जागतिक चिमणी दिवस
बुटकी चिमणी आली हो अंगणी
ठेवू दाणा पाणी तिच्यासाठी ....१
चिवचिव करी घरभर फिरी
त्रास नाही करी कुणालाही ......२
चिऊचा हा घास काऊचा तो घास
आईचा प्रयास चालू असे .......३
गायब चिमणी नीरव अंगणी
खाया दाणा पाणी कोणी नाही ....४
धरणी सजवू निसर्ग वाचवू
साखळी जगवू निसर्गाचा ....५
- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
चिमणी
मंदिरावरची पहाटेची भक्तिगीते
विहिरीवरील घागरीचा आवाज
पहाटे पाचला कोंबड्याचे आरवणे
कुठे हरवला हा सगळा आवाज
स्वतःपुरताच विचार करू लागला
माणूस स्वार्थी नि मतलबी बनला
घरातील गाई म्हशी विकून टाकली
मुक्या प्राण्यांविषयी सहानुभूती संपली
जीव लहान असेल तरी आहे महत्वाचे
अन्न साखळीत स्थान आहे प्रत्येकाचे
चिमणी सारखेपक्षी नामशेष होऊ नये
भविष्यात चित्रापुरतेच शेष राहू नये
- नासा येवतीकर, 9423625769
#जागतिक_चिमणी_दिवस
घराघरांत दिसणारा एकमेव छोटा पक्षी म्हणजे चिमणी. कोणाच्या घरात बिनधास्तपणे प्रवेश करण्याचा त्याला जणू जन्मतः हक्कच मिळाले आहे. पण वाढत्या शहरीकरण व जंगलतोडीमुळे चिमणी सारख्या अनेक पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. निसर्गातील अन्नसाखळीमधील तो देखील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे घरात, अंगणात चिमणीसाठी पाणी ठेवा, ही विनंती
- नासा
No comments:
Post a Comment