📚 साहित्य दर्पण Whatsapp ग्रुप 📰🖊
द्वारा आयोजित
🗽 साहित्य दरबार 🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
🚩भाग :- ( 14वा)- चौदावा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - _24/07/2016_
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★
*आंतर राष्ट्रिय पालक दिनानिमित्त*
††††††††††††††††††
========
*मी एक पालक*
_किंवा_
*पालक नव्हे मित्र बना...!*
==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.ना सा येवतीकर सर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री आप्पासाहेब सुरवसे
************************
💥 परीक्षक - *अनिल लांडगे सर*
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
जी पी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :-- *श्री .क्रांति बुद्धेवार सर, धर्माबाद*
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -
💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.
💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..
💥 या स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _25 जूलै 2016_ रोजी सायंकाळी 9:00 Pm वाजता मिळेल. त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...
📩 त्यासाठी .
🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....
👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973
👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769
👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702
=================================
[7/24, 10:51 AM]
👨👩👧 स्पर्धेसाठी 👨👩👧
मी एक पालक विषय म्हणजे आपल्या दैनंदिन घडामोडींपैकी अत्यंत महत्त्वाचा विषय . पालक आहे मी एकाच पाल्याची पण असे वाटते कि त्या एकट्यालाच अगदी चांगल्या प्रकारे शिक्षण आणि संस्कार देऊ शकले तर जिवन सार्थक होईल .
दिवस सुरु होताच प्रथम धावपळ असते ती डबा तयार करुन मुलाला तयार करुन त्याला पटकन शाळेत पोहोचवण्याची. मी सुद्धा त्याच्या सोबतच निघते , त्याच शाळेत मी शिक्षिका आहे . दोघं परत घरी येतो तेव्हा संध्याकाळ झालेली असते . मग मुलासाठी खायला काहीतरी बनवते तोपर्यंत तो फ्रेश वैगेरे होतो मग दोघं गृहपाठ करण्यासाठी बसतो. नंतरचा वेळ असतो त्याच्या खेळण्याचा.
रात्री माझे पति कामावरुन आल्यानंतर ते प्रयत्न करतात कि किमान अर्धा तास तरी मुलाशी गप्पा मारुन दिवसभरातील घडामोडींविषयी जाणुन घ्यावे .
अशा प्रकारे आम्हा दोघा पति पत्नी चा प्रयत्न असतो कि जास्तीत जास्त वेळ मुलाला द्यावा.
सहा वर्षांचा आहे तो फक्त आणि इतक्या लवकर कोणत्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत कि तो काय बनेल कारण असंख्य क्षेत्र उघडे आहेत आजच्या काळात आणि पर्याय त्याच्या हातात सोडलाय.
चांगले संस्कार देऊन चांगले व्यक्तीमत्व घडवण्याचा प्रयत्न मात्र सतत चालू आहे आणि राहिल.
योगिनी चॅटर्जी #52
======================================
[7/24, 1:50 PM]
स्पर्धेसाठी ---पालक नव्हे मित्र बना...!
बाप....
दिवस शनिवारचा, सकाळची शाळा. पहिले काही तास संपल्यानंतर शालेय पोषण आहार देण्याची वेळ.मीही थोडा नाश्ता करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे शालेय आवरातील विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत व्हरांड्यात उभा होतो.मुलेही आपले जेवण आटोपून स्वछंदपणे गप्पा मारणे,कोणी खेळ खेळणे तर कोणी नुसतेच उभे राहलेली.हे सर्व पाहत मी उभा होतो.गेल्या चार-पाच दिवसांत उसंत न घेतलेल्या पावसाने क्षणभर विश्रांती घेतली असता मैदानावर साचलेल्या पाण्यात उड्या मारताना काहीजण मला दिसत होते.पण त्यांच्या या बालआनंदात व्यत्यय आणण्यास माझे मन तयार नव्हते.इतक्यात एक मुलगा माझ्याजवळ आला नि त्यांच्या कृत्याची तक्रार नोंदवू लागला.आता याच्याही मनाचे समाधान करणे मला भाग होते.मग शिस्तीच्या नावाखाली मी त्या मुलांना उगाच रागवण्याचा अविर्भाव आणून तेथून हटकले.याक्षणी तक्रारदाराची आनंदी मुद्रा माझ्या नजरेआड झाली नाही. हे सर्व न्याहाळताना ,अनुभवताना तिसरीच्या वर्गातील एक विद्यार्थी माझ्याजवळ आला नि मला नुसतीच हाक देऊन गेला.त्याचा हा हाक मारण्याचा एपिसोड टि.व्ही.वरील मालिकांप्रमाणे रिपिट होत राहिला.त्याच्या प्रत्येक हाकेला मी ओ देत होतो.शेवटी न राहवून मी त्याला थोडा वैतागुनच विचारले,अरे!काय काम आहे?का उगाच सारखा बोलावत आहेस? मी काय कुठे पळून चाललो आहे की काय? एका दमात एवढं सारे बोलून झाल्यावर मला वाटले आता हा घाबरून वर्गात जाईल.पण या महाशयांनी माघार घेतलीच नाही.यापुढे तो मला म्हणाला ,मग शाळा सुटल्यावर जातासा की घरी.त्याच्या या बोलण्याचा मला राग आला पण त्याला आणखी बोलते करण्याच्या हेतूने मी राग मागे सारून त्याला विचारले,मग इथेच राहू का? नि मग मी जेवायचे कोठे? यावर तो उत्तरला राहा की इथे नि जेवा आमच्या घरी.या त्याच्या बालबुद्धिचे मला आता जरा जास्तच कुतूहल वाटायला लागले नि त्याला आणखी बोलते करायचे ठरवून मी त्याला म्हणालो,अरे! माझ्या घरचे माझी वाट पाहतील की! त्यांच्याकडे नको का जायला मला? या माझ्या प्रश्नावरही त्याने उपाय शोधून ठेवलेला होताच.जावा की शनिवारी आणि रविवारी परत या सोमवारी.
आता मात्र मला त्याच्या जाणतेपणाची जाणीव व्हायला लागली होती.सध्याची पिढी कशात मागे राहू शकत नाही याचा प्रत्यय मला येत होता.मी त्याच्याकडून क्लीन बोल्ड होण्याच्याच मार्गावर होतो.तरीही मी माझी विकेट सहजासहजी गमवायची नाही ठरवलेलं.याच निग्रहानं मी त्याला विचारले,तुला चालतं का तुझे बाबा तुझ्याजवळ नसलेले? करमत का तुला त्यांच्याशिवाय? आता आपण याला षटकार खेचला आहे ही माझी अहंमिक भावना.पण त्याने यापुढे टाकलेल्या याँर्कर चेंडूने मात्र माझ्यातील गुरूजी नि बाप दोघांची विकेट काढली.
तो तिसरीच्या वयोगटातील विद्यार्थी.जेमतेम नऊ वर्षे वयाचा.या वयात मानसशास्त्रीय दृष्टिने विचार करता मुलांना भावनिक,शारीरिक सुरक्षितता महत्वाची असते.ही सुरक्षितता त्याला सर्वप्रथम त्याच्या आई-वडील नि कुटुंबातील इतर सदस्यांकडून असते.त्याचे त्याच्या कुटुंबातील प्रत्येक घटकाशी अतूट नाते असते.असे नाते की ज्याच्या आधारावर तो आपल्या आयुष्याची शिडी बळकट करत असतो.नि या भक्कम पाय-यांवर स्वार होत तो आयुष्यातील अनेक आव्हाने पेलत यशशिखर गाठतो.हा सर्व तर्क या विद्यार्थ्याच्या उत्तराने पूर्णत: निष्क्रिय केला असे मला वाटते.तो विद्यार्थी म्हणाला ,करमतय की.पप्पा नसले म्हणून काय झाले.मम्मी आहे की घरी.
मी क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहीलो नि शेवटी माझा झालेला पराजय मला आवडेना म्हणून मग मी त्याच्यावर चिडून त्याला वर्गात जाण्यास सांगितले. बाप.......
मुलगा वर्गात निघून गेल्यावर माझे पुढे कशातच मन लागेना.पप्पा नसले म्हणून काय झाले.मम्मी आहे की घरी.त्याच्या या वाक्याने माझ्यातील बापपणाला पुरते विचारमग्न केले होते.याच नव्हे तर बालवयातील नि युवावस्थेतील मुलांच्या मनात 'बाप' कसा असेल?त्यांच्या जीवनात बापाचे स्थान काय असावे? आई इतकाच जिव्हाळा,ओढ,माया बापाबद्दल मुलाच्या मनात असते का? या मुलाने असे का म्हटले असावे? बाप यांत कुठे नि का कमी पडतो?या प्रश्नांचे विचारचक्रच माझ्या मनात घुमू लागले.
प्रत्येक मुलाच्या जीवनात त्याच्या आईचे अनन्यसाधारण असेच महत्त्व आहे.'आई माझा गुरू,आई कल्पतरू ,सौख्याचा सागरु,आई माझी' या श्लोकातून आईचे जीवनातील स्थान अधोरेखीत होते.पण आई प्रमाणेच मुलाच्या जीवनप्रवासात बापदेखील तितकाच महत्त्वपूर्ण असतो.पण या मुलाच्या या वक्तव्याने मात्र बापाचे सध्याच्या मुलांच्या मनातील स्थान काय असावे हे विचारधीन झाले. बाप हा केवळ भौतिक सुखसोयी करून देणारा,कुटुंबाच्या गरजा भागवणारा घटक असेच का त्याचे नाते असते.केवळ बापच कमविता असेल तर त्या घरातील मुलांचे ऋणानुबंध आईशी जसे जुळलेले असतात तसे ते बापाशी जुळत नसावेत का? कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वाधिक वेळ कुटुंबातून बाहेर राहिल्याने व त्यात भर म्हणून मुलांचे संगोपन या संकल्पनेत डोकावलेला पुरषी अहंकार या कारणांनी या बापाचे मुलाशी इतके घट्ट नाते तयार होत नसावे जितके मुलाचे त्याच्या नित्य सहवासात असलेल्या त्याच्या आईशी असते.क्षणभर डॉ.सलील कुलकर्णी यांनी गायलेले 'कोमेजून निजलेली एक परीराणी.... या गीताच्या ओळी कानावर गुंजन करु लागल्या नि मन घरातील माझ्या मुलांकडे धाव घेऊ लागले.पण शाळा सुटायला अजून तासभर वेळ होता.'Emotions are not great than our duty' या सुवचनाचीही आठवण याक्षणी मनात होती.शेवटी मी माझी कर्तव्यपुर्तता करून शाळा सुटल्यावर घरी मार्गस्थ झालो.घरी पोहचल्यावर आजच्या उर्वरित दिवसातील बहुतेक वेळ मी माझ्या ऊर्जास्रोत असणा-या मुलांच्यासोबत व्यतीत केला. तसे मी नेहमीच दिवसातील अधिक वेळ माझ्या दोन्ही मुलांच्या सोबत घालवतो.आई इतका किंबहुना थोडा जास्तच माझा सहवास माझ्या या दोन्ही बालवयातील मुलांना हवा असतो.
जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करताना आजच्या या धावपळीच्या युगातही आपल्या मुलांचे पालकत्व आईच्याच ममतेने बापाने जोपासावे असे मला मनोमन वाटते .मुलांना त्यांचा बाप आई इतकाच हवाहवासा वाटावा यासाठी प्रत्येक बापाने आपल्या मनात माऊलीची स्थापना करायला काय हरकत आहे. असे घडले तर भविष्यात 'आई-बाबा माझे गुरू,आई-बाबा कल्पतरु,सौख्याचा सागरू आई- बाबा माझे' असाही श्लोक मुलांच्या ओठी येईल ना!
यापुढे जाऊन ज्या घरात भौतिक सुखप्राप्ती करिता धावणा-या बापाच्या जोडीला मुलाची आईदेखील घराबाहेर पडून धावत आहे त्या घरातील मुलाचे मन कोणाला शोधत असेल हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न अनुत्तरितच राहतोय.
---- समाप्त.
-----सुवर्णविलास------
========================================
. . . . . . लेख : पितृदेवो भव . . . .
मानवी जीवनात आई-वडील हे दोन्ही महत्त्वाचे आहेत; परंतु वडिलांपेक्षा आपण सर्वच जण आईला सर्वात जास्त महत्त्व देतो. कारण आई ही प्रत्येक मुलाला आपल्या उदरात नऊ महिने नऊ दिवस अतिशय काळजीपूर्वक सांभाळ करते.
गर्भात जुळलेली नाळ आयुष्यभर टिकून राहते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिचा आणि मुलाचा जिव्हाळय़ाचा, प्रेमाचा संबंध असतो.आई ही प्रेमळ, मायाळू आणि मुलांना समजून घेणारी असते तर याउलट वडील हे कठोर, कडक, शिक्षा करणारे आणि मुलांना न समजून घेणारे असतात, असे जनमाणसात आई-वडिलांविषयी बोलल्या जाते. परंतु खरोखरच प्रत्येक वडील एवढा कठोर किंवा निष्ठूर असतो का? साहित्याच्या क्षेत्रातसुद्धा आईवर बर्याच साहित्यिकांनी विपुल लेखन केलेले आढळून येते. मात्र त्या प्रमाणात वडिलांवर आधारित लिहिलेले साहित्य फार कमी म्हणण्यापेक्षा नगण्यच आहे. मराठवाड्यातील कवी इंद्रजित भालेराव यांनी 'बाप' या कवितेद्वारे समाजातल्या वडील मंडळींना एक प्रकारे न्याय मिळवून दिला आहे.
घरकाम करणारी व सतत मुलांच्या सहवासात राहणारी ती म्हणजे आई. त्यामुळे त्यांच्यात जवळीकता निर्माण होते आणि ते आईसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतात. तर वडील मात्र कामाच्या निमित्ताने नेहमी घराबाहेरच राहतात. त्यांचा सहवास मुलांना फार कमी मिळतो.
त्यास्तव मुले आणि वडील यांच्यात जवळीकता निर्माण होत नाही. त्यामुळे मुले वडिलांना थोडशे घाबरतात. वडील हे घराचे कर्ते, सवरते, त्यास्तव घरातील विविध जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नेहमी विचार प्रक्रिया चालूच ठेवावी लागते. कधी कधी बाहेरील कामाचा ताण किंवा आर्थिक बाबींची समस्या त्यांच्या डोक्यावर नेहमीच जाणवत असते. त्यास्तव वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचे प्रकार वडिलांकडून प्रत्येक घरात होऊ शकते यात शंका नाही. त्याचे परिणाम लहान मुलांवर होतात. बालपणापासून रागात वा संतापात पाहिलेल्या वडिलांची प्रतिमा नेहमीसाठी त्यांच्या स्मरणात राहते. त्यामुळे ती मुले वडिलांसमोर बोलण्यासाठी घाबरतात, भितात किंवा कचरतात.
भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. येथे घरातील सर्व लहान-मोठे काम स्त्रियांनी करायचे आणि घराबाहेरील कामे पुरुषांनी करायची अशी प्रथा आहे. (सध्याच्या काळात यात हळूहळू बदल होत आहे ते चांगले आहे की वाईट ते येणारा काळच ठरवेल.) पुरुषांची सर्व कामे फारच जबाबदारीची, त्यामुळे ती पेलताना पुरुष म्हणजे घरातील वडील नेहमीच तणावात दिसून येतो. त्याचाच परिणाम त्यांच्या वागण्या-बोलण्यावर होत असतो. म्हणूनच आज समाजात आईला जेवढे मोठे स्थान मिळाले तेवढे मोठे स्थान वडिलांना मिळत नाही. मात्र ते स्थान प्राप्त करणे फार जिकरीचे वा कठीण काम नाही. त्यासाठी प्रत्येक वडिलांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आईकडून मुलांना कौटुंबिक संस्कार मिळतात तर सामाजिक संस्कार वडिलांकडून मिळतात. प्रत्येक मुलावर वडिलांचे अनुवंषिक गुणधर्म फार मोठय़ा प्रमाणात संक्रमित होतात. प्रत्येकजण आपल्या वडिलांसारखा नाव कमावण्याची इच्छा बाळगतो. समाजात वडिलांची प्रतिमा चांगली किंवा वाईट अशी असेल त्याच पद्धतीवर मूल चालते. तेव्हा समाज सहज बोलून जातो की, हा तर आपल्या बापाच्या चालीवर गेला आहे. आपल्या मुलांना समाजात चांगली जागा मिळावी, इज्जत मिळावी, लोक त्यांना मान द्यावे असे वाटत असेल तर प्रत्येक वडिलांनी समाजात चांगले वागण्याचे ध्यानात घ्यावे.
आपली इतरांशी वागणूक चांगली ठेवावी. खोटे बोलून कोणाला फसवू नये, प्रत्येकाशी प्रेमाने व सौजन्याने वागावे. वाईट व्यसनांची सवय ठेवू नये. आपल्या वाईट सवयी हळूहळू आपले मूल विशेषकरून मुलगा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. दारू पिणे, तंबाखू खाणे, पत्ते खेळणे, विडी वा सिगारेट पिणे, रिकामटेकडे राहून गप्पा मारणे इत्यादी वाईट सवयी लहानपणापासून बघत आल्याने त्याच्या मनात त्याविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी आकर्षण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अजून एक नुकसान संभवू शकते. घरात व्यसनी लोकांचे काहीच स्थान नसते, बोलणे कोणी ऐकत नाही आणि स्वाभिमान संपतो. दुसर्याला उपदेश करूच शकत नाही. 'मी सांगतो लोकाला शेंबूड माझ्या नाकाला' उक्तीप्रमाणे वागणे निश्चित जमणार नाही.
मुलांवर योग्य संस्कार टाकण्याची फार मोठी जबाबदारी वडिलांवर आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्याच्या वेळापर्यंत वडिलांच्या सर्वच वागणुकीची आणि वर्तणुकीची मुले अगदी बारकाईने निरीक्षण करतात. एखाद्या टीप कागदाप्रमाणे आपल्या वर्तनाचे ते अनुकरण करतात. हे प्रत्येक वडिलांनी ध्यानात घेऊन पाऊल टाकल्यास आपले नावसुद्धा नक्कीच उज्ज्वल होईल. माझे घरात कोणीच ऐकत नाही, मानीत नाही अशी तक्रार करणार्या वडिलांनी सर्वप्रथम स्वत:चे आत्मपरीक्षण करून आपल्या अंगी असलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच मानाचे स्थान मिळू शकेल.
वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी आणि समाजात वडिलांचे असलेले प्रतिबिंब बदलावयाला हवे. सार्याच वडिलांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागे करून जीवन जगल्यास आणि मुलांसमोर चांगले वर्तन ठेवल्यास आईला जसे प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू ही उपाधी मिळाली तशीच उपाधी वडिलांनाही मिळू शकते. प्रत्येक अपत्याने वडिलांच्या अस्मितेला धक्का लागणार नाही असे जीवन जगणे आवश्यक आहे.
नागोराव सा.येवतीकर
मु. येवती, ता. धर्माबाद (९४२३६२५७६९)
==========================================
[7/24, 2:28 PM] +91 95529 80089:
स्पर्धेसाठी.....
आजची पिढी प्रत्येक क्षेत्रात ' फाॅरवर्ड' होत आहे,तसेच पालकाला मित्राची भुमिका बजावुन मुलाला यशाच्या गगनात उत्तुंग भरारी मारण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास व शिक्षणरुपी पंखांना बळकटी देण्यासोबतच संस्कार , वागणे , अभ्यास ,शिस्त ,मोठ्यांचा आदर ,जगण्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन या सर्वांचा पाया पक्का करण्यासाठी त्याचे बालपणात बिजारोपण होणे आवश्यक आहे.
मुलांच्या भविष्याचा मार्ग अधिक उज्वल होण्यासाठी ' एक कदम हम चले एक कदम तुम चलो ' असे म्हणण्यापेक्षा पालक व मुलाने मित्राप्रमाणे 'साथ-साथ' मिळुन संस्कारीत मुलगा घडविला गेला पाहीजे.
'गहणा कर्मस्य गती ' अर्थात वाईट कर्मामुळे मरण बिघडते तर चांगल्या कर्मामुळे सुधारते त्या प्रमाणे मुलांचे आयुष्य सुधारण्यासाठी मित्राप्रमाणे मुलांना समजुन घेण्याची गरज आहे.मुलांचे मित्र मोबाईल व त्यांच्यातील विविध 'गेम्स 'होतील व त्यांचे कौतुक करण्याऐवजी चिंता करण्याची वेळ येण्या अगोदर व मुलगा एक्कलकोंडा होऊन आपला मुलगा जगाशी जवळ येतांनासुद्घा दूर जाऊ नये या करीता मुलाचा आपणमित्र होऊन त्याचे आपल्या बरोबर संस्कारासोबत ,शिस्तसोबत,यशासोबत,नाते अधिक दृढ, घट्ट बनवु शकेल.
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65
=======================================
[7/24, 4:16 PM] +91 98603 14260:
स्पर्धेसाठी लेख
******************
पालक नव्हे ;मित्र बना
********************
आई माझा गुरु
आई कल्पतरु
सौख्याचा सागरु
आई माझी
साने गुरुजींच्या या ओळी
किती सार्थ आहे मुलांच्या जीवनात मातापित्याचे स्थान मोठे आहे आई सुसंस्कार घडवते .चालायला बोलायला शिकविते.
वडील कमावून आणताता प्रृपंचाचा भार वहातात कुटुंबासाठी झटतात.आईवडील प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करुन मुलांच्या हौसमौजेकडे लक्ष देतात त्यांचे कोडकौतूक करतात.
आजचे आईवडील नोकरी करतात मुले पाळणाघरात वाढतात हम दो हमारा एक यामुळे त्यांना शेअरींग काय असते हे समजत नाही दुस-यासाठी काही करायचे असते हे कळत नाही मी माझे ही भावना वाढीस लागते
यासाठी मुलांना लहान
वयातच वळण लावणे महत्वाचे ठरते
आजची पिढी अत्यंत बुध्दीमान आहे मुले अनुकरण प्रिय असतात मोठे वागतात त्याःचेच ते अनुकरण करतात यासाठी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे स्वयंशिस्तीची गरज आहे. मुलांचे लाड करावेत पण फाजिल लाड नकोत.त्यांना" नाही "हा शब्द ऐकण्याचीही सवय लावली पाहिजे,
मुलांशी मैत्री केली पाहिजे त्यांना आईवडीलांशी मनमोकळेपणाने संवाद साधता आला पाहिजे असे मोकळे वातावरण मैत्रीपूर्ण वातावरण घरात आसले पाहिजे
शैशव, पौगंडालस्था तारुण्य प्रोढपण जरापण या मानवी आयुष्याच्या अवस्था आहेत मुलांना शैशवावस्थेत लाड प्रेम करावेत पण शिस्तही हवी स्वावलंबन शिकवावे
पौगंडावस्थेत तर मुलांचे मन फार जपले पाहिजे त्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत ते कसे आहेत याकडे लक्ष द्यायला हवे हे मुलांशी सुसंवाद करुनच शक्य आहे
काय चांगले काय वाईट याची त्यांना जाणीव करुन दिली पाहिजे आजचा विद्यार्थी शिक्षणाच्या ओझ्याखाली दबून गेलाय स्पर्धेच्या युगात टिकून रहावे यासाठी ट्यूशन शाळा हाँबीज यात तो भरडून निघतोय काही काही घरातून मुलांवर तू डाँक्टरच हो अमुकच हो अशी पालकांची इच्छा असते मुलाचाकल वेगळाच असतो अशावेळी त्याला अपयश येते मग त्याला आईवडीलांची भिती वाटते तो आत्महात्या करतो घर सोडून जातो मित्रमंडळीत रमतो घराचे घरपण हरवून जाते यासाठी पालकांनी प्रथम मुलांचा मित्र बनले पाहिजे त्याचे विचार त्याचा कल जाणून घेतला पाहिजे त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे
पैशाने सारे विकत घेता येत नाही मुलांना आपला विश्वास वाटला पाहिजे यासाठी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे चांगल्या वाईटाची जाण दिली पाहिजे .
मुलांर माया प्रेम करा गोडी गुलाबुने समजावून सांगा मुलांचे मित्र बना
माझ्या घरचेच उदाहरण देते आम्ही दोघेही नोकरी करत होतो मी रेल्वेत होते मुलीच्या जन्मानंतर मुमी नोकरी सोडली कारण पाळणाघरात आम्हाला तिला ठेवायचे नव्हते घरी सांभाळणारे कुणी नव्हते मग मी घरी राहिले तिचा आभ्यास संस्कार याकडे लक्ष दिले नंतर मुलगा झाला तो शाळेत जाऊ लागल्यावर पार्टटाईम नोकरी धरली मुलांवर योग्य ते संस्कार आम्ही दोघांनीही केले .
मुलगी इंजिनिआर झाली परदेशात गेली पण आपले संस्कार टिकवून आहे मुलगा mbaकरतोय दोन्ही मुले गुणी आहेत आम्हाला फार जपतात माझ्या मिस्टरांच्या आजारपणात मुलाने आपृले करियर सोडले पण त्यांची सेवा केली नुकतेच ते गेले
मुलीने आम्हाला तिच्याबरोबर परदेशात नेले आम्ही एकमेकांना साथ देत आहोत मुलीच्या मुलाच्या आवाजात जरी बदल झाला तरी मला समजते इतके आम्ही एकरुप आहोत
माझ्या डोळ्यांचे आँपरेशन झाले तर मुलाने स्वतः स्वयंपाकही केला मला गँसजवळ जाऊ दिले नाही मुलीला रजा नाही मिळाली पण आर्थिक भार ती सांभाळते मला आमच्या दोन्ही मुलांचा आभिमान आहे मी आई असले तरी आता बाबाःचीही भूमिका मलाच पार पाडायचीय पण त्या आधी मी माझ्या मुलांची मैत्रिण आहे मुले माझ्याशी सर्व स्तरावर चर्चा करु शकतात हेच माझ्यासाठी महत्वाचे .
प्राची देशपांडे
==============================
[7/24, 4:21 PM] +91 75882 07368:
🍂साहित्य दरबार🍂
👬भाग--१४वा👬
*पालक नव्हे मिञ बना*
प्रसिद्ध तत्ववेत्ता खलिल जिब्राल यांनी म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. ते म्हणतात, " मुले तुमच्या पोटातून आलेली असतात पण ती स्वतंत्र. व्यक्तीमत्वे असतात. ती पूर्णपने तुम्हांला पाहिजे तशी तयार होऊ शकत नाहीत.
मी त्यांच्या या विचाराशी सहमत आहे पालकांनी मुलांचे मिञ व्हावे. मुलावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करू नये. उदा.खेळात, नाचात, परिक्षेत. तू उत्तम प्रावीण्य मिळवले पाहिजे तू डॅाक्टर किंवा इंजिनियर झालाच पाहिजे अशाने काय होते एखाद्या मुलाला या पेक्षाही दुस-या गोष्टीची आवड असते पण पालकाच्या इच्छेसाठी तो त्याच्या मताला मान्यता देऊन प्रयत्न्याला लागतो पण काय होते त्याच्या आवडीचा जर विषय त्याला मिळाला तर तो मनापासून आनंदाने त्यात उत्तमच प्रगती करून यश संपादन करू शकतो पालकांनी जो विषय सांगितला त्यात त्याला आवड नसलीतर तो प्रयत्न जरूर. करतो त्याचे पालक सुद्धा त्याला चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून महागडे क्लासेस पण लावतात पण त्याला त्याचा विशेष फायदा होत नाही. कष्ट करून मेहनत करून अपेक्षित फळ मिळत नाही. यामुळे काय होते तो मानसिक द्रष्ट्या खचतो व यश न मिळाल्यामुळे पालकसुद्धा नाराज होतात. याचा परीणाम दोघात मतभेद होतात पाहिजे ते साध्य. होत नाही याचे कारण म्हणजे फक्त जबरदस्ती. माझ्या मुलाने हेच बनले पाहिजे. मी म्हणतो तसेच केले पाहिले याचे परिणाम भयंकर गंभीर. होतात.
दुसरा मुद्दा असा की पालकांना वाटते महागडया शाळा, क्लासेस म्हणजे उच्च दर्जाचे शिक्षण, पण हे अत्यंत चूकिचे आहे. शाळेतील मुलांच्या, शिक्षकाच्या राहणीमानाचा मोठया इमारतीचा शिक्षणाशी काहीही संबंध नसतो. पालकांनी एवढेच पाहिले पाहिजे तिथल्या शिक्षणाचा दर्जा काय, तेथील. शिक्षक किती योग्यतेचे आहेत आपल्या मुलासाठी.
मला एक विनोद आठवतो:😀😃
नविन प्रवेशासाठी मुला्ला गेऊन गेलेल्या पालकांना मुख्याध्यापक म्हणतात
मुख्याध्यापक. : "हे बघा, तुम्हांला शाळेत पुस्तके, वह्या, गणवेष,बूट, मोजे. कम्पास, रंग,टिफीन बॅाक्स हे सर्व शाळेतूनच घ्यावे लागेल."
पालक. :(हळू आवाजात) शिक्षण....
मुख्याध्यापक. : " ते माञ तुम्हाला बाहेरून खाजगी क्लासेस मधून घ्यावे लागेल."
😜😀😃
या वरून मला एवढेच सूचवायचे आहे की, पूर्ण विचार करून अनुभव घेऊन या गोष्टींचा निर्णय घ्यावा. यामुळे पालक व मुलगा या दोघांची होणारी पिळवणूक थांबवली जाईल.
आता माझा स्वतःचा अनुभव सांगते. आम्हाला दोन मुले, माझे पती नेञचिकीत्सा अधिकारी त्यांची बदली जव्हार, नंदुरबार, अक्कलकूवा अशा आदिवाशी भागात होती. यामुळे मुलांना नाविलाजाने जि.प. शाळेत घालावे लागले. त्याचा त्यांच्या अभ्यासावर काही फरक पडला नाही.
आज माझा मोठा मुलगा निनाद B.E.इंजिनियर आहे. बेंगलुरू येथे डेल्फी कंपनीत काम करत आहे. लहाना तेजस M.B.B.S. आहे. ऒरंगाबाद घाटी रूग्णालयात ईन्टर्नशिप करत आहे. आम्हीै मुलांना कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही म्हणून मिळालेले हे उत्त्तम फळ.
अजून एक स्वामी विवेकानंदांचा किस्सा आठवला एक मुलगा खूप गोड खात होता. तेवढे गोड खाणे त्याच्यासाठी योग्य नव्हते तो मुलगा विवेकानंदाचा खूप आदर करत होता. आईने प्रयत्न. करून थकल्यावर ती त्याला स्वामी कडे घेऊन अाली व म्हणाली हा खूप गोड खातो माझे ऎकत नाही, तुम्ही सांगा तो तुमचे नक्की एकेक. स्वामी म्हणाले आठ दिवसानंतर या. अाई आठ दिवसानी परत आली तेव्हा विवेकानंदानी मुलाला गोड खाऊ नको असे सांगितले. काही दिवसानंतर विवेकानंदानी आईला विचारले मुलाने गोड खाणे सोडले का, आई म्हणाली हो, पण ही गोष्ट तेव्हाच का नाही सांगितलीे आठ दिवस वाया गेले. ते म्हणाले मी स्वतः आठ दिवस साखर सोडली नंतर त्याला सांगितले मी जी गोष्ट स्वतः करतो ती समोरच्याला सोड असे कसे सांगू. एवढा बोध घ्यावा की पालकांनी नुसता उपदेश करण्यापेक्षा क्रुती करून दाखवावी
@४९ नलिनी वांगीकर (सायली)
=================================
[7/24, 4:29 PM] Subhadra Sanap:
स्पर्धेसाठी पालक नव्हे मित्र बना
➖➖➖➖➖➖➖➖➖
आजचा विषय सध्याच्या परिस्थितीत गंभिरविषय आहे आणी याचा आपणच विचार करायची गरज आहे खरतर मूल हे आईच्या गर्भातच शिकत असते नऊ महिने आई कशी रहाते काय करते याचा परिणाम बालकावर होतो क्षमा मागुन सांगते आजकाल गरोदर पणा हा एक आजार म्हणुन महिला वागतात जरा कणखर राहिलात तर बरेचसे प्रॉब्लेम दुर होतील
आईवडील दोघेही नोकरीला असतील तर मुल ही एकाकी होतात मुल्यशिक्षण हे घरातुनच मिळत असते खेळण्याबागडण्याच्या वयात मुलं तासनतास टि व्ही समोरुन उठत नाहीत लहाऩ असतांना आईला वाटते बरं नादी लागलय कार्टुन बघतय पण तेच मुल ह्या टि व्ही समोरुन उठत नाहीत याचे वाईट परिणाम होतात
पुर्वी एकत्र कुटुंब असायची घरात आजी आजोबा काका काकु आत्या पै पाहुना यानी घर भरलेल असायच संस्कार म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही तर ते कृतीतुन द्यायचे असतात पण आता या बाबी राहिल्या नाहित हम दो हमारे दो या चौकोनी कुटुंबात पाचव्याला जागाच नाही याचा परिणाम असंस्कारी पिढी घडवण्यासाठी होत आहे आणी याचा परिणाम बालकावर होतो आईवडीलांचे अनुकरन मुले करत असतात याचा गांभिर्याने विचार करायची गरज आहे आईवडीलांनी मुलांचे मित्र बना त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करा चुकीच्या बाबीवर पांघरुन न घालता त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करावा तसे मुलांचा कल ओळखुन त्यांना शिक्षण द्यावं प्रत्येक पालकाला वाटत आपला पाल्य हा डॉक्टर इंजिनिअर व्हावा पण मुलावरील अती दडपणापोटी मुले वाया जातात याचाही विचार करावा
काल एक बातमी वाचण्यात आली एका करोडपती हिरे व्यापार्याने मुलाला काही ठरावीक पैसे देऊन व्यवहाराचा अनुभव घेण्यासाठी बाहेर पाठवल पैसा कमवन किती अवघड आहे हे कळाल्यानंतरच त्याला पैशाचे मोल कळनार आहे आपनही मुलांच्या चैनीच्या गरजा पुर्ण करण्यासाठी थोडे बंधन घातले पाहिजेत अस मला वाटत
याप्रसंगी एक उदाहरण सांगते एका व्यक्तीने काही अंडी उबवायला ठेवली होतीकोंबडी ती उबवत होतीअचानक त्याचा एक मित्र आला आणी म्हणाला या अंड्यामधुन पिलु बाहेर येण्याची किती दिवस वाट पहायची आन ती अंडी इकडे बघ मी कस लवकर त्या पिलांना बाहेर काढतोय अन् त्याने एकएक अंड फोडायला सुरवात केली अगोदरच उबवलेली अंडी होती त्यातुन पिल बाहेर आली पण काही वेळातच ती गतप्रान झाली सांगायचा उद्देश हाच की वेळ येवुद्या सगळ व्यवस्थित होईल
खेडकर सुभद्रा बीड (२०) मो नं (९४०३५९३७६४)
==================================
==================================
[7/24, 4:53 PM]
📚 *साहित्य दर्पण* 📚
💥_द्वारा आयोजित_💥
🗽 *~साहित्य दरबार~* 🗽
*विषय :-एक जागरूक पालक*
आज प्रत्येक दिवस आपले विशेष महत्व घेवून उगवतो आणि मावळतो . सोबतच त्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण घडमोडीची छाप पाडून आपल्या वेळेचा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मग ते कु-क्षेत्रात असेल किंवा सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहावा असे असते. कारण आपण शाळा आणि एकूणच सर्व क्षेत्रात दिनविशेष म्हणून साजरे करत असतो . ज्याप्रमाणे स्वातंत्र्य दिन ,प्रजासत्ताक दिन , शिक्षक दिन ,बालक दिन आपण साजरे करतो पण आत्तापर्यंत मला तरी आठवत नाही की विविध क्षेत्रात *पालक दिन* साजरा केलेला आहे.आणि म्हणून हा आज आंतरराष्ट्रिय पालक दिन हा खऱ्या अर्थाने जुलै महिण्याच्या चौथ्या रविवारी साजरा केला जातो. खरोखरच एक विद्यार्थी म्हणून नव्हे तर एक भारताचे भावी आधारस्तंभ नव्हे तर एक नागरिक म्हणून म्हणून घडवण्यात पालकांचा गुरु पेक्षा ही मोठा वाटा असतो हे या ठिकाणी अधोरेखित करावे लागेल.
