[5/28, 10:30 AM]
*जीवन*
जीवन हे एक पदर
सुख व दुःखाचा सागर
जीवनात हवे सर्वस्व
दुःखाला मात्र क्षमस्व
जीवनात करायचे काही
दुःखाची भेट होतच राही
जीवनात दुःख आल्याशिवाय
सुख कसे कळणार आहे ?
जीवन नको वाटलं तरी
मजला दुःख हवे आहे . . . .
मजला दुःख हवे आहे . . . . .
- नासा येवतीकर, धर्माबाद 26
[5/28, 10:49 AM]
+91 98905 67468:
स्पर्धेसाठी ::नवकवी
बिनशिर्षकाच्या कबंध कविता
पिच्छा पुरविणा-या त्या दंतकथा
शहार आणणाऱ्या कधी वदंता
सांभाळायची कां तीच रूढ प्रथा
नव्या वाटेच्या शोधात ती पाऊले
लिहावयाचे स्वतःस भावले
विद्रोहाच्या झाल्या आता परंपरा
नवे सवतेसुभे अन घटना
घासतात कंगोरे ही आपसात
जपून ठेवले ओळखीचे तरी
बंडासाठी गुळगुळीत शब्द
अनाडी लुब्ध, अज्ञानी बुद्धिवंत
विहिरीच्या परिघात वावरता
समुद्राच्या खोलीस अजमावता
सपासप चालवित सुटतात
कुऱ्हाडीसारखे
शब्दांचे अंदाधुंद वार
कवितेसाठी
कुठल्याही विषयावर
विधीनिषेध शून्य
भंजाळलेला वाचक जीव
सुटकेसाठी धडपडे
आलिप्त होऊन
बधीर संवेदनांनी
हकनाक पिळवटतो
सनातन समंध
नवकवीच्या रूपात.
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
[5/28, 11:42 AM]
+91 96047 18866:
* स्पर्धे साठी *
🌷 हिंदोळा 🌷
भावनांचा हिंदोळा
ओसांडू लागला ....
आठवणीत जीव
झोक्याला टांगला ....!!!
मुठीत घेतले त्या
गेलेल्या क्षणाला
गहिवरले आज
समजाविले मनाला .....!!
खेळ असा का चालला
उमजेना कोडे
सांगावे मी माझे
गुज लाडे लाडे .....!!
आठवात तुझ्या मन
कस थकल थकल
दूर क्षितिजाला
मग जाऊन टेकल ......!!
बरी नव्हे कासावीस
नको देऊ त्याला सजा
प्रेमाच्या या नात्यावर
अधिकार न माझा ....!!
************************
सौ सुरेखा जाधव 24 .....
[5/28, 11:53 AM]
+91 95529 80089:
गरीबी....
जगता जगता गरीबाच्या
नशिबी मरणं आलं
आयुष्य व नशिबाच्या
आड आता सरणं आलं ।।
जिंकता जिंकता गरीबाच्या
नशिबी हारणं आलं
अपयशाच्या गर्तेत पुन्हा
खोलवर बघा शिरणं आलं ।।
हसता हसता गरीबाच्या
नशिबी रडणं आलं
पडणार्या पावसात पुन्हा
नेहमीचं जळणं आलं ।।
दुःख सोसता सोसता गरीबाच्या
नशिबी सुखस्वप्न आलं
सुखिच्या रस्त्यातुन जातांना
अचानक बघा वळणं आलं ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर
[5/28, 12:28 PM]
+91 94036 17701: _
स्पर्धेसाठी_
*आसवं*
वेशीपल्याडल्या रानात झोपड़ी तिनं थाटलेली
तीन दगडांची चुल अन् गाडगी मड़की फुटलेली तिनं त्यात मांडलेली
झोपड़ीला तिच्या अंधार नव्हता
तरी पण ती अंधारात होती
झोपड़ीला तिच्या पाऊस नव्हता
तरी पण ती भिजलेली होती
तिच्या झोपडीकडं पाहून चांदोबाही हसायचा
न पाहिल्यासारखं करुन झाडामागुंन जायचा
भुकेला पानी अन् तहानेला पानी पियुन् आनंदात ती राहत होती
बाब्याला पण याची थोड़ी फार सवय होती
~(बाब्या - तिचा 5 वर्षाचा लहान मुलगा)~
पण औंदाच्या उन्हाळ्यांनं तीचं पाणी बी आटलं
धरणी माय कोरडी पडली तिचं आभाळच फाटलं
बाहेर झोपडीच्या बाब्या वरडत होता
भाकर दे मायला रडुंन रडुंन सांगत होता
न पेटवलेली चुल विझवत
अन् राहिलेल्या आसवांत पदर भिजवत....
