1⃣ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहात गोंधळ घालणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांना ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आले निलंबित
2⃣ सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश आणि ओडिशाचं नाव दुष्काळग्रस्त राज्यांच्या यादीतून वगळलं
3⃣ नवी दिल्ली- बिहार, झारखंड, तेलंगणा, कर्नाटका, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्र दुष्काळग्रस्त राज्ये म्हणून घोषित
4⃣ चंद्रपूर, लातूर, परभणी महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर, तिन्ही महापालिकांसाठी 19 एप्रिलला मतदान, 21 तारखेला मतमोजणी
5⃣ परीक्षांमुळे दिल्लीतील पालिका निवडणुकीची तारीख पुढे ढकलली. आता 23 एप्रिलला मतदान आणि 26 एप्रिलला मतमोजणी होईल
6⃣ निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतल्याची मंत्री गिरीश महाजन यांची माहिती, रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 1100 सुरक्षास रक्षक तैनात करणार
7⃣ बीसीसीआयने जाहीर केली खेळाडूंची वार्षिक मध्यवर्ती कराराची यादी; विराट कोहली, धोनी, अश्विन, रहाणे, पुजारा, जडेजा, मुरली विजय यांची ग्रेड ए यादीत निवड.
या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
Thursday, 23 March 2017
तंत्रस्नेही प्रशिक्षण
Tuesday, 21 March 2017
डिजिटल शाळा
*डिजिटल शाळा : जबाबदारी कुणाची ?*
राज्यात जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रा अंतर्गत प्रत्येक सरकारी शाळा डिजिटल करण्यात यावे असे आदेश सरकारने काढले आहे. त्यामुळे गावागावातील मुख्याध्यापक आणि शिक्षक मंडळी शाळा डिजिटल करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. कित्येक शाळा लोकसहभाग आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून डिजिटल झाले आहेत आणि काही होण्याच्या मार्गावर आहेत. पण अजुन ही काही शाळा डिजिटल झाले नाहीत त्यास काय कारण असू शकते ? याबाबीचा परामर्श घेण्याचा छोटा प्रयत्न केलेला आहे.
*पालकांचा दृष्टिकोन -*
सरकारी शाळा म्हणजे या शाळेस शासना कडून भरपूर प्रमाणात निधी मिळते. शिक्षकांना ही भरपूर पगार मिळते. आम्ही पालक सर्व गरीब घराचे आहोत. आमचे कुटुंबाचे जीवन रोजच्या कामावर अवलंबून आहे. शंभर रु. कमाई करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करावे लागते. आमच्या जवळ पैसा राहिला असता तर आमच्या मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी पाठविलो असतो काय ? अश्या प्रकारचे बोलणे प्रत्येक मुख्याध्यापकास ऐकून घ्यावे लागत आहे. जेंव्हा जेंव्हा शाळा डिजिटल करण्याचा मुद्दा समोर येतो तेंव्हा तेंव्हा शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक मंडळीना असे ऐकुन घ्यावे लागत आहे. पालकांचे म्हणणे नक्कीच चूकीचे नाही. शिक्षणाच्या अधिकार अधिनियम 2009 अन्वये सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. मग पालकाना आपण पैसे कसे मागु शकतो हा ही एक प्रश्नच आहे. एका पालकाने प्रश्न विचारले, " शाळा डिजिटल करण्याची जबाबदारी शासनाची नव्हे काय ?" या प्रश्नाने समोरील मुख्याध्यापक निरुत्तर झाले. खरोखरच शाळा डिजिटल करण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडतो आहे. शाळा डिजिटल करण्यासाठी शासन एक रूपायादेखील खर्च करण्याची तयारी दर्शवित नाही. त्यामुळे पालकांत संभ्रम अवस्था आहे.
*कर्मचारी द्विधा मनस्थितीत*
काही पालक रागात येऊन सर तुम्हीच खर्च करा की शाळेला डिजिटल करायला यावर तेथील मुख्याध्यापक आणि शिक्षक काय बोलणार. सरकारी शाळेतील कर्मचारी आज येथे तर उद्या तेथे अशी त्यांची नोकरी करण्याची पध्दत आहे. आज शाळा डिजिटल करायची आणि उद्या बदली झाली की सर्व सोडून जायचे. मग शिक्षक मंडळी ही शाळा डिजिटल करण्यासाठी पैसे का खर्च करावे ? त्यांना कायमचे त्याच शाळेवर नेमणुक तर मिळणारच नाही. आमच्या एका सरकारी शाळेतील मित्राने आपल्या पदरचे 25-30 हजार रू. खर्च करून शाळा डिजिटल केली. शिक्षक, विद्यार्थी, आणि गावकरी या सर्वाना त्यांचा अभिमान वाटला. प्रशंसनीय असे कार्य त्यांनी केले. मात्र नुकतेच प्रशासकीय बदल्या मध्ये त्यांची बदली अश्या शाळेवर झाली जेथे पुन्हा एकदा शून्यातून काम करण्याची पाळी त्याच्यावर आली. आत्ता त्यांनी काय करावे. हे अनुभव पाहिल्यावार सरकारी शाळा डिजिटल करून मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना खरोखर काय मिळणार आहे. इतर गावात काही गोष्टी शक्य झाल्या म्हणून प्रत्येक गावात ते शक्य आहे असा समज करून घेतल्यामुळे इतराना याचा त्रास होत आहे. शाळा डिजिटल नसेल तर मुले प्रगत किंवा हुशार होणार नाहीत काय ?प्रत्येक गावात सधन गावकरी असतातच अशी गोष्ट नाही. ज्याठिकाणी कसल्याच प्रकारची सोय नसेल तर डिजिटल शाळेसाठीचा खर्च कुठून करायचा हा प्रश्न ही अनेका ना सतावतो आहे. ज्याचे उत्तर कोणी ही प्रशासकीय यंत्रणा द्यायला तयार नाही. काही ही करा पण शाळा डिजिटल करा असा आदेश वरिष्ठ स्तरावरुन देण्यात येत आहेत त्यामुळे शाळेवरील मंडळी चिंताग्रस्त होत आहेत. शाळा डिजिटल करणे ही काही सोपी गोष्ट नाही त्यासाठी निदान एक लाख रू. खर्च अपेक्षित आहे. त्याच सोबत शाळेचा दरमहा येणारा विद्युत खर्च जो की 500 रु. च्या खाली नसतो. विद्युत मंडळ शाळेत बसविलेले मीटर सी नावाने दिल्यामुळे अधिकचा खर्च सोसावे लागत आहे. तेच मीटर आर करून मिळाल्यास खर्च कमी होऊ शकतो पण ही प्रक्रिया वरिष्ठ पातळीवरुन करायला पाहिजे पण तसे होत नाही त्यामुळे महिन्यात 10 यूनिट जळाले तरी बिल मात्र 300 ते 500 रू. येत आहे. यावर काही उपाययोजना शासन करेल काय ? हा ही प्रश्न कायम आहे.
*प्रमाणित अभ्यासक्रम*
डिजिटल शाळे साठी महाराष्ट्र शासना कडून अजुन पर्यंत प्रमाणित अभ्यासक्रम तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले कोणत्याही कंपनीवाल्या कडून शाळा ह्या अभ्यासक्रम इनस्टॉल करतात. त्यासाठी जवळपास 8 ते 10 हजार रु. खर्च घेतात. तो खर्च शासनानी वाचविणे गरजेचे आहे.
तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेबसाइट आणि इतर माध्यमातून बरीच माहिती मिळत आहे. मात्र त्यासाठी शाळेत इंटरनेटची सुविधा असणे गरजेचे आहे. मात्र जेथे साधे फोन चालत नाही तेथे नेट कुठून चालणार हा ही मोठा प्रश्न आहे. ह्या सर्व बाबीच्या अडचणीवर मात करीत डिजिटल शाळेची धुरा सांभाळणे तसे सोपे काम नाही. शाळा डिजिटल करा हे म्हणणे खुप सोपे आहे मात्र प्रत्यक्षात राबविणे खुपच कठिन काम असल्याची चर्चा मुख्याध्यापक मंडळीत नेहमीच होत असते.
नागोराव सा. येवतीकर,
स्तंभलेखक, धर्माबाद
nagorao26@gmail.com
Monday, 20 March 2017
बजेट - 2017
*अर्थसंकल्प यशस्वी भव:*
राज्याचे अर्थमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प नुकतेच सादर केले. शासनाला दरवर्षी अर्थसंकल्प सादर करावाच लागतो त्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर केले आहे असे वाटते. राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाईल काय याबाबत मनात राहून राहून शंका येते. कारण राज्याच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा कर्जमाफीचा प्रश्नाला बगल देण्यात आली. वास्तविक पाहता सरकार सहानुभूतिपूर्वक विचार करून शेतकऱ्याची कर्जमाफी करतील असा विश्वास लोकांना वाटत होते. सत्तेत असलेले मित्र पक्ष नक्की कर्जमाफी मिळवून देतील असे प्रत्येक शेतकऱ्यास वाटत होते. मात्र त्या ऐवजी ऊस उत्पादक शेतक-यांना थोडा दिलासा देऊन ऊस खरेदी कर माफ करण्याचे ठरविले. मात्र राज्यात सर्वात जास्त कापूस उत्पादक आहे त्याचा कोठे ही विचार केला गेला नाही. पुढील 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला गेला. वृक्ष आपणास सर्व काही मिळवून देतात. एक शेतकरी एक वृक्ष जरी जगविला तर लाखो वृक्ष जगू शकतात. त्यासाठी गरज आहे वृक्षाचे महत्त्व शेतकरी लोकांना समजावून सांगण्याचे. दरवर्षी लाखो वृक्ष लावले जातात कागदो पत्री दाखविले जातात मात्र जगतात किती हे फार महत्वाचे आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. तो संकल्प कुठे ही दिसून आलेले नाही.
देशी-विदेशी मद्यावरील कर वगळता अन्य कुठल्याही वस्तूवर कर वाढ केले नाही. ही एक चांगली बाब आहे यामुळे शासन दरबारी मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकेल. पण दारू महाग झाल्यामुळे दारू पिणाऱ्या लोकांची संख्या कमी होणार नाही या उलट स्वस्तातील विषारी दारू पिऊन स्वतःसोबत कुटुंबाचे जीवन संकटात आणणाऱ्याची संख्या वाढू शकते. त्यापेक्षा सर्वत्र दारूबंदी करायला हवी होती. त्यामुळे अनेक संसार उघड्यावर येण्यापासून तरी वाचली असते. पण शासनाचे उत्पन्नाचे एकमेव स्त्रोत दारू आहे त्यामुळे सरकार दारूबंदीचे पाऊल उचलणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी या अर्थसंकल्प मध्ये 34 कोटी 86 लाखाची तरतूद केली आहे. सर्वात ज्यास्त रस्ते अपघात हे दारूमुळे झाले आहेत किंवा होतात. दारू पिऊन मुख्य रस्त्यावर भरधाव वेगात वाहने चालविल्यामुळे अपघात घडतात त्यात स्वतःचे जीव तर ते गमावतात त्याच सोबत हकनाक दुसऱ्याचा ही बळी घेतात. मुख्य रस्त्यावरील सर्व दारुची दुकानें बंद करण्याचा निर्णय खरोखर अंमलबजावणी झाली तर रस्ते अपघात मधील संख्या घटेल असे वाटते. दारूमुळे अनेकाची घरे उध्वस्त झाल्याचे पाहण्यात येते. त्यामुळे मानवाचा विकास सुध्दा होत नाही. अशा मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांसाठी 100 कोटींची विशेष तरतूद करून खरा आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र यामुळे खरोखर मानवी निर्देशांक वाढेल काय ? याबाबत शंकाच आहे.
गाव हे राज्याचे आत्मा असुन त्याचा विकास झाल्याशिवाय राज्याचा विकास होऊच शकत नाही. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाइन्फ्रा ही संस्था स्थापन केली जाणार असल्याचे अर्थमंत्री नी स्पष्ट केले. पाणी हे माणसाच्या आरोग्यचे मुळ कारण आहे. म्हणून ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली. ज्यातून लोकांना पिण्यायोग्य पाणी पुरवठा करता येईल. मात्र तो निधी तूटपूंजी आहे असे वाटते. मराठवाड्यातील दुष्काळासाठी कायम स्वरुपाची उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प, उन्हाळ्याच्या मोसमात मराठवाड्यातील लोकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागते. त्यांची काळजी घेत मराठवाड्याला पाणी पुरवठ्यासाठी 15 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केल्याबद्दल मराठवाडी जनता खरोखर आभारी राहील.
