📚 साहित्य दर्पण Whatsapp ग्रुप 📰🖊
द्वारा आयोजित
🗽 साहित्य दरबार 🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
🚩भाग :- ( 6वा )-सहावा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 22 मे 2016
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★★
भरकटलेल्या आजच्या नवतरुण पिढीला वेळीच आळा घालण्या निमीत्त
††††††††††††††††††
==================
📝 विषय:- "संस्कार "अर्थातच *सुसंस्कार*
==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.आप्पासाहेब सुरवसे, लाखणगांवकर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री ना .सा. येवतीकर धर्माबाद
************************
💥 परीक्षक -
सौ. शशिकला बनकर ,भोसरी ; पुणे
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥 ग्राफिक्स - श्याम स्वामी हिंगोली
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -
💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.
💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..
💥 या स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक 23 मे 2016 रोजी सायंकाळी 7:00Pm वाजता मिळेल. त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...
📩 त्यासाठी .
http://nasayeotikar.blogspot.com/2016/05/sanskar-article-whatsapp-6-22-2016-1000.html
🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....
👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973
👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769
👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702
======================================
* संस्काराकडे दुर्लक्ष नको *
( पाऊलवाट पुस्तकातून साभार पान क्रमांक - 91)
एकविसावं शतक हे ज्याप्रमाणे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते तसे ते धावपळीचे सुध्दा युग आहे. जो तो मनुष्य येथे एखाद्या यंत्राप्रमाणे आज काम करीत आहेत. भरपूर पैसा कमावणे आणि त्यातून आपल्या लेकरांना सुखी व आनंदी ठेवण्यासाठी आई - वडील हे दोघेही विविध क्षेत्रात नोकऱ्या करीत आहेत. घरातील चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिलांनी देखील कुटुंबाच्या प्रगतीसाठी घराबाहेर पाऊल ठेवले आहे. हा बदल देशाच्या प्रगतीसाठी निश्चितच अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे ; परंतु या बदलामुळे घरात काही समस्याचाही जन्म झाला आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महिला नौकरी करू नयेत किंवा त्यांनी फक्त घरचे कामाच करावीत या विचाराधीन आम्ही नाही. परंतु दोघेही नौकरी करणाऱ्या कुटुंबात तणावाचे वातावरण दिसून येते, हे सत्य स्वीकारावे लागेलच. ज्या घरात पुरुष आणि स्त्री या दोघांचे योग्य समायोजन होते तेथे शांतता सुध्दा दिसून येते हे ही खरेच आहे. पण ते फारच अल्प काळ टिकून राहण्याची भीती सुध्दा असतेच. या कामाच्या व्यापात आणि धावपळीत आपल्या पोटच्या मुलांवर संस्कार करायचे राहून चालले आहे असे काही ठिकाणच्या अनुभवावरून वाटते. ज्यांच्या जवळ खूप पैसा आहे त्यांना वाटते की पैशाच्या बळावर सर्व काही मिळविता येते परंतु त्यांना हे माहित नाही की पैशाच्या बळावर संस्कार मिळविता येणार नाही. संस्कार हा जीवनाचा अनमोल ठेवा आहे आणि त्यांची रुजवण बाळ गर्भात असल्यापासून करावे लागतात. गर्भसंस्कार सुध्दा अत्यंत महत्वाचे आहे. गरोदर महिलांनी कसे वर्तन ठेवायला हवे, मन प्रसन्न ठेवायला हवे, स्वतःला दगदग पासून दूर ठेवावे, चांगल्या गोष्टी, कथा व गाणी ऐकायला हवे या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करायला हवे. बालपणी मुलांवर जे संस्कार होतात ते आयुष्यभर त्याच्या सोबत असतात. चिरकाल टिकणारे संस्कार योग्य प्रकारे झाले तर त्याचे अनुकूल परिणाम पहावयास मिळतात अन्यथा वाईट परिणाम तर कोणालाही पहावे सुध्दा वाटत नाही. गर्भपासून ते मूल समजदार होईपर्यंत त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षपर्यंत मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होतील याकडे प्रत्येक पालकांनी ध्यान ठेवणे गरजेचे आहे. आपले पारंपारिक सण वा उत्सव यातून मुलांवर सामाजिक सोबत कौटुंबिक संस्कार टाकता येतात म्हणून असे सण साजरे करतांना त्यातून मुलांवर संस्कार कसे टाकता येतील याचा विचार करून कार्यक्रम साजरे केल्यास तेथे एक वेगळाच आनंद अनुभवास येतो. त्याचप्रमाणे मुलांना याच वयात स्वावलंबनाची शिकवण ही द्यायला हवे. जसे की घरात इतरत्र पडलेल्या वस्तू उचलून जागेवर ठेवणे, अंथरुण व पांघरूणची घडी करून ठेवणे, पाणी भरण्यासाठी व घराची झाडलोट करण्यासाठी आईला मदत करणे, घराबाहेर बाबांच्या कामात मदत करणे यांसारखी कामे दिसतात लहान पण खूप महान कार्य करून जातात. म्हणूनच लहानपणापासून दिलेले हे स्वावलंबनाचे धडे मुलांना भावी आयुष्यात निश्चितच उपयोगी पडतील. नवरा बायको यांनी घरात वावरत असताना प्रेमाने आणि आपुलकीने वागावे त्या वागण्याचा परिणाम मुलांवर होत असतो. दारू पिऊन आपल्या बायकोवर हात उगारणाऱ्या कुटुंबातील मुलांवर कसे संस्कार होतील आणि भविष्यात तो सुसंस्कारी निघेल असे वाटते काय. तसे झाल्यास ते एक miracle ( जादू ) च ठरेल. म्हणून लहान वयात मुलांवर योग्य संस्कार करणे ही एकप्रकारे हिऱ्यांच्या खड्यावर केलेली प्रक्रियाच आहे. या संस्कारामुळे त्यांचे जीवन हिऱ्यांप्रमाणे प्रकाशमान होऊन चमकत राहते.
*नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*
======================================
श्याम वैजनाथ स्वामी हिंगोली: *संस्कार*
चांगले संस्कार केले जातात का आपोआप होतात ? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे.
संस्कार हे सानिध्यात होत असतात..कळत नकळत
चांगले संस्कार असलेल्या माता पित्याची मुले संस्कारीच असतील याची शाश्वती नाही..
तसेत सुसंस्कृत नसलेल्यांची मुले सुध्दा संस्कारी निघतात अशी खूप उदाहरणे आहेत..
फूले विकत घेता येतात सुवास नाही..
चिखलात येणारे कमळ सुध्दा आकर्षक दिसते..
काट्याच्या झाडाला येणारे गूलाब सुंगधीत आहे..
आज जगातील परिस्थिती पाहीली तर
भ्रष्टाचार . बलात्कार..दहशतवाद..जातीवाद..कशाचे लक्षण आहे ?
वरील गोष्टी घडत असतांनाच धार्मिक सण उत्साहाने जगभर साजरे होतातच...हे सुसंस्कृत घडते..
एकाच कुटुंबातील सदस्यात संस्कार बाबतीत विसंगती आढळते..रावण व बिभीषण..
मग या गोष्टी घडतांना संस्काराचे मूळ कोठे गृहीत धरायचे ?
कोणताही धर्म..जात पंथ..वाईट शिकवण देत नाही..
तरी वेगवेगळ्या धर्माची संस्कार केंद्रे निर्माण झाली आहेत...
स्वैराट चित्रपटाला ला समर्थन करणारे वा विरोध करणारे खूप आहेत
संस्कार बाबतीत मला एकच वाक्य खूप आवडते..
*दुसरोंके साथ वो व्यवहार करो जो तुम्हे आपनोंके लिये अच्छा लगता हो*...
*श्याम वैजनाथ स्वामी*
*@13 हिंगोली*
======================================
[5/22, 12:21 PM] +91 98905 67468:
स्पर्धेसाठी ::सुसंस्कार ::
संस्कार म्हणजे संस्कृती तर सुसंस्कार म्हणजे समाजगौरव. संस्कार म्हणजे मानवतेच्या गुणांचे संवर्धन तर सुसंस्कार म्हणजे चारित्र्याचे गुणवर्धन.
संस्कार मनावर कायमचे कोरले जातात. जात, धर्म, वंश, लिंग यानुसार संस्कारात बदल होत जातात. सुसंस्कारांचा आचार विचारांवर प्रभाव असतो. संस्कार विचारांची दिशा ठरवितात तर कधी ते नैतिकतेशी संबंधित असतात. सुसंस्कार समाजाशी व्यक्ती चे समन्वय राखणारे असतात.
अर्थकारण, वर्गीय व्यवस्था यांनी संस्कारांना वळण मिळते. संस्कार रूजविण्यात शिक्षण महत्वाची भूमिका बजावते. लेखन, संभाषण यावर संस्कारांचा प्रभाव असतो. प्रत्येक क्षणी संस्कार कळत नकळत दृढ होत जातो. भाषा, भौगोलिक स्थिती यांचा संस्कारावर परिणाम होतो. चांगले, वाईट असे संस्कारांचे वर्गीकरण व्यक्तीसापेक्ष, धर्मसापेक्ष, समाजसापेक्ष, देशसापेक्ष होत असते. समाजाने याची मोजपट्टी ठरविलेली असते.
माणूस अनुकरण प्रिय असतो. संस्कार अनुकरणाने, अनुसरणाने येतात. रूढी, प्रथा, सामाजिक संकेत संस्कार पोसतात. विचार आणि पुस्तके संस्काराला दिशा देतात. संस्कारांनी माणसे कधी कधी कर्मठ, सनातनी होतात. सुसंस्कार विनय, दया, परोपकार आदि गुणांचा परिपोष करतात. आई, वडील, गुरू, मित्र सुसंस्कार रूजविण्यात मदत करतात. गरिबी, मध्यमवर्गीय, श्रीमंती या पातळीवर संस्कारांची परिभाषा बदलत राहते. सुसंस्कारांना सामाजिक, राजकीय शिष्टाचार मान्यता असते.
सुसंस्कारांचे महत्व आजच्या आधुनिक जगातही खूप आहे. समाज, देश एकसंध राखण्यास सुसंस्कार मदत करतात. संस्कार आपल्या जाणीवा प्रगल्भ करतात. विज्ञानाने माणूस ज्ञानी होतो तर सुसंस्कारांनी तो आदरणीय होतो.
गुन्हेगारी, भ्रष्टाचार, व्यभिचार या दुर्वर्तनांवर सुसंस्काराअभावी आरोपण झालेले असते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संस्कार होत असतात. अगदी गर्भसंस्कारापासून याची सुरुवात होते. निकोप समाजासाठी सुसंस्कार अतिशय जरुरीचे असतात.
सुसंस्कार दुर्गुणांचे कंगोरे घासून काढतात जेणेकरून जगणे सहज, सरळ, सुसह्य होते.
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
======================================
[5/22, 2:41 PM] +91 94035 93764:
🌺 साहित्य दरबार स्पर्धेसाठी
संस्कार
चांगले संस्कार म्हणजे चांगले वागणे हा ठोबळमानाने अर्थ
मुल आपल्या जन्माच्या अगोदर पासुन शिकत असते म्हणुनच बाळाची चाहुल लागताच माता गर्भसंस्कार सारख्या पुस्तकाचा आधार घेते़
तसे पाहिले तर प्रत्येक आईला वाटत असते माझ मुल हे गुणी असावेव त्यासाठी ती प्रयत्न करते परंतु आजकाल मुलांना स्ंस्कारीत कसे करायचे हा एक गहन प्रश्न आहे
संस्कार म्हणजे माझ्यामते शिकवण्यापेक्षा एका पिढीकडुन दुसरीपिढीघेते ते संस्कार
प्रत्येक मूल्याची जोपासना झाली पाहिजे मुलामध्ये श्रमप्रतिष्ठा जोपासली पाहिजे कोणतेही कष्ट करण्याची क्षमता त्यामध्ये असावी
आपले आईवडील आजी आजोबा व इ तरही वडिलधारी मंडळी बद्दल त्याला आदर वाटावा
यासाठी आपल्या ुलाचे संगोपन करतांना जागरुक असने फार आवश्यक आहे
योग्य वयात योग्य ती साधन उपलब्ध करुन द्यावी कि जेणेकरुन मुलांवर त्यचा वाईट परिणाम होईल
उदां (टिं वहीं मोबाईल संगणक गाडी)
या दुषीत वातावरणातुन जे मूल
वाचेल तोच या काळात टिकेल
खेडकर सुभद्रा बीड (२० )
======================================
[5/22, 3:30 PM] +91 99219 67040:
🌹साहित्य दरबार-6🌹
***********************
★ विषय==संस्कार★
==================
जगामध्ये भारतीय संस्कृतीकडे फार आदराने,सन्मानाने पाहिले जाते.कारण भारतीय संस्कृतीचे मूळं ही संस्काराच्या जडणघडणीतुन घडलेली आहेत.
“जे पेराल तेच उगवेल” या उक्तीप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुसंस्काराचे मूल्य रूजलेली आहेत व म्हणुनच आपली भारतीय संस्कृती आजतागयात टिकली आहे व जगात आदरनिय व वंदनिय आहे.
मुल जन्मास येते तेव्हापासुन ते ते मरेपर्यत त्याच्यावर वेगवेगळे संस्कार घडवले जातात.आजकाल तर गर्भसंस्कार हा प्रकार अतिशय झपाट्यान वाढत चालला आहे. गर्भात असल्यापासुन आजची आधुनिक आई आधुनिक संस्कार तिच्या बाळावर रूजवत आहे व त्याचे परिणामही सकारात्मक दिसुन येत आहेत.मी स्वत: ती आधुनिक आई आहे मी ही माझ्या दोन्ही मुलांस गर्भसंस्कार केले आहेत व त्यात मी यशस्वी झाले आहे.म्हणुनच म्हणतात“ रसाळ बीजापोटी फळे रसाळ गोमटी.”
आजची आधुनिक पिढी व्यसनी,व्याभिचारी,उद्धट,रोगी बनत चालली आहे. ‘फँशन’ नावाच्या गोंडस फँडने या तरूण पिढीला बरबादीकडे ओढत आहे. काँलेजच्या नावाखाली अनेक गोरखधंदे मुल करत आहेत. प्रसारमाध्यमाच्या विभत्स्य विळख्यात अडकून ‘अय्याशी’ नावाची ‘ किड’ या तरूण पिढीला लागली आहे. प्रत्येक आईवडिलांस सुसंस्कारी मुलं हवी असतात पंरतू पाश्चात्य संस्कृतीची वाळवी भारतीय संस्कृतीला पोखरत चालल्याचे दिसुन येत आहे.
एका बाजुस देशाचे नाव उंचावणारी पिढी चांगल्या संस्कामुळे घडत आहे तर दूस-या बाजुला देशाचे नाव बदनाम करणारी पिढी कुसंस्कारामुळे घडत आहे. क्रिडा,साहित्य, सिनेमा, राजकारण शिक्षण इत्यादी क्षेत्रात युवा पिढी अग्रेसर आहे तर दुसरीकडे चोरी,दरोडा,डाका,खुन,अपहरण तस्करी बाँम्बस्फोट इ. प्रकारातही पिढी अग्रेसर होत असल्याचे दिसुन येते.आणि तेव्हा मग पिढीवरच्या सुसंस्कार गरज प्रकर्षाने जाणवते.शेवटी मीएवढेच म्हणेल..
“संस्काराचे आहेत
दोन प्रकार
एक सुसंस्कार
दुसरा कुसंस्कार…
सुसंस्कार देई
जिवनास आकार
कुसंस्कार देई
जिवनास विकार…
आकाराने जिवन
घडले जाईल
विकाराने जिवन
विस्कटले जाईल…
म्हणुनच जाणा
वेळीच जीवनाचे मोल
तरच हे जीवन
सावरेल तोल...”
==================
सौ.कल्पना जगदाळे-घिगे★
@8बीड .
==================
[5/22, 4:00 PM] +91 94035 93764:
संस्कार
(स्पर्धेसाठी)
आपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते; मात्र त्यासाठी त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, हे त्यांचे कर्तव्य ठरते. आपल्या मुलावर सुसंस्कार करतांना आपण भारताचा भावी नागरिक घडवत आहोत, असा व्यापक दृष्टीकोन प्रत्येक पालकाने ठेवायला हवा ! त्यामुळे केवळ आपल्या मुलावर संस्कार करणे, एवढेच त्यांचे संकुचित ध्येय उरणार नाही, तर राष्ट्रउभारणीसाठी अप्रत्यक्षरीत्या केलेले ते प्रयत्नच ठरतील ! प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याचे आई-वडील हे सर्वांत पहिले व महत्त्वाचे शिक्षक असतात. एकमेकांवर प्रेम करण्यास आणि एकमेकांशी जमवून घेण्यास प्रथम आई-वडीलच मुलाला शिकवतात. लहापणापासून मुलाला प्रोत्साहन दिले, तर कोणतीही गोष्ट हाताळण्यास ते पटकन शिकते. मुलाला चमच्याने कसे जेवावे इथपासून मलमूत्रविसर्जनानंतर स्वच्छता कशी पाळावी, येथपर्यंत सारे पालक शिकवतात. लहान मुलांना गोष्टी वाचून दाखवल्याने त्यांना वाचनाची आवड निर्माण होते. मुले अनुकरणप्रिय असल्याने पालकांनी जोपासलेल्या छंदांचे ज्ञान त्यांना आपसूक होते.
आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान मुलांना शिकवायला हवे ! अडीअडचणीच्या वेळी कोणावर किती विश्वास ठेवायचा याचे ज्ञानही मुलांना त्यांचे पालक देऊ शकतात. जिवनातील वेगवेगळया प्रसंगांना कसे तोंड द्यावे, हे पालक त्यांना सांगू शकतात. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे, हे पालकांनी मुलांना सांगायला हवे. जीवनाचे ध्येय, जीवनाचे आदर्श हे सारे पालकांनी जबाबदारीने व विचारपूर्वक मुलांसमोर मांडायला हवे आणि मुलांनी त्याच्या दिशेने करावयाच्या वाटचालीच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शनही करायला हवे. या वेळी त्यांना काय योग्य व काय अयोग्य हे नेमकेपणाने सांगायला हवे; मात्र त्यांची मते त्यांच्यावर लादता कामा नयेत. त्यांचे निर्णय त्यांना घेण्याची मुभा जरूर द्यावी; मात्र पालकांनी सांगितलेल्या योग्य-अयोग्याच्या संकल्पना या एवढ्या स्पष्ट स्वरूपात त्याच्या मनावर बिंबायला हव्यात की मुलाने गैरवर्तन करताच कामा नये ! थोडक्यात पालकांनी आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांना शिकवायला हवे. मुलांच्या आयुष्याला दिशा देणारा तात्त्विक मुद्दा असू दे किंवा त्यांना शिकवायच्या छोट्या-मोठ्या सवयी असू दे, हे सारे संस्कार धार्मिकतेच्या पायावरीलच हवेत. हल्लीच्या बहुतांश पालकांचे स्वत:चे जीवनविषयक तत्त्वज्ञान हेच पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारलेले व चंगळवादी बनलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मुलांवरही त्याच विचारांचे व कृतींचे संस्कार केले जातात.
खेडकर सुभद्रा
क्र २०
======================================
*** संस्कार ***
सकाळी सकाळी आमच्या शेजारी नारायणरावांनी काकूंना एक बातमी वाचण्यास दिली. 'नवी पिढी बिघडतीय कशी- एक चिंतनीय बाब!' बातमी वाचून "संस्कारच नाहीत मुळी मेल्यांवर!" असे फणका-यानं म्हणत काकू कामाला निघून गेल्या. कुठलंही वर्तमानपत्र उघडा. काय दिसतं? भ्रष्टाचार, अत्याचार, दरोडे वगैरेच्या बातम्या. व्यक्तीला विनाशाच्या गर्तेत लोटणा-या मादक द्रव्यांच्या, चित्रपटांच्या अश्लील जाहीराती ! हे सारं कशाचं द्योतक म्हणावं ? आपण 21 व्या शतकाकडे ( आपली सदसदविवेक बुध्दी गहाण ठेवून ) वाटचाल करीत आहोत, असा टेंभा मिरवणा-या पिढीचं....? की सा-या जगात महान व स्तुत्य ठरलेल्या परंतु आपल्याच देशात पायमल्ली होणा-या संस्कृतीचं...? शेवटी सभोवतालच्या समाजालाच दूषणं देत " शाळेत मास्तरांनी हेच शिकवलं काय रे?" असा काहीसा शेरा मारून प्रत्येक जण आपली जबाबदारी झटकून मोकळा होतो. "संस्कार!" केवळ साडे तीन अक्षरांचाच पण प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा फार गहन अर्थाचा शब्द.
आईच्या पोटी जन्मलेल्या बालकांवर सर्वप्रथम आई-बापच संस्कार करीत असतात. म्हणूनच सर्वात प्रथम आई-बापच सुसंस्कृत असणे अगत्याचे आहे. वेश्येच्या उदरी जन्म पावूनही वसिष्ठ तप:श्चर्येने विप्र झाला. तद्वतच मानव जन्माचे सार्थक होण्यासाठी बालपणापासूनच चांगल्या संस्काराची आवश्यकता असते. संस्काराशिवाय माणसाला खरं माणूसपण येत नाही. हे सुसंस्कार व्यक्तीवर जर बालपणापासूनच झाले तर ते आयुष्यभर आधारभूत होतात, टिकतात. आज सभोवार पाहता दुर्दैवाने मोठ्या माणसांचे वर्तन बिघडत चालल्यामुळे पुढील पिढीबद्दल चिंता वाटतेय. आजच्या बालकांसमोर म्हणावे तसे आदर्श समोर आहेत का? अजूनही आपण पूर्वीच्याच आदर्शांची री ओढतो. चांगले आदर्श हे स्वतःहून आपल्यासमोर येऊन उभे राहत नाहीत. तर आपणच ते डोळसपणे शोधायचे असतात. आजच्या शिक्षणाने माणूस शिक्षित होतोय, पण तो सुशिक्षित होतोय का, हाच खरा प्रश्न आहे.
राष्ट्राचा खरा आधार स्तंभ म्हणून आपण ज्या युवा वर्गाकडे पाहतो, तोच युवा वर्ग आज आईचा हात सोडून बाईचा हात धरून कॉलेजच्या कट्ट्यावर बसून स्वतःचे आयुष्य उधळून लावत आहे. हीच का ती संस्काराची पातळी ? सकाळी उठून हातात दीड-दमडीचा मोबाईल घेऊन शांताबाई च्या गाण्यावर झिंगाट होत तोंडात कोंबलेल्या मावा-गुटख्याच्या पिचका-यांनी रस्ता रंगविणारे डिजीटल युवक संस्काराच्या वाटेवर ख-या अर्थाने चालतोय का ? मुळीच नाही. शिक्षण म्हणजे केवळ दळण नव्हे, तर व्यक्तीच्या जीवनाला वळण लावण्याचं एकमेव साधन आहे. मुलांच्या शिक्षणात व प्रगतीत संस्काराची कास धरुन शिक्षक व पालक दोघांचाही सक्रीय सहयोग असणे आवश्यक आहे. सुसंस्कार हे कधीही धर्म, जात-पात, लहान-थोर, स्त्री-पुरूष, गरीब-श्रीमंत यांच्या आड येत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवं.
" मनामनातून एकच श्रध्दा, जरी दैवते वेगवेगळी
जरी निराळ्या आशा-भाषा, संस्काराची एकच पातळी "
✎ प्रा. नितीन दारमोड @ 3
======================================
साहित्य दर्पण – स्पर्धा—२२ मे २०१६
साहित्य दरबार— विषय – संस्कार
संस्कार या तीन अक्षरी शब्दामागे केव्हढं जग उभारलेले आहे. संस्काराचे अनेक पदर,अनेक कंगोरे आपण सर्वजण अनुभवित असतो. संस्काराची प्रक्रिया बाल्यावस्थेपासुनच व्हायला हवी नव्हे अलिकडे गर्भसंस्काराचे क्लासेस चालतात. संस्कार कोण करते तर प्रामुख्याने आई कारण मुलं बाबांपेक्षा आईजवळ जास्त जवळ असतात.दुसरे शिक्षक,शिक्षिका, तिसरे मित्र,मैत्रिणि,नंतर जेथे तो वा ती काम करतात ते ऑफिस वा बिझिनेस या सगळ्यातून मुलांचे व्यक्तिमत्व बनत असते.
आजच्या विभक्त कुटुंब पध्दति,नातेसंबधाचे दुरावलेले दोर,एकेरी पालकत्व,गरीबी श्रीमंती ही दरी,अफाट महागाई – मग त्यात भाजी,वाणसामन,कपडे,शाळा, कॉलेजच्या फीया औषधे ,डॉक्टर सारे आलेच ! मुलांच्या वाढत्या मागण्या, रहात्या जागाचे गगनाला भिडलेले भाव,त्यासाठी घरातली स्त्री अर्थार्जनासाठी घराबाहेर पडली. मी संकुचित वृत्तिची नाही. स्त्रिला स्वत्व हवेच परंतु वरील सगळ्याचा गोषवारा पाहिला तर बालपणी होणा-या संगोपनाला कात्रीच लागते ! गृहिणीवर घर,ऑफिस,मुले यांचा भार ती सांभाळते पण मुलांच्या मनाच्या मशागतीसाठी ती वेळ कुठुन आणेल ?
मुलांना शांतता,प्रेमळता,आपुलकी,जिव्हाळा,दुस-याशी शेअर करायची वृत्ती, वाचन,चितंन,मनन करण्याची सवय,सुट्टीत नवीन खेळ,नवीन गांवाची,संस्थाची माहिती देणे. बहिणी भावंडाना योग्य प्रकारे सांभाळणे,स्वावलंबन शिकविणे,दुस-यावर अवलंबुन रहाता स्वत:ची भाकर कशी कमवावी, चुगल्या ,चहाड्या न करता समन्वयाने कसे जगायचे, खोटे न बोलता परिस्थिती आटोक्यात कशी राहिल हे पहाणे,घरातील मोठ्यांना आदराने वागविणे,आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कसे करावे,बोलताना माधुर्य जपुन बोलणे,अभ्यासात सात्तत्य ठेवणे. तत्परतेने वेळ प्रसंगी दुस-याला, शेजा-याला मदत करणे,एव्हढ्याशा गोष्टीने उगाच फुशारुन न जाता लिनतेने कसे जगावे.सतत दुस-याचे उणे दुणे काढणे,आपला संबध नसता उगाचच लुडबुड करणे, आपली चामडी बचावण्यासाठी सर्रास खोटे बोलणे व त्याची खंत न बाळगणे,या आणि अशा कितीतरी गोष्टी मुलं वर दिलेल्याकडूनच शिकतात. घरात आईबाबांचे वागणे, घरातील वातावरण,मुल टिपकागदाप्रमाणे टिपत असतात.या वरील गोष्टी आपण पाहिल्या.हे सारं शिस्तबध्द करायला इथ वेळ कुणाला आहे. ?
युग नुसतं पळतयं ! २१ व्या शतकाला सामाना देताना कॉम्प्युटर,सेल फोन्स,टी.व्ही.माध्यम, प्रसार माध्यमं या पिढीला कुठे घेऊन जाणार आहेत ?
सैराटसारखे सिनेमे मुलांच्या मनावर आघात करीत आहेत.घटस्फोट,एकतर्फि प्रेमातून आलेली विफलता, आत्महत्या, स्त्रियांचे लैगिंक शोषण, लिव्ह इन रिलेशनशिप, वृध्दाश्रमाची होणारी प्रचंड वाढ, गुन्हेगारी वृत्ती,बलात्कारी वृत्ती,खाबूगिरी इथे घरं, स्त्रिया, समाज, प्रचंड प्रमाणावर कमी पडतोय.
बदल हा मानवाचा स्थायीभाव आहे.परंतु तो कोणत्या अंगानी व्हायला हवा हे ज्या ज्या स्तरातून व्यक्ती संस्कार घेऊन येतात त्यांनी त्यांनी डोळे उघडे ठेवून समाजातले चांगले तेच टिपण्याची वृत्ती आत्मसात करायला हवी.संस्काराचे मुळ घर,घरातील माणसे ! काही वेळा आपल्याला असेही दिसून येते कि, घर अशिक्षित असले तरी मुलं सुसंस्कारीत असतात. कारण त्यांच्या रक्तातच खरेपणा असतो. तो कधीही पुसला जात नाही.
मुलत: व्यक्तीनी समाजाशी संबध येतो तेव्हा बरं वाईट काय हे जाणायला शिकले पाहिजे, नाहीतर आज गुंड प्रवृत्तीची माणसे निर्माण झालीच नसती. आज सामजात दोन प्रवाह आढळतात एक नेकीने चालणारा व दुसरा कशाचीही तमा न करणारा इथच संस्काराचे फासे सुलटे व उलटे पडलेले दिसतात. याला जबाबदार कोण ? प्रश्न मोठा गहन आहे.!संस्काराच्या या अनेक पदराना सांभाळणार कोण!
ह्या प्रश्नांच्या गुत्यांचा गुंडा कुठे घरंगळत जाणार देवच जाणे !!
सहज सुचतय ते लिहतेय--
घरकुल विणावं नेकिचं
संस्काराच्या ज्योत्याचं
हाती बळ हवं ऐक्याचं
नाती जपावी प्रेमातचं
प्रेषक – कुंदा पित्रे (४६)
शिवाजी पार्क, दादर,
मुंबई २८
९३२४७४२७०७
======================================
[5/22, 5:31 PM] +91 88881 89650:
🌸 संस्कार...🌸
संस्कार म्हणजे जीवन भरणीचा पाया.संस्काराचा पाया जर मजबुत असेल तर जीवनरुपी इमारत कसल्याही वादळाला तोंड देण्यास सर्मथ होईल म्हणून संस्कार जीवनात अविभाज्य घटक आहे. आज एकसीव्या शतकात वावरत असताना संस्काराची व्याख्याच बदलून गेली आहे.झपाट्याने बदलत जाणारे शहरीकरण.संकुचित मनोर्वत्ती. स्वार्थी स्वभाव या सा-याचा परिणाम सामाजिक जीवनावर झाला असुन चांगल्या संस्काराची आज अत्यंत गरज आहे.चांगले संस्कार म्हणजे काय तर माणसानी मानसा सारखे वागणे. जीवनात येवून माणसाला काय हव असत तर ते म्हणजे प्रेम आणि सुख यासाठी हवा असतो तो सुस्कांर.ज्या बालकाला सुस्कांर मिळेल,तो आपलेच जीवन आनंदी बनवेल असे नाही तर सामाजिक जीवन ही आनंदमय बनवन्यास हातभार लावण्यात मदत करेल. शिरीष गिरी @58 जि.प.प्रा.शाळा आरणवाडी ता.धारुर जि.बीड
8888189650
======================================
[5/22, 5:56 PM] +91 98702 51951:
साहित्य दरबार, २२मे,२०१६
* संस्कार
संस्कार म्हणजे काय? तर चांगले व वाईट ह्याची जाण!
जी आईवडिलच आपल्या मुलांना देऊ शकतात.पण इथेच पालक चुकतात.संस्काराच्या वर्गाला पाठवुन मोकळे होतात.त्याग,प्रेम, क्षमा,शांती ह्याचे धडे घरातूनच द्यायचे असतात.सोयिस्करपणे हे विसरून आपल्याच विश्वात मश्गूल असतात.हातात ग्लास धरून ,काहीजण रात्री रंगवत बसतात.मुलांना कार्टून लावून देऊन,सुटकेचा निश्वास टाकतात.पण
मुले खरच रमतात का? त्यांना हवा असतो,आईवडिलांचा सहवास,अनेक पडलेल्या प्रश्नांना मायेच्या उत्तराचा घांस.पण एवढा वेळ असतो कुठे त्याना द्यायला! असते तारेवरची कसरत ,रोजची लोकल गाठायला.आणि एक क्षणभर सुद्धा वेळ नसतो मुलांच्या गप्पागोष्टी ऐकायला.
दिवलागणीची वेळ. टी,व्ही चॅनलनी,सुरू होते.त्यामुळे एकत्र जेवणाची लज्जत तर कधीच हरवलेली असते.आणि मग एकमेकांशी संवाद साधायला रात्र केंव्हा होेते कळत नाही.मनातले विचार मनातच राहून पुन्हा उद्याची सुरवात होते!
आपल मूल संस्कारक्षम हवे असेल तर आपणच बदलल पाहिजे.आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून ,आपल्या मित्र,मैत्रिणींमधला वेळ कमी करून ,तो अमूल्य वेळ मुलांकरता कारणी लावला पाहिजे.ह्या आपल्या उडणार्या फुलपाखरांशी आपणच बागडलं पाहिजे.त्याच्या पंखात संस्कारांचे बळ देऊन,सक्षम करून उंच उडायला शिकवले पाहिजे.
"मग हीच मुले देशाची शान होतील!
संस्कारांच बीज,पुन्हां मातीत रूजवतील.!"
स्वाती केळकर दादर मुंबई २८
=====================================
[5/22, 6:01 PM] +91 84220 89666:
"साहित्य दरबार"
===========
संस्कार
******************
संस्कार हा शब्द आज परवलीचा शब्द झालाय आणि घरोघरी ऐकायला मिळतो. संस्कार वर्गांचं तर जणू काही पेवच फुटलेलं आहे. ज्यांना आपलं नाक पुसता येत नाही त्याही बाळांना "तथाकथित "संस्कार वर्गात घातलंय जातं.खरंच याची गरज आहे का हो ?
संस्कार हा शब्द संस्कृतीच्या जवळ पोचणारा आहे. जे घर प्रकृती तर सोडाच, विकृतीच्या विळख्यात सापडलेले आहे,तिथे संस्कृती आणि संस्काराची अपेक्षा करणे म्हणजे स्वतःच दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे. बाळांना" मला माझी आवडती सिरियल बघू देत नाही, म्हणून मी त्याला संस्कार वर्गात घातलं "अशी प्रतिक्रिया देणारी माता धन्यच म्हणायला हवी.
या मातेने बाळाकडून संस्कारांची अपेक्षा करावी ?
घरात रोज भांडणा-या पती पत्नीनं, न चुकता सायंकाळी पेगवर पेग घेणा-या बाबांनी /आईने अपत्याकडून संस्काराची अपेक्षा करावी? ही नवीन पिढी भरकटलेली आहे म्हणून मोकळं व्हावं?
ही पिढी कां भरकटली? कोण आहे जबाबदार याला? अहो त्यांना दिशा द्यायला आपण असमर्थ आहो म्हणून त्यांची दशा आहे, हे आपण सोयिस्करपणे विसरतो आहोत.
त्यांना न पेलणा-या अपेक्षांचं ओझं, त्यांची क्षमता न बघता त्यांच्यावर लादतो आहोत. 90%च्या आतला विद्यार्थी हा आज थट्टेचा विषय झालाय. राज्य,राष्ट्रीय, स्तरावरील शाळा सोडून आम्ही "इंटरनॅशनल "च्या मागे लागलो आहोत. आमच्या मध्यमवर्गीय घरातल्या बाळाला त्यात कितपत सामावून घेतलं जाऊ शकतं याचा आम्ही कधी विचार करणार आहोत? हा विषय खूप मोठा आहे. अगदी" घागरीत सागर" भरण्यासारखा. संदिग्ध आहे. तरीही अपवादानेच नियम सिद्ध होतात या न्यायाने विचार करता आजची पिढी "वाया" गेली म्हणून आपल्याला मोकळे होता येणार नाही. कारण संस्कार शिकवता येत नाहीत, ते उचलले जातात. म्हणून एक जबाबदारीपूर्वक मी विधान करते की आजची पिढी खरोखर संस्कारी आहे जर ते घरात मिळत असतील तर?
आमच्या धनाची पेटी आम्ही उघड्यावर टाकतो आणि चोरी झाली म्हणून ओरडत सुटतो. याला काय म्हणायचे? मुलांकडून अपेक्षा करताना आपण कुठे चुकतोय का, हे आधी बघायला हवे. मी जर माझ्या सासूबाईंना माझ्याजवळ ठेवत नाही, तर मी माझ्या मुलाकडून कोणत्या संस्काराची अपेक्षा करू? मला सायंकाळी देवाजवळ दिवा लावून रामरक्षा म्हणायला वेळ नाही, माझी सिरियल जाते,तर मी मुलाकडून शुभंकरोतीची अपेक्षा का ठेवायची? मलाच 17 चा पाढा येत नसताना बाळांनी संगणकासारखी घडाघडा उत्तरे कां द्यावी?
बाहेरच्या वातावरणामुळे आज नव्या पिढीवर नको ते संस्कार होत आहेत, हे मीही अमान्य करीत नाही. पण माझ्या घरातले बालपणाचे संस्कार घट्ट असतील तर या वरवरच्या गोष्टींचा परिणाम तेवढा घातक नसेल. 40/42 वर्षांपूर्वी शहरात एकटीने वसतीगृहात 6 वर्षे काढलेली मी स्त्री आहे. घरात चालत नव्हते म्हणून अभक्षभक्षण,किंवा अपेयपान हे माझ्याकडून कधीच घडले नाही. कारण बालपणाचे संस्कार. वाचनाचा संस्कार आमच्या बाबांनी आमच्या लहानपणीच घडवला.तेच संस्कार आम्ही पुढील पिढीला द्यायला हवेत.
मुंबईला राहात असताना क्षणोक्षणी मी सुसंस्कार पाह्यले आहेत.लोकलमध्ये गर्दीच्या वेळी एखाद्या आजीला, गरोदर बाईला जागा देणारी नेहा ,माझ्या व पाहुण्यांच्या हातातले सामान घेऊन रेल्वे ओव्हरब्रीज पार करणारा हेमंत, पत्ता विचारला असताना घरी सोडणारा विकी , मला इथेच भेटले सारे.
गणपती विसर्जनाच्या वेळी समुद्राच्या काठावर निर्माल्य गोळा करणारी, काॅलेजच्या अनेक उपक्रमाद्वारे समाज कार्य, प्रबोधन करणारी तरूण पिढी असंस्कृत कशी असेल? नाटक, सिनेमा, सिरियल ,संगीत,खेळ यात पुढे असणारी मंडळी ही नव्या पिढीचंच सभासदत्व करतात. डाॅ.बंग, डाॅ.आमटे यांच्याबरोबर आदिवासी भागात कितीतरी मोठा तरूण वर्ग आहे. नानासाहेब, मकरंदच्या "नाम" मधे काम करणारी तरूण पिढी अधिक संस्कारशील, संस्कारी, सुसंस्कृत आहे.
आज साहित्य मंडळात असलेली तरूण मंडळी, आमच्या कडून काही घेण्याची अपेक्षा करीत असतील , तर उदारहस्ते आम्ही ती द्यायला हवी. कारण यांच्यातच उद्याचे कवी,लेखक, गज़लकार आहेत.
शेवटी काय,तर साहित्य आणि कला माणसाला संस्कार आणि सश्रद्ध असं ओलसर मन देतात. या नव्या पिढीवर उत्तम
संस्कार आहेतच ,फक्त गरज आहे ती दिशा देण्याची. एकूण काय सुसंस्कारांची सुरूवात आपण आपल्यापासून करूया आणि घडवूया संस्कारी नवीन पिढी.
*******************
सुनंदा पाटील
======================================
[5/22, 6:10 PM] +91 86980 67566:
🌸संस्कार🌸
काळाबरोबर पुढं पुढं जात असताना संस्कार शब्द
मागं मागं पडताना दिसतो आहे.भारतीय संस्कृतीचा मोठेपणा जगभर आहे नव्हे तो जगजाहिर आहे असे म्हणता येईल,पण संस्कृतिचा मोठेपणा मिरवणा-या भारतात संस्काराला ओहोटी का लागावी..विचार करण्याची गरज आहे.पिताजीच्या आज्ञेखातर वनवासात जाणारा राम,अंध आई वडिलांना कावडीतून तीर्थयात्रा घडविणारा श्रावणबाळ आज दिसत नाहीत..उलट वडिलधा-यांशी उद्धट
वर्तन करणारे आणि आई वडिलांना तीर्थयात्रेऐवजी वृद्धाश्रमात घेऊन जाणारे श्रावण बाळ निपजले आहेत.
स्वत:च्या जन्मदात्याबरोबर असे वर्तन असणा-यांकडून इतराबरोबर सभ्य राहण्याची आपेक्षा कशी ठेवता येईल?मुलींच्याबाबत सतत वाटणारी असुरक्षतेची भावना आणि त्यासाठी तीच्यावरच अवास्तव असणारी बंधनं यातून "सातच्या आत घरात"ही पालकांची होत असलेली भावना ही बाब म्हणजे विकृत सामाजिक स्थितीदर्शवणारी परिस्थिती आहे.चौकाचौकातून लुटमारीचे सोहळे उघड्या डोळयांनी पाहण्याची वेळ आज आल्याचे सर्वत्र चित्र दिसते आहे...कुटुंब जशी लहान लहान होत गेली तशी मनंही लहान आणि कोंदट होत गेली.विभक्त कुटुंबामुळे संस्काराची शेदोरी ज्यांच्याकडून मिळायची अशी आजी आजोबा ही पात्र संसारातून हद्दपार झाली.प्रत्येक्ष आई वडिलांना नोकरीमुळे आपल्या पाल्यांना वेळ देता येत नाही.त्यासाठी टिव्ही सारखे खेळणे मुल्यांच्या
स्वाधीन केले.पुढे हेच खेळने मुलांना जवळचे वाटू लागले,आणि संस्काराची वाट लागायला सुरवात झाली.संस्कार पायदळी तुडवण्याचा हा असंस्कृतपणा वाढत असताना आपणासर्वांची डोळेबंद करुन बसण्याची नव्हे कांही करण्याची वेळ आहे हे वेळीच ओळखता आले तर होणारी अवकळा टाळता येईल.संस्कार ही बाजारात मिळणारी गोष्ट नाही.प्रथम ती स्वत:मध्ये असावी लागते,ती अंगीकारली पाहिजे तेव्हाच ती पुढे संक्रमीत होत असते.तेव्हा परिस्थिती उंबरा ओलांडून आपल्या हातातून निघून जाण्याअगोदर
डोळे उघडा आणि प्रथम स्वत:मध्ये संस्कार पेरा पुढे संस्कारच उगवतील.कारण म्हणतातच ना पेराल तेच उगवेल.सुसंस्कार काळाची गरज आहे.
जशी मुलांवर तशी मुलींवरसुद्धा.अधुनिकतेचे आकर्षण आणि फाजील चंगळवाद याची होणारी वाढ खरे तर कुटुंबातील कमी होत असलेला संवाद कारणीभूत आहे.घरातील आपला वावर हा बालकांसाठी आदर्श असतो.आपल्या चालीरिती,
हावभाव,आचारविचार आणि व्यवहार याचे निरिक्षण आणि परिक्षण आणि अनुकरणही बालक करत असते.तेव्हा संस्कारचे वर्तूळ आपल्या पासून सुरु होते.आजकालच्या मुलांना संस्कारच नाहीत ही आपली ओरड खरंच तथ्य सांगणारी आहे का..?आपल्या चूका दुस-यांच्या माथी मारण्याची आपली सवय कोणासाठीही नवी नाही.जर आपलाच अधिकतम वेळ फेसबुक,व्हॉट्सअँपवर जात असेल तर त्या आकर न घेतलेल्या गोळयांना कोण नि कसा आकार देणार...ते देखील याच वाटेने चालू लागले तर नवल ते काय..?तेव्हा उघडा डोळे आणि बघा नीट...संस्कार भिजल्या साबणासारखा हातातून सहज निसटून जातो आहे आगदी नकळत. असो खुप बोलतोय असं मला वाटू लागलंय तरीही मी बोलत राहणं हे संस्काराला धरून नाही.तेव्हा थांबतो.
श्री.पडवळ हणमंत सोपान
मु.पो.उपळे(मा.)ता.उस्मानाबाद.
मो. 8698067566.
(स्पर्धेसाठी)
======================================
[5/22, 6:18 PM] +91 99234 45306:
स्पर्धेसाठी
***सुसंस्कार***
--------------------------------------------------------
प्रथमत: संस्कार म्हणजे काय ते पाहु...
सं--संस्कृतीरक्षक
स्--स्वावलंबी
का--कार्यकुशल
र--रचनात्मक
प्रत्येक पालकाला वाटते आपल्या मुलावर चांगले संस्कार झाले पाहिजेत.ते तसा प्रयत्नही करत असतात.बालकांवर योग्य संस्कार करणे हे मातापित्याचे प्रथम कर्तव्य आहे.आई ही बालकाची प्रथम गुरु असते.तिने अगदी गर्भापासुऩच आपल्या बालकांवर उत्तम संस्कार केलेले असतात. प्रत्येक पालकाला वाटते आपल्या मुलावर चांगले संस्कार, योग्य जडणघडण व्हावी. भारताचा एक सुजान नागरिक बनविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. काहींना तर बालपणापासुनच याचे योग्य ज्ञान मिळते.कारण मुलांवर संस्कार हे त्याच्या कुटुंब,समाज,शाळा व परिसर यातुनच होत असतात.म्हणुन प्रत्येकाच्या कुटुंबात योग्य आचारविचारांची माणसे असली तर त्या पिढीतील मुलांवर उत्तमोत्तम संस्कार होतात.पुर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांना घरातील सर्वांच्या वागण्या-बोलण्यातुन आपोआपच संस्कार घडायचे.हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीत आई-बाबा, शाळा,मित्र यावरच संस्काराची शिदोरी अवलंबुन राहिली आहे.
संस्कार हेआपोआप होत नसतात ते रुजवावे लागतात.यासाठी कुटुंबाबरोबर परिसर व शाळेचाही या घटकावर परिणाम जाणवतो.हल्ली मित्रांबरोबर,किंवा वाढत्या तंत्रज्ञानामुळे मुलांवर योग्य संस्कार केले तरी ती बिघडण्याची शक्यताच जास्त वाढली आहे. तरीही आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेळोवेळी त्यांना त्यांच्या भविष्याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे.
आजची ही तरुण पिढी फँशनच्या नावाखाली,पाश्चात्य संस्कृतिचे अनुकरण करत, व्यसनी,व्यभिचारी बनत चालली आहे.भारतीय संस्कृती सोडुन पाश्चात्य संस्कृतीमुळे ही पिढी बरबाद होऊ लागली आहे.प्रत्येक आई-बाबांचा हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
आजच्या राजकारणात तर अशा बिघडलेल्या तरुण पिढीचा वापर सर्रास होताना दिसतो. तरुणाई डिजेच्या तालावर थरकतेय.योग्य वयात म्हणजे बालवयातच बालकांवर उत्तम संस्कार झाले नाहीत तर या अशा घटऩांना सामोरे जावे लागते म्हणुन प्रत्येक जबाबदार पालकांचे एकच कर्तव्य आहे ते म्हणजे आपली पिढी सुशिक्षित बरोबरच सुसंस्कारित केली पाहिजे.
-----------------------------------------------------------------------
.......संगीता भांडवले (१६)
वाशी, उस्मानाबाद
======================================
[5/22, 6:22 PM]
🐣संस्कार🐣
असं म्हणतात,लहान मुले म्हणजे ओल्या मातीचा गोळा!"त्याला जसा आकार आपण देऊ तशी ती घडतात.हे घडवणे म्हणजेच संस्कार होत. "लहान मुलांची मने म्हणजे कोरी पाटी होय" या कोऱ्या पाटीवर आपण जी अक्षरे लिहू ती त्यावर उमटतात. संस्कारातून घडते ती संस्कृती! हे संस्कार अनेक प्रकारचे असू शकतात. संस्कारातूनच माणसाचे व्यक्तिमत्व घडत असते. चांगले संस्कार होत गेले तर ती व्यक्ती सुसंस्कारित होते. अन्यथा त्या व्यक्तीचे जीवन म्हणजे नरकच होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,"ज्याप्रमाणे पडिक जमिनीला सुपीक बनविण्यासाठी मशागतीची गरज असते, तशी मानवी बुध्दीला सुध्दा संस्काराची गरज असते."
आपण वारंवार पाहतो की,विभक्त कुटुंबाचे अनेक बाबींवर फार विपरीत परिणाम झालेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे घरातील बालकावर होणाऱ्या संस्कारावर सुद्धा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. घरात बालकावर होणारे अनौपचारिक संस्कार संपले आणि म्हणून आज औपचारिक संस्कार केंद्राची निर्मिती झाली.असे औपचारिक संस्कार म्हणजे एकप्रकारचे त्यांच्यावरील हे "लादणे" नाही का? असाच व्हाट्सॅपवर वाचलेला एक संदेश- आईवडील खूप छान तयार होऊन मुलाला घेऊन ते पार्टीला निघतात आणि जाताना ते वडील स्वतःच्या वृध्द आईवडिलांना सांगतात की,"आईबाबा,आम्ही बाहेर पार्टीत जेवतोय. तुम्ही शेजारच्या मंदिरात भंडाऱ्यात जेवून घ्या" घराबाहेर गेल्यानंतर तो लहान मुलगा वडिलाना म्हणतो,"पपा,मीही मोठा झाल्यावर एखाद्या मंदिराच्या शेजारीच घरी घेईन कारण असेच मला बाहेर जेवायला जाताना तुम्हाला मंदिरात जेवायला जाता येईल,नाही का?" हे आहेत अनौपचारिक संस्कार! याचा अर्थ मुलाना आपण काही शिकवूच नये,असं नाही. पण संस्कार केंद्रात जाऊन मुलांवर संस्कार होणार नाहीत तर ते घरातूनच होत असतात.
संस्कार हे अनुकरणातून होतात. हे अनुकरण कधी घरातून असते,कधी चित्रपट,मालिका,कधी मित्रसंगत,कधी समाज,तर कधी आपल्यावर प्रभाव पाडणाऱ्या आपल्या आदर्श व्यक्ती! यातून माणूस घडतो. संस्कार हे बालपणीच होतात असेही नाही. बऱ्याचदा व्यक्तीच्या स्वभावात मोठेपणी झालेली असतात. कारण आपण पाहतो,अनेक चांगल्या आईवडिलांची मुले ही मोठेपणी वाया गेलेली दिसतात तर कुटुंबाला वाईट पार्श्वभूमी असूनही मुलाने नावलौकिक मिळवलेले असते. कारण तो कुटुंबातून बाहेर पडून कोणाच्यातरी प्रभावाने किंवा सहवासाने बदललेला असतो. म्हणून बालपणीच नाहीतर माणसाला आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या संस्काराची गरज आहे. असे राहिले तरच तरुण पिढी दिशाहीन होऊन भरकटणार नाही.
-संगीता देशमुख,वसमत @14
======================================
[5/22, 6:58 PM] +91 94228 84140:
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्पर्धेसाठी
=======================
"संस्कार" हा शब्द ऐकताच आपण खूप भारावून जातो ,आज च्या प्रत्येक घडामोडी किंवा प्रकार जसे-भष्ट्राचार; बलात्कार;किंवा व्यभिचार या घटना आपण आपल्या अवती-भोवती जेव्हा घडतांना पाहतो ; ऐकतांना किंवा वाचतांना आपण सहजच बोलून जातो की संस्कार नाहि त्या व्यक्तिवर, आणि सर्व साधारण पणे "संस्कार"या बाबी चा सरळ अर्थ हा आई-वडिल म्हणजेच कुटुंबा सोबत जोडतो पण ते सुद्धा पूर्णपणे योग्य नाहि, लहान मुलां मध्ये त्याला प्राप्त वातावरण मग ते सामाजिक;आर्थिक; मानसिक;शारीरिक कोणतेही असो त्याचा बलापणी संस्कार घडतांना खूप मोठा प्रभाव ह्या बाबींचा असतो,पण जस जसे आपण मोठे होतो स्वत :ला प्रयत्न पूर्वक बदलू शकतो
सर्व प्रथम "संस्कार " म्हणजे काय?संस्कार हा शब्द आपण सुसंस्कार या अर्थिच विचारात घेवू या,
तर मला तरी वैयक्तिक रित्या संस्कार म्हणजे ती एक मनावर घडणारी ;नकळत होणारी; जन्मत: बलकांना ती ग्रहण करण्याची मिळालेली एक नैसर्गिक गुण किंवा शक्ती अथवा कला सुद्धा म्हणन्यास हरकत नाहि, कारण संस्कार हे जरी घडविले जातात पण हे सुद्धा तेवढेच खरे कि ते ग्रहण करणे हि सुद्धा तेवढिच आवश्यक प्रक्रिया आहे, म्हणूनच एकाच कुटुंबात आणि संस्कारात वाढलेली मुले दोन स्वतंत्र व्यक्ति असल्या मुळे आणि दोघांची एकाच घटना -गोष्टी कडे पाहण्याचा व त्यावर प्रतिक्रिया करण्याचा दृष्टकोण आप-आपल्या प्राप्त वैचारीक क्षमते नुसार व प्रगल्भते नुसार लावण्याचा प्रयत्न होतो म्हणूनच एकाच संस्कारात वाढलेली एक किंवा त्या पेक्षा जास्त अपत्ये भिन्न-भिन्न व्यक्तिमत्वाची घडतात आता इथे व्यक्तिमत्व या साठी म्हंटले आहे कारण संस्कार हा व्यक्तिमत्वाचा एक महत्वपूर्ण घटक आहे ,
वैज्ञानिक दृष्टीकोणातून विचार केल्यास 0 ते ५ वय हे अतिशय संस्कारक्षम म्हणून सांगितले जाते 0ते५ या वया मध्ये संस्कार हे नकळतपणे आणि निरीक्षण च्या माध्यमातून ग्रहण केले जातात म्हणूनच आई ने ती गरोदर असतांना चांगली पुस्तके वाचवित; चांगले विचार करावेत या वर बाळाची वाढ अवलंबून असते वाढ मग ती फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक सुद्धा आणि मानसिक वाढिवरच मानसिक स्वास्थ अवलंबून असते आणि यावरच विचारांची प्रगल्भता म्हणजेच विपरित परिस्थितीत सुद्धा स्वत:वरील नियंत्रण न गमविता योग्य मार्गाने त्यावर विजय मिळविण्याची क्षमता म्हणजेच "संस्कार" होत, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिजामाता आणि शिवजी महाराज तसेच डॉ* बाबासाहेब आंबेडकर आहेत,
आपण लहानपणी मुलांना शिकवितो खोटे बोलणे पाप आहे किंवा चुकीचे आहे पण चिकित्सक विचार शक्ति असलेली मुले आपल्याला हा प्रश्न विचारल्या शिवाय राहणार नाहि --कि मग शिवाजी महाराजां नी आजारी असल्याचे खोटे नाटक का केले? किंवा हत्या करणे पाप आहे वाईट आहे तर मग फाशी का होते? महाराणा प्रतापांनि युद्ध का केले?
तर मला असे वाटते कि आपल्या मुलांना पाप आणि पुण्य ह्या बाबीं पेक्षा चांगले आणि वाईट ह्या बाबी शिकवव् 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*सौ* *मंजुषा* *देशमुख*
@४०
*अमरावती*
*९४२२८८४१४०*
======================
[5/22, 7:02 PM] +91 94228 84140:
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्पर्धेसाठी
=======================
"संस्कार" हा शब्द ऐकताच आपण खूप भारावून जातो ,आज च्या प्रत्येक घडामोडी किंवा प्रकार जसे-भष्ट्राचार; बलात्कार;किंवा व्यभिचार या घटना आपण आपल्या अवती-भोवती जेव्हा घडतांना किंवा ऐकतांना किंवा वचतांना आपण सहजच बोलून जातो की संस्कार नाहि त्या व्यक्तिवर, आणि सर्व साधारण पणे "संस्कार"या बाबी चा सरळ अर्थ हा आई-वडिल म्हणजेच कुटुंबा सोबत जोडला जातो,
सर्व प्रथम "संस्कार " म्हणजे काय?
तर मला तरी वैयक्तिक रित्या संस्कार म्हणजे ती एक मनावर घडणारी ;नकळत होणारी; जन्मत: बलकांना ती ग्रहण करण्याची मिळालेली एक नैसर्गिक गुण किंवा शक्ती अथवा कला सुद्धा म्हणन्यास हरकत नाहि, कारण संस्कार हे जरी घडविले जातात पण हे सुद्धा तेवढेच खरे कि ते ग्रहण करणे हि सुद्धा तेवढिच आवश्यक प्रक्रिया आहे, म्हणूनच एकाच कुटुंबात आणि संस्कारात वाढलेली मुले दोन स्वतंत्र व्यक्ति असल्या मुळे आणि दोघांची एकाच घटना -गोष्टी कडे पाहण्याचा व त्यावर प्रतिक्रिया करण्याचा दृष्टकोण आप-आपल्या प्राप्त वैचारीक क्षमते नुसार व प्रगल्भते नुसार लावण्याचा प्रयत्न होतो म्हणूनच एकाच संस्कारात वाढलेली एक किंवा त्या पेक्षा जास्त अपत्ये भिन्न-भिन्न व्यक्तिमत्वाची घडतात आता इथे व्यक्तिमत्व या साठी म्हंटले आहे कारण संस्कार हा व्यक्तिमत्वाचा एक महत्वपूर्ण घटक आहे ,
वैज्ञानिक दृष्टीकोणातून विचार केल्यास 0 ते ५ वय हे अतिशय संस्कारक्षम म्हणून सांगितले जाते 0ते५ या वया मध्ये संस्कार हे नकळतपणे आणि निरीक्षण च्या माध्यमातून ग्रहण केले जातात म्हणूनच आई ने ती गरोदर असतांना चांगली पुस्तके वाचवित; चांगले विचार करावेत या वर बाळाची वाढ अवलंबून असते वाढ मग ती फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक सुद्धा आणि मानसिक वाढिवरच मानसिक स्वास्थ अवलंबून असते आणि यावरच विचारांची प्रगल्भता म्हणजेच विपरित परिस्थितीत सुद्धा स्वत:वरील नियंत्रण न गमविता योग्य मार्गाने त्यावर विजय मिळविण्याची क्षमता म्हणजेच "संस्कार" होत, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिजामाता आणि शिवजी महाराज तसेच डॉ* बाबासाहेब आंबेडकर आहेत,
आपण लहानपणी मुलांना शिकवितो खोटे बोलणे पाप आहे किंवा चुकीचे आहे पण चिकित्सक विचार शक्ति असलेली मुले आपल्याला हा प्रश्न विचारल्या शिवाय राहणार नाहि --कि मग शिवाजी महाराजां नी आजारी असल्याचे खोटे नाटक का केले? किंवा हत्या करणे पाप आहे वाईट आहे तर मग फाशी का होते? महाराणा प्रतापांनि युद्ध का केले?
तर मला असे वाटते कि आपल्या मुलांना पाप आणि पुण्य ह्या बाबीं पेक्षा चांगले आणि वाईट ह्या बाबी शिकविल्यात तर आपल्याला त्यांच्या प्रश्नांचे समाधान १००% करता येईल,
संस्कार म्हणजे केवळ उच्चशिक्षण नव्हे;संस्कार म्हणजे केवळ खरे बोलणे सुद्धा नव्हे;संस्कार म्हणजे केवळ मोठ्याचा आदर नव्हे तर संस्कार म्हणजे योग्य -अयोग्य;न्याय-अन्याय;चांगले-वाईट; विधायक आणि विघातक यातील फरक समजणे ;निर्णय घेता येणे;प्रतिकार करता येणे होय;कृती करता येणे हा व्यापक अर्थ संस्कार या शब्दा मध्ये समाविष्ट होतो,
माणसाची जसजशी वैचारिक प्रगल्भता वाढत जाते मग ती वाचन; मनन;चिंतन यातून सुद्धा वाढते आणी आपण अधिक संस्कारक्षम बनत जातो याला वयाचे बंधन नसते म्हणूनच करमचंद गांधी हे महात्मा गांधी पर्यन्त आणि भीमराव आंबेडकर हे डॉ*बाबासाहेब आंबेडकर पर्यन्त तर शिवजी हे छत्रपती शिवजी पर्यन्त पोहचू शकले व कोणतेही विद्यापीठ असो किंवा माता -पिता असोत आपल्या मुलांना "संस्कार"देतांना यांची उदाहरणे नक्किच देतात,
Mentally and physically healthy person is the richest person in the word,
आणि हे स्वास्थ प्राप्त होते ते केवळ "संस्काराने"
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*सौ* *मंजुषा* *देशमुख*
@४०
*अमरावती*
*९४२२८८४१४०*
======================
[5/22, 7:03 PM] +91 97636 67401:
स्पर्धेसाठी नाही
*** संस्कार ***
'संस्कार' एक अर्थपूर्ण शब्द प्रत्येकाचाच या शब्दाशी अगदी लहानपणापासून सबंध येत असतो, तर संस्कार म्हणजे नक्की काय..?
संस्कार म्हणजे माणूस घडवणं, त्याच्यातील गुणदोषांची त्याला जाणीव करून देणं, बाहेरच्या जगात वावरण्यासाठी त्याला सक्षम बनवणं, आई ही आपली प्रथम गुरु असते , नंतर वडील, गुरूजन, कुटुंबातील इतर नातेवाईक, सदस्य.. आपल्यावर सतत संस्कार करत असतात मानवी मन हे अतिशय संस्कारक्षम आहे,
खरंतर आजचं युग हे संगणकाचं किंवा स्पर्धेचं युग आहे, इथे रोज स्वतःला सिध्द करावं लागतं, सिध्द केलं तरच आपण या जगात सन्मानाने जगू शकतो.
पाश्चात्य संस्कृतीचे झपाट्याने होत असलेले अंधानुकरण, चंगळवादी जीवनशैलीचा चुकीचा आदर्श, जीवनाला समृद्ध करणार्या मूल्यांचा होणारा ऱ्हास, आत्मप्रेम आणि विभक्त कुटुंबपद्धती, अनाचार स्वैराचार, भ्रष्टाचार यासारख्या सामाजिक विकृतिचे वाढते प्रमाण यामुळे आजचा आपला समाज भौतिक सुखाच्या मागे लागून मनःशांती गमावलेला, संस्कार नसल्याने आतून पोखरलेला, जीवनाची कृतार्थता नेमकी कशात आहे, हे न समजल्यामुळे काहीसा गोंधळलेला...
परंतू संस्कार करणारी काही ऊर्जाकेंद्रे असतात, फक्त आपले मन आणि दृष्टी निरामय हवी सजग हवी नानारूपांनी नटलेला निसर्ग नाना प्रकारे आपल्यावर संस्कार करीत असतो, आपल्या वाचनात आलेली श्रेष्ठ दर्जाची पुस्तके आपल्यावर संस्कार करीत असतात ग्रंथ वाचनातून आयुष्याला कलाटणी मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत, "वाचाल तर वाचाल" असे आपल्याला सतत सांगितले जाते, म्हणून वाचन हा एक प्रकारे संस्कारच आहे, संतसाहित्याचा वाटा संस्कारात मोलाचा आहे. तसेच धर्मग्रंथ आपल्यावर सतत संस्कार करत असतात, गीता, बायबल कुराण, सर्व ग्रंथात मानसिक जडणघडणीसाठी उपयुक्त तत्वज्ञान आहे, म्हणूनच मी म्हणेन, "संस्कारांचा अमूल्य ठेवा दडला ग्रंथात, रामायणात, महाभारतात, जीजाऊंच्या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली संस्कारच घडविली समाजभूषण कुलभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे डॉ प्रकाश आमटे, कठिण परिस्थितीतून मार्ग काढणार्या सिंधुताई सपकाळ या आज आदरणीय व्यक्तीमत्व आहेत,
इतर प्राणी आणि माणूस वेगळा का आहे कारण माणूस विचार करू शकतो, भावना व्यक्त करु शकतो, केव्हा, कुठे कसं, काय बोलायचं हे सर्व आपल्याला संस्कारच शिकवत असतात म्हणून मानवी जीवनात संस्कारांच महत्त्व अनन्यसाधारण आहे.
असा हा माणसाचा जन्म आपल्याला मिळाला म्हणून आपण स्वतःला भाग्यवान समजायला हवे, मानवी जीवन हा एक संग्राम आहे, इथून कोणालाही पळ काढता येत नाही, इच्छा असो की नसो प्रत्येकाला या संग्रामात सहभागी व्हावेच लागते, चांगल्या संस्कारांची पेरणी केली तर आपण या संग्रामात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
© सौ.शशिकला बनकर, भोसरी, पुणे
मोबाईल - 9763667401
======================================
[5/22, 7:07 PM] +91 94213 45341:
नमस्कार साहित्य स्पर्धा साठी
संगीता सपकाळ बीड 9421345341
संस्कार
हा आपल्या जीवनात अनेक गोष्टी तुन येत नाही असतात पण कुटूंबातील संस्कार झाले तर मी नक्कीच म्हणेल कि ते आपल्या घरात सगळ्यांना खूप सुंदर वळण हे आई वडील आजी आजोबा यांनी दिले आहेत ते सर्व काही उपाय योजना शिकवल्या जातात जसे
ज्याला आजी आजोबा सहवास
त्याच्या जीवनाचे सोने हमखास
[5/22, 8:14 PM] +91 97636 67401: साहित्य दरबार--भाग6
***********************
🌹संस्कार🌹
मानवी जीवन हे सुख दुःखाच्या उभ्या नि आडव्या
धाग्यांनी विणलेल एक भरजरी वस्त्र आहे.मात्र या
वस्रात100 धागे दुःखाचे आणि असला तर एखादा धागा सुखाचा असतो. अशा दुःखमय जीवनात आनंदाची हिरवळ पसरावयाची असेल
तर आपले मुल सुविचारी,
सदाचारी, बुद्धिमान संस्कारक्षम असायला हवे असे प्रत्येक आई-वडीलांना
वाटत असते, कारण मुलं
चांगली असतील तर तोच
स्वर्ग !
आयुष्याच्या वाटेवर सुख-
दुःखाच्या क्षणांना ज्यामुळे न्याय देता येतो ते संस्कार,
संस्कार हे खरे तर संस्कृतीचे
शिलेदार असतात. पुरुष हा
वंशसातत्य राखतो पण
चिवटपणे संसार सांभाळते आणि नकळत आपल्या बाळावर सुसंस्कार करते ती
स्रीच. त्याच्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार असते,
ती त्याला जन्म देणारी माताच .
मुलावर आईच्या माध्यमातुन
प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचे पडसाद उमटत असतात ,आणि हेच पडसाद
जन्मभर मुलांसोबत असतात
आणि यालाच आपण गर्भशिदोरी किंवा गर्भसंस्कार असे म्हणतात.
रुढीपरंपरा,चालिरिती तुन
आलेले अनुभव आपण
जीवनात कळत नकळत
स्विकारित असतो.
मुलांच्या उत्तम जडण-घडणीत आयुष्य प्रवास सुखकर होण्यासाठी
सुसंस्काराची अत्यंत गरज
आहे. सु म्हणजे चांगले ,आणि
संस्कार म्हणजे मुलांच्या सार्वांगिण विकासात त्याला
कळत-नकळत दिलेले अनुभव.मुलं हे अनुकरणप्रिय
असतात, त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे ते अनुकरण
करीत असते म्हणूण देशाची
भावी पिढी निकोप घडविणे हे प्रत्येक कुटुंबाचे कर्तव्य आहे.
आजच्या तरुण पिढी
वरील संस्कार हे बालपणीच नकळत झालेले असतात.चांगल्या किंवा वाईट संस्कारास जबाबदार घटक आई वडील कुटुंब परिसर वातावरणइ. बाबीवरुन मुलांची वागण्याची विचारांची दिशा ठरते.हे परिणाम म्हणजेच
संस्कार होत
जेवढ्या चांगल्या विचारांचा परिणाम मुलांवर होतो त्यामुळेच त्यांचे संस्कारित व्यक्तीमत्व घडत असते.म्हणुणच म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज जरी चांगले असले तरी जमीन ,मशागत खतइ बाबी परिणामकारक असतील तर वृक्ष ही चांगला होणार हे ओघाने आलेच
कावळा काळा व
कोकिळा ही काळीच !दोघामधील फरक ओळखण्यासाठी वसंत
रुतू यावा लागतो, तेव्हा काव काव करणारा कावळा व कुहू
कुहू करणारी कोकिळा हे आवाजावरुन समजते
म्हणजेच चांगले संस्कार हे रंगावरुन नव्हे तर गुणावरुन ठरतात.
लेखिका - सौ. मीना सानप, बीड
======================================
[5/22, 8:23 PM] +91 97636 67401:
आज स्पर्धेसाठी आलेले लेख
नावे
1)बाबू फिलिप डिसोजा
2)खेडकर सुभद्राताई
3)कल्पना जगदाळे
4)खेडकर सुभद्राताई
5)प्रा.नितिन दारमोड
6)कुंदा पित्रे
7)शिरीषजी गिरी
8)स्वाती केळकर
9)सुनंदाताई पाटिल
10)पडवळ हनुमंत सोपान
11)संगीता भांडवली
12)संगीता देशमुख
13)मंजूषा देशमुख
14)संगीता सपकाळ
15)मीना सानप
16)ना.सा.येवतिकर
कोणाचे नाव राहीले आहे का कृपया मला सांगा लगेच
======================================
.