Thursday, 31 December 2015

👥 साहित्य मंथन व्हाट्सअप 
ग्रूप आयोजित चारोळी स्पर्धा 
==========================
📖 चारोळी स्पर्धा विषय :- 
                         नवीन वर्ष किंवा संकल्प 

💥स्पर्धेचा दिनांक :  01 जानेवारी 2016 
🕛 वेळ : सकाळी 10 ते सायं. 7 पर्यंत
==========================
स्पर्धेचे नियम : 
1) एका स्पर्धकाला जास्तीत जास्त  5 चारोळ्या पोस्ट करता येतील. 
2) त्यापैकी स्पर्धेसाठी एकच चारोळी ग्राह्य धरली जाईल ! जी चारोळी स्पर्धेसाठी असेल तसा उल्लेख करावा 
3) चारोळी च्या दुसऱ्या व चौथ्या चरणाचे शेवटी यमक जुळावे !
4) चारोळी स्पर्धेत ग्रूप बाहेरील व्यक्ती ही भाग घेऊ शकतात, त्यांनी 
* अरविंद कुलकर्णी - 09689077239
* नागोराव येवतीकर - 09423625769
* उत्कर्ष देवणीकर - 9763116493
* गजानन वारणकर - 09881384404
* डॉ. शिल्पा जोशी - 09967708474
* अंजना कर्णिक - 09820758823

वरील कोणत्याही एका क्रमांक वर पोस्ट करावी. 
==========================
📱 सर्व चारोळ्या संकलित पणे पाहण्यासाठी व  वाचण्यासाठी खालील ब्लॉग क्लिक करावे. 
www.nasayeotikar.blogspot.com
==========================
 👤 आयोजक : अरविंद कुलकर्णी, अहमदनगर 

👤संयोजक व परीक्षक :- निर्मलाताई सोनी (अमरावती )
==========================
जास्तीत जास्त मित्रा पर्यंत हा msg पोहोचवावे. 

2015 ला निरोप देऊन 2016 वर्षाचे स्वागत . . . . . 
नववर्षांनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा . . .! 
==========================



[1/1, 10:46 AM] 
‪+91 94213 87623‬: 
🌷नवीन वर्ष किंवा संकल्प🌷
 🌿नुतन वर्षाच्या शुभेच्छा🌿
**स्पर्धेसाठी**👇🏻
1)नवे वर्ष
       नवा ध्यास
    नवे पर्व
        नवा श्वास
=====================
2)मावळत्या वर्षाला
    जिप्सीचा रामराम
     दरवळतोय मनामनात
     मंगेशाचा सलाम.
=====================
3)कडेलोट करण्या अहं
    मनोमन माझा प्रयास
     शिष्यांप्रती प्रामाणिकता
     लागला मज ध्यास
=====================
4)अहं चा आलेख
    ठेवायचाय उतरता
    प्रामाणिकतेची कास
    नुतन वर्षाकरता
=====================
5)संकल्पाची उभारून गुढी
    जळमटे बाजू सारायची
     अहंकाराला तिलांजली
     प्रामाणिकता जोपासायची
=====================
6)वर्षागणिक संकल्प रचले
    क्षणिक त्यांचे आयुष्य ठरले
    पण साहित्यमंथन गृपमुळे
    संकल्पपुर्तीचे बीज रूजले
         ........जयश्री पाटील.
=====================

[1/1, 10:53 AM] ‪
+91 98207 58823‬: 
अयं नूतन आंग्लवर्ष: भवत्कृते 
भवत्परिवारकृते च मंगलमयः 
क्षेमस्थैर्यारोग्यैश्वर्याभिर्वृद्धिकारकः 
भवतु इति प्रार्थना एवं शुभेच्छाः |
जागृती निखारे, मुंबई 
=====================
[1/1, 12:27 PM] 
काव्यमंथन  , भाग :-16 
विषय :-🔴 वर्ष नवे ,संकल्प नवे🔴

सगळेच करतात ,संकल्प 
म्हणून ,करायचा नसतो 
एक तारखेला करून 
दोन तारखेला विसरायचा नसतो ।
*अरविंद कुलकर्णी 
(स्पर्धेसाठी नाही )
=====================
[1/1, 1:12 PM] 
‪+91 97650 01266‬
नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ...!!!