आणि म्हणून पालकांचा हा मोठा वर्ग आपल्या मुलावर बाळकडू देत असतो नव्हे संस्कारक्षम बनवण्याचा ज्ञानामृत प्राशन करण्यास देत असतो आणि म्हणून पालक खरा गुरु आणि मार्गदर्शक असतात. याशिवाय जो पर्यंत आजच्या या अति सुपर वेगवान युगात पालक हा त्यांच्या पाल्यांचा मित्र बनणार नाही तो पर्यंत माणुसकीच्या जीवनाची चावी आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आजचा पालक केवळ पोलिस प्रशासनाचा एक भाग म्हणून आपल्या पाल्यांना हे करू नको , ते करू नको याचे उपदेश - सल्ले देत असतो. पण असे न होता पालकांनी अक्षरशः आपल्या पाल्यांचा *मितवा* म्हणून जेंव्हा एकरूप म्हणून होईल तेंव्हा खऱ्या अर्थाने आदर्श पालक म्हणून जगापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करायला हवा. कारण आज जे विद्यार्थी यशाच्या उंच शिखरावर विराजमान झालेले असतात ते नक्कीच त्यांच्या पालकांच्या आदर्शवत वागण्यामुळेच असतात.
*मितवा म्हणजे मित्र ,तत्वज्ञ आणि वाटाड्या -गुरु आणि मार्गदर्शक*
केवळ बापाने घरात येताच हुकुमशाही हिटलरची नीती वागणूक आजच्या काळात कितपत योग्य आहे हे प्रत्येक बाप या नात्याने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे .आणि म्हणून केवळ आदेश आणि सुचना किंवा प्रत्येक बाबतीत नकारत्मक टिका टिप्पणी करता कामा नये .यातून आपण कसे त्यांच्या नजरेतून त्यांच्या बालमनाच्या चित्रपटात खलनायक असतात. यासोबतच त्यांची वृत्ती ही कळत नकळत गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत नाही ना याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपले विचार सकारात्मक ठेवल्याने आपल्या घरात प्रेम , जिव्हाळा आणि आपुलकी सोबतच एक नात्यांची वीन गुंफली जावी यातून हे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते.
_आई हे घरातले चालते बोलते *विद्यापीठ* असते हे या पालक या नात्यातील विसरून चालणार नाही . आई म्हणजे सर्व काही आहे . आज आई या पालक नात्यात अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले नाव आहे_ . _आई शिवाय पाल्य पोरका असतोच असतो .आई ची शिकवण ही केवळ निःस्वार्थी भावनेतुन कायम अविरत करत असते.केवळ आणि केवळ जगात हेच एक असे न्यायालय आहे की तिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि विजयी यश यांची किंमत ही आंनदा अश्रुच्या रुपात अनमोल रुपात की ज्याचे मोल होवू शकत नाही._ असे *आसु* हे जगाच्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याच मापने मोजता येत नाही हे मात्र सूर्य प्रकाशाइतके सत्य चमकल्याशिवाय राहत नाही . आज तरी त्याला तोड़ नाही. मग पालक हे अडाणी असोत की उच्च शिक्षित असोत .पालक हा पालक असतो . _घर हे घर असते त्या घरात *घरपण* असेल तर त्या घराला अर्थ म्हणजे पैसा स्वरुपात नव्हे तर एक प्रेम आपुलकी , जिव्हाळा आणि नात्यांची घट्ट पायाभरणी इमारती उंच च उंच आपोआप तयार होतील यात काही शंका नाही. केवळ उंच फ्लॅट आणि झोपडी यातील साम्य म्हणजे आई हे एक विद्यापीठ आहे हे सत्य या ठिकाणी नाकारुन चालणार नाही._
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री .आप्पासाहेब सुरवसे*
~_लाखणगांवकर_~
_AMKSLWOMIAW_
*🌹AK47🔫*
===============================
[7/24, 5:01 PM] Sangita deshamukh Vasmat:
*आंतरराष्ट्रीय पालकदिनाच्या निमीत्ताने*
काही दिवसापूर्वी जवळच्याच शहरामध्ये एका सुशिक्षित कुटुंबातील मुलाने आपल्याच आईच्या हत्येची सुपारी मित्राना देऊन हत्या घडवून आणली होती. अशा एक नाही अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. अशा असंवेदनशील घटना दररोज वर्तमानपत्रात वाचून वाचून आपली मनेही आता बोथट होऊ लागली आहेत. अशा घटना घडण्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला की,लक्षात येते आजच्या पालकांची बदलत गेलेली भूमिका!
आजच्या चौकोनी कुटुंबात आईवडील हे दोघेही अर्थाजर्नासाठी बाहेर पडतात. या बाहेर पडण्यामुळे आईवडील व लेकरांचा संबंध हा फार कमी होत आहे. आईच्या पदराखाली लेकरू सुरक्षित असते,ही भावना कालबाह्य होऊन आईवडिलांजवळ लेकराना धाकच रहात नाही,अशी भावना प्रबळ होऊ लागली आहे. पण आजच्या पालकाना हेच कळत नाही,प्रेमात लेकरांची वाढ ही सकस आणि निकोप होत असते. आणि म्हणूनच आजचे पालक त्यांच्या मुलाना त्यांच्यापासून जेवढे दूर व जेवढे व्यस्त ठेवता येईल तेवढे व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. वयाच्या अडीच वर्षापासून मुले नर्सरी,प्ले गृपसारख्या शाळेत आईवडिलांनी दाखल केलेले असतात. आणि याहीपेक्षा पुढचे पाऊल म्हणजे याच वयापासून मुलाना खाजगी शिकवण्याही लावल्या जातात. आजच्या बदललेल्या कुटुंबपद्धतीतून आजी-आजोबा नावाचे विद्यापीठ हद्दपार झालेच आहे पण मुलांच्या जीवनातील पहिली अनौपचारिक शाळा म्हणून आईवडील यांचा उल्लेख केल्या जात असेल. अशा अनौपचारिक शाळा हळूहळू बंद पडून प्ले गृप,नर्सरी,पाळणाघर,खाजगी शिकवण्या या कृत्रिम शाळांचे भरघोस पीक आलेले आहे. संस्कारक्षम वयात आईवडिलांच्या सहवासात मुलाना घरातून ज्या अनौपचारिक संस्काराची रुजवण व्हायची त्यातून त्यांचे एक सक्षम,प्रेमळ,संवेदनशील व्यक्तिमत्त्व विकसित व्हायचे.प्रेमासोबतच,घरात मुलांवर धाक असायचा. छोट्या मोठ्या चुकांची त्यानुसार शिक्षाही तिथेच भेटायची. त्यामुळे काय बरोबर अन् काय चूक हे तिथेच मुलानाही कळायचे. अशी ऊनसावलीत लेकरांची निकोप जडणघडण व्हायची. ज्या वयात मुलावर आईवडिलांच्या प्रेमाची शिंपण व्हावी,चुकांची जाणीव आपल्याच माणसाकडून प्रेमाने व्हावी, त्या वयात मुले जर बाहेरच्या व्यवहारी जगात आपण सोडत असू तर मुलामध्ये कुटुंबाप्रती प्रेम,सद्भावना,सहानुभूती,संवेदनशीलता या गुणांची रुजवण कुठून होईल? आणि आजकाल बरेचजण असेही म्हणतात की,पालकांनी मुलांचे मित्र बना.पण तुलनात्मकदृष्ट्या पाहिले तर हे लक्षात येईल की,जेव्हा पाल्याना शाळेत आणि घरीही ज्या सौम्य शिक्षा व्हायच्या तेव्हाच लेकराना मोठया व्यक्तिसोबत कसं रहावं,त्यांच्याशी अदबीने रहावं आणि त्यासोबतच नकार पचवायची शक्तीही त्यातूनच मिळायची. आज पालकानी पाल्याशी मित्रत्वाची घेतल्याने खरच पालक आणि पाल्य यांचे संबंध सुधारलेत का?याउलट माझे तर निरीक्षण असे दाखवते की, पालकांनी मुलांवरचा धाक कमी केला आणि मुले हेकट,दुराग्रही झालीत.कोणत्याही परिस्थितीत आपलेच म्हणणे खरे करून घेणारे झालीत. याचे पर्यावसान म्हणजे मग आपल्या आर्थिक गरजा पूर्ण होत नाहीत म्हटल्यावर आईच्या हत्येची सुपारी देण्यापर्यंत मुलांची मजल जाते.
मध्यमवर्गीय पालकांजवळ आज पूर्वीपेक्षा पैसा जास्त खुळखुळू लागला. त्यात अपत्ये एक किंवा दोनच! म्हणून आजचा पालकही आपल्या पाल्यावरचे प्रेम हे संस्कारापेक्षा पैशातच अधिक तोलत आहेत.त्याबदल्यात आजची पाल्यही आईवडिलांकडून मिळणारे हे प्रेम पैशातच मोजत आहेत. आपल्या घराजवळ मिळणाऱ्या शिक्षणाची त्याना किंमत उरली नाही. मग पालक पहिलीपासूनच आपल्या पाल्याना ग्रामीण भागातील पालक जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी,तालुक्याचे पालक जिल्ह्याच्या ठिकाणी,तर छोट्या जिल्ह्याचे पालक अजून मोठ्या शहरात आपल्या पाल्याना वसतिगृहात ठेवून शिक्षण देत आहेत.ही मुले कुटुंबापासून दूर गेल्याने यांची नाळ कुटुंबाशी जुळतच नाही. यात आपले पालकत्व कमी पडते असे,पालकांना वाटत नाही का?अशा मुलामुलींकडून कुटुंबावर प्रेम करण्याची अपेक्षा हेच पालक कसे ठेवू शकतात?आजचे पालकत्व वेगळ्याच हव्यासापोटी चुकीच्या दिशेने चालले असे वाटत नाही का?
-संगीता देशमुख,वसमत@14
=================================================
[7/24, 5:53 PM] +91 97306 89583: स्पर्धेसाठी...✍
*_पालक नव्हे ;मित्र बना_*
मित्रांनो , आपण सर्वांनी "तारे जमीन पर" हा चित्रपट पाहालाच आहे.आजच्या स्पर्धेच्या अनुषंगाने या चित्रपटाची आवर्जून आठवण झाली.पालक वर्ग आणि पाल्य यांच्यातील सहसंबंधाचे आणि मुलांचे भावविश्व
अनुभवायला मिळाले.
पालक होणे हा अतिशय सुखद अनुभव असला तरी फक्त काहीच पालक हे आपल्या पाल्यांशी मित्रांप्रमाने संवाद साधतांना दिसून येतात. सध्याच्या काळात तर आई वडील दोन्ही नोकरीवर असले की छोट्या मुलांची हेळसांड होतांना दिसते,बालपणापासुनच ही मुले आई वडीलांच्या प्रेमापासुन दुरावलेली असतात.अशा काळात जी व्यक्ती त्यांचा सांभाळ करते तिच्याशी मात्र ही मूले भावनिक होतात.शहरी विभागातील पालक वर्ग आणि खेडे भागातील पालक वर्ग यांतही मोठी तफावत दिसून येते,एकाच घरात दोन पाल्यांमधे प्रचंड ओढ़ातान व तुलना पाहावयास मिळते.यालाही मोजकेच पालक संवेदनशील पणे हाताळतांना दिसतात.जशी हाताची पाचही बोटे सारखी नसतात तशीच एकाच पालकाची दोन मुले विभिन्न विचारांची असु शकते अशा पाल्यांशी समायोजन साधने जर त्यांना जमले तर पालक-पाल्य नात्याची विण घट्ट होउन मैत्री चे संबंध जोपासता येतील.काही घरात स्वमग्न मुले आढळून येतात,यांनाही पालकांकडून भावनिक जिव्हाळा मिळाला नाही की समोर जाऊन ही मुले बीभत्स रूप धारण करतात.मूल समजून घेताना त्याच्या वयाचा व मनाचा विचार होणे गरजेचे आहे,आजही काही पालक अभ्यासासाठी मुलांना बदड़तांना दिसतात त्यामुळे डिप्रेशन चे बळी गेलेली मुले पाहायला मिळतात.कॉम्पिटिशन हा ही एक मोठा विकारच पालकांमधे जडलेला दिसून येतो.कंप्यूटर,नाना प्रकारचे क्लासेस,मोबाइल यांमुळे सुद्धा पालक व मुले यांच्यातील संवाद नाहिसा झालेला दिसून येतो.चर्चा आणि संवाद ही अभिव्यक्तीची प्रभावी माध्यम आहेत.पालक व पाल्यात संवादाची मोठी उणीव पाहावयास मिळते,यामुळे ही पालक व पाल्य यांच्या तील नात्यात दुरावा दिसून येतो.
जवळ जवळ ९०%पाल्य हे आपल्या पालकांना घाबरातात व संवाद टाळताल. पाल्यांनी आपल्या भावना पालकांशी शेयर करण्यासाठी आधी पालकांनी मित्र बनने गरजेचे आहे.पाल्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे तरच मुले व पालक यांच्यात मैंत्रीचे नाते घट्ट होईल कदाचित मुलांतील विकारांनाही आळा घालण्यात पालक वर्ग यशस्वी होईल...
*कधी झालेल्या चुका*
*पोटाशी दडवुन बघा*
*कधी रुसलेल मूल*
*समजावून तर बघा*
*कधी अभ्यासातून*
*सुट्टी देऊन तर बघा*
*कधी थरथरनारा हात*
*हातात घेऊन बघा*
*कधी "मी आहे ना"*
*एवढंच म्हणून तर बघा*
*एवढंच म्हणून तर बघा*
✍प्रणाली काकडे✍
*******************(**(*********************
[7/24, 6:13 PM] 6 Kalpna Jagadale: 💥 *साहित्य दर्पण* 💥
🍁 *आयोजित* 🍁
💐 *साहित्य दरबार* 💐
*विषय-पालक नव्हे मित्र बना*
***********************************************
सकाळची सुरूवात आजकाल सोशलमिडीयाद्वारे होते भुपाळी कालबाह्य झाली.
म्हणजेच फेसबुक,वाँट्अँप,टिव्ही,नि वर्तमानपत्र.वर्तमानपत्र शेवटी येत याकडे जाणिपुर्वक लक्ष करून देते. आणि मग या मिडीयाद्वारे ज्या बातम्या ऐकतो,पाहतो नि वाचतो त्यान डोक,मन सुन्न होत.ज्या पिढीवर उदयाच उज्वल भविष्य अवलंबून आहे ती पिढी इतकी रागिट,व्यसनाधिन,असभ्य बनत चाललेली दिसते की याची कारण काय?कोणती?याचा खरेतर शोध नि बोध घेणे अत्यंत गरजेच ठरत.
“जे पेराल तेच उगवते"असे म्हणतात म्हणुच ही पिढी वाया न जाऊ देता तीला वेळीच आपण सावरावयास हवे. आजकाल एका घरात राहुनही सगळी लोक ही अनोळख्यासारखी राहतात.बाबा मोबाईल,आई कामात,दादा लँबटाँप,नि लहानगा कार्टुन हे चित्र पहा जवळजवळ सगळया घरात पहायला मिळते.जरास मागच्या काळात जरा डोकावून पहा. घर कस भरलेल,गजबजलेल सगळी एकत्र खाणे,खेळणे,गप्पागोष्टी,भांडंण,रूसवेफुगवे नि वेळ पडल्यास एकजुटीची कामे.हे सांगण्यामागचा एकच उद्देश की आजकालची आईबाबा बदलली नि नंतर मुल बदलली. जर आपणास मुलांचा मित्र बनुन रहायच असेल तर आपण प्रथम आपल्याच सवयी बदलवयास हव्या कारण आपण जे करू तेच मुल करतात.
एक बातमी मागे वाचली एका चौथीच्या मुलानं आईबाबा रागावले म्हणुन फाशी घेतली. अरे हे काय? फाशी घेण ही भावना त्याच्या मनात आलीच कशी? का? मग आईबाबानी मुलांना रागावयाचच नाही का? मग त्यांच्या अनुभवाचा फायदा काय? मुलांना फक्त स्वैराचारच द्यायचा का? बर आईबाबा रागावतात यात भल कोणाच? या नि अशा घटना घडल्या की आपसुकच प्रत्येक आईवडीलांच्या तोंडुन शब्द निघतात “या मुलांसोबत वागायच तरी कसं?"
काही दिवसापुर्वी मी एका डाँक्टर दांपत्याच्या घरी गेली होते.सवयीप्रमाणे पहिले घरभर नजर फिरवली नि मग न रहावून मँमला प्रश्न केला “तुमची मुलगी दिड वर्षाचीच मग ही इतकी पुस्तक कोणाची?" त्यावर म्हटल्या “आमच्या तिघांची." त्यांच म्हणणे की मुलांना आपण जितका जास्त वेळ देवू तितकी ती आपली बनून राहतात नि मग आम्ही दोघांनी सगळी पुस्तक जमवून जगच तिच्याजवळ आणली तिला आम्ही प्राणी, पक्षी पशुंच्या जवळ घेवुन जातो नि निसर्ग व कुंटूब यांची चांगली सांगड घालून देतो मी तिच्यासाठी दवाखाना सोडलाय. त्यांनी सांगितलेल्या अनुभवाने मी भारावुनच गेले.म्हणजेच काय तर आपल्यामध्ये व मुलांमध्ये संवाद हा वेळोवेळी होणे अंत्यत गरजेचे आहे.
आजकालच्या मुलांचा मित्र बनायच असेल तर प्रत्येक आईबाबाही स्वत:च्या ईच्छा प्रथम: मरायला हव्यात मोबाईल वापर कमी,टिव्ही कमी हे टाळुन मुलांना शाळेतुन आल्यास शाळेतील दिवस कसा गेला यावर सुसंवाद घडला तर मुलांना नक्कीच आनंद होईल अस मला वाटत.शिवाय नेहमी कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी मुलांस घेवुन गेल्यास त्यांना बाहेरील मुलांसोबत फिरावे वाटणार नाही. तसेच त्यांच्यासोबत खेळा,भांडा,एखादा सिनेमा पहा,जेवायला बाहेर जा. मनमोकळ्या गप्पा मारा,खळखळुन हसा,खोडी काढा. पहा मग मुल कशी होतात आपल्यासोबतही स्वछंदी,आंनदी. या निमित्ताने मला इथे सांगावस वाटत की माझी मुल ही माझ्या मिस्टरशी जास्त जवळ आहेत कारण एकच ते कितीही थकलेली असले तरी ते मुलांशी नेहमीच लहान होऊन खेळतात. ते त्यांचे मित्रच जणु काही.काही हव नको ते पहिले मी घरात असले तरी त्यांनाच सांगणार कारण एकच ती त्यांच्यात माझ्यापेक्षा जास्त एकरूप झालीत आणि मुलांनाही मग ते त्यांचा मित्रच वाटतात.म्हणुनच या नि अश्या लहान लहान गोष्टीकडे जर आपण लक्ष दिले तर मुल ही नक्कीच आपले मित्र बनुन राहतील नि मोठ्या अनर्थ घडणाऱया घटना घडणार नाहीत.
शेवटी मला एकच म्हणावेसे वाटते की प्रत्येक आईवडिल जर मुलांचे मित्र बनली तर मुलांना बाहेर मैत्री नि मित्र शोधण्याची गरज पडणार नाही नि त्यांचे भविष्यही तितकेच उज्वल नि कल्याणकारी होईल कारण आईवडीलांपेक्षा दुसरा कोणताच मित्र हा कल्याणकारी विचार करणारा हा नक्कीच नसेल.
🖊🖊🖊📝🖊🖊🖊
कल्पना जगदाळे @8★बीड
*👆स्पर्धेसाठी👆*
👆👆👆👆👆👆👆
********************************************
[7/24, 6:28 PM] +91 84469 46555: साहित्य दर्पण आयोजित
*साहित्य दरबार*
*एक जागरूक पालक*
आज प्रत्येकाला पडलेला प्रश्न म्हणजे मुलांचे संगोपन व पालन कोणत्या प्रकारे करावे. कोण म्हणतं मुलांचे मित्र होऊन त्यांना समजावून घ्यावे व त्यांच्याशी व्यवहार ठेवावा. पण यात मला थोडा अतिशयोक्तीपणा दिसतो. हे कांही अंशी शक्य असते, पण प्रत्येक ठिकाणी असे वागणे अशक्य आहे, सर्वजण जाणून आहेत. पण बदलत्या काळात स्वतःला आधुनिकतेकडे झूकल्याचे दाखविण्याकरीता स्पष्ट बोलत नाहीत. तोंड दाबून बूक्क्याचा मार झेलल्याप्रमाणे आधुनिकता दाखविण्याचा प्रयत्न करतात. लेखकाला नेमके काय म्हणायचं आहे, असा प्रश्न हा लेख वाचताना वाचकांच्या मनात येत असेल. इथे मी सांगू इच्छितो की मीही मुलांचा बाप आहे व इतर बापा इतकेच मलाही माझ्या आपत्यांची काळजी आहे. किंबहुना मी काळजी घेतोय. पण माझे विचार थोडेसे भिन्न आहेत. याकरिता आपण संस्कार आणि संस्काराकडे वळले पाहीजे.
पूर्वाश्रमी मुले गुरूकुलात राहून शिक्षण घेत असतं. त्यामुळे मुले गुरूकुलात निवास करून शिक्षण घेत असल्याने आईवडील व मुलांचे शिक्षण यांचा कांही संबंध येत नसतं. गुरू हेच मुलांची काळजी घेत असतं. प्रसंगी ते कठोर व प्रसंगी मृदु होत विद्यार्थ्यांना विद्या दान करीत व गुरूंच्या नैतिक धाकात राहून मुले विद्यार्जन करीत असत. विद्यार्थ्यांमध्ये विद्वता आणणे हे लक्ष करून गुरू शिक्षण देत असतं. याशिवाय कांही दुसरे नाही.
त्यानंतर यात बदल शिक्षणात बदल होऊन मुले घरी राहून शाळेत जाऊन शिक्षण घेऊ लागले. आपणही त्याच पध्दतीने शिक्षण घेतले आहे. शाळेत शिक्षण सुरू झाले. शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या भल्याकरिता घेतलेली कठोरता घरापर्यंत येऊ लागले. मग मुलांच्या मानसिक अवस्थेबाबत ओरड सुरू झाली. मुलांना कठोर वागणूक दिल्यास मुलांवर मानसिक परिणाम होऊ शकतो, हे मानस तज्ञ सांगू लागले. त्यामुळे शिक्षकाविरूध्द आईवडील सरसावू लागले. त्यामुळे शिक्षक भीतीच्या सावटाखाली आले. हे कोणी नाकारत नाही, नाकारत असल्यास एकांतात तेही हे मान्य करतात. त्यामुळे विद्यादानात फरक पडला. मुलांना विद्वान करणे हे गुरू चे ध्येयात परिवर्तीत होऊन मुलांना शिकविणे, या कडावर स्थिर झाले. आजही कांही शिक्षक मुलांना आपल्या परीने पूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करातात, पण त्यातील किती घ्यायचे हे मुलांच्या कुवतीवर असते. पूर्व काळापासून आतापर्यंतचे डोळ्यासमोर आणून आपणास शिक्षणासाठी कठोरता दाखविल्यामुळे मानसिक परिणाम झालेली किती वयस्क वा मुले दिसले. मुलांना सततचे कठोर वागणूक मिळत असल्यास त्यांच्यावर मानसिक परिणाम होते, हे मान्य आहे. नैसर्गिक कुवतीत सरावांने भर घालून त्याची व्याप्ती वाढविता येते.
मुले हे मनानी मृदू असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीची जिज्ञासा असते. त्यामुळे जिज्ञासा पूर्तीसाठी धडपडत असतात. त्यावेळी त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्याची तयारी ठेवावी. बाप मुलाचा मित्र होण्याचा प्रयत्न केला तरी मुलगा हा आपल्या खऱ्याखुऱ्या समवयस्क मित्राप्रमाणे प्रत्येक गोष्ट सांगेल असे घडत नाही. मुलगा जरी लहान असला तरी त्याला आपलं आणि आपल्या व वडिलांच्या वयातील अंतर त्यास कळत असते. आई ही मुलाची प्रत्येक चूक पोटात घालून घेत असते व हे नैसर्गिक आहे. सर्वप्रथम आपण पालक आपली वैचारिक पातळी व आचार व्यवस्थीत ठेवायला हवे. मुले अनुकरणीय असतात. पाल्य हे आईवडिलांचे अनुकरण करीत असते. त्यामुळे आईवडिलांनी मुलांशी वागत असताना त्यांना लहानपणापासून व्यवहारीक ज्ञान द्यावे. मनुष्य कोणतेही कार्य करीत असताना त्याचा संबंध त्या कार्याच्या अनुषंगीक बुध्दीशी असतो व त्याच्याशी इतर घटकांचा संबंध नसतो, हे प्रथमतः मुलांच्या मनामध्ये ठसविणे आवश्यक आहे. घरामध्ये आई किंवा वडील यांच्यापैकी एकाचा नैतिक दरारा असला पाहीजे. नैतिक दरारा म्हणजे मारहाण करणे नाहीतर आपण विपरीत काही केल्यास आपणाला जाब विचारणारे आहेत, हे मुलांच्या मनात सदैव असायला हवे. अनावश्यक लाड करू नये. प्रत्येक लाड पुरवीत गेल्यास मुले हट्टी होतात व हट्ट पूर्ण झाल्याशिवाय ते शांत होत नाहीत. त्यामुळे योग्य हट्ट पुरवावे व इतर वेळी नाकारावे. योग्य हट्टच पुरविला जातो, हे ही त्यास कळायला लागते. यावरून वर म्हंटल्याप्रमाणे मुले अनुकरणीय असल्याने ते आईवडीलांचे आचरण व व्यवहाराचे निरीक्षण करते व तसेच वागण्याचा प्रयत्न करते. त्याला आईवडीलांच्या आचरण, व्यवहारात असलेली भावना लक्षात येत नाही. नैतिक दबाव व व्यवहारीक समज दिली असता मुले आईवडीलांची प्रत्येक वाक्य, आचरण व व्यवहार हे त्यांनी हाती घेतलेल्या कार्याच्या मर्यादेत घेतील व विपर्यस्तपणा त्यांच्याकडून घडणार नाही. मुले चिखलाच्या गोळ्याप्रमाणे आहेत. गोळा वाळला तर कोरून मुर्ती बनवावे लागते व त्यावेळी गोळा फुटण्याचा संभव असतो. त्यामुळे गोळा सुकण्यापुर्वी हाताने दाब देत देत त्यात माणूस मुर्ती साकारावे म्हणजे कोरण्याची गरज पडणार नाही व फुटण्याची भीती नाही. देश सेवेसाठी एक उत्तम नागरिक घडवायचे आहे, भ्रष्टाचार निर्मूलन व निस्वार्थ समाजसेवक घडवायचे आहे, असे प्रत्येकाने ठरवून मुलाचे संगोपन व तसे त्यांच्यावर संस्कार करीत गेले असता मुले घडत जातात. शिवाय असा विचार ठेवून पालकांनी मुलांशी वागल्यास पालकांच्या विचारांची पातळी उंचावते व त्यांचे त्याच पध्दतीने पाल्यांशी व्यवहार होत राहतो. त्यात शिस्त असेल पण कठोरता नसेल. अनुकरणांने मुलेही त्याच शिस्तीचे व ध्येयाचे पाईक होतात. शैक्षणिक गरजेच्यावेळी पालक व व्यवहार ज्ञान शिकवीताना पाल्याचे मित्र बना, म्हणजे त्याच्या आयुष्याची घडी व्यवस्थीत बसेल.
सर्वांना पालक दिनाच्या शुभेच्छा ।
बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
मोबाईलः 8446946555
==============================
[7/24, 6:31 PM] +91 75880 55882: 🌹🌹साहित्य दरबार🌹🌹
पालक नव्हे मित्र बना
🌹 🌹स्पर्धेसाठी
मातृदेवो भवो
पितृदेवो भवो
म्हणुन आईवडिलांच्या पाया पडणे व त्याच्या समोर कुठल्याही गोष्टी न बोलणे,पायाच्या बोटाकडे पाहात मान खाली घालून उभे राहणारी मुले म्हणजे आज्ञाधारक ही कल्पना पूर्वी आमच्या आईच्या काळातील त्यावेळची समाजव्यवस्थाच अशी होती.मोठ्यांचा मान राखणे म्हणजे त्यांच्या समोर कमी बोलणे असा होता.
आज प्रत्येक जण शिकत आहे शिक्षण घेतल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान प्रत्येकालामिळत आहे.जागतिक पातळीवरील ज्ञान मिळवण्याची प्रत्येकाची धडपड आहे.जीवन दिवसेनदिवस सुंदर व स्वच्छंदी जगण्याची प्रत्येकाची प्रबळ इच्छा आहे.प्रसारमाध्यमांवरील माहिती मुळे देखील माणसाच्या ज्ञानात भरपूर भर पडली आहे.आपण देखील आपल्या पाल्यानसाठी ज्ञानाची दरवाजे खुली केली आहेत.अगदी बालवाडीपासून आपण आपली मुल पहिल्याक्रंमाकाने पास व्हावीत म्हणुन धडपडत आहोत वेगवेगळ्या क्लासला जाण्यासाठी त्याला प्रोत्साहीत करत आहोत.पण त्यात प्रकर्षाने एक गोष्ट चुकन्याची खूप शक्यता मात्र वाढत आहे.आपली मुले शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडतात वेगवेगळ्या क्लासच्या निमीत्ताने जाणा-या वेगवेगळया
ठिकाणी, त्याना वेगवेगळी माणसे मिळतात.त्या प्रत्येकाच्या वागण्याची, तुमच्या मुलांच्या त्याच्याशी असलेल्या संपर्काची माहिती आपण ठेवतो का? वडील म्हणतात मी क्लासची फी भरुन आलो,म्हणजे माझ्यावरील त्याच्या शिक्षणाची जबाबदारी संपली का? त्यानी किती क्लास मध्ये प्रवेश घ्यावा?याला काही मर्यादा असायला हवी की नाही.
आपला पाल्य किती योग्यतेचा आहे व शेवटी स्वत:च्या पोटापुरते कमावण्याची त्याची कुवत कुठल्या क्लासमध्ये आहे?या सर्व प्रश्नाची उत्तरे पालकांनी स्वत :ला विचारावीत व आपल्या पाल्यासोबत त्या सर्व क्लासमधुन त्याच्या योग्यतेचा व भविष्यात ज्यामुळे तो स्वतःच्या पायावर उभा राहु शकतोतोच क्लास त्याच्या आवडीनुसार निवडावा नव्हे आपल्याला बरीच समजअसते त्यानुसार त्याला आपण तिकडे समजुतीने वळवावे.
लहाणपणी धिंगाणा घालणे व खेळणे,भांडणकरणे हा लहान मुलांचा स्थायीभाव असतो.मग जा बर बाहेर खेळायला...म्हणणारी पालक असतात.व आई मात्र घरात झोप काढत असते.चुकीचे आहे हे...आपल्या मुलाने सोबत आपण खेळले पाहिजे.पालकांनी मुलानसोबत भरपूर गप्पा मारल्या पाहिजेत ,खेळले पाहिजे. चला आपण सर्वजण खेळ खेळुया म्हणुनत्याना सहभागी करुन घेतले पाहिजे
मुले खूप रमतात..त्याना त्याच्या शाळेतीलरोज काय घडले ?कोणते शिक्षक काय शिकवतात ?कसे शिकवतात ?शाळेत तुझे कोण मित्र आहेत?ते तुझ्याशी कसे वागतात?डब्यात काय काय आणतात?एक ना अनेक प्रश्न विचारुन पालकानी पाल्याशी चर्चा साधली पाहिजे. जेणेकरून त्याची शब्दसंपत्ती वाढेल वक्तृत्व सुधारले व त्याच्या परिसराची तुम्हाला माहिती मिळेल.
टेलिव्जिन वरील मालिका -अतिशय धोकादायक गोष्ट आहे .आईवडिलांनी स्वत : बंधन पाळावेत लागतात .घरातील मोठ्यानी जर टी.व्ही पाहिला नाहीतर मुले देखील हट्ट करत नाहीत हा माझा अनुभव आहे. त्याऐवजी मुलांना अभ्यासाला बसवणे व त्याच्यासोबत बसुन त्याच्या अडचणी सोडवणे,त्याचे पांठातर,त्याच्या गणिताच्या सराव वर्गपाठ गृहपाठ या गोष्टी वेळच्यावेळी पुर्ण केल्या तर त्यात जास्त फायदा होतो.
शाळेतील मित्र त्यांचे आपल्याघरी येणे जाणे त्याच्या आवडी निवडी ,मुलाचे वाढदिवस, गणेशोत्सव यासारख्या छोट्या कार्यक्रमातून आपण आपल्या मुलाच्या खूप जवळ जातो व त्याच्या जवळ जवळ सर्व आवडीनिवडी जाणून घेऊ शकतो.त्याच्या उच्चशिक्षणाची तयारी करत असतो त्यावेळेस देखील त्याना आपण जे पैसे पाठवतो ते महिन्याला द्यावेत एकदम वर्षांचे देऊ नयेत .त्याचे खर्चाचे नियोजन बिघडुन शकते.
पाल्यानसाठी उच्च शिक्षीत होत असताना बाहेरच्या जगाविषयी माहिती दिली पाहिजे.चांगल्या वाईटाची जाणीव करुन दिली पाहिजे. अगदी लैंगिक शिक्षणाची माहिती देखील दिली पाहिजे.संभाव्य धोक्यान बद्दल जागरूक केले पाहिजे या सर्व गोष्टीची चर्चा केली पाहिजे. जेणेकरून करून त्याबद्दल त्याला विशेष कुतूहल राहणार नाही.
आपल्या पाल्याची जडणघडण नक्कीच आपल्या हाती आहे.लहानपणी शुभंकरोती शिकलेली मुले ,आईवडिलांशी मित्रत्वाच्या नात्यानी वागणारी मुले,आईवडिलांनकडून सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेणारी मुले व जे आईवडिल त्या प्रश्नांची उत्तरे अतिशय मार्मिक व सात्त्विकपणे देतात त्या मुलात व आईवडिलात नक्कीच मित्रत्वाचे नाते निर्माण होते.म्हणून म्हणावे वाटते.
या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार 👭
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्नेहलता कुलथे
मोबा 7588055882
क्र.37

[7/24, 6:45 PM] +91 94207 84086: स्पर्धेसाठी.......
'पालक नव्हे मित्र बना'
आज चौकाचौकात मार्गदर्शन केंद्रे उघडलेली आहेत,आणि हिच आजच्या काळाची मोठी शोकांतिका आहे.आपल्याच मुलांना समजावण्यासाठी दुसर्या कोणाची तरी मदत घेणे यत्किंचितही रास्त वाटत
नाही अन् मनाला पटतही नाही,एकेकाळी घरात भरपूर माणसे असायची म्हणून मुलांना वेगळा वेळ देण्याची गरज भासत नव्हती आज विभक्त कुटुंबामुळे मूले एकलकोंडी बनत आहेत, काॅम्पुटर,मोबाईल यांच्या आहारी जाताना त्यांना स्वमग्नतेसारखे आजार जडत आहेत या सर्व गोष्टींना जबाबदार कोण?हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर येतो आणि उत्तरही लगेचच मिळते, पालकच!हो फक्त पालक आणि पालकच यासाठी जबाबदार आहेत.
आज स्पर्धेचे युग आहे असे म्हटले जाते,पण आपला पाल्य हा खरंच त्या रेसचा घोडा आहे का याचा विचार पालकांनी सर्वप्रथम करायला हवा,त्यांना जर रेसचा घोडाच हवा होता तर पालक बनण्यासाठी एवढा अट्टाहास कशाला? आणि खरंच जर त्यांना एक सुजाण नागरिक हवा असेल,सानेगुरुजसारखं संवेदनशील व्यक्तीमत्व हवं असेल,एक माणसातला माणूस शोधणारा विवेकानंद हवा असेल तर पालकांना आपल्या पाल्याचा मित्र होण्याशिवाय पर्याय नाही.
पालकांनी हे जरूर लक्षात ठेवावे की मुले निरीक्षणातून शिकत असतात आणि त्यांच्या पुढे सतत आम्ही असे करायचो,आमच्यावेळी असे होते,असे सांगायची गरज नाही.सध्याच्या बदलत्या युगाप्रमाणे त्यांचे मित्र बनून दोन गोष्टी आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागल्यास आपल्या चार गोष्टी ते आदराने ऐकतील.
पालकांनी आपल्या पाण्याचा मित्र बनणे ही काळाची गरज आहे.कारण मुले मित्रासारख्या वागणार्या पालकांशी आपल्या मनातील गुजगोष्टी शेअर करतील आणि त्यांच्या मनातील कळाल्याशिवाय काय चूक आणि काय बरोबर हे त्यांना कसे सांगणार?
-श्रीमती माळेवाडीकर रोहिणी गंगाधरराव,क्रमांक 36,माजलगाव.
===============================================