Friday, 31 July 2026

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...!


"वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!"

आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार येतात. कधी आनंदाचे क्षण असतात, तर कधी दुःखाचे. कधी निसर्ग आपल्याला मोहून टाकतो, तर कधी एखादी घटना मनाला स्पर्श करून जाते. पण हे सारे विचार आपण शब्दांत मांडतो का ? जे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतात ते लेखक आणि कवी बनतात. मग आपण ही लेखक आणि कवी बनू शकतो का ? यावर कधी विचार केला आहे काय ? नाही ना ? चला, आजपासून आपण लिहायला सुरुवात करू या !

लेखन म्हणजे फक्त परीक्षेतील उत्तरपत्रिका भरणे नाही. परीक्षेतील प्रश्नाच्या उत्तराचे लेखन करणे म्हणजे लेखन नव्हे. लेखन म्हणजे आपल्या मनातील भावना, कल्पना, अनुभव आणि स्वप्ने शब्दांत व्यक्त करण्याची सुंदर कला आहे. जो विद्यार्थी लिहितो, तो अधिक विचार करतो. जो विचार करतो, तो अधिक समजून घेतो. आणि जो समजून घेतो, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.

आपल्या हातात पेन किंवा पेन्सिल असते; पण त्या छोट्याशा लेखणीत आपल्या भविष्याचा प्रकाश दडलेला असतो. एक सुंदर शब्द, एक प्रभावी वाक्य, एक छोटी कविता किंवा एखादा अनुभव यातूनच मोठे लेखक, विचारवंत आणि समाजाला दिशा देणारी माणसे घडतात. 

आपण रोज खूप काही पाहतो, ऐकतो आणि आणि अनुभवतो. पावसाचे थेंब, पक्ष्यांचा किलबिलाट, शाळेतील गमती-जमती, आईची माया, मित्रांची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन, आपल्या गावातील माणसे, निसर्गाचे सौंदर्य हे सारे आपल्या मनात साठत असते. पण या अनुभवांना शब्द मिळाले, तर तेच साहित्य बनते. म्हणूनच लेखन म्हणजे मनातील विचारांना शब्दांचे सुंदर पंख देण्याची कला होय.

आपल्या मनात कायम एक प्रश्न पडतो चांगले लिहायचे कसे ? तर याचे उत्तर आहे वाचन !

जसा मजबूत पाया असेल तशी इमारत भक्कम उभी राहते, तसाच भरपूर वाचनाचा पाया असेल तर लेखन अधिक सुंदर, समृद्ध आणि प्रभावी होते. वाचनामुळे नवीन शब्द मिळतात, भाषेची समज वाढते, कल्पनाशक्ती विकसित होते, विचारांना दिशा मिळते आणि अभिव्यक्ती अधिक परिणामकारक बनते. म्हणूनच वाचन आणि लेखन ही एका रथाची दोन चाके आहेत. एकाशिवाय दुसरे अपूर्ण आहे. कोणताही महान व्यक्ती एका कवितेतून किंवा एका लेखातून घडला नाही. त्यासाठी सातत्यपणे वाचन आणि लेखन दोन्ही महत्वाचे आहेत. 

आपल्या मराठीतील अनेक थोर साहित्यिक याच मार्गाने घडले. साने गुरुजी यांनी प्रेम, करुणा आणि संस्कार शब्दबद्ध केले. कुसुमाग्रज यांच्या कवितांनी समाजाला नवी चेतना दिली. पु. ल. देशपांडे यांनी विनोदातून माणुसकीचा संदेश दिला. वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तर फक्त दीड दिवस शाळेत गेले तरीही ते महान लेखक व लोकशाहीर झाले. कारण त्यांनी आपले अनुभव शब्दात मांडले. कष्टकरी लोकांच्या समस्या त्यांनी जसे पाहिले, जसे अनुभवले तसे ते शब्दात मांडले. म्हणूनच त्यांचे नाव साहित्य विश्वात जगभर पोहोचले. सर्व साहित्यिकांनी सातत्याने वाचन केले, जीवन अनुभवले आणि अखंड लेखन केले. म्हणूनच त्यांचे साहित्य आजही आपल्याला प्रेरणा देते.

जगातील महान लेखकही असेच घडले. त्यांनी भरपूर वाचन केले, जगाकडे जिज्ञासेने पाहिले आणि नियमित लिहित राहिले. लेखक जन्माला येत नाही; तो सातत्यपूर्ण वाचन, चिंतन आणि लेखनातून घडत असतो.

मुलांनो, लेखन केल्याने फक्त वही भरत नाही, तर मन समृद्ध होते. लिहिणारा विद्यार्थी निरीक्षक बनतो. तो प्रश्न विचारतो, विचार करतो, स्वतःचे मत मांडतो आणि आपल्या भावनांना योग्य शब्द देऊ लागतो. लेखन आत्मविश्वास वाढवते, भाषेवर प्रभुत्व मिळवून देते आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनवते.

सुरुवातीला मोठे निबंध किंवा कविता लिहिण्याची गरज नाही. दररोज फक्त काही ओळी लिहा. आज शाळेत काय घडले ? पाऊस कसा वाटला ? आईबद्दल, मित्राबद्दल, झाडाबद्दल, शिक्षकांबद्दल किंवा आपल्या गावाबद्दल लिहा. एखादी छोटी कविता करा, गोष्ट लिहा किंवा एखादा सुंदर विचार वहीत नोंदवा. प्रत्येक दिवसाचे लेखन तुमच्या प्रगतीची साक्ष देईल. रोज काही ना काही नवीन लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला रोज काही तरी नवीन सुचत जाते. चुका झाल्या तरी घाबरू नका. चुका म्हणजे शिकण्याची पहिली पायरी असते. प्रत्येक नवीन लेखन तुम्हाला कालपेक्षा अधिक सक्षम बनवत असते. 

आज मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात अनेक जण फक्त पाहतात आणि वाचतात; पण स्वतः काही लिहित नाहीत. तुम्ही मात्र वेगळे बना. फक्त माहितीचे ग्राहक बनू नका, तर विचारांचे निर्माते बना. तुमच्या लेखणीत समाज बदलण्याची ताकद आहे.

चला, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा होत आहे, त्यानिमित्ताने एक छोटा संकल्प करूया, "मी दररोज काहीतरी वाचेन, दररोज काहीतरी लिहीन, नवीन शब्द शिकेन, सुंदर विचार मांडेन, लेखणीला माझा मित्र बनवेन, आणि उत्तम लेखक होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीन."

तेव्हा मुलांनो, चला लिहू या...! कारण आज वहीत लिहिलेला प्रत्येक शब्द, उद्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया ठरणार आहे.

आजची छोटी लेखणी, उद्याचा मोठा लेखक घडवू शकते. वाचू या... विचार करू या... आणि मनापासून लिहू या ! कारण शब्द बदलतात मन, आणि मन बदलते जग.


- नासा येवतीकर, धर्माबाद

Tuesday, 28 July 2026

दिनविशेष माहिती - 29 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

गुरुपौर्णिमा विशेष

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

कसे आहात? मजेत ना?

मी नासा येवतीकर. आपल्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.

आज आपण भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी अशा गुरुपौर्णिमा या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

लक्षपूर्वक ऐका हं ! कारण या माहितीच्या आधारे शेवटी तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

चला तर मग, सुरुवात करूया...


आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस महान ऋषी महर्षी वेदव्यास यांची जयंतीचा दिवस. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे संकलन केले, महाभारत या महान ग्रंथाची निर्मिती केली तसेच अठरा पुराणांच्या रचनेतही त्यांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्यांना महान गुरु मानले जाते.

भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. आई-वडील आपल्याला जन्म देतात; पण गुरु आपल्याला ज्ञान, संस्कार, शिस्त आणि योग्य जीवनमार्ग देतात. अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा तोच खरा गुरु.

संत कबीरांनी गुरुचे महत्त्व सांगताना म्हटले आहे—

"गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय ?
बलिहारी गुरु आपल्या, गोविंद दियो बताय."

याचा अर्थ असा की, गुरु आणि देव दोघेही समोर उभे असतील तर प्रथम गुरुंनाच वंदन करावे, कारण देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात.

आपणास शिकविणारे शाळेतील शिक्षकही आपल्या जीवनातील खरे गुरु आहेत. ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर चांगले विचार, उत्तम संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम, सहकार्य आणि देशप्रेम यांसारखी जीवनमूल्येही शिकवतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरुजनांचा नेहमी आदर केला पाहिजे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना वंदन करतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. ही परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीचे वैभव आहे.

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया—

• आपल्या गुरुजनांचा नेहमी आदर करू.
• नियमित अभ्यास करू.
• शिस्तीचे पालन करू.
• चांगले संस्कार अंगीकारू.
• आपल्या आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे नाव उज्ज्वल करू.

शेवटी, एक सुंदर ओळ आठवूया—

"गुरुविण कोण दाखवील वाट,
ज्ञानदीप तेच लावितात."

चला, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन करून त्यांच्या आशीर्वादाने ज्ञान, संस्कार आणि यशाचा मार्ग स्वीकारूया.

मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला नक्की कळवा.

आता या माहितीवर आधारित काही प्रश्न पाहूया.

प्रश्न १ : आषाढ महिन्यातील पौर्णिमेला कोणता सण साजरा केला जातो?
उत्तर : गुरुपौर्णिमा.

प्रश्न २ : गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाची जयंती साजरी केली जाते?
उत्तर : महर्षी वेदव्यास यांची.

प्रश्न ३ : महाभारताची रचना कोणी केली?
उत्तर : महर्षी वेदव्यास यांनी.

प्रश्न ४ : गुरुपौर्णिमेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर : व्यासपौर्णिमा.

प्रश्न ५ : भारतीय संस्कृतीत कोणाचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे?
उत्तर : गुरुचे.

(ही माहिती विविध विश्वसनीय संदर्भांच्या आधारे संकलित करण्यात आली आहे.)

चला, पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार!

संकलन : नासा येवतीकर, धर्माबाद
मो. ९४२३६२५७६९

धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र!

Friday, 24 July 2026

दिनविशेष माहिती - 25 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 

कसे आहात तुम्ही ? मजेत ना !

 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.

आज 25 जुलै मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी, लेखक आणि प्रभावी वक्ते कवी वसंत बापट जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......


कवी वसंत पुरुषोत्तम बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

वसंत बापट हे मराठीतील प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक, प्राध्यापक आणि उत्कृष्ट वक्ते होते. त्यांच्या कवितांमध्ये देशप्रेम, समाजप्रेम, मानवता, निसर्गप्रेम आणि प्रेरणादायी विचारांचा सुंदर संगम आढळतो. त्यांनी महाराष्ट्रभर काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम करून मराठी कवितेला लोकमान्यता मिळवून दिली.

त्यांनी अनेक गाजलेली देशभक्तिपर आणि प्रेरणादायी गीते लिहिली. त्यांपैकी "उत्तुंग आमुची उत्तर सीमा", "सैन्य चालले पुढे" आणि "राकट देशा, कणखर देशा" ही गीते विशेष प्रसिद्ध आहेत. आज सुद्धा ही गीते विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय उपक्रम आणि देशभक्तीपर प्रसंगी आवर्जून सादर केली जातात.

मुंबईतील महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले.

१७ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या कविता, गीते आणि साहित्य आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.

विद्यार्थी मित्रांनो, कवी वसंत बापट यांचे जीवन आपल्याला देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, साहित्यप्रेम आणि सतत ज्ञानार्जन करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपणही चांगले नागरिक बनण्याचा संकल्प करूया.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - कवी वसंत बापट यांचा जन्म केव्हा झाला ?

बरोबर उत्तर आहे, कवी वसंत बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. 


दुसरा प्रश्न - भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले ?

बरोबर उत्तर आहे, सन 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन झाले.


तिसरा प्रश्न - राकट देशा, कणखर देशा" ही प्रसिद्ध गीत कोणी लिहिले ?

बरोबर उत्तर आहे, राकट देशा, कणखर देशा" ही प्रसिद्ध गीत कवी वसंत बापट यांनी लिहिले 


चौथा प्रश्न - वसंत बापट यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून कोठे कार्य केले. ?

बरोबर उत्तर आहे, मुंबईतील महाविद्यालयात वसंत बापट यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.


आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - वसंत बापट यांचे निधन केव्हा झाले ?

बरोबर उत्तर आहे - १७ सप्टेंबर २००२ रोजी वसंत बापट यांचे निधन झाले. 

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

धन्यवाद!

Wednesday, 22 July 2026

दिनविशेष माहिती - 23 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आज २३ जुलै लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती जाणून घेणार आहोत.

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग जाणून घेऊ या ......
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान राष्ट्रपुरुष, थोर समाजसुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रखर राष्ट्रवादी व्यक्तिमत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. लोकमान्य टिळक यांचे मूळ नाव 'केशव गंगाधर टिळक' होते. लहानपणापासून त्यांना 'बाळ' या टोपणनावाने ओळखले जात असे. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे होते. 
टिळकांनी शिक्षणाला राष्ट्रीय विकासाचे प्रभावी साधन मानले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह न्यू इंग्लिश स्कूल आणि पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणातून देशप्रेम, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, हा त्यांचा उद्देश होता.

लोकमान्य टिळक हे निर्भीड पत्रकारही होते. त्यांनी मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजी भाषेतून 'द मराठा' हे वृत्तपत्र सुरू केले. त्यात ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांवर कठोर टीका केली. त्यांच्या लेखणीतून जनतेमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली.

टिळकांनी समाजात एकात्मता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. या उत्सवांमुळे सामान्य जनतेमध्ये राष्ट्रप्रेम जागृत झाले आणि स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली.

त्यांची प्रसिद्ध गर्जना म्हणजे "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच." या एका वाक्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची चळवळ अधिक जोमाने उभी राहिली.

लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' हा महत्त्वपूर्ण ग्रंथही लिहिला. कर्मयोग, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवा हा जीवनाचा खरा मार्ग असल्याचा संदेश त्यांनी या ग्रंथातून दिला.

दिनांक १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले. परंतु त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि राष्ट्रप्रेम आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.

प्रिय विद्यार्थ्यांनो, लोकमान्य टिळकांचे जीवन आपल्याला सत्य, धैर्य, परिश्रम, शिक्षणाचे महत्त्व आणि देशभक्ती यांचा अमूल्य संदेश देते. आपणही प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन, शिस्तीचे पालन करून आणि आपल्या देशाचा जबाबदार नागरिक बनून त्यांना खरी आदरांजली वाहूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - लोकमान्य टिळक यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. 

दुसरा प्रश्न - लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या मराठी वृत्तपत्राचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, केसरी हे मराठी वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरु केले. 

तिसरा प्रश्न - लोकमान्य टिळकांची प्रसिद्ध गर्जना कोणती ?
बरोबर उत्तर आहे, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ही त्यांची प्रसिद्ध गर्जना आहे.

चौथा प्रश्न -  लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
बरोबर उत्तर आहे, लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. 

शेवटचा पाचवा प्रश्न - लोकमान्य टिळकांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र!

Tuesday, 21 July 2026

दिनविशेष माहिती - 22 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 22 जुलै महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांची जयंती त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग जाणून घेऊ या ......
श्री. अजित अनंतराव पवार
(२२ जुलै १९५९ – २८ जानेवारी २०२६)

मा. अजित अनंतराव पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. आपल्या कर्तृत्व, निर्णयक्षमता, प्रशासनावरील मजबूत पकड आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी, कणखर आणि लोकप्रिय नेता म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. जनतेशी असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संपर्क, प्रभावी नेतृत्व आणि विकासकामांप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांना व्यापक लोकसमर्थन लाभले.
सन १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा कार्यभार सांभाळला. तसेच वित्त व नियोजन, जलसंपदा, ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास तसेच क्रीडा व युवक कल्याण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले.
श्री. अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प ११ वेळा विधानमंडळात सादर करण्याचा मान मिळविला. तसेच जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांचा विकास, पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, सिंचन प्रकल्पांना गती देणे, औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि विकासाभिमुख प्रशासकीय निर्णय राबविणे यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांना चालना मिळाली. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान झाले.
राजकीय क्षेत्रात तसेच जनसामान्यांमध्ये ते प्रेमाने "अजितदादा" या नावाने ओळखले जात. स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रिय स्वभाव, कठोर परिश्रम आणि विकासासाठीची अखंड तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.
श्री. अजित पवार यांची पत्नी श्रीमती सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री असून त्यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. कुटुंबाने सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील कार्याची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.
दि. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती (जि. पुणे) येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 🌹

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - श्री अजित पवार यांचा जन्म केव्हा झाला ? 
बरोबर उत्तर आहे, श्री अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. 

दुसरा प्रश्न - अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून केव्हा निवडून आले ?
बरोबर उत्तर आहे, सन १९९१ मध्ये अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून निवडून आले. 

तिसरा प्रश्न -  श्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून किती वेळा कार्यभार सांभाळला ?
बरोबर उत्तर आहे, श्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा कार्यभार सांभाळला

चौथा प्रश्न - सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?
बरोबर उत्तर आहे, श्रीमती सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत.

शेवटचा पाचवा प्रश्न - श्री अजित पवार यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - दि. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती (जि. पुणे) येथे झालेल्या विमान अपघातात श्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 19 July 2026

दिनविशेष माहिती - 20 जुलै


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आज २० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस (International Moon Day) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण ह्या दिवसा विषयी माहिती समजून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......


विद्यार्थी मित्रांनो, रात्रीच्या आकाशात चमकणारा चंद्र आपला सर्वात जवळचा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र आपल्याला प्रकाश देत नाही, तर तो सूर्यप्रकाश परावर्तित करतो. चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ८४ हजार ४०० किलोमीटर अंतरावर आहे.
२० जुलै १९६९ हा दिवस मानवजातीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. याच दिवशी अमेरिकेच्या अपोलो-११ मोहिमेद्वारे मानवाने प्रथमच चंद्रावर पाऊल ठेवले. अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. त्यांच्यासोबत बझ ऑल्ड्रिन यांनीही चंद्रावर भ्रमण केले, तर मायकेल कॉलिन्स हे अंतराळयानातच कक्षेत राहिले.
नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवताना म्हटलेले प्रसिद्ध वाक्य आजही जगभर प्रसिद्ध आहे – "हे एका माणसाचे छोटे पाऊल आहे; पण मानवजातीसाठी ही एक मोठी झेप आहे."
या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) २०२१ पासून २० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली.
भारतानेही चंद्र संशोधनात मोठी कामगिरी केली आहे. चांद्रयान-१ मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा महत्त्वाचा शोध लागला. त्यानंतर चांद्रयान-३ मोहिमेद्वारे २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून इतिहास घडवला. त्यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीपणे उतरलेला जगातील पहिला देश ठरला.
आंतरराष्ट्रीय चंद्र दिवसाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, अंतराळ संशोधन आणि खगोलशास्त्राबद्दल आवड निर्माण करणे, तसेच शांततापूर्ण अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देणे हा आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आजचे विज्ञान हे उद्याचे भविष्य आहे. कदाचित तुमच्यापैकीच एखादा विद्यार्थी भविष्यात अंतराळ वैज्ञानिक किंवा अंतराळवीर बनेल. म्हणूनच विज्ञानाची आवड जोपासा, जिज्ञासा वाढवा आणि मोठी स्वप्ने पाहा.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस (International Moon Day) केव्हा साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, २० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस (International Moon Day) म्हणून साजरा केला जातो

दुसरा प्रश्न -  आपल्या सर्वात जवळचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे ?
बरोबर उत्तर आहे, चंद्र आपला सर्वात जवळचा नैसर्गिक उपग्रह आहे.

तिसरा प्रश्न - चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव कोण ?
बरोबर उत्तर आहे, अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव होय.

चौथा प्रश्न - अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल केव्हा ठेवले ?
बरोबर उत्तर आहे, २० जुलै १९६९ रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.

शेवटचा पाचवा प्रश्न - कोणत्या मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा भारताने महत्त्वाचा शोध लागला. ?
बरोबर उत्तर आहे - चांद्रयान-१ मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा भारताने महत्त्वाचा शोध लागला.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

धन्यवाद! 🚀🌕

-----------------------------------------------
जागतिक बुद्धिबळ दिन – २० जुलै

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज २० जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन (World Chess Day) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण  बुद्धिबळ या खेळाविषयी माहिती जाणून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......
विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिबळ हा जगातील सर्वात जुना आणि बुद्धीला चालना देणारा खेळ मानला जातो. या खेळाचा उगम भारतात झाला. प्राचीन काळात या खेळाला 'चतुरंग' असे म्हणत असत. नंतर हा खेळ पर्शिया, अरब देश आणि युरोपमार्गे संपूर्ण जगात पोहोचला.
२० जुलै १९२४ रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाने २०१९ मध्ये २० जुलै हा दिवस 'जागतिक बुद्धिबळ दिन' म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जगभर साजरा केला जातो.
बुद्धिबळामध्ये ६४ चौकटी आणि ३२ मोहरे असतात. प्रत्येक खेळाडूकडे १६ मोहरे असतात. राजा, राणी, हत्ती, उंट, घोडा आणि प्यादी या मोहऱ्यांचा योग्य वापर करून प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह आणि मात देणे हे या खेळाचे उद्दिष्ट असते. राजा हा बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा आहे.
बुद्धिबळ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नाही, तर तो एकाग्रता, स्मरणशक्ती, संयम, नियोजन, निर्णयक्षमता आणि तर्कशक्ती वाढविणारा खेळ आहे. म्हणूनच जगभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बुद्धिबळ शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते.
भारताला बुद्धिबळाच्या क्षेत्रात मोठा अभिमान आहे. विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले विश्वविजेते बुद्धिबळपटू आहेत. त्यांच्या यशामुळे भारतात बुद्धिबळाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. आज भारतातील अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. त्यामध्ये डी. गुकेश, आर. प्रज्ञानानंद, अर्जुन एरिगैसी आणि कोनेरू हम्पी यांसारखे खेळाडू विशेष उल्लेखनीय आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिबळ आपल्याला प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळायला शिकवते. जीवनातही कोणताही निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घेतला तर यश निश्चित मिळते.
चला, या जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त आपण बुद्धिबळ खेळण्याची सवय लावूया, आपली विचारशक्ती वाढवूया आणि आपल्या बुद्धीचा विकास करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न -  बुद्धिबळ खेळाचा उगम कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, बुद्धिबळ खेळाचा उगम भारतात झाला. 

दुसरा प्रश्न - प्राचीन काळात बुद्धिबळ या खेळाला काय म्हणत असत ?
बरोबर उत्तर आहे, प्राचीन काळात बुद्धिबळ या खेळाला 'चतुरंग' असे म्हणत असत.

तिसरा प्रश्न - आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना कोठे झाली.  ?
बरोबर उत्तर आहे, फ्रान्स ची राजधानी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना झाली. 