1)
यश, सुख लाभो तुम्हां
मनाची ही सदिच्छा,
नववर्षाच्या सर्वांना, 
खूप खूप शुभेच्छा ....
*********************
2)
नववर्षाची ही नवी पहाट,
म्हणे आनंद सर्वांस वाट,
स्वप्न नवे साकार जीवनी,
अन् यशाला करुन दे वाट ....
निर्मला सोनी.
=====================
[1/1, 1:25 PM] 
💥💥साहित्य मंथन 💥💥
                    आयोजित
🏆🏆काव्य मंथन 🏆🏆
✏✒चारोळी स्पर्धा ✒✏

वर्ष नवे किंवा सकंल्प
2016 चे हे खास वर्ष  नवे
मनात नसावेत रुसवे फुगवे
मी जाळतो मनातील काजळी-कावे
हा दृढ संकल्प करतो मनोभावे

✏🎯✒
 आप्पासाहेब सुरवसे सर 
     लाखनगांवकर
=====================

[1/1, 2:02 PM] 
‪+91 88797 63591‬: 
|| संकल्प ||
=●=●=●=
हातावरचे असे पोट आमचे
संकल्प त्यास हवे कशाला..
कोकिळेच्या सुरात मिसळून
कावळ्याने मग गावे कशाला..!!
😊◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆😊
******सुनिल पवार......
=====================
[1/1, 2:07 PM] 
 💥💥साहित्य मंथन 💥💥
                     आयोजित 

🎤🎤काव्य मंथन🎤🎤

📖चारोळी स्पर्धा📖

नवे वर्ष किंवा संकल्प 

नव्या वर्षाची नवी सोनेरी पहाट
मी शोधितो वाचनाची पाऊलवाट
करावा संकल्प हा नित्य नवा
नित्य नेमाने लेखनाचा छंद  हवा 
           ✒🎯✏
आप्पासाहेब सुरवसे सर
       लाखनगांवकर
=====================

[1/1, 2:14 PM] 
ना. सा. येवतीकर, नांदेड कडून पोस्ट झालेली ग्रुप च्या बाहेर ची चारोळी
 ✨💫 स्पर्धेसाठी 💫✨

माय तुझ्या दुःखाला गं
मांडतो मी लेखणीत माझ्या,
हाच नवा संकल्प मी
बिंबवलाय बघ मनी माझ्या.....

🅿 प्रमोद जा.चांदेकर 
          मलगड / कोल्हापूर 
          मधुभाषा- 8805587988
============================
[1/1, 2:15 PM] ‪
+91 99305 09026‬
साहित्य मंथन
चारोळी
**********************
1)
चारोळ्यांच्या शब्दकवनाने गुंफू या धागे हारांचे,
  मैत्रीच्या नात्याचे बंध नाही आजन्म तटू द्यायचे,
  कथालेखनाने साहित्य मंथनाचे प्रतिलिपीशी बंध जुळवायचे,
 वाहूनी सुमने करू या स्वागत नव नषाॅचे 
*************************************
2)
नवे साल नवे संकल्प,
   तडीस नेऊ सारे आपण,
  जमूनी सारे करू या स्वागत,
 एक दिलाने साहित्य मंथन फूलवू या सारेजण.
***************************************
3)
सरत आले साल ,दोन हजार पंधरा,
   भेटीला येते दोन हजार सोळा.
   हे नुतन वषॅ  जावो आनंदाने,
   स्वागता जमवू एक विचारांचा मेळा.
************************************
4)
हे परमेश्वरा, तू तरी जाग वचनाला,
   सवॅ पामरांना आशीश दे जगण्याला,
    अन्न वस्त्र ,निवारा या गरजा भागवण्याला,
    नको रे देऊ  प्रोत्साहन शेतकरी आत्महतेला.
**************************************
[1/1, 2:15 PM]
 ‪+91 98207 58823‬

संकल्प: चारोळी स्पर्धा
     १
संकल्प माणसं जोडण्याचा
सुखदु:ख वाटून घेण्याचा
देश हितासाठी झुंजण्याचा 
आरोग्यासह जगण्याचा।

