Friday, 3 April 2020

दिवा प्रकाशाचा

दृष्टी बदलली तरच सृष्टी बदलेल

आज भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनता जनार्दनला संबोधित करत असताना रविवारी 05 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं मेणबत्ती किंवा टॉर्चचा उजेड करावं असे सांगितले. यामुळे कोरोना विषाणू नष्ट होईल असं ते कुठे ही बोलले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ आपण का काढतो ? हे न कळण्यासारखे आहे. आपण प्रत्येक गोष्ट धर्माकडे घेऊन जातो. देशाचे पंतप्रधान हिंदू धर्माचे आहेत म्हणून त्यांचा प्रत्येक निर्णय या धर्माशी निगडित असतो, असे समज निर्माण करून घेणेच मुळात चुकीचे आहे. दिवे का लावायचे याचे कारण सांगताना त्यांनी जे काही सांगितले आहे ते नैराश्यग्रस्त लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे असा हेतू आहे. यात श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यापैकी कोणत्याही बाबी येत नाहीत. विदेशात जे चित्र दिसत आहे, ते चित्र भारतात दिसू नये. अनेक लोकांना प्रेरणा देण्यासाठी हे दिवे लावायचे आहेत. 
अंधश्रद्धा वगैरे काही नाही......!
दिवा लावणे म्हणजे अंधारात प्रकाश पसरविणे होय. भारतात लॉकडाऊन झाल्यापासून सर्व जनता घरात कोंडून आहे. यापूर्वी देखील रविवारी सायंकाळी थाळी किंवा टाळ्या वाजविण्या मागचा हेतू काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणे त्यांची प्रशंसा करणे हा होता. पण लोकांना त्याचा अर्थ कळला नाही आणि वेगळेच चित्र निर्माण झालं. परत उद्या रविवारी 05 एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं दिवे लावण्यामागे देखील असाच काही अर्थ अभिप्रेत आहे. या क्रियेमुळे कोरोना नष्ट होईल असे कोठे ही उल्लेख नाही. पण जे कोणी म्हणजे आपण सर्वजण या कोरोनाच्या विरुद्ध घरात बसून एक युद्ध खेळत आहोत. आम्ही अजून हरलो नाही, आम्ही अजून त्याच शर्थीने प्रयत्न करत आहोत. एकमेकांना प्रोत्साहन देणे आणि इतरांच्या मनात जे नैराश्य आलंय ते दूर व्हावं. या सर्व बाबीसाठी लोकांमध्ये चैतन्य यावे. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडावे या हेतूने दिवे लावण्यासाठी सांगण्यात आलंय, असं मला मा. नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून कळलं आहे. त्यामुळे मी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून नाही तर डोळसपणे करणार आहे.
देशाचा एक जबाबदार नागरिक 130 कोटी लोकांना काही बोलत आहे म्हणजे काही हसी मजा नाही दृष्टीमध्ये बदल झाल्याशिवाय हे शक्य नाही असे वाटते. याविषयी काही ओळी जे की उत्स्फूर्तपणे मनात आले आहेत याठिकाणी नमूद करावेसे वाटते. 

एक दिवा लावू चला

अंधारात प्रकाश होण्यासाठी
सर्वांनी एक दिवा लावू चला
नैराश्याने ग्रासलेल्या मनात
आत्मविश्वास जागवू चला

लॉकडाऊन झाली गाव शहर
ठप्प झाले सर्वांचे व्यवहार
तळहातावर पोट असणाऱ्यांना
मदतीचा हात देऊ चला
अंधारात प्रकाश होण्यासाठी
सर्वांनी एक दिवा लावू चला

विषाणू पसरतोय हातपाय
वेळीच करावा लागेल उपाय
रोगाचा फैलाव होण्यापूर्वी
त्याचा नायनाट करू चला
अंधारात प्रकाश होण्यासाठी
सर्वांनी एक दिवा लावू चला

- नासा येवतीकर, 9423625769

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...