त्याच सोबत डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती डिजिटल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्या माध्यमातून लोकांच्या अनेक काम सहज आणि सुलभ पध्दतीने होतील असा विश्वास वाटतो. पुढील काळ हा संपूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. त्यासाठी गावागावात ग्रामपंचायतीमध्ये संगणक प्रणाली आणि तेथे काम करणारी कर्मचारी यांची नेमणुक करता येऊ शकते. याच माध्यमातून गावातील बेरोजगार युवकांना रोजगारा कसे मिळविता येईल याचा ही विचार करता येऊ शकतो. राज्यातील 1 लाख 22 हजार युवकांना रोजगार प्रशिक्षण देण्याची योजना या अर्थसंकल्पात मांडण्यात आली. ते उद्दिष्ट सफल झाली तर बेरोजगार युवकांची संख्या कमी होण्यास मदत होईल. मानवी जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शिक्षणा शिवाय मानवाची प्रगती यापूर्वी झाली नाही आणि पुढे होणार ही नाही. शिक्षण हे एक असे झाड आहे ज्याचे फळ 20 वर्षांनंतर चाखायला मिळतात. झाडाची ज्याप्रकारे योग्य निगा आणि काळजी घेतली तर सक्षम झाड उभे राहते. काही कालावधी उलटल्यानंतर त्यास फुले आणि फळे बघायला मिळतात. त्या झाडाप्रमाणेच शिक्षण आहे. प्राथमिक शिक्षण योग्य प्रकारे झाले तर पुढील शिक्षण उत्तम होऊ शकते. त्यासाठी राज्य सरकार काही ठोस पाऊल उचलणे गरजेचे असते. सध्या राज्यात सर्वत्र डिजिटल शाळेचे वारे वाहत आहे तेंव्हा शासन सरकारी शाळेत डिजिटल तंत्रज्ञान अजुन जोमाने सुरु होण्यासाठी प्रत्येक शाळेला निदान 10-15 हजार रुपये तरी अर्थसंकल्पमध्ये तरतूद करतील असे वाटले होते मात्र शिक्षणावर 40 कोटी ची तरतूद केली आहे ते ही उच्च शिक्षणासाठी. प्राथमिक शिक्षणाचा अजिबात विचार केला गेला नाही. या व्यतिरिक्त अजुन बरेच गोष्टीची अर्थसंकल्प मध्ये सोय केली आहे ज्यात पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी 325 कोटीं, प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानासाठी 200 कोटीं, मराठी भाषा संवर्धनासाठी 17 कोटीं, नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर गोरेगावमध्ये महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामा सेंटर उभारणार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे अहमदनगरमधील जामखेडमध्ये स्मारक बांधणार, पंढरपूरच्या वारीसाठी 3 कोटी रू. महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाख, स्वतंत्र ओबीसी महामंडळासाठी 2 हजार 384 कोटी, कर्करोग निदान करण्यासाठी सोय उपलब्ध करणार, 253 आरोग्य केंद्रावर निदान आणि उपचार होईल, साथरोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार, राज्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 700 कोटी, सिंधुदूर्गात आंबा समुद्रामार्ग वाहतूक करण्यासाठी प्रयत्न, महाराष्ट्रातील महामार्गाची लांबी 15 हजार 404 किमी झाली
असे अनेक संकल्प या निमित्ताने जनते समोर मांडण्यात आली. त्या सर्व योजना कागदावर खुपच भारदस्त वाटत आहेत मात्र प्रत्यक्षात जमिनीवर किती योजना यशस्वी होतात ? हा ही एक प्रश्नचिन्हच आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी गेल्या वर्षी काय संकल्प मांडला होता त्यातील किती योजना आपल्या उद्दिष्टा पर्यंत गेले, किती शिल्लक राहिले ?याचा आढावा किंवा लेखाजोखा घेऊन पुढील अर्थसंकल्प केला गेला पाहिजे पण तसे होत नाही म्हणून कागदावर केलेल्या योजना सफल होवो, त्यास यश मिळो एक नागरिक म्हणून एवढेच शुभचिंतन करू शकतो.
*- नागोराव सा. येवतीकर*
अनुक्रमांक
*साहित्य स्पंदन समूह अणुक्रमांक*
01 - क्रांती शंकरराव बुद्धेवार, धर्माबाद नांदेड
02 - सौ. कुमुद कोरडे
03 - विकास राउत
04 - सुरज कुमारी
05 - विकास सरक फलटण, सातारा
06 - सुनंदा रामराव वाजे, सिडको, नाशिक
07 - सौ. प्रज्ञा दत्तात्रय घोडके,चिंचवड पुणे
08 - अमोल अलगुडे
09 - प्रिती भगत, जुन्नर
10 - अविनाश पाटील
11 - रोहिदास होले ,दौंड ,पुणे
12 - सारिका श्रीरंग मद्दलवार, कुंडलवाडी नांदेड
13 - सुनील आलुरकर , बिलोली
14 - कोतवाड अश्विनी सोपान, बिलोली
15 - अनिल दूगाने, देगलूर
16 - सौ.चैत्राली जोगळेकर
17 - योगेश्वरी भानुदास पाटील, सुल्तानपुर
18 - सौ मनीषा निपाणीकर लातूर
19 - एन बी रेड्डी मुखेड
20 - संगीता देशमुख
21 - संकेत गाडेकर अधिक्षक श्री स्वामी समर्थ निवासी मूकबधिर विद्यालय लोणंद
22 - पुष्पा सदाकाळ
23 - संजय नारायण शेठ कळवा ठाणे
24 - संतोष शेळके
25 - भंडारे सतीश माधवराव कंधार
26 - नासा येवतीकर, धर्माबाद नांदेड
27 - अनिल लांडगे उंडणगाव
28 - वृषाली सुरेश खाड्ये मुंबई
29 - प्रणाली काकडे
30 - शिवानी खोरे
31 - लेणेकर संतोेष, उस्मानाबाद
32 - किशोर झोटे, औरंगाबाद
33 ॲड.प्रमोद महादेव मोहिते , कराड जि.सातारा
34 - किर्ती र. हरिभक्त, पुणे.
35 - शशिकला बनकर
36 - रमेश वायदांडे
37 - शरद पाटील, पुणे
38 - प्रणाली काकडे,अमरावती
39 - सुनिल विश्वनाथ ससाणे पाटील ,सातारा
40 - मीना सानप
41 - संगीता जायभाये
42 - प्रा. वैशाली देशमुख, संयोजक, नागपुर
43 - निर्मला सोनी अमरावती
44 - डॉ .गीतांजली शर्मा (कसमळकर ) पुणे
45 - अश्लेषा मोदी
46 - संतोष भोमे
47 - मीनाक्षी माळकर
48 - सौ इंदुमती रोडे-शेळके, पुणे
49 - मनीषा वाणी
50 - ऋषिकेश देशमुख
51 - गजानन इब्तेवार उमरी ,नांदेड
52 - आबासाहेब निर्मळे
53 - निता अरसुळे, जालना
54 - युवराज राजपुत
55 - सगर पंढरी, धर्माबाद
56 - अनिल रेड्डी
57 - रुपाली वैद्य, नांदेड
58 - संगीता कदम
60 - हमीद गुलाबनबी खाटीक
62 - मीरा खेडकर
63 - बंडोपंत कुलकर्णी
64 - विजया कोष्टी
65 - नरेंद्र कन्नके
67 - विशाल कन्हेरकर
71 - कवी निखिल खराबे
73 - dr meghana Hanamsagar (kulkarni)
5 - वृषाली वानखडे, अमरावती
77 - सूभाष कवळो
78 -
80 - हणमंत पडवळ
81 - हमीद गुलाबनबी खाटीक, जळगाव
82 - श्री . अनिल ओहळ, श्रीरामपूर जि. अहमदनगर
83 - सौ.खेडकर सुभद्रा बीड
84 - संजय माचेवार, वसमत
88 - भिसे दिगंबर
90 - वंदना ऐवळे
93 - छाया रसाळ
99 - पांडुरंग शिंदे
100 - लक्ष्मण दशरथ सावंत,औरंगाबाद
101 - साई पाटिल, श्री कंप्यूटर्स, धर्माबाद
111- विजया वाघ
113 - पंडित डोरले
121 - शोभा तोटावार, बिलोली
123 - अजय बिरारी नाशिक.