  २
संकल्प नव वर्षारंभी
रूजवावे स्नेहबीज मनी
रूसवे हेवेदावे सोडूनी
समाधानी राहवे जीवनी।
अंजना कर्णीक
**************************************
[1/1, 2:17 PM] ‪
+91 99305 09026‬: 
5)
माझ्या सग्यासोय-यानो
स्वागत करा नव वषाॅचे आनंदाने
निधाॅर करा,लाच नाही देणार नाही घेणार,
सवॅ व्यवहार करीन सचोटीने.
सुलभा कुलकणीॅ.बोरीवली मुंबई
फोन. 9930509026.
**************************************

[1/1, 3:25 PM
💥💥साहित्यमंथन💥💥
                     आयोजित 
💈💈काव्यमंथन💈💈

🏆🏆चारोळी स्पर्धा🏆🏆

📖नवे वर्ष किंवा संकल्प📖
=================

संकल्पाची गुढी उभारु जोमाने
कामाला सुरुवात करु नेटाने
नव्या वर्षात वाहून घेऊ स्वतः ला
जागून आपल्या कार्य कर्तव्याला
✏🎯✒......✒✏
आप्पासाहेब सुरवसे सर 
      लाखनगांवकर
**************************************

[1/1, 3:33 PM] ‪
+91 98207 58823‬
चारोळी स्पर्धा
नववर्षारंभी करूनी
संकल्प मैत्रभावनेचा
मनीचे खेद विसरूनी
माणूसपण जपण्याचा
अंजना कर्णिक
**************************************

[1/1, 3:37 PM] 
‪+91 98207 58823‬
चारोळी स्पर्धा
नव्या वर्षात प्रार्थना भगवंताला
जगवी या देशीच्या 
बळीराजाला
नको करूस तू 
कृपेस पारखा
पर्जन्याविन सारा
देश नाडलेला

अंजना कर्णिक
**************************************

[1/1, 3:40 PM] 
📚साहित्य मंथन 📚

🏆काव्य मंथन🏆

💈चारोळी स्पर्धा💈

✏नवे वर्ष किंवा संकल्प✒

संकल्प हा नवरंग आवृतीचा
त्यात असावा अजुन वाटा नवकवीचा
नवकविंनो चारोळ्या ठेवा खास तयार 
वाचक वर्ग आहे निष्णात, प्रगल्ब नि हुशार
✒🎯✏.....!
आप्पासाहेब सुरवसे सर
     लाखनगांवकर
**************************************

[1/1, 3:45 PM] 
वर्ष नवे संकल्प नवे
-----------------------
करावा संकल्प मनी ,हरप्रयत्ने
करावी त्याची सिद्धी ।
असूद्या ध्यानी मित्रांनो ,
आजचा पेपर होतो उद्याची रद्दी ।
*अरविंद कुलकर्णी 
(स्पर्धेसाठी नाही )
**************************************

[1/1, 4:14 PM] 
+91 94237 93288‬
चारोळी स्पर्धा
संकल्प/नवे वर्ष
🌷🌷🌷🌷🌷🌷
1
जल्लोष नववर्षाचा
होई वाजतगाजत
संकल्पाचे घोंगडे 
मात्र राहते भिजत
***************
2
जगा आणि जगू द्या
संकल्प करा मनी
सुखसागर भरवा रे
गरिबांच्या जीवनी
***************
3
नववर्ष आनंदी येता
संकल्पाची चढाओढी
सुखाची सावली येता
संकल्प मोडीत काढी
***************
4
आले नवीन वर्ष
घेऊन मनी हर्ष
समता संकल्पास्तव
करा सदा संघर्ष
*************
5
मानवतेची गुढी उभारा
हाच संकल्प मनी धरा
तन मन धन अर्पुनी
नववर्षाचे स्वागत करा
*****************
💐💐💐💐💐💐💐💐
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
🌷🌷🌷🌷🌷🌷
Happy new year
💐💐💐💐💐💐💐
**************************************

[1/1, 4:28 PM]
 ‪+91 70667 79265‬
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बद्दलले वर्ष हर्षोल्हासी
नवीन शुभकारक मंगल दिनी..!
ध्यानी धरून संकल्प उद्दिष्ट ,
नुतन शुभेच्छा कार्यारंभुनी..!!
_____________________
मंगलमय दिनकरा
अभिनंदनीय शुभंकरा..!
सुखशांतीचा वर्षाव घडावा, 
हिच प्रार्थना करतो इश्वरा..!!
_______________________
करून स्वागत नवीन वर्षाचे 
जिवलग मित्रांची व्हावी प्रगती..!
आनंद मम मनास मिळावा,
हेची भगवंता तुज विनंती..!!
________________________
पाहून सोहोळा जगतातील 
नवीन वर्षवाचा आता..!
गगनाला भिडले तनमन,
हरपले दुःख दैन्य तत्परता..!!
_________________________
खुप खुप मनपूर्वक शुभेच्छा 
नुतन वर्षांस करून अभिवादन..!
जातील दिन हे सुखलाभांचे, 
श्रीचरणी आता करू या वंदन..!!
__________________________
2⃣0⃣1⃣6⃣ 
✏__________जी.पी.
     🙏🙏🙏🙏🙏
**************************************

[1/1, 4:51 PM] ‪
+91 74989 64901‬
१)
नववर्षाची पहाट उगवली
नवनवे संकल्प घेऊनी
मानाची वाटावी पाकळी
मोकळी करूनी आपुली झोळी
*********************
२)
सुगंध भरला मोगरा
धुंद करतो घरादारा
नववर्षाच्या दरबारा
दुःस्वप्नांना नकोच थारा
*********************
३)
आसमंती रंग निळा
भावभक्तीचा मनी मळा
रंगबहरला फुलमेळा
नवसंकल्प हा आगळा
*********************

[1/1, 5:12 PM] 
+91 98207 58823‬
चारोळी स्पर्धेसाठी

स्वप्नांतील मनोरथांना
प्रयत्नांचे पंख लावीन
स्वत: सुखी होताना
'नाही रे' ना सुख वाटीन।
*****************

नववर्ष संकल्प 
धरीन लेखनाच कास
मती  जरी  अल्प
मनी साहित्याची आस।
******************

दिसामाजी वाचेन लिहीन
हा संकल्प नव वर्षाचा
साहित्याचे चाखून नवनीत
आनंद घेईन जीवनाचा।
*********************

संकल्पसिद्धी होते श्रमाने
नववर्ष होते सुफळ सफल
जीवन जगावे सर्वार्थाने
अन्यथा हा जन्म विफल।

अंजना कर्णिक
**************************************
[1/1, 5:27 PM] ‪
+91 82759 48708‬
 ⭐💡⭐💡⭐💡⭐💡⭐💡


🌀नववर्षांची नवी पहाट 
प्रकाशली ओलांडत निशा,
झाली नवकिरणांची बरसात 
उजळुनी आल्या दाही दिशा...
    
🌻एक नविन दिवस सुन्दर 
आल्हादकारी सकाळ घेऊन येईल
मनाच्या अंतरंगात नविन पालवी फुटेल
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणा कणाला जाणीव होईल 
त्या नववर्षाची ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत

  

🍀नव्या वर्षाचे नवे नवे साज लेवू
नव्या नव्या संकल्पाना मार्ग दाखवू 
नव्या नव्या नभी ऊंच भरारी घेऊ
मिळून सर्व साक्षरतेची ज्योत पेटवू


   🌺नववर्षाचे करुया स्वागत
   नव्या या संकल्पांनी
   मराठी शाळा टिकवुया
   माध्यम मराठी घेवूनी

    

 🌲"सरत्या वर्षाला देऊया
आनंदाने शेवटचा सलाम....
नववर्षाचा संकल्प करूया
शेतकरीसाठी धनादेशास  नाम

 🍁"आले आले नविन वर्ष 
मनी झाला हर्ष , 
करूनी नविन संकल्प , 
करू जीवनाचा उत्कर्ष.."


🌹एक और ईंट गिर गई 
दीवार-ए-जिंदगी से:
नादान कह रहे हैं, 
नया साल मुबारक हो..!!


🌻वर्षामागून वर्ष सरतात सारी,
नेहमीच पुढच वर्ष मागच्या वर्षाला मारी,
हर वयर्षच असत खूप खूप न्यारी,
सोळाव वरीस हाय लय लय भारी.