चौथा प्रश्न - बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा कोणता ?
बरोबर उत्तर आहे, राजा हा बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - भारताचे पहिले विश्वविजेते बुद्धिबळपटू कोण आहेत. ?
बरोबर उत्तर आहे - विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले विश्वविजेते बुद्धिबळपटू आहेत.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
धन्यवाद! ♟️🌍

Friday, 17 July 2026

दिनविशेष माहिती - 18 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज  १८ जुलै  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
 निमित्ताने त्यांच्या साहित्य आणि कार्याविषयी माहिती जाणून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......
आज १८ जुलै मराठी साहित्यविश्वातील थोर साहित्यिक, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही. पण त्यांनी जीवनालाच आपले विद्यापीठ मानले. आपल्या निरीक्षणशक्ती, अनुभव आणि वाचनाच्या बळावर ते एक महान साहित्यिक बनले.
अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, तर ते लोकशाहीर, समाजसुधारक आणि जनतेचे कवी होते. त्यांनी आपल्या साहित्यातून गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि वंचित समाजाचे दुःख, संघर्ष आणि स्वाभिमान यांचे जिवंत चित्रण केले.
त्यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या, अनेक कथा, पोवाडे, लावण्या, लोकनाट्ये आणि प्रवासवर्णने लिहिली. त्यांची 'फकिरा' ही कादंबरी विशेष गाजली असून तिला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर असल्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि शौर्य यांवर अनेक पोवाडे लिहिले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गौरवगान करणारे पोवाडे विशेष प्रसिद्ध आहेत.
अण्णाभाऊ साठे हे सोव्हिएत रशियाला भेट देणारे पहिले मराठी साहित्यिक मानले जातात. त्यांच्या साहित्यकृतींचे रशियनसह अनेक परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यामुळे मराठी साहित्याचा गौरव जगभर पोहोचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
त्यांचा एक प्रसिद्ध विचार आहे—
"ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे, तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर पेलली आहे."
या विचारातून त्यांनी श्रमाचे महत्त्व आणि कष्टकरी माणसाचा सन्मान अधोरेखित केला.
१८ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचे विचार, साहित्य आणि समाजप्रबोधनाचे कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.
विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातून आपण हे शिकले पाहिजे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, कष्ट, आत्मविश्वास आणि शिक्षणाची ओढ असेल तर मोठे यश मिळवता येते. समाजातील प्रत्येक माणसाचा आदर करणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? आम्हांला नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

१) अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय होते ?
उत्तर: तुकाराम भाऊराव साठे.

२) अण्णाभाऊ साठे यांचा जन्म केव्हा व कुठे झाला ?
उत्तर: १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव, जि. सांगली येथे.

३) अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती आहे ?
उत्तर: फकिरा.

४) अण्णाभाऊ साठे हे कोणत्या देशाला भेट देणारे पहिले मराठी साहित्यिक मानले जातात ?
उत्तर: सोव्हिएत रशिया (USSR).

५) अण्णाभाऊ साठे यांचे निधन केव्हा झाले ?
उत्तर: अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 15 July 2026

दिनविशेष माहिती - 16 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात? मजेत ना?

मी नासा येवतीकर. दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.

आज १६ जुलै. हा दिवस संपूर्ण जगभर "जागतिक सर्पदिन" (World Snake Day) म्हणून पाळला जातो. या दिवसानिमित्त आपण सापांविषयीचे गैरसमज दूर करून त्यांचे पर्यावरणातील महत्त्व जाणून घेणार आहोत.

लक्षपूर्वक ऐका हं ! कारण या माहितीच्या आधारे शेवटी तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

चला तर मग, आजची माहिती ऐकूया...
दरवर्षी १६ जुलै रोजी जागतिक सर्पदिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे सापांबद्दल जनजागृती करणे, त्यांच्याविषयी असलेली भीती आणि अंधश्रद्धा दूर करणे तसेच त्यांचे संरक्षण करण्याचा संदेश देणे.
विद्यार्थी मित्रांनो, साप हा निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. तो उंदीर, घूस आणि पिकांचे नुकसान करणाऱ्या इतर प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा तो एक प्रकारे मित्रच आहे.
भारतात सापांच्या जवळपास 300 प्रजाती आढळतात. साप तीन प्रकारचे असतात एक विषारी साप, दुसरे निम विषारी साप आणि तिसरे बिन विषारी साप. त्यामुळे प्रत्येक साप विषारी असतो, हा समज चुकीचा आहे.
भारतात एकूण चार सर्वाधिक विषारी साप आहेत. त्यात नाग हा विषारी साप भारतात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. 
आपल्याला एखादा साप दिसला तर त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि तात्काळ वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती द्यावी. साप पकडण्याचा किंवा त्याच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न कधीही करू नये.
पावसाळ्यात साप बऱ्याचदा बिळांमधून बाहेर येतात. त्यामुळे घराच्या आसपास स्वच्छता ठेवणे, कचरा किंवा लाकडांचे ढीग साचू न देणे, रात्री टॉर्चचा वापर करणे आणि पायात चप्पल किंवा बूट घालणे या साध्या सवयी अपघात टाळण्यास मदत करतात. सर्प दंश झाल्यावर वेळ न दवडता दवाखान्यात जावे. मांत्रिक किंवा इतर झाडपालाची औषधं खाऊन आपला वेळ वाया घालवू नये.
मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक सजीवाचे स्वतःचे महत्त्व असते. सापांचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण होय. म्हणून आपण सापांबद्दल भीती नव्हे तर योग्य माहिती आणि जागरूकता बाळगली पाहिजे.
चला, जागतिक सर्पदिनानिमित्त आपण असा संकल्प करूया—
"सापांबद्दल अंधश्रद्धा पसरवणार नाही, त्यांचे संरक्षण करू आणि निसर्गातील प्रत्येक सजीवाचा आदर करू."

मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला नक्की कळवा.
आता या माहितीवर आधारित पाच प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया.

प्रश्न १ : जागतिक सर्पदिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : जागतिक सर्पदिन दरवर्षी १६ जुलै रोजी साजरा केला जातो.

प्रश्न २ : शेतकऱ्यांचा खरा मित्र कोण ?
उत्तर : साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. 

प्रश्न ३ : सापाचे एकूण किती प्रकार आहेत ?
उत्तर : सापाचे एकूण तीन प्रकार आहेत, विषारी साप, निम विषारी साप आणि बिन विषारी साप.

प्रश्न ४ : भारतातील सर्वाधिक विषारी साप कोणता ?
उत्तर : नाग हा भारतातील सर्वाधिक विषारी साप आहे.

प्रश्न ५ : साप दिसल्यास आपण काय करावे?
उत्तर : साप दिसल्यास त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती द्यावी.

वरील माहिती सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांनी संकलित केले आहे. 

चला, पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात.

तोपर्यंत नमस्कार! 🙏

निवेदन :
नासा येवतीकर, धर्माबाद
📞 ९४२३६२५७६९

Tuesday, 14 July 2026

दिनविशेष माहिती - 15 जुलै

सशक्त तरुण : सशक्त भारत

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त प्रासंगिक लेख
दरवर्षी १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१४ मध्ये या दिवसाची घोषणा केली आणि 2015 पासून साजरा करण्यासाठी सुरुवात झाली. या दिवसामागील उद्देश म्हणजे तरुणांना रोजगारक्षम, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करणे. कारण कोणत्याही राष्ट्राचे भविष्य त्याच्या तरुणांच्या हातात असते. तरुण सक्षम असतील, कौशल्यसंपन्न असतील, तरच राष्ट्र प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचू शकते.
भारत हा जगातील सर्वांत तरुण देशांपैकी एक आहे. आपल्या देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही युवा आहे. हीच भारताची खरी ताकद आहे. मात्र केवळ मोठी युवा लोकसंख्या असणे पुरेसे नाही; त्या तरुणांमध्ये ज्ञान, कौशल्य, चारित्र्य, नवोपक्रमाची वृत्ती आणि राष्ट्रभक्ती असणे आवश्यक आहे. म्हणूनच "सशक्त तरुण : सशक्त भारत" ही केवळ घोषणा नसून देशाच्या विकासाचा मूलमंत्र आहे.
आजचे जग झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, डेटा सायन्स, डिजिटल तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, जैवतंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशील विचार आणि डिजिटल साक्षरता ही आजच्या तरुणांसाठी तितकीच महत्त्वाची आहेत.
स्वामी विवेकानंदांनी तरुणांना उद्देशून म्हटले होते, "उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका." हा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा संदेश दिला. महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा तरुणांनी कृतीत उतरविला, तर भारताचा विकास अधिक वेगाने होईल.
आज अनेक तरुण स्टार्टअप उभारत आहेत, नवीन संशोधन करत आहेत, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, सामाजिक उपक्रम राबवत आहेत आणि जगभरात भारताचा झेंडा उंचावत आहेत. ऑलिम्पिक, विज्ञान, अवकाश संशोधन, उद्योग, कला, साहित्य आणि माहिती-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत भारतीय युवकांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. ही यशोगाथा इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मात्र दुसरीकडे काही गंभीर आव्हानेही आहेत. बेरोजगारी, अपुरी कौशल्ये, व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, मानसिक ताण, दिशाहीनता आणि पर्यावरणाविषयीची उदासीनता ही चिंतेची बाब आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी शासन, शैक्षणिक संस्था, पालक आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजकता, करिअर मार्गदर्शन आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यावर अधिक भर दिला पाहिजे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्येही कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरते शिक्षण न घेता जीवनासाठी शिक्षण घ्यावे, स्वतःच्या आवडीची कौशल्ये विकसित करावीत आणि रोजगार निर्माण करणारे बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. "स्किल इंडिया", "स्टार्टअप इंडिया" आणि "डिजिटल इंडिया" यांसारखे उपक्रमही याच दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
कौशल्य म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नाही; तर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वावलंबनाचा पाया आहे. कौशल्यामुळे व्यक्ती स्वतःचे जीवन घडवते आणि समाजाच्या विकासातही मोलाचे योगदान देते. कौशल्यसंपन्न युवक हे राष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे आधारस्तंभ असतात.
आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संगणक, भाषा, संवाद, कला, क्रीडा, विज्ञान, पर्यावरण संरक्षण, आर्थिक साक्षरता आणि जीवनकौशल्ये यांचाही अभ्यास केला पाहिजे. वेळेचे नियोजन, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सतत शिकण्याची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख ठरली पाहिजे.
जागतिक युवा कौशल्य दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम साजरा करण्याचा दिवस नाही. हा प्रत्येक तरुणाने स्वतःच्या क्षमतेचा शोध घेण्याचा, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा आणि देशाच्या प्रगतीत आपले योगदान देण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करायचे असेल, तर प्रत्येक तरुण सक्षम, कुशल, सुसंस्कृत आणि जबाबदार असणे आवश्यक आहे. कारण राष्ट्राची खरी ताकद त्याच्या युवकांमध्ये असते. म्हणूनच आजच्या या जागतिक युवा कौशल्य दिनी आपण सर्वांनी एकच निर्धार करूया, 
"कौशल्यसंपन्न तरुण घडवू, आत्मनिर्भर भारत उभारू; सशक्त तरुण घडला तरच सशक्त भारत घडेल."

नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Sunday, 12 July 2026

दिनविशेष माहिती - 13 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज १३ जुलै  वीर बाजीप्रभू देशपांडे बलिदान दिन
 त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण बाजीप्रभू देशपांडे यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......
स्वराज्याचे महान शिलेदार, अद्वितीय पराक्रम, स्वामिनिष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक असलेले वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा आज स्मृतिदिन 

बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म इतिहासकारांच्या मतानुसार सतराव्या शतकाच्या प्रारंभी साधारणपणे इ.स. १६१५ च्या सुमारास झाला. लहानपणापासूनच त्यांना व्यायाम, कुस्ती, घोडेस्वारी आणि शस्त्रविद्येची विशेष आवड होती. त्यांची शरीरयष्टी धिप्पाड, मजबूत आणि बलवान होती. तलवारबाजी, दांडपट्टा आणि रणकौशल्य यांत ते अत्यंत प्रवीण होते. त्यांच्यात धैर्य, शिस्त, निष्ठा आणि नेतृत्वगुण यांचा सुंदर संगम होता.

