Saturday, 20 March 2021

21/03/2021 कविता दिवस

जागतिक कविता दिवस 
।। कविता ।।

शब्द हेच धन शब्द हेच मन
शब्दामुळेच जिवंत आहे तन

कवितेतील शब्द बोलाविते मला
कवितेतील शब्द जागविते मला

कवितेमध्येच गुंतला माझा प्राण
कवितेनेच दिलाय मान सन्मान

कविता आहे म्हणून मी आहे
कवितेसाठी माझा जन्म आहे

कवितेमुळे माझी ओळख झाली
याच कवितेने मला प्रसिद्धी दिली
 
कवितेने मला नेले सातासमुद्रापार
कवितेनेच वाढविला माझा परिवार

- नासा येवतीकर

।। कविता ।।

शब्दांमागून शब्द आले
मनात आले लिहीत गेलो
अनुभवाचे काही विचार
काव्यामधून व्यक्त केलो

कमी शब्दांत जास्त विचार
कवितेतून होतो साकार
आपल्या मनातील भावनांना
कवी कवितेतून देतो आकार

शब्द हेच त्यांचे धन
शब्द हीच त्यांची संपत्ती
शब्दांचे भाव जोडले की
होते नव्या कवितेची उत्पत्ती

कविता वाचायला सोपी पण
समजायला अवघड असते
शब्दांमधून उतरलेल्या भावना
कवींचे हळवे मन सांगते

- नासा येवतीकर, 9423625769

।। कविता ।।

कविता कशी करावी ?
साधी करावी, सोपी करावी
दुसऱ्यांना समजेल अन
उमजेल अशी करावी

कविता कोठे करावी ?
घरात करावी, बाहेर करावी
ज्याठिकाणी सुचत असेल
त्याठिकाणी लगेच करावी

कविता कोणावर करावी ?
आई वर करावी
बायको वर करावी
जीवापाड प्रेम करणाऱ्या
जुन्या प्रेयसीवर करावी

कविता का करावी ?
मन समाधानासाठी करावी
कुणाचे तरी दुःख दूर
सारण्यासाठी करावी

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

20/03/2021 चिमणी दिवस

जागतिक चिमणी दिवस
बुटकी चिमणी आली हो अंगणी
ठेवू दाणा पाणी तिच्यासाठी ....१
 
चिवचिव करी घरभर फिरी
त्रास नाही करी कुणालाही ......२

चिऊचा हा घास काऊचा तो घास
आईचा प्रयास चालू असे .......३
 
गायब चिमणी नीरव अंगणी
खाया दाणा पाणी कोणी नाही ....४
 
धरणी सजवू निसर्ग वाचवू
साखळी जगवू निसर्गाचा ....५

- नासा येवतीकर, येवती 
ता.  धर्माबाद जि. नांदेड
9423625769

चिमणी

मंदिरावरची पहाटेची भक्तिगीते
विहिरीवरील घागरीचा आवाज
पहाटे पाचला कोंबड्याचे आरवणे
कुठे हरवला हा सगळा आवाज
स्वतःपुरताच विचार करू लागला
माणूस स्वार्थी नि मतलबी बनला
घरातील गाई म्हशी विकून टाकली
मुक्या प्राण्यांविषयी सहानुभूती संपली
जीव लहान असेल तरी आहे महत्वाचे
अन्न साखळीत स्थान आहे प्रत्येकाचे
चिमणी सारखेपक्षी नामशेष होऊ नये
भविष्यात चित्रापुरतेच शेष राहू नये

- नासा येवतीकर,  9423625769

#जागतिक_चिमणी_दिवस 
घराघरांत दिसणारा एकमेव छोटा पक्षी म्हणजे चिमणी. कोणाच्या घरात बिनधास्तपणे प्रवेश करण्याचा त्याला जणू जन्मतः हक्कच मिळाले आहे. पण वाढत्या शहरीकरण व जंगलतोडीमुळे चिमणी सारख्या अनेक पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. निसर्गातील अन्नसाखळीमधील तो देखील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे घरात,  अंगणात चिमणीसाठी पाणी ठेवा, ही विनंती