🔷स्वतःसाठी तर सारेच जगतात 
थोडं जगून पहा दुसर्यासाठीही 
 मिळविण्यात आनंद असतोच,
 काहीतरी देता  आलं पाहीजे

🌹वर्ष नवे येतील जातील
संकल्प नवे होतील तुटतील
तुटू न देवू जुळली नाती
भंगली तर कधी न जुळतील


🌲काढशील जर का 
तु आणखी साल
दुःखातच जाईल 
मग हेही साल

🌷नवीन नवीन काय म्हणता
मराठीला अभिमान वाटेल असे करता 
नसेल जमेल तर 
सरता वर्ष 
माय मराठी आय मराठी 
मनातून करता


 🌀नवीन वर्षाची चाहूल भारी
मनात विचारांचा वादळ भारी
कैसे असेल नवीन वर्ष
आपल्या व् आपल्या देशाच्या उन्नतीसाठी


🌹सहिष्णुतेचे आले युग हे
धरा हाती समतेची दिवटी
पेटवा मशाली नवक्रांतीची
झळाळू द्या दिव्य तेजाने पहाट ही नववर्षाची
**************************************

[1/1, 5:33 PM] ‪
+91 74989 64901‬
मद्यधुंद जनता जाहली
साजरे करता गतवर्षाला
धुंदीतच स्वारी निघाली
कळले देवाघरी धावली
**********************
( सकाळी १०.४५ ला पूर्ण चेंदामेंदा झालेली कार पाहिली😔)
**************************************
ना. सा. येवतीकर, नांदेड यांच्याकडून झालेली ग्रूप बाहेरील पोस्ट
[1/1, 5:37 PM] 
Sharad thakar
स्पर्धेसाठी 

नवा उल्हास, नवा हर्ष 
सदा नवा,नवा रहावो 
नवीन हे वर्ष सर्वांना 
आनंदी आनंदात जावो 

    शरद ठाकर 
  सेलू जि परभणी 
  8275336675
**************************************

[1/1, 5:44 PM] 
ना. सा. येवतीकर, नांदेड यांच्याकडून झालेली ग्रूप बाहेरील पोस्ट 
.....स्पर्धेसाठी चारोळी.........
       नवे हे वर्ष नवे हे पर्व,
       स्वागत तयाचे करू रे.
       ध्येयवेड्या स्वप्नांना आता,
       पंखांचे बळ देऊ रे.

              _ क्रांति एस. बुद्धेवार, नांदेड 
               07588427335
***********************************
 संकल्प धर्माचा धरा 
ओळख पटवा स्वतःची 
स्वसंस्कृतीच्या जोरावर 
मान उंचवा भारताची 
- नागेश काळे, लातूर

**************************************
[1/1, 6:25 PM] 
दिवस उगवतो, रात्र ही होते 
दिवसामागून, दिवस सरते 

आयुष्य आपले, ठरते मग अल्प 
नाव राहील असे, करू या संकल्प
🚩 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

=========^^^^^^^^^^^============
[1/1, 6:31 PM] 
‪+91 70667 79265‬
 त्याग,कर्तव्य,कष्ट. ...
माझ्या जीवनाचे सत्व
प्रत्येक दिव्यातून जाईन 
पण गमवणार नाही सत्व...
__ नागेश काळे, लातूर

=========^^^^^^^^^^^============
[1/1, 6:35 PM] 
‪+91 70667 79265‬
शूद्ध या भावनेला 
शब्दाने ही रुप दिले..
आठवणीची शिदोरी 
नूतन वर्ष दाविले..!!
____ नागेश काळे ,लातूर
=========^^^^^^^^^^^============
========================

संकल्प नववर्षाचा.....

कात टाकुनी नवा हो भुजंगा,
पकड मार्ग नवजीवनाचा,
वाचविन तुझा प्रत्येक वंश,
हाच संकल्प नववर्षाचा.
- क्रांती बुद्धेवार, नांदेड 
 07588427335

( ग्रूप बाहेरील पोस्ट )
=========^^^^^^^^^^^============
[1/1, 6:53 PM] 
 तुटक तुटक शब्दाने 
भावनाला रूप दिले 
नववर्षाच्या स्वागताला 
शब्द ही कमी पडले 
- राजेश काळे, लातूर

=========^^^^^^^^^^^============
[1/1, 6:57 PM] 
🙏 नवे वर्ष , नवे वर्षे 🙏

काय आहे नवे वर्ष . ?. . ?

नवे वर्ष , नवे हर्ष !
नवी आशा , नवी दिशा ! 

 365 पानांची कोरी डायरी म्हणजे नवे वर्ष ,
आपण लिहणाऱ्या आयुष्याचा अनुभव म्हणजे नवे वर्षे !
कौटूंबिक जिव्हाळा , मैत्रीची साथ , प्रेमाची फुलवात म्हणजे नवे वर्षे !
चैतन्याची सुरूवात , जीवनाचा आधार म्हणजे नवे वर्षे !!

🙏 नवे वर्ष , नवे वर्ष 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ज्योती बोंदरे , नागपूर
9371963213
( ग्रूप बाहेरील पोस्ट )
=========^^^^^^^^^^^============
[1/1, 6:57 PM] ‪
+91 74989 64901‬: 
गंधधुंद शब्दांनी बहरला
साहित्य-मंथन दरवळला
नववर्षी संकल्प घेतला
तूला पूजु रे शब्दफुला
*****
© जागृती निखारे
१.१.२०१६ .संध्या.६.५५
=========^^^^^^^^^^^============

[1/1, 6:58 PM]
 ‪+91 96190 23330‬: 
🍂चारोळी - स्पर्धा🍂
1 )
नवीन नवीन ठरवायचे
 मनापासून राबवायचे ।
नव वर्षाचा हाच संकल्प
कणभर तरी पुढे जायचे ॥
2 )
नवी आशा नवी दिशा
उगवेल मग नवी उषा ।
उत्साहाने भरू दिवस
येणारच नाही निराशा ॥
3 )
नीती मूल्ये  आदर्शांचे
पालन करीत जगायचे ।
समाजाची सेवा करीत
जन उपयोगी रहायचे ॥
4 )
कितीजणांचे असह्य जीवन
का घ्यावयाचे डोळे मिटून? 
जमेल तितकी मदत करावी
काही संकल्प उरी बाळगून
5 )
अपार मेहनत  करूनही
मिळत नाही  नीट जगणे ।
त्यांच्या उपयोगी पडायचे
नवीन वर्षाचे हेच मागणे ॥
(5 नं. ची ... स्पर्धेसाठी)
               डाॅ. शरयू शहा
-  -  -  -  -  -  -  -  -  -
=========^^^^^^^^^^^============

[1/1, 6:58 PM] 
चारोळी स्पर्धा 

तुझ्या  प्रेमाची नजर
नेहमी दुसरीकडेच  वळलीय 
माझ्या  अश्रूंची  किंमत
नव वर्षी तरी कळेल काय . . . . . ?
- श्याम वैजनाथ स्वामी, हिंगोली 
9765426220

=======================

ये नव्या वर्षा नव्याने 
ये जरा होऊन गाणे
या भुकेल्या पाखरांच्या 
देऊ या चोचीत दाणे..! 
श्याम वैजनाथ स्वामी,  हिंगोली
9765426220

( ग्रूप बाहेरील पोस्ट )
=========^^^^^^^^^^^============

[1/1, 6:59 PM]
 ‪+91 98239 22702‬
 ✨✨✨✨✨✨✨
करुणी वादळी त्या क्षणांचे विस्मरण
जोडूया नाते नवीन युगाशी
एक पाऊल पुढे टाकुनी करु संकल्प नवा
घालू गवसनी उतुंग यशाशी

   💫💫💫💫
हरवलेल्या मानुसकीचा शोध
घेण्या नवसंकल्प करु मनी
या मातीच्या संस्काराचे ऋण
फेडुया सत्कार्य करुणी
💫💫💫💫💫💫💫
        🎯  मा.तु.खुडे
=========^^^^^^^^^^^============

[1/1, 7:00 PM] 
ना. सा. येवतीकर, नांदेड यांच्याकडून घोषणा 
📣📣📣📣📣
वेळ संपली

=========^^^^^^^^^^^============




मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...