच ख-या अर्थाने शिक्षणाचा श्नीगणेशा झाला.
अक्षर कळे संकट टळे या उक्तीप्रमाने माणसाला शिक्षणाचे महत्व कळू लागले. आज जी भौतिक सुविधा आपल्याला प्राप्त आहेत हे सर्व शिक्षणामुळेच. एका पिढी कडून दुस-या पिढीला मिळालेले ज्ञान आणि स्मार्ट जनरेशन यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात झपाट्याने विकास होत गेला.
शिक्षण हा शब्द अगदी सर्वव्यापी आहे. शिक्षण जो घेईल तो अगदी समाजामध्ये ताठ मानाने स्वाभिमानाने जगेल. शिक्षण अगदी झोपडीत राहणारा व नवकोटनारायणही घेऊ शकतो जो ते जीद्दीने प्राप्त करील तो स्वत:च सूधारतो असे नाही तर त्याचे कुटूंब त्याचा समाज मार्गपथावर नेवून ठेवतो.

शिरीष गिरी, बीड      
मो.नं 8888189650.

=====================================

लेख क्रमांक : आठ 
"शिक्षण- जीवन विकासाचे साधन"
       महात्मा गांधी म्हणाले होते ,"माणसाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण होय". माझ्यासारख्या स्त्रियाना तर शिक्षण हे अमृत वाटले पाहिजे. कारण क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले  आणि महात्मा ज्योतिबा फुले या दांपत्यानी त्याकाळी आमच्यासाठी शिक्षणाचे दार उघडले नसते तर आम्ही स्त्रिया आज कुठे खितपत पडलो असतो,कुणास ठाऊक! आज समस्त स्त्रीजातीचा विकास दिसतोय,तो फक्त आणि फक्त शिक्षणामुळेच हे निर्विवाद सत्य कुणीही नाकारु शकणार नाही.  जगातील एकही क्षेत्र असे नाही जे स्त्रीने पादाक्रांत केले नाही. हा विकास कशामुळे साध्य झाला,तो म्हणजे फक्त शिक्षणामुळेच!  डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी सर्व मानवजातीच्या विकासासाठी सर्वात आधी शिक्षणाचा हक्क मागितला. दलित आणि  स्त्रियाना जेव्हा शिक्षणाचा अधिकार नव्हता तेव्हा त्यांचे आयुष्य कसे  पशूवत होते,याची कल्पनाही न केलेली बरी! आज दलिताना आणि स्त्रियांना माणूस म्हणून जी वागणूक मिळते ती त्यानी घेतलेल्या शिक्षणामुळे!विकास मग तो  स्त्रीचा  असो अथवा पुरुषाचा,ते साधण्याचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण होय.मी स्त्रिया आणि दलित यांचे उदाहरण देण्यामागचे कारण म्हणजे शिक्षणामुळे झालेला विकास हा ठळकपणे जाणवतो  तो या दोन विशिष्ट वर्गात!
        शिक्षण माणसाला काय देते? आत्मसन्मान,स्वाभिमान,विचार करण्याची ताकद ,विशिष्ट विचार घेऊन जगण्याची ताकद,स्वावलंबन,अन्यायाला विरोध करण्याची ताकद,सत्याला सामोरं जाण्याची ताकद,हे सगळं देते ते शिक्षण!आणि लौकिकार्थाने शाळा शिकूनही आपल्यात वरील बाबींचा विकास झाला नसेल तर त्याने  शिक्षण घेतलेच नाही,असे खेदाने म्हणावे लागेल. कारण शिक्षण हे फक्त उदरनिर्वाहाचे साधन नाही तर ते संपूर्ण जीवनाच्या विकासाचे साधन आहे. माणसाला माणूसपण प्राप्त करुन देते ते शिक्षण! माणसाच्या मन,मेंदू आणि मनगटाचा विकास करते ते शिक्षण! माणसाला उच्चपदापर्यंत पोहोचविण्याचे काम करते ते शिक्षण!डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील,महर्षी कर्वे,फुले दांपत्य,राजर्षी शाहू महाराज या थोरामोठ्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते म्हणूनच त्यानी आपापल्या परीने आधी सर्वांच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. 
   "विद्या देती नयी कल्पना,
कल्पना लाती नये विचार,
नये विचारोंसे मिले ग्यान,
ग्यान बनाये आपको महान" हे विचार आहेत डॉ. ए पी जे अब्दूल कलाम यांचे! या सर्व लोकानी  आपल्यासमोर मांडलेले विचार हे अनुभवातून मांडलेले होते.मानवी जीवनाच्या विकासाचे साधन म्हणून   शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखल्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते,
" विद्येविना मती गेली,मतिविना नीती गेली,नीतीविना गती गेली,गतिविना वित्त गेले,वित्तविना शूद्र खचले,इतके अनर्थ एका अविद्येने केले"
   म्हणूनच त्यानी शिक्षणाच्या क्रांतीची मशाल हातात घेतली होती. 
    शिक्षणाने माझी संवेदनशीलता एवढी जागी व्हावी की,माझ्या आजूबाजूचा कोणताही वंचित घटक शिक्षणापासून दूर रहात असेल तर त्यांच्या शिक्षणासाठी माझी पावले धडपडली पाहिजे,माझा हातभार त्यांच्या विकासासाठी लागला पाहिजे."अज्ञानाच्या जाळ्यातून प्रत्येकजण सुटला पाहिजे,चूल नाही पेटली तरी चालेल,ज्ञानासाठी प्रत्येकजण पेटून उठला पाहिजे." यात मुख्य माझा हातभार असला पाहिजे . तरच खऱ्या अर्थाने माझ्या शिक्षणाने माझ्या जीवनाचा विकास झाला असे समजेन! 


    सौ. संगीता देशमुख,वसमत @14

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लेख क्रंमांक : नऊ 
+91 94237 15865‬: 
शिक्षण---जीवन विकासाचे साधन               
जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण  महत्व आहे.नव्हे नव्हे मानवी  जीवनाची शिक्षण ही मूलभूत गरज आहे. शिक्षण  ही निरंतर  चालणारी  प्रक्रिया  आहे . आपण प्रत्येक  टप्प्यावर  शिकत असतो म्हणून  आपण  सर्वानी शिक्षणाचे  पावित्र्य  जपायला हवे.
शिक्षण  म्हणजे समाज  परिवर्तनाचे साधन होय शिक्षणामुळे व्यक्तीचे चारित्र्य 
निकोप घडत असते.शिक्षक  विद्यार्थ्यांना  तळमळीने शिक्षण  देत असतात त्यामुळेच  विद्यार्थ्यांच्या  आयुष्याला कलाटणी मिळते.जीवन जगत असताना आपण कस वागाव हे शिक्षणामुळेच कळते.शिक्षणामुळे आयुष्य समृद्ध  होते.शिक्षण हे दोन प्रकारचे असते.आपली आपल्याला ओळख  करुन देते ते एक  शिक्षण आणि  दुसरे तंत्रज्ञान . सर्वांवर निरपेक्ष प्रेम  करणे  शिक्षणामुळेच शक्य  आहे. शिक्षणामुळे मानवाचा सार्वागिंण विकास  होतो  व मानवाचा विकास झाल्यास देशाचा विकास होतो.हे आंबेडकर  म.फुलेनी जाणले होते म्हणुन त्यानी तळागाळातील लोकांना शिक्षण दिले पाहिजे ,शिक्षणापासुन कोणीही  वंचित राहू नये म्हणुन त्यांनी  पिपल्स एजुकेशन सोसायटी स्थापन  केली.म्हणजेच मानवी जीवनात  खर्या अर्थाने चांगली  क्रांती घडविण्याचे काम केवळ शिक्षणच करु शकते आणि म्हणुन आता शिक्षणाचा विचार नुसता देशाच्या  नाही तर जगाच्या  केंद्र स्थानी येऊ पहातोय.युनेस्कोच्या 195 सदस्यानी एकत्रित  येऊन  सर्वासाठी शिक्षण हे मान्य करणं काही  विशेष  नाही, परंतु 1800व्या शतकात अज्ञानाच्या अंधारात  पिचत पडलेला बहुजन  समाज पाहुन ज्योतीरावांचे मन हेलावले आणि त्यांनी  समाजाचा विरोध पत्करुन व छळ सोसुन शिक्षणाचा  दीप तेवत ठेवला आणि शिक्षणाला अग्रक्रम दिला. म्हणुन आज म्हणावस वाटतं या सुधारणांचे नेत्रसुख अनुभवण्यासाठी,आनंदोत्सव साजरा करण्यासाठी..... ज्योतिबा , तुम्ही आज हवे होतात!.....                                     

सौ. सानप मिना  नगर रोड, बीड    9423715865
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

लेख क्रमांक : दहा 

+91 94228 84140‬
'शिक्षण ' जीवन विकासाचे साधन

        'जो शिकेल तोच  टिकेल'
    मित्रांनो  आपण सर्वात प्रथम 
'शिक्षण' म्हणजे  काय याचा विचार  करु या..... 
मुळातच 'शिक्षण ' हा शब्दच खुप व्यापक आहे  आपल्या वाचनात  आलेलेच असेल की  ' शिक्षण' ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे  प्रत्येक क्षणाला माणूस हा काही तरी शिकतच असतो  म्हणजे च नेमके काय करीत असतो?
म्हणजेच प्रत्येक क्षणी काही गोष्टी अनुभवाने काही निरीक्षणाने तर काही गोष्टी प्रत्यक्ष प्रयत्न पूर्वक अभ्यासाने आत्मसात करीत असतो  तेव्हा आपण शिक्षण या शब्दा चा  अर्थ केवळ पुस्तके वाचने आणि इयत्ता  गाठाणे किंवा कोणती तरी पदवी प्राप्त करने एवढ्या पूरता मर्यादित नाही लावू शकत ....कारण शिक्षणा ची व्याख्या जर एवढी च अस ती तर आज उच्च पदवी धारक  गुन्हेगार बनले नसते
उदा * डॉक्टर होवून  स्त्री भ्रूण हत्ये सारखी पापे  आज घडली नसती ओसामा बीन लादेन सारखा संगणक अभियंता एक आतंकवादि बनला नसता
मग आता 'शिक्षण ' म्हणजे नेमके काय?
तर 'शिक्षण ' म्हणजे वर्तन बदल  आता वर्तन बदल  म्हणजे काय आणी कसा ....तर सकारात्मक वर्तन बदल  म्हणजे च खरे शिक्षण होय 
     शिक्षण आणी विकास यांचा परस्पर संबंध काय?
शिक्षणा व्दारे कोणता विकास अपेक्षित आहे ?
सर्व साधारण पणे शिक्षण  आणि पैसा यांचा संबंध  जोडला  जातो पण,खऱ्या अर्थी पैसा म्हणजे  शिक्षण आणी शिक्षण म्हणजे पैसा आणी पैसा म्हणजेच विकास अशी आजच्या काळाची सर्व साधारण समजूत आहे  पण ,खरोखर  याचच अर्थ  शिक्षण आहे का  ...?
आपण सर्व  बाबीं चा विचार केल्यास 
आपलेच आपल्या मनाशी व्दंद सुरु होईल
कारण जर असे असते तर गरीबां च्या  घरातून हसण्याचा
आणि श्रीमंतां च्या घरातून रडण्याचा आवाजच  कधी ऐकायला  आला नसता .
   कारण शिक्षण हे तीन प्रकारे  विकास घडवून आणते  1---बौद्धिक  2--शारीरिक  3--भावनिक   आणि हे तिन्ही विकास  माणसा मध्ये जेव्हा सकारात्मक वर्तन बदल घडवून  आणतात तेव्हा खऱ्या अर्था ने आपण शिक्षण घेतले असे म्हणता येईल उदा ~आपण  रस्त्याच्या  डाव्या बाजूने चालावे अभ्यासतो म्हणजे बौद्धिक विकास   ट्रैफिक पोलिस असतांना आपण डाव्याच बाजूने च  वाहन चलवितो हा आहे  शारीरिक विकास आणि ट्रैफिक पोलिस  नसतांनाही आपण कोणत्या हि प्रकार चा अनर्थ घडू नये म्हणून  वहतुकीचे नियम पाळतो हा झाला भावनिक विकास म्हणजेच आपण जे शिकलो त्याचा  आपल्यावर झाला सकारात्मक वर्तन बदल म्हणजे "शिक्षण'' होय .
  मग अर्थातच जो व्यक्ती असे शिक्षण घेतो त्याच्या  विचारा -आचाराला एक  बैठक असते , उच्च विचार सरणी असते ,
प्रामाणिक पणा असतो ,जीवना कडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोण असतो , कोणत्या हि परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते , समजाप्रती आपले कर्तव्या ची जाणीव असते ,
मग तो एक कलेक्टर असो किंवा एक फळ किंवा दूध विक्रेता .... जर खऱ्या अर्थी त्यांनी शिक्षण घेतले आहे तर कलेक्टर पैसा खाऊ होणार नाहि आणि फळ किंवा दूध विक्रेता थोडया पैशां च्या मोहसाठी  कार्बाइड मध्ये फळे पिकविनारा आनी भेसळयुक्त  दूध विक्रेता बनाणार नाही
   कारन शिक्षणातून "विकास " साधायचा असतो तो समाजाचा -देशाचा मग आपोआपच  आपला विकास होणारच .....
'हे विश्वची माझ घर ' ही संकल्पना म्हणजे शिक्षण आणी तेच विकासाचे साधन 

लेखन कर्ती~~सौ . मंजुषा देशमुख 
@ ४०
मु+पो ~~अमरावती 
जि.~~~अमरावती 
९४२२८८४१४०
✍✍✍✍✍✍✍✍✍

===========================================

लेख क्रमांक : अकरा 

+91 91466 15473‬
📚शिक्षणाचे महत्त्व📚

       'शिक्षण' म्हणजे नेमके काय? शाळेत जाऊन, वर्गात बसुन, शिक्षकांनी जे शिकवल ते आत्मसात करणे म्हणजे शिक्षण आहे का? 'नाही',  ज्ञान ,तर्कज्ञान आणि अनुभव यांची सागंळ म्हणजे 'शिक्षण'. या धावपळीच्या वैज्ञानिक युगात शिक्षणाच अतिशय महत्त्व आहे. या काळात अन्न, पाणी, निवारा या व्यतिरिक्त शिक्षण सुध्दा जगण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरतो.
          आधीच्या काळात शिक्षण नव्हत अस नाही, पण या काळात वाढलीय ती टेक्नॉलॉजी आणि वाढलाय त्याचा उपयोग. जगाच ज्ञान घेण्यासाठी टेक्नॉलॉजी चा उपयोग आवश्यक आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. युगायुगापासून शिक्षण सुरु आहे. शिक्षण देणारे बदलले , शिक्षणांच्या पद्धती बदलल्या, प्रत्येक युगात शिक्षणाची परिभाषा वेगळी ठरली पण शिक्षणाच महत्त्व कधीच बदलले नाही.
      शाळेत कधीही न गेलेल्या स्री-पुरुषांना बाजारातला पैशांचा व्यवहार चांगला जमतो तेही तोडी पण तेच जर आपण त्याच्या हातात लेखनी दिली आणि गणित सोडवा म्हटलं तर ते त्यांना जमणार नाही. कारण ते कधी गणित शिकले नाहीत. पैशाचा व्यवहार येतो म्हणून शिक्षणाची गरज नाही अस होत नाही. लिहीता वाचता आणि समजता येत असेल त्याला आपण सुशिक्षत म्हणू. कितेकदा अशिक्षितपणामुळे आपला तोटा होतो. किमान आपला तोटा वाचवण्यासाठी शिक्षण घेतलं पाहीजे. आपण शिक्षण घेतलं तर आपला समाज सुशिक्षित होऊन पुढारेलं.
       शिक्षण ही समाजाचीच नव्हे तर काळाची गरज आहे. घोकणपट्टीला नाही तर्कज्ञानांला महत्त्व आहे.
 मोठी पुस्तक झाली 
 वाचायला घोकण,
 घोकण नकोरे 
 जोतीबाचं द्या तर्कज्ञान...!
    
भाग्यश्री चलाख.
नागपूर
मो.नं: 9146615473
~~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

लेख क्रमांक : बारा 
"शिक्षण जिवन विकासाचे साधन"

   शिक्षण एक किमया आहे. ज्याने ती कला आत्मसात केली. तो खरच आपल्या आयुष्याचा किमयार ठरतो.
उदाहरण म्हणून द्यावयाचे झाल्यास, मी दलित साहित्याचा उगमांकडे बोट करेन. हजारो वर्षोंनुवर्षे ज्याला आपण गुलाम म्हणून वागवलो जात आहोत, याची त्याला साधी खंत ही नव्हती. पण जेव्हा शिषणमहर्षींनी त्यावर, शिक्षणांचा परिस फिरवला अन् बघता बघता असंख्य चळवळी गुंफल्या गेल्या, हे वास्तव सत्य नाकारुन चालणार नाही.
   मी म्हणेन शिक्षण संवेदना ही आहे. म्हणूनच शिकलेल्या इंग्रजांनी अडाणी असलेल्या भारतीयांना स्वातंत्र्याची जाणीव करुन दिली. महात्मा फुले, डाँ. बाबासाहेब आणि राजर्षि शाहु यांनी शिक्षणातून जगण्याप्रती संवेदना निर्माण केली. वन्यजीव सारखं जगण्याची विवंचना करुन, संघर्ष करण्यास सांगीतले. सुरवातीस अज्ञानी असलेल्या समाजाने ह्या संवेदना धुळीस लावल्या. याचे उदाहरण म्हणून अॅड. एकनाथ जी आपल्या आत्मचरितात म्हणतात की, "गाव एका सणाला म्हशीचं पारडू ( येला ) कापीत असे, वरवर जरी हे गावाचे रक्षण व्हावे म्हणून असले तरी, खरे हे की मागासलेला समाज प्रतिष्ठित समाजाच्या हाताखाली असावा हा प्रमुख हेतु होता. म्हणून मी  विरोध केला तर माझ्या उपाशी समाजाने मला बोल सुनावले, कारण ते अशिक्षीत होते. त्यांना त्याची जाणीव नव्हती."
   विद्रोही साहित्य ही शिक्षण संवेदनावरच आधारलेल आहे. हे नाकारुन चालणार नाहीं. खलिल जिब्रान सारखा जागतीक विद्रोही लेखक अरेबी स्त्रियांवरील अत्याचाराची संवेदना देतो. कारण त्या स्त्रियां आजही धर्माच्या नावावर  शिक्षणांपासून दुर आहेत. यांचे वर्तमान उदाहरण म्हणून पाकिस्तान च्या मलाईका चे नाव सुचवू इच्छितो.त्याचबरोबर भारताती माओ आणि नक्षली चळवळी, शिकलेल्या डोक्यांनी अयोग्य मार्ग अवलोकन करुन अशिक्षीतांमध्ये संवेदना भरुन पेरलेल्या दिसतात.
   शिक्षण हे दुधारी अस्त्र आहे अस पूर्वी म्हटलं जायचं. म्हणून ते संपादन करण्यासाठी मोठे मोठे सम्राट आपल्या पाल्यास, वनात राहणा-या कठोर परिस्थितित जिवन जगणा-या महर्षिकडे सफुर्त करत. त्यातूनच दिक्षा घेऊन सम्राट पुत्र अजब एकहाती पराक्रम करत. त्याच सर्व श्रेय शिक्षणाला जाते.
   शिक्षणांची विविध मीमांसा करतांना  शिक्षण प्रगतिचे चाक आहे , ज्याने योग्य दिशेने हे चाक ओळवले, त्याचा विकास निश्चित आहे. पण सध्या याप्रती खुप खंत वाटते. 
   कारण शिक्षणाचं बाजारीकरण झालेले, सर्व कडे दिसून येते. ऐवढे पैसे द्या, अन् ही डिग्री घ्या! हे सम्मानाने सांगीतले जाते. मग सांगा त्याची शाश्वत गुणवत्ता कशी टिकेल.
   हि भारतीय शिक्षण पद्धतिची खुप मोठी शोकांतीका आहे, हे डावलून चालणार नाही.
- महेश देसले
Mdesale29999@gmail.com
8806646250

=======================================







Thursday, 21 April 2016





📚📚साहित्य दर्पण 📖
                द्वारा आयोजित

🎹   नाद चारोळी स्पर्धा 🎹

💥भाग :::→01 पहिला 💥
~~~~~~~~~~~~~~~
दिनांक:::→21-04 -2016
 वार:---→गुरूवार
~~~~~~~~~~~~~~~
विषय→ थेंब थेंब वाचवा पाणी
==================
संकल्पना:--आप्पासाहेब सुरवसे लाखणगांवकर
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
मार्गदर्शक ::→ना सा येवतीकर  धर्माबाद
************************
संयोजक::::→सौ मंजूषा देशमुख ,अमरावती
±±±±±±±±±±±±±±±±±±
परीक्षक ::::→श्री.गजानन पवार पाटिल वरूड देवी हिंगोली
××××××××××××××××××
थेंब थेंब पाणी साचवूया
पाण्याविना आहे जीवन व्यर्थ
रेल्वेने नव्हे तर नळाला पाणी
यावे तेंव्हा जीवन होईल सार्थ

✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री. आप्पासाहेब सुरवसे
         लाखणगांवकर
   AMKSLWOMIAW
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌹🌹स्पर्धेसाठी🌹🌹
सर्वाना विनंती करतो की
असाल राजा अथवा राणी
सध्या जगाची गरज अाहे
वाचवा थेंब थेंब पाणी
@२१ सुनिल बेंडे वसमत
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
स्पर्धेसाठी चारोळी

दुष्काळ तो सांगूनी गेला
पाणी अमृताचा प्याला
वाचवा थेंब थेंब त्याचा
निक्षून बजावून गेला