सुरुवातीला ते बांदल देशमुखांच्या फौजेत कार्यरत होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्ताराच्या मोहिमेत बांदल मावळ आपल्या बाजूने घेतला. त्या वेळी बाजीप्रभूंचे शौर्य, प्रामाणिकपणा आणि स्वराज्यावरील निष्ठा पाहून महाराजांनी त्यांना आपल्या विश्वासू सरदारांमध्ये स्थान दिले. त्यानंतर त्यांनी अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवत स्वराज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले.

इ.स. १६६० मध्ये पन्हाळगडाला सिद्दी जौहरने वेढा दिला. त्या संकटातून छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचविण्याची जबाबदारी बाजीप्रभूंनी आपल्या खांद्यावर घेतली. महाराज पुढे निघाले आणि बाजीप्रभूंनी अवघ्या काहीशे मावळ्यांसह घोडखिंडीत हजारो शत्रूंना रोखून धरले.

"विशाळगडावर पोहोचल्याची तोफ ऐकू येईपर्यंत ही खिंड मी लढवीन!" अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. रणांगणात त्यांच्या शरीरावर असंख्य घाव झाले, तरीही त्यांनी तलवार हातातून सोडली नाही. अखेर विशाळगडावरून तोफेचा आवाज ऐकू आला. महाराज सुखरूप पोहोचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले आणि स्वराज्यासाठी लढता लढता त्यांनी वीरमरण स्वीकारले.

बाजीप्रभूंच्या या अतुलनीय बलिदानामुळेच छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचले आणि स्वराज्याची ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित झाली. त्यांच्या पवित्र बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंडीला "पावनखिंड" हे नाव देण्यात आले. आजही ती भूमी प्रत्येक मराठी माणसाला शौर्य, त्याग आणि स्वामिनिष्ठेची प्रेरणा देते.

विद्यार्थी मित्रांनो, बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान हे स्वराज्यासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचे प्रतीक आहे. त्यांचे शौर्य आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहतात."

चला, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आपणही प्रामाणिकपणा, धैर्य, शिस्त आणि राष्ट्रप्रेम या गुणांचा स्वीकार करण्याचा संकल्प करूया.

जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय हिंद !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - लहानपणापासूनच बाजीप्रभू देशपांडे यांना कशाची आवड होती. ?

बरोबर उत्तर आहे, लहानपणापासूनच बाजीप्रभू देशपांडे यांना व्यायाम, कुस्ती, घोडेस्वारी आणि शस्त्रविद्येची विशेष आवड होती.


दुसरा प्रश्न - सुरुवातीला बाजीप्रभू देशपांडे कोणाच्या फौजेत कार्यरत होते. ?

बरोबर उत्तर आहे, सुरुवातीला बाजीप्रभू देशपांडे बांदल देशमुखांच्या फौजेत कार्यरत होते. 


तिसरा प्रश्न - १६६० मध्ये पन्हाळगडाला कोणी वेढा दिला होता ?

बरोबर उत्तर आहे, १६६० मध्ये पन्हाळगडाला सिद्दी जौहरने वेढा दिला. 


चौथा प्रश्न - कोणत्या गडावरून तोफेचा आवाज ऐकू आल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण स्वीकारले ?

बरोबर उत्तर आहे, विशाळगडावरून तोफेचा आवाज ऐकू आल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण स्वीकारले

शेवटचा पाचवा प्रश्न - बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंडीला कोणते नाव देण्यात आले. ?

बरोबर उत्तर आहे - बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंडीला "पावनखिंड" हे नाव देण्यात आले.


चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769


Friday, 10 July 2026

दिनविशेष माहिती - 11 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 

कसे आहात ? मजेत ना !

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आज ११ जुलै अर्थात जागतिक लोकसंख्या दिन त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण लोकसंख्या याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......


११ जुलै हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ११ जुलै १९८७ रोजी जागतिक लोकसंख्या ५ अब्जांपर्यंत पोहोचली होती, ज्याला 'फाइव्ह बिलियन डे' म्हटले गेले. सन १९९० पासून हा दिवस अधिकृतपणे जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली

विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या म्हणजे एखाद्या देशात किंवा प्रदेशात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या. लोकसंख्या ही देशाची ताकद असली, तरी तिची वाढ योग्य प्रमाणात आणि नियोजनबद्ध असणे आवश्यक आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढल्यास अन्न, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, वाहतूक आणि पर्यावरण यांवर मोठा ताण येतो. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवरही अतिरिक्त दबाव निर्माण होतो.

आपला भारत देश हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. आज भारताची लोकसंख्या सुमारे १४८ कोटी (१.४७७ अब्ज) इतकी आहे तर चीनची लोकसंख्या सुमारे १४१.२ कोटी (१.४१२ अब्ज) आहे. भारताने २०२३ मध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला. भारताने २०२३ मध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला.

कुटुंब नियोजन कार्यक्रमाची आखणी सुरुवातीच्या काळापासून करत आली आहे. १९८० च्या दशकात "हम दो, हमारे दो" हा घोषवाक्य देशभर अत्यंत लोकप्रिय झाला.

लोकसंख्या वाढ ही देशासाठी फायदेशीर पण आहे आणि नुकसानदायक देखील आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदार व जागरूक राहणे गरजेचे आहे. शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समानता, मुलींचे शिक्षण, चांगले आरोग्य, स्वच्छता आणि लहान कुटुंबाचा स्वीकार हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

विद्यार्थी म्हणून आपणही या विषयात योगदान देऊ शकतो. पाणी व अन्नाची नासाडी टाळणे, झाडे लावणे, स्वच्छता राखणे, ऊर्जेची बचत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि लोकसंख्या व संसाधनांचा योग्य वापर याबाबत समाजात जनजागृती करणे ही आपली जबाबदारी आहे.

चला, आजच्या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपण सर्वजण "सुशिक्षित, सुदृढ, जागरूक आणि जबाबदार समाज घडवूया" असा संकल्प करूया.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो ?

बरोबर उत्तर आहे, 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो


दुसरा प्रश्न - जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात केव्हा झाली ?

बरोबर उत्तर आहे, १९९० पासून ११ जुलै हा दिवस अधिकृतपणे जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली.


तिसरा प्रश्न - आजच्या स्थितीत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता ?

बरोबर उत्तर आहे, भारत हा आजच्या स्थितीत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.


चौथा प्रश्न - भारताची आजची लोकसंख्या किती आहे ?

बरोबर उत्तर आहे, भारताची आजची लोकसंख्या 148 कोटी आहे


शेवटचा पाचवा प्रश्न - १९८० च्या दशकातील प्रसिद्ध घोषवाक्य कोणते ?

बरोबर उत्तर आहे - १९८० च्या दशकातील प्रसिद्ध घोषवाक्य म्हणजे "हम दो, हमारे दो".


ही सर्व माहिती Chat GPT च्या साहाय्याने तयार करण्यात आली आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769


Thursday, 9 July 2026

दिनविशेष माहिती - 10 जुलै

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज १० जुलै जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण ऊर्जा स्वातंत्र्य याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......

ऊर्जा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाला गती देणारी शक्ती. वीज, पेट्रोल, डिझेल, गॅस, कोळसा आणि सूर्यप्रकाश यांसारख्या विविध स्रोतांमधून आपल्याला ऊर्जा मिळते. परंतु कोळसा, पेट्रोल आणि डिझेल यांसारखे पारंपरिक ऊर्जास्रोत मर्यादित आहेत, आज नाही तर उद्या ते संपणारे आहे. त्यांचा अतिवापर केल्याने पर्यावरणाचे नुकसान होते.
म्हणूनच ऊर्जा स्वातंत्र्य म्हणजे शक्य तितक्या प्रमाणात जी ऊर्जा कधी ही संपणार नाही असे उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलऊर्जा आणि जैवऊर्जा यांसारख्या स्वच्छ व नूतनीकरणक्षम ऊर्जास्रोतांचा वापर करून ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होणे. यामुळे इंधनावरील आपले अवलंबन कमी होते, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने जपली जातात.
विद्यार्थी म्हणून आपणही ऊर्जा बचतीसाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. वर्गातून किंवा घरातून बाहेर पडताना दिवे, पंखे आणि इतर विद्युत उपकरणे बंद करणे, गरज नसताना विद्युत उपकरणाचा वापर करू नये, दिवसा नैसर्गिक प्रकाशाचा वापर करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि ऊर्जा बचतीचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.
लक्षात ठेवा, "ऊर्जा वाचवले तर पर्यावरण वाचेल, म्हणजेच आपले भविष्य सुरक्षित राहील." आजच्या या दिनानिमित्त आपण सर्वांनी ऊर्जा बचतीची सवय लावण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्याचा संकल्प करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, 10 जुलै रोजी जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 

दुसरा प्रश्न - संपणाऱ्या पारंपरिक दोन ऊर्जास्रोताची नावे सांगा ?
बरोबर उत्तर आहे, कोळसा, पेट्रोल आणि डिझेल यासारखी पारंपरिक ऊर्जास्रोत आज नाही तर उद्या संपतात.

तिसरा प्रश्न -  न संपणाऱ्या दोन ऊर्जास्रोताची नावे सांगा ?
बरोबर उत्तर आहे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलऊर्जा आणि जैवऊर्जा ही न संपणारी ऊर्जास्रोत आहेत. 

चौथा प्रश्न - वर्गातून किंवा घरातून बाहेर पडताना काय करावे ?
बरोबर उत्तर आहे, वर्गातून किंवा घरातून बाहेर पडताना दिवे व पंखे बंद करावेत. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न जरा विचार करून द्या - पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काय करावे ?
बरोबर उत्तर आहे - पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ऊर्जेची बचत करणे आवश्यक आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 7 July 2026

दिनविशेष 08 जुलै

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 08 जुलै जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण ॲलर्जी याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ...... 
 "जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन" साजरा करण्याचा उद्देश म्हणजे ॲलर्जीबाबत जनजागृती करणे आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय सर्वांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
ॲलर्जी म्हणजे आपल्या शरीराची एखाद्या पदार्थावर होणारी अतिसंवेदनशील प्रतिक्रिया. काही लोकांना धूळ, परागकण, धूर, बुरशी, विशिष्ट अन्नपदार्थ, औषधे किंवा पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे ॲलर्जी होऊ शकते.
ॲलर्जी झाल्यास शिंक येणे, नाक वाहणे, डोळे लाल होणे किंवा खाज येणे, त्वचेवर पुरळ उठणे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही वेळा ती गंभीर स्वरूपाचीही असू शकते. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास पालकांना किंवा शिक्षकांना सांगून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आपण काही सोप्या चांगल्या सवयी लावून ॲलर्जीपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. घर आणि शाळा स्वच्छ ठेवणे, धुळीपासून दूर राहणे, हात नियमित धुणे, पौष्टिक आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, धूर व प्रदूषणापासून शक्य तितके दूर राहणे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घेणे हे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थी म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.
चला, आजच्या या जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिनानिमित्त आपण सर्वजण स्वच्छतेची सवय लावूया, आरोग्याची काळजी घेऊया आणि ॲलर्जीबाबत स्वतःही जागरूक राहूया तसेच इतरांनाही जागरूक करूया.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न -  जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन कधी साजरा केला जातो ? 
बरोबर उत्तर आहे, दरवर्षी ०८ जुलै रोजी जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन साजरा केला जातो

दुसरा प्रश्न - ॲलर्जीची शंका आल्यास कोणाचा सल्ला घ्यावा ?
बरोबर उत्तर आहे, ॲलर्जीची शंका आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तिसरा प्रश्न -  ॲलर्जी होण्याची दोन कारणे सांगा ?
बरोबर उत्तर आहे, धूळ, परागकण, धूर, काही अन्नपदार्थ किंवा औषधे यामुळे ॲलर्जी होऊ शकते. 