माय बाब्याला गोंजारित होती
अन् आसवं पिवून दिस काढायचं
हळू हळू शिकवित होती...
*प्रविण सानप*
*धुळे*
[5/28, 1:35 PM]
+91 97636 67401
स्पर्धेसाठी
मुक्त कविता
****कळसूत्री बाहुली****
सुखदुःखाच्या उन - सावल्या अनुभवणारी
आयुष्यभर पुरुषांच्या तालावर नाचणारी
सतत दुर्लक्षिलेली
उदासीनतेचा बळी ठरलेली
मन मारून जगणारी...
.... मी एक कळसूत्री बाहुली ‼
आपल्या जीवनाची सूत्रे इतरांकडे सोपवणारी
बालवयात वडिलांच्या धाकात रहाणारी
बालपण हरवून बसलेली
किशोरवयात शोषली गेलेली
हुंडाबळी ठरणारी...
.... मी एक कळसूत्री बाहुली
तरुण वयात नवऱ्याच्या तालावर नाचणारी
रात्रंदिवस सेवा करणारी
प्रत्येकाच्या हातात वस्तू आणून देणारी
इच्छा असो वा नसो बोहल्यावर चढणारी सासरी बोलणी खाणारी
तरीही मूक रहाणारी...
.... मी एक कळसूत्री बाहुली ‼
मुले झाल्यावर त्यांच्या तालावर नाचणारी
पहाटे उठून स्वयंपाक करणारी...
कितीही दमली तरी पाहुण्यांचे हसून स्वागत करणारी
त्यांच्या पुढे पुढे करणारी
.... मी एक कळसूत्री बाहुली ‼
आजी झाल्यावर नातवंडे सांभाळणारी
त्यांना शाळेत पोहचवणारी
सर्वांना सांभाळून घेणारी
मुलांनी नाही सांभाळले तरी
अनाथाश्रमात रहाणारी...
... मी एक कळसूत्री बाहुली ‼
(स्त्री... तुझी कहाणी, या कवितासंहातून)
© सौ.शशिकला बनकर, भोसरी, पुणे
[5/28, 1:52 PM]
नव्या युगाचा वाघ तू......
🐆🐆🐆🐆🐆🐆
धगधगती अाग तू
नव्या युगाचा वाघ तू
कर्तव्याला अातातरी
जाग बांधवा जाग तू...॥धृ॥
होरपळतायत बांधव तुझे
दुष्काळाच्या अागीत रेः
न्यायासाठी लढतायतः
विषमतेच्या दरीत रे
न्याय देण्या सर्वांना
जाग बांधवा जाग तू....॥१॥
घुसखोरं घालूनी थैमान
हक्कावर तुझ्या टपले
मुखातला घास तुझ्या
गिळण्यासाठी बसले
धडा शिकवण्या त्यांना
जाग बांधवा जाग तू....॥२॥
कुपोषणाच्या खाईत रे
तव बांधव लोटला जातो
गुलामीचे चटके सांग
कुंठवर तू रे सोसतो
बंध जुल्माचे तोडण्या
जाग बांधवा जाग तू....॥३॥
अस्तित्वावर तुझ्या रे
अाज प्रश्न केला जातो
शूरविरता ओळख खरी
विसरुनी कसा रे जातो
अस्मिता तुझी बाळगण्या
जाग बांधवा जाग तू.....॥४॥
अंधारात खितपत पडल्या
अनंत पिढ्या तुझ्या रे
साद घालती तुजला
हो वाटाड्या तू अाज रे
मात्रभूमिचे ऋण फेडण्या
जाग बांधवा जाग तू.....॥५॥
धगधगती अाग तू
नव्या यूगा वाघ तू......
🎯 मारुती खुडे
(९८२३९२२७०२)
[5/28, 2:38 PM]
+91 96896 75050:
कविता...
मुक्त कविता स्पर्धेसाठी...
‘आठवण'
आठवण तुझीया,
आठवतो पापणी अडूनी।।
दिवस ते पाखरागत,
कसे गेले भुर्कुनउडूनी।।
आठवण तुझी येता,
दिवस ते जूने-जूने।।
तुझे निघून जाणे,
दिवस हे सुने-सुने।।
मनाच्या कोप-यात,
तुझी आठवण आहे।।
धनाशी मतलबकाय,
तीच साठवण आहे।।
आठवण तुझी म्हणजे,
पुस्तकातील मोरपंख।।
आठवण आठवता आज,
मनी होई वेदनेचा डंख।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050
[5/28, 2:48 PM]
+91 94213 45341:
नमस्कार साहित्य दपॅन स्पर्धा साठी
संगीता सपकाळ बीड
राम मी असो की नसो
तु माञ सीता हवीस
माझ्या सारया कृकृत्याना
नजरेआड करण्यासाठी
गंधारी तु व्हावीस
गंधारी तु व्हावीस
दिवसभर नोकलीचा पाहुण्याचा
फाफट पसारा
तुझ्या भोवती असतो
तरी मी तुझ्याकडे पाहिल्यावर
थकवयाचा लवलेश तुझ्या
चेहर्यावर नसतो
प्रेमाने ओथंबून जायचीच
सवय तुच मला लावलीस
राम मी असो की नसो
तु माञ सीता हवीस
माझ्या सारया कृकृत्याना
नजरेआड करण्यासाठी
गंधारी तु व्हावीस
गंधारी तु व्हावीस
घरासाठी मुलासाठी
तु सुसुसंस्कृत आई व्हावीस
राम मी असो की नसो
तु माञ सीत हवीस
नेहमीच मी तुला अपशब्दाने
धोपाटतो
तुझ्या मनाच्या पतंगाचा
दोर मी कापतो
घेऊ दैत नाही मी
तुला मोकळा श्वास
राम मी असो की नसो
तु माञ सीत हवीस
तुला ओलांडून तूला
कोलमनडून साता समूदातुन
आलो मी फिरून तरी
माझ्या कल्पना विलासातली रातराणी होऊन अखंड पणे
माझ्यासाठी सुसुगंध दरवळीत
राहिलीस
राम मी असो की नसो
तु माञ सीता हवीस
संगीता सपकाळ 37
[5/28, 2:56 PM]
+91 90216 09369:
📚साहित्य दर्पण .....
स्पर्धेसाठी (मुक्त कविता )📝
" आशेचा किरण "
जेव्हा आयुष्य असतं
नीरस आणि रंगहीन
जेव्हा मन होवू पाहतं
कोणाच्यातरी अधिन....
जेव्हा आपल्याकडे स्वतःचे
असे काहीच उरत नाही...
बेरजेच्या गणितात आपल्याला
जेव्हा कोणीच धरत नाही....
जेव्हा स्वावलंबनही
बदलतं परावलंबनात
जेव्हा काहूर विचारांचं
माजतं आपल्या मनात....
जेव्हा समोर असूनही
जे आपलं नसतं
जेव्हा आपलंच मन
आपल्याला कोसतं.....
जेव्हा एखादं वादळ येतं
आणि सारंकाही उद्ध्वस्त होतं
जेव्हा आयुष्य या वादळात
कुठेतरी भरकटत जातं......
तेव्हा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी
एक आशेचा किरण लपलेला असतो
जो अशा कठीण प्रसंगांसाठी
कायम मनात जपलेला असतो....!
---जयश्री हातागळे
मो.9021609369
साईनगर
कोंढवा बुदृक
पुणे 48
[5/28, 3:14 PM]
+91 98603 14260:
मुक्त कविता
स्पर्धेसाठी
नाते
नाते म्हणजे काय असते?
नाते जीवनाचा पाया असते.
जीव जन्मताच चिकटते नाते
ते कुणाचे बालक तर कुणाचे भावंड असते
कुणाचा भाचा भाची तर कुणाचे पतवंड
जन्मतःच सुरु होणारे नातेमरणानंरही टिकते
आठवणींच्या हिंदोळ्यावर तसेच झुलत रहाते
नाते असते मायाममतेचे
नाते असते जीवाशिवाचे
नाते असते रक्ताचे
नाते असते मनाचे
नाते असते प्रीतीचे
नाते असते भक्तीचे
मनात नसताना निभावणे
नाते असते सक्तीचे
नात्यात स्वार्थाला नसावा वाव
गैरसमजामुळे नात्यात येतो तणाव
सामंजसौयाचा मार्ग अनुसरावानात्यातला दुरावा हलकेच दूर करावा
अहंकार, वैर,अभिमानाला फाटा द्यावा
स्वाभिमान मात्र अंगी बाळगावा
नात्यात परस्परांचा राखावा मान
कुणी कुणाचा करु नये अपमान
मानवी जन्म एकदाच मिळतो
ऋणानुबंधाने नात्यांचा धागा जुळतो
जुळलेले नाते टिकवणे असते स्त्री च्या हाती
जिने ते नाते टिकवले
तिची जगात होते कीर्ती
प्राची देशपांडे
🍁स्पर्धेसाठी🍁
कविता : मातीचं दुखणं...
कुणी सोडलं हसणं
कुणी सोडलं फुलणं...
कसं सांगू मी शब्दात
काळ्या मातीचं दुखणं...
तिच्या कोरड्या ओठांची
तृष्णा व्याकूळ झालेली...
भूक संयम राखून
तिच्या उरी निजलेली...
झाली विहीर बेअब्रू
नदी उघडी पडली...
पाण्याविना या मातीची
सारी लेकरं रडली...
तिला इतुका दिलासा
रात्री चंद्रमा शितल...
पण निजू देत नाही
तिला दुष्काळाची सल...
भेगा मातीच्या लिपाया
यावं आभाळ दाटून...
जावे मातीचे मातीत
कण कण मिसळून...
..... निलेश कवडे अकोला
✍🏻✍🏻✍🏻@ 44.
[5/28, 4:18 PM]
+91 84220 89666
मुक्त काव्य स्पर्धेसाठी
**********************
लग्न
÷÷÷÷
हिरवाईचा मऊ दुशेला,घेत पांघरुन तनूवरी
आज शोभते वसुंधराही,सलज्जनयना नवीनवरी
सूर्य पित्याने योजियला वर मेघ सावळा तिजसाठी
नवथर अवनी शालू ल्याली, तृणांकुराचा जरीकाठी
इंद्रधनुचे तोरण साजे, मंडपास या आकाशा
अनेक नक्षत्रांच्या राशी शोभिवंत करी जानवसा
नवबंधूही कमर बांधुनी, करी लग्नाची तय्यारी
चंद्र चांदण्या लगबग धावत, कुणी येतसे धरेवरी
वीज घेऊनी तेज करितसे, लखलखाट हा दीपांचा
ताशा गरजत सूर आळवी, सुमधुर ऐशा सनईचा
दाट धुक्याचाा अंतःपट हा मध्ये धरिती आठ दिशा
ऊर्ध्वा अधरा विहिणी शोभत, सजून बसल्या मोहकशा
लग्न लावण्या सावध सारे, अक्षत घेऊन सर आली
पडली अलगद अंगावरती क्षमा वधू का बावरली
देण्या आशिष वरीष्ठ आले,अश्रू जमले नेत्रांशी
क्षितीजावरती मीलन झाले, वसुंधरेचे मेघाशी !!
@@@@@@@@@
सुनंदा पाटील
[5/28, 4:39 PM]
+91 86980 67566
🙈🙉 सावळीचा घोर🙉🙈
सावळया रंगाची
कोवळी पोर
घरामधी....
जीवाला घोर
आई बेजार
रानामधी....
नाना विकल्प मनी
घरात नाहीत धनी
वाटती भिती....
टपल बोका
पावलावर धोका
जातीला पोरीच्या...
भांडं काचेच बाई
म्हणती करावी घाई
लग्नाची तिच्या...
बाईचं जीनं
लाजीरवानी
अनवानी चालनं तसचं...
काळा माघुन काळ
बदलतो जरी रोज
छळण्यातही नाविण्य यांच्या...
सुपीक डोक्यातही
कुजकेच विचार
अचार कांही बदलत नाही....
बदलुन वेश
वावरतात चोर
म्हणूनच वाटतोय जीवाला घोर.....!!
श्री.पडवळ हणमंत
उपळे ( मा.)ताउस्मानाबाद.
8698067566
[5/28, 4:45 PM]
+91 98702 51951
स्पर्धेसाठी,
मुक्त कविता
" शब्द"
शब्द म्हणजे अस्त्र,
शब्द म्हणजे शस्त्र,
अनेकविध छटांचे,
. जणू गुंफलेले वस्त्र!
शब्द शैशवामधले,
बोबडे बोल होतात,
दुडुदुडु रांगत- रांगत,
मन गुंतवून टाकतात!
वात्सल्याची झूल पांघरून,
मायेची उब घेउन,
हेच शब्द ममतेचे,
निर्व्याज प्रेम देतात!
तर कधी हेच शब्द,
वासंतिक होतात,
प्रितीच्या वर्षावानी,
कोमल सायली होतात!
शब्द जटाधारी कधी,
उग्र रूप होतात,
तप्त निखार्याची आग ओकत,
भस्म करून जातात!
आयुष्याच्या अस्ताला,
शब्द मूक होतात,
निराकार,निर्विकार,
आत्मरूप पाहतात!!!
स्वाती केळकर, @७१
दादर, मुंबई २८
####################
[5/28, 4:52 PM]
+91 99214 24125
* स्पर्धेसाठी *
🇮🇳 तुझ्या प्रतीक्षेत🇮🇳
देशाचा रे तु सैनिकं **
तुझी देशाला रे आसं
मन खचून ते जातं
अरे, तुझ्या प्रतीक्षेत**
तुझं तान्हुलं लाडकं*
आठवण ते काढतं
अभिमानाने जगतं
तोही तुझ्या प्रतीक्षेत***
नभ ओथंबून येत
मनी सावटं दाटतं
जीव लागला वाटेतं
तुझ्या प्रतीक्षेत***
माय बाप ते विरतं *
आसवान्ना थारा देतं
जीव घेऊन मुठीतं
उभे तुझ्या प्रतीक्षेत***
तुझ्या पाठीशी रे देवं*
देशाला रे पण वाचवं
क्षण।साठी परत गावातं ,
सारे तुझ्याच प्रतीक्षेतं***
🍁वृषाली वानखडे🍁
*75*
🌴अमरावती🌴
[5/28, 4:58 PM]
+91 94228 84140
🍁 स्पर्धेसाठी🍁
===================
🌹पाप-ण्या🌹
~~~~~~~~~~~~~~~~
पापण्या ह्या तुझ्या का झुकतात ?
आठवुन भुतकाळ ह्या का ओलावतात,
सर्व तुज पाशी असतांना ह्या-
सदैव कुणाला शोधतात?
कितीतरी वेळा गुलमोहर हा
मोहरुन गेला परी
आठवणी तुझ्या नेहमिच
शिषिराच्या आठवणीच का देतात?
डोळे तुझे नी माझे , भिडता
नजरेस नजर मिळता तार मनाच्या जुळता
ह्या भेदाच्या भिंत्ती का उसळतात ?
सांगून तू मज गेला, तो शब्दांचा भास होता,
अर्थ तुझ्या बोलण्याचा मात्र
या समाजाचा एक घाव होता
इथे न कळले प्रेम कुणाला
जो तो उन्मत्त ,मस्तावला होता
जीव जो जळत होता तो, त्यांच्याच आपल्यांचा होता
हात जोडून मंदिरात मागतात जे मागणे
का ? मंदिराच्या प्रांगणात आज
हातात त्यांच्याच नंग्या तलवारी होत्या?
डोळ्यात आता तुझ्या नी माझ्या
भंगलेली स्वप्ने होती ,पण
पण , मान्यवरांच्या मात्र
इमारती मजबुत होत्या
===================
*सौ* *मंजुषा* *देशमुख* @४०
*अमरावती*
९४२२८८४१४०
===================
[5/28, 4:59 PM]
+91 94035 93764
*तू पुरुष....मी स्त्री*
गप्प बस बोललास
गप्प झाले...
आता का म्हणतोस
शांत का बसलीस
मुकी आहेस काय
नाचव तू मी नाचते
हसव तू मी हसते
म्हण चल फ़िरायला जायचे
दोन मिनीटात मी तयार
मी थकलो...चल तूझे चेपते पाय
आज तू खुश दिसतोस
बढती मिळाली की काय
वाह!! मी पण होते खुश
माझ्या डोळ्यात वाचतोस कधी
आनंद...दुख: ...
अंध नजरेने ओरबाडून घेतोस ..
ऐकलास कधी माझा करुण "स्वर"
हो मी कठपूतली रे तुझी
काय वाटेल ते तूझ्या मर्जीने
काय नको ते तुझ्याच मर्जीने
काहुर हुरहुर मन चेतना
हे शब्द नाहीच का रे तूला माहीत?
हेच शब्द आहेत ठाऊक तूला!
तू *पुरुष*अन मी *स्त्री*
सौ सुभद्रा खेडकर
बीड
क्र 20
(स्पर्धेसाठी)
No comments:
Post a Comment