Thursday, 10 March 2016


📚 साहित्य मंथन Whatsapp ग्रूप  📚
........... आयोजित..........
🎼 🎵 🎹 काव्यमंथन 🎹 🎵 🎼
************************
📚 चारोळी स्पर्धा  📚
************************
📢जागतिक ग्राहक दिनानिमित्त 📢
विषय:----👥 जागो ग्राहक जागो 👥
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹

💥 दिनांक :-11/03/2016
💥 वार : - शुक्रवार
💥 वेळ : - 10:00 ते  07:00 पर्यंत
==================================
💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 एकास एकच चारोळी पोस्ट करता येईल
💥 चारोळीखाली आपले नाव, गाव व मोबाईल नंबर अवश्य लिहावे
💥 चारोळी स्पर्धेचा निकाल blog पाहण्यास मिळेल त्यासाठी वारंवार चौकशी करु नये .
💥साहित्य मंथन ग्रूपच्या बाहेरील  व्यक्ति, मित्र परिवार यात सहभागी होऊ शकतात...त्यासाठी .
खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर आपल्या चारोळ्या पोस्ट कराव्यात....
=======================================
🎬अॅडमिन कोअर कमिटी🎬

👤अरविंद कुलकर्णी, अहमदनगर
📱09689077239
=================
👤आप्पासाहेब सुरवसे, उस्मानाबाद
📱09403725973
=================
👤ना. सा. येवतीकर, नांदेड
📱 09423625769
===============
👤उत्कर्ष देवणीकर, उमरगा
📱09763641193
=================
👤सौ. जयश्रीताई पाटिल, वसमत
📱09421387623
===============
👤सौ. अंजनाताई कर्णिक, मुंबई
📱09820758823
=================
 👤गजानन वारणकर नांदेड
📱9881384404
===================
👤डॉ .शिल्पाताई जोशी,मुंबई
📱09967708474
===================

🔦संकल्पना : - अरविंद कुलकर्णी
------÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷------
🎙संयोजक : - आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
××××××××××××××××××××
🎗संकलक:-गजानन पवार पाटिल. हिंगोली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎤 परीक्षक : - श्री. ना .सा. येवतीकर ,नांदेड
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
💢 ग्राफिक्स  :-क्रांति बुध्देवार, धर्माबाद
📱7588427335
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 10:26 AM]
🔦🔦🔦🔦🔦
सगळयाच सामानात
आज भेसळ होत आहे
जागो ग्राहक जागो
म्हणण्याची वेळ येत आहे
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 10:39 AM] ‪+91 88797 63591‬
प्रत्येक वस्तुचे बिल घ्या
काळा बाजारास घाला आळा
उठा ग्राहक हो व्हा जागे आता
राष्ट्र संपत्तीचा अपव्यय टाळा..
*****सुनिल पवार......
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 10:49 AM] ‪+91 98813 84404‬
 धावपळीच्या युगात,
कोणाजवळ आहे वेळ...
ग्राहक राजा बघतोय,
दुरूनच हा भेसळीचा खेळ...
🔵WARANKAR G🔵
      👉🏼नांदेड👈🏼
🔴स्पर्धेसाठी नाही🔴
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 11:02 AM] ‪+91 98696 43268‬
दुधाला लागली पाण्याची धार
चपातीवर दिसते खडीचे दार    
तिखटावर पसरला मातीचा थर
भेसळ पाहुन ग्राहकाचा तक्रारीचा स्वर.
छाया पाटील
9869643268
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 11:21 AM] ‪+91 94213 87623‬
☘"ग्राहकराजा खरीद वस्तू
            आय एस आय शिक्क्याची
            जाहीरातीवर भाळू नको
            फसवणूक आवर स्वतःची" ☘
.........जयश्री पाटील
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 11:39 AM]
विषय:- जागो ग्राहक जागो

    🔸चारोळीस्पर्धा🔸

ग्राहक तक्रार निवारण मंच
हाच खरा भेसळीचा असतो संच!
तिथेच आहे खरी भ्रष्ट भेसळ
तर मग कसे होतील पापी सरळ?
 ✏🎯🎯🎯✒
श्री.आप्पासाहेब  सुरवसे
       लाखनगावकर
AMKSLWOMIAW
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 11:48 AM] ‪+91 99305 09026‬
 सुलभा कुलकणीॅ
सगळीकडे भष्ट्राचार भेसळीचा बाजार
नको रे ग्राहका होऊ तू बेजार
चोखंदळ जर असेल तुझी नजर
तरच घेशील तू चांगली खबर.
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 11:48 AM] ‪+91 72495 90174‬
स्पर्धेसाठी
चारोळी

सगळ्याच वस्तूत
होते सर्रास भेसळ
जागा हो ग्राहक अन
त्सुनामी सारखा उसळ

-----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 11:52 AM]
🌸चारोळी स्पर्धा🌸
   "जागो ग्राहक जागो "

डोळे लावून घेतो पाच हजाराची साडी,
कुरकुर करतो घेताना पाच रुपयाची जुडी,
ग्राहका जागा हो,कोण करतेय लबाडी,
तिथेच कर तुझी जागृकतेची कुरघोडी.
 
 संगीता देशमुख,वसमत
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 12:04 PM] ‪+91 98207 58823‬
चारोळीस्पर्धा : ग्राहक

ग्राहक  म्हणे 'राजा' असतो
 पण फक्त खरेदीच्या वेळी
 एरवी तर नाडलेला असतो
होई तो फसवणूकीचा बळी
*********************
अंजना कर्णिक
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 12:07 PM]
" जागो ग्राहक जागो "
असे हाच माझा नवस
गोरगरीबांनाही यावेत
सुखाचे चार दिवस ...!
             " राजेश रेवले"
               परभणी,
              मो.9623407165
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 12:07 PM] ‪+91 98207 58823‬
 चारोळी स्पर्धा:
ग्राहक
ग्राहका  तू हो रे जागा
करू नको व्यर्थ खरेदी
नको भुलूस वरलिया रंगा
गरजे पुरताच जा दुकानी!
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 12:13 PM] ‪+91 98207 58823‬
चारोळी स्पर्धा
ग्राहक
जिहिरातींचा भुलभुलय्या
पाडेल मोह  व्यर्थ वस्तुंचा
करूनी विचार आमदनीचा
 योग्य नियोजन कर ग्राहका
अंजना कर्णिक
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 12:43 PM]
जो भी कुछ गलत होगा
सही करनेके लिये भागो.
अधिकार है आप सबका,
जागो ग्राहक जागो.

डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.
९२२६१३०६०१
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 1:06 PM] ‪+91 72495 90174‬
ग्राहक असावा दक्ष
ठेवावे अचूक लक्ष
भेसळी कडे नको दुर्लक्ष
ग्राहकच  आजाराचे भक्ष्य

-----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 1:14 PM] ‪+91 94213 87623‬
 "ग्राहकराजाला चेतवून सारे
बनुया समाजमनाचा आरसा
चारोळीद्वारे प्रबोधन करणे
हाच साहीत्यमंथनचा वारसा"
.......जयश्री पाटील(ही चारोळी स्पर्धेसाठी)🚩
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 1:28 PM] ‪+91 98207 58823‬
चारोळी स्पर्धा
करावी एकजूट ग्राहकांनी
बहिष्काराचे ऊचलावे अस्र
संत्रस्त सारेच महागाईनी
भेसळ शोधण्याचे जाणू तंत्र
 अंजना कर्णिक
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 1:55 PM] ‪+91 98239 22702‬
 चारोळी स्पर्धेसाठी....
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
महागाईचा भडका उडाला येथे अाज
अन् पाण्यालाही लागली पहा अाग
दुनियेच्या बाजारी मानुसकी झाली महाग
भेसळीनेही कहर केला जाग ग्राहका जाग
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
                  🎯 मारुती खुडे
                           माहुर
               (९८२३९२२७०२)
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 1:59 PM] ‪+91 72495 90174‬
ग्राहक राजा ग्राहक राजा
भेसळ वाल्यांचा वाजव वाजा
तेव्हाच माल मिळेल भाऊ
सुंदर ,स्वच्छ , चांगला , ताजा

----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 2:01 PM] ‪+91 98207 58823‬
 ग्राहक .

भरघोस सूट देऊन
जुना माल खपवला जातॊ .
आकर्षक जाहिरात करुन
ग्राहकच फसवला जातो .

    रत्नाकर जोशी
          जिंतूर
    ८२७५२३१६४१
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 2:01 PM] ‪+91 72495 90174‬
ग्राहक मंचाची पायरी
चढायला भिऊ नका
घाबरून खराब माल
महाग विकत घेऊ नका

-----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 2:03 PM] ‪+91 72495 90174‬
 जे होत नाही सेल
लागतो त्याचाच सेल
ग्राहक राजा फसतो
होतो स्वस्तात फेल

-----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 2:08 PM] ‪+91 72495 90174‬
साहित्य मंथन परीवार
समाज मंथनही करतो
जागा हो ग्राहक राजा
नुसता बाजार काय करतो?

----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 2:09 PM] ‪+91 74989 64901‬
भाजीचा भावताव करतांना पाहिले भल्या श्रीमंतांना
अरे जाण जरा गरिबांना
जागा हो रे ग्राहका भाव करतांना
 © जागृती निखारे. पुणे.
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 2:19 PM]
स्वस्त आणि मस्त माल
पाहून खूश होतो ग्राहकराजा
होऊन माला माल
मालक मारतो मस्त मजा

✏✒शिल्पा जोशी☝
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 2:20 PM] ‪+91 99305 09026‬
 सुलभा कुलकणीॅ
दूकानदार,
सेल सेलच्या नावाने जूना माल विकतो.
ग्राहकराजा या सेलला
 चांगलाच भुलतो
डोळे बंद करूनी माल विकत घेतो,
फसलो या जाणीवेने कपाळाला हात मारूनी बसतो
************************
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 2:23 PM] आत्तापर्यंत सहभागी स्पर्धक -
* सुनिल पवार
* गजानन वारणकर
* छाया पाटील
* जयश्री पाटील
* अप्पासाहेब सुरवसे
* सुलभा कुलकर्णी
* ज्ञानेश्वर भामरे
* संगीता देशमुख
* अंजना कर्निक
* राजेश रेवले, परभणी
* डॉ. सुधीर अनंत काटे, पुणे
* मारुती खुडे
* रत्नाकर जोशी, जिंतूर
* जागृती निखारे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 2:34 PM]
📚साहित्य मंथन📚
                द्वारा आयोजित

🎹 काव्यमंथन  🎹

🗽  चारोळी स्पर्धा  🗽
==================
* विषय :--जागो ग्राहक जागो *
==================
बिस्किट कमी पॅक पुढयात
ग्राहकांच्या निराशा पदरी
न्याय मिळतो कित्येक वर्षांनी
जेव्हा चढतो कोर्टाची पायरी
✒🎯🎯🎯✏
श्री.आप्पासाहेब सुरवसे
        लाखंनगावकर
   AMKSLWOMIAW
::::::::::::::::::::::::::;::::::::::::::::

[3/11, 2:39 PM] ‪+91 99704 46447‬
 चारोळी स्पर्धा

1)
ग्राहक असे देव विक्रेत्यांसी
गोष्ट अपरूप ही कलियुगा
परि तयार ग्राहकासीच लुटण्सासी |
म्हणून म्हणताती ग्राहक जागा ||
~~~~~~~~~~~~~~~~~~
2)
येथे चाले बियाण्यातही भेसळ
लक्ष होई सामान्य जनता |
आवाज उठवून घालू आळा
जागा ग्राहक हो आता ||

क्रमांक 2 ची स्पर्धेसाठी

SP
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 2:44 PM]
चारोळी...
साहित्य मंथन स्पर्धेसाठी.


‘जागो ग्राहक जागो'

जाहिरात असते रंजक,
किती खोटी,किती खरी।।
जाहिरातीच्या भूलभुलैय्यात,
ग्राहका जागा हो आता तरी।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 2:34 PM] Surwase: 📚साहित्य मंथन📚
                द्वारा आयोजित

🎹 काव्यमंथन  🎹

🗽  चारोळी स्पर्धा  🗽
==================
* विषय :--जागो ग्राहक जागो *
==================
बिस्किट कमी पॅक पुढयात
ग्राहकांच्या निराशा पदरी
न्याय मिळतो कित्येक वर्षांनी
जेव्हा चढतो कोर्टाची पायरी
✒🎯🎯🎯✏
श्री.आप्पासाहेब सुरवसे
        लाखंनगावकर
   AMKSLWOMIAW
::::::::::::::::::::::::::;::::::::::::::::
[3/11, 2:38 PM] Bhuddewar Kranti: चारोळी...
साहित्य मंथन स्पर्धेसाठी.


‘जागो ग्राहक जागो'

जाहिरात असते रंजक,
किती खोटी,किती खरी।।
जाहिरातीच्या भूलभुलैय्यात,
ग्रहका जागी हो आता तरी।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 2:39 PM] ‪+91 99704 46447‬
चारोळी स्पर्धा

1)
ग्राहक असे देव विक्रेत्यांसी
गोष्ट अपरूप ही कलियुगा
परि तयार ग्राहकासीच लुटण्सासी |
म्हणून म्हणताती ग्राहक जागा ||

~~~~~~~~~~~~~~~~~~

2)
येथे चाले बियाण्यातही भेसळ
लक्ष होई सामान्य जनता |
आवाज उठवून घालू आळा
जागा ग्राहक हो आता ||

क्रमांक 2 ची स्पर्धेसाठी

SP
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 3:00 PM] ‪+91 97650 01266‬
 स्पर्धेसाठी

स्वस्त माल पाहून असे हो हरखू नका,
किमान स्वतःला तरी हो फसवू नका,
जागो ग्राहक जागो'चा नारा पाठ ठेवा,
वेळीच सावध व्हा अन् भान हरवू नका....

निर्मला सोनी.
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 3:05 PM
🌹 काव्यमंथन चारोळी स्पर्धा 🌹
🌺 विषय :- ग्राहक दिन 🌺

एकावर एक फ्री , फुकट नसते काही हो ।
खराब माल खपवण्याचा धंदा यांचा ,ग्राहक राजा जागा हो ।
@ अरविंदकुलकर्णी
(स्पर्धेसाठी नाही )
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 3:08 PM]
जाहिरातीचा फसवा
हा मांडलेला बाजार
बळी पडतो 'राजा',
ग्राहक होऊनी पामर
✏🎯🎯🎯✒
श्री.आप्पासाहेब सुरवसे
       लाखनगावकर
AMKSLWOMIAW
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 3:16 PM] ‪+91 94213 87623‬
 !!  चारोळी !!

सूज्ञ ग्राहका जागा हो
व्यापारीगल्ले भरू नको
जाहिरातींच्या या मोहजाळी
सावज त्यांचे तू ठरू नको !

***********************
नाव-श्री.मुटकुळे नरहरी दत्तराव
गाव - परभणी.ता.जि.परभणी.
मोबाईल क्र.- 9405895130

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

[3/11, 3:22 PM] ‪+91 95275 57069‬
 📝काव्यमंथन📝
चारोळी....स्पर्धेसाठी
----------

अहो ग्राहक राजा,
खरेदीची घ्या खबरदारी...
द्या फसवणुकी-विरोधी
तक्रार 'न्याय'दरबारी...

डॉ.सखाराम डी.भगत
गाव-निनावी
ता-इगतपुरी
जि-नाशिक
मो.नं.९५२७५५७०६९

[3/11, 3:35 PM]
" स्पर्धेसाठी "

विषय : जागो ग्राहक जागो

जाहिरात असते जोमदार
      उत्पादन मात्र फुसका बार
जाहिरातीवर वारेमाप उधळल्यावर
     ग्राहकाच्या नशिबी काय येणार ?

              सुनीता सुरेश महाबळ
8308558
बालेवाडी, पुणे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
नमस्कार,
साहित्य मंथन What's app गृप आयोजित,
चारोळी स्पर्धेसाठी
(विषय - जागो ग्राहक जागो)


जाग माणसा जाग आता,
तूच तुझा शिल्पकार....
सावर या दुनियेत स्वतःला,
कधी नकोस मानु हार....

© तुषार ज्ञानेश्वर पाटिल
मु. निंभोरा ता. धरणगांव (जळगाव)
मो. ७७२१८६६६३२.
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 4:18 PM]
खरेदी करता काहीही,
घ्या त्याची पक्की पावती..
केला प्रयत्न फसवण्याचा कोणी,
ग्राहक मंच्याशी देतील ते झडती...

     @ उत्कर्ष देवणीकर

👆स्पर्धेसाठी नाही..
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 4:21 PM]
 ग्राहकांनी जाहिराती ह्या अश्लील
कुटुंबा सहीत तरी कशा बघाव्या
नको त्या अंतरवस्त्रा,वापराच्या
ब्रैंड अंबेसिडर महिला तरी नसाव्या
✒🎯🎯🎯✏
श्री.आप्पासाहेब सुरवसे
      लाखनगावकार
AMKSLWOMIAW
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 4:36 PM]
ग्राहक .

भरघोस सूट देऊन
जुना माल खपवला जातॊ .
आकर्षक जाहिरात करुन
ग्राहकच फसवला जातो .

    रत्नाकर जोशी
          जिंतूर
    ८२७५२३१६४१
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 4:39 PM] ‪+91 99690 71390‬
चारोळी स्पर्धा !
जर प्रत्येक भारतीय ग्राहक झाला जागा,
तर काय बिशाद आहे कुणी फसवेल त्याला ,
जर जनजाग्रुती झाली,साक्षरता आली
तर ग्राहकाचा नक्कीच होईल फायदा!
सौ. निलाक्षी विद्वांस.
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 4:49 PM]
बिन मातीचे राशन घेऊन द्या,
बिलात फरक दाऊन द्या..
असा गि-हाईक तुम्ही बनुन या,
सा-या मिलावटीतुन बाहेर न्या..
     - सौ.अनुराधा हवेलीकर- शहापुरकर
 🕊रा. देगलूर, जि. नांदेड
   भ्र.ध्व. ९५०३६६५९५८
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/11, 5:34 PM] ‪+91 74989 64901‬
जुना माल नवे वेष्ठण
सुंदर असे नवे आकर्षण
किंमत कमी सेलचे आकर्षण
फसवणूकीचे वेगळे लांछन
© जागृती निखारे.

[3/11, 6:04 PM]
"जागतिक ग्राहक दिन"
=================
निमित्ताने स्पर्धेसाठी चारोळी पाठवित आहे.

        ==चारोळी==

समजत नाही मले आता,
मी कोणती खातो उसळ?
कडधान्य तूप लोणी या,
या समद्यात झाली भेसळ

भाऊ नाही येत ओयखाले,
हे 'कुसय,' हायका 'मुसय'?
आन् खानं पीणं ,देणं घेणं ,
विचारात  बी  सरमिसय
.....................................
    श्री.का.रा.चव्हाण.
        (वऱ्हाड कवी)
"भक्तवत्सल"भाग्यनगर,
परभणी.(8552833839)
==================

[3/11, 6:34 PM]
जागो ग्राहक जागो'

किती दिवस करशील सहन,
आता तरी जागा हो ग्राहक,
लाथाडूनी या भ्रष्ट व्यवस्थेला,
मानगुटीच्या यांच्या हो मालक.
@क्रांती बुद्धेवार.
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 6:36 PM] ‪+91 88057 91905‬
 स्पर्धेसाठी
जाहिरातीच्या मायाजालात
भुलवु नका स्वता:ला
निरखुन, पारखुन वस्तु घे ग्राहकराजा
जप आपल्या हिताला
- रघुनाथ सोनटक्के
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 6:41 PM] ‪+91 98239 22702‬
जाहिरातीच्या नावाखाली
व्याभिचार यांनी मांडला
फसवेगिरीच्या दलदलीत
ग्राहकराजा नेहमीच बुडला
         
            🎯  मारुती खुडे.
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 6:57 PM]
🌷 चारोळी 🌷

ऊठ ग्राहका जागा हो
नव्या पिढीचा धागा हो
किंमत तुझी जाण जरा तू
व्यापाऱ्यांचा राजा हो

🌼 श्री.कैलास सुरवसे 🌼
     (एम. ए. बी.एड )      
     पदवीधर शिक्षक
घर क्रमांक सी/१०३
'सुमन निवास' ज्ञानेश्वर नगर  परभणी. ४३१४०१.
भ्रमणध्वनी क्रमांक  8411862121

[3/11, 6:57 PM] ‪+91 98239 22702‬
 जाहीरातीच्या मोहमायेत
ग्राहकराजा कायमचा फसला
मलई खाती फसवे दलाल
मूळ मालक येथे हक्काला मुकला

          🎯मारुती खुडे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/11, 6:59 PM] ‪+91 98239 22702‬
 जाग ग्राहका जाग आत्ता
भेसळीला देऊ नको थारा
कर्तव्याला जाग लवकरी
लोकशाहीचा तूच वाघ खरा
             
              🎯मारुती खुडे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
                         * T H E - E N D *
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~









**************************

Wednesday, 9 March 2016

* दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून दर्जा *

- नागपूर येथील दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावास त्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा याच ठिकाणी घेतली. त्यानंतर गेली ६० वर्षे हे स्थळ जगभरातील बौद्धधर्मियांसाठी श्रद्धास्थळ बनले आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य स्तुपाचेही आकर्षण आहे. डॉ.आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षात दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचे औचित्य साधण्यात आले आहे.

यापूर्वी दीक्षाभूमीस पर्यटन स्थळ म्हणून ‘क’ दर्जा होता. मात्र, गेल्या वर्षी भारतरत्न आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता कार्यवाहीला वेग दिला आहे. त्यानुसार, पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यास मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे दीक्षाभूमीचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे.

Tuesday, 8 March 2016


* माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर नाव - सौ. वृषाली शिंदे *

भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. भारताच्‍या सर्वोच्‍च अश्‍या राष्‍ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्‍ट्रपती होण्‍याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान झाल्‍या. देशातल्‍या विविध राज्‍यात महिला ह्या मुख्‍यमंत्री वा इतर महत्वाच्‍या पदावर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलिस महासंचालक पदावर श्रीमती किरण बेदीचे नाव ठळक अक्षराने लिहीले गेले. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकीळा म्‍हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्‍लेश्‍वरी, साईना नेहवाल, सानिया मिर्झा इत्‍यादी सर्व महिला आपल्‍या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्‍यासाठी महत्‍वाची भुमिका बजावली आहे. विविध क्षेत्रात असंख्‍य महिला आहेत, ज्‍यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. समाजात अश्या असंख्य महिला आहेत ज्यांचे कार्य विशेष नोंद घेण्यासारखी आहे.
आज जागतिक महिला दिनानिमित्ताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या प्रतिलिपी डॉट कॉम मराठी विभाग प्रमुख सौ. वृषाली शिंदे यांची माहिती त्यांच्याच शब्दांत देत आहोत.
त्यांचा जन्म मुंबईत दिनांक- २१ जुलै 1971 रोजी झाला. त्यांच्या परिवारात पती आणि एक मुलगी असा छोटासा परिवार आहे. त्यांचे आई वडिल दोघेही नौकरी करत. त्यांचे शिक्षण बी. ए. जरी असेल तरी माहिती तंत्रज्ञानच्या क्षेत्रात खूप मोठे काम त्यांनी केले आहे. मे १९९३ मध्ये त्यांचा विवाह झाला. ते सरकारी नौकरी करतात, त्यांना भटकंती, प्रवासाची खूप आवड आहे आणि भरपूर वाचन करतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच  हे मजल गाठू शकले असे ते म्हणतात.

मी -  प्रतिलिपी कडे कसे वळलात ?  वृषाली शिंदे - लहानपणापासून साहित्य वाचनाची आवड, शाळा व कॉलेज जीवनात साधारण कविता करत असे, वाचनाची प्रचंड आवड, सामाजिक जाणीव, मातृ भाषेबद्दलची आस्था

मी -  प्रतिलिपी विषयी काही सांगा ?
वृषाली शिंदे -  प्रतिलिप हा एक तरुण आणि होतकरू मुलांनी नवीन साहित्यकसाठो उपलब्ध करून दिलेला उत्तम मंच आहे.  ह्यावर कुणीही नवीन किंवा प्रसिद्ध साहित्यिक आपले लेख, कथा, कादंबरी, कविता, नाटक किंवा कुठलेही साहित्य विना मूल्य प्रकाशित करू शकता त्यासाठी कुठलीही रक्कम घेतली जात नाही. तसेच हे साहित्य डिजिटल फॉरमॅट मध्ये ई-बुकच्या रुपात प्रकाशित केले जाते, जी कि येणाऱ्या पुढील काळाची गरज आहे. शिवाय हे ऑनलाइन प्रकाशित होत  असल्यामुळे जगभरातून ते आपण आपल्या कॉम्पुटरवर, टॅबवर किंवा स्मार्टफोनवर सहज केंव्हाही वाचू शकता. प्रतिलिपी हे काम फक्त एक भाषेसाठी करत नाही तर सध्या मराठी, हिंदी, बंगाली, तामिळ, तेलगू आणि गुजराथी अश्या सहा भाषेत चालू आहे आणि बाकी भाषेतही लवकरच सुरु होणार आहे. प्रतिलिपी मराठी विभागाची मी प्रमुख आहे व मराठी भाषेचं सर्व कामकाज मी पाहते. विशेष म्हणजे प्रतिलिपिवरील साहित्य वाचकांसाठी ठराविक फी च्या रुपात वाचनासाठो ठेवले जाणार आहे आणि त्यातून आलेली 70% रक्कम हि लेखकास दिली जाणार व बाकी 30℅ प्रतिलिपी आपली website व स्टाफ साठी खर्चाच्या रुपात वापरणार आहे. सध्या प्रतिलिपी ला उत्तम प्रतिसाद मिळत असून मागील आठवड्यात (मार्च पहिला आठवडा) प्रतिलिपिवरील वाचकांची संख्या 30 लाख च्या वर पोहोचली आहे, आणि हे प्रतिलिपीने खूप कमी वेळात साध्य केले, त्यासाठी लेखकाचा व वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे व त्यांचे आभार. आपण ही www.pratilipi.com या वेबसाईट ला भेंट दया आणि आपल्या कथा, कविता, ललित, वैचारिक लेख email वर पाठवा त्यांस नक्कीच प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचसोबत 9969484328 या क्रंमाकावर ही संपर्क करु शकता.

मी -  जागतिक महिला दिनाविषयी महिलांना काय संदेश द्याल ?
वृषाली शिंदे -  मी संदेश देण्या इतकी मोठी तर नाहीच. कारण महिलांना महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून अनेक समाज सुधारकांनी त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी काम केले आहे आणि तो एक खूप मोठा संदेश आहे. आणि त्याचमुळे आज महराष्ट्रातील अनेक महिला शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभ्या आहेत, तरीही एक खंत आहे आजपण असंख्य महिला शिक्षण घेऊन सुद्धा आणि क्षमता असून ही आपला संसार, चूल आणि मूल ह्यापुढे सरकत नाही. तरीही मी संदेश देऊ इच्छिते कि स्त्रीयांनी मला जमणार नाही किंवा मी करू शकणार नाही हे झुगारून आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावे. त्यामुळे त्या स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचा, समाजाचा विकास घडवतील. फक्त मी स्त्री आहे असे समजून चालणार नाही तर आपणही एक मानव आहोत, पुरुषाप्रमाणे आपल्यालाही बुद्धी, ताकद दिली आहे आणि तिचा खरोखर उपयोग करणे जरूरी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
मी - आपणांस सुध्दा खूप खूप शुभेच्छा.

शब्दांकन -
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
9423625769

Monday, 7 March 2016

📚साहित्य मंथन Whatsapp ग्रूप 📚
........... आयोजित..........
************************
📚मुक्त चारोळी खुली स्पर्धा 📚
************************
🙎जागतिक महिला दिनानिमित्त 🙎
💥 दिनांक :-08/03/2016
💥 वार : - बुधवार
💥 वेळ : - 10:00 ते  07:00 पर्यंत
==================
💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 एकच चारोळी पोस्ट करता येईल
💥 चारोळीखाली आपले नाव, गाव व मोबाईल नंबर अवश्य लिहावे
💥 निकाल ब्लॉगवर पाहण्यास मिळेल त्यासाठी वारंवार चौकशी करु नये
💥साहित्य मंथन ग्रूपच्या बाहेरील  व्यक्ति, मित्र परिवार यात सहभागी होऊ शकतात...त्यासाठी .
खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर आपल्या चारोळ्या पोस्ट कराव्यात....
==================
🎬एडमिन कोअर कमिटी🎬

👤अरविंद कुलकर्णी
📱09689077239
=================
👤आप्पासाहेब सुरवसे
📱09403725973
=================
👤ना. सा. येवतीकर
📱 09423625769
===============
👤उत्कर्ष देवणीकर सर
📱09763641193
=================
👤सौ. जयश्रीताई पाटिल
📱09421387623
===============
👤सौ. अंजनाताई कर्णिक
📱09820758823
=================
 👤गजानन वारणकर नांदेड
📱9881384404
===================
👤डॉ .शिल्पाताई जोशी,मुंबई
📱09967708474
===================

🔦संकल्पना : - अरविंद कुलकर्णी
------÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷------
🎙संयोजक : - आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
××××××××××××××××××××
🎗संकलक:-ना सा येवतीकर
www.nasayeotikar.blogspot.com
येथे आपल्या चारोळी पाहता येईल
~~~~~~~~~~~~~~~~
🎤 परीक्षक : - अंजनाताई कर्णिक, माहिम, मुंबई
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
💢 ग्राफिक्स  :-क्रांति बुध्देवार
📱7588427335
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



[3/8, 10:12 AM]
प्रेमाची भाषा
मला समजले नाही
तिचे रुसने ही
मला उमजले नाही
- नासा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 10:17 AM]
 +91 84258 22099‬
माझ्या सुखावर तुझा
अधिकार असावा
दुखात डोले तुझे पूसन्याचा
अधिकार मात्र माझा असावा
@ बाबाजी गोडसे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 10:52 AM]
मुक्त विषय अन् मुक्तची लेखन,
विचार मुक्त अन् मुक्त विवेचन.
मुक्तपणे मुक्ताचे वर्णन
मुक्तेश्वरास करून वंदन.

डॉ.सुधीर अनंत काटे..निगडी,पुणे.
८/३/१६,मो.९२२६१३०६०१
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 11:25 AM]
समस्त 'भू' तलावरच्या पुरुषांनो,
"अस्मिता" माझी खोडू नका!
जरी असली हातात 'कंकण'..
परी माझा "पुरुषार्थ" मोडू नका!
- महेश
Mdesale29999@ gmail.com
8806646250
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 11:27 AM] ‪
+91 94213 87623‬

सारेच मला फसवत गेले
मीही वेडा फसत गेलो
तरीही मनात डुख न धरता
सामोरे त्यांना हसत गेलो

नाव-श्री.मुटकुळे नरहरी दत्तराव
गाव - परभणी.ता.जि.परभणी.
मोबाईल क्र.- 9405895130
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 12:06 PM] ‪
+91 98813 84404‬
अन्नपूर्णा तू ,सरस्वती तू,
भवानीची धारदार तलवार तू...
माता-भगिनी तू, सखी तू,
विश्वाच्या कणाकणात तू....
🔵WARANKAR G🔵
      👉🏼नांदेड👈🏼
🔴  स्पर्धेसाठी-नाही  🔴
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 12:25 PM]
बाहेर चाललासे दिव्याचा
दिव्य झगमगाट ।
माझ्या संसारी मंद तेवते
समईची नाजूक ज्योत ।
@ अरविंद कुलकर्णी
(स्पर्धेसाठी नाही )
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 12:52 PM] ‪
+91 88797 63591‬
 || सावित्रीच्या लेकींनो ||
=●=●=●=●=●=●=●=
तुमच्यातील सक्षमतेला नवी ओळख दया
ते अश्रु नयनातले आता जाळून टाका..
हव्या कशास त्या कुबड्या सहानभूतिच्या
सावित्रीच्या लेकींनो सन्मानाने जगणे शिका..!!
******सुनिल पवार.....

[3/8, 1:02 PM] ‪
+91 88797 63591‬
|| जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
■■■■■■■■■■■■■■■■■■
एक दिवसाचा मान, त्यातही समाधान..
गुलाबाने घेतले जणू काट्यांचे वरदान.!!
शुभेच्छेचे पुष्प आज, चहुओर दरवळेल..
पुन्हा तेच निर्माल्य, तेच कूड़ादान..!!
****सुनिल पवार.....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 1:04 PM] ‪
+91 97650 01266‬
जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...
**********************
स्पर्धेसाठी..

माहिमा तुझा किती वर्णावा मी नारीशक्ती,
सुखा- दु:खात तूच बनत राहिली सावली,
सलाम माझा तुझ्या अफाट कर्तृत्वाला,
सदाच जगली तू होवून जगाची माऊली...

निर्मला सोनी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 1:23 PM] ‪
+91 94213 87623‬
    !! आई  !!
     ----------
जशी किना-यावर जिरते लाट
पुन्हा मागे फिरत नाही
तशी सर्वांसाठी असणारी आई
स्वतःसाठी उरत नाही ..!

               "राजेश रेवले",
                परभणी.
              मो.9623407165
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 2:08 PM] ‪
+91 98813 84404‬
जिजाऊ सावित्रीच्या देशा ,
करू नको महीलेची दुर्दशा....
तीच्या मधून निपजतील उद्याच्या,
 इंदीरा,प्रतीभा,लता आणि आशा....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गिरीश विठठलराव साबळे.शिक्षक
जि.प.शाळा कलगाव
मो.नं.7745805509
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 2:13 PM] ‪
+91 96577 08858‬
नानाविध रुपे तिची
सप्त गुणांचा संगम
अवनी ती ब्रह्मांडी तिच
सबला हा तिचा जन्म..
पूजा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 2:32 PM] ‪
+91 72495 90174‬
 महिला दिन स्पर्धेकरिता
-------------------------------------
प्रत्येक रूढी तूला
स्त्री म्हणून छळत गेली
तू आत वाती प्रमाणे
स्वतः मात्र जळत गेली
-----ज्ञानेश्वर भामरे
     7249590174
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 2:33 PM]
 माता,भगिनी,पत्नी अन मुलगी,
आहे जीवनाचा पुर्ण आधार...
स्त्री शीवाय नाही होणार पुर्ण,
कधी मानवी जीवनाचा सार..

      @ उत्कर्ष देवणीकर
                उमरगा
            9763116493

👆स्पर्धेसाठी नाही

सर्वांना जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐

[3/8, 2:36 PM] ‪
+91 99690 71390‬
अंजना कर्णिक
9820758823
        मैत्री
मैत्री ही आरश्यासारखीअसावी पारदर्शक,जी दाखवेल खरे रुप !
मैत्री ही सावली सारखी असावी, जी कधीच नाही जाणार सोडुन!
जरी जरेने वठलो आपण,
मैत्रीला नव कोंब फुटेल !
सौ. निलाक्षी विद्वांस
माहीम .मुंबई
9969071390
चारोळी स्पर्धेसाठी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 2:48 PM] ‪
+91 94040 71984‬
🌺चारोळी स्पर्धेसाठी🌺
याच मातीत जन्मल्या स्ञिया
महान विदुषी मॆञेयी, गार्गी
अजूनही द्या सन्मान स्ञियांना
प्रश्न लागतील सर्व मार्गी
     सुनिल बेंडे वसमत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 2:58 PM]
 चारोळी...
स्पर्धेसाठी

‘महिला दिन'

स्त्रीत्वाशिवाय जगती,
अस्थित्व ना कुणाचे।।
‘लेक वाचवा' करु संकल्प,
औचित्य महिला दिनाचे।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 3:22 PM]
 रात्री अपरात्री एकटी स्त्री
दिसली म्हणजे नाही संधी
तिच्या रक्षणाची नि भविष्याची
जबाबदारी ही छत्रपतींच्या विचारांची नांदी
    ✏🎯🎯🎯✒
श्री. आप्पासाहेब सुरवसे
       लाखणगांवकर
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 4:03 PM]
मनुस्मृतिच्या काळात स्त्रीची
अधोगती अन् अवनती
डॉ. बाबासाहेबांच्या संविधानात
स्त्रीची उन्नतीच उन्नती
✏🎯🎯🎯✒
श्री.आप्पासाहेब सुरवसे
     लाखणगांवकर
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 4:22 PM]
घेतला वसा त्या सावित्रीने ,
उघडण्या ज्ञानाचे महाद्वार,
लढती आजच्या रणरागिनी,
उघडण्या मंदिराचे प्रवेशद्वार.
@ क्रांती बुद्धेवार.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 4:42 PM]
"जो तो इथे राही ,
आत्मप्रौढीतच मग्न,
फोटोपुरता दिखावा,
समाजकार्य पावते भग्न."
  संगीता देशमुख,वसमत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 4:44 PM]
"अंगभर पाचू केशराचे लेवून वसन
खिडकीतून डोकावता तपन,
घरदार भरले रवितेजाने
 घेता दर्शन तृप्त झाले शरीर मन."
  संगीता देशमुख,वसमत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 5:02 PM]
‪+91 94213 87623‬
"आम्ही अजून कोरडे बनलो नाहीत,
ओढलेत कोरडे जगाने आम्हावर तरीही,
देवालयात पाय ठेवू देऊ नका अाम्हास,
देवास नतमस्तक करुत,तुम्ही प्रयत्न करा कितीही
  संजय माचेवार,वसमत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 5:05 PM] ‪
+91 72495 90174‬
जग पुढे गेलं पण
आम्हा ठेवलं मागे
संस्कृतीच्या रक्षकांनो
व्हा आता तरी जागे
-----ज्ञानेश्वर भामरे

[3/8, 5:18 PM] ‪
+91 72495 90174‬
बदनाम जिंदगी ही
 वरदान वाटते हो
नावा करीता न मी
कुणाचे पाय चाटले हो
----ज्ञानेश्वर भामरे

[3/8, 5:18 PM] ‪
+91 72495 90174‬
माझ्याच माणसांनी
केला लिलाव माझा
कळला जरा उशिरा
त्यांना स्वभाव माझा
------ज्ञानेश्वर भामरे

[3/8, 5:21 PM] ‪
+91 72495 90174‬
मळा कोरडा कोरडा
नाही दिसे हिरवळ
पाण्यावाचून थांबली
एक हिरवी चळवळ
----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 5:48 PM]
माझ्या सोबत्यांनी
मजवर उपकार थोर केले
कोणी लूटून कोणी
मज सावरून गेले
@ अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 5:55 PM]
खेळ खेळताना ;
कबड्डीचा,खो झाला,
आणि,एकविसाव्या शतकात
शिक्षणाच्या आईंचा
घो झाला.
    (जाधव सुधाकर.टी. मोबाईल नंबर -9545950068)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 [3/8, 2:41 PM] ‪
+91 96896 75050‬
चारोळी...
स्पर्धेसाठी

‘महिला दिन'

स्त्रीत्वाशिवाय जगती,
अस्थित्व ना कुणाचे।।
‘लेक वाचवा' करु संकल्प,
औचित्य महिला दिनाचे।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 2:59 PM]
साहित्य मंथन साठी

     "महिला "

सात्विक सोज्वळपणाचा
महिला कळस असते
तप्त उन्हात फुललेला
महिला पळस असते
    शरद ठाकर
 सेलू जि.परभणी
8275336675
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 3:23 PM]
 ‪+91 95036 65958‬: कळले न रात्र कधी
ओसरली तुझ्या आठवणीत..
थेंब बनुनी ओघळली हलकेच
 जी जपली होती पापणीत..
     - सौ.अनुराधा हवेलीकर- शहापुरकर 🕊
      रा. देगलूर, जि. नांदेड
   भ्र.ध्व. ९५०३६६५९५८
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
**********************************
ब्लॉग वरील चारोळी -
झेप गरुडाची घेउनी तव, हो तु जगी सफल.....
उ॑च भरारी घेऊनी तव हो तु जगी सफल.........
दाखव तु जगास आता, बळ तुझ्या पंखाचे.,, 
जगास तव जिंकुनी मुठीत तव घेण्याचे .......
जमीन असो वा असो अंतराळ,,झेप तिथे घेण्याचे..........
चुल ,मुल ते जुनेच आता,,,घे भरारी तु सफल होण्याची आता ......... 
happy woman's day..........
govind jogdand....at .thane west ......
mobile.no.8652601836/९०२२५४४४५६

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 6:48 PM]
‪+91 72495 90174‬
चारोळी स्पर्धेकरीता
घरापासून अवकाशापर्यत मारली जिने भरारी
झाशीची राणी ,डाॅ आनंदीबाई ,कल्पना चावलाने तिला दिली नवी उभारी
सांभाळून सर्व नाती-खाती सार्थकी लावलं आयुष्य
नविन पिढीस जन्म देवून तिच घडवते आहे देशाचं भविष्य
श्रीमती नयना कुळकर्णी
खारघर नवी मुंबई
मो. नं 9869785379
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 7:49 PM]
‪+91 99305 09026‬
हे नारी,
सवॅगुण संपन्नतेचा वसा भारी
मातृत्वाची चाहूल तुझी कूस भरी,
जरी तू पूवॅजन्मीचीअबला नारी
थोर विदूषीनी तुला दिली भरारी.
सुलभा कुलकणीॅ. बोरीवली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 8:06 PM] ‪
+91 72495 90174‬
त्या करीता मुलांवर
करा चांगले संस्कार
आपोआप मिटून जातील
महिलेवरचे अत्याचार
----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 8:16 PM] ‪
+91 72495 90174‬
परावलंबी नाहित त्या
करू  लागल्या नोकरी
 त्यांच्याही पैशांनी घरात
शिजू लागलीय भाकरी
----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 8:24 PM] ‪
+91 98207 58823‬
घराबाहेर गेलेल्या मुलीची
जेंव्हा मला चिंता नसेल
तोच दिवस खऱ्या अर्थाने
महिला दिन असेल .
           रत्नाकर जोशी
                जिंतुर
         08275231641
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[3/8, 8:48 PM]
 ‪+91 70667 79265‬
महिला दुर्बल न रहावी
जावो अंधार सारून पुढे
मुढ जनावरे मोकाट सुटले,
भगिनींनो शिकवा त्याना धडे
✏_______ गजानन पवार
महिला दिनाच्या माझ्या सर्व भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐
[3/8, 8:50 PM]
‪+91 98817 62075‬
"देवीचे रूप असूनही गाभाऱ्यात निषिद्ध मी
सृजनत्वाची जननी तरी अपवित्र कशी मी ?
नर-नारी मध्ये निम्मी माझी सहनशील भागीदारी
लक्ष्मीची पाऊले माझी तरी नकोशी कशी मी ? "
                                                   © राजन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कणखरतेच्या बुरख्याआड
अनेकजण हडबडले
तिच्या अश्रूमध्ये
भले भले वाहून गेले
- मुग्धा मोडक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नसे मी ही देवी
भोग्या  ही नसे
जरी असे आई
माणूस प्रथम असे.
अंजना©

नाही दिलेत मज प्रेम जरी
नच ठेवलात  माझा मान
माणसासम जगू द्या तरी
इतके तरी  ठेवाल भान
अंजना©
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१)
मानापमान तू सोसत आलीस
नाती समस्त निभावित आलीस
वात्सल्याचे दान देतही आलीस
स्वसुखाला त्यागून जगतच आलीस
*************-*--***
२)नाती सारी निभवूनी अन्नपूर्णा झालीस तू
मानापमान सोसूनी सौख्यदायिनी झालीस तू
वात्सल्यदान दावूनी वात्सल्यदायिनी झालीस तू
स्वानंदाला विसरूनी आनंददायिनी झालीस तू
*************
© जागृती निखारे १०.११ रात्र
स्पर्धेसाठी नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
********** T H E - E N D **********
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निकाल - - - - - - - - 

साहित्यमंथन: महिलादिन
चारोळी स्पर्धा 

प्रथम क्रमांक
१) रत्नाकर जोशी
२)अनिल लांडगे

द्वितीय क्रमांक
१)राजन
 २) राजेश येवले

तृतिय क्रमांक
१)नयना कुलकर्णि
२)क्रांती बुद्घेवार

ऊत्तेजनार्थ
१)सुनिल बेंडे
 २)गिरीश साबळे
  ३)ज्ञानेश्वर भामरे

परीक्षक: 
अंजना कर्णिक







जागतिक महिला दिन विशेष 



* मुलींचे शिक्षण: प्रगतीचे लक्षण *

शनि शिंगणापूर येथील मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा किंवा नाही या बाबत सध्या समाजात, मि‍डियामध्‍ये जोरदार चर्चा चालू आहे. खरोखरच शनि मंदिराच्‍या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळाला तर त्‍यांचे सारेच प्रश्‍न सुटतात काय ? चारशे वर्षापासून चालू असलेली परंपरा सहजा सहजी बदलेल असे वाटत नाही. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण, महिलांची कुचंबणा, घरात व दारात महिलांची होत असलेली मुस्कटदाबी याविषयी फार कमी बोलल्‍या जाते. त्‍यांच्‍या प्रश्‍नांना वाचा फोडल्‍या जात नाही त्‍यांमूळे त्‍यांच्‍या वरील अन्‍याय काही केल्‍या कमी होत नाही. यात महिलांनीच पुढाकार घेणे अत्‍ंयत गरजेचे आहे. महिलांवर होणारे अन्‍याय महिलांनीच सक्षमरित्‍या सामना करून सोडविले पाहिजे, त्‍याशिवाय महिलांची प्रगती अशक्‍य आहे आणि ही शक्‍ती महिलांमध्ये फक्‍त शिक्षणामूळेच येऊ शकते. शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्‍त्रोत आहे. शिक्षण घेतल्‍यामुळे आपल्‍या जीवनाला एक दिशा मिळते, संजिवनी मिळते.  यांचे उत्‍तम उदाहरण म्‍हणून आपण महात्‍मा ज्‍योतिबा फुले आणि त्‍यांची पत्‍नी सावित्राबाई फुले यांच्‍या जीवनचरित्राकडे पाहू शकतो. अनाडी व निरक्षर पत्‍नी मूळे एके दिवशी ज्योतिबाना त्यांचा महत्‍वाचा कागद गमवावा लागला आणि त्याच वेळी पत्‍नी सावित्रीबाईला साक्षर  करण्‍याचा त्यांनी मनसुभा केला. तेवढ्याच तत्परतेने त्‍यास सावित्रीबाईंनी होकार दिला. घरातल्‍या घरात शिक्षण दिले. त्‍याचा फायदा एवढा झाला की, देशातील पहिली महिला शिक्षिका होण्‍याचा मान सावित्राबाई फुले यांना मिळाला. साहित्‍याच्‍या क्षेत्रात त्‍यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महात्‍मा फुले यांना शिक्षणाचे महत्‍व कळाले होते. त्‍यामुळे त्‍यांनी सन १८४८ मध्‍ये पुणे येथील भिडेच्या वाड्यात खास करून मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. एक स्‍त्री शिकली तर संपूर्ण कुटूंब शिकते अशी त्‍यांची धारणा होती त्‍यातूनच मग त्‍यांनी आपल्‍या पत्‍नीला शिकवले. असे महत्‍व प्रत्‍येक पालकांना,  नव-यांना म्‍हणजेच  पुरूष मंडळींना कळणे गरजेचे आहे. समाजात आजही मुलींच्‍या शिक्षणाच्‍या बाबतीत पालक जागरूक नाहीत. असे  म्‍हणण्‍यापेक्षा मुलांच्‍या व मुलींच्‍या शिक्षणाबाबत दुजाभाव करीत असतात. मुलगी शिकून काय करणार ? ही पालकांची  भावना  अजूनही दुर झालेली नाही. इंग्रजांच्‍या गुलामीगिरीच्‍या काळात महिलानी घराबाहेर जाणे अगदी तुच्‍छ समजले जायचे. महिला या " चूल आणि मूल " एवढ्याच कामासाठी समाजात राबत असत, तर शिक्षणासाठी घराबाहेर जाणे दूरची गोष्‍ट. भारत स्‍वतंत्र झाला त्यावेळी देशासमोर निरक्षरता ही फार मोठी समस्‍या होती. त्‍यातल्‍या त्‍यात महिलांची निरक्षरता तर देशाच्‍या प्रगतीत फार मोठी अडसर ठरत आले आहे. त्‍यामुळे शासन प्रथम पासुनच महिलांच्‍या शिक्षणावर भर देत आले आहे. गेल्‍या वीस एक वर्षापासुन शिक्षणाच्‍या बाबतीत भारताची प्रगती उल्‍लेखनीय झाली म्हणणे चुकीचे ठरणार  नाही. प्राथमिक शिक्षणात सर्व शिक्षा अभियान मोहिमेमुळे मुलींच्‍या शिक्षणाला प्रेरणा मिळाली.  शासनाने मुलींच्‍या  शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्‍हावा या साठी मुलींचा उपस्थिती भत्‍ता,  सावित्रीबाई फुले दत्‍तक पालक योजना, मोफत  गणवेश, मोफत पुस्तके, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, विद्यावेतन, शाळेला ये-जा करण्‍यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना, एसटी ने  मोफत  प्रवास  करण्‍यासाठी अहिलाबाई होळकर योजना, कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय, मानव विकास योजना, तसेच लेक वाचवा लेक शिकवा या सारख्‍या अनेक योजनाच्‍या माध्‍यमातून मुलींच्‍या शिक्षणासाठी शासन  प्रयत्‍न करीत होते आणि करीत आहे. त्‍यांना त्‍यात काही अंशी यश  मिळाले पण पुर्ण यश मिळालेच नाही. त्‍यांची अनेक कारणे आहेत. त्‍या कारणाचा  विचार करून त्‍यावर उपाय योजना  करणे आवश्‍यक  आहे.
* पालकांची शिक्षणाबात अनास्‍था -
मुलींच्‍या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील  पालकामध्‍ये तेवढी उत्सुकता व जागरूकता दिसत नाही, जेवढे शहरी  भागातील पालक जागरूक असतात. ग्रामीण भागातील पालक स्‍वत: शिक्षणाच्‍या  बाबतीत अनभिज्ञ असतात,  त्‍यामुळे त्‍यांना शिक्षणाचे महत्‍व पटत नाही. बरं  शिक्षणाचे महत्‍व पटत नाही असे जर म्‍हणावे तर हेच निरक्षर पालक आपल्‍या मुलाचे शिक्षण कुठेच थांबू  देत नाहीत. पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाचे शिक्षण पुर्ण करतात आणि मुलीचे शिक्षण मात्र या ना त्या कारणांवरुन थांबवितात. गावात ज्‍या वर्गापर्यंत शाळा त्‍याच  वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकण्‍याची मुभा  दिली जाते. पुढील शिक्षणासाठी जवळच्‍या गावात किंवा शहरात जावे लागते आणि त्‍याठिकाणी जाण्‍यासाठी मुलींना परवानगी दिली  जात नाही, ही वस्‍तुस्थिती आहे. त्‍यामुळे आज प्राथमिक  वर्गातील मुलींची  संख्‍या माध्‍यमिक वर्गात गेल्‍यावर ५० % पेक्षा कमी  होते ही गळती मुलीच्‍या विकासास नक्‍कीच बाधक ठरत आहे.
* अनिष्‍ठ रूढी व परंपरा -
ग्रामीण भागातील समाज आज ही अनिष्‍ठ रुढी व परंपरेच्‍या खोल गर्तेतुन बाहेर येण्‍यास तयार नाहीत. मुलींच्‍या शिक्षणा विषयी त्‍यांच्‍या मनात आज ही तेच विचार घोळत आहेत जे की, वीस वर्षापूर्वी होते. मुलीने शिकून काय करावं ? शेवटी घरच तर सांभाळायचे आहे. त्‍यासाठी एवढं शिक्षण पुरेस आहे या विचाराने ग्रामीण भागातील पालक आपल्‍या मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच बंद करायला भाग पाडतात. काही पालक मंडळी मुलींना सुरक्षेच्या कारणांवरून शाळेत पाठविणे बंद करतात. मुलींचे लग्‍न होईपर्यंत आई-वडिलांना तिची काळजी वाटते, मुलींच्या वाट्याला कोणतेही वाईट प्रसंग येऊ नये असे प्रत्येक पालकांना वाटते त्यामुळे त्यांचे  पुढील शिक्षण बंद करण्‍यात आल्‍याचे काही पालक खाजगीत बोलतात. तर काही पालक मुलगी आता उपवर झाली, तिच्‍या साठी एखादे चांगले स्‍थळ बघुन एकदाचं हात पिवळं केलं की, मी मोकळा होईन असे बोलतात. त्‍यांच्‍या या बोलण्‍यातून मुलीं विषयी असलेली त्यांची तळमळ व काळजी स्‍पष्‍टपणे दिसून येते. सध्‍या समाजात असलेले गढूळ वातावरण आणि मुलींच्‍या बाबतीत वाढत चाललेली असुरक्षितता यामूळे कोणीही मुलीच्‍या शिक्षणासाठी पुढील पाऊल टाकताना दिसून येत नाही. त्‍याच बरोबर देशात चालत आलेली वधूपक्षाकडून वरपक्षाला द्यावी लागणारी देणगी म्‍हणजे हुंडा. यामुळेसुध्‍दा मुलींच्‍या शिक्षणावर फार मोठा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. एखाद्या पालकांने आपल्‍या मुलींना खुप शिकविले, तिच्‍या शिक्षणावर खूप खर्च केला, असे असले तरी मुलींच्‍या लग्‍नाच्‍या वेळी देणगी द्यावीच लागते अशी परंपरा मुलींच्‍या शिक्षणास घातक ठरत आहे. त्‍यामुळे अश्‍या अनिष्‍ठ रूढी व परंपरा यास तिलांजली देणे अत्‍यावश्‍यक आहे. एवढं शिकवून, खर्च करून जर पुन्‍हा आहे तीच प्रथा सांभाळायची असेल तर मुलींच्‍या शिक्षणावर खर्च का करावा ? असा सर्व सामान्‍य विचार पालक करतोच, यात त्‍याचा तरी काय दोष ? पण याउलट मुलगी शिकून सवरून नौकरीला लागली किंवा स्‍वत:च्‍या बुध्‍दीमत्‍तेच्‍या बळावर रोजगार मिळवून कमावती झाली तर समाजात तिची पद, प्रतिष्‍ठा, मानसन्‍मान या सर्वच गोष्‍टी वाढीस लागतात. महिलांच्‍या हातात स्‍वत:चा पैसा असला किंवा पुरुषांकडे भीक मागण्‍याची वेळ जर महिलांवर येत नसेल तर तिला स्‍वाभिमानाने जीवन जगता येते. स्‍वाभिमानी स्त्रिया ह्या अनिष्‍ठ रूढी, परंपरा आणि प्रथा यांच्‍याविरोधात लढा देऊ शकतात आणि त्‍यात यश सुध्‍दा मिळवू शकतात. म्‍हणूनच मुलींचे शिक्षण अत्‍यंत महत्‍चाचे आहे.
* हक्‍क आणि कर्तव्‍याची जाण -
भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. भारताच्‍या सर्वोच्‍च अश्‍या राष्‍ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्‍ट्रपती होण्‍याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान झाल्‍या. देशातल्‍या विविध राज्‍यात महिला ह्या मुख्‍यमंत्री वा इतर महत्वाच्‍या पदावर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलिस महासंचालक पदावर श्रीमती किरण बेदीचे नाव ठळक अक्षराने लिहीले गेले. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकीळा म्‍हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्‍लेश्‍वरी, साईना नेहवाल, सानिया मिर्झा इत्‍यादी सर्व महिला आपल्‍या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्‍यासाठी महत्‍वाची भुमिका बजावली आहे. विविध क्षेत्रात असंख्‍य महिला आहेत. ज्‍यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. त्‍या सर्वाची यादी करीत बसलो तर फारच लांबलचक यादी होईल. महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार  समाधानकारक नाही. कारण आज ही महिलांना म्‍हणावी तशी संधी मिळत नाही, हे वास्‍तव नाकारून चालणार नाही. देशाच्‍या राजकारणात आणि इतर महत्‍चाच्‍या क्षेत्रात महिलांना संधी मिळावी, त्‍यांच्‍यात धाडस, साहस, प्रगती व्‍हावी यासाठी सरकारने महिलांना पन्‍नास टक्‍के आरक्षण देण्‍याच्‍या तयारीत आहे. परंतु आज जे काही महिला राजकारणात आहेत किंवा ज्‍यांनी निवडणूक जिंकून सत्‍ता व पद मिळविले आहेत. त्‍या पदावर खरोखरच महिलाच राज्‍य करीत आहेत काय ? याचे वास्‍तव चित्र असे आहे की बहुतांश ठिकाणी सरपंच, पोलिस पाटील, तालुक्‍याचे सभापती, शहराचे नगराध्‍यक्ष किवा जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षपदी महिलांची वर्णी लागत आहे.  त्‍यांचे रिमोट मात्र त्यांच्या पतीराजच्‍या हातात आहे. यास कारण एकच आहे ते म्‍हणजे या पदाधिकारी महिला शिकलेल्‍या नसल्‍यामूळे ते आपल्‍या पतीच्‍या हातून कारभार पाहत असतात. संविधानाने ज्‍या हेतूने किंवा उदेश्‍याने नियमावली तयार केली त्‍याचा आपण अश्याप्रकारे अनादर करीत असतो.  आपणाला आपले हक्‍क आणि कर्तव्‍याची जाण निर्माण करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. निरक्षर किंवा अडाणी बाई लोकप्रतिनिधी झाली तर त्‍या विभागाचा विकास जसा व्हायला पाहिजे तसा होतो का ? निदान याचा एक वेळा विचार करून आपल्‍या मुलींना शिकवू या. उद्या कदाचित ती गावची सरपंच बनून गावाचा कायापालट करू शकेल.
* पालकांचे दारिद्र्य – मुलींच्‍या शिक्षण विकासात पालकांचे दारिद्र्य ही फार मोठी समस्या आहे. पोटाचे प्रश्‍न जो पर्यंत सुटत नाहीत तो पर्यंत माणसाचे कशातच लक्ष नसते. शेती काम करतांना घरातील लहान मोठी कामे करण्‍याची गरज घरातील मुलीं कडून पूर्ण केल्‍या जाते. घरातील छोटी भांवडे सांभाळणे, कपडे धुणे, भांडी घासणे, घर सांभाळणे इत्‍यादी कामे अर्थातच मुलींना करावे लागते. याउलट मुले काहीच काम करीत नाहीत तरी आई-वडीलांचा मुलांविषयी वेगळाच भाव असतो आणि मुलीं विषयी वेगळाच. एवढं असून सुध्‍दा प्राथमिक वर्गात मुलींची अभ्‍यासातील प्रगती मुलांपेक्षा जास्‍त दिसून येते. याची प्रचिती दहावी व बारावीच्या निकाल ज्‍यावेळेस लागतो त्यावेळेस निदर्शनास येते. मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा नेहमीच सरस असतो. पहिल्‍या दहा मध्‍ये सर्व श्रेष्‍ठ गुणांत मुलींच बाजी मारतात. मात्र पुढे पदवीचे शिक्षण घेतांना मुलींच्या संख्येत लक्षणीय घट होते. गुणवत्‍ता यादीत झळकणा-या मुलीं कदाचित कुठे तरी नौकरी मिळवतिल परंतु बाकीच्या मुलींचे पुढे काय प्रगती होते ? या बाबत प्रश्‍न चिन्‍हच आहे. याउलट दहावी-बारावीत सर्वसाधारण गुण मिळविलेला मुलगा मात्र आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी प्रयत्‍न करतो. ही प्रथा कुठे तरी बंद व्‍हायला पाहिजे मुलगा असो वा मुलगी सर्वांना शिक्षण मिळायलाच हवे. याउलट मुलींचे शिक्षण समाजाच्‍या व देशाच्या प्रगतीसाठी आवश्‍यक आहे. आज देशात जे काही अनैतिक किंवा अराजकता वाढत चालले आहे. त्‍यास मुलींना शिक्षण न देणे हेच प्रमुख कारण दिसून येते. मुलीने शिक्षण घेतले तर तिला स्‍वत:बद्दल आत्‍मविश्‍वास निर्माण होतो. आज घरोघरी हुंडाबळी किंवा विवाहित मुलींचा जो छळ चालू आहे त्यास शिक्षण घेतलेली मुलगी नक्कीच विरोध करेल यात शंकाच नाही. मुलींच्‍या सुरक्षित आयुष्‍यासाठी तिला वयाच्‍या आठराव्‍या वर्षा पर्यंत शिक्षण देणे आवश्‍यक आहे. देशाच्‍या प्रगतीसाठी मुलींचे शिक्षण हे फारच आवश्‍यक आहे. पराया धन किेंवा परक्‍या घरची सून म्‍हणून जाणारी, आपल्‍या घरांसाठी तिचा ज्ञानाचा काय फायदा ? अश्‍या गोष्‍टीचा विचार न करता मुलींना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यायाच्‍या विरूध्‍द आवाज उठविण्‍यासाठी  मुलींना शिकवलेच पाहिजे, त्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. म्‍हणूनच मुलींचे शिक्षण म्‍हणजे प्रगतीचे लक्षण असे म्हटल्या जाते ते काही खोटे नाही हे आपण नेहमी साठी लक्षात ठेवावे.
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक व स्तंभलेखक
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

Sunday, 6 March 2016


================ निकाल ================

साहित्य मंथन whatsapp ग्रूप आयोजित विचार मंथन स्पर्धा
विषय : जागतिक महिला दिन
संयोजन व परीक्षण : सौ. प्रिया वैद्य, बोस्टन, अमेरिका
============================
( 1 ) जागतिक महिला दिन.
जागतिक महिला दिन हा भारतातच काय संपूर्ण जगात अतिशय उत्साहात,धुमडक्यात साजरा करण्यात येईल ,यात काही शंका नाही.  जर महिला दिनी एकाच व्यासपीठावर सुषमा स्वराज आणि सोनिया गांधी किंवा मग ममता -जयललिता-मायावती-रबडीदेवी ,सुप्रिया सुळे यांनी  बोलायला सुरुवात करतील तर सगळ्याच परस्परांच्या मनातील खंत ,गोष्टी बोलून दाखवतील कारण आज  एकविसाव्या विज्ञानवादी युगात ही भारत हा पुरुषप्रधान देश होता आणि आजही आहे.त्याला राजकीय पक्ष तरी कसे अपवाद राहतील.कारण सत्ता ही दिवस -रात्री प्रमाणे बदलत असते परंतु हेच कालचे विरोधक आजचे सत्ताधीश आणि आजचे सत्ताधीश हे उद्याचे विरोधक असणार हे नक्कीच  जरी खरे असले स्त्रियां विषयीची मानसिकता बदलताना दिसुन येत नाही. म्हणून जनता जनार्धन तव्यावरील भाकरी पलटतात, ते ही खायच्या नागेलींच्या पानाप्रमाणे....., परंतु आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री कुठेही कमी नाही.ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अगदी काकण भर जास्त पण कमी नाही ,पुरुषांच्या पेक्षा कौशल्याधिष्टित सहजतेने काम करताना दिसून येतायत.
         आज महिला सबलीकरणासाठी "स्त्री संघटन" होणे नितांत गरजेचे आहे. अबला ह्या सबलाच झाल्याच पाहिजेत हे ही तितकेच खरे .आज मित्तीला सर्व पुरुषी अहंकारी वृत्तीने वागण्यााचे आपल्या घरातून सुरुवात करून सोडून दिले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने  भारत एक जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकू शकेल.आज प्रत्येक घरात अशी एक विचारधारा बनत चालली आहे की ,ज्याप्रामाणे छत्रपतीे शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्यांच्या घरात तशीच अवस्था आज मुलींच्या बाबतीत दिसून येते आज म्हणून तर सरकारला सुकन्या ,सावित्रीबाई, कु.स्वाती इ.सारख्या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लागते. त्यापेक्षा भयावह परिस्थिति आज मुला-मुलींच्या जन्मदराचे प्रमाण व्यस्त दिसुन येते आहे. त्याही पेक्षा आजची  स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची कर्दनकाळ म्हणून घरातच वावरतेय. प्रत्येक  जन म्हणतोय की, आई पाहिजे,बहिण पाहिजे,पत्नी पाहिजे,मग मुलगी ,बेटी का  नको ? मग घोडे कुठे आडत आहे.  आज मित्तिला प्रत्येक जन सोशल मेडियावर चर्चा करताना "बेटी बचाव -बेटी पढाव"  नारा जोरात लगावताना दिसतोय पण विचार आणि प्रत्यक्ष कृतीचा अवमेळ दिसतो आहे. ज्यांना पहिले अपत्य मूलगी आहेत तेच पांढरपेशी लोक मुलींच्या जन्माचे कंस, रावण, राक्षसी प्रवृत्ती,नव्हे तर साक्षात कुप्रसिध्द डॉ.सरस्वती -सुदाम मुंडेच्या रूपाने डोके वर काढतात.
       आज ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना एकाही स्त्री शेतकरी महीलेने आत्महत्या केलेली आढळून येत नाही. शिवाय सर्वात जास्त दुष्काळाशी दोन हात हे त्या घरातील स्त्रियाला करावे लागतात.पण तीला ह्या असल्या "महिला दिनाचे " ना सोयर ना सूतक ..! तिला बस राब राब राबावे लागतेय. आज स्त्री शिकुन प्रत्येक क्षेत्रातील क्षितिजे पादाक्रांत करताना कशाची तमा न बाळगता ती निश्चित यशस्वी वाटचाल करत आहे.याउलट राजकारणात तर सरपंच पतीच  गावचा कारभार हाकतात,सरपंच बाई ह्या नामधारी नावालाच, केवळ फक्त झेंड्याची दोरी धरण्यापुरत्या आणि  फोटो सेशन पुरत्याच्...त्याचप्रमाणे शहरी भागात ही नगरसेविकांचे मिस्टर त्याहुन  निराळे नाहीत.ते ही स्वः त नगरसेवक, नगराध्यक्षाच्या तोऱ्यात वावरात.एवढेच काय तर मध्यतंरी अशी ही बातमी वाचनात आली की,एका जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पती हे संबधित जिल्ह्याचा कारभार अक्षरक्ष:शिक्षणा धिकारी दालनात बसून  पवित्र शिक्षणाचा गाढा हाकत आहेत..हा कोणता कळस म्हणायचा...,विकासाचा..,की अधोगतीचा.... निर्लज्जेतेचा...का पुरुषप्रधान मानसिकतेचा...
कमीत कमी उच्च शिक्षित शिकलेल्या- सवरलेल्या महिलांनी तरी स्वः ता पासून सुरुवात करावी .आणि स्वः ताला कमी समजण्याची रूढ़ ,प्रथा,परंपरा,नव्हे तर स्पर्धा मोडीत काढावी..
       आज एकंदरीत विचार करता स्त्रियां ह्या 50%टक्के आहेत आणि प्रमाण 33%आरक्षण मागत आहेत. पण ते ही मिळत नाही याला जबाबदार कोण ? तर एकूणच उदासीनताच नव्हे काय...?
ज्याप्रमाणे खासदार आमदार हे सर्व मिळून त्यांच्या निधी ,पेंशन किंवा ततसंबंधी  एकमुखाने बिनविरोध निर्णय घेतात.त्याच प्रमाणे कट्टर राजकीय महिला एकत्र येऊन स्त्री जातीच्या प्रगतीसाठी,उन्नतीसाठी , विकासासाठी अतिशय मनातून प्रयत्न करतात,झटतात हे खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांचा आदर्श घेऊन स्थानिक पातळीवर सुद्धा गट ,तट, जात, पात, धर्म ,पंथ, वर्ग, पक्ष हे सर्व विसरून सर्व महिलांनी आणि विशेषतः पुरुष वर्गानी ही एकत्र येऊन खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणा साठी  प्रयत्न करावेत हीच ' "महिला दिनी "' माफक आणि रास्त अपेक्षा...!!!!!
- आप्पासाहेब सुरवसे लाखनगांवकर
जि. प. प्रा. शा .लोणीघाट, ता. जि .बीड
9403725973
============================
( 2 ) जागतिक महिला दिन
मातृत्वचा गोड सागर म्हणजे माता सर्व श्रुष्टिची जणींनी महिला तिचा आदर हा सर्व माणवजातीने राखला पाहिजे नव्हे राखायलाच हवा
आज देश प्रगतीसाठी धावतो आहे आनंद वाटतो पण कधी वृतमान पत्रात कधी शेजारीच ऐकायला मिळते की अमुक वर्षाची बालिका, अमुक वर्षाची महिला यांच्यावर अन्याय, अत्याचार झाला तेव्हा मात्र मन हेलावून जाते तेथून विचाराला सुरूवात होते की? ही कसली प्रगती अरे! हा आधिकार कोणी दिला या नराधमांना
तुम्हीच जगता काय रे येथे कुत्र्या मांजरा सारखे?
ज्यां मातेला भगवंतानी सोंदर्य बहाल केले आहे हे काय फक्त तुमच्या नजरा चुकविण्यासाठीच किती घाणेरडी नजर टाकता एका परस्त्री वर 'आमच्या छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगा.... एक मुस्लिम महिलेला मातेचा दर्जा दिला' ''अशीच आमची आई असती तर आम्ही ही सुंदर झालो असतो''!
मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईने या अत्याचारी समाजाचा खुप जाच सहन केला त्याचीच सुंदर फलप्राप्ती आजची म्हणून महिला सबळ झाली आहे..
विचार पवित्र ठेवा सर्व काही सुंदर होईल
महिलांना खरचं स्वातंत्र मिळाले असे वाटते का? मी तर म्हणेन नाही..स्वातंत्र मिळाले तर एखाद्या विधवा महिलेला समाज का मान्यता देण्यास मागे पुढे बघतो तिला का तिचे विचार मारावे लागतात?
किती तरी वेळेस तिच्यावर वाईट प्रसंग ओढवले जातात...
जगाचा बघण्याचा दृष्टीकोन ही वेगळा भासतो
का तर ती विधवा आहे म्हणून? यात तिचा काय दोष आहे
हे कुठेतरी थांबायला हवे आहे थांबले तरच महिला दिन
ख-या अर्थाने सार्थ झाला
हा प्रश्न एकट्या महिलांचा नसून सर्वांनी यासाठी प्रयत्न करायला हवेत माझ्या अल्पबुद्धिने जे वाटले ते परखड मांडण्याचा प्रयत्न केला काही चुका असतील तर क्षमा असावी...
विचार मंथनसाठी
महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व माता जणींनीला
हार्दिक शुभेच्छा
- गजानन पवार, हिंगोली
070667 79265‬
============================
( 3 ) जागतिक महिला दिन
कसा सुरू झाला हा महिला
दिन? कधी ?कुठे ?कशासाठी?
अशा तर्‍हेचे प्रश्न मनात येणे साहजीकच आहे.
१९१० मधे प्रथम  कोपनहेगन येथे स्रियांनी  मोठा औद्योगिक संप घडवून आणला होता. या व अन्य सर्वच क्षेत्रातील लिंगभेदाला आपला विरोध दर्शवण्यासाठी. याच ठिकाणी आंतरराष्र्टिय समाजवादी महिला परिषदेने स्री दिनाचि जाहीरनामा आखला व प्रसिद्घ केला .  १७ देशातील  १०० स्री प्रतिनिधींनी तो संमत केला
१९११ ला प्रथम याच
परिषदेच्या प्रेरणेने डेन्मार्क , आॅस्र्टिया, जर्मनी व स्वित्झर्लड या देशातील स्रियांनी प्रचंड मिरवणुका,संच मोर्चे यामधून कामाच्या ठिकाणी स्री पुरूष समानता, समान वेतन,  सर्व स्रियांना कमाईचा हक्क आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्याच्या हक्काची मागणी केली
१९१७ मधे ८मार्च या दिवशी युद्धाला ऊबलेल्या रशियन स्रियांनी ,"भाकरी आणि शांतता" याची मागणी करत देशभर सर्वत्र संप घडवून आणले आणि ४ दिवसातच रशियाचा जुलमी राजा झार याने महिलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
१९७५ साली युनायटेड नेशन्स आॅर्गनायझेशनने जागतिक पातळीवर ८मार्च हा महिला दिन म्हणून घोषीत केला.
याचे एक मुख्य ऊद्द्दीष्ट आहे ते म्हणजे तरराष्र्टिय पातळीवर राजकीय,सामाजिक, आर्थिक व शांततेच्या पातळीवर महिलनी केलेल्या अजोड कामगिरीचा यथोचित गौरव करणे.
आत्ता ८ मार्च  २०१६ रोजी साजर्‍या होणार्‍या महिला दिनाची संकल्पना आहे ,
सर्व पृथ्वीवर २०३० पर्यत
स्री व पुरूष ५०:५० अशी समान लोकसंख्या पर्यत आणणे.तसेच: स्रियांची १००% शोषण मुक्ती करणे.
स्रियांच्या देहविक्रीचा व्यापार पुर्ण थांबवणे.
स्रीचे शाररिक, मानसिकव
आर्थिक, शोषण थांबवणे.
संपुर्ण लैंगिक शोषण मुक्तीसाठी कायदे राबवणे  व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे
स्रीयांच्या कौमार्य शुद्धतेचा पुरावा म्हणून खासकरून अनेक मुस्लीम समाजात व आफ्रिकन जमातीत अजूनही  मुलगी लहान असताना करण्यात येत असलेल्या अत्यंत अमानुष आशा 'योनी बंदी'  म्हणजे ( genital mutilation)च्या शस्रक्रियांना १००%आळा घालणे.
प्रत्तेकाने pledge for sex Parity म्हणजे "लिंग  समानतेची प्रतिज्ञा घेणे.
या प्रतिज्ञेतुनच
१ स्रियांच्या नेत्रृत्वाला संधी
२ कमाईच्या समान संधी देणे
३ स्रियांच्या महत्वाकांक्षा पुर्ण व्हाव्यात म्हणूनसंधी ऊपलब्ध करून देणे
४ पुर्वग्रहदुषीत समाजिक रुढींचे ऊच्चाटन करणे
५ स्रियांनी आर्थिक सामाजिक  ,औद्योगिक,
शैक्षणिक राजकीय कर्तृत्वाचा गौरव करणे
अशी सर्व धोरणेआखण्यातआली आहेत.
पण.........
काही देशात व शहरी भागात वरील काही ऊद्दीष्टे फलीत होत असली तरी रोजच्या रोज वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या अत्यंत विपरीत आहेत
१ स्रियांवर  त्यांच्या शरीर मनावर मालकी हक्क गाजवणे हे तर जगभरच्या पुरूषांचे सार्वत्रिक वर्तन
आहे.
२ स्रिच्या पोषणाकडे दुर्लक्ष करणे, मुलींना पुरेसे जेवण न देणे
३ तिला शिक्षणा पासुन वंचीत ठेवून ,कोवळ्या वयात सर्वप्रकारच्या कौटुंबिक जबाबदार्‍या घ्यायला लावणे.
४ जवळच्या नातलगांकडूनच नव्हे तर प्रत्यक्ष बाप भाऊ यांचेकडूनतिचे लैंगिक शोषण होणे
५ स्री भ्रृण हत्या सर्रास आढळणे
६ स्री पुरुष विषम लोकसंख्याचा राक्षस
७ कामाच्या ठिकाणी समान काम करूनही  पुरूषापेक्षा कमी
वेतन, कामाचे जादा तास भरायला लावणे .
६ स्रीयांना होणारी मारहाण
७ स्रियांवर होणार्‍या बलात्कारांचे भयानक वाढते आकडे
८ स्री पोलीस, स्री कंडक्टर परिचारिका, गार्ड यांचेवर होणारे हल्ले
असे विषण्ण करणारे चित्र पाहीले की निदान आपला देश तरी युनोने ठरवून दिलेल्या ऊद्दिष्टांना पुर्ण करेलअसे वाटत नाही.महिला दिन ऊत्सव साजरे होतायत,समानतेच्या मोटरसायकल रॅल्या निघतायत, पण प्रत्यक्षातसामान्य स्री, " दीन" आहे ने खरच!
बर ,  एक स्री तरी दुसर्‍या स्रीला  तरी कुठे सन्मान पुर्वक समान वागणूक देतेय!
म्हणजे खरी गरज आहे ती
१ शिक्षण व संस्कारातून स्रियांबाबतच्या समाज धारणेत आमुलाग्र बदल घडवून आणण्याची.
२ स्रियांनी शारीरिक सबलता व आत्मनिर्भरता
प्रात्त करून घेण्याची
३ व्यवसाय व कौशल्य शिक्षण घेऊन स्वयंपुर्ण होण्याची
४  घरातल्या मुलांना स्री देहाचा  व मनाचा आदर करायची शिकवण देण्याची.
५ स्री ने स्वत:चा सन्मान ठेवण्याची व अन्य स्रियांना कमी न लेखण्याची.
म्हणजे मग रोजचा दिवसच सन्मानाचा असेल! दीन नसेल!
खर तर आज असे एकही क्षेत्र नाही जेथे स्रिने कत्तृत्व दाखवलेले नाही. सुनाता विल्यम्स, कल्पना चावला या अवकाशात झेपावलेल्या स्रिया असोत वा सेनेच्या तिन्ही दलात भरती होणार्‍या सैनिका असोत ! ती कुठेच कमी
नाही! रेल्वे चालवणे , हवाई जहाज चालवणे, ट्रॅक्टरनी शेती करणे, संरक्षण ऊत्पादन, न्याय वैद्यक, गुत्पहेर ,अशा
खास तुरूषी समजल्या जाणार्‍या क्षेत्रातले महिलचे कार्य महान आहे. असे असताना,' मुलगी झाली हो'म्हणून गळे काढणारे वा जन्मताच तिचा अंत करणारेही याच देशात आहेत.
म्हणून स्रियांनी जाणले पाहीजे की ,'एकी हेच त्यांचे बळ आहे'.'मिलकर लडेंगे मिलकर पाएंगे'
- अंजना कर्णिक, पुणे
098207 58823
============================
   ( 4 )   "जागतिक महिला दिन"
      महिला कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी ८मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या महिला कामगारांच्या लढ्याचे प्रतीक म्हणून 'जागतिक महिला दिन' जगभर साजरा होतो. या लढ्याने महिलांच्या हक्कांची जाणीवही जगव्यापी झाली. वस्त्रोद्योगातील महिला कामगारांच्या हक्कांसाठी न्यूयॉर्कमध्ये ८मार्च १८५७ ला पहिले आंदोलन झाले. त्याचेच स्मरण करीत  पन्नास वर्षानी ८मार्च रोजीच महिला कामगारांचे आंदोलन झाले. सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा व सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षितता  मिळावी,यासाठी रुटगर्स चौकात ही निदर्शने झाली. यानंतर कोपनहेगन येथे दुसऱ्या जागतिक समाजवादी महिला परिषदेत ८मार्च हा दिवस जागतिक महिला दिन  म्हणून स्वीकारावा,असा ठराव क्लारा झेटकिन या झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने मांडला.तेव्हापासून ८मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो.ही आहे आज जगभर साजऱ्या होणाऱ्या 'जागतिक महिला दिनाची' पार्श्वभूमी!पण वास्तव काय आहे?ज्या उद्देशाने हा दिवस साजरा करायचे ठरले होते त्यातील सार्वजनिक ठिकाणी स्त्रीला सुरक्षितता मिळाली का?
     या प्रश्नाचे उत्तर खेदाने नकारार्थीच  येईल.
        स्त्रीने "चूल आणि मूल" ही पारंपरिक चौकट तोडून उंबरठ्याच्या बाहेर पडली तेव्हा तिच्या कार्यक्षेत्रासोबत तिच्या  समस्येचे रूपही विस्तारित झाले.तिचा कौटुंबिक  छळ बंद झाला आणि सामाजिक अत्याचार सुरू झाला.स्त्रीला वैचारिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने फुले दांपत्याने १८४८मध्ये मुलींच्या शिक्षणाची मशाल पेटवली. याचा परिणाम असा झाला की,ती वैचारिक आणि बऱ्याच प्रमाणात आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली परंतु ती सुरक्षित मात्र अजूनही होऊ शकली  नाही. ऱोज वर्तमानपत्र उघडले की,त्याच त्याच संस्कृतीचा ऱ्हास दाखविणाऱ्या व काळीज चिरून टाकणाऱ्या बातम्या वाचल्या किंवा आजूबाजूला तशा घटना पाहिल्या,ऐकल्या की वाटते,"जागतिक महिला दिन" साजरे करून काय साध्य होत आहे?आज सर्वच क्षेत्रात स्त्रीने उत्तुंग भरारी मारली. त्यात यशस्वी सुध्दा झाली  झाली आहे. स्वत:चा वेगळा ठसा देखील उमटवला आले. यावरून स्त्री सक्षम झाली असे म्हणता येईल परंतु तरी ती सुरक्षित झाली म्हणता येईल का?कारण या देशात बलात्कार करणारा उजळ माथ्याने फिरतो तर बलात्कारीत स्त्रीवर आत्महत्येची वेळ येते. गावापासून शहरापर्यंत कुठलीही स्त्री सक्षमपणे  अशा प्रसंगाला तोंड देण्याचे सामर्थ्य प्राप्त करु शकलेली नाही. आजही स्त्रियांसाठी संविधानापेक्षा समाज आणि धर्म यांचेच कायदे लागू होताहेत. मूठभर स्त्रियांचा झगमगाट आणि स्वैराचार पाहून अखिल स्त्रियांच्या जीवनमानाचे अंदाज काढणे,हे कपोलकल्पित होईल.स्थानिक स्वराज्य संस्थेने स्त्रियांसाठी आरक्षण दिले असले तरी ग्रामीण तर सोडाच पण बऱ्याच शहरी स्त्रिया सुध्दा रबरी शिक्का किंवा कळसूत्री बनून राहील्या आहेत.
      अशावेळी "तूच तुझ्या जीवनाची शिल्पकार"याप्रमाणें स्त्रीने स्वतःहून या  स्वातंत्र्याचा,आरक्षणाचा सक्षमपणे लाभ घेतल्याशिवाय उपयोग होणार नाही.नाहीतर असे वर्षानुवर्षे जागतिक दिन येतील अन अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या  पिढीतील काहीजण या दिवसाला एक परंपरा म्हणून साजरा करतील किंवा काहीजण अंध्दश्रध्दा म्हणून सोडून देतील.
   "घे झेप मुली  आता,पिंजऱ्यातच नको फडफडू,
अन्यायाविरुध्द पेटून ऊठ,नको आता कढू अन रडू ,
नव्या युगाची,नव्या धाडसाची वाट नवी पाडू,
महिला जागतिक दिनाचे हेच आता दे लेकीला बाळकडू."
   समस्त महिला भगीणीना सन्मान,वैचारिक स्वातंत्र्य,हक्क प्राप्त होवो,हीच येणाऱ्या "जागतिक महिला दिना"निमित्त हार्दिक शुभेच्छा.
     - संगीता देशमुख, वसमत जि. हिंगोली
============================
( 5 )
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर नाव - सौ. वृषाली शिंदे
भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. भारताच्‍या सर्वोच्‍च अश्‍या राष्‍ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्‍ट्रपती होण्‍याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान झाल्‍या. देशातल्‍या विविध राज्‍यात महिला ह्या मुख्‍यमंत्री वा इतर महत्वाच्‍या पदावर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलिस महासंचालक पदावर श्रीमती किरण बेदीचे नाव ठळक अक्षराने लिहीले गेले. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकीळा म्‍हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्‍लेश्‍वरी, साईना नेहवाल, सानिया मिर्झा इत्‍यादी सर्व महिला आपल्‍या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्‍यासाठी महत्‍वाची भुमिका बजावली आहे. विविध क्षेत्रात असंख्‍य महिला आहेत, ज्‍यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. समाजात अश्या असंख्य महिला आहेत ज्यांचे कार्य विशेष नोंद घेण्यासारखी आहे.
आज जागतिक महिला दिनानिमित्ताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या प्रतिलिपी डॉट कॉम च्या मराठी विभाग प्रमुख सौ. वृषाली शिंदे यांची माहिती त्यांच्याच शब्दांत देत आहोत.
त्यांचा जन्म मुंबईत दिनांक- 21जुलै 1971 रोजी झाला. त्यांच्या परिवारात पती आणि एक मुलगी असा छोटासा परिवार आहे. त्यांचे आई वडिल दोघेही नौकरी करत. त्यांचे शिक्षण बी. ए. जरी असेल तरी माहिती तंत्रज्ञानच्या क्षेत्रात खूप मोठे काम त्यांनी केले आहे. मे 1993 मध्ये त्यांचा विवाह झाला. ते सरकारी नौकरी करतात, त्यांना भटकंती, प्रवासाची खूप आवड आहे आणि भरपूर वाचन करतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच  हे मजल गाठू शकले असे ते म्हणतात.
मी -  प्रतिलिपी कडे कसे वळलात ?  वृषाली शिंदे - लहानपणापासून साहित्य वाचनाची आवड, शाळा व कॉलेज जीवनात साधारण कविता करत असे, वाचनाची प्रचंड आवड, सामाजिक जाणीव, मातृ भाषेबद्दलची आस्था
मी -  प्रतिलिपी विषयी काही सांगा ?
वृषाली शिंदे -  प्रतिलिप हा एक तरुण आणि होतकरू मुलांनी नवीन साहित्यकसाठो उपलब्ध करून दिलेला उत्तम मंच आहे.  ह्यावर कुणीही नवीन किंवा प्रसिद्ध साहित्यिक आपले लेख, कथा, कादंबरी, कविता, नाटक किंवा कुठलेही साहित्य विना मूल्य प्रकाशित करू शकता त्यासाठी कुठलीही रक्कम घेतली जात नाही. तसेच हे साहित्य डिजिटल फॉरमॅट मध्ये ई-बुकच्या रुपात प्रकाशित केले जाते, जी कि येणाऱ्या पुढील काळाची गरज आहे. शिवाय हे ऑनलाइन प्रकाशित होत  असल्यामुळे जगभरातून ते आपण आपल्या कॉम्पुटरवर, टॅबवर किंवा स्मार्टफोनवर सहज केंव्हाही वाचू शकता. प्रतिलिपी हे काम फक्त एक भाषेसाठी करत नाही तर सध्या मराठी, हिंदी, बंगाली, तामिळ, तेलगू आणि गुजराथी अश्या सहा भाषेत चालू आहे आणि बाकी भाषेतही लवकरच सुरु होणार आहे. प्रतिलिपी मराठी विभागाची मी प्रमुख आहे व मराठी भाषेचं सर्व कामकाज मी पाहते. विशेष म्हणजे प्रतिलिपिवरील साहित्य वाचकांसाठी ठराविक फी च्या रुपात वाचनासाठो ठेवले जाणार आहे आणि त्यातून आलेली 70% रक्कम हि लेखकास दिली जाणार व बाकी 30℅ प्रतिलिपी आपली website व स्टाफ साठी खर्चाच्या रुपात वापरणार आहे. सध्या प्रतिलिपी ला उत्तम प्रतिसाद मिळत असून मागील आठवड्यात (मार्च पहिला आठवडा) प्रतिलिपिवरील वाचकांची संख्या 30 लाख च्या वर पोहोचली आहे, आणि हे प्रतिलिपीने खूप कमी वेळात साध्य केले, त्यासाठी लेखकाचा व वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे व त्यांचे आभार. आपण ही www.pratilipi.com या वेबसाईट ला भेंट दया आणि आपल्या कथा, कविता, ललित, वैचारिक लेख email वर पाठवा त्यांस नक्कीच प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचसोबत 9969484328 या क्रंमाकावर ही संपर्क करु शकता.
मी -  जागतिक महिला दिनाविषयी महिलांना काय संदेश द्याल ?
वृषाली शिंदे -  मी संदेश देण्या इतकी मोठी तर नाहीच. कारण महिलांना महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून अनेक समाज सुधारकांनी त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी काम केले आहे आणि तो एक खूप मोठा संदेश आहे. आणि त्याचमुळे आज महराष्ट्रातील अनेक महिला शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभ्या आहेत, तरीही एक खंत आहे आजपण असंख्य महिला शिक्षण घेऊन सुद्धा आणि क्षमता असून ही आपला संसार, चूल आणि मूल ह्यापुढे सरकत नाही. तरीही मी संदेश देऊ इच्छिते कि स्त्रीयांनी मला जमणार नाही किंवा मी करू शकणार नाही हे झुगारून आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावे. त्यामुळे त्या स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचा, समाजाचा विकास घडवतील. फक्त मी स्त्री आहे असे समजून चालणार नाही तर आपणही एक मानव आहोत, पुरुषाप्रमाणे आपल्यालाही बुद्धी, ताकद दिली आहे आणि तिचा खरोखर उपयोग करणे जरूरी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
मी - आपणांस सुध्दा खूप खूप शुभेच्छा.

शब्दांकन -
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
9423625769
============================
( 6 )
"समाजासोबतच सोशल मिडीयावरील स्त्री स्वतंत्र व सुरक्षित आहे का ?"
   या संदर्भात आपण मत मांडावे असं वाटलं.मुळात कोणतीही स्त्री जेव्हा फेसबुकवर,वॉटस अप वर येते तेव्हा तिचा उद्देश ज्ञान,मनोरंजन,व्यक्त होणे,आधुनिक जगाच्या संपर्कात राहणे,व नंतर जवळचे मित्र झालेच तर सुख दु:ख शेअर करणे..असे वेगवेगळे उद्देश कमी अधिक प्रमाणात असतात.पण स्त्री सोशल मिडीयावर आली म्हणलं कीच बर्याच लोकांच्या भुवया उंचावतात. या स्त्रीला मग वेगवेगळे अस्त्र वापरुन माया,प्रेम,प्रोत्साहन अशाप्रकारे जवळीकता वाढवुन नंतर मूळ स्वरुपात येऊन वाईट मेसेज,कमेंट द्वारे त्रास दिला जातो.प्रत्येक स्त्री ही उपभोग्य वस्तु आहे,ही धारणा अशा लोकांच्या मनात असते.तसं पाहीलं तर असे लोक फार कमी आहेत.चांगल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे.पण वाईट लोकांच्या कारवायामुळे स्त्रिया एकतर फेसबुक सोडुन जातात,किंवा तुरळक यांच्या दबावाला बळी पडु शकतात तर काही आत्मविश्वासाने याला तोंड देऊन खंबीरपणे सामना करतात.
   या सर्व प्रकारांतुन दिसुन येते की स्त्री कितीही खंबीर असली तरी तिला त्रास होतोच.
या सर्व गोष्टी दूर करायच्या असतील तर..समाजाची मानसिकता बदलावी लागेल...मुलींना सुरक्षितपणे शिकता,फिरता,नोकरी,व्यवसाय करता आला पाहीजे..स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवुन दिल्याशिवाय...नुसता कोरडा मोठेपणा कामाचा नाही असे मला वाटते...
माझी एक रचना...
ती जळत राहते,
तो जाळत राहतो,
कधी हुंड्यासाठी,
कधी एकतर्फी प्रेमासाठी,
कधी वासनापुर्तीसाठी,
चारित्र्याच्या संशयापोटी,.....
ती शांतपणे जळत आलीय..
त्याचा अन्याय भोगत आलीय...
पण तीही बनलीय सक्षम आता..
नाही चालणार अहंकाराची सत्ता..!
- दिलीप धामणे, हिंगोली
099222 36870‬
============================
( 7 )
‬महिला तिच्या कर्तुत्वाला शतशः नमन
अनादी काळापासुनच स्त्री जातीस अनन्यसाधारण कार्ये केलेली आहेत अन् ज्या त्या वेळेला स्वतःची नवी ओळख तसेच स्थान मिळवून संपुर्ण जगताला तिची महती पटवून दिलेली आहे.
कोणतेही कार्य असो स्री कार्यक्षम होती आहे अन् असेलही.सृष्टी निर्मात्या श्री महादेवांनी ही त्यांच्या शक्ती रूपात पार्वती मातेस स्थान दिले.त्याच देवीने अनेकानेक रूपात प्रकट होऊन अनेकानेक असाध्य कार्ये पूर्णत्वास नेली. इतकेच नव्हे तर झाशीची राणी, मा जिजाऊ यांना तर त्यांच्या कर्तुत्वासाठी साता समुद्रापार लहान थोर जाणतात.
जे स्वतः देवादिदेवांनी स्विकार केले तेच आजच्या ह्या कलियुगी सर्वच विसरले आहोत ह्याचीच खंत वाटते.
आजही स्रीया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुनी कामे करतात किंबहुना पुढेच आहेत उदाहरणादाखल अनेक नावे घेता येतील
पहिली IPS (आय पी एस)-किरण बेदी
महिला मुख्यमंत्री- श्रीमती मोदी
तडफदार महिला पंतप्रधान- इंदिरा गांधी
महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील
अन् अजुनही बरेच.
खेद हाच की आजच्या SO CALLED पुरुष प्रधान संस्कृती ने आजकालच्या पिढीच्या विचारांना दुषित करुन टाकले आहे.पुरुष प्रधान संस्कृती निर्माण करणारे सर्वांना ह्याचा कसा विसर पडु शकतो की पुरूषाला जन्म देणारी ती स्री च आहे जी नुसता जन्म देत नाही तर प्रसुतीच्या वेळेस स्वतःच्या होणा-या त्रासाचा विचार न करता नव जीवास जन्म देते अन् ह्या सर्वात तिचा स्वत:चाही नव जन्म होतो (तो शारीरीक त्रासाचा पुरुष कल्पना ही करू शकत नाही)
सांगणे इतकेच की विचार बदला आयुष्य बदलेल. स्री च्या स्रीत्वाचा सन्मान करा किंबहुना करायलाच हवा तो आपण सर्वांनी कितीही झाले तरी आपले सर्व आराध्यांची शिकवणच आहे ती, मग ते आराध्य कोणीही असो
कोणताही देव राजे शिवाजी कोणीही असो शिकवण एकच स्रीयांचा सन्मान करावा.
अन् स्री ही एका नव्हे तर तीन कुळांचा ऊद्धार करते त्याच धर्तीवर विचार कराल तर पुरुष एकाच कुळाचा ऊद्धार करतो.
स्री चा आदर होई जिथे
साक्षात दैवी शक्ती वसे तिथे.
चला संकल्प करूयात फक्त महिला दिना पुरता मर्यादित न ठेवता अंगवळणी पाडुन अहोरात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये स्रीयांना समान मान देऊन त्यांचा सन्मान करूयात
संजय पाटील, पुणे
099704 46447
============================
( 8 )
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभर स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हाता.याविरुध्द स्त्रिया संघर्ष करीत होत्या.१८९० मध्ये अमेरिकेत मतदान हक्काबाबत द नॅशनल अमेरिकन वुमन सफ्रेज असोसिएशनची स्थापना झाली.पण ती मर्यादित हक्काबाबत लढत होती. म्हणून या मर्यादित हक्कांना देशांतरीत कामगार स्त्रियांनी विरोध केला व क्रांतिकारी मार्कस्वाद्यानी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्काच्या मागणीला पाठिंबा दिला.
१९०७  मध्ये स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.त्यात क्लारा झेटकिन  या लढाऊ वृत्तिच्या कम्यनुस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क पाहिजे.हे स्त्रियांचे कर्तव्य आहे. अशी घोषणा केली.  ८ मार्च १९०८ ला न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारानी रुटगर्स चौकात जमून निदर्शने केली. त्यांच्या अनेक मागण्यापैकी एक मागणी म्हणजे प्रौढ स्त्रियाना मतदानाचा हक्क मिळावा.या जोरदार मागणीमुळे क्लारा झेटकिन प्रभावित झाली.
क्लाराने १९१० साली कोपनहेगन याथे दुस-या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारानी केलेल्या कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्विकारावा हा ठराव केला.मग अमेरीका,युरोप वगैरे देशात या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. परिणामी १९१८ साली इंग्लंड व १९१९ साली अमेरीकेत यश मिळाले .
भारतात मुंबई येथे ८ मार्च १९४३ साली पहिला महिला जागतिक दिन साजरा झाला.१९७५ हे साल युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहिर केले.त्यानंतर स्त्रियांच्या समस्या समाजासमार,जगासमोर येऊ लागल्या.स्त्रियांच्या संघटना निर्माण झाल्या.सामाजिक,राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक यात परिस्थिनुसार स्त्रीविषयक प्रश्नांच स्वरुप बदलत गेले. स्त्री संघटनाच्या मागणीतदेखील बदलाव आला.
  पुरणकालापासुन स्त्रियांना संघर्ष तर करावाच लागला,सीता,द्रौपदी,मध्यायुगीन काळातील संतस्त्रिया मीराबाई,जनाबाई,पुढे जिजाई,राणी लक्ष्मुबाई,यानी प्रांतासाठी दिलेला लढा,स्वातंत्रासाठी अनेकीनी दिलेले बलिदान,सावित्रीबी फुले,रमाबाई रानडे (१,२) डॉ.आनंदीबाई जोशी या जागतिक स्त्रियांच्या सन्मानाच्या उबंरठ्यावर कितीतरी पुढे होत्या.त्यांची प्रखर आत्मशक्ती,आत्मभान वाखाण्याजोगे होते.त्यांना त्रिवार वंदन.!
जागतिक पातळीवर काम केलेल्या तसेच  लेखन,कला,व्यवसायात ब-याच महिला आघाडीवर आहेत.अगदी अलीकडे प्रकाशात आलेल्या महाराष्ट्रात फलटन येथे असलेल्या केवळ मराठीवर प्रेम म्हणुन अमेरीका सोडून आलेल्या Maxine Bernstein मावशी इथे मराठी शाळा काढते व सारे जीवन मराठी शिकविण्यात व्यतित करते.
मृणालिनी साराभाई नृत्यनिपुण (नुकतेच निधन झाले),अभिनेत्री नूतन,साधना मूर्तीमंत सादगी,व त्यांचा जीवंत अभिनय,
लेखिका,दुर्गाबाई भागवत –सार आयुष्य लेखनाला वाहिलेल.इंदिरा संत,शांताबी शेळके,जीवनात कठीण प्रसंगाना तोंड देत मंगलमय गीतरचना केल्या.समाजसेविका विद्या बाळ,रेणू गावास्कार यांच कार्य अशांना स्मरण करणं म्हणजे त्यांना मानाचा मुजराच ! (खर तर कितीतरी स्त्रिया आपल्या तेज:पुंज कार्याने तळपत आहेत.पण इथे मर्यादा आहे.)
  स्त्रिया विषयी एव्हढा जागर चालु असताना सारा सन्मान मिळत असताना भारतात अजूनही खेडोपाडी पारंपारीकता,धर्मच्या नावांखली अनिष्ठ प्रथा चालु आहेत. त्याचा भळी स्त्रियाच ठरत आहेत.
  शहरातसुध्दा स्त्रियावरबलात्कार,मारहाण,अतिप्रसंग,खुन होतच आहेत. कामाच्याठिकाणी लैगिंग शोषण होतेय.जिकडे पहावे तिकडे स्त्रियावर बळजबरी केली जातेय.घटस्फोटाचे प्रमाम वाढते आहे.कधी कधी स्त्रियांच स्त्रियांच्या वैरी ठरत आहेत.वेश्याव्यवसाय तस्करी ,अनीष्ट रुढिना खतपाणी ,बुवाबाजीला उत्तेजन ,याला स्त्रिया हातभार लावतायत की, काय ?अशा सामाजिक प्रश्नांच्या चळती समोर असताना ख-याखु-या अर्थाने महिला सुखी झाल्या कां हा प्रश्न पडतो.मग जागतिक महिला दिन साजरा करायचा कां?
  या प्रसनाकडे स्त्री संघटनानी आधिक लक्ष पुरवावे.स्त्रियामधील अनिष्ट भावनाच केली तर जागतिक महिला दिन साजरा करण्याला अर्थ उरेल !उद्याच्या ८ मार्च साठी स्त्रियांनी पायाभूत सच्चेपणात टिका की, आपोआप ससत्री ही देशाचा भक्कम पाय ठरेल !  आशा करु या.— त्याप्रित्यर्थ--एक चारोळी –
               महिला दिन आहे गोजिरा
               शोषितांना द्या मायेचा हात
               संघा संघाने येथे पसरा
               सहिष्णुता जपा साथ साथ

- कुंदा पित्रे, दादर, मुंबई
093247 42706
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



जागतिक महिला दिन निमित्ताने आज दिनांक 07 मार्च 2016 दैनिक लोकपत्र मधील ऑफ पिरियड सदराखाली प्रकाशित लेख 
" स्वागत करु या स्त्री जन्माचे ! "

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...