*तंत्रस्नेही शिक्षक : काळाची गरज*
- नासा येवतीकर
आजचे युग हे संगणकीय आणि नवनवीन तंत्रज्ञानाचे आहे. रोज काही ना काही नवीन महितीची भर पडत आहे. संगणक, मोबाईल आणि स्मार्ट फोन मुळे घरबसल्या बरीच माहिती मिळत आहे. एका क्लिक वर हवी ती माहिती क्षणात मिळण्याची सुविधा आत्ता निर्माण झालेली आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शाळेतील अध्ययन आणि अध्यापनात झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल असा विश्वास शालेय विभागाचे शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेब, शिक्षण संचालक मा. गोविंद नांदेडे आणि शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर साहेब यांना वाटतो. त्याच मुळे त्यांनी राज्यातून तंत्रस्नेही शिक्षकांची फौज तयार व्हावी यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर तंत्रस्नेही शिक्षकासाठी कार्यशाळेचे आयोजन करीत आहेत.
आज राज्यात सर्वत्र डिजिटल शाळेचे वारे वाहत आहेत. अनेक गावातील जनता स्वयंस्फुर्तीने समोर येऊन शाळेला समृध्द कसे करता येईल ? याचा विचार करीत आहेत. 14 व्या वित्त आयोगातुन शाळेला मदत मिळत आहे. गावचे सरपंच इतर सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेत यापूर्वी शिक्षण घेतलेले आणि सध्या चांगल्या पदावर काम करणारे गांवकरी, तसेच शाळेतील कार्यरत शिक्षक यांनी सर्वानी मिळून शाळा डिजिटल आणि ज्ञानरचनावादी करण्याचा जणू विडा उचलला आहे असे चित्र सध्या राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.
बदलत्या काळानुसार शिक्षकास सुध्दा बदलणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय आपली धडगत नाही हे ही आत्ता शिक्षकांना कळून चुकले आहे. त्यामुळे आज प्रत्येक शिक्षक तंत्रस्नेही होण्याचा प्रयत्न करतोय आणि ते गरजेचे आहे. आज शाळेतील सर्व योजना मग ते मुलांची शिष्यवृत्ती असो किंवा विद्यार्थ्याची सरल मध्ये माहिती भरणे असो ते आत्ता ऑनलाइन झाले आहे. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत रोजच्या रोज लाभार्थी विद्यार्थी संख्या ऑनलाइन करण्याचे काम यावर्षी 15 जून पासून चालू करण्यात आले. स्वच्छ विद्यालय पुरस्कारसाठी ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय शाळेचा पुरस्कार साठी विचार केला जाणार नाही. शिक्षकांना राज्य पुरस्कार मिळविण्यासाठी या वर्षी पासून ऑनलाइन द्वारे च अर्ज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजे शालेय कारभारात आत्ता ऑनलाइन चे काम फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शिक्षकांचा पगार सुध्दा आज शालार्थ या ऑनलाइन प्रणाली द्वारे दिल्या जात आहे परंतु सध्या ही प्रक्रिया शिक्षक किंवा मुख्याध्यापक स्वतः तयार करीत नसून बाहेरील कमर्शियल व्यक्ती कडून करून घेत आहेत त्यामुळे शासन ज्या उद्देश्यासाठी प्रणाली सुरु केली ती असफल होताना दिसत आहे शिक्षक आणि मुख्याध्यापकच नाही तर अधिकारी मंडळी सुध्दा याच मार्गावरुन वाटचाल करीत आहेत यासाठी आर्थिक झळ सोसावे लागत आहे ती गोष्ट वेगळी नुकतेच बदल्याच्या प्रक्रिया पार पडल्या यात जवळपास हजारांच्या घरात बदल्या झाल्या पूर्वी च्या पद्धतीनुसार एका ठिकाणाहुन गमन आणि दुसऱ्या ठिकाणी उपस्थित झाले की संपले पण आज या शालार्थ प्रणाली त पूर्वी सारखे तर प्रक्रिया कराविच लागते तयशिवाय
ऑनलाइन सुध्दा गमन आणि उपस्थित व्हावे लागते आणि त्यासाठी ज्याना जसे जमेल तसे ह्या बाहेरील व्यक्तिनी पैसे उकळले असल्याची चर्चा आज शिक्षक खाजगी स्वरुपात बोलत आहेत याला कारण एकच आहे आपण तंत्रज्ञानाशी मैत्री न करता त्यापासून दूर पळत राहिलो आणि त्याचा फायदा या व्यक्ती घेत आहेत यात त्याची काहीच चूक नाही ज्यप्रकरे आपणास काही आजार झाला असेल तर आपण
डॉक्टर कडे जातो तो डॉक्टर एकही इंजेक्शन किंवा औषध न देता फक्त कागदावर ट्रीटमेंट लिहून देतो आणि आपण त्याला त्याची जे काही फी असेल 60 रूपया पासून 500 रूपया पर्यन्त त्याला देतो कारण त्याने त्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाचा वापर आपल्या साठी केलेला आहे
त्यामुळे बाहेरील लोक अमुक काम करण्यासाठी तमुक पैसा घेतात एवढा खर्च शाळेच्या मुख्याध्यापकानी कसे समायोजन करावे यास फक्त एक आणि एकच उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही सुध्दा तंत्रस्नेही बना संगणक शिका आणि त्या संगणकाचा वापर शालेय अध्यापनासोबत शालेय कामकाज मध्ये सुध्दा वापरल्याशिवाय पर्याय नाही आपली जुनी परंपरा थोडासा बाजूला सारून या नव्या तंत्रज्ञानाने मुलांना शिकवित राहिलो आणि शालेय व्यवस्थापनात याचा वापर केला तर आपल्या शाळेला, शाळेतील विद्यार्थ्यांना आणि वैयक्तिक आपणाला ही याचा फायदा नक्की होईल.
तेंव्हा चला तर मग आपण सारे तंत्रस्नेही शिक्षक बनू या आणि येत्या वर्षात संपूर्ण महारष्ट्र प्रगत करू या. धन्यवाद