Saturday, 10 August 2019

वेळेचे नियोजन

*आपण केलात का वेळेचे नियोजन ?*

वेळ ही एक अशी वस्तू आहे जे की कोणासाठी ही थांबत नाही. मग तो श्रीमंत असो की गरीब सर्वांसाठी वेळ सारखाच असतो. जो वेळेची कदर करतो वेळ त्याची कदर करते. जो वेळेला ओळखतो त्याला नंतर वेळ ओळखते. गेलेली वेळ किती ही पैसा खर्च केला तरी परत मिळत नाही. म्हणून म्हटले जाते time is money अर्थात वेळ म्हणजे पैसा आहे. पण जेव्हा आपण आजूबाजूला रिकामटेकडे माणसं पाहतो त्यावेळी खूप दुःख वाटते. दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण नष्ट झालेला जपान आज उद्योगविश्वात अग्रेसर आहे याचे कारण म्हणजे त्यांनी वेळेला महत्व देतात. प्रत्येकजण तिथे काही ना काही काम करीत असतो आणि वेळेवर काम पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. त्याउलट आपल्याकडे घडते. आपल्या देशात शाळा सोडल्यास कोणी ही वेळे कडे लक्ष देत नाहीत. देशात शाळा तेवढ्या घड्याळाच्या वेळेनुसार भरतात आणि सुटतात. विद्यार्थी आणि शिक्षक त्या वेळेचे पालन करतात. इतरत्र मात्र वेळेचे काही बंधन नसते. त्यामुळे त्यांना वेळेशी काही देणे घेणे नसते. शाळेतून मिळालेला वक्तशीरपणा हे मूल्य पुढे चालून ही मंडळी का विसरून जातात हेच मुळी कळत नाही. बहुतांश ठिकाणी वेळेवर कार्यक्रम सुरू होत नाही. कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आणि प्रेक्षक वेळेपूर्वी हजर राहतात मात्र कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मात्र हमखास एक तास उशिरा येतात. त्यामुळे किती धावपळ होते आणि कार्यक्रमात किती समायोजन करावे लागतात हे त्या संयोजकांनाच कळते. बऱ्याच लग्नपत्रिकेत जी मुहूर्ताची वेळ टाकलेली असते त्यावेळी लग्न लावले जात नाहीत. त्यामुळे लग्नाला आलेल्या मंडळींची खूप पंचायत होते. उशिराने धावणाऱ्या रेल्वेमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो तर एक मिनीट उशीर झाल्यामुळे जेंव्हा रेल्वे हुकते त्यावेळी आपणास आपली वेळ आठवते. काही कारणामुळे वेळेवर परीक्षा केंद्रावर न गेल्यामुळे विद्यार्थी परीक्षेला मुकले अशी बातमी वाचण्यास मिळते तेंव्हा त्या वेळेचे महत्व कळते. भारतात काही जणांकडे फुरसत नाही तर काही जणांकडे वेळ काढण्यासाठी टाईमपास केला जातो. जर आपल्याकडे रिकामा वेळ असेल तर आपण काय करता ? याच्या उत्तरावर आपली प्रगती अवलंबून आहे. चला आपला प्रत्येक क्षण न क्षण कामाला आणू या. त्यासाठी आपले स्वतः चे एक वेळापत्रक तयार करू या. म्हणजे वेळेचे योग्य नियोजन करता येईल.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...