___________________

मिळेना कुठे पाणी
आले डोळ्यात पाणी
पाण्यासाठी वणवण
पाणी सांगे कहाणी

___________________

थेंब थेंब पाण्यासाठी
कीती धोक्यात जीव
उतरावे विहीरीत खोल
कोणास येईना किव

____________________


पाण्यावाचून हलेना पान
पाणी सजिवांचे जीवन
पाणी आहे खरीच दौलत
थेंब थेंब अमोल पावन

___________________

पाण्याच्या प्रेमात पडतो
आहे ईथे प्राणी प्रत्येक
पाणी वाचवा थेंब थेंब
पाण्यापायी मेले कित्येक

___________________

कवयित्री सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे
मोबाईल - 9763667401
©काॅपीराईट
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
💧💧
"थेंबाथेंबात लपलयं जिवन
साठवण त्याची करू चला
नालाबंडींग नी शेततळ्याची
मुहुर्तमेढ व्हावी या मिरगाला"
💧💧
"पाण्यासाठी महायुद्ध तिसरे
भाकीत खोटे ठरवू आपण
थेंब थेंब जिरवू धरणित
सुखात नांदेल प्रत्येकजण"

👆🏾🖋🖊[स्पर्धेसाठी]
💧💧
"पैसे साठवून तिजोरी भरली
पण भिती चोराची दिसरात
वाचवून पाणी भरतील विहीरी
सूख  अवतरेल कलीयुगात"
.........जयश्री पाटील.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
चारोळी स्पर्धेसाठी


थेंब थेंब वाचवा पाणी
पाणी म्हणजे जीवन कहानी
असलं म्हणजे आबादानी
नसलं म्हणजे कोरडी कहानी

----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~~~~~
पाण्यासाठी दरवर्षी
कित्ती पैसे खर्च होतात
तरीही दर उन्हाळ्यात
गावच्या विहीरी कोरड्या होतात
    ---ज्ञानेश्वर भामरे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
चारोळी...
साहित्य दर्पण स्पर्धेसाठी...


घोटभर पाण्याच्या शोधातं,
मायमाऊली फिरे अनवाणी।।
ओळखूनी भविष्यातला धोका,
थेंब थेंब वाचवा रे पाणी।।

✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050

💐💐💐💐💐💐💐
चारोळी...
साहित्य दर्पण स्पर्धेसाठी...


थेंब थेंब पाण्यासाठी,
माऊलीचा आटापिटा।।
भरेना कधी माठ-रांजण,
किती घालूनीयाही खेटा।।

✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
थेंब थेंब वाचवा पाणी


"दुष्काळाचा करण्या सामना
 थेंब थेंब वाचवा पाणी,
 थेंबाथेंबाने सागर बनतो
 हीच खरी अमृतवाणी!"
__संगीता देशमुख,वसमत
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
निसर्गाशी खेळण्याचा
हा प्रसाद आहे
पाण्याचा दुष्काळ हा
निसर्गाचा शाप आहे
_______________
✍🏻गणेश@5
पाण्याविना होत आहे
निसर्गाची हानी
 वाया घालवू नका,बापहो
जीवन आहे पाणी
--------------------------------------
टंचाईवर मात करण्यासाठी
करा जल पुनर्भरण
पाणी वाचवण्यासाठी
करा हो वृक्षारोपण

✍🏻गणेश @5
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
☄ स्पर्धेसाठी चारोळी ☄

1) पाण्यासाठी भटकलो दाही दिशा
पण नाही दिसली कुठेच आशा
म्हणून थेंब थेंब वाचवूया पाणी
नाहीतर गुंडावा लागेल आपला गाशा
2) पाणी हेच जीवन
पाणी हेच मरण
थेंब न थेंब नाही वाचवला
तर जगण्याला नसेल कारण

✒ प्रा. नितीन दारमोड @ 3
🎯🎯🎯🎯🎯🎯
💧💧💧💧💧
पाण्यासाठी रोज
जावे लागे दुर-दुर..!
चिकाटीने वापरा पाणी
नसता डोळा वाहिल पुर..!!
✍🏻_____ गजानन पवार.@81 .....
 (स्पर्धेसाठी नाही)
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
स्पर्धेसाठी

विहिरित उतरून पाण्यासाठी
आत्ताच एक गेलाय जीव
पाण्यासाठी भटकणाऱ्याची
कोणालातरी येऊ दे कीव
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
निसर्गाशी खेळण्याचा
हा प्रसाद आहे
पाण्याचा दुष्काळ हा
निसर्गाचा शाप आहे
---------------------------------------
 पाण्याविना होत आहे
निसर्गाची हानी
 वाया घालवू नका,बापहो
जीवन आहे पाणी
--------------------------------------
टंचाईवर मात करण्यासाठी
करा जल पुनर्भरण
पाणी वाचवण्यासाठी
करा हो वृक्षारोपण
--------------------------------------
पाणी अडवा,पाणी जिरवा
योजना शासनाची
बंधारे-पाट बांधून
पाणी अडविण्याची
--------------------------------------
पाण्याचा नको अपव्यय
करूया त्याचे जतन
योजनेच्या नावाने
पाण्याचे होतेय राजकारण

✍🏻गणेश @5
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
स्पर्धेसाठी चारोळी

दुष्काळ भिषण सांगूनी गेला
पाणीच असे अमृताचा प्याला
थेंब थेंब वाचविल पृथ्वीला
आधी वृक्षारोपण करू चला

@ सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे
मोबाईल - 9763667401
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💦💦💦💦💦
हातावरचे होते पाणी
पाचशे फुटावरून बोलते!..!
ओढे, नाले धरा अडवून?
पाण्याचा वनवास थांबते..!!
✍🏻 गजानन पवार @81
( स्पर्धेसाठी नाही )
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
थेंबा-थेंबाने करूया
पाण्याचे जतन
अपव्यय केल्यास पाण्याचा
दुर नाही आपुले मरण

✍🏻गणेश @5
🌻🌺🌺🌺🎯🎯🎯
"श्रावणबाळासारखा
खरा होईल शाप
वाचविले नाही पाणी
तर विनाश आपोाप".....
🖋🖊जयश्री पाटील
"श्रावणबाळासारखा
खरा होईल शाप
वाचविले नाही पाणी
तर विनाश आपोआप".....
जयश्री पाटील
साहित्य दर्पण मध्ये जसा
पसरतोय चारोळ्यांचा फवारा
या तापलेल्या भू वरती पाहिजे तसा
थेंब थेंब पाण्याचा मारा...
.
✒ प्रा. नितीन दारमोड @ 3
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
साहित्य दर्पणने दिली
माझ्या चारोळीस दिशा
थेंब-थेंब पाण्याने
पूर्ण होईल तृषा

✍🏻गणेश @5
💐💐💐💐💐💐
स्पर्धेसाठी

वाचवून पाण्याचा एकेक थेंब
चला भविष्य वाचवू
एक निर्धार करूया आज
थेंब अन थेंब साचवू ।।

निलेश निचत@50
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
चारोळी..
साहित्य दर्पण स्पर्धेसाठी..

झाला घसा कोरडा विहीरीचा,,,,
नद्या नाले झाले खाली ||
जर वाचविले असते पाणी,,,
तर तेच कामा आल असत
यंदाच्या साली ||

विशाल मोरे..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्पर्धेसाठी

थेंब थेंब वाचवुन पाण्याचा
साचुन त्याचे बनते तळे
येता संकट दुष्काळाचे
तेव्हाच महत्त्व त्याचे कळे

शंकर तारळकर
9011383535
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
चारोळी...
साहित्य दर्पण स्पर्धेसाठी...


थेंब थेंब पाण्यात कसं,
महत्त्व जीवनाचं दडलयं।।
केल्याने छळ निसर्गाचा,
दर्शन दुष्काळाचं घडलयं।।

✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

पाण्याची भरमसाठ नासाडी
IPLचा धमाकाच लय भारी
दुष्काळी भागात थेंब थेंब
पाण्यासाठी होतेय हाणामारी

✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री. आप्पासाहेब सुरवसे
        लाखणगांवकर
    AMKSLWOMIAW
______________________
@→AK 47 🔫 स्पर्धेसाठी
______________________
🌼💐🌹🌹🌼💐🌹
एक एक थेंब पाण्यासाठी तरसेल ही जिंदगी...
आतापासूनच वाचवल नाही जर पाणी..!
थेंबथेंब शोधन्यात बरबाद होईल ही जिंदगी..
स्वप्न हे जरी वास्तवात बदलेल आज वाचवल नाही जर पाणी..!
👆🏾👆🏾👆🏾[स्पर्धेसाठी]
ऋषिकेश पवार@10,औरंगाबाद
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
स्पर्धेसाठी
काय करणार आता पाणी नाही...
टैंकर शिवाय आता पर्याय नाही..
थेंबे थेंबे तले साचे...
अजून आम्ही विसरलो नाही..!

ऋषिकेश पवार@10,औरंगाबाद
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
स्पर्धेसाठी......
💧💧💧💧💧💧💧
उद्याचा होतील हजार दाणे...
आज पेरलेल्या एका दाण्याचे....
थेंब थेंब पाणी साठविल्याने...
समृद्ध होतील साठे पाण्याचे....
👆🏾👆🏾👆🏾स्पर्धेसाठी
✍🏻✍🏻✍🏻✍🏻
निलेश कवडे @44
💐💐💐💐💐💐💐
स्पर्धेसाठी...
💧💧💧💧💧💧💧
अपुल्या अस्तित्त्वासाठी
इतुके करुया आपण...
मित्रा थेंबाथेंबाने
सागर भरुय आपण
✍🏻✍🏻✍🏻
निलेश कवडे @44
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

थेंबाला थेंब जोड़ता
जलाशय साठतो
पण तोच थेंब उड़ता
सागरही आटतो......

सौ कल्पना शिवाजी महाडिक
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

चारोळी...
साहित्य दर्पण स्पर्धेसाठी...


थेंब अन् थेंब पाण्याचा,
आता जमिनीत जिरवा।।
पाळाल हा मंत्र तरचं,
राहील जीवनात गारवा।।

✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

माझ्या स्वप्नात येऊनि पाणी..
म्हणते मला थेंब थेंब वाचवा..!
आटेल एक दिवशी सारे पाणी..
मंत्र सांगते..
पाणी वाचवा,जीवन वाचवा..!
ऋषिकेश पवार,औरंगाबाद.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
💦 स्पर्धेसाठी💦
गोष्ट सांगते खरी,
पाण्यासाठी होते मारामारी.. !
थेंब थेंब पाणी वाचवा,
पाण्याची आहे कमतरता भारी...!
---------------------------------------
 आपण तर शिकली
सवरली लोक शहाणी,
बचत करा पण्याची
वाचव थेंब थेंब पाणी...!
   ✒️ भाग्यश्री चलाख
मो.नं: 9146615473
💐💐💐💐💐💐💐

स्पर्धेसाठी चारोळी

         
वर्तमानाचे ऐका जरा
थेंब थेंब पाणी साठवा
भविष्याचीही हाक येते
थेंब थेंब पाणी वाचवा
            ***
दुष्काळाची बाधा टाळा
गरजेला घालून आवर
थेंब थेंब पाणी वाचवा
अंघोळीला नको शावर
           ***
थेंबाचे महत्त्व ओळखा
पाणीसंकटाचे घोडे थांबवा
समाजाला हातभार लावा
थेंब थेंब पाणी वाचवा

- दिनेश चौडेकर

दिनेश @ 36
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🚩 स्पर्धेसाठी

पाण्याचे थेंब आहे
साऱ्यासाठी गरजेचे
वाचवू या थेंब थेंब
तेंव्हाच तर तळे साचे
- नासा @ 26
🌻🌻🌻🌸🌸🌸🌸
स्पर्धेसाठी चारोळी
       क्र.२

थेंब थेंब  पाणी तुझे,
अमृताहूनी आज मोल ||
पाणी वाचवा पाणी जिरवा,
नाहितर दिसणार नाही पाणी राहतिल नुसत्या विहीरी गोल ||
*******************

पाणी वाचवा पाणी  जिरवा,,
पाण्यानेच जिवन घडे ||
जर नाही वाचविले पाणी
तर ना राहतील तळे ना राहतील नळे ||
*******************
निरउपयोगी पाणी कामात आना,,
जिरवा जमिनीत सांडपाणी ||
तेच जमिनीत जावून शुद्घ होते,,
ठरते तेच अमृतराणी ||
*****************

थेंब थेबं जिरवा पाणी,,
पाण्याविणा जिवन नाही ||
पाणीच आहे सर्व काही,,
पाणी नाही तर काहीच नाही ||

विशाल मोरे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💦💦💦💦💦💦💦
भोपळ्या माजी साचे पाणी
आयुष्य झाले गोल गोल..!
आता तरी कळू दे मायबापा,
थेंब थेंब पाण्याचे मोल..!!
  ✍🏻 ___ गजानन पवार
(स्पर्धेसाठी नाही )
💧💧💧💧💧💧
रखरखत्या उन्हाळ्यातही चारोळ्याची बरसात भारी
निसर्गराजा पाणी दे पाणी
मागणी ही तुझ्या दरबारी
                 
                            MK@18
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्पर्धेसाठी

जीव टांगणीला,
माझ्या शेतकरी बापाचा।
चला चला जिरवूया,
थेंब थेंब पाण्याचा।
✍🏻महेश हातझाडे@42
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
4) वेळ संपता संपता
एवढे एकच सांगणे
थेंब थेंब वाचवूनी आता
पाण्याचे संवर्धन करणे

✒ प्रा. नितीन दारमोड @ 3
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
* चारोळी स्पर्धा साठी *

पाण्याच मोल..
मानवा, तुला कळता कळायचं नाही
थेंबबर पाणी..
जीव वाचवण्यासाठी मिळायचं नाही
- महेश देसले
8806646250
Mdesale29999@gmail.com
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
संकलन ::::----†↓↓↓↓↓↓↓
प्रा . नितिन जी दारमोड सर
धर्माबाद जिल्हा नांदेड

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

Sunday, 17 April 2016


📚  साहित्य  दर्पण 📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

भाग :------      1ला  पहिला
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
दिनांक :--17 एप्रिल 2016
वार:----- रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
वेळ सकाळी 9:00Am ते
सायंकाळी 7:00Pm पर्यंत
==================
विषय:----समाजात स्त्रियांचा दर्जा उंचावण्याचे उपाय
==================
संयोजक :--प्रा.नितिन दारमोड,नांदेड
************************
परीक्षक:---प्रा.सौ.संगीता भालसिंग अहमदनगर
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"''''''''''''''''''''''''''''
संकलन:-- श्री अनिल जी लांडगे सर ,परभणी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आणि ग्राफिक्स :--ना सा येवतीकर सर धर्माबाद
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'


* समाजात स्त्रियांचा दर्जा उंचाविण्याचे उपाय *

यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, तत्र रमन्ते देवता या संस्कृत भाषेतील सुवचनाचा अर्थ आहे ज्याठिकाणी स्त्रियांची पुजा केली जाते त्याठिकाणी देव रमतो. हे झालं शब्दशः अर्थ परंतु प्रत्यक्षात त्याचा अर्थ असा आहे. ज्या घरात स्त्रियांची पुजा केली जाते म्हणजे स्त्रियांना मानाचे स्थान दिले जाते, त्यांच्या विचारांना वाव दिले जाते, त्यांचा मान ठेवला जातो, आणि त्यांना समानतेची वागणूक दिली जाते, त्या घरात देव रमतो यांचा अर्थ त्या घरात शांतता व समृद्धी राहते. त्या घरची उत्तरोत्तर प्रगती होत राहते. वरील सुवचन आपणांस बऱ्याच ठिकाणी वाचण्यात येते. नेहमीप्रमाणे वाचन करणे आणि सोडून देणे यापलीकडे आपण काहीच करीत नाही हे ही सत्यच आहे. पुरातन काळापासून महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेली नाही हे वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या छोट्या मोठ्या महिलांच्या अत्याचाराच्या बातम्यामधून कळून येते. आजही स्त्रियाना चूल आणि मूल या क्षेत्रापुरतेच बांधून ठेवले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आजही त्यांना त्यांचा दर्जा मिळालेला नाही. त्यांचा दर्जा उंचाविण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ? यांचा विचार करण्याची ही योग्य वेळ आहे असॆ वाटते.
शनि मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी सध्या समाजात वादविवाद चालू आहेत. न्यायालयाने महिलांच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु समाज मानण्यास तयार नाही. तेंव्हा प्रश्न असा पडतो की, महिलांना मंदिरात प्रवेश दिल्याने त्यांचे प्रश्न सुटणार आहेत काय ? याचा विचार करणे गरजेचे आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार, अमानुष छळ या विषयावर आंदोलने झाली असती तर कदाचित महिलांना मोकळा श्वास घेता आले असते. स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आजपर्यंत स्त्रियांच्या समस्येवर सर्वांनी भरभरून लिहिले आहे मात्र समाजात आजही महिलांचे समस्या काही कमी झाले नाहीत कारण या समस्यावर उपाययोजना झालीच नाही. फक्त चर्चा आणि चर्चाच झाली. म्हणूनच उपायांची अंमलबजावणी करण्याची नितांत आवश्यकता आहे. संसारात पुरुष आणि स्त्री दोघांनाही समान महत्व आहे. रथाच्या चाकाप्रमाणे पुरुष आणि स्त्री हे एकमेकांना पूरक आहेत. एक जरी चाक खराब झाले तर ज्याप्रमाणे रथ चालत नाही अगदी तसेच पुरूष आणि स्त्रियांचे आहे. दोघांच्याही प्रगतीत एकमेकास असलेला आधार महत्वाचे आहे त्याशिवाय जीवनाची प्रगती शक्यच नाही.
शिक्षणाने माणसाचा संपूर्ण विकास होतो हे यापूर्वी महात्मा फुले यांनी सांगितले आहे. शिक्षणामुळे व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण होते. अन्यायाविरूध्द लढण्याची शक्ती मिळते. समाजात मान आणि सन्मान दोन्ही मिळतात. याचमुळे समाजात स्त्रियांचा दर्जा उंचाविण्यासाठी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचसोबत याच शिक्षणाच्या माध्यमातून ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले तर कोणत्याही संकटाला न डगमगता यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतात. आज कित्येक स्त्रिया स्वतःच्या पायांवर उभे होत आहेत. त्यामुळेच समाजात त्यांचा दर्जा सुध्दा उंचावला जात आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलींची संख्या समाधानकारक आहे मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत लक्षणीय फरक आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मुली उच्च शिक्षण पूर्ण करतात. यांत बदल झाले पाहिजे. शासनाने सुध्दा मुलींच्या उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष देवून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी मुलींच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यायलाच पाहिजे. मुलगा - मुलगी यांत भेद न मानता समान तत्वावर चालली पाहिजे असॆ वाटते.
जी व्यक्ती पैसा कमाविते, त्यांस घरात, समाजात आणि गावात प्रतिष्ठा मिळते आणि आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये पैसा फक्त पुरुष कमावितो म्हणूनच त्यालाच प्रतिष्ठा मिळते, यांत काही चूक नाही. मग स्त्रियांनी देखील रोजगार किंवा नौकरी मिळविले आणि त्याद्वारे पैसे कमवु लागले तर समाजात, घरात आणि गावात त्यांची सुध्दा प्रतिष्ठा नक्कीच वाढू लागेल, यांत शंकाच नाही. यांचाच विचार करून प्रत्येकाने आपल्या बहिणीला किंवा मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असॆ शिक्षण देऊन त्यांना रोजगार किंवा नौकरी करण्याची संधी दिली तर ते स्वतः प्रगल्भ होतील आणि त्यांचा समाजातील पत वाढून दर्जा सुध्दा वाढण्यास मदत होईल. महिलांचा समाजातील दर्जा उंचाविण्यासाठी दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपादक श्री मुरलीधर ( बाबा ) शिंगोटे यांनी जय महाराष्ट्र च्या स्तंभलेखिका राही भिडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीच्या निमित्ताने मुख्य संपादकाची जबाबदारी देऊन खऱ्या अर्थाने महिलेचा सन्मान केला आहे असॆ वाटते.
जुन्या विचारांचा पगडा डोक्यावर असल्यामूळे समाज आज सुध्दा त्या सनातन परंपरेत अडकून पडले आहे. श्रध्दा आणि अंधश्रद्धाच्या विळख्यातून महिला अजूनही बाहेर आले नाहीत. तेंव्हा महिलांनी आत्ता आपला समाजातील दर्जा वाढविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे सुध्दा तेवढेच आवश्यक आहे. समाजात एकाएकी असॆ बदल होणार नाही. त्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही सामंजस्यपणे वागणे ही गोष्ट सुध्दा विसरून चालणार नाही.

नागोराव सा . येवतीकर 09423625769

=============================================

📚✒साहित्य दर्पण 📰🖊
                    द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार   🗽
≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠
प्रेषक::-→↓↓↓↓
श्री. आप्पासाहेब सुरवसे
         लाखणगांवकर
★★★★★★★★
            "सत्याला सत्य आणि असत्याला असत्य हे अनुभावाच्या कसोटीवर प्रत्यक्षात मानायला जे शिकवतं आणि हेच सत्य प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करायला जे बाळकडु पाजलं जातं नव्हे तर ते शिकवण देतं ते म्हणजे शिक्षण "---आद्यशिक्षण क्रांत्तिकारक,क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी अगदी मार्मिक आणि समर्पक शब्दात शिक्षणाची व्याख्या  केलेली आहे... आणि म्हणून स्त्री, -स्त्री कल्याण, तिचा विकास ,उत्कर्ष,आणि तिच्या संबधी विविध दूरदृष्टि महत्वाकांक्षी योजना  याचा उहापोह चर्चा, वाद- विवाद, परिसंवाद हे स्थानिक पातळी पासून ते जागतिक पातळी पर्यंत एरंडाच्या गुर्हाळाप्रमाणे गाळतात.एवढेच काय लोकशाहीच्या चौथा खांब विविध प्रसारमाध्यमे यात मुद्दामहुन विषय चगळतात.पण परिणाम मौल मात्र शून्य दिसते .
         एरंडाचे गुर्हाळ याच साठी म्हटले आहे की,स्त्रीचा दर्जा ,समाजातील पत , प्रतिष्ठा, किंमत उंचावण्याच्या प्रत्येक जन कोठुन सुरुवात करतो हाच खरा वास्तववादी प्रश्न पडतो आहे ? आपल्या घरातील स्त्रीला आपण घरात किंमत देणार नाहीत,एवढेच काय समाजात वावरु देणार नाहीत , तिच्या स्वाभिमानी जगाला अंकुश न लावता स्वातंत्र्याची वागणूक देणार नाहीत  तोपर्यंत  स्त्री आणि स्त्रीच्या वेगवेगळ्या रुपाची  महती , महत्व ,किंवा महिमा आपण खऱ्या अर्थाने  वर्णन करुच शकत नाहीत आणि म्हणून मुलभुत पहिला उपाय म्हणून घरात अगोदर किंमत ,मान- सन्मान द्या ,मग समाज आपोआप  किंमती बरोबर मान- पान, सन्मान ,प्रतिष्ठा देईल नव्हे तर तिला डोक्यावर घेत  तिच्या कार्यकर्तुत्वाची नि प्रगल्भतेची  मीमांसा   करत कौतुक ,प्रसंशा केल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही ...
                   आज मित्तिला पुरोगामी पणाचे ढोंग वर करणी दिसून येते आहे कारण पुरोगामी विचार आणि कृती यात खुप मोठी दरी असल्याचे दिसून येते आहे. एकीकडे  सर्वोच्च न्यायालय स्त्रीला आत्मसन्मानाची वागणूक देण्यासाठी कटिबध्द असल्याचे  कायद्याच्या भाषेत सांगत असले, तरी  दुसरीकडे स्थानिक महिलांना हाताशी धरून आणि  त्यांचा स्त्री जातिविषयीचा अज्ञानाचा  फायदा घेत "काटयाने काटा काढला जातो " या उक्तिप्रमाणे  स्त्रीच स्त्रीच्या विनाशाचा पाया रचत आहे नव्हे स्त्रीच स्त्रीच कर्दनकाळ ठरू पाहते आहे . आजघडीला पुरोगामित्वाच्या विचारांना कुठेतरी कृतीची जोड कमी पड़ते आहे,याचा सारासार विचार व्हावयास हवा..! म्हणूनच कथनी आणि करनी मधील विषमता दूर व्हावी आणि मग पुरुषांना  मंदिर प्रवेशच काय ...? पण घरातल्या  किचन मध्ये पुरुषी अहंकारी वृत्तीला स्वयंपाक घरात  स्त्री बरोबर पुरुषाला प्रवेश घेण्यास भाग पाडावे म्हणजे------ म्हणजे आजची ही स्त्रीची  दयनीय, केविलवाणी- दीनवाणी अवस्था येणाऱ्या पुढील काळात न दिसता पुरुषांच्या बराबरीची नि वैचारिक उत्तुंग गरुड़ झेपेच्या प्रगल्भतेची येणाऱ्या  भविष्य काळात  उंचावल्याशिवय राहणार नाही.....

          स्त्रीला विरोध आणि फक्त विरोध कुठे होत असेल तर तो सर्वाधिक तिव्र स्वरुपात  तिच्याच् घरात ,नंतर मोहल्ल्यात, समाजात ,गावात, नि मग नातेवाईकांमध्ये सामना करावा लागतो मग  ही शृंखला बनत जाते .आणि हीच शृंखला का बनते तर  स्त्रीत्वाविषयीचा समाजाचाच काय तर एकंदरीत सर्व पर्यायी घटकांचा स्त्री आणि स्त्रीत्वा वर नेहमीच अविश्वास दाखवला जात आहे.हा अविश्वास गैर विश्वासु आहे म्हणून स्त्रीला देवीच्या रुपात पाहतात मग विश्वासु ही समजण्यात  यावे तरच म्हणजे पुरोगामी त्वाचा ठसा जगाला बिंबवलेला दिसू शकेल..
           शिक्षणाशिवाय प्रगती नाही,विकास नाही ,उत्कर्ष नाही आणि सर्वांचे मूळ म्हणजे शिक्षण ...!!! संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी "शिक्षण" हेच एक रामबाण जालीम एक नंबरचे औषध आहे. हे कदापि ही विसरून चालणार नाही. आणि म्हणून आज मग पुन्हा एकविसाव्या शतकात काही धर्मांध शक्ति स्त्रीच्या जुन्या रूढि चाली रीती परंपरा पण बिनबुडाच्या  पाळल्या जाव्यात  यासाठी आग्रह धरताहेत..
        संविधान मानते की संबध मानव जातीचे   कर्माने श्रेष्टत्व  ठरवले जाऊ शकते.. न की त्याच्या जन्माने...!!! पण म्हणून काय आता नव्याने मनुस्मृतिचे प्रकाशनाचा घाट बांधला जातो आहे की काय ? आणि मग जुन्या सर्व सिस्टम वर्णवर्गीय अगदी तंतोतंत पाळल्या जाव्यात यासाठी अट्टहास करत आग्रह धरत आहेत.
          आजच्या स्त्रीने मग  काय फक्त रांधा -वाढा,धूणी- भांडी ,नि उष्टी काढ़ा किंवा मग "चुल आणि मूल "या आणि अशा कर्मठ विचारांत आणि कृतीमध्ये  गुरफटून रहायचे का ?? याला जबाबदार कोण ??  तर स्वत:ला सावित्रीच्या लेकी म्हणून  ज्या महिला सिध्द करत अथवा मानायला तयार होत नाहीत त्या अशा जळमळटलेल्या विचारांच्या  पाईक म्हणून स्वता:ला घोषित करतील आणि मग इतिहासाचा काळ त्यांना आणि त्याच्या प्रवृत्तीला कदापि माफ करणार नाही. खऱ्याखुऱ्या सराईत गुन्हेगार म्हणून इतिहासात गणल्या जातील  इतिहास त्याची नोंद घेईल आणि इतिहास ,सामाज ही मग माफ करणार नाही यांच्या अशा विचार आणि कृतीचे पुनर्वसन हे होणे क्रम प्राप्त झाले पाहिजे.
         पूर्वीचा मनुचा कायदा हा आभासी आणि आजचा संविधानाचा  वास्तववादी युगाचा वेध घेणारा कायदा यात जमीन आसमान चा फरक आहे.पण आजची शिकल्या सवरलेली स्त्री मनुचा कायदा पाळते .नैसर्गिक नियमांना  हारताळ फासते म्हणजेच  काय तर मासिक धर्मात पाळीच्या वेळी  कोणतेही  सत्कर्म  ,पूजा पाठ किंवा  ग्रामीण भागातील स्थानिक राजकारनातील पदाधिकारी असणाऱ्या स्त्रीया "झेंडावंदन "सारख्या राष्ट्रिय कामाला नकार देते मग  पुन्हा प्रश्न पडतो की समाजात स्त्रीचा दर्जा नेमका कोणी उंचवायचा....?????