125 - सुरेखा धारपवार अकोला
143 - संजय रामदास उखळे, नांदेड
150 - अभिषेक सूर्यकांत रुद्रवार
अनुक्रमांक
*साहित्य स्पंदन समूह अणुक्रमांक*
01 - क्रांती शंकरराव बुद्धेवार, धर्माबाद नांदेड
02 - सौ. कुमुद कोरडे
03 - विकास राउत
04 -
05 - विकास सरक फलटण, सातारा
06 - सुनंदा रामराव वाजे, सिडको, नाशिक
07 - सौ. प्रज्ञा दत्तात्रय घोडके,चिंचवड पुणे
08 - अमोल अलगुडे
09 - प्रिती भगत, जुन्नर
10 - अविनाश पाटील
11 - रोहिदास होले ,दौंड ,पुणे
12 - सारिका श्रीरंग मद्दलवार, कुंडलवाडी नांदेड
13 - सुनील आलुरकर , बिलोली
14 - कोतवाड अश्विनी सोपान, बिलोली
15 - अनिल दूगाने, देगलूर
16 - सौ.चैत्राली जोगळेकर
17 - योगेश्वरी भानुदास पाटील, सुल्तानपुर
18 - सौ मनीषा निपाणीकर लातूर
19 - एन बी रेड्डी मुखेड
20 - संगीता देशमुख
21 - संकेत गाडेकर अधिक्षक श्री स्वामी समर्थ निवासी मूकबधिर विद्यालय लोणंद
22 -
23 - संजय नारायण शेठ कळवा ठाणे
24 -
25 - भंडारे सतीश माधवराव कंधार
26 - नासा येवतीकर, धर्माबाद नांदेड
27 - अनिल लांडगे उंडणगाव
28 -
29 -
30 - शिवानी खोरे
31 - लेणेकर संतोेष, उस्मानाबाद
32 - किशोर झोटे, औरंगाबाद
35 - शशिकला बनकर
38 - प्रणाली काकडे,अमरावती
50 - ऋषिकेश देशमुख
51 - गजानन इब्तेवार उमरी ,नांदेड
77 - सूभाष कवळो
78 -
88 - भिसे दिगंबर
90 - वंदना ऐवळे
99 - पांडुरंग शिंदे
100 - लक्ष्मण दशरथ सावंत,औरंगाबाद
111- विजया वाघ
113 - पंडित डोरले
123 - अजय बिरारी नाशिक.
125 - सुरेखा धारपवार अकोला
143 - संजय रामदास उखळे, नांदेड
150 - अभिषेक सूर्यकांत रुद्रवार
Sunday, 19 March 2017
नावाची लक्ष्मी
नावाची लक्ष्मी
सरर्र..... असा दुरवरून आवाज ऐकू आला. तसा आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं तर कडेवर एक लहान मूल घेवून येणारी बाई दृष्टीस पडली. जेमतेम वीस-बावीस वर्षाची ती पोरगी ; परंतु वयाने वयस्कर वाटावी अशी दिसत होती. जवळजवळ पळतच ती माझयाजवळ आली. मी काही बोलण्याच्या अगोदरच ती म्हणाली, "सर मला ओळखलं नाही का ?" मी नकारार्थी मान हलवून नाही एवढंच उत्तर दिलं. ओळखीचा चेहरा वाटत होता, परंतु नाव व गाव लक्षात येत नव्हते. शेवटी तिनेच सांगितले "सर, मी वर्गात उशीरा येणारी आणि अर्धा तास आधीच जाणारी... " तिचे शब्द अर्धवट तोडत मला तिचे नाव आठवले आणि म्हटलो "तुझे नाव लक्ष्मी ना !" बरोबर, लगबग दहा-बारा वर्षानंतर तिची भेट झाली. तिची ती अवस्था पाहून तिला अनेक प्रश्न विचारून तिची माहिती काढली. मनोमन खुप दु:ख वाटलं. तेवढ्यात माझी बस आल्यामुळे मी तिचा निरोप घेतला आणि शाळेला जाणा-या बसमध्ये एका खिडकीपाशी येऊन बसलो.
बस वेगात धावत होती. अनेक लहान-मोठी झाडे त्याच वेगात मागे जात होती. माझे मन सुद्धा दहा-बारा वर्षापूर्वीच्या गावातील शाळेला जाऊन पोहोचले. गावात पहिली ते सातवी वर्गापर्यंतची सरकारी शाळा होती. गावात सर्वच जातीतील लोक समसमान अशी होती. परंतु हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक सधन होते. तर बाकी सर्व मजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटूंब होते. शाळेतील मुलांचा गणवेश, त्यांचे दप्तर, राहणीमान पाहून मनाला थोडं उत्साह आला. याठिकाणी काही तरी निर्माण करायचे आहे... या निश्चयाने सातव्या वर्गाची हजेरीपट घेवून वर्गात प्रवेश केलो. वर्गात एकूण वीस मुले, त्यापैकी आठ मुली होत्या. उपस्थिती ब-यापैकी. मुलांची हजेरी घ्यायला सुरूवात केली. एकानंतर एक हजरी देत होते. लक्ष्मी.... असे नाव उच्चारताच तिची मैत्रीण म्हणाली, सर ती येईल एवढ्यात. थोड्याच वेळानंतर ती आली. मी तिच्यावर रागावणार होतो, परंतु तिची अवस्था पाहून मला तिच्यावर कीव आली आणि वर्गात बसण्याची परवानगी दिलो.
गरगरीत गोल चेहरा, केस विस्कटलेले, अंगावर फाटलेले कपडे आणि घाईघाईत ती शाळेला आली आहे, असे वाटत होते. यापुढे उशिरा यायचे नाही अशी तंबी देऊन तिला वर्गात बसविले. वर्गातील मुलांची चाचणी घेऊन कोण कसा आहे? हे पाहण्यासाठी काही प्रश्न विचारले तेव्हा सर्वच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी तिचे हात वर होते. लक्ष्मी चुणचुणीत, चाणाक्ष व हुशार आहे, हे माझ्या बुद्धीने तेव्हाच हेरले. दुपार टळली होती, शाळा सुटायला जेमतेम अर्धा तास बाकी असतांना. ती दबक्या पावलांनी माझ्या जवळ आली आणि घरी जाण्याची परवानगी मागू लागली. हे असे तिचे रोजचेच होते, परंतु या गोष्टीचा छडा लावायचा या हेतूने एके दिवशी शाळेत लवकर आलो आणि सरळ लक्ष्मीचे घर गाठले.
मारूतीच्या पारासमोर असलेलं झोपडं म्हणजे लक्ष्मीचे घर. लक्ष्मी.... अशी हाक दिल्याबरोबर ती झोपडीच्या बाहेर आली. हात पिठाने माखलेले... ती भाकरी करीत होती. बाजूलाच तिचे दोन भावंडे खेळत होती. घरात दुसरे कोणी नव्हते. मी म्हटलं, लक्ष्मी, तुझे आई-बाबा कुठे आहेत ? यावर ती मनात दु:ख आवरून म्हणाली. गावच्या पाटलांच्या मळ्यात आई-बाबा मजुरी करतात. सकाळी लवकर मळ्यात जातात. शाळेची घंटा वाजल्यावर आई मळ्यातून येते आणि बाबांसाठी भाकरी घेऊन जाते, सोबत यांना पण नेते. तेव्हा मला कळाले की, लक्ष्मी ही शाळेत उशिरा का येते. घरातील झाडलोट, धुणीभांडी, स्वयंपाक हे सर्व तिलाच करावी लागत असे. घरच्या गरीब परिस्थितीमुळे तिच्या शिक्षणात अनेक संकटे येत होती. परंतु तिचा शिकण्याचा निर्धार पक्का होता. तिची खरीखुरी परिस्थिती सर्वांना कळाल्यावर वर्गातील सर्व मुले आणि शाळेतील शिक्षकांनी तिला सर्वतोपरी मदत करण्याचा ठाम निश्चय केला आणि शालेय गणवेश, काही वह्या, कंपासपेटी, दप्तर, पेना तिला मदत म्हणून दिल्या. खरोखरच ती खूप हुशार आणि एकपाठी होती. प्रथम सत्र परीक्षेत तिने प्रथम क्रमांक मिळविला होता.
दिवाळीच्या सुट्टया संपल्या आणि शाळेला सुरूवात झाली. सुट्ट्यानंतर शाळेचा पहिला दिवस. वर्गात जेमतेम मुले उपस्थित होती. वर्गात प्रवेश केला आणि हजेरी घ्यायला सुरूवात केली. एकानंतर एक मुले हजेरी देत होती. लक्ष्मी... नाव उच्चारताच मीच म्हटलं, येईल ती थोड्या वेळात. यावर तिची मैत्रीण म्हणाली, ती येणार नाही. तिच्या घरचे सर्व जण गेलेत, दुसरीकडे राहायला. मी म्हणालो, म्हणजे काय ? मुलांना काही माहित नव्हतं. म्हणून तिच्या व कुटुंबाविषयीची विचारणा गावातल्या मोठ्या लोकांशी केली असता गावच्या पाटलानं कामावरून कमी केल्यामुळे ते कामाच्या शोधात गेली आहेत. दुस-या गावाला अशी माहिती मिळाली. तसा मी हताश झालो. मनात वाटलं की, प्रजासत्ताक दिनी सा-या गावक-यासमक्ष तिचा सत्कार करावा आणि तिचं भविष्य घडवावं. परंतु नियतीला काही दुसरेच मान्य होते, सत्र संपले. तिच्या नावापुढे सतत अनुपस्थित असा शेरा मारून त्या वर्षांच्या सारी पानं बांधल्या गेली.
दहा-बारा वर्षानंतर आज तिची भेट झाली. त्यात तिच्या सोबत झालेल्या बातचितमूळे मन विषण्ण झालं. ती सांगत होती, त्या दिवशी पाटलांकडे बाबा दिवाळी खरेदीसाठी पैसा मागायला गेला होता. परंतु पाटलांनी पैसे देण्याऐवजी बाबांवर चोरीचा आळ ठेवून पंचायत बसविली आणि आमचं घर क्षणभरसुद्धा येथे थांबू नये असा पंचांनी निर्णय दिला. त्याच रात्री आम्ही तेथून निघालोत आणि मिळेल तिथं काम करून राहू लागलो. या रस्त्यावरच माझी सोयरिक झाली, लग्न झालं आणि मूलंही जन्मलं. सर, मला खूप शिकायचं होत पण... म्हणत ती डोळ्यातून पाणी आणू लागली. तिच्यासोबत माझेही डोळे पाणावले. ती फक्त नावाची लक्ष्मी होती. प्रत्यक्षात तिच्याकडे जर लक्ष्मी असती तर ती आज एका चांगल्या पदावर दिसली असती. आज देशात अश्या कित्येक लक्ष्मी गरीबी व दारिद्रयामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडतात. त्यांच्याजवळ असलेली बुद्धीमत्ता त्यांनाही वापरात येत नाही ना देशाच्या काही कामी येत नाही.
याच तंद्रीत माझ्या शाळेचे गाव आले. बसच्या घंटीने मी भानावर आलो. तसाच खाली उतरलो. शाळेत गेलो आणि चिमुरड्या त्या मुलांसोबत खेळण्यात रंगून गेलो.
नागोराव येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.
मतदान जनजागृती ( Voting Awarness )
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. चला मतदान करू .......! ...
-
दीपोत्सवाचा सण : दिवाळी दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळी सणाची आबालापासून वृध्दापर्यंत सर्वानाच चातक पक्ष्य...
-
संतुलित आहार - नागोराव सा. येवतीकर , मु. येवती ता. धर्माबाद अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा...
-
सूर्यमाला व त्यातील विविध ग्रहांची माहिती फोटोसह सूर्यमाला सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्य...