चौथा प्रश्न - ॲलर्जी कसे ओळखणार दोन लक्षणे सांगा.
बरोबर उत्तर आहे, शिंक येणे, नाक वाहणे, डोळ्यांना खाज येणे, त्वचेवर पुरळ उठणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही ॲलर्जीची लक्षणे आहेत. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न -  ॲलर्जीपासून बचाव करण्यासाठी कोणत्या सवयी महत्त्वाच्या आहेत ?
बरोबर उत्तर आहे  - स्वच्छता राखणे, धुळीपासून दूर राहणे, हात धुणे, पौष्टिक आहार घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Monday, 29 June 2026

शेख सलीम सर सेवानिवृत्ती ( Retirement of Shaikh Salim Sir )

विद्यार्थी हेच दैवत मानणारे शेख सलीम सर
सेवानिवृत्तीचा हा क्षण आनंदाचा आहे की भावनांनी ओथंबून गेलेला आहे, हे सांगणे जरा कठीण आहे. कारण आज 30 जून रोजी आपण अशा व्यक्तिमत्त्वाला सन्मानपूर्वक निरोप देणार आहोत, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणक्षेत्रासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी समर्पित केले. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय शेख सलीम सर.
शिक्षक हा केवळ पाठ्यपुस्तक शिकवणारा नसतो, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा शिल्पकार असतो. या वाक्याचा प्रत्यय सलीम सरांच्या संपूर्ण सेवाकाळात वारंवार आला. मुलांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणारे, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेली क्षमता ओळखून ती विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे ते खऱ्या अर्थाने हाडाचे शिक्षक होते. प्रत्येक विद्यार्थी यशस्वी व्हावा, आत्मविश्वासाने पुढे जावा आणि उत्तम नागरिक घडावा, नेहमी हीच त्यांची धडपड होती.
शिस्त हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. शाळेची वेळ सुरू होण्यापूर्वी शाळेत उपस्थित राहणे आणि दिवसाचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतरच सर्वांत शेवटी शाळेतून बाहेर पडणे, ही त्यांची कार्यशैली होती. वेळेचे नियोजन, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि कामातील सातत्य यामुळे ते सर्व शिक्षकांसाठी प्रेरणास्थान ठरले.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांचा प्रेमळ स्वभाव. विद्यार्थी असो, शिक्षक असो, कर्मचारी असो किंवा पालक प्रत्येकाशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला. प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शक्य ते सहकार्य करणे, ही त्यांची सहज वृत्ती होती. त्यामुळे त्यांनी केवळ सहकारीच नव्हे, तर असंख्य जिवलग मित्र कमावले. आयुष्यात शत्रूपेक्षा मित्र अधिक कमावणारे व्यक्तिमत्त्व हीच त्यांची खरी ओळख आहे.
मुख्याध्यापक म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी नेतृत्व केले. प्रशासनात शिस्त, निर्णयांमध्ये पारदर्शकता आणि सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत उल्लेखनीय होती. शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रत्येक शिक्षकाला संधी दिली, जबाबदाऱ्या वाटून दिल्या आणि सामूहिक नेतृत्वावर भर दिला. त्यामुळे शाळेचा सर्वांगीण विकास साधता आला. ते ज्या ज्या ठिकाणी सेवा केली आहे तेथे नंदनवन फुलवले आहे. 
पालकांशी त्यांचा असलेला सुसंवादही तितकाच प्रेरणादायी होता. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक आणि शाळा यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे, हे त्यांनी नेहमीच कृतीतून दाखवून दिले. पालकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले आणि शिक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याची भावना दृढ केली. एखादा विद्यार्थी शाळेत अनुपस्थित असेल तर त्यांची समस्या जाणून घेऊन सोडवणूक करण्याची त्यांची खास पद्धत होती. 
शासकीय अधिकारी असोत किंवा विविध विभागातील मान्यवर, प्रत्येकाशी त्यांनी आदरयुक्त आणि समतोल संवाद साधला. कोणत्याही सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत शाळेचे काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला. त्यामुळे शाळेची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
शिक्षण हे केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नसते, याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, विविध उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रम यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, हा त्यामागील त्यांचा प्रामाणिक हेतू होता. या विविध उपक्रमात ते स्वतः अग्रेसर राहायचे. त्यांचा उत्साह पाहून इतर शिक्षक देखील त्या उपक्रमात हिरीरीने सहभागी होत असत. त्यामुळे त्यांची शाळा नावारूपाला येत असत.
शिक्षक संघटना आणि पतसंस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी शिक्षकांच्या हितासाठी सातत्याने काम केले. गरज पडेल तेव्हा मदतीचा हात पुढे करणे, सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, ही त्यांची जपलेली मूल्ये होती. म्हणूनच ते केवळ प्रशासक नव्हते, तर सर्वांचे विश्वासू सहकारी होते.
मराठी भाषेवर त्यांची असलेली उत्कृष्ट पकड हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक उल्लेखनीय पैलू आहे. प्रसंगानुरूप बोलण्याची शैली, विचारांची प्रभावी मांडणी आणि भाषेचा नेमका वापर यामुळे त्यांचे प्रत्येक भाषण व मार्गदर्शन प्रेरणादायी ठरत असे. शब्दांची श्रीमंती आणि विचारांची खोली यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत होता.
आज ते शासकीय सेवेतून निवृत्त होत असले, तरी त्यांची मूल्ये, कार्यपद्धती, नेतृत्व, माणुसकी आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आमच्या मनात सदैव जिवंत राहील. त्यांनी घालून दिलेला आदर्श पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.
जाता जाता शेख सलीम सरांसाठी एक रचना 

 "सर, तुमच्या वाटेवर....."

शाळेच्या त्या प्रत्येक वाटेवर,
आजही तुमची पावले उमटतील.
तुम्ही नसाल उद्या सेवेमध्ये,
तरी आठवणी मात्र सोबत चालतील.

वेळेआधी शाळेत येणारे,
शेवटी कुलूप लावून जाणारे.
कर्तव्याला पूजा मानणारे,
विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे.

मुलांच्या गुणवत्तेचा ध्यास घेत,
ज्ञानदीप सतत प्रज्वलित ठेवला.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामध्ये,
स्वतःचा आनंद शोधत राहिला.

मुख्याध्यापक नव्हे, खरे मार्गदर्शक,
नेतृत्वाला दिला नवा अर्थ.
प्रेम, विश्वास, माणुसकी आणि शिस्त 
यांनीच सजविला जीवनपथ.

शिक्षक, विद्यार्थी, पालक सारे,
आपलेपणाने जोडत राहिलात.
प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन,
हृदयामध्ये घर करून राहिलात.

विज्ञान असो की सांस्कृतिक मंच,
प्रत्येक ठिकाणी उत्साह भरलात.
संघटना, पतसंस्था, सहकाऱ्यांसाठी,
नेहमी मदतीचा हात पुढे केलात.

मराठी शब्दांना दिली ताकद,
विचारांना दिली सुंदर दिशा.
हसतमुख चेहरा, निर्मळ मन,
हीच तुमच्या जीवनाची भाषा.

मित्रांची श्रीमंती कमावत गेलात,
मनांवर प्रेमाची सही करत गेलात.
सेवा संपली म्हणतात सारे,
पण प्रेरणेचा प्रवास सुरूच ठेवत गेलात.

आज निरोप देताना एवढेच म्हणू,
तुम्ही पदावरून निवृत्त झालात;
पण आमच्या हृदयातून कधीच नाही.
तुमच्या कर्तृत्वाचा सुवास,
आमच्या प्रत्येक पावलात कायम राही.

तुम्ही कालही आमचे प्रेरणास्थान होतात,
तुम्ही आजही आमच्या अभिमानात आहात.
उद्या काळ पुढे सरकेल तरी,
तुम्ही सदैव आमच्या हृदयातच आहात. 🌹

आदरणीय शेख सलीम सर, आपण सेवेतून निवृत्त होत आहात; परंतु आमच्या मनातून कधीही निवृत्त होणार नाही. आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, समाधान, दीर्घायुष्य आणि कौटुंबिक सुख लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्या कर्तृत्वाला मनःपूर्वक सलाम!
आपल्या सेवेला विनम्र अभिवादन!
आणि आपल्या उज्ज्वल, निरामय सेवानिवृत्त जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, 
प्रा. शाळा पिंपळगाव 
ता. धर्माबाद जि. नांदेड 
9423625769

दिनविशेष माहिती - 01 जुलै ( Vasantrao Naik )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 उन्हाळी सुट्टीनंतर आपण सर्वजण नवीन वर्ग आणि नवीन शाळेत आला आहात. होय ना ! 
मी नासा येवतीकर, या वर्षातील पहिल्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आज 01 जुलै अर्थात कृषिदिन त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दूरदृष्टीचे नेते होते. त्यांना "महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक" म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेती, सिंचन आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देऊन महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणले.
वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव वसंतराव फुलसिंग नाईक असे होते. त्यांचे बालपण ग्रामीण शेतकरी कुटुंबात गेले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहता आल्या. त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून वकिली व्यवसाय सुरू केला; परंतु समाजसेवेची आवड असल्याने ते राजकारणात आले.
वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष भर दिला.
त्यांच्या कार्यकाळात शेतीच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांनी आधुनिक शेती पद्धती, सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि सिंचन सुविधा यांचा प्रसार केला. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे कृषी उत्पादनात मोठी वाढ झाली. या योगदानामुळे त्यांना "महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक" असे म्हटले जाते. हरित क्रांती म्हणजे कृषी उत्पादनात झालेली मोठी वाढ.
वसंतराव नाईक यांनी दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष उपाययोजना केल्या. त्यांनी जलसंधारण, विहिरी, तलाव आणि सिंचन प्रकल्पांना चालना दिली. शेतकऱ्यांना कर्जसुविधा आणि कृषी शिक्षण उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या धोरणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. त्यांनी रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. 
शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या. समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठीही त्यांनी विविध योजना राबवल्या. वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात राज्यात चार कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
वसंतराव नाईक यांचे संपूर्ण जीवन कष्ट, प्रामाणिकपणा आणि जनसेवा यांचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यभर कार्य केले. आजही त्यांचे कार्य सर्वासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्णय सन १९८९ मध्ये घेण्यात आला.
वसंतराव नाईक यांचे १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे निधन झाले.
वसंतराव नाईक यांच्या जीवनातून परिश्रम, दूरदृष्टी, समाजसेवा आणि नेतृत्वगुण यांचा आदर्श घ्यावा. देशाच्या विकासासाठी शिक्षणाबरोबरच समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, हा संदेश त्यांचे जीवन आपल्याला देते.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न -  वसंतराव नाईक यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या गावात झाला. 

दुसरा प्रश्न - वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते ?
बरोबर उत्तर आहे, वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते. 

तिसरा प्रश्न - हरित क्रांतीचे जनक असे कोणास म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते.

चौथा प्रश्न - वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात राज्यात किती कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. ?
बरोबर उत्तर आहे, वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात राज्यात चार कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.