✍🏼🖊🖊🎯🖊🖊✒
श्री. आप्पासाहेब सुरवसे
       लाखनगांवकर
AMKSLWOMIAW
=============================================

** समाजात स्त्रियांचा दर्जा उंचावण्याचे उपाय **
         
           विधात्यानं निर्माण केली ही सृष्टी ! समवेत निसर्गही ! त्याचा येथेच्छ उपभोग घ्यायला पुरूष जातीला जन्माला घातलं... भविष्याला आपल्या ओटीत फुलवणारी अन् भूतकाळाला पदरात झुलवणारी स्त्री त्यानं निर्मिली... स्त्री निर्मितीचा हेतू किती निर्मळ पण आमच्या संस्कृतीनं तिच्या नाजूक पायात रूढी परंपरेच्या बेड्या ठोकल्या. चुल आणि मुल इथं पर्यंत मर्यादित ठेवलं. पण काळ बदलत गेला आणि तिने जुलुमाचा पिंजरा तोडून आपल्या आशा आकांक्षांचे पंख फडकून विकास घडवायला सुरुवात केली. कधी कल्पना चावला बनून अवकाशाला गवसणी घातली तर कधी सिंधूताई सपकाळ बनून अनाथांची माय बनली. कधी इंदिरा गांधी बनून राजकारणात दबदबा निर्माण केला तर कधी किरण बेदी बनून प्रशासनातलं कौशल्य दाखवून दिलं. पण मुळात स्त्री आजही उपेक्षितच आहे. रस्त्यावरून चालत जात असतांना तिच्या कडे वासनेच्या नजरेतून पाहणारे आंबटशौकीन नर समाजात आजही वावरतात. म्हणून स्त्री जातीला समाजात योग्य मान सन्मान व आदर मिळणे ही काळाची गरज आहे.
          सर्वात आधी समाजाची स्त्रियांप्रती असलेली मानसिकता बदलायला हवी. परस्त्री माते समान हा विचार रुजलाच पाहिजे. स्त्री जातीने आत्ता सशक्त होण्यासाठी शिक्षणाची कास अधिक परिपक्वपणे धरली पाहिजे. अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडून विज्ञानवादी विचार केला पाहिजे. वट सावित्री साठीचे नवस उपवास सोडून क्रांतीज्योती सावित्रीबाईचे चरित्र वाचले पाहिजे. पाळण्याच्या दोरी बरोबरच आपल्या विकास रथाची दोरी सांभाळली पाहिजे. देव-देवतांची पारायणे करण्यात गुरफटून न राहता स्त्री उध्दारकांची चरित्रे वाचून आपल्या वैचारिक पातळीत वाढ घडवून आणावी. परंपरेच्या शृंखला तोडून वैचारिक परिवर्तन घडवून आणावे. नवरा आंधळा होता म्हणून आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधणारी गांधारी न होता पतीच्या आंधळेपणावर आपल्या डोळसपणाने त्याला दृष्टी मिळवून देणारी नवी गांधारी उभारायला हवी.
        शनी शिंगणापूर च्या चौथ्यावर प्रवेश मिळावा म्हणून तृप्ती देसाई ह्यांनी यशस्वी आंदोलन केलं पण त्याने काय शनी देव वेगळा पावला काय? नवा चमत्कार घडवून आणला काय? नाही ना. मग हीच आंदोलनं जर स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी केलं तर... हुंडाबळी विरोधात उभारलं तर... नक्कीच स्त्री जातीच्या उध्दारासाठी मदत होईल.
             समाज जीवनाच्या चौकटीत पुत्ररत्न देणारी माता समाजाच्या आदरास पात्र ठरते पण कन्यारत्न देणारी माता अवहेलनेला कारण ठरते. म्हणून आजच्या स्त्रीयांनी आपल्या सर्वांगीण विकासा करीता शिक्षणाच्या वाटेवर चालायला हवे. स्त्री पुरुष समानतेचा अजेंडा मिरवायला हवा. विज्ञानाची साथ धरून बदल घडवायला हवा. प्रत्येक कार्यक्षेत्रात आपल्या विकासाचा झेंडा फडकावयाला हवा.
समाज हा चंद्रावर जात असला तरी एक गोष्ट विसरतो की भारतीय महापुरूषांना घडवणारी केवळ स्त्रीच आहे. तिच्या शक्ती सामर्थ्याने महापुरूष राष्ट्राचे नायक झाले. छत्रपती शिवरायांना घडवणारी राष्ट्रमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घडवणारी माता रमाबाई, म. फुलेंना घडवणारी सावित्री ही स्त्रीच होय. आज चंगळवाद आणि परावलंबी जीवनाच्या आहारी गेलेली आपली नवीन पिढी भरकटलेल्या अवस्थेत नानात-हेचे अनैतिक कृत्य करुन स्त्रीयांचे शील लुटत आहेत. येथे 'आरोपी कोण' हे शोधण्यापेक्षा मुलाने आपल्यातला छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर, म. फुले जिवंत केला आणि मुलीने आपल्यातील जिजाऊ, रमाई, सावित्री जिवंत केली तर चंगळवादाचा पराभव होईल. शिवाय दिल्लीची निर्भया देखील पुन्हा भारतात कुठेच होणार नाही.
      स्त्रीयांच्या सहनशक्तीची उंची आणि विविध भूमिकेचे गुणधर्म मोजण्याएवढा पुरुष जाणी असेल असे मला वाटत नाही. तसा जाणी तरूण निर्माण व्हावा आणि स्त्री-पुरूष समानतेच्या नवयुगाचा आरंभ व्हावा एवढीच निखळ भुमिका यामागे आहे.

( शब्द मर्यादेची अट पाळून )

✒ प्रा. नितीन दारमोड
      धर्माबाद
=============================================

समाजात स्त्रियाचा दर्जा उचाविण्यासाठी......
स्त्रियांनी कुठल्याच परीस्थितीत खंबिरपणे न घाबरता सामना केल्यास
त्याचा दर्जा उचावेल...
"कारण"
 आजकाल विनयभंग,बलात्कार असे
प्रकार घडत असल्याने
स्त्रियाना समाजात मोकळेपणाने जगण्यास मनाइ केली जाते,,त्यामुळे त्याच्या मनातील इच्छा,आकांशा मनातच राहतात...
     उदा: शिक्षण घेउन स्वताच्या पायावर उभ राहून या समाजात आपले
अस्थित्व निर्मान करावे
पण समाजातल्या अशा घटनांनमुळे ते पूर्ण करू शकत नाहीत ,,
..
..
विनयभंग बलात्कार असे प्रकार थांबविण्यासाठी,,व स्त्रियांचा दर्जा समादात उचाविण्यासाठी
  आपल्या मुलींना,बहीनींना  स्व:ता सामर्थ बनविण्यासाठी
माझ्यामते कराटे क्लासेस, बॉक्सींग झ.विद्या प्राप्त करून द्याव्या लागतील तेव्हाच स्त्रिया आपले स्वरक्षण स्वता करू शकतील,,तेव्हाच स्त्रियाचा दर्जा समाजात उचांवेल कारण
     ति स्व:ता च्या पायावर उभी असेल ,ति स्वताची मदत स्व:ता करू शकेल..
..
..
..
विशाल मोरे
7387737148
=====================================

1)  स्रि शिक्षणाची कास धरावी.
2)मूलाप्रमानेच मुलीची काळजी घ्यावी.
3)शिक्षणामध्ये अग्रक्रम द्यावा.
4)मुलीला उच्च शिक्षण द्याव
5)मुलीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे.
6)आवडी निवडीचे स्वातंत्र्य असावे.
तिचे वयात आल्यावरच लग्न  करावे.
स्रियांकडे समाजाचा पाहण्याचा  द्रुष्टीकोन विधायक असावा
स्रियांच्या आत्मसंमानाला ठेच लागू नये.
सुनेला मूलींप्रमाणे वागवा.
भारतात गायीप्रमाणे माय पण सुरक्षित असावी.
🖊🖊🖊🖊✒✒
सदानंद मोरे  वडोदा
ता.मलकापुर जि.बुलडाणा.    
 7387298079/9561082632

=======================================


























मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...