 - नासा

Wednesday, 17 March 2021

17/03/2021

मृत्यू 

माणसात जीव असेपर्यंत
चालतो सरळ व्यवहार
जीव निघून गेला की
गळ्यात घालतात पुष्पहार

ना कोणती धडपड असते
ना असते कोणती हालचाल
चौघे घेऊन जाती स्मशानात
माणसांचे होतात काय हाल

जिवंतपणी पाहून घ्यावा
मेलेल्या माणसांची अवस्था
येत नाही सोबत कोणी ही
ठेवू नये कशावर ही आस्था

मिळवलेल्या धन संपतीपेक्षा
गिणती होते केलेल्या कर्माची
मृत्यूनंतर आपल्या माघारी 
आठवण राहते ती कामाची

- नासा येवतीकर, येवती, ता. धर्माबाद, 9423625769

Monday, 15 March 2021

korona

कोरोना नियम

कोरोना वाढल्यामुळे
पुन्हा एकदा लॉकडाऊन
गर्दी होऊ नये म्हणून
दुकानाचे शटर डाऊन

बाहेर जाताना तोंडावर मास्क 
बोलताना ठेवू सुरक्षित अंतर
साबणाने दोन्ही हात स्वच्छ धुवू
बाहेर फिरून घरी आल्यानंतर

कोरोनाचे साधे नियम पाळा
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा
साध्या नियमांचे पालन करून
कोरोनाला घालू या आळा

आपले प्राण अत्यंत महत्वाचे
कुटुंबासाठी जीव की प्राण
आपल्यासोबत इतरांचे ही
वाढवू या आयुष्यमान

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

15/03/20211

जागतिक ग्रह दिन

ग्राहक देवता आहे
असे व्यापारी म्हणतो
दुकानात आलेल्या देवाला
ओरबडून तोच लुटतो

गोड गोड बोलून
ग्राहकाला फसवितो
पैसे कमविण्यासाठी
तो व्यवहार करतो

जीवनावश्यक वस्तू
खरेदी करावेच लागते
कुठे ही मिळणार नाही
दुकानात जावेच लागते

तरी सांगणे एक आहे
सहजासहजी फसू नका
स्वतःचे निर्णय स्वतः घ्या
कोणाचे बोलणे ऐकू नका

ग्राहक राजे जरा जागे व्हा
बाजारभाव जरा समजून घ्या

- नासा येवतीकर, 9423625769


16/03/2021

कविता - आशा व निराशा 
तू अशी जवळी राहा आहे एकच आशा
स्वप्न माझे पूर्ण कर नको करू निराशा

गाढ झोपेत असतांना मला भीती नव्हती
कारण तुझा हाथ सोबतीला होता जरासा
स्वप्न माझे ......

अंधारात चालताना अडखळत नव्हतो मुळीच
मी तुझ्या पाठीशी आहे दिला होतास भरवसा
स्वप्न माझे .....
 
एकटे सोडून मला जाऊ नको तू दूर अशी
तुझ्यावाचून प्रिये होऊन जाईल माझी दशा
स्वप्न माझे .....

मी तेथेच आहे जेथे तू सोडून गेलीस
सांग, तुझ्याविना मी जीवन जगू कसा
स्वप्न माझे .....

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Sunday, 14 March 2021

15/03/2021

कविता - झोप 
तळहातावर पोट असणारे
विना काळजी जगतात
ज्याच्याजवळ संपत्ती असते
रात्रभर जागरण करतात

निवांत झोप यावी म्हणून
दिवसरात्र मेहनत करतात
पैसा कमावून झोप उडते
रात्रीला गोळ्या खाऊन झोपतात

भकेला कोंडा नि निजेला धोंडा
त्यांची झोप हिरावून घेत नाही
कष्ट केल्याने येतो थकवा
त्यांना झोप म्हणावे लागत नाही

जीवनात पैसा संपत्ती महत्वाचे
सोबत महत्वाचे आहे झोप
दिवसा काम रात्री आराम नसेल
तर आपले सर्वच होईल लोप

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...