कोण होईल ज्ञानपती 2024 ( प्रजासत्ताक दिनानिमित्त )
प्रश्नमंजुषा स्पर्धा - जानेवारी 2024
विद्यार्थ्यांचे नाव - वर्ग :-
शाळेचे नाव -
------------------------------------------------------------------------------------------------------------
सूचना - दिलेल्या चार पर्यायापैकी योग्य पर्यायावर टीक करावे. एका प्रश्नाला एक गुण असेल.
1. चालतांना रस्त्यांच्या कोणत्या बाजूने चालावे ?
1) डाव्या 2) उजव्या 3) मधोमध 4) यापैकी नाही
2. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात कोणी मार्गदर्शन केले ?
1) श्री एकनाथ शिंदे 2) श्रीमती द्रौपदी मुर्मु 3) श्री नरेंद्र मोदी 4) श्री देवेंद्र फडणवीस
3. या मातीच्या पुण्याईचा या गीताचे कवी कोण ?
1) प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी 2) कवी राजा बढे 3) लक्ष्मण माने 4) कुसुमाग्रज
4. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जय हिंद असा नारा कोणी दिला ?
1) पंडित नेहरू 2) महात्मा गांधी 3) लोकमान्य टिळक 4) नेताजी सुभाषचंद्र बोस
5. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
1) महात्मा गांधी 2) लोकमान्य टिळक 3) महात्मा फुले 4) पंडित नेहरू
6. लोहपुरुष असे कोणास म्हटले जाते ?
1) महात्मा गांधी 2) लोकमान्य टिळक 3) सरदार पटेल 4) पंडित नेहरू
7. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोठे झाला ?
1) पुणे 2) शिवनेरी 3) सातारा 4) सिंदखेडराजा
8. हुतात्मा दिन कधी असतो ?
1) 26 जानेवारी 2) 03 जानेवारी 3) 30 जानेवारी 4) 12 जानेवारी
9. पहिले भारतीय ऑलिम्पिक विजेते कोण ?
1) विजयकुमार दहिया 2) खाशाबा जाधव 3) सायना नेहवाल 4) राज्यवर्धन सिंह राठोड
10. ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ?
1) आयझॅक न्यूटन 2) एडिसन 3) लुई पाश्चर 4) ब्रेल लुई
11. खालीलपैकी कोणता वनस्पतीचा अवयव नाही ?
1) मूळ 2) पान 3) वारा 4) खोड
12. गुरुत्वाकर्षण चा शोध कोणी लावला ?
1) आयझॅक न्यूटन 2) एडिसन 3) लुई पाश्चर 4) ब्रेल लुई
13. खालीलपैकी गटात न बसणारा ओळखा ?
1) वाघ 2) सिंह 3) कोल्हा 4) गाय
14. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते ?
1) खरा धर्म 2) जय जय महाराष्ट्र माझा 3) हा देश माझा 4) बलसागर भारत होवो
15. विजयकुमार दहिया कोणत्या खेळांशी संबंधित आहे ?
1) हॉकी 2) खो-खो 3) कबड्डी 4) कुस्ती
16. लान्सनायक अल्बर्ट एक्का यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे ?
1) भारतरत्न 2) परमवीर चक्र 3) पद्मविभूषण 4) पद्मश्री
17. खालीलपैकी झाडापासून आपणांस काय मिळत नाही ?
1) लाकूड 2) सावली 3) फळ 4) ऊन
18. डॉ. जगदीशचंद्र बोस यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे ?
1) भारतरत्न पुरस्कार 2) परमवीर चक्र पुरस्कार 3) नोबेल पुरस्कार 4) पद्मविभूषण पुरस्कार
19. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण ?
1) कल्पना राठोड 2) कल्पना चावला 3) जुही चावला 4) सुनीता चावला
20. खालीलपैकी प्रथमोपचार पेटीत नसलेली वस्तू कोणती ?
1) आयोडीन 2) साबण 3) इंजेक्शन 4) कात्री
21. हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्याचे नेतृत्व कोणी केले ?
1) महात्मा गांधी 2) स्वामी विवेकानंद 3) स्वामी रामानंद तीर्थ 4) गोविंदभाई श्रॉफ
22. कासीम रझवी यांच्या सैन्याचे नाव काय होते ?
1) सरकार 2) सरदार 3) रझाकार 4) निजामकार
23. हैद्राबाद संस्थानावर कोणाचे राज्य होते ?
1) औरंगजेब 2) बादशाह 3) निजाम 4) शिवाजी महाराज
24. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणास ओळखले जाते ?
1) दगडाबाई शेळके 2) ताराबाई मोडक 3) ताराबाई परांजपे 4) अनुताई वाघ
25. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे ?
1) औरंगाबाद 2) नांदेड 3) परभणी 4) लातूर
26. स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा कोणत्या संस्थानात होता ?
1) काश्मीर 2) जुनागढ 3) हैद्राबाद 4) यापैकी नाही
27. नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
1) महात्मा गांधी 2) स्वामी विवेकानंद 3) स्वामी रामानंद तीर्थ 4) गोविंदभाई श्रॉफ
28. हैद्राबाद संस्थान भारतात केव्हा विलीन झाले ?
1) 17 सप्टेंबर 1949 2) 17 सप्टेंबर 1948 3) 17 सप्टेंबर 1947 4) 17 सप्टेंबर 1950
29. निवडुंगाची फुले हे पुस्तक कोणी लिहिले ?
1) दगडाबाई शेळके 2) ताराबाई मोडक 3) ताराबाई परांजपे 4) अनुताई वाघ
30. हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या हत्या कोणत्या ठिकाणी झाली ?
1) धर्माबाद 2) अर्जापूर 3) अर्धापूर 4) बिलोली
31. निजाम सरकारवर कारवाई करणाऱ्या ऑपरेशनचे नाव काय होते ?
1) सोलो ऑपरेशन 2) पोलो ऑपरेशन 3) खोलो ऑपरेशन 4) डोलो ऑपरेशन
32. मुक्ती स्तंभ कोठे बांधण्यात आले आहे ?
1) औरंगाबाद 2) हैद्राबाद 3) निजामाबद 4) धर्माबाद
33. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 15 सप्टेंबर 2) 15 ऑगस्ट 3) 26 जानेवारी 4) 17 सप्टेंबर
34. हैद्राबाद मुक्तीसंग्राम वेळी भारताचे गृहमंत्री कोण होते ?
1) पंडीत नेहरू 2) सरदार वल्लभभाई पटेल 3) डॉ. राजेंद्र प्रसाद 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
35. निजामच्या सेनापतीचे नाव काय होते ?
1) कासीम अली 2) मीर उस्मान 3) कासीम रझवी 4) अब्दुल कासीम
36. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्याचा निर्णय कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतला ?
1) शंकरराव चव्हाण 2) वसंतदादा पाटील 3) वसंतराव नाईक 4) विलासराव देशमुख
37. निजाम सरकारमध्ये शिक्षणाची भाषा कोणती होती ?
1) तेलगू 2) इंग्रजी 3) उर्दू 4) मराठी
38. मराठवाड्यातून कोणती नदी वाहते ?
1) गंगा 2) गोदावरी 3) कृष्णा 4) चंद्रभागा
39. हैद्राबाद संस्थानात मराठवाड्यातील किती जिल्ह्याचा समावेश होता ?
1) 07 2) 09 3) 08 4) 10
40. स्वातंत्र्यापूर्वी भारतात एकूण किती संस्थाने होती ?
1) 665 2) 565 3) 562 4) 546
41. खालीलपैकी भारताची राजधानी कोणती ?
1) मुंबई 2) दिल्ली 3) नागपूर 4) कलकत्ता
42. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे ?
1) मुंबई 2) जपान 3) न्यूयॉर्क 4) इंग्लंड
43. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?
1) श्री रामनाथ कोविंद 2) द्रौपदी मुर्मु 3) नरेंद्र मोदी 4) एकनाथ शिंदे
44. भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?
1) श्री रामनाथ कोविंद 2) द्रौपदी मुर्मु 3) नरेंद्र मोदी 4) एकनाथ शिंदे
45. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
1) श्री रामनाथ कोविंद 2) द्रौपदी मुर्मु 3) नरेंद्र मोदी 4) एकनाथ शिंदे
46. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) डॉ. राजेंद्र प्रसाद 3) पंडीत जवाहरलाल नेहरू 4) श्रीमती इंदिरा गांधी
47. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) डॉ. राजेंद्र प्रसाद 3) पंडीत जवाहरलाल नेहरू 4) श्रीमती इंदिरा गांधी
48. भारताचे पहिले महिला पंतप्रधान कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) डॉ. राजेंद्र प्रसाद 3) पंडीत जवाहरलाल नेहरू 4) श्रीमती इंदिरा गांधी
49. भारतीय घटनेचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) डॉ. राजेंद्र प्रसाद 3) पंडीत जवाहरलाल नेहरू 4) श्रीमती इंदिरा गांधी
50. भारत देश केव्हा स्वतंत्र झाला ?
1) 17 सप्टेंबर 2) 26 जानेवारी 3) 15 ऑगस्ट 4) 01 मे
वरील प्रश्नांची उत्तरे चेक करण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.
धन्यवाद .......!
संकलन :- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769