आता शेवटचा पाचवा प्रश्न - वसंतराव नाईक यांची जयंती कोणता दिन म्हणून साजरा केला जातो. ?
बरोबर उत्तर आहे - वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 28 June 2026

वटपौर्णिमा ( Vatpournima - 2026)

आधुनिक काळातील महिला आणि वटपौर्णिमा
भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सण केवळ धार्मिक विधींशी संबंधित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक मूल्यांचे जतन करणारे असतात. वटपौर्णिमा हा त्यापैकी एक महत्त्वाचा सण आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा सण विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी करतात. पौराणिक कथेनुसार, सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळविले, त्या प्रसंगाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. परंतु, आधुनिक काळात शिक्षण, विज्ञान, स्त्री-सक्षमीकरण आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे वटपौर्णिमेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे.
पूर्वीच्या काळात स्त्रीचे संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि पतीभोवती केंद्रित होते. तिच्या अस्तित्वाची ओळख बहुधा पत्नी आणि आई या भूमिकांपुरती मर्यादित होती. त्यामुळे वटपौर्णिमेचे व्रत हे तिच्या कर्तव्याचा एक भाग मानले जात असे. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आधुनिक स्त्री ही शिक्षित, स्वावलंबी, आत्मविश्वासपूर्ण आणि निर्णयक्षम झाली आहे. ती केवळ घरापुरती मर्यादित न राहता शिक्षण, उद्योग, प्रशासन, विज्ञान, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहे.
या बदलत्या सामाजिक वास्तवामुळे वटपौर्णिमेच्या स्वरूपात आणि त्यामागील भावनेतही परिवर्तन झाले आहे. आधुनिक स्त्रिया हा सण अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यामागील नातेसंबंधातील प्रेम, विश्वास, निष्ठा आणि परस्पर आदर यांचे प्रतीक म्हणून पाहतात. आज अनेक स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत श्रद्धेने करतात, परंतु त्याचवेळी त्या पती-पत्नी या नात्यात समानतेलाही तितकेच महत्त्व देतात.
आधुनिक समाजात विवाह हा केवळ स्त्रीने पतीसाठी त्याग करण्याचा संबंध नसून, तो परस्पर सहकार्य, सन्मान आणि जबाबदारीवर आधारित असतो. त्यामुळे काही ठिकाणी पतीदेखील पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात किंवा उपवास पाळतात. ही बाब स्त्री-पुरुष समानतेच्या विचाराला बळ देणारी आहे. नात्यातील एकतर्फी त्यागाऐवजी परस्पर समर्पणाची भावना आधुनिक कुटुंबव्यवस्थेची गरज बनली आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात वटपौर्णिमा साजरी करण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. शहरांमध्ये वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे काही स्त्रिया सामूहिक पूजा, ऑनलाइन पूजा किंवा साध्या स्वरूपात हा सण साजरा करतात. सामाजिक माध्यमांवर शुभेच्छा देणे, पारंपरिक वेशभूषेतील छायाचित्रे शेअर करणे यामुळे या सणाला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. तथापि, या सणाचे मूळ तत्त्व जपणेही तितकेच आवश्यक आहे.
आजच्या काळात काही जण वटपौर्णिमेसारख्या परंपरांवर टीका करतात. त्यांना हा सण स्त्रीवर अन्याय करणारा किंवा जुनाट वाटतो. परंतु, कोणत्याही परंपरेचे मूल्यमापन करताना तिच्या मूळ उद्देशाचा विचार करणे आवश्यक आहे. जर एखादी स्त्री स्वतःच्या इच्छेने, श्रद्धेने आणि आनंदाने हा सण साजरा करत असेल, तर त्या निवडीचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे, कोणालाही हा सण साजरा करण्यासाठी बळजबरी करणेही योग्य नाही. आधुनिकतेचा खरा अर्थ परंपरा नाकारणे नसून, विवेकाने त्यांचा स्वीकार करणे हा आहे.
वटपौर्णिमा हा सण आजच्या काळात स्त्रीच्या त्यागाचे नव्हे, तर कुटुंबातील प्रेम, विश्वास, समर्पण आणि सहजीवनाच्या मूल्यांचे प्रतीक म्हणून पाहिला जावा. आधुनिक स्त्री परंपरा आणि प्रगती यांचा समतोल साधत आहे. ती आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत असतानाच समानता, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मूल्यांनाही जपते. त्यामुळे आधुनिक काळातील वटपौर्णिमा ही केवळ एक धार्मिक परंपरा न राहता, बदलत्या समाजव्यवस्थेत नातेसंबंध अधिक दृढ करणारा आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणारा एक अर्थपूर्ण सण ठरतो. 

वटपौर्णिमा

वटवृक्षापरी नाते असावे,
प्रेमाने सदैव फुलत राहावे.
विश्वासाच्या मजबूत मुळांनी,
संसार सुखाचा बहरत राहावे.

सावित्रीच्या निष्ठेचा आदर्श,
जीवनाला देतो नवा हर्ष.
त्याग, माया, प्रेम नि समर्पण,
कुंटुंबासाठी जीवन अर्पण.

वटवृक्ष देई शीतल छाया,
जशी कुटुंबाची प्रेमळ माया.
सुख-समृद्धी, आरोग्य लाभो,
प्रत्येक घरात आनंद नांदो.

वटपौर्णिमेच्या या पावन दिनी,
बंध अधिक दृढ होवोत मनी.
सौख्य, समाधान, मंगल क्षणांनी,
जीवन फुलो प्रेमाच्या फुलांनी.

- नासा येवतीकर, 9423625769


सर्व महिला भगिनीना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🙏

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, 9423625769

Thursday, 25 June 2026

विजेचा शॉक की रॉक ? ( Light Bill )

विजेचा शॉक की रॉक ?
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात वीज हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. उद्योग, शेती, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन हे विजेवर अवलंबून असल्याने वीजदरांमध्ये होणारे बदल थेट जनतेच्या खिशावर परिणाम करतात. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले विधान विशेष लक्षवेधी ठरले आहे. पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रातील वीज गुजरातपेक्षाही स्वस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. या घोषणेनंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, हा विजेचा "शॉक" आहे की खरोखरच "रॉक" ठरणारा निर्णय ?
सध्या तामिळनाडू व तेलंगणा राज्यात विजेचा दर 9.30 ₹, मध्यप्रदेश 8.27 ₹ त्यानंतर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात विजेचा दर 8.19 ₹ प्रति युनिट असा आहे. तर गुजरातचा प्रति युनिट दर 7.87 ₹ असा आहे. गुजरात राज्य हे उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण, पायाभूत सुविधा आणि तुलनेने कमी वीजदर यासाठी ओळखले जाते. अनेक उद्योगपती गुजरातकडे आकर्षित होण्यामागे स्वस्त आणि सातत्यपूर्ण वीजपुरवठा हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्राची वीज गुजरातपेक्षा स्वस्त करण्याचे लक्ष्य निश्चितच महत्त्वाकांक्षी आहे. जर हे लक्ष्य साध्य झाले, तर राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते.
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्यांपैकी एक आहे. मात्र, वाढती वीज मागणी, उत्पादन खर्च, वितरणातील तांत्रिक तोटा आणि आर्थिक अडचणी यामुळे वीजदरांवर दबाव निर्माण होत असतो. अनेकदा उद्योग क्षेत्राने महाराष्ट्रातील तुलनेने जास्त वीजदरांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा वेळी सरकारची ही घोषणा उद्योगांसाठी आशेचा किरण ठरू शकते.
वीज स्वस्त झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा उद्योग क्षेत्राला होईल. उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे उद्योग अधिक स्पर्धात्मक बनतील. नवीन गुंतवणूक आकर्षित होईल आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल. "मेक इन महाराष्ट्र" या संकल्पनेला बळकटी मिळू शकते. याशिवाय लघु व मध्यम उद्योगांनाही आर्थिक दिलासा मिळेल.
शेती क्षेत्रासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. आजही अनेक शेतकरी सिंचनासाठी विजेवर अवलंबून आहेत. वीजदर कमी झाल्यास शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील आर्थिक चक्र अधिक गतिमान होऊ शकते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी हा एक सकारात्मक टप्पा ठरू शकतो.
सर्वसामान्य ग्राहकांसाठीदेखील स्वस्त वीज ही दिलासादायक बाब असेल. घरगुती वीजबिलांवरील भार कमी झाल्यास कुटुंबांच्या मासिक खर्चात बचत होऊ शकते. महागाईच्या काळात ही बचत नागरिकांसाठी महत्त्वाची ठरेल. त्यामुळे सरकारच्या या घोषणेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मात्र, कोणतीही घोषणा प्रत्यक्षात उतरवणे हे मोठे आव्हान असते. वीज स्वस्त करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे, नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणे, वितरणातील नुकसान कमी करणे आणि आर्थिक व्यवस्थापन सुधारणे आवश्यक आहे. केवळ घोषणा करून अपेक्षित परिणाम साध्य होणार नाहीत. त्यासाठी दीर्घकालीन नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे.
सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि इतर हरित ऊर्जास्रोतांचा वापर वाढविणे हा या दिशेने महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. महाराष्ट्रात नवीकरणीय ऊर्जेच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्यास वीज उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच पर्यावरणपूरक विकासालाही चालना मिळेल. शेतीला दिवसा वीज पुरवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या 'सौर कृषिपंप' कुसुम योजनेत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात तब्बल १० लाखांपेक्षा जास्त सौर कृषिपंप बसवण्यात आले असून, देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी ६४ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. घरांवर सोलर पॅनेल बसवण्याच्या 'पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने'तही महाराष्ट्र आघाडीवर असून, छतावरील प्रकल्प बसवण्याच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
स्थापित एकूण सौर ऊर्जा क्षमतेचा विचार करता महाराष्ट्र देशात ५ व्या क्रमांकावर आहे, ज्याची क्षमता आता ८,४०० मेगावॅटहून अधिक झाली आहे.
सरकारच्या या घोषणेकडे विरोधक आणि तज्ज्ञही बारकाईने पाहत आहेत. काहीजण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असले, तरी काहींनी याची व्यवहार्यता आणि आर्थिक परिणाम याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत सरकार कोणती ठोस पावले उचलते, यावर या योजनेचे यश अवलंबून असेल.
"विजेचा शॉक की रॉक?" या प्रश्नाचे उत्तर आजच देणे कठीण आहे. जर सरकारने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवून महाराष्ट्रातील वीजदर गुजरातपेक्षाही कमी केले, तर हा निर्णय निश्चितच "रॉक" ठरेल. उद्योग, शेती आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी तो विकासाचा नवा अध्याय लिहू शकतो. मात्र, अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, पारदर्शक धोरणे आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.
शेवटी, स्वस्त वीज ही केवळ आर्थिक बाब नसून ती विकासाची गुरुकिल्ली आहे. महाराष्ट्राला अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि प्रगत बनविण्यासाठी वीज क्षेत्रातील सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही घोषणा आगामी काळात महाराष्ट्रासाठी "शॉक" नव्हे तर "रॉक" ठरते का, याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

( काही आकडे नेट वरून घेण्यात आली आहेत. )

- नासा येवतीकर, स्तंभलेखक
धर्माबाद जि. नांदेड 9423625769

Wednesday, 24 June 2026

बालविवाह : एक सामाजिक समस्या ( Stop Child Marriage )

बालविवाह : एक सामाजिक समस्या
भारतीय समाजात विवाह ही एक महत्त्वाची सामाजिक संस्था मानली जाते. विवाहामुळे दोन व्यक्तींबरोबरच दोन कुटुंबांचेही नाते दृढ होते. मात्र विवाहासाठी योग्य वय असणे अत्यंत आवश्यक आहे. अल्पवयीन मुलगा किंवा मुलीचा विवाह लावून देण्याच्या प्रथेला बालविवाह असे म्हणतात. भारतातील कायद्यानुसार मुलीचे विवाहाचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात होणारा विवाह हा बालविवाह मानला जातो आणि तो कायद्याने गुन्हा आहे.
आज विज्ञान, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या युगातही बालविवाहाची समस्या पूर्णपणे नष्ट झालेली नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे अलीकडील अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवला आहे. हा निर्णय बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
समाजात बालविवाहामागे अनेक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. लोकांचा अशिक्षितपणा आणि अज्ञान - ग्रामीण तसेच शहराच्या काही भागांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम माहिती नसतात. त्यामुळे ते परंपरेच्या नावाखाली मुला-मुलींचे लवकर लग्न करतात.
दुसरे एक कारण म्हणजे गरीबी. गरीब कुटुंबांना मुलीचा सांभाळ हा आर्थिक भार वाटतो. त्यामुळे लहान वयातच तिचे लग्न करून जबाबदारी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मुलींचे वय वाढत जाते तसे पालकांची चिंता वाढत जाते. 
तिसरे महत्वाचे कारण म्हणजे सामाजिक परंपरा आणि रूढी पद्धत. काही समाजांमध्ये बालविवाह ही जुनी परंपरा मानली जाते. समाजाच्या दबावामुळे अनेक कुटुंबे या प्रथेला अनुसरतात. प्रथा मोडली तर काही कोप होईल आणि आपल्या कुटुंबाला त्याचा त्रास सोसावा लागेल अंधश्रद्धेच्या पोटी अशी अनामिक भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे ते बालविवाहाला बळी पडतात.
सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेची चिंता होय. मुलींच्या सुरक्षेबाबत असलेली भीती आणि सामाजिक असुरक्षितता यामुळे काही पालक लवकर विवाह करण्यास प्राधान्य देतात. आज समाजात मुलींच्या बाबतीत ज्या काही घटना घडत आहेत. त्यामुळे मुली स्वतःला असुरक्षित जाणवत आहेत. तर मुलींच्या वडीलाना काळजी आणि भीती वाटत आहे. मुलींचे लवकरात लवकर लग्न करून जबाबदारीमधून मुक्त होण्यासाठी धावपळ करताना दिसून येतात. मुलीच्या बापाचे काळीज काय असते ? हे त्याच्या जन्माला गेल्यावरच कळते हे ही सत्य आहे. 
जनतेला कायद्याविषयी अपुरी माहिती असणे हे ही एक महत्वाचे कारण दिसून येते. समाजात बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती नसल्याने अनेक ठिकाणी अजूनही बालविवाह घडताना दिसतात. बालविवाह केल्याने कायद्यानुसार कोणती शिक्षा होते याची माहिती लोकांना नाही कारण या कायद्याखाली अटक झालेल्याची व शिक्षा झालेल्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी कमी आहे. 
बालविवाहाचे परिणाम मुलांवर कमी पण मुलीवर मोठ्या प्रमाणात दिसून येतात. बालविवाहाचे दुष्परिणाम केवळ मुलीवरच नव्हे तर संपूर्ण समाजावर होतात. सर्वप्रथम मुलींच्या शिक्षणात खंड पडतो. बालविवाह झालेल्या मुलींना अनेकदा शिक्षण अर्धवट सोडावे लागते. काही मुली आपले माध्यमिक शिक्षण देखील पुर्ण करत नाहीत. त्यापूर्वीच त्यांचे लग्न केल्या जाते. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाचे मार्ग बंद होतात.
लहान वयात लग्न केल्यामुळे मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. लहान वयात गर्भधारणा झाल्यास माता व बालक दोघांच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कुपोषण, रक्तक्षय आणि प्रसूतीतील गुंतागुंत यांचा धोका वाढतो. शिक्षण घेण्याच्या वयात मुलगी माता होते आणि विशीच्या घरात तिचे आयुष्य संपूष्टात येते. तिचे स्वप्नांना पंख फुटण्याच्या अगोदरच लग्न या विधीमुळे पंख कापले जातात. ती आयुष्यात गुलामगिरीत जीवन जगते. यामुळे ती नेहमी मानसिक ताणतणाव मध्ये जीवन जगत असते. बालपणातच वैवाहिक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागल्यामुळे मुली मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त होतात. त्यांचे बालपण हरवून जाते. प्रत्येकाचा विकास हा फक्त शिक्षणामुळे होतो. पण मुलींचे शिक्षण अर्धवट राहत असल्याने ते कधीच प्रगल्भ होत नाहीत. त्यामुळे घरात त्यांना दुय्यम स्थान दिल्या जाते. घरातील ती एक शोभेची वस्तू बनून जाते. शिक्षण नसल्याने तिच्या बुद्धीचा म्हणावा तेवढा विकास होत नाही. ती स्वतः काही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून तिच्याकडे आर्थिक स्वावलंबनाचा अभाव असतो. शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होतात. परिणामी त्या आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून राहतात. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला असे समर्थ रामदास स्वामी म्हटले आहे, तशी त्यांची अवस्था होते. त्यामुळे गरिबीचे चक्र कायम त्यांच्या भोंवती फिरत असते. शिक्षणाचा अभाव, कमी उत्पन्न आणि मोठे कुटुंब यामुळे गरिबीचे चक्र पुढील पिढीतही कायम राहते. 
या नव्या कायद्यामुळे काय होईल ?
महाराष्ट्र शासन लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा विचार करत आहे. हा नियम लागू झाल्यास अनेक सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.
विवाहापूर्वी वधू-वराचे वय सर्वाना सहज तपासता येईल. त्यामुळे कोणालाही बालविवाह लपविणे कठीण होईल. तसेच प्रशासनाला संशयास्पद विवाहांवर लक्ष ठेवणे सोपे जाईल. पालक आणि समाजामध्ये कायद्याबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होईल. समाजातील बालविवाह होण्याचे प्रमाण काही अंशी तरी कमी होण्यास मदत होईल. मुलींना आपले उच्च माध्यमिक शिक्षण तरी पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ आणि संधी मिळेल.
मात्र हा नियम केवळ कायदेशीर नियंत्रणासाठी नसावा तर समाजामध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणारा ठरला तर अधिक चांगले होईल. बालविवाह पूर्णपणे थांबविण्यासाठी केवळ कायदा पुरेसा नाही. त्यासाठी प्रभावी जनजागृती आणि सामाजिक सहभागाची आवश्यकता आहे.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जागरूकता कार्यक्रम घेऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना बालविवाहाच्या दुष्परिणामांची माहिती देणे आवश्यक आहे. ग्रामसभांमधून प्रचार गावपातळीवर ग्रामसभा, महिला बचतगट आणि युवक मंडळांच्या माध्यमातून जनजागृती करावी. प्रसारमाध्यमांचा वापर जसे की दूरदर्शन, रेडिओ, वृत्तपत्रे आणि सामाजिक माध्यमांद्वारे व्यापक प्रचार करावा लागेल. बालविवाह घडवून आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून इतरांसाठी प्रतिबंधात्मक संदेश देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण आणि विविध शासकीय योजनांद्वारे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे. समाजात मुलीं सुरक्षितपणे वावरू शकतील असे संरक्षित वातावरण तयार करणे आवश्यक आहे. तसेच मुलीं स्वतः संरक्षण करू शकतील असे कराटेचे प्रशिक्षण प्रत्येक शाळेत बंधनकारक करण्यात यावे. ज्यामुळे मुलीं स्वतः स्वतःचे संरक्षण करू शकतील. त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल. 
बालविवाह ही केवळ एक सामाजिक समस्या नसून मुलांच्या मूलभूत हक्कांवर होणारा अन्याय आहे. मुलींना शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनाच्या संधींपासून वंचित ठेवणारी ही प्रथा समाजाच्या प्रगतीस अडथळा निर्माण करते. महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापण्याचा नियम हा बालविवाह रोखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो. मात्र कायद्याबरोबरच समाजाची मानसिकता बदलणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि सातत्यपूर्ण जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येक बालकाला सुरक्षित, आनंदी आणि शिक्षणपूर्ण बालपण मिळावे, यासाठी बालविवाहमुक्त समाज निर्माण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, 
धर्माबाद जि. नांदेड 
9423625769

Tuesday, 23 June 2026

पुस्तक परिचय - माय माती अन ती ( Book Review )

मातीशी नाळ जुळलेला काळजाचा ठाव घेणारा कवी अनिकेत देशमुख यांचा कवितासंग्रह " माय माती अन् ती "
उच्चविद्याविभूषित असलेल्या व कवी निवेदक म्हणून सर्वदूर सुपरिचित असलेल्या कवी अनिकेत देशमुख यांचा नुकताच प्रकाशित झालेला दुसरा काव्यसंग्रह "माय माती अन् ती" वाचण्यात आला. याआधी त्यांचा "पाऊलखुणा" नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला असून वाचकांनी त्यास खूप चांगला प्रतिसाद दिला होता. अनिकेत देशमुख हे साहित्यिक जगतातलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून अनेकांना सुपरिचित आहेत. अनिकेत देशमुख एक विद्यार्थीप्रिय नवोपक्रमशील आदर्श शिक्षक आहेत. ते एक युवा कवी, बहारदार निवेदक व उत्कृष्ट सुत्रसंचालनकर्ते आहेत. त्याचबरोबर ते एक नम्र, मितभाषी व प्रतिभावंत कवी साहित्यिक आहेत. त्यांची कविता त्यांच्यासारखीच साधी, सरळ, सोपी, नितळ, लयदार, कसदार, मातीशी नाळ जोडणारी आहे. हा काव्यसंग्रह काव्यरसिक वाचकांच्या काळजाचा ठाव घेणारा काव्यसंग्रह आहे. काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावर असलेली युवा कादंबरीकार पुष्पराजदादा गावंडे माजी सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांची पाठराखण या कवीला व या काव्यसंग्रहाला समर्पक अशी आहे.
 या काव्यसंग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत लोककवी प्रा.प्रशांतदादा मोरे यांनी चिंतनात्मक व अभ्यासपूर्ण स्वरूपात लिहिलेली  "सृजनाची गाथा- माय माती अन् ती" ही प्रस्तावना वाचनीय आहे त्याचबरोबर काव्यसंग्रहाची महती वाढविणारी आहे. त्याचबरोबर कविता कशी असावी हे अत्यंत साध्या व सोप्या शब्दात आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख यांनी मांडले आहे. त्यांनी कवी अनिकेत देशमुख यांच्या कवितेची वाट प्रसिद्ध लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या वाटेवर जाणारी कविता असा महत्त्वाचा उल्लेख केला आहे. जो महत्त्वाचा आहे.
माय, माती अन् ती म्हणजे लेखणी  या तिन्ही एकमेकांशी अतूट नात्याने जोडलेल्या आहेत. माय माणसाला जन्म देते, प्रेम, माया आणि संस्कार देते. माती माणसाला अन्न, आधार आणि ओळख देते. तर लेखणी या दोन्हींचे महत्त्व, त्याग, वेदना आणि गौरव शब्दरूपाने समाजासमोर मांडते. त्याचबरोबर जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी "ती " आपल्याला वेगवेगळ्या रूपात या काव्यसंग्रहात भेटत राहते वाचकांशी हितगुज करते. हे या काव्यसंग्रहाचे वेगळेपण आहे.
आईच्या मायेतून आणि मातीच्या सहवासातून माणसाचे व्यक्तिमत्त्व घडते. या अनुभवांमधूनच लेखक किंवा कवीला प्रेरणा मिळते आणि त्याची लेखणी सशक्त बनते. लेखणी माय आणि मातीचे ऋण व्यक्त करण्याचे कार्य करते. त्यामुळे माय, माती आणि लेखणी या तिन्ही मानवी जीवनाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. या कवितासंग्रहात एकूण ५७ कविता असून त्या वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आधारित रचना आहेत. 
आपल्या पहिल्याच माय कवितेत कवी म्हणतात, 
धग इस्तवाची सोसे
 माय थापते भाकर
 मायासाठी 'कोहिनूर'
 तिच्या हाताची बिल्लोर
अर्थात आई आपल्या कुटुंबासाठी किती कष्ट घेते, याचे सुंदर वर्णन या ओळींमध्ये केले आहे. चुलीतील जळत्या आगीची धग सहन करून आई प्रेमाने भाकरी थापते. तिच्या कष्टांमागे केवळ कर्तव्य नसून अपार माया आणि त्याग दडलेला असतो. आईच्या हातची भाकरी ही अतिशय चविष्ट आणि अमूल्य असते. म्हणूनच कवीने आईच्या हातच्या बिल्लोर म्हणजेच बांगडीची तुलना जगातील सर्वात मौल्यवान 'कोहिनूर' हिऱ्याशी केली आहे. आईचे प्रेम, त्याग आणि तिच्या हातच्या अन्नाची गोडी ही अनमोल असल्याचा संदेश या ओळींतून व्यक्त होतो.
आनंदसरी कवितेत कवी एका ठिकाणी म्हणतो, 
घाम रक्ताचं बियाणं
बळी पेरतो मातीत 
खरा पाऊस कळतो 
शेतकऱ्याच्या जातीत 
अर्थात शेतकरी आपल्या शेतात पीक घेण्यासाठी खूप मेहनत करतो. तो जणू स्वतःच्या घामाचे आणि रक्ताचेच बियाणे मातीत पेरत असतो, म्हणजेच शेतीसाठी तो अथक परिश्रम करतो. पाऊस वेळेवर पडणे किंवा न पडणे याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यावर होतो. त्यामुळे पावसाचे खरे महत्त्व, त्याची किंमत आणि त्याची प्रतीक्षा काय असते, हे शेतकऱ्यालाच सर्वाधिक जाणवते. या ओळींतून शेतकऱ्याचे कष्ट, त्याचे निसर्गावर असलेले अवलंबित्व आणि पावसाशी असलेले त्याचे अतूट नाते व्यक्त झाले आहे. 
दुःख वावराचे, साहेब आणि वांझ या कवितेतून कवीने शेतकऱ्याचे कष्ट आणि दुःख वाचकासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
घाबरायचं नाही या लयबद्ध असलेल्या कवितेत कवी म्हणतो 
कृषीप्रधान देशातून दिसेनाशी होईल माती
सिमेंटच्या जंगलात अमली पदार्थांच्या राती
जुलमी कपटी धोरणास या गाडायाचं हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय...
अर्थात भारत हा कृषीप्रधान देश असला तरी आज वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि चुकीच्या धोरणांमुळे सुपीक जमीन नष्ट होत चालली आहे. शेतीची जमीन कमी होऊन तिच्या जागी सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. त्यामुळे समाजात अनेक सामाजिक समस्या, विशेषतः अमली पदार्थांचे वाढते प्रमाण, निर्माण होत आहे. या परिस्थितीस कारणीभूत असलेल्या अन्यायकारक व कपटी धोरणांविरुद्ध संघर्ष करणे आवश्यक आहे. हा बुलंद आवाज या काव्यसंग्रहातून मांडला आहे.
कवी वरील ओळींतून निराश न होता संकटांवर मात करण्याचा संदेश देतो. जरी परिस्थिती प्रतिकूल असली, तरी राखेतून पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभे राहून नव्या जोमाने प्रगती करावी, असे तो सांगतो. कोणत्याही संकटाला घाबरून न जाता धैर्याने आणि जिद्दीने त्याचा सामना करण्याचे आवाहन या कवितेतून करण्यात आले आहे.
अनेक कवी संमेलन गाजविलेले कवी अनिकेत देशमुख यांची स्वतःची आवडती कविता म्हणजे 
नांगराचा फाळ असते कविता
भजनातील टाळ असते कविता
काळ्या आईला हसवणारं
काळंकुट्ट आभाळ असते कविता
ही कविता वाचकाच्या मनात रुंजी घालत राहते.
शहरात होणारी घुसमट कवी आपल्या कवितेत मांडताना लिहितो
चाल दोस्ता आतातरी जाऊ आपल्या गावा
माणसं यंत्र झालीत अन् जहरी झालीय हवा
या कवितेतून कवीला सांगायचे आहे की, आधुनिक जीवनात माणसे अत्यंत व्यस्त आणि यांत्रिक झाली आहेत. शहरातील धकाधकीच्या जीवनात माणसांमधील प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी कमी होत चालली आहे. तसेच प्रदूषणामुळे वातावरणही दूषित झाले आहे. त्यामुळे कवी आपल्या मित्राला म्हणतो की, आता तरी आपण आपल्या गावाकडे जाऊया. गावातील निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ हवा आणि माणसांमधील जिव्हाळा यामुळे मनाला शांतता आणि समाधान मिळेल. या ओळींतून शहरी जीवनातील कृत्रिमता आणि ग्रामीण जीवनातील साधेपणा, माणुसकी व निसर्गप्रेम यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
बघा एवढं करता आलं तर , साहेब, ओल आणि मढं या कवितेतून सध्याच्या व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत.
 कवी शोकांतिका या कवितेतून जो शोक व्यक्त करत आहे, तो सर्वांनाच असायला हवा, ते म्हणतात, 
कुपोषणानं दरवर्षी इथं 
हजारो जीव मरतात 
मंदिरांना कळस मात्र 
दररोज सोन्याचे चढतात !
अर्थात समाजातील विषमता आणि संवेदनाहीनता यांवर या ओळींतून भाष्य करण्यात आले आहे. आपल्या देशात आजही अनेक गरीब, उपेक्षित आणि लहान मुले कुपोषणामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडतात. त्यांना अन्न, औषधे आणि मूलभूत सुविधा मिळत नाहीत. दुसरीकडे, मंदिरांवर मात्र मोठ्या प्रमाणात सोन्याचे कळस चढवले जातात आणि भरपूर पैसा खर्च केला जातो. कवी या विरोधाभासाकडे लक्ष वेधून समाजाला विचार करण्यास भाग पाडतो की, धार्मिक कार्यांवर खर्च करण्याबरोबरच गरजू, भुकेल्या आणि कुपोषित लोकांच्या मदतीसाठीही पुढे आले पाहिजे. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, हा संदेश या ओळींतून व्यक्त होतो.
चाटा कवितेतून कवी सध्याच्या राजकीय परिस्थितीचे वास्तव चित्रण केले आहे. कार्यकर्ते सतरंजी उचलण्यात अर्धे आयुष्य वाया घालवितातत आणि नेते मंडळी आपला वारसा म्हणून घरातील सदस्यांना पुढं आणतात. हे चित्र कुठं तरी बदलायला हवं. हा विचार कवी अनिकेत देशमुख यांची सशक्त कविता मांडते.
"बापू" या कवितेतून कवी बापूंनी दिलेली खेड्याकडे चला ही हाक आठवण करून देतात तसेच आज बापूजीच्या स्वप्नातील भारत हरवला असल्याची खंत देखील व्यक्त करतात. आपल्या कवितेत ते म्हणतात, 
आता हिम्मत नाही कुणातच बापू 
'चले जाव' म्हणायची 
इथं प्रत्येकालाच घाई 
चरख्याजवळ सेल्फी काढायची !!
या ओळींतून कवीने आजच्या समाजातील दिखाऊपणा आणि महात्मा गांधी यांच्या विचारांपासून दूर गेलेल्या समाजाचे वास्तव चित्रण मांडले आहे. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी दिलेल्या 'चले जाव' (भारत छोडो) आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देऊन लोकांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. परंतु आजच्या काळात अन्याय, भ्रष्टाचार आणि सामाजिक समस्यांविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य अनेकांमध्ये दिसत नाही.
लोक गांधीजींच्या विचारांचे आचरण करण्याऐवजी त्यांच्या स्मृतीचिन्हांजवळ, जसे की चरख्याजवळ, केवळ सेल्फी काढण्यात आणि दिखावा करण्यात अधिक रस घेतात. म्हणजेच, गांधीजींच्या तत्त्वांचा स्वीकार करण्याऐवजी त्यांचे केवळ बाह्य प्रदर्शन केले जाते. या ओळींतून कवीने समाजाला गांधीजींचे विचार प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचा आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याचा संदेश दिला आहे.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान राजीव गांधी, देशाचे वीर सैनिक जवान, बळीराजा यांची महती सांगणाऱ्या या काव्यसंग्रहातील कविता देखील वाचनीय आहेत. 
पुस्तकाचे शीर्षक असलेल्या कवितेत कवी म्हणतो, 
माय, माती नि मातृभाषा
असतात जन्मांच्या सोबती
 शब्दांमध्ये कशी वर्णावी
 तिन्हींची महती
अर्थात आई, मातृभूमी आणि मातृभाषा या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. जन्मापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत या तिन्ही गोष्टी माणसाच्या सोबत असतात. आई आपल्याला प्रेम, संस्कार आणि आधार देते; माती म्हणजे मातृभूमी आपल्याला ओळख, संस्कृती आणि अस्तित्व देते; तर मातृभाषा आपल्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम बनते.
या तिन्हींचे महत्त्व इतके महान आणि अमूल्य आहे की, ते केवळ शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. कवी या ओळींतून आई, मातृभूमी आणि मातृभाषा यांच्याप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो. या कवितेतून कवी मराठी भाषेची होणारी गळचेपी वाचकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
एकंदरीत हा काव्यसंग्रह म्हणजे आपल्याला जन्म देणाऱ्या आई विषयी, आपल्या मायभूमी विषयी, देशाविषयी, सर्वांचं पालनपोषण करणारा तारणहार बळीराजा, देशाचा संरक्षक सीमेवरचा जवान या सर्वांविषयी प्रत्येकाच्या मनात अभिमान तयार करणारा आहे. कवी विदर्भातील असल्याने काही शब्द वैदर्भीय वाटतात. मात्र भाषा साधी, सरळ आणि सोपी आहे. त्यामुळे ही कविता वाचकाला आपली वाटते आणि त्याच्या मनाला साद घालते हे या काव्यसंग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत समर्पक असे आहे. अक्षरशिल्प प्रकाशन अमरावती कडून हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आलेला आहे. पुस्तकाची बांधणी, भाषा, अंतरंग, मुखपृष्ठ, मलपृष्ठ एकंदरीत सर्वच अत्यंत दर्जेदार झाले आहे. वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येक रसिक वाचकांनी हा काव्यसंग्रह विकत घेऊन वाचावा असा आहे.
आपल्या बहारदार निवेदनासाठी आणि वेगळ्या धाटणीच्या कवितेसाठी कवी अनिकेत देशमुख यांना त्यांच्या पुढील लेखनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ......!
****
पुस्तकाचे नाव - माय माती अन् ती (मराठी कवितासंग्रह)
कवी अनिकेत जयंतराव देशमुख गोपालखेड जि. अकोला
स्वागत मूल्य - २४५ ₹
प्रकाशक - अक्षरशिल्प प्रकाशन अमरावती
****
पुस्तक परिचय 
-  नासा येवतीकर 
मुख्याध्यापक, प्रा. शाळा पिंपळगाव 
ता. धर्माबाद जि. नांदेड 
Pin - 431809
मो. - 9423625769

पुस्तक परिचय वाचल्याबद्दल मनस्वी आभार !

काव्यसंग्रह मागविण्यासाठी संपर्क 
कवी अनिकेत देशमुख - 9689634332 

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...! "वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!" आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार ...