नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आजच्या कार्यक्रमात आपण प्रा. देविदास वाडेकर यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
प्रा. देविदास दत्तात्रय वाडेकर
प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर हे मराठी साहित्यविश्वातील अभ्यासू प्राध्यापक, संशोधक आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. आपल्या सखोल अध्ययन, प्रभावी अध्यापनशैली आणि साहित्यिक लेखनामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या नि वाचकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहेत.
प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच वाचनाची आवड आणि साहित्याची ओढ असल्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण मराठी विषयात घेतले. पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयासह इतर महाविद्यालयात त्यांनी तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले. त्यांची शिकवण्याची पद्धत साधी, समजण्यास सोपी आणि उदाहरणांनी परिपूर्ण अशी होती. विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लावणे हे त्यांच्या अध्यापनाचे वैशिष्ट्य होते.
साहित्य, संस्कृती, समाजप्रबोधन आणि विचारपर लेखन यांद्वारे त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. विविध वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि व्याख्यानमालेतून त्यांनी आपले विचार मांडले.
त्यांच्या लेखनात सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि संस्कारक्षम विचार यांचा प्रभाव दिसून येतो. ते केवळ शिक्षक नव्हते, तर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. प्रा. वाडेकर यांनी इंग्रजी विषयांचे ज्ञान मराठीत आणण्यासाठी मराठी परिभाषेवर प्रचंड काम केले. मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प १९७४ मध्ये संपादित केला, जो तत्त्वज्ञान क्षेत्रातील मैलाचा दगड मानला जातो. त्यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव माझी वाटचाल असे आहे.
मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात पुढे गेले.
प्रा. देविदास वाडेकर यांचे ५ मार्च १९८५ रोजी निधन झाले.
प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर हे ज्ञान, संस्कार आणि साहित्यप्रेम यांचे प्रतीक होते. त्यांच्या अध्यापन आणि लेखनातून समाजाला दिशादर्शन मिळाले. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.
आज प्रा. देविदास वाडेकर यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन !
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला.
दुसरा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर हे कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले.
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर हे तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले.
तिसरा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांना लहानपणापासून कश्याची आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती.
चौथा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव काय आहे ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव माझी वाटचाल असे आहे.
शेवटचा पाचवा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांनी मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प कोणत्या वर्षी संपादित केला ?
बरोबर उत्तर आहे - १९७४ मध्ये प्रा. देविदास वाडेकर यांनी मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प संपादित